श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १५ वा - अन्वयार्थ

गृहस्थांसाठी मोक्षधर्मांचे वर्णन -

नृप - हे राजा - केचित् द्विजाः - कित्येक ब्राह्मण - कर्मनिष्ठाः (सन्ति) - कर्मनिष्ठ असतात - अपरे तपोनिष्ठाः (सन्ति) - दुसरे तपोनिष्ठ असतात - ये अन्ये केचित् (ते) - आणि जे दुसरे कोणी असतात ते - स्वाध्याये प्रवचने - अध्ययन, अध्यापन, - ज्ञानयोगयोः च निष्ठिताः (सन्ति) - ज्ञानमार्ग व योगाभ्यास यात निमग्न असतात. ॥ १ ॥

आनंत्यं इच्छता (नरेण) - कर्माचे अनंत फल मिळविण्याची इच्छा करणार्‍या पुरुषाने - कव्यानि च दैवे - पितरांना उद्देशून दिली जाणारी कव्ये व देवकार्यातील हव्ये - ज्ञाननिष्ठाय देयानि - ज्ञाननिष्ठ ब्राह्मणाला अर्पण करावी - तद्‌भावे इतरेभ्यः (देयानि) - तसा ज्ञाननिष्ठ ब्राह्मण न मिळाल्यास दुसर्‍यांना द्यावी - यथार्हतः स्यात् - ही गोष्ट योग्यतेप्रमाणे व्हावी. ॥ २ ॥

द्वौ विप्रौ दैवे (कार्ये) - दोन ब्राह्मणांना देवकार्यात - पितृकार्ये त्रीन् - पितृकार्यात तीन ब्राह्मणांना - उभयत्र वा एकैकं भोजयेत् - किंवा दोन्ही ठिकाणी एकेकालाच भोजन द्यावे - सुसमृद्धः अपि - पुष्कळ श्रीमंतानेही - श्राद्धे विस्तरं न कुर्यात् - श्राद्धांत विस्तार करू नये. ॥ ३ ॥

एतानि देशकालोचित् - ही देशकालाला अनुरूप - तश्रद्धाद्रव्यपात्रार्हणानि - श्रद्धा, द्रव्ये, पात्रे व पूजासाहित्ये - विस्तरात् स्वजनार्पणात् च - विस्तार केल्याने व नातलगांना अर्पण केल्याने - सम्यक् न भवंति - फलदायक होत नाहीत. ॥ ४ ॥

देशे काले च संप्राप्ते - योग्य देश व काल प्राप्त झाला असता - हरिदैवतं मुन्यन्नं - ज्याची हरि देवता आहे व जे मुनींना खाण्यास योग्य असे अन्न - विधिवत् श्रद्धया पात्रे न्यस्तं - सशास्त्र सत्पात्र ब्राह्मणाला श्रद्धापूर्वक दिले असता - कामधुकू अक्षयं च (भवति) - इच्छा पुरविणारे व अक्षय्य होते. ॥ ५ ॥

देवर्षिपितृभूतेभ्यः - देव, ऋषि, पितर भूते यांना - आत्मने स्वजनाय च - आणि स्वतःला व इष्टमित्रांना - अन्नं संविभजन् - अन्न विभागून देऊन त्याने - सर्वं तत् पुरुषात्मकं पश्येत् - सर्व जग ईश्वररूप पाहावे. ॥ ६ ॥

धर्मतत्त्ववित् - धर्माचे तत्त्व जाणणार्‍या पुरुषाने - श्राद्धे आमिषं न दह्यात् - श्राद्धात मांसदान करू नये - न च अद्यात् - आणि भाषण करू नये - यथा मुन्यन्नैः - जशी ऋषींच्या अन्नांनी - (देवतानां) परा प्रीतिः स्यात् - देवादिकांची अत्यंत तुष्टि होते - (तथा) पशुहिंसया न (स्यात्) - तशी पशुहिंसेने होत नाही. ॥ ७ ॥

भूतेषु - प्राणिमात्रांच्या ठिकाणी - मनोवाक्कायजस्य दण्डस्य - मन, वाणी व देह यापासून होणार्‍या दंडाचा - यः न्यासः - जो त्याग - एतादृशः परः धर्मः - ह्याच्यासारखा दुसरा श्रेष्ठ धर्म - सद्धर्मं इच्छतां - सद्धर्माने वागण्याची इच्छा करणार्‍या - नृणां न (अस्ति) - मनुष्याला नाही. ॥ ८ ॥

एके अनीहाः - काही निष्काम - यज्ञवित्तमाः ज्ञानिनः - यज्ञाचे तत्त्व पूर्णपणे जाणणारे ज्ञानी पुरुष - ज्ञानसंदीपिते आत्मसंयमने - ज्ञानाने प्रदीप्त केलेल्या मनोनिग्रहात - कर्ममयान् यज्ञान् जुह्वति - कर्ममय यज्ञांचा होम करितात. ॥ ९ ॥

भूतानि - प्राणी - द्रव्ययज्ञैः यक्ष्यमाणं दृष्ट्‌वा - द्रव्यमय यज्ञांनी यजन करणार्‍या मनुष्याला पाहून - एष अकरुणः अतज्ज्ञः - हा निर्दय आत्मतत्त्व न जाणणारा - असुतूप् - व स्वतःच्या प्राणांची तृप्ति करणारा - मा ध्रवुं हन्यात् - मला खचित मारील - (इति) हि बिभ्यति - असे म्हणून खरोखर भितात. ॥ १० ॥

तस्मात् - त्याकरिता - धर्मवित् संतुष्टः - धर्म जाणणार्‍या संतुष्ट पुरुषाने - दैवोपपन्नेन मुन्यन्नेन अपि - दैववशात मिळालेल्या मुनींच्या अन्नांनीच - अहरहः नित्यनैमित्तिकीः क्रियाः कुर्यात् - प्रतिदिवशी नित्यनैमित्तिक कर्मे करावी. ॥ ११ ॥

धर्मज्ञः - धर्म जाणणार्‍या पुरुषाने - विधर्मः परधर्मः आभासः - विधर्म, परधर्म, वरकरणी धर्मासारखी दिसणारी गोष्ट, - उपमा छलः च - सदृश धर्म आणि कपटयुक्त धर्म - इमाः पंच अधर्मशाखाः - ह्या पाच अधर्माच्या शाखा - अधर्मवत् त्यजेत् - अधर्माप्रमाणे सोडून द्याव्या. ॥ १२ ॥

धर्मबाधः विधर्मः स्यात् - ज्या करण्याने स्वधर्माला बाध येतो तो विधर्म होय - अन्यचोदतः परधर्मः (स्यात्) - दुसर्‍यासाठी सांगितलेला जो धर्म तो परधर्म होय - उपधर्मः तुः पाखंडः वा दंभः (स्यात्) - उपधर्म किंवा उपमा म्हणजे पाखंड अथवा ढोंग होय - शब्दभित् छलः (स्यात्) - शब्दाचे भलभलते अर्थ करणे हा छळ म्हणतात. ॥ १३ ॥

यः तु - जो पण - हि आश्रमात् पृथक् - खरोखर आपल्या आश्रम धर्माहून निराळा असा - पुंभिः इच्छया कृतः - पुरुषाकडून स्वेच्छेने आचरिला जातो - सः आभासः (स्यात्) - तो आभास होय - स्वभावविहितः धर्मः - स्वभावाला अनुरूप असणारा धर्म - कस्य प्रशांतये न इष्टः - कोणाला शांती देण्यास इष्ट होणार नाही. ॥ १४ ॥

अधनः - दरिद्री मनुष्याने - धर्मार्थं यात्रार्थं वा अपि - धर्माकरिता किंवा उदरनिर्वाहाकरिता सुद्धा - धनं न ईहेत - द्रव्याची इच्छा करू नये - अनीहा - निरिच्छपणा - अनीह मानस्य महाहेः इव - उद्योग न करणार्‍या अजगराला जसा तसा - वृत्तिदा - उपजीविका देणारा होतो. ॥ १५ ॥

संतुष्टस्य निरीहस्य स्वात्मारामस्य - संतुष्ट, निरीच्छ व स्वात्मसुखी रममाण झालेल्या पुरुषाला - यत् सुखं भवति - जे सुख मिळते - तत् - ते - कामलोभेन अर्थेहया - उपभोगेच्छेने व द्रव्याच्या इच्छेने - दिशः धावतः कृतः - दाही दिशांकडे धावणाराला कोठून मिळणार? ॥ १६ ॥

यथा उपानत्पदः - जसे पायात जोडा असणार्‍याला - शर्कराकंटकादिभ्यः शिवं - खडयाकाटयापासून अभय असते - (तथा) सदा संतुष्टमनसः - तसे निरंतर ज्याचे मन संतुष्ट आहे अशाला - सर्वाः दिशः सुखमयाः (भवन्ति) - सर्व दिशा सुखमय वाटतात ॥ १७ ॥

राजन् - हे राजा - संतुष्टः केन वा न वर्तेत - संतोषी प्राणी कशाने बरे निर्वाह करणार नाही - वारिणा अपि (वर्तेत) - प्राण्याने सुद्धा निर्वाह करील - जनः (तु) - परंतु लोक - औपस्थ्यजैहव्यकार्पण्यात् - मैथुनसुख, जिव्हेची तृप्ति, दैन्यवृत्ति यायोगे - गृहपालायते - घर राखणार्‍या कुत्र्याप्रमाणे होऊन राहतात. ॥ १८ ॥

असंतुष्टस्य विप्रस्य - असंतोषी ब्राह्मणाचे - तेजः विद्याः तपः यशः - तेज, विद्या, तपश्चर्या व यश ही - स्त्रवंति - गळून जातात - इंद्रियलौल्येन च - आणि इंद्रियांच्या चंचलपणामुळे - ज्ञानं एव अवकीर्यते - ज्ञानसुद्धा नष्ट होते ॥ १९ ॥

च - आणि - जनः - मनुष्य - क्षुतृड्‍भ्यां - क्षुधा व तृषा यांच्या योगाने - कामस्य अन्तं (याति) - काम वासनेच्या नाशाला जातो - क्रोधस्य (च अंतं) एतत्फलोदयात् याति - आणि क्रोधाच्या नाशाला त्याचे फळ मिळाल्याने जातो - (किन्तु) दिशः जित्वा - पण दाही दिशा जिंकल्याने - भुवः वा भुक्त्वा - किंवा पृथ्वीचे राज्य भोगल्याने - लोभस्य न (अन्तं याति) - लोभाच्या अंताला जात नाही ॥ २० ॥

राजन् - हे राजा - बहवः बहुज्ञाः संशयच्छिदः पंडिताः - पुष्कळ बहुश्रुत व लोकांचे संशय दूर करणारे पंडित - एके सदसस्पतयः अपि - कित्येक सभाध्यक्ष सुद्धा - असंतोषात् अधः पतंति - असंतोषामुळे अधोगतीस जातात ॥ २१ ॥

असंकल्पात् कामं (जयेत्) - संकल्पाच्या त्यागाने काम जिंकावा - अर्थान् अनर्थेक्षया लोभं (जयेत्) - अर्थाना अनर्थ समजून लोभाला जिंकावे - तत्त्वावमर्शनात् च भयं (जयेत्) - व तत्त्वविचाराने भीती जिंकावी ॥ २२ ॥

आन्वीक्षिक्या शोकमोहौ (जयेत्) - आत्मविचाराने शोक व मोह जिंकावे - महदुपासया दंभं (जयेत्) - सत्पुरुषांच्या सेवेने दंभ जिंकावा - मौनेन योगां तरायान् (जयेत्) - मौनधारणाने योगांतील विघ्ने जिंकावी - कायाद्यनीहया हिंसां (जयेत्) - शरीरादिकांविषयीच्या निरिच्छपणाने हिंसाबुद्धि जिंकावी ॥ २३ ॥

कृपया भूतजं दुःखं [जह्यात्] - कृपया प्राण्यांपासून होणारे दुःख दूर करावे - समाधिना दैवं [जह्यात्] - समाधीच्या योगे दैविक दुःख टाकावे - योग वीर्येण आत्मजं [दुःखं जह्यात्] - योगसामर्थ्याने शरीरजन्य दुःख टाकावे - सत्त्वनिषेवया च निद्रां [जह्यात्] - आणि सात्त्विक आहाराने निद्रेला दूर करावे ॥ २४ ॥

च सत्त्वेन - आणि सत्त्वगुणाने - रजः तमः च जयेत् - रजोगुण व तमोगुण जिंकावे - उपशमेन च सत्त्वं [जयेत्] - आणि उपशमाने सत्त्वगुण जिंकावा - एतत् सर्वं - हे सर्व - पुरुषः - पुरुष - गुरोः भक्त्या - गुरुविषयी भक्तीने - हि अंजसा जयेत् - खरोखर सहज जिंकू शकतो ॥ २५ ॥

यस्य - ज्याची - साक्षात् - प्रत्यक्ष - भगवति ज्ञानदीपप्रदे गुरौ - भगवद्रूपी व ज्ञानरूप प्रकाश देणार्‍या गुरूच्या ठिकाणी - मर्त्यासध्दीः [स्यात्] - मनुष्याप्रमाणे तुच्छ बुद्धि असेल - तस्य सर्वं श्रुतं - त्याचे सर्व अध्ययन - कुंजरशौचवत् [व्यर्थं भवति] - हत्तीच्या स्नानाप्रमाणे फुकट होय. ॥ २६ ॥

एषः वै भगवान् - हा खरोखर भगवान - साक्षात् प्रधानपुरुषेश्वरः - प्रत्यक्ष प्रकृतिपुरुषांचा नियामक - योगेश्वरः विमृग्यांघ्रिः [च अस्ति] - व योगिजन ज्याच्या चरणांचा शोध करतात, असा आहे - [तं] वै लोकं नर मन्यते - पण लोक त्यालासुद्धा मनुष्य समजतात. ॥ २७ ॥

सर्वाः नियमचोदनाः - सगळे नियम आणि विधी - षड्‍वर्गसंयमैकान्ताः [सन्ति] - सहा विकारांचे नियंत्रण हा आहे उद्देश ज्यांचा असे होत - तदन्ताः यदि [ते] - ते फळ आहे ज्याचे असे ते जर - योगान् नो आवहेयुः - ध्यानधारणासमाधिरूप योग संपादन करणार नाहीत - [तर्हि ते] श्रमावहाः [स्युः] - तर ते केवळ श्रमदायक होत. ॥ २८ ॥

यथा वार्तादयः अर्थाः - जसे कृषि इत्यादि व्यापार - योगस्य अर्थं न बिभ्रति - योगाभ्यासाची फळे देत नाहीत - ते अनर्थाय भवेयुः - ते अनर्थाला कारण होतात - तथा आसतः - त्याप्रमाणे अभिमानी पुरुषाला - पूर्तं इष्टं अनर्थाय भवति - इष्टापूर्तादि धर्म अनर्थकारक होतात. ॥ २९ ॥

यः चित्तविजये यत्तः - जो मन जिंकण्याविषयी उद्युक्त आहे - [सः] निःसंगः - तो सर्वसंगपरित्यागी, - अपरिग्रहः - कसलाही संग्रह न करणारा - एकः विविक्तशरणः - एकटा व एकांतात राहणारा - भिक्षुः भिक्षामिताशनः स्यात् - भिक्षेचे नेमके अन्न खाणारा असा संन्यासी असावा. ॥ ३० ॥

राजन् - हे राजा - शुचौ समे देशे - शुद्ध व सपाट प्रदेशात - आत्मनः स्थिरं समं - आपले न हालणारे, सपाट - सुखं आसनं संस्थाप्य - व सुखकर आसन स्थापन करून - तस्मिन् - त्यावर - ऋज्वंगः - सरळ शरीर धारण करून - ओं इति (जपन्) आसीत् - ओम् ह्या मंत्राचा उच्चार करीत बसावे. ॥ ३१ ॥

यावत् मनः कामान् त्यजेत् - जोपर्यंत मन विषयेच्छा सोडील - स्वनासाग्रनिरीक्षणः - आपल्या नाकाच्या टोकाचे निरीक्षण करीत - पूरकुंभकरेचकैः - पूरक, कुंभक व रेचक यांनी - प्राणापानौ संनिरुध्यात्ः - प्राण व अपान ह्यांचा निरोध करीत बसावे. ॥ ३२ ॥

बुधः - ज्ञानी मनुष्याने - कामहतं भ्रमत् मनः - इच्छांनी ताडिलेले व भ्रमण करणारे मन - यतः यतः निःसरति - जेथून जेथून बाहेर पडेल - ततः ततः शनैःउपाहृत्य - तेथून तेथून हळू हळू आणून - (ततः) हृदि रुंध्यात् - ते हृदयात कोंडून ठेवावे. ॥ ३३ ॥

एवं अनिशं अभ्यसतः - याप्रमाणे नेहमी अभ्यास करणार्‍या - तस्य यतेः चित्तं - त्या योग्याचे मन - अल्पीयसा कालेन - अगदी थोडया दिवसात - अनिन्धनवह्वित् निर्वाणं याति - काष्ठरहित अग्नीप्रमाणे शांतीस प्राप्त होते. ॥ ३४ ॥

कामादिभिः अनाविद्धं - कामक्रोधादिकांनी न चालविलेले - ब्रह्मसुखस्पृष्टं - ब्रह्मसुखाचा स्पर्श झालेले - प्रशांताखिलवृत्ति - व ज्यांच्या संपूर्ण वृत्ती शांत झाल्या आहेत असे - यत् चित्तं - जे चित्त - (तत्) कर्हिचित् न एव उत्तिष्ठेत - ते कधीही विक्षेप पावतच नाही. ॥ ३५ ॥

यः भिक्षुः - जो संन्यासी - पूर्वं - प्रथम - त्रिवर्गावपनात् - तीन पुरुषार्थांचे उत्पत्तिस्थान - गृहात् प्रव्रज्य (गच्छति) - अशा घरातून बाहेर पडून जातो - (सः) पुनः यदि तान् सेवेत - तो पुनः जर त्यांचा स्वीकार करील - (तहिं) सः वै वांताशी अपत्रपः स्यात् - तर तो खरोखर ओकलेले खाणारा निर्लज्ज समजावा. ॥ ३६ ॥

यैः स्वदेहः - ज्यांनी आपला देह - अनात्मा मर्त्यः - अनात्मा, मरणधर्मी, - विट्‌कृमिभस्मसात् स्मृतः - विष्ठा, कृमि व भस्म होण्याच्या योग्यतेचा मानिला - ते यदि एवं - ते जर याला - आत्मसात् कृत्वा श्लाघयंति - आपलासा करून गौरवतील - हि असत्तमाः - खरोखर नीच. ॥ ३७ ॥

गृहस्थस्य क्रियात्यागः - गृहस्थाने कर्ममार्ग सोडणे - बटोः अपि व्रतत्यागः - ब्रह्मचार्‍याने व्रते सोडणे - तपस्विनः ग्रामसेवा - वानप्रस्थाने गावात येऊन राहणे - भिक्षोः च इंद्रियलौल्यता - आणि संन्याशाचा इंद्रियसुखाकडे ओढा असणे - एतत् अनर्थावहं अस्ति - हे अनर्थाला कारण होते. ॥ ३८ ॥

एते हि - खरोखर असे लोक - आश्रमापसदाः आश्रमविडंबकाः खलु (सन्ति) - निःसंशय आश्रमास नीचपणा आणणारे व आश्रमाचे सोंग घेणारे होत - तान् देवमायाविमूढान् - देवाच्या मायेने मोहित झालेल्या त्यांना - अनुकंपया उपेक्षेत - कीव करून उपेक्षावे. ॥ ३९ ॥

ज्ञानधुताशयः - ज्ञानाने ज्याचे चित्त निर्मळ झाले आहे असा मनुष्य - परं आत्मानं विजानीयात् चेत् - जर श्रेष्ठ आत्म्याला जाणील - (तर्हि) लंपटः किं इच्छन् - तर तो लंपट होऊन काय इच्छील - कस्य वा हेतोः - अथवा कोणत्या कारणाकरिता - देहं पुष्णाति - देहाला पोशील. ॥ ४० ॥

शरीरं रथं आहुः - शरीराला रथ म्हणतात - इंद्रियाणि हयान् - इंद्रियांना घोडे - इंद्रियेशं मनः अभीषून् - इंद्रियांचा स्वामी जे मन त्याला लगाम - मात्रा वर्त्मानि - शब्दादि विषयांना मार्ग - धिषणां सूतं - बुद्धीला सारथी - ईशसृष्टं च सत्त्वं बुहद्वंधुरं (आहुः) - आणि ईश्वराने निर्माण केलेल्या चित्ताला मोठे जोखड म्हणतात. ॥ ४१ ॥

दशप्राणं अक्षं पठन्ति - दहा प्राणांना रथाचा आस म्हणतात - अधर्मधर्मौ चक्रे - अधर्म व धर्म यांना दोन चाके म्हणतात - अभिमानं जीवं रथिनं - अहंकारवान जीवाला रथात बसणारा - च हि - आणि शिवाय - प्रणवं तस्य धनुः - ओंकाराला त्याचे धनुष्य - जीवं तु शरं - शुद्ध जीवाला तर बाण - परं एव लक्ष्यं (पठंति) - परब्रह्माला वेधण्याचे ठिकाण म्हणतात. ॥ ४२ ॥

रागः द्वेषः लोभः च - शोक, मोह, भय आणि मद - मानः अवमानः असूया च - मान, अपमान व द्वेष - माया हिंसा मत्सरः च - कपट हिंसा व मत्सर - रजः प्रमादः क्षुत् निद्रा - अभिमान, प्रमाद, क्षुधा व निद्रा - एवमादयः तु शत्रवः (सन्ति) - इत्यादिक तर शत्रु होत - क्वचित् रजस्तमःप्रकृतयः (सन्ति) - यातील काही रजोगुणी व काही तमःप्रकृति - (क्वचित्) सत्त्वप्रकृतयः (सन्ति) - व काही सत्त्वप्रकृति आहेत. ॥ ४३-४४ ॥

आत्मवशोपकल्पं - आपल्या अधीन आहे साहित्य ज्याचे असा - नृकायरथं यावत् धत्ते - मनुष्यदेहरूप रथ जोवर मनुष्य धारण करीत आहे - गरिष्ठचरणार्चनया - महासाधूंच्या चरणांच्या सेवेने - निशातं ज्ञानासिं दधत् - तीक्ष्ण झालेली ज्ञानरूपी तलवार धारण करीत - अच्युतबलः - परमेश्वर आहे बळ ज्याचे - अस्तशत्रुः - व नाहीसे झाले आहेत शत्रु ज्याचे असा - उपशांतः स्वाराज्यतुष्टः (भूत्वा) - शांत व ब्रह्मानंदाने संतुष्ट झालेला असा होऊन - इदं विजह्यात् - ह्या शरीरादिकांचा त्याग करावा. ॥ ४५ ॥

नो चेत् - नाही तर - असदिंद्रियवाजिसूताः - दुष्ट इंद्रियरूप घोडे व सारथी - प्रमत्तं उत्पथं नीत्वा - बेसावध मनुष्याला आडमार्गाला नेऊन - विषयदस्युषु निक्षिपंति - विषयरूपी चोरवस्तीत फेकून देतात - ते दस्यवः - ते चोर - अमुं सहयसूतं - ह्याला घोडे व सारथी यांसह - तमोंधे उरुमृत्यूभये - ज्यात मृत्यूचे मोठे भय आहे अशा अज्ञानांधकाराने - संसारकूपे क्षिपंति - भरलेल्या संसाररूप कूपात लोटितात. ॥ ४६ ॥

प्रवृत्तं च निवृत्तं - प्रवृत्त आणि निवृत्त असे - द्विविधं वैदिकं कर्म (अस्ति) - दोन प्रकारचे वैदिक कर्म आहे - प्रवृत्तेन आवर्तेत - प्रवृत्तीमार्गाने पुनःपुन्हा संसारात परत येतो - निवृत्तेन च अमृतं अश्र्नुते - आणि निवृत्तिमार्गाने मोक्षसुख भोगतो. ॥ ४७ ॥

हिंस्रं - श्येनयागादि हिंस्र कर्म - द्रव्यमयं अग्निहोत्रादि - व ज्यामुळे द्रव्य पुष्कळ लागते असे अग्निहोत्रादि - दर्शः पूर्णमासः च - दर्श व पूर्णमास याग - काम्यं अशांतिदं - हे सर्व कामनायुक्त व शांति न देणारे आहे - चातुर्मास्यः पशुः सुतः च - चातुर्मास्य याग, पशुयाग व सोमयाग. - एतत् प्रवृत्ताख्यं - हे प्रवृत्तिमार्गातील कर्म - हुतं प्रहुतं च एव - तसेच वैश्वदेव व बलिहरण - इष्टं (अस्ति) - इष्टनामक कर्म होय - सुरालयाराम - देवालय बांधणे, बागबगीचे करणे, - कूपाजीव्यादिलक्षणं पूर्तं (स्यात्) - विहीरी बांधणे, पाणपोई घालणे इत्यादि प्रकारचे कर्म पूर्त कर्म होय. ॥ ४९ ॥

क्ष्मेश - हे पृथ्वीपते - द्रव्यसूक्ष्मविपाकः च धूमः - होमद्रव्याचा सूक्ष्म परिणाम जो धूम - रात्रिः - रात्र - अपक्षयः - कृष्णपक्ष - दक्षिणं अयनं - दक्षिणायन - सोमः दर्शः ओषधीवीरुधः - चंद्र, दर्श, औषधि व वनस्पती - अन्नं रेतः - अन्न व रेत - इति (अयम्) - असा हा - पुनर्भवः पितृयानः - पुनः जन्म देणारा पितृमार्ग होय - एकैकश्येन अनुपूर्वं - प्रवृत्तिमार्गाने जाणारा क्रमाक्रमाने प्रत्येक - भूत्वा भूत्वा इह जायते - स्थानाजवळ जाऊन पुनः या भूमीवर जन्मास येतो. ॥ ५०-५१ ॥

निषेकादिश्मशानान्तैः संस्कृतः - गर्भधानापासून अंत्येष्टीपर्यंत संस्कारांनी युक्त झालेला - द्विजः (स्यात्) - ब्राह्मण होय - ज्ञानदीपेषु इंद्रियेषु - ज्ञानाने उद्दीपित झालेल्या इंद्रियांमध्ये - क्रियायज्ञान् जुह्वति - क्रियायज्ञांचा होम करितात ॥ ५२ ॥

इंद्रियाणि मनसि (न्यसेत्) - इंद्रियांचा मनामध्ये लय करावा - वैकारिकं मनः वाचि - विकारी अशा मनाचा वाणीमध्ये - वाचं वर्णसमाम्नाये - वाणीचा वर्णसमूहात - तं स्वरे ओंकारे - वर्णसमूहाचा त्रिवर्णरूप ओंकारात - ओंकारं बिंदौ - ओंकाराच्या बिंदूत - तं नादे - त्या बिंदूच्या नादामध्ये - तं तु प्राणे (न्यसेत्) - त्या नादाचा परब्रह्मरुपी लय करावा ॥ ५३ ॥

अग्नीः सूर्यः - अग्नि, सूर्य - दिवा प्राहूणः - दिवस, प्रातःकाल - शुक्लः राका - शुक्लपक्ष, पूर्णिमा - उत्तरं स्वराट् - उत्तरायण अशा मार्गाने - विश्वः च तैजसः प्राज्ञः - आणि तेथे विश्व, तेजस व प्राज्ञ ही स्वरुपे घेतो - समन्वयात् तुर्यः आत्मा - एकरुप झाल्यावर चौथा जो आत्मा तोच तो ॥ ५४ ॥

इदं देवयानं प्राहुः - ह्याला देवांचा मार्ग म्हणतात - हि अनुपूर्वशः भूत्वा भूत्वा - कारण क्रमाक्रमाने उत्पन्न होऊन - आत्मयाजी उपशांतात्मा आत्मस्थः - आत्म्याचा उपासक, शांत मनाचा व आत्मनिष्ठ पुरुष - न निवर्तते - पुनः संसारात येत नाही ॥ ५५ ॥

वेदनिर्मिते एते - वेदांनी निर्माण केलेले हे - पितृदेवानां अयने - पितर व देव यांचे दोन मार्ग - शास्त्रेण चक्षुषाः यः वेद - शास्त्रदृष्टीने जो जाणतो - जनस्थः अपि - लोकांत वागूनही - न मुह्यति - मोह पावत नाही ॥ ५६ ॥

जनानां आदौ अंते सत् - जनांच्या प्रारंभी व अंती असणारे - बहिः अंतः परावरं - बाहेर, आत, उच्च व नीच - ज्ञानं ज्ञेयं - ज्ञान व ज्ञानाचा विषय - वचः वाच्यं - भाषण व भाषणाचा विषय - तमः ज्योतिः - अप्रकाश व प्रकाश - (एतत् सर्वं) स्वतः तु अयं अस्ति - ही सर्व हा स्वतःच होय ॥ ५७ ॥

यथा हि आबाधितः अपि आभासः - जसे खरोखर खोटे ठरलेले प्रतिबिंबसुध्दा - वस्तुतया स्मृतः - वस्तुरुपाने प्रतीतीला येते - तद्वत् ऐंद्रियकं - त्याप्रमाणे इंद्रियांचे विषय - दुर्घटत्वात् - वास्तविकपणे असणे कठिण असल्यामुळे - अर्थविकल्पितं (अस्ति) - वस्तुरुपाने कल्पिलेले आहेत ॥ ५८ ॥

इह अर्थानां - ह्या विश्वात देहादि पदार्थांमध्ये - क्षित्पादीनां छाया - पृथिव्यादिकांच्या ऐक्यबुद्धीला आधार शरर आदि आहे असे - कतमा अपि न - कोणत्याही प्रकारे संभवत नाही - हि संघातः न अपि विकारः - अथवा कार्यावयवीही संभवत नाही - न पृथक् - पंचमहाभूतांपासून वेगळेही नाही - न अन्वितः मृषा - व युक्तही संभवत नाही म्हणून खोटे होय ॥ ५९ ॥

धावतः च - आणि महाभूते - अवयवित्वात् - अवयवयुक्त असल्यामुळे - तन्मात्रावयवैः न स्युः - परमाणुरुपी अवयवांहून निराळी असू शकत नाहीत - अवयविनी हि असति - म्हणून अवयवी खोटे ठरल्यावर - अंततः अवयवैः असत् (स्यात्) - शेवटी अवयवहि खोटा ठरणारच ॥ ६० ॥

तावत् वस्तुनः विकल्पे सति - अविद्या निवृत्त झाली नाही तोपर्यंत वस्तूचा भेद भासत असता - सादृश्यभ्रमः स्यात् - सारखेपणाची भूल असणारच - यथा स्वप्ने जाग्रत्स्वापौ - ज्याप्रमाणे स्वप्नातील जागेपणा किंवा झोप - तथा विधिनिषेधता (अस्ति) - त्याप्रमाणे मिथ्यासृष्टीतील विधिनिषेध सांगणारी शास्त्रे होत ॥ ६१ ॥

आत्मनः - आत्म्याचे - भावाद्वैतं - भावाद्वैत - क्रियाद्वैतं तथा द्रव्याद्वैतं - क्रियाद्वैत व तसेच द्रव्याद्वत - वर्तयन् मुनिः - मनात वागविणारा मुनी - स्वानुभूत्या इह - आत्मस्वरुपाच्या अनुभवाने ह्या संसारातील - त्रीन् स्वप्नान् धुनुते - जागृति, स्वप्न व निद्रा ह्या तीन अवस्थांना दूर करितो ॥ ६२ ॥

विकल्पस्य अवस्तुत्वात् - भेदाच्या खोटेपणामुळे - पटतंतुवत् - तंतु व वस्त्रं यांप्रमाणे - कार्यकारणवस्त्वैक्यमर्शनं - कार्य व कारण ह्या दोन्ही वस्तूंचे ऐक्य आहे असे पहाणे - तत् भावाद्वैतं उच्यते - ते भावाद्वैत म्हणतात ॥ ६३ ॥

पार्थ - हे धर्मा - मनोवाक्तनुभिः साक्षात् - मन, वाणी व शरीर याच्या योगे प्रत्यक्ष - परे ब्रह्मणि - परब्रह्माच्या ठिकाणी - यत् सर्वं कर्मसमर्पणं - जे सर्व कर्मांचे समर्पण करणे - तत् क्रियाद्वैतं उच्यते - त्याला क्रियाद्वैत म्हणतात ॥ ६४ ॥

आत्मजायासुतादीनां - स्वतः व स्त्रीपुत्रादिक यांच्या - अन्योषां सर्वदेहिनां - आणि इतर सर्व प्राण्यांच्या - यत् स्वार्थकामयोः ऐक्यं - स्वार्थाशी व कामाशी जे ऐक्य - तत् द्रव्याद्वैतं उच्यते - त्याला द्रव्याद्वैत म्हणतात. ॥ ६५ ॥

नृप - हे राजा - यत् यस्य - जे द्रव्य ज्या वर्णाला - येन वा यत्र - ज्या उपायाने अथवा ज्या देशी व काली - यतः अनिषिद्धं (स्यात्) - ज्यासाठी निषिध्द सांगितले नसेल - तेन सः नरः - त्या द्रव्याच्या योगे त्या मनुष्याने - कर्माणि ईहेत - कर्मे करावी - अनापदि अन्यैः न (ईहते) - संकटकाल प्राप्त झाला नसता दुसर्‍या द्रव्यांनी कर्मे करु नयेत. ॥ ६६ ॥

राजन् - हे राजा - एतैः च अन्यैः - ह्या आणि दुसर्‍या - वेदोक्तैः स्वकर्मभिः - वेदोक्त स्वकर्मांनी - वर्तमानः तद्भक्तिभाक् नरः - वागणारा कृष्णाचा भक्त मानव - गृहे अपि अस्य गतिं यायात् - गृहस्थाश्रमात असूनही श्रीकृष्णाच्या गतीला प्राप्त होतो. ॥ ६७ ॥

यथा हि - जसे खरोखर - नृपदेव यूयं - हे राजाधिराज तुम्ही - प्रभोः - प्रभु श्रीकृष्णाच्या आश्रयाने - आत्मनः दुस्त्यजात् आपद्वणात - स्वतःवर आलेल्या दुर्धर संकटातून - उत्तरत - पार पडला - सेवया - आणि तूही ज्याच्या चरणकमलांच्या सेवेने - निर्जितदिग्गजः क्रतून् अहार्षीत् - दशदिशांकडील दिग्गजांना जिंकून यज्ञ करिता झालास. ॥ ६८ ॥

पुरा अतीते महाकल्पे - पूर्वी गेलेल्या महाकल्पात - अहं गंधर्वाणां सुसंमतः - मी गंधर्वांना अत्यंत मान्य असा - नाम्ना उपबर्हणः - उपबर्हण नावांचा - रूपपेशलमाधुर्य - सुंदर रूप, नाजूकपणा, माधुर्य - सौगन्ध्यप्रियदर्शन - व सुगन्ध इत्यादि गुणांमुळे ज्यांचे दर्शन सर्वांस आवडणारे होते असा - स्त्रीणां प्रियतमः - स्त्रियांचा आवडता - नित्त्यं मत्तः तु पुरुलंपटः - नित्य उन्मत्त व अतिशय लंपट असा - कश्चित गंधर्वः अभवं - कोणी एक गंधर्व होतो. ॥ ६९-७० ॥

एकदा देवसत्रे तु - एके दिवशी देवांच्या सभेत तर - विश्वसृग्भिः हरिगाथोपगायने - प्रजापतींनी हरिकथेचे गायन करण्यासाठी - गंधर्वाप्सरसां गणाः उपहूताः - गंधर्व व अप्सरांचे समुदाय बोलाविले. ॥ ७१ ॥

तत् च विद्वान् अहं - आणि ते आमंत्रण कळल्यावर मी - स्त्रीभिः परिवृतः गायन् गतः - स्त्रियांनी परिवेष्टित होऊन गात गात गेलो - तत् विश्वसृजः हेलनं ज्ञात्वा - तो मी केलेला प्रजापतींचा अपमान जाणून - मे ओजसा शेपुः - आपल्या प्रभावाने मला शाप दिला - त्वं कृतहेलनः - ज्याने आमचा अपमान केला आहे असा तू - नष्टश्रीः आशु शूद्रतां याहि - ऐश्वर्यापासून भ्रष्ट होऊन लवकर शूद्राच्या जन्माला जा. ॥ ७२ ॥

तावत् अहं - तत्काल मी - दास्यां जज्ञे - दासीच्या उदरी जन्माला आलो - तत्र अपि अहं - तेथेही मला - ब्रह्मवादिनां शुश्रूषया अनुषङगेण - ब्रह्मज्ञानी पुरुषांची सेवा प्राप्त झाल्यामुळे व संगति घडल्यामुळे - ब्रह्मपुत्रतां प्राप्तः - ब्रह्मदेवाचा पुत्र झालो आहे. ॥ ७३ ॥

पापनाशनः गृहमेधीयः धर्मः - पापांचा नाश करणारा गृहस्थाश्रम्याचा धर्म - ते वर्णितः - तुला निवेदन केला - गृहस्थः येन - गृहस्थ ज्याच्या योगाने - अञ्जसा न्यासिनां पदवीं इयात् - अनायासे संन्याशांच्या गतीला प्राप्त होतो. ॥ ७४ ॥

यूयं नृलोके भूरिभागाः (स्थ) - तुम्ही मनुष्यलोकांमध्ये मोठे भाग्यवान आहा - बतमनुष्यलिंगं गूढं - कारण मनुष्यचिन्हाने गुप्त असा - साक्षात् परं ब्रह्म - प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्ण - आवसति इति - राहतो म्हणून - लोकं पुनानाः मुनयः - लोकांना पवित्र करणारे मुनि - येषां गृहान् अभियंति - ज्यांच्या घरी चालून येतात. ॥ ७५ ॥

वः प्रियः सुहृत् - तुमचा प्रिय मित्र - मातुलेयः आत्मा - मामेभाऊ जिवलग - विधिकृत् अर्हणीयः - आज्ञेप्रमाणे वागणारा पूज्य - गुरुः च - आणि उपदेश कर्ता - सः अयम् (कृष्णः) - तो हा कृष्ण - कैवल्यनिर्वाणसुखानुभूतिः - मोक्ष व परमानंदाचा अनुभव हेच ज्याचे स्वरूप असा - महद्विमृग्यं ब्रह्म - मोठे मोठे साधु ज्याचा शोध करितात तो परमात्माच होय. ॥ ७६ ॥

साक्षात् भवपद्मजादिभिः - प्रत्यक्ष शंकर व ब्रह्मदेवादिकांनाही - यस्य रूपं - ज्याचे स्वरूप - धिया वस्तुतया - विशाल बुद्धीच्या योगे वास्तविक रीतीने - न उपवर्णितं - वर्णन करिता आले नाही - सः एषः सात्वतां पतिः - तो हा यदुपती भगवान - मौनेन भक्त्या - मौनाने, भक्तीने - उपशमेन (च) पूजितः - आणि शांति ह्या साधनांनी पूजिलेला असा - नः प्रसीदतां - आम्हावर प्रसन्न होवो. ॥ ७७ ॥

इति देवर्षिणा प्रोक्तं निशम्य - याप्रमाणे नारदाने सांगितलेले श्रवण करून - सुप्रीतः - अत्यंत संतोष पावलेला - भरतर्षभः प्रेमविव्हलः (भूत्वा) - भरताश्रेष्ठ धर्मराज प्रेमाने गहिवरला होऊन - कृष्णं (नारदं) च पूजयामास - कृष्णाची व नारदाची पूजा करिता झाला. ॥ ७८ ॥

पूजितः मुनिः - पूजा केलेला नारदमुनि - कृष्णपार्थौ उपामंत्र्य प्रययौ - कृष्ण व धर्मराज यांचा निरोप घेऊन निघून गेला - पार्थः कृष्णं परं ब्रह्म श्रुत्वा - धर्मराज, श्रीकृष्ण परब्रह्म आहे असे ऐकून - परमविस्मितः - अत्यंत विस्मित झाला. ॥ ७९ ॥

इति ते - याप्रमाणे तुला - दाक्षायणीनां पृथग्वंशाः प्रकीर्तिताः - दक्षकन्यांचे निरनिराळे वंश सांगितले - यत्र देवासुरमनुष्याद्याः - ज्या वंशात देव, दैत्य व मनुष्यादिक - चराचराः लोकाः - चराचर सृष्टि उत्पन्न झाली. ॥ ८० ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP