|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ६ वा - अन्वयार्थ
देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन - राजन् - हे परीक्षित राजा - सुरगणैः - देवगणांनी - एवं - याप्रमाणे - स्तुतः - स्तविलेला - सहस्रार्कोदयद्युतिः - हजार सूर्यांच्या उदयाप्रमाणे कांति असलेला - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - हरिः - सर्वांची दुःखे हरण करणारा - ईश्वरः - परमेश्वर - तेषां - त्यांच्यासमोर - आविरभूत् - प्रगट झाला. ॥१॥ तेन - त्या - महसा एव - तेजानेच - प्रतिहतेक्षणाः - ज्यांचे नेत्र दिपून गेले आहेत असे - सर्वे - सर्व - देवाः - देव - खं - आकाशाला - दिशः - दिशांना - क्षोणिं - पृथ्वीला - च - आणि - आत्मानं - स्वतःला - न अपश्यन् - पाहू शकले नाहीत. - विभुं - परमेश्वराला - कुतः (पश्येयुः) - कोठून पाहणार ॥२॥ शर्वेण सह - शंकरासह - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - विरिञ्चः - ब्रह्मदेव - स्वच्छां - स्वच्छ - मरकतश्यामां - पाचूच्या मण्याप्रमाणे हिरव्या वर्णाच्या - कञ्जगर्भारुणेक्षणां - कमळाच्या गाभ्याप्रमाणे जिचे नेत्र आरक्तवर्णाचे आहेत - तप्तहेमावदातेन - तापलेल्या सुवर्णाप्रमाणे पिवळ्या - लसत्कौशेयवाससा (युक्तां) - तेजस्वी रेशमी वस्राने युक्त अशा - प्रसन्नचारुसर्वाङ्गिं - शांत व सुंदर आहेत सर्व अवयव जीचे अशी - सुमुखीं - सुंदर मुखाच्या - सुंदरभ्रुवं - सुंदर भुवयांच्या - महामणिकिरीटेन - महामोल रत्नांच्या मुकुटाने - च - आणि - केयूराभ्यां - दोन पोच्यांनी - भूषितां - शोभिवंत केलेल्या - कर्णाभरणनिर्भातकपोलश्रीमुखाम्बुजां - कानांतील कुंडलामुळे चकाकणार्या गालांनी ज्याच्या मुखकमलाला शोभा आली आहे अशा - तां - त्या - तनुम् - मूर्तीला - दृष्ट्वा - पाहून ॥३-५॥ काञ्चीकलापवलयहारनूपुरशोभिताम् - कमरपटटा, कडी, हार, पैंजणे, ह्यांनी शोभणार्या - कौस्तुभाभरणाम् - कौस्तुभमणि आहे अलंकार जीवर अशा - लक्ष्मीं - लक्ष्मीला - बिभ्रतीं - धारण करणार्या - वनमालिनीम् - ज्याने वनमाला धारण केली आहे अशा - मूर्तिमद्भिः - मूर्तिमंत - सुदर्शनादिभिः - सुदर्शनादिक - स्वास्रैः - स्वतःच्या अस्रांनी - उपासितां - सेविलेल्या - सशर्वः - शंकरासह - देवप्रवरः - ब्रह्मदेव - सर्वामरगणैः साकं - सर्व देवांसह - अवनिं गतैः सर्वाङ्गैः - पृथ्वीवर टेकलेल्या सर्व अवयवांनी लोटांगण घालून - परं पुरुषं - श्रेष्ठ पुरुषाला - तुष्टाव - स्तविता झाला. ॥६-७॥ अगुणाय - निर्गुण - अजातजन्मस्थितीसंयमाय - जन्म, स्थिती, व संहार ज्याला नाहीत अशा - निर्वाणसुखार्णवाय - मोक्षसुखाचा समुद्र - अणोःअणिम्ने - परमाणूपेक्षाही लहान अशा - अपरिगण्यधाम्ने - ज्याचे तेज मोजता येणार नाही अशा - महानुभावाय - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा - ते - तुला - नमोनमः - वारंवार नमस्कार असो. ॥८॥ पुरुषर्षभ - हे पुरुषश्रेष्ठा - धातः - हे जगत्पालका ईश्वरा - तव - तुझे - एतत् - हे - रूपं - स्वरूप - श्रेयोर्थिभिः - कल्याणाची इच्छा करणार्यांनी - वैदिकतान्त्रिकेण - वैदिक व तांत्रिक अशा - योगेन - उपासना पद्धतीने - सदा - नेहमी - ईज्यं (अस्ति) - पूजनीय आहे - उह - खरोखर - अमुष्मिन् विश्वमूर्तौ - ह्या विश्वरूपी तुझ्या शरीरात - त्रिलोकान् - त्रैलोक्याला - च नः - आणि आम्हाला - सह - एकत्र - पश्यामि - मी पाहतो. ॥९॥ इदं - हे जग - अग्रे - प्रथम - आत्मतन्त्रे - स्वतंत्र अशा - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आसीत् - होते - मध्ये - मध्ये - त्वयि - तुझ्या मध्ये - आसीत् - होते - अन्ते - शेवटी - त्वयि - तुझ्या ठिकाणी - आसीत् - होते - मृत्स्रा - माती - घटस्य इव - जसा घटाचा आदि, मध्य व अंत असतो त्याप्रमाणे - परस्मात् - प्रकृतीहूनही - परः त्वं - श्रेष्ठ असा तू परमेश्वर - अस्य - ह्या - जगतः - जगाचा - आदिः - आदि - मध्यम् - मध्य - अंतः - अंत. ॥१०॥ त्वं - तू - आत्माश्रयया - आत्म्याचा आश्रय करून राहिलेल्या - स्वया - स्वतःच्या - मायया - मायेने - इदं विश्वं - ह्या जगाला - निर्माय - उत्पन्न करून - तत् अनुप्रविष्टः (असि) - त्यात शिरला आहेस - युक्ताः - योगमुक्त - मनीषिणः - बुद्धिमान - विपश्चितः - ज्ञानी पुरुष - गुणव्यवाये - गुणांच्या परिणामात - अपि - सुद्धा - अगुणं - निर्गुण असे - मनसा - मनाने - पश्यन्ति - पाहतात. ॥११॥ मनुष्याः - मनुष्य - यथा - ज्याप्रमाणे - एधसि - काष्ठामध्ये - अग्निं - अग्नीला - च - आणि - गोषु - गाईच्या ठिकाणी - अमृतं - दुग्धाला - भुवि - पृथ्वीच्या ठिकाणी - अन्नं - अन्नाला - च - आणि - अम्बु - पाण्याला - उद्यमने - उद्योगामध्ये - वृत्तिं - उपजीविकेला - योगैः - अनुरूप अशा कर्मांनी - हि - खरोखर - अधियन्ति - मिळवितात - कवयः - ज्ञानी पुरुष - बुद्ध्या - बुद्धीने - गुणेषु - गुणांच्या ठिकाणी - त्वां - तुला - वदन्ति - वर्णितात. ॥१२॥ नाथ - हे स्वामी - सरोजनाभ - हे पद्मनाभ परमेश्वरा - सर्वे - सर्व - वयं - आम्ही - अद्य - आज - अतिचिरेप्सितार्थं - फार दिवसांपासून इच्छिलेल्या अशा - तं - त्या - समुज्जिहानं - उत्तम रीतीने प्रगट होणार्या - त्वां - तुला - दृष्ट्वा - पाहून - दवार्ताः - वणव्याने पीडिलेले - गजाः - गज - गाङगम् अम्भः इव - गंगोदकाला पाहून जसे तसे - निर्वृतिं - सुखाला - गताः - प्राप्त झाले. ॥१३॥ अंतरात्मन् - आमच्या अंतर्यामी राहणार्या हे ईश्वरा - सः - तो - त्वं - तू - वयं अखिललोकपालाः - आम्ही सर्व लोकपाल असे - यदर्थाः - ज्या इच्छेने - तव पादमूलं - तुझ्या चरणाजवळ - समागताः - प्राप्त झालो - तं अर्थं विधत्स्व - ती आमची इच्छा पूर्ण कर - अशेषसाक्षिणः ते - सर्वत्र साक्षीरूपाने राहणार्या तुला - बहिः - बाहेर - अन्यविज्ञाप्यं - दुसर्यांना सांगण्याजोगे - किं वा (अस्ति) - काय आहे बरे. ॥१४॥ ईश - हे परमेश्वरा - अहं - मी - गिरित्रः - शंकर - च - आणि - सुरादयः - देवादिक - ये - जे - दक्षादयः - दक्ष आदिकरून - अग्नेः - अग्नीच्या - केतवः इव - ठिणग्याप्रमाणे - पूथक् - वेगवेगळे - विभाताः - चमकत आहो - ते - ते - शं - कल्याण - किं वा - कसे बरे - विदाम - जाणू - नः - आमच्या - द्विजदेवमन्त्रं - ब्राह्मण व देव ह्या विषयींचे कार्य - विधत्स्व - कर.॥१५॥ विरिञ्चादिभिः - ब्रह्मादिदेवांनी - एवं - याप्रमाणे - ईडितः - स्तविलेला - तेषां - त्यांचे - तत् - ते - हृदयं - अंतःकरण - तथा एव - त्याचप्रमाणे - विज्ञाय - जाणून - बद्धाञ्जलीन् - हात जोडलेल्या - संवृतसर्वकारकान् - सर्व इंद्रियांचा निग्रह केलेल्या - जीमूतगभीरया - मेघगर्जनेप्रमाणे गंभीर अशा - गिरा - वाणीने - जगाद - म्हणाला. ॥१६॥ तस्मिन् सुरकार्ये - त्या देवांच्या कार्याविषयी - एकः एव ईश्वरः - एकटाच समर्थ असा - सुरेश्वरः - परमेश्वर - समुद्रोन्मथनादिभिः - समुद्रमंथनादि कर्मांनी - विहर्तुकामः - क्रीडा करण्याची इच्छा करणारा असा - तान् - त्या ब्रह्मादि देवांना - आह - म्हणाला. ॥१७॥ हंत ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - अहो शंभो - हे शंकरा - हे देवाः - हे देवहो - सर्वे - सर्व - सुराः - देव - अवहिताः - एकाग्रचित्ताने - यथा - ज्यायोगे - वः - तुमचे - श्रेयः - कल्याण - स्यात् - होईल - मम भाषितं - माझे भाषण - शृणुत - ऐका. ॥१८॥ यात - जा - यावत् - जेव्हा - वः - तुमचा - आत्मनः - स्वतःचा - भवः (आगच्छति) - उर्जित काळ येईल - तावत् - तोपर्यंत - कालेन - काळाने - अनुगृहीतैः तैः - अनुग्रह केलेल्या त्या - दानवदैतेयैः - दानव व दैत्य यांच्याशी - संधिः - संधि - विधीयतां - करा. ॥१९॥ देवाः - देव हो - कार्यार्थगौरवे सति - साधावयाचे कार्य मोठे असता - अर्थस्य पदवीं गतैः - कार्याच्या उद्योगाला लागलेल्यांकडून - अहिमूषकवत् - साप जसा उंदराशी त्याप्रमाणे - अरयः अपि - शत्रूसुद्धा - हि - खरोखर - संधेयाः - संधि करण्यास योग्य आहेत. ॥२०॥ अविलम्बितं - लवकर - अमृतोत्पादने - अमृत उत्पन्न करण्याविषयी - यत्नः क्रियतां - प्रयत्न करा. - यस्य पीतस्य - जे अमृत प्राशन केले असता - मृत्यूग्रस्तः जंतुः - मृत्यूने गिळलेला प्राणी - वै - खरोखर - अमरः - अमर - भवेत् - होईल. ॥२१॥ देवाः - देव हो - क्षीरोदधौ - क्षीरसमुद्रात - सर्वाः वीरुत्तृणलतौषधीः - सर्व वेली, गवत, लता व औषधी ह्यांना - क्षिप्त्वा - टाकून - मंदरं - मंदरपर्वताला - मंथानं - रवी - कृत्वा - करून - वासुकिं तु - वासुकि सर्पाला तर - नेत्रं - दोरी - कृत्वा - करून - सहायेन मया - साहाय्य करणार्या माझ्यासह - अतन्द्रिताः - आळस सोडून - (सागरं) निर्मंथध्वं - समुद्र घुसळा - दैत्याः - दैत्य - क्लेशभाजः - क्लेश भोगणारे - भविष्यन्ति - होतील - यूयं - तुम्ही - फलग्रहाः - फळ घेणारे. ॥२२-२३॥ सुराः - देव हो - यत् - जे - असुराः - दैत्य - इच्छन्ति - इच्छितील - तत् यूयं अनुमोदध्वं - त्याला तुम्ही संमति द्या - यथा - ज्याप्रमाणे - सर्वे - सर्व - अर्थाः - इष्ट मनोरथ - सांत्वया - गोडीगुलाबीने - सिध्द्यन्ति - सिद्धीस जातात - संरंभेण - द्वेषाने - न (सिध्द्यन्ति) - सिद्धीस जात नाहीत. ॥२४॥ जलधिसंभवात् - समुद्रापासून उत्पन्न होणार्या - कालकुटात् विषात् - कालकूट विषाला - न भेतव्यं - भिऊ नका - वः - तुमच्याकडून - जातु - कधीही - वस्तुषु - पदार्थाच्या ठिकाणी - लोभः - लोभ - रोषः - क्रोध - तु - त्याचप्रमाणे - कामः - इच्छा - न कार्यः - केली जाऊ नये. ॥२५॥ राजन् - हे परीक्षित राजा - स्वच्छन्दगतिः - स्वेच्छेने गमन करणारा - ईश्वरः - ऐश्वर्यसंपन्न - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - पुरुषोत्तमः - महाविष्णु - इति - याप्रमाणे - देवान् - देवांना - समादिश्य - सांगून - तेषां - त्यांच्या समक्ष - अन्तर्दधे - गुप्त झाला. ॥२६॥ अथ - नंतर - पितामहः - ब्रह्मदेव - च - आणि - भवः - शंकर - तस्मै भगवते - त्या षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा परमेश्वराला - नमस्कृत्य - नमस्कार करून - स्वं स्वं धाम - आपापल्या स्थानाला - जग्मतुः - गेले - सुराः - देव - बलिं - बलिराजाकडे - उपेयुः - गेले.॥२७॥ संधिविग्रहकालवित् - संधि व युद्ध यांचा योग्य काळ जाणणारा - श्लोक्यः - स्तुत्य - दैत्यराट् - दैत्यांचा राजा बलि - असंयत्तान् अपि - युद्धाकरिता उद्युक्त नसलेल्या सुद्धा - अरीन् - शत्रूंना - दृष्ट्वा - पाहून - जातक्षोभान् - खवळून गेलेल्या - स्वनायकान् - आपल्या सेनापतींना - न्यषेधत् - निषेधिता झाला.॥२८॥ ते - ते देव - असुरयूथपैः - दैत्यसंघांच्या नायकांनी - गुप्तं - रक्षिलेल्या - च - आणि - परमया - सर्वोत्कृष्ट अशा - श्रिया - राज्यलक्ष्मीने - जुष्टं - सेविलेल्या - जिताशेषं - संपूर्ण त्रैलोक्य ज्याने जिंकले आहे अशा - आसीनं - सिंहासनावर बसलेल्या - वैरोचनिं - विरोचनाचा पुत्र अशा बलिराजाजवळ - उपागमन् - आले. ॥२९॥ महामतिः - मोठा बुद्धिवान - महेंद्रः - इंद्र - श्लक्ष्णया - मधुर अशा - वाचा - शब्दांनी - सांत्वयित्वा - शांत करून - पुरुषोत्तमात् शिक्षितं तत् सर्वं - परमेश्वरापासून शिकलेले ते सर्व - अभ्यभाषत - सांगता झाला. ॥३०॥ तत् - ते इंद्राचे भाषण - दैत्यस्य - बलिराजाला - अरोचत - आवडले - तत्र - तेथे - अन्ये - दुसरे - ये - जे - असुराधिपाः - दैत्यपति - च - आणि - शंबरः - शंबर - अरिष्टनेमिः - अरिष्टनेमि - च - आणि - ये - जे - त्रिपुरवासिनः (आसन्) - तीन नगरांत राहणारे होते॥३१॥ परंतप - हे शत्रुतापना - ततः - नंतर - कृतसौहृदाः - मैत्री केलेले - देवासुराः - देव व दैत्य - संविदं - संकेत - कृत्वा - करून - अमृतार्थे - अमृतप्राप्तीकरिता - परमं उद्यमैमं - मोठा उद्योग - चक्रुः - करते झाले. ॥३२॥ ततः - नंतर - शक्ताः - समर्थ - परिघबाहृवः - अडसरांसारखे दंड असणारे - दुर्मदाः - मदाने धुंद झालेले - ते - ते देव व दैत्य - ओजसा - शक्तीने - मन्दरगिरिं - मंदर पर्वताला - उत्पाटय - उपटून - नन्दतः - गर्जना करणारे - उदधिं - समुद्राकडे - निन्युः - नेऊ लागले. ॥३३॥ दूरभारोद्वहश्रान्ताः - दूरपर्यंत ओझे नेल्यामुळे दमलेले - शक्रवैरोचनादयः - इंद्र, बलि, इत्यादि - तं - त्या मंदरपर्वताला - वोढुं - वाहून नेण्यास - अपारयन्तः - असमर्थ असे होत्साते - विवशाः - निरुपाय झाल्यामुळे - पथि - वाटेतच - विजहुः - टाकिते झाले. ॥३४॥ तत्र - तेथे - निपतन् - पडणारा - सः कनकाचलः गिरिः - तो सोन्याचा मंदरपर्वत - महता भारेण - मोठया भारामुळे - बहून् - पुष्कळ - अमरदानवान् - देव व दानव यांना - चूर्णयामास - चुरडता झाला. ॥३५॥ गरुडध्वजः - गरुडवाहन - भगवान् - परमेश्वर - तान् - त्या देवदैत्यांना - तथा - तशा रीतीने - भग्नमनसः - निराश झालेले - भग्नःबाहूकन्धरान् - मांडया, बाहू, व माना मोडून गेल्या आहेत ज्यांच्या असे झालेले - विज्ञाय - जाणून - तत्र - तेथे - बभूव - प्रगट झाला. ॥३६॥ गिरिपातविनिष्पिष्टान् - अंगावर पर्वत पडल्यामुळे चुरून गेलेल्या - अमरदानवान् - देव व दानव ह्यांना - विलोक्य - पाहून - यथा - जशा रीतीने - निर्जरान् - देव - निर्व्रणान् - व्रणरहित होतील - ईक्षया - अवलोकनाने - जीवयामास - जिवंत करिता झाला. ॥३७॥ लीलया - सहजरीतीने - एकेन - एका - हस्तेन - हाताने - गिरिं - मन्दरपर्वताला - गरुडे - गरुडावर - आरोप्य - ठेवून - च - आणि - आरुह्य - स्वतः चढून - सुरासुरगणैः - देव व दैत्य ह्यांच्या समुदायांनी - वृत्तः - वेष्टिलेला - अब्धिं - क्षीरसमुद्राकडे - प्रययौ - जाउ लागलाच ॥३८॥ पततां वरः - पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ असा - सः सुपर्णः - तो गरुड - स्कंधात् - खांदयावरून - गिरिं - मंदरपर्वताला - अवरोप्य - खाली उतरवून - जलान्ते - पाण्याजवळ - उत्सृज्य - ठेवून - हरिणा विसर्जितः - श्रीविष्णूने जाण्याची आज्ञा दिलेला - ययौ - निघून गेला. ॥३९॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय सहावा समाप्त |