|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय ४ था - अन्वयार्थ
हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार - तदा - त्यावेळी - ब्रह्मेशानपुरोगमाः - ब्रह्मदेव व शंकर ज्यामध्ये पुढारी आहेत असे - देवर्षिगन्धर्वाः - देव, ऋषि व गंधर्व - हरेः - श्रीविष्णूच्या - तत् - त्या - कर्म - कर्माची - शंसन्तः - प्रशंसा करणारे - कुसुमासारं - पुष्पवृष्टीला - मुमुचुः - सोडीते झाले. ॥१॥ दिव्याः - आकाशातील - दुंदुभयः - दुंदुभि - नेदुः - वाजू लागल्या - गन्धर्वाः - गंधर्व - ननृतु - नृत्य करू लागले - जगुः - गाऊ लागले - ऋषयः - ऋषि - सिद्धाः - सिद्ध - चारणाः - चारण - पुरुषोत्तमं - विष्णूची - तुष्टुवुः - स्तुति करू लागले. ॥२॥ यः - जो - असौ - हा - ग्राहः - नक्र - सः - तो - वै - खरोखर - हूहूः गंधर्वसत्तमः - हूहू नावाचा गंधर्वश्रेष्ठ - देवलशापेन - देवलऋषीच्या शापामुळे - ग्राहः जातः - नक्र झालेला - सद्यः - तत्काळ - मुक्तः (भूत्वा) - मुक्त होऊन - परमाश्चर्यरुपधृक् - अत्यंत आश्चर्यजनक स्वरूप धारण करणारा - उत्तमश्लोकं - श्रेष्ठकीर्तीच्या - अव्ययं - अविनाशी - यशोधाम - कीर्तीचे स्थानच अशा - कीर्तन्यगुणसत्कथं - ज्याचे गुण व गोड कथा वर्णनीय आहेत अशा - अधीशं - त्रैलोक्याधिपति परमेश्वराला - शिरसा - मस्तकाने - प्रणम्य - नमस्कार करून - अगायत - गाऊ लागला. ॥३-४॥ ईशेन - परमेश्वराने - अनुकंपितः - कृपा केलेला - मुक्तकिल्बिषः - निष्पाप झालेला - सः - तो हूहू गंधर्व - तं - त्या परमेश्वराला - परिक्रम्य - प्रदक्षिणा घालून - प्रणम्य - नमस्कार करून - लोकस्य पश्यतः - लोक पाहात असता - स्वं लोकं - आपल्या लोकाला - अगात् - गेला. ॥५॥ भगवत्स्पर्शात् - श्रीविष्णुचा स्पर्श झाल्यामुळे - अज्ञानबन्धनात् - अज्ञानरूपी बंधनापासून - विमुक्तः - मुक्त झालेला - गजेन्द्रः - गजेंद्र - पीतवासाः - पिवळे वस्त्र नेसलेला - चतुर्भुजः - चार हातांचा - भगवतः - श्रीविष्णूच्या - रूपं - स्वरूपाला - प्राप्तः - मिळविता झाला. ॥६॥ सः - तो - वै - खरोखर - पूर्वं - पूर्वी - पांडयः - पाण्डयदेशातील - द्रविडसत्तमः - श्रेष्ठ द्रविड - इंद्रद्युम्नः इति ख्यातः - इंद्रद्युम्न ह्या नावाने प्रसिद्ध असा - विष्णुव्रतपरायणः - वैष्णवव्रत निष्ठेने आचरणारा - राजा - राजा - अभूत् - होता. ॥७॥ एकदा - एके दिवशी - कुलाचलाश्रमः - कुलपर्वत हाच आहे आश्रम ज्याचा असा - तापसः - तपस्वी - जटाधरः - जटा धारण करणारा - आप्लुतः - स्नान केलेला - आत्मवान् - ज्ञानी - सः - तो इंद्रद्युम्न - आराधनकाले - पूजेच्या वेळी - गृहीतमौनव्रतः - मौनव्रत धारण केलेला - अच्युतं - कधीही अधोगतीला न जाणार्या - ईश्वरं - सर्वैश्वर्यसंपन्न - हरिं - श्रीविष्णूचे - समर्चयामास - पूजन करीत होता. ॥८॥ महायशाः - मोठा कीर्तिमान - शिष्यगणैः - शिष्यसमूहांनी - परिश्रितः - आश्रय केलेला - मुनिः - अगस्त्य ऋषि - यदृच्छया - सहजगत्या - तत्र - तेथे - समागमत् - आला - ऋषिः - ऋषि - तूष्णीं - स्तब्धपणे - रहसि - एकांतात - उपासीनं - बसलेल्या - अकृतार्हणादिकं - आपला पूजनादि सत्कार न करणार्या - तं - त्या राजाला - वीक्ष्य - पाहून - चुकोप ह - खरोखर रागावला. ॥९॥ सः - तो अगस्त्य ऋषि - तस्य - त्या इंद्रद्युम्न राजाला - इमं शापं - हा शाप - अदात् - देता झाला - असाधुः - दुष्ट - दुरात्मा - दुर्बुद्धि - अकृतबुद्धिः - ज्याच्या बुद्धीला चांगले वळण मिळाले नाही असा - विप्रावमन्ता - ब्राह्मणांचा अपमान करणारा - अयं - हा - अद्य - आज - अंधं - अंधकारमय - तमः - अज्ञानात - विशतां - शिरो - यथा - ज्याप्रमाणे - गजः - हत्ती - स्तब्धमतिः (अस्ति) - गर्विष्ठ बुद्धीचा असतो - (अतः) स एव (भवतु) - म्हणून तो हत्तीच होवो. ॥१०॥ नृप - हे परीक्षित राजा - सानुगः - शिष्यांसह - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - अगस्त्यः - अगस्त्य ऋषि - एवं - याप्रमाणे - शप्त्वा - शाप देऊन - गतः - गेला - इंद्रद्युम्नः - इंद्रद्युम्न - राजर्षिः - राजर्षि - अपि - सुद्धा - तत् - ते - दिष्टं - दैवाने प्राप्त झालेले संकट - उपधारयन् - समजून - आपन्नः - संकटात सापडलेला - आत्मस्मृतिविनाशिनीं - आत्मविषयक स्मरणाचा नाश करणार्या - कौञ्जरीं योनिं - हत्तीच्या जन्माला - आप - प्राप्त झाला - यत् - जे - गजत्वे अपि - गजजन्मामध्येही - अनुस्मृतिः (आसीत्) - पूर्वजन्माचे स्मरण राहिले - हर्यर्चनानुभावेन - भगवंताच्या पूजेच्या प्रभावाने होय. ॥११-१२॥ एवं - याप्रमाणे - गजयूथपं - गजेंद्राला - विमोक्ष्य - मुक्त करून - पार्षदगतिं - स्वतःच्या सेवकाच्या पदवीला - गमितेन - पोहोचविलेल्या - तेन अपि युक्तः - त्याच्यासहित - गन्धर्वसिद्ध विबुधैः - गंधर्व, सिद्ध व देव यांनी - उपगीयमानकर्मा - ज्याचे पराक्रम गायिले आहेत असा - अब्जनाभः - श्रीविष्णु - गरूडासनः - गरुडावर बसून - अद्भुतं - आश्चर्यकारक अशा - स्वभवनम् - आपल्या लोकाला - अगात् - गेला. ॥१३॥ महाराज - हे महाराज कुरुश्रेष्ठा - मया - मी - शृण्वतां - ऐकणार्यांना - स्वर्ग्यं - स्वर्ग देणारा - यशस्यं - कीर्ति देणारा - कलिकल्मषापहं - कलीसंबंधी पातके नष्ट करणारा - दुःस्वप्ननाशं - वाईट स्वप्नांचा नाश करणारा - एतत् - हा - गजराजमोक्षणं (नाम) - गजेंद्रमोक्षनामक - कृष्णानुभावः - श्रीकृष्णाचा पराक्रम - तव - तुला - ईरितः - सांगितला. ॥१४॥ श्रेयस्कामाः - कल्याण इच्छिणारे - द्विजातयः - द्विज - प्रातः - सकाळी - उत्थाय - उठून - शुचयः (भूत्वा) - शुचिर्भूत होऊन - दुःस्वप्नाद्युपशान्तये - वाईट स्वप्नांच्या शांतीकरिता - एतत् - हे आख्यान - यथा (वत्) - जसेच्या तसे - अनुकीर्तयन्ति - पठण करितात. ॥१५॥ कुरुसत्तम - हे कुरुश्रेष्ठा - सर्वभूतमयः - सर्व भूते हेच ज्याचे स्वरूप आहे असा - विभुः - व्यापक - हरिः - श्रीविष्णु - प्रीतः (भूत्वा) - प्रसन्न होऊन - सर्वभूतानां शृण्वतां - सर्व प्राणी श्रवण करीत असता - गजेन्द्रं - गजेंद्राला - इदं - हे - आह - म्हणाला. ॥१६॥ - ये - जे - मां - माझे - त्वां - तुझे - च - आणि - सरः - ह्या सरोवराचे - च - आणि - इदं - हा - गिरिकन्दरकाननं - त्रिकूटपर्वत, त्यावरील गुहा व अरण्ये ह्यांचे - वेत्रकीचकवेणूनां - येथील वेत, शब्द करणारे कळक व वेळू यांचे - गुल्मानि - गुच्छांचे - सुरपादपान् - देववृक्षांचे ॥१७॥ इमानि शृङगाणि - या शिखरांचे - मे - माझी - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाची - च - आणि - शिवस्य धिष्ण्यानि - शंकराची मंदिरे - मे - माझे - प्रियं - आवडीचे - धाम - स्थान - क्षीरोदं - क्षीरसमुद्र - च - आणि - भास्वरं - प्रकाशमान - श्वेतद्वीपं - श्वेतद्वीप - मम - माझे - श्रीवत्सं - श्रीवत्सलांच्छन - कौस्तुभं - कौस्तुभमणि - मालां - वनमाळा - कौमोदकीं गदां - कौमोदकी गदा - सुदर्शनं - सुदर्शनचक्र - पाञ्चजन्यं - पांचजन्य नावाचा शंख - पतगेश्वरं सुपर्णं - पक्ष्यांचा अधिपति गरुड - शेषं - शेष - च - आणि - सूक्ष्मां - अत्यंत लहान - मत्कलां - माझा अंश अशी - मदाश्रयां - माझा आश्रय करून राहणारी - देवीं - दैदीप्यमान - श्रियं - लक्ष्मी - ब्रह्माणं - ब्रह्मदेव - नारदम् ऋषिं - नारद ऋषि - भवं - शंकर - च - आणि - प्रह्लादम् एव - प्रल्हादसुद्धा - मे - माझ्या - मत्स्यकूर्मवराहाद्यैः - मत्स्य, कूर्म वराह इत्यादि - अवतारैः - अवतारांनी - कृतानि - केलेली - अनन्तपुण्यानि - अगणित पुण्य देणारी - कर्माणि - कर्मे - सूर्यं - सूर्य - सोमं - चंद्र - हुताशनं - अग्नि - सत्यं - सत्यस्वरूपी - प्रणवं - ओम्कार - अव्यक्तं - माया - गोविप्रान् - गाई व ब्राह्मण - अव्ययं - अविनाशी - धर्मं - धर्म - दाक्षायणीः धर्मपत्नीः - दक्षाच्या कन्या धर्माच्या ज्या तेरा भार्या त्या - सोमकश्यपयोः अपि (पत्नीः) - चंद्र व कश्यप ह्यांच्या सुद्धा भार्या - गङगां - गङगा - सरस्वतीं - सरस्वती - नंदां - नंदा - कालिंदीं - यमुना - सितवारणम् - ऐरावत - ध्रुवं - ध्रुव - सप्त ब्रह्मऋषीन् - सात ब्रह्मर्षि - च - आणि - पुण्यश्लोकान् मानवान् - नळराजादि पुण्यश्लोक पुरुष ॥१८-२३॥ मम रूपाणि - तसेच माझ्या स्वरूपाचे - उत्थाय - उठून - अपररात्रान्ते - पहाटे - प्रयताः (भूत्वा) - पवित्र होऊन - सुसमाहिताः - सावधानपणाने - स्मरन्ति - स्मरण करितात - हि - खरोखर - अखिलात् - संपूर्ण - एनसः - पापापासून - मुच्यन्ते - मुक्त होतात. ॥२४॥ अग्ङ - बा गजेन्द्रा - ये च - आणि जे - निशात्यये - रात्रीच्या शेवटी म्हणजे पहाटे - प्रतिबुद्ध्य - जागे होऊन - अनेन - ह्या स्तोत्राने - मां - माझे - स्तुवन्ति - स्तवन करितात - तेषां - त्यांना - अहं - मी - प्राणात्यये - मरणसमयी - विमला - निर्मळ - मतिं - बुद्धि - ददामि - देतो. ॥२५॥ हृषीकेशः - श्रीविष्णु - इति - याप्रमाणे - आदिश्य - सांगून - जलजोत्तमः प्रध्माय - पाञ्चजन्यनामक उत्तम शंख वाजवून - विबुधाकनीकं - देव सैन्याला - हर्षयन् - आनंद देत - खगाधिपं - गरुडावर - आरुरोह - बसला. ॥२६॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय चवथा समाप्त |