|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ८ वा - अध्याय २ रा - अन्वयार्थ
गजेंद्राकडून भगवंतांची स्तुति आणि त्याचे संकटातून मुक्त होणे - राजन् - हे राजा - त्रिकूट इति विश्रुतः - त्रिकूट ह्या नावाने प्रसिद्ध असा - क्षीरोदेन आवृतः - क्षीरसमुद्राने वेष्टिलेला - श्रीमान् - शोभायमान - योजनायुतं उच्छ्रितः - दहा हजार योजने उंच असा - गिरिवरः - श्रेष्ठ पर्वत - आसीत् - होता. ॥१॥ तावता - तितक्याच प्रमाणाने - पयोनिधिं पर्यक् - समुद्राच्या सभोवती - विस्तृतः (सः) - पसरलेला तो - रौप्यायसहिरण्मयैः - रुप्याच्या, लोखंडाच्या व सोन्याच्या अशा - त्रिभिः शृंगैः - तीन शिखरांनी - दिशः - दिशांना - खं - आकाशाला - रोचयन् - शोभविणारा असा - आस्ते - आहे. ॥२॥ (सः) - तो पर्वत - रत्नधातुविचित्रितैः - रत्ने व गैरिकादि धातु यांनी चित्रविचित्र दिसणार्या - नानाद्रुमलतागुल्मैः - अनेक वृक्ष, वेली व गुच्छ यांनी - च - आणि - अन्यैः - दुसर्या - निर्झराम्भसां - झर्यातील उदकाच्या - निर्घोषैः - शब्दांनी - सर्वाः ककुभः - सर्व दिशा ॥३॥ च - आणि - समंतात् - सभोवार - पयऊर्मिभिः - उदकाच्या लाटांनी - अवनिज्यमानाङ्घ्रिः - धुतले जात आहेत पायथ्याचे पर्वत ज्याच्या असा - सः - तो त्रिकूटपर्वत - हरिन्मरकताश्मभिः - हिरव्या पाचेच्या शिळांनी - भूमिं - पृथ्वीला - श्यामलां - हिरवी - करोति - करितो. ॥४॥ क्रीडद्भिः सिद्धचारणगंधर्वविद्याधरमहोरगैः - खेळणार्या सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर आणि मोठमोठे सर्प यांनी - किन्नरैः - किन्नरांनी - च - आणि - अप्सरोभिः - अप्सरांनी - जुष्टकंदरः - सेविल्या आहेत गुहा ज्याच्या असा ॥५॥ यत्र - जेथे - श्लाघिनः हरयः - गर्विष्ठ सिंह - परशङकया - दुसर्या सिंहाच्या शंकेने - अमर्षया - सहन न झाल्यामुळे - संगीतसंन्नादैः - संगीताच्या मधुर नादांनी - नदद्गुहं - घुमून जात आहेत गुहा ज्याच्या अशा - अभिगर्जन्ति - गाजवून सोडतात. ॥६॥ नानारण्यपशुव्रातसङ्कुलद्रोण्यलंकृतः - अनेक जातीच्या वन्य पशूंच्या समूहांनी भरलेल्या गुहांच्या योगे सुशोभित - चित्रद्रुमसुरोद्यान - विविध वृक्ष ज्यामध्ये आहेत अशा देवांच्या उपवनांत - कलकण्ठविहङगमः - मधुर शब्द करणारे पक्षी जेथे राहात आहेत असा ॥७॥ अच्छोदैः सरित्सरोभिः - ज्यांमध्ये निर्मळ उदक आहे अशा नद्या व सरोवरे यांनी - च - आणि - मणिवालुकैः पुलिनैः - जेथे रत्नांची वाळू आहे अशा वाळवंटानी - देवस्त्रीमज्जनामोदसौरभाम्ब्वनिलैः - देवस्त्रियांच्या स्नानाचा जो सुगंध त्यायोगे सुगंधयुक्त झालेल्या उदकांनी व वायूंनी - युतः - युक्त ॥८॥ तस्य - त्या पर्वताच्या - द्रोण्यां - दरीत - सुरयोषितां - देवस्त्रियांचे - आक्रीडं - क्रीडास्थान असे - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न - महात्मनः - महासमर्थ - वरुणस्य - वरुणाचे - ऋतुमन्नाम - ऋतुमत् नावाचे - उद्यानं - उपवन. ॥९॥ नित्यं - नेहमी - दिव्यैः पुष्पफलद्रुमैः - स्वर्गीय अशी फुले, फळे व वृक्ष ह्यांनी - सर्वतः - सर्व ठिकाणी - अलङ्कृतं - शोभणारे - मंदारैः - मंदारवृक्षांनी - पारिजातैः - पारिजातक वृक्षांनी - च - आणि - पाटलाशोकचंपकैः - गुलाब, अशोक व चाफे यांनी ॥१०॥ चूतैः - आम्रवृक्ष - प्रियालैः - खिरणी - पनसैः - फणस - आम्रैः - आम्र - आम्रातकैः - आंबाडा - अपि - आणि - क्रमुकैः - पोफळी - नालिकेरैः - नारळ - खर्जूरैः - खजूर - च - आणि - बीजपूरकैः - महाळुंग - मधूकैः - मोह - सालतालैः - साल व ताड - च - आणि - तमालैः - तमाल - असनार्जुनैः - असाणा व अर्जुनसादडा - अरिष्टोदुंबरप्लक्षैः - रिठा, उंबर, पिंपरी - वटैः - वड - च - आणि - किंशुकचंदनैः - पळस व चंदन - पिचुमंदैः - लिंब - कोविदारैः - कोविदार - सरलैः - सरल - सुरदारुभिः - देवदार - द्राक्षेक्षुरम्भाजम्बूभिः - द्राक्ष, ऊस, केळी, जांभळी - बदर्यक्षाभयामलैः - बोरी, बेहडे, हिरडे, आवळी - बिल्वैः - बेल - कपित्थैः - कवठ - जंबीरैः - ईड - भल्लातकादिभिः - बिब्बे इत्यादिकांनी - वृतः - वेष्टिलेला - तस्मिन् - त्या पर्वतावर - सुविपुलं - अत्यंत विस्तृत - लसत्काञ्चनपङकजम् - सुवर्णकमळांनी शोभणारे - सरः - सरोवर ॥११-१४॥ कुमुदोत्पलकल्हारशतपत्रश्रिया - कुमुदे, उत्पले, कल्हारे व शतपत्रे ह्यांच्या शोभेने - ऊर्जितं - सुंदर दिसणारे - मत्तषट्पदनिर्घुष्टं - मत्त भ्रमरांनी घुमवून सोडिलेले - च - आणि - कलस्वनैः - मधुर शब्द करणार्या - शकुन्तैः - पक्ष्यांनी - हंसकारण्डवाकीर्णं - हंस व कारंडव यांनी गजबजून गेलेले - चक्राह्वैः - चक्रवाकांनी - सारसैः अपि - सारसपक्ष्यांनी सुद्धा - जलकुक्कुट - पाणकोंबडे, - कोयष्टिदात्यूहकुलकूजितं - टिटव्या दात्यूह ह्यांच्या समुदायांनी निनादित केलेले ॥१५-१६॥ मत्स्यकच्छपसंचार - मासे व कासवे यांच्या इकडेतिकडे फिरण्याने - चलत्पद्मरजःपयः - हलणार्या कमळातील रजःकणांनी ज्यातील उदक गढूळ झाले आहे असे - कदंबवेतसनलनीपवंजुलकैः - कळंब, वेत, वेळू, नीप, बकुळ यांनी - वृतं - वेष्टिलेले - कुन्दैः - कुंद - कुरबकाशोकैः - कोरंटी व अशोक - शिरीषैः - शिरीष - कुटजेंगुदैः - कुडे व हिंगणबेट - कुब्जकैः - कुब्जक - स्वर्णयूथीभिः - सोनजाई - नागपुन्नागजातिभिः - नागचाफा, पुन्नाग, व जाई - मल्लिक्काशतपत्रैः - मोगरे व शतपत्रे - च - आणि - माधवीजालकदिभिः - माधवी व जालक इत्यादि - च - आणि त्याचप्रमाणे - तीरजैः - काठावर उत्पन्न झालेल्या - अन्यैः - दुसर्या - नित्यर्तुभिः - सर्व ऋतूंत फळाफुलांनी भरलेल्या - द्रुमैः - वृक्षांनी - अलं - अत्यंत - शोभितं - शोभणारे ॥१७-१९॥ तत्र - त्या सरोवराच्या काठी - एकदा - एके दिवशी - तग्दिरिकाननाश्रयः - त्या पर्वतावरील अरण्यात राहणारा - वारणयूथपः - गजेंद्र - करेणुभिः - हत्तीणींसह - चरन् - संचार करीत - कीचकवेणुवेत्रवद्विशालगुल्मं - ध्वनि करणारे वेळू, कळक, वेत व त्यावर वेली चढून बनलेले विस्तीर्ण गुच्छ ह्यांना - सकंटकान् वनस्पतीन् - काटेरी झाडांना - प्ररुजन् - मोडून टाकीत ॥२०॥ हरयः - सिंह - गजेंद्राः - मोठे हत्ती - व्याघ्रादयः - वाघ आदिकरून - सखङगः - गेंडयासह इतर पशु - व्यालमृगाः - सर्प व मृग - महोरगाः - मोठमोठे साप - सगौरकृष्णाः - गौर व कृष्णवर्णाचे पशु - शरभाः - शरभ - च - आणि - चमर्यः - वनगाई - यद्वन्धमात्रात् - ज्या गजेंद्राच्या मदाचा नुसता वास आला असता - अपि - सुद्धा - भयात् - भीतीमुळे - द्रवन्ति - पळत सुटतात. ॥२१॥ क्षुद्राः - सामान्य - वृकाः - लांडगे - वराहाः - डुकर - महिषर्क्षशल्याः - रानरेडे, अस्वल व साळई - गोपुच्छसालावृकमर्कटाः - गाईसारखे शेपूट असणारे वानर, काळ्या तोंडाचे वानर, तांबडया तोंडाची माकडे - हरिणाः - हरिण - च - आणि - शशादयः - ससे आदिकरून क्षुद्र प्राणी - यदनुग्रहेण - ज्या गजेंद्राच्या कृपेने - अभीताः - भीतिरहित होऊन - अन्यत्र - दुसरीकडे - चरन्ति - फिरतात. ॥२२॥ घर्मतप्तः - उन्हाने तापलेला - मदच्युत् - मद गाळणारा - करिभिः - गजांनी - करेणुभिः - हत्तिणींनी - वृतः - वेष्टिलेला - कलभैः - छाव्यांनी - अनुद्रुतः - अनुसरलेला असा - गरिम्णा - प्रचंडपणाने - गिरिं - त्रिकूट पर्वताला - परितः - सभोवार - प्रकंपयन् - कांपवीत - मदाशनैः - मद भक्षण करणार्या - अलिकुलैः - भ्रमरसमूहांनी - निषेव्यमाणः - सेविलेला - पङकजरेणुरूषितं - कमळतंतूंनी भरलेल्या - सरोऽनिलं - सरोवरांतील वायूचा - विदूरात् - लांबून - जिघ्रन् - वास घेणारा - मदविह्वलेक्षणः - ज्याचे नेत्र मदाने विव्हल झाले आहेत असा - तृषार्दितेन - तहानेने पीडिलेल्या - स्वयूथेन - आपल्या कळपाने - वृतः - वेष्टिलेला - सः - तो - गजेंद्रः - गजेंद्र - द्रुतं - लवकरच - तत्सरोवराभ्याशं - त्या सरोवराजवळ - अगमत् - आला. ॥२३-२४॥ तस्मिन् - त्या सरोवरांमध्ये - विगाह्य - शिरून - अद्भिः - पाण्यांनी - आत्मानं - स्वतःला - स्नपयन् - स्नान घालून - गतक्लमः - श्रमरहित झालेला असा होत्साता - निजपुष्करोद्धृतं - आपल्या सोंडेने घेतलेले - हेमारविन्दोत्पलरेणुवासितं - सुवर्णकमळांतील सुगंधयुक्त तंतूंनी सुवासित झालेले - निर्मलं - स्वच्छ - अमृताम्बु - गोड उदक - निकामं - यथेच्छ - पपौ - प्याला. ॥२५॥ स्वपुष्करेण - आपल्या सोंडेने - उद्धृतसीकराम्बुभिः - घेतलेल्या थंड जलाने - करेणूः - हत्तिणींना - च - आणि - कलभान् - छाव्यांना - निपाययन् - पाणी पाजणारा - संस्नपयन् - स्नान घालणारा - घृणी - दयाळू - दुर्मदः - मदोन्मत्त - कृपणः - गरीब बिचारा - गजः - हत्ती - अजमायया - भगवंताच्या कृपेने - कृच्छ्रं - येणार्या संकटाला - न आचष्ट - पाहता झाला नाही. ॥२६॥ नृप - हे परीक्षित राजा - तत्र - त्या ठिकाणी - कश्चित् - कोणीएक - दैवचोदितः - दैवाने पाठविलेला - बलीयान् - बलाढय - ग्राहः - नक्र - तं - त्या गजाला - रुषा - रागाने - चरणे - पायाच्या ठिकाणी - अग्रहीत् - धरिता झाला - यदृच्छया - विधिवशात - एवं - याप्रमाणे - व्यसनं - संकटाला - गतः - प्राप्त झालेला - अतिबलः - अत्यंत बळकट असा - सः - तो - गजः - गज - यथाबलं - यथाशक्ती - विचक्रमे - नक्राच्या हातून सुटण्याकरिता पराक्रम करू लागला. ॥२७॥ दीनधियः - दीनवाण्या - करेणवः - हत्तिणी - बलीयसा - बलाढय नक्राने - तरसा - वेगाने - तथा - त्याप्रमाणे - विकृष्यमाणं - ओढिल्या जाणार्या - आतुरं - पीडिलेल्या - यूथपतिं - गजेंद्राला उद्देशून - विचुक्रुशुः - आक्रोश करित्या झाल्या - च - आणि - अपरे - दुसरे - पार्ष्णिग्रहाः - पाठिराखे - गजाः - गज - तारयितुं - सोडविण्यास - न अशकन् - समर्थ झाले नाहीत. ॥२८॥ महीपते - हे परीक्षित राजा - एवं - याप्रमाणे - नियुद्ध्यतोः - युद्ध करणारे - सप्राणयोः - बलाढय - इभेंद्रनक्रयोः - गजेंद्र व नक्र - अंतरतः - आत - च - आणि - बहिः - बाहेर - मिथः - एकमेकांना - विकर्षतोः - ओढीत असता - सहस्त्रं - हजार - समाः - वर्षे - व्यगमन् - निघून गेली - अमराः - देव - चित्रं - आश्चर्य - अमंसत - मानिते झाले. ॥२९॥ ततः - नंतर - दीर्घेण कालेन - पुष्कळ काळपर्यंत - जले - पाण्यात - विकृष्यमाणस्य - ओढिला गेल्यामुळे - अवसीदतः - दुःख पावलेल्या - गजेन्द्रस्य - गजेंद्राच्या - मनोबलौजसां - मानसिक शक्ति, इंद्रियशक्ती व शारीरिक शक्ति ह्यांचा - महान् - मोठा - व्ययः - नाश - अभूत् - झाला - जलौकसः - नक्राचे - सकलं - सगळे - विपर्ययः - गजेंद्राच्या उलट - अभूत् - झाले. ॥३०॥ देही - देहधारी - विवशः - परतंत्र - सः - तो - गजेन्द्रः - गजेंद्र - यदृच्छया - दैवयोगाने - इत्थं - याप्रमाणे - यदा - जेव्हा - प्राणस्य - प्राणावर आलेल्या - संकटं - संकटाला - आप - प्राप्त झाला - आत्मविमोक्षणे - स्वतःला सोडविण्याविषयी - अपारयन् - असमर्थ होऊन - चिरं - पुष्कळ काळपर्यंत - दध्यौ - विचार करीत राहिला - अथ - नंतर - इमां बुद्धिं - ह्या विचाराला - अभ्यपद्यत - प्राप्त झाला. ॥३१॥ इमे - हे - ज्ञातयः - जातभाई - गजाः - गज - आतुरं - पीडिलेल्या - मां - मला - मोचितुं - सोडविण्यास - न प्रभवन्ति - समर्थ होत नाहीत - करिण्यः - हत्तिणी - कुतः (प्रभवन्ति) - कशा समर्थ होतील - च - आणि - विधातुः - दैवाचा - पाशेन - पाश अशा - ग्राहेण - नक्राने - आवृतःअपि - वेष्टिलेला असताहि - अहं - मी - परायणं - श्रेष्ठ अशा - तं - त्या - परं - परमेश्वराला - यामि - जातो. ॥३२॥ यः - जो - कश्चन - कोणी - ईशः - परमेश्वर - बालिनः - बलाढय अशा - प्रचण्डवेगात् - मोठया वेगवान अशा - भृशं - अत्यंत - अभिधावतः अंतकोरगात् - धावणार्या मृत्यूरूपी सर्पापासून - भीतं - भ्यालेल्या - प्रपन्नं - शरणागतास - परिपाति - रक्षितो - यद्भयात् - ज्याच्या भयाने - मृत्यूः - मृत्यु - प्रधावति - पळतो - तं - त्याला - शरणं - शरण - ईमहि - जातो. ॥३३॥ अष्टमः स्कन्धः - अध्याय दुसरा समाप्त |