श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ८ वा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ

देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवतांची स्तुती -

राजन् - हे परीक्षित राजा - अधनाशनं - पातकाचा नाश करणारे - एतत् - हे - पुण्यं - पुण्यकारक - गजेंद्रमोक्षणं - गजेंद्रमोक्षसंबंधी - हरेः - भगवंताचा - कर्म - पराक्रम - ते - तुला - उदितं - सांगितला - तु - आता - रैवतं - रैवत नावाचे - अन्तरं - मन्वन्तर - शृणु - ऐक. ॥१॥

तामससोदरः - तामस मनूचा भाऊ - रैवतः नाम - रैवत नावाचा - पञ्चमः - पाचवा - मनुः (आसीत्) - मनु होता - अर्जुनपूर्वकाः - ज्यात अर्जुन वडील आहे असे - बलिविंध्यादयः - बलि, विंध्य आदिकरून - तस्य - त्या रैवतमनूचे - सुताः (आसन्) - पुत्र होत. ॥२॥

राजन् - हे परीक्षित राजा - विभुः - विभु - इंद्रः आसीत् - इंद्र होता - भूतरयादयः - भूतरय आदिकरून - सुरगणाः (आसन्) - देवसंघ होते - हिरण्यरोमा - हिरण्यरोमा - वेदशिराः - वेदशिरा - ऊर्ध्वबाह्वादयः - ऊर्ध्वबाहु आदिकरून - द्विजाः (आसन्) - ब्रह्मर्षि होते. ॥३॥

शुभ्रस्य - शुभ्राची - विकुंठा - विकुंठा नावाची - पत्नी (आसीत्) - भार्या होती - तयोः - त्या दोघांच्या पोटी - भगवान् वैकुंठः - भगवान श्रीविष्णु - स्वयं - स्वतः - वैकुंठेः - वैकुंठनामक - सुरसत्तमैः - श्रेष्ठ देवांसह - स्वकलया - आपल्या अंशाने - जज्ञे - जन्मास आला. ॥४॥

देव्या रमया - देवी लक्ष्मीने - प्रार्थ्यमानेन येन - प्रार्थना केलेल्या ज्या वैकुंठाने - तत्प्रियकाम्यया - त्या लक्ष्मीचे प्रिय करण्याच्या इच्छेने - लोकनमस्कृतः - सर्व लोकांनी वंदन केलेला - वैकुंठःलोकः - वैकुंठ नावाचा लोक - कल्पितः - निर्माण केला.॥५॥

तस्य - त्या विष्णूचा - अनुभावः - पराक्रम - कथितः - सांगितला - च - आणि - परमोदयाः - मोठा उत्कर्ष ज्यात आहे असे - गुणाः - ऐश्वर्यादि गुण - यः - जो - विष्णोः - श्रीविष्णूच्या - गुणान् - गुणांना - वर्णयेत् - वर्णील - सः - तो - भौ‌मान् - पृथ्वीचे - रेणून् - रजःकण - विममे - मोजिता झाला. ॥६॥

चक्षुषः - चक्षूचा - पुत्रः - पुत्र - वै - खरोखर - चाक्षुषः नाम - चाक्षुष नावाचा - षष्ठः - सहावा - मनुः (आसीत्) - मनु होता - च - आणि - पूरुपूरुष सुद्युम्नप्रमुखाः - पूरु, पूरुष सुद्युम्न हे आहेत मुख्य ज्यामध्ये असे - चाक्षुषात्मजाः (आसन्) - चाक्षुषाचे मुलगे होते. ॥७॥

राजन् - हे परीक्षित राजा - तत्र - त्या चाक्षुष मन्वन्तरामध्ये - मन्त्रद्रुमः - मंत्रद्रुम - इंद्रः (आसीत्) - इंद्र होता - आप्यादयः गणाः - आप्य आदिकरून संघ - देवाः (आसन्) - देव होते - तत्र - त्यात - वै - खरोखर - हविष्मद्वीरकादयः - हविष्मान, वीरक इत्यादि - मुनयः (आसन्) - ऋषि होत. ॥८॥

तत्र - त्या मन्वन्तरात - अपि - सुद्धा - देवः - देव - भगवान् - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न - जगतः पतिः - त्रैलोक्याधिपति विष्णु - वैराजस्य - वैराजाच्या - संभूत्यां - संभूतिनामक भार्येच्या पोटी - अंशेन - अंशाने - अजितः नाम - अजित नावाचा - सुतः - पुत्र - अभवत् - झाला. ॥९॥

येन - ज्याने - पयोधिं - समुद्राला - निर्मथ्य - मंथून - सुराणां - देवांना - सुधा - अमृत - साधिता - मिळवून दिले - अंभसि - उदकात - भ्रममाणः - फिरणारा - मंदरः - मंदरपर्वत - कूर्मरूपेण - कूर्मरूपाने - धृतः - उचलून धरिला. ॥१०॥

ब्रह्मन् - हे शुकाचार्य - भगवता - भगवान विष्णूने - क्षीरसागरः - क्षीरसमुद्र - यथा - जशा रीतीने - वा - किंवा - यदर्थं - ज्या कारणाकरिता - मथितः - मथिला - यतः च - ज्या कारणास्तव - अम्बुचरात्मना - कूर्मस्वरूपाने - अद्रिं - मंदर पर्वताला - दधार - धरिता झाला. ॥११॥

सुरैः - देवांनी - यथा - जशारीतीने - अमृतं - अमृत - प्राप्तं - मिळविले - च - आणि - ततः - त्यापासून - अन्यत् - दुसरे - किं - काय - अभवत् - उत्पन्न झाले - एतत् - हे - भगवतः - श्रीविष्णूचे - परमाद्भुतं - अत्यंत आश्चर्यजनक - कर्म - कर्म - वदस्व - आम्हाला सांग. ॥१२॥

त्वया - तुझ्याकडून - संकथ्यमानेन - वर्णिल्या जाणार्‍या - सात्वतांपतेः - भक्तरक्षक भगवंताच्या - महिम्ना - माहात्म्याने - सुचिरं - पुष्कळ काळपर्यंत - तापतापितं - त्रिविध तापाने तापलेले - मे - माझे - चित्तं - अंतःकरण - न अतितृप्यति - अत्यंत तृप्त होत नाही. ॥१३॥

द्विजाः - हे शौनकादि ऋषिहो - एवं - याप्रमाणे - संपृष्टः - विचारलेला - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - द्वैपायनसुतः - व्यासपुत्र शुक - (नृपं) अभिनंद्य - राजाचे अभिनंदन करून - हरेः वीर्यं - भगवंताचा पराक्रम - अभ्याचष्टुं - सांगण्यास - प्रचक्रमे - प्रारंभ करिता झाला. ॥१४॥

यदा - जेव्हा - युद्धे - युद्धामध्ये - असुरैः - दैत्यांनी - शितायुधैः - तीक्ष्ण आयुधांच्यायोगे - बाध्यमानाः - पीडिलेले - देवाः - देव - गतासवः - गतप्राण झालेले असे - निपतिताः - पडले - भूयशः (च) - आणि पुनः - न उत्तिष्ठेरन् स्म - उठू शकले नाहीत. ॥१५॥

नृप - हे परीक्षित राजा - यदा - जेव्हा - दुर्वाससः - दुर्वास ऋषीच्या - शापात् - शापामुळे - सेन्द्राः - इंद्रासह - त्रयः - तीन - लोकाः - लोक - निःश्रीकाः - ऐश्वर्यरहित - अभवन् - झाले - च - आणि - तत्र - तेथे - इज्यादयः - यज्ञादिक - क्रियाः - कर्मे - नेशुः - नष्ट झाली. ॥१६॥

(तदा) महेन्द्रवरुणादयः - तेव्हा इंद्र, वरुण आदिकरून - सुरगणाः - देवसमूह - एतत् - हे - निशाम्य - पाहून - स्वयं - स्वतः - मन्त्रैः - मसलतींनी - मन्त्रयंतः - विचार करीत बसले असता - विनिश्चयं - निश्चयाला - न अध्यगच्छन् - प्राप्त झाले नाहीत.॥१७॥

ततः - नंतर - सर्वशः - सर्व मिळून - मेरोः मूर्धनि - मेरु पर्वताच्या शिखरावर - ब्रह्मसभां - ब्रह्मदेवाच्या सभेत - जग्मुः - गेले - परमेष्ठिने - ब्रह्मदेवाला - प्रणताः - नम्र झालेले असे - सर्वं - संपूर्ण वृत्त - विज्ञापयांचक्रुः - निवेदन करिते झाले. ॥१८॥

सः - तो - विभुः - सर्वव्यापी ब्रह्मदेव - इंद्रवाय्वादीन् - इंद्र, वायु इत्यादिकांना - निःसत्त्वान् - निर्बळ - विगतप्रभान् - निस्तेज - लोकान् - लोकांना - अमङगलप्रायान् - बहुतांशी अमंगळ झालेल्या - असुरान् - दैत्यांना - अयथा - देवांच्या उलट स्थितीत - विलोक्य - पाहून - समाहितेन मनसा - एकाग्र अंतःकरणाने - परं पुरुषं - परमेश्वराला - संस्मरन् - आठवीत - सः - तो - परः भगवान् - श्रेष्ठ ब्रह्मदेव - उत्फुल्लवदनः - प्रफुल्लित आहे मुख ज्याचे असा - देवान् - देवांना - उवाच - म्हणाला.॥१९-२०॥

अहं - मी ब्रह्मदेव - भवः - शंकर - यूयं - तुम्ही - अथो - त्याचप्रमाणे - असुरादायः - दैत्य आदिकरून - मनुष्यतिर्यग्द्रुमघर्मजातयः - मनुष्य, पशु, पक्षी, वृक्ष, ढेकूण आदिकरून स्वेदज जाती - तस्य अवतारांशकलाविसर्जिताः (सन्ति) - त्या परमेश्वराचा अवतार जो विष्णु त्याचा अंश जो ब्रह्मदेव त्याचे अंश जे मरीचि आदिकरून प्रजापति त्यांपासून झालेल्या आहेत - सर्वे - सर्व आपण - तं अव्ययं - त्या अविनाशी परमेश्वराला - शरणं व्रजाम - शरण जाऊ. ॥२१॥

यस्य - ज्या परमेश्वराला - वध्यः - वघार्ह - न - नाही - न च रक्षणीयः - आणि रक्षणार्हहि नाही - उपेक्षणीयादरणीयपक्षः - अमका उपेक्षा करण्याजोगा व अमका सत्कार करण्याजोगा असा भेदभाव - न - नाही - अथापि - तरीही - काले - योग्य वेळी - सर्गस्थितिसंयमार्थं - उत्पत्ति, रक्षण व संहार करण्याकरिता - (सः) रजःसत्त्वतमांसि धत्ते - तो रजोगुण, सत्त्वगुण व तमोगुण धारण करितो.॥२२॥

देहिनां भवाय - प्राणिमात्रांच्या उत्कर्षाकरिता - सत्त्वं जुषाणस्य - सत्त्वगुणाला स्वीकारणार्‍या - तस्य - त्या विष्णूला - अयं च - हाच - स्थितिपालनक्षणः - सृष्टीच्या स्थिरपणासाठी रक्षण करण्याचा समय - तस्मात् - त्याकरिता - जगद्गुरुं - त्रैलोक्याचा गुरु अशा विष्णूला - शरणं व्रजाम - शरण जाऊ या - सुरप्रियःसः - देवांवर प्रेम करणारा तो - स्वानां नः - स्वकीय अशा आमचे - शं - कल्याण - धास्यति - करील. ॥२३॥

अरिंदम - हे शत्रुनाशका - वेधाः - ब्रह्मदेव - सुरान् - देवांना - इति - याप्रमाणे - आभाष्य - सांगून - देवैः सह - देवांसह - तमसः - अंधाराच्या - परं - पलीकडे असलेल्या - साक्षात् - प्रत्यक्ष - अजितस्य - विष्णुच्या - पदं - स्थानाला - जगाम - गेला. ॥२४॥

विभो - हे समर्था - तत्र तु - त्या ठिकाणी तर - अवहितेन्द्रियः - एकाग्र अंतःकरण केलेला ब्रह्मदेव - अदृष्टस्वरूपाय - ज्याचे स्वरूप दृष्टिगोचर होत नाही अशा - श्रुतपूर्वाय - पूर्वी ऐकिलेल्या - दैवीभिः गीर्भिः - दिव्य शब्दांनी - वै - खरोखर - स्तुतिं - स्तुति - अब्रूत - करिता झाला. ॥२५॥

मनोग्रयानं - मनाच्यापुढे चालणार्‍या - वचसा अनिरुक्तं - वाणीने वर्णन करिता न येणार्‍या - अप्रतर्क्यं - ज्याच्याबद्दल कल्पना करिता येत नाही अशा - निष्कलं - उपाधिरहित - गुहाशयं - ह्लत्कमळांत राहणार्‍या - अनन्तं - ज्याचा पार नाही अशा - आद्यं - सर्वांच्या पूर्वी असणार्‍या - अविक्रियं - विकाररहित अशा - सत्यं - सत्यस्वरूप - देववरं - देवश्रेष्ठ - वरेण्यं - वर देणार्‍या - नमामहे - आम्ही नमस्कार करितो. ॥२६॥

यत्र - ज्या तुझ्या ठिकाणी - गृध्रपक्षौ - विषयाभिलाषी जीवाचा पक्ष घेणार्‍या - छायातपौ - अविद्या व विद्या - न - नाहीत - तं - त्या - प्राणमनोधियात्मनां - प्राण, मन, बुद्धि व अहंकार यांना - विपश्चितं - जाणणार्‍या - अर्थेन्द्रियाभासं - विषय व इंद्रिये ह्या रूपांनी भासणार्‍या - अव्रणं - देहरहित - अनिद्रं - निद्रारहित - अक्षरं - अविनाशी - खं - आकाशरूप - त्रियुगं - तीनही युगांत प्रगटणार्‍या श्रीविष्णूला - शरणं - शरण - व्रजामहे - आपण जाऊ या. ॥२७॥

अजया - मायेने - ईर्यमाणं - प्रेरिलेले - मनोमयं - मनोरूपी - पञ्चदशारं - पंधरा आरांचे - आशु - जलद चालणारे - त्रिणाभि - तीन तुंब्यांचे - विद्युच्चलं - विजेप्रमाणे चंचल - अष्टनेमि - आठ धावांचे - अजस्य - भगवंताचे - चक्रं तु - चक्र तर - यदक्षं - ज्याचा आंस असे - आहुः - म्हणतात - तं - त्या - ऋतं - सत्यस्वरूपी परमात्म्याला - प्रपद्ये - मी शरण जात आहे. ॥२८॥

यः - जो - एकवर्णं - केवळ ज्ञानस्वरूपी - तमसः परे - अज्ञानांधकाराच्या पलीकडे असलेले - अलोकं - न दिसणारे - अव्यक्तं - अतिसूक्ष्मपणामुळे ज्याचे स्वरूप समजत नाही असे - अनंतपारं - ज्याचा अंत लागत नाही असे - तत् (ब्रह्म अस्ति) - सुप्रसिद्ध ब्रह्म आहे - (यः च) उपसुपर्णं - आणि जो जीवासमीप - आसांचकार - असतो - एनं - अशा ह्या परमेश्वराला - धीराः - विद्वान पुरुष - योगरथेन - योगरूपी रथाने - उपासते - सेवितात. ॥२९॥

यया - ज्या मायेच्या योगाने - जनः - लोक - मुह्यति - मोहित होतो - अर्थं - पदार्थाला - न वेद - जाणत नाही - यस्य - ज्याच्या - मायां - मायेला - कः - कोणीही - न अतितितर्ति - तरून जात नाही - निर्जितात्मात्मगुणं - ज्याने आत्मा, आत्मशक्ति व तिचे गुण ह्यांना जिंकिले आहे अशा - भूतेषु - प्राणिमात्रांच्या ठिकाणी - समं - समबुद्धीने - चरन्तं - चालणार्‍या - परेशं - परमेश्वराला - ननाम - आम्ही नमस्कार करितो. ॥३०॥

ऋषयः - ऋषि - च - आणि - इमे - हे - वयं - आम्ही - यत्प्रियया सत्त्वेन तन्वा एव - ज्याच्या आवडत्या सत्त्वगुणरूपी शरीरानेच - सृष्टाः अपि - उत्पन्न झालेले असूनही - अन्तः - आत - च - आणि - बहिः - बाहेर - आविः - प्रगट होणार्‍या - सूक्ष्मां - अत्यंत परमाणुरूपी - गतिं - गतीला - न विद्महे - जाणत नाही - इतरप्रधानाः - इतर रजोगुण व तमोगुण ज्यांत मुख्यत्वेकरून आहेत असे - असुराद्याः - दैत्य आदिकरून - कुतः (विदुः) - कसे जाणतील. ॥३१॥

स्वकृता एव - स्वतःच निर्माण केलेली - इयं - ही - मही - पृथ्वी - यस्य - ज्याचे - पादौ - दोन पाय होत - यत्र - जेथे - हि - खरोखर - चतुर्विधः - चार प्रकारची - भूतसर्गः - प्राण्यांची उत्पत्ति होते - सः - तो - आत्मतन्त्रः - स्वतंत्र - ब्रह्म - ब्रह्मरूप - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान - महापूरुषः - पुरुषश्रेष्ठ ईश्वर - वै - खरोखर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥३२॥

उदारवीर्यं - मोठे सामर्थ्यवान - अम्भः तु - उदक तर - यद्रेतः - ज्याचे वीर्य होय - त्रयः - तीन - लोकाः - लोक - अथ - ज्यामुळे - अखिललोकपालाः - सर्व इंद्रादि लोकपाल - सिध्यन्ति - सिद्धी मिळवितात - उत - त्याचप्रमाणे - वर्धमानाः - वृद्धिंगत होणारे असे - जीवन्ति - उपजीविका चालवितात - ब्रह्म - ब्रह्मरूपी - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - प्रसीदतां - प्रसन्न होवो.॥३३॥

दिवौकसां - देवांचे - बलं - बल - अन्धः - अन्न - आयुः - आयुष्य - नगानां - वृक्षांचा - प्रजनः - उत्पादक - प्रजानां - लोकांचा - ईशः - स्वामी आहे - सोमं - चंद्राला - यस्य - ज्या परमेश्वराचे - मनः - मन असे - वै - खरोखर - समामनन्ति - मानितात - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आम्हांवर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥३४॥

जातवेदाः - ज्यापासून धन निर्माण झाले असा - क्रियाकाण्डनिमित्तजन्मा - ज्याचा जन्म कर्मकांडाच्या उत्पादनार्थ आहे असा - अन्तःसमुद्रे - समुद्राच्या आत - स्वधातून - आपल्या भक्ष्य पदार्थांना - अनुपचन् - पक्व करणारा - अग्निः - अग्नि - तु - तर - यस्य - ज्या परमेश्वराचे - मुखं - मुख - जातः - झाला - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आम्हांवर - प्रसीदतां - प्रसन्न होवो.॥३५॥

देवयानं - देवमार्गाची देवता - त्रयीमयः - तीन वेद ज्याचे रूप आहे - ब्रह्मणः - ब्रह्माचे - धिष्ण्य - मूळ स्थान - च - आणि - अमृतं - अमृतरूपी - मृत्यूः - काळस्वरूप - एषः - हा - तरणिः - सूर्य - यच्चक्षुः - ज्या परमेश्वराचे नेत्र - आसीत् - आहे - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आम्हांवर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥३६॥

वायुः - वायु - चराचराणां - स्थावरजंगमसृष्टीचा - प्राणः - प्राण - सहः - इंद्रिय (शारीर-शक्ति) - च - आणि - ओजः - उत्साहशक्ति - अनुगाः - सेवक - सम्राजम् इव - ज्याप्रमाणे सार्वभौ‌म राजाला त्याप्रमाणे - वयं - आम्ही - अन्वास्म - अनुसरतो - यस्य - ज्या परमेश्वराच्या - प्राणात् - प्राणापासून - अभूत् - उत्पन्न झाला - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आम्हांवर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥३७॥

यस्य - ज्याच्या - श्रोत्रात् - कर्णापासून - दिशः - दिशा - च - आणि - हृदः - हृदयापासून - खानि - इंद्रिये - प्रजज्ञिरे - उत्पन्न झाली - पुरुषस्य - परमेश्वराच्या - नाभ्याः - नाभीपासून - प्राणेन्द्रियात्मासुशरीरकेतं - प्राण, इंद्रिये, मन, जीव व शरीर यांचा आधार असे - खं - आकाश - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आम्हांवर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥३८॥

बलात् - शक्तीपासून - महेन्द्रः - इंद्र - प्रसादात् - प्रसादापासून - त्रिदशाः - देव - मन्योः - क्रोधापासून - गिरीशः - शंकर - घिषणात् - बुद्धीपासून - विरिञ्चः - ब्रह्मदेव - च - आणि - खेभ्यः - इंद्रियांपासून - छंदांसि - छंद - ऋषयः - ऋषि - मेढ्रतः - शिस्नापासून - कः - प्रजापति - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आमच्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥३९॥

यस्य - ज्याच्या - वक्षसः - वक्षस्थलापासून - श्रीः - लक्ष्मी - छायया - छायेच्या योगाने - पितरः - अर्यमादि पितर - आसन् - उत्पन्न झाले - स्तनात् - स्तनापासून - धर्मः - धर्म - पृष्ठतः - पाठीपासून - इतरः - अधर्म - अभूत् - उत्पन्न झाला - शीर्ष्णः - मस्तकापासून - द्यौः - स्वर्ग - विहारात् - क्रीडेपासून - अप्सरसः - अप्सरा - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आमच्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥४०॥

यस्य - ज्याचे - मुखं - मुख - विप्रः - ब्राह्मण - च - आणि - गुह्यं - गुप्त - ब्रह्म - वेद - भुजयोः - दोन बाहूंच्या ठिकाणी - राजन्यः - क्षत्रिय - च - आणि - बलं - शक्ति - आसीत् - आहे - ऊर्वोः - मांडयांमध्ये - विट् - वैश्य - ओजः - उत्साह - यस्य अङ्‌घ्रि - ज्याचे पाय - अवेदशृद्रौ - वेदव्यतिरिक्त सेवादि वृत्ति व शूद्र हे होत - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आमच्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥४१॥

अधरात् - खालच्या ओठापासून - लोभः - लोभ - उपरि - वरच्या ओठापासून - प्रीतिः - प्रेम - नस्तः - नाकातून - द्युतिः - कांती - स्पर्शेन - स्पर्शाच्या योगाने - पशव्यः - पशूंना उचित असा - कामः - काम - अभूत् - उत्पन्न झाला - भ्रुवोः - दोन भुवयांपासून - यमः - यम - पक्ष्मभवः तु - पापण्यांपासून तर - कालः - काळ - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आमच्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥४२॥

द्रव्यं - भूतादि पदार्थ - वयः - काळ - कर्मगुणान् - गुण व कर्म - विशेषं - भौतिक प्रपंच - यद्योगमायाविहितान् - ज्याच्या योगमायेपासून निर्मिलेले - वदन्ति - म्हणतात - यत् - जे - प्रबुधावबोधं - विद्वानांनी असत्य म्हणून जाणलेले - दुर्विभाव्यं - कल्पना करण्यास कठीण असे - सः - तो - महाविभूतिः - मोठा ऐश्वर्यवान परमेश्वर - नः - आमच्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो.॥४३॥

उपशान्तशक्तये - ज्याच्या शक्ति शांत झाल्या आहेत अशा - स्वराज्यलाभप्रतिपूरितात्मने - ज्याचा आत्मा आत्मानंदाच्या लाभाने परिपूर्ण झाला आहे अशा - मायारचितेषु - मायेने निर्माण केलेल्या - गुणेषु - गुणांच्या ठिकाणी - वृत्तिभिः - दर्शनादि वृत्तींनी - न सज्जमानाय - आसक्ति न ठेवणार्‍या - नभस्वदूतये - ज्याच्या लीला वायूसारख्या आहेत अशा - तस्मै - त्या परमेश्वराला - नमः - नमस्कार - अस्तु - असो. ॥४४॥

सः - तो - त्वं - तू - ते - तुझे स्वतःचे - सस्मितं - स्मितहास्ययुक्त - मुखाम्बुजं - मुखकमळ - दिदृक्षणां - पाहण्याची इच्छा करणार्‍या - प्रपन्नानां - शरण आलेल्या - नः - आम्हाला - आत्मानं - स्वतःला - अस्मत्करणगोचरं - आमच्या दृष्टिगोचर होशील अशा रीतीने - दर्शय - दाखीव. ॥४५॥

विभो - सर्वव्यापी परमेश्वरा - सः भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न असे आपण - काले काले - योग्य वेळी - स्वेच्छाधृतैः - स्वच्छंदाने धारण केलेल्या - तैः तैः - त्या त्या - रूपैः - स्वरूपांनी - यत् - जे - कर्म - कर्म - नः - आम्हाला - दुर्विषहं - करण्यास कठीण - तत् - ते कर्म - हि - खरोखर - स्वयं - स्वतः - करोति - करितो. ॥४६॥

विषयार्तानां - विषयांनी पीडिलेल्या - देहिनां - प्राण्यांची - कर्माणि - कर्मे - क्लेशभूर्यल्पसाराणि - पुष्कळ श्रम व थोडे फळ ज्यात आहे अशी - वा - किंवा - विफलानि - मुळीच फळ न देणारी - तथा - परंतु तसेही कर्म - त्वयि - तुझ्या ठिकाणी - अर्पितं - अर्पण केले असता - (विफलं) न एव - निष्फळ होतच नाही. ॥४७॥

अवमः अपि - थोडा सुद्धा - कर्मकल्पः - कर्माचा आभास - ईश्वरार्पितः - परमेश्वराला अर्पण केला असेल तर - विफलाय - निष्फळ होण्यास - न कल्पते - समर्थ होत नाही - हि - कारण - एषः - हा - सः - तो - पुरुषस्य - पुरुषाचा - आत्मा - आत्मा - दयितः - प्रिय - हितः - हितावह ॥४८॥

यथा - ज्याप्रमाणे - तरोः - वृक्षाच्या - मूलावसेचनं - मुळांना पाणी घालणे - स्कंधशाखानां - खांद्या व फांद्या ह्यांना - हि - खरोखर - एवं - ह्याप्रमाणे - विष्णोः - विष्णूचे - आराधनं - पूजन - सर्वेषां - सर्वांना - च - आणि - आत्मनः - स्वतःला - हि - खरोखर ॥४९॥

नमस्तुभ्यं - - अनन्ताय - अनंत अशा - दुर्वितर्क्यात्मकर्मणे - ज्याच्या लीला कल्पनातीत आहेत अशा - निर्गुणाय - निर्गुण - गुणेशाय - गुणांचा स्वामी - च - आणि - सांप्रतं सत्त्वस्थाय - तसेच सध्या सत्त्वगुणामध्ये स्थित - नमस्तुभ्यम् - आपल्याला आम्ही नमस्कार करतो. ॥ ५० ॥

अष्टमः स्कन्धः - अध्याय पाचवा समाप्त

GO TOP