श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १४ वा - अन्वयार्थ

गृहस्थाचे सदाचार -

देवऋषे - हे नारदा - मादृशः च गृहमूढघीः - गृहस्थः - माझ्यासारखा घरात आसक्त झाले आहे मन ज्याचे असा गृहस्थ - एतां पदवीं - ह्या मार्गाला - येन विधिना - ज्या रीतीने - अंजसा याति (तं) ब्रूहि - सत्त्वर प्राप्त होतो तो विधि सांगा. ॥ १ ॥

राजन् - हे राजा - गृहेषु अवस्थितः - घरात राहणार्‍या पुरुषाने - गृहोचिताः क्रियाः कुर्वन् - गृहस्थाश्रमाला योग्य अशी क्रिया करीत - साक्षात् वासुदेवार्पणं (कृत्वा) - प्रत्यक्ष परमेश्वराला अर्पण करून - महामुनीन् उपासीत् - मोठमोठया ऋषींची सेवा करावी. ॥ २ ॥

श्रद्दधानं - श्रद्धायुक्त होत्साता - यथाकालं उपशांतजनावृतः - यथाकाली विरक्त पुरुषांना बरोबर घेऊन - अभीक्ष्णं - वारंवार - भगवतः अवतारकथामृतं शृण्वन् - परमेश्वराचे अवतारचरित्ररूपी अमृत श्रवण करीत. ॥ ३ ॥

सत्संगात् शनकैः - सत्संगाने हळू हळू - आत्मजायात्मजादिषु संगं विमुच्येत् - शरीर, स्त्री, पुत्र इत्यादिकांविषयीचा संग सोडावा - (तेषु) मुच्यमानेषु - त्यांचा संग सुटत असता - स्वयं स्वप्नवत् उत्थितः (भवति) - स्वतः स्वप्नातून जणु उठतो. ॥ ४ ॥

देहे गेहे च - देह आणि घर याठिकाणी - यावदर्थं उपासीनः पंडितः - कामापुरता संबंध ठेवणार्‍या ज्ञानी पुरुषाने - विरक्तः (सन्) रक्तवत् - विरक्त असताहि आसक्ताप्रमाणे - तत्र नृलोके - त्या मनुष्यलोकात - नरतां न्यसेत् - मनुष्यपणाच ठेवावा. ॥ ५ ॥

निर्ममः च (भूत्वा) - आणि ममत्व सोडून - ज्ञातयः पितरौ - ज्ञातिजन, आईबाप, - पुत्राः भ्रातरः अपरे सुहृदः - पुत्र, भाऊ आणि दुसरे इष्टमित्र - यत् वदंति - जे म्हणतील - यत् इच्छंति - जे इच्छितील - (तत्) अनुमोदेत - त्याला अनुमोदन द्यावे. ॥ ६ ॥

दिव्यं - स्वर्गातील वृष्टि होऊन उत्पन्न झालेले धान्य, - भौ‌मं - भूमीतील ठेव - अंतरिक्षं च वित्तं - आणि आपोआप मिळालेले द्रव्य - अच्युतनिर्मितं (अस्ति) - परमेश्वराने निर्माण केलेले होय - बुधः तत् सर्वं स्वतः उपभुंजानः - त्या सर्वाचा उपभोग घेणार्‍या ज्ञानी मनुष्याने - एतत् कुर्यात् - ही कर्मे करावी. ॥ ७ ॥

यावत् जठरं ध्रियेत - जेवढयाने पोट भरेल - तावत् देहिनां स्वत्वं (अस्ति) - तेवढेच मनुष्याचे स्वतःचे होय - हि यः अधिकं अभिमन्येत - याकरिता जो यापेक्षा अधिकाचा अभिमान करतो - सः स्तेनः - तो चोर - दंडं अर्हति - दंडाला पात्र आहे. ॥ ८ ॥

मृगोष्ट्रखरमर्काखुसरीसृप्खगमक्षिकः - हरिण, उंट, गाढव, माकडे, उंदीर, साप, पक्षी आणि माशा यांना - आत्मनः पुत्रवत् पश्येत् - आपल्या मुलाप्रमाणे पाहावे - तैः एषां अंतरं कियत् (अस्ति) - पुत्रामध्ये आणि ह्यांच्यात कितीसा भेद आहे. ॥ ९ ॥

गृहमेधी अपि - गृहस्थाश्रमाने सुद्धा - त्रिवर्गं अतिकृच्छ्रेण न भजेत् - धर्म, अर्थ व काम ह्यांना मोठया कष्टाने सेवन करू नये - यथादेशं यथाकालं - ज्या स्थली व ज्या काळी - यावत् दैवोपपादितं (भजेत्) - जेवढे दैवाने प्राप्त होईल तेवढेच सेवावे. ॥ १० ॥

आश्वाघान्तेऽवसायिभ्यः - कुत्रे, पतित, चांडाळ ह्या सर्वांना - यथावत् कामान् संविभजेत् - योग्य रीतीने इष्ट असे अन्न वाटून द्यावे - यतः नृणां स्वत्वग्रहः (अस्ति) - जिच्या ठिकाणी मनुष्यांना आपलेपणाचा मोठा अभिमान असतो - एकां आत्मनः दारां अपि - आपली एकुलती एक बायको सुद्धा. ॥ ११ ॥

यदर्थे स्वप्राणान् जह्यात् - जिच्याकरिता आपण प्राण देतो - वा पितरं गुरुं हन्यात् - अथवा बापाला व गुरूला मारितो - तस्यां स्त्रियां - अशा स्त्रीच्या ठिकाणी - यः स्वत्वं जह्यात् - जो आपलेपणा सोडतो - तेन अजितः हि जितः (स्यात्) - त्याने दुसर्‍या कोणीही न जिंकलेला असा परमेश्वरही जिंकला आहे असे समजावे. ॥ १२ ॥

कृमिविड्‌भस्मनिष्ठांतं - किडे, विष्ठा व भस्म यात अंत होणारे - इदं तुच्छं कलेवरं क्व - हे तुच्छ शरीर कोणीकडे - तदीयरतिः भार्या क्व - ह्या शरीराचे सुखस्थान अशी स्त्री कोणीकडे - अयं नभच्छदिः आत्मा (च) क्व - आणि आकाशाला आच्छादणारा आत्मा कोणीकडे. ॥ १३ ॥

प्राज्ञः - सुज्ञ मनुष्याने - सिद्धैः यज्ञावशिष्ठार्थैः - सिद्ध केलेल्या अशा यज्ञ करून उरलेल्या अन्नाने - आत्मनः वृत्तिं कल्पयेत् - आपला चरितार्थ चालवावा - शेषे स्वत्वं त्यजन् - बाकींच्यावरील स्वत्व सोडणारा मनुष्य - महतां पदवीं इयात् - परमहंसाच्या पदवीला प्राप्त होतो. ॥ १४ ॥

अन्वहं स्ववृत्त्यागतवित्तेन - प्रतिदिनी आपल्या धंद्यात जे द्रव्य मिळेल त्याने - देवान् ऋषीन् नृभूतानि - देव, ऋषी, मनुष्य, भूते, - पितृन् आत्मानं पृथक् पुरुषं - पितर आणि स्वतःच अंतर्यामी असा सर्वांहून परमात्मा यांना निरनिराळे - यजेत् - पूजावे. ॥ १५ ॥

यहिं आत्मनः अधिकाराद्याः - जर स्वतःच्या अधिकारादिक - सर्वाः यज्ञसंपदः स्युः - सर्व यज्ञसंपत्ति असतील - वैतानिकेन अग्निहोत्रादिना विधिना - यज्ञासंबंधी अग्निहोत्रादि विधीने - यजेत् - अनुष्ठान करावे. ॥ १६ ॥

राजन् - हे राजा - अयं सर्वयज्ञभुक् भगवान् - हा सकलयज्ञभोक्ता परमेश्वर - विप्रमुखे हुतैः - ब्राह्मणांच्या मुखी हवन केलेल्या अन्नाने - यथा हि इज्येत (तथा) - जसा खरोखर पूजिला जातो तसा - अग्निमुखतः हविषा न वै - अग्निमुखी हवन केलेल्या अन्नाने निश्चये करून होत नाही. ॥ १७ ॥

तस्मात् - त्याकरिता - ब्राह्मणदेवेषु मर्त्यादिषु - ब्राह्मण, पंचमहायज्ञांतील देवता आणि मनुष्ये यांच्यासाठी - यथार्हतः तैः तैः कामैः - योग्यतानुसार त्या त्या उपभोगांनी - ब्राह्मणान् अनु - प्रथम ब्राह्मणानंतर इतर अशा पद्धतीने - एनं क्षेत्रज्ञं यजस्व - ह्या क्षेत्रज्ञाची आराधना करावी. ॥ १८ ॥

वित्तवान् द्विजः - धनवान ब्राह्मणाने - प्रौष्ठपदे मासि - भाद्रपद महिन्यात - पित्रोः तद्‌बंधूनां च - मातापितरांचे व त्यांच्या बंधूंचे - अपरपक्षीयं श्राद्धं - कृष्णपक्षातील श्राद्ध - यथावित्तं कुर्यात् - जसे द्रव्य असेल त्याप्रमाणे करावे. ॥ १९ ॥

अयने विषुवे - दक्षिणायन, उत्तरायण, मेषसंक्रांत व तूळसंक्रांत या काळी - व्यतीपाते दिनक्षये - व्यतीपात योग, तिथिक्षय या प्रसंगी - चंद्रादित्योपरागे च - आणि चंद्रग्रहण व सूर्यग्रहण या समयी - द्वादशीश्रवणेषु च - आणि श्रवणनक्षत्रयुक्त द्वादशीला. ॥ २० ॥

शुक्लपक्षे तृतीयायां - वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी - अथ कार्तिके नवम्यां - आणि कार्तिकातील नवमीला - तथा हेमंते शिशिरे चतसृषु अष्टकासु - त्याचप्रमाणे हेमंत व शिशिर ऋतूंतील चार अष्टका ह्या दिवशी. ॥ २१ ॥

माघे सितसप्तम्यां च - आणि माघ शुक्ल सप्तमीला - मघाराकासमागमे - मघानक्षत्रयुक्त पौर्णिमेला - राकया च अनुमत्या वा युतानि - आणि पूर्ण चंद्रबिंबयुक्त पौर्णिमा किंवा एका कलेने न्यून चंद्रबिंब असलेली पौर्णिमा यांनी युक्त अशा - मासर्क्षाणि अपि - मासनक्षत्राच्या दिवशीसुद्धा. ॥ २२ ॥

द्वादश्यां अनुराधा स्यात् - तसेच द्वादशीला अनुराधा नक्षत्र असेल तर - श्रवणः तिस्रः उत्तराः - श्रवण अथवा उत्तरा उत्तराषाढा व उत्तराभाद्रपदा ही नक्षत्रे असतील तर - वा आसु तिसृषु एकादशी (यदि स्यात्) - किंवा अनुराधा, श्रवण व तीन उत्तरा ह्या नक्षत्री एकादशी आली असेल तर - जन्मर्क्षश्रोणयोगयुक् श्राद्धं कुर्यात् - जन्मनक्षत्र व श्रवण ज्या दिवशी असेल, त्या दिवशी श्राद्ध करावे. ॥ २३ ॥

ते एते - ते हे - नृणां श्रेयोविवर्धनाः - मनुष्यांचे कल्याण वाढविणारे - श्रेयसः कालाः (सन्ति) - श्रेष्ठ काल होत - एतेषु सर्वात्मना श्रेयः कुर्यात् - ह्या काली सर्वतोपरी धर्मकृत्ये करावीत - तत् आयुषः अमोघं (स्यात्) - तेच खरे आयुष्याचे साफल्य होय. ॥ २४ ॥

एषु - ह्या योगांवर - स्नानं जपः होमः व्रतं देवाद्विजार्चनं - स्नान, जप, होम, व्रत व देव आणि ब्राह्मण यांची पूजा - पितृदेवनृभुतेभ्यः यत् दत्तं - पितर, देव, मनुष्य व भूते ह्यांना जे दिलेले असते - तत् हि अनश्वरं भवति - ते निश्चयेकरून अक्षय्य होते. ॥ २५ ॥

नृप - हे राजा - जायाया - स्त्रीचे पुंसवनादि संस्कार, - अपत्यस्य - मुलाचे जातकर्मादि संस्कार, - तथा आत्मनः संस्कारकालः - त्याप्रमाणे स्वतःचे यज्ञदीक्षादि संस्कार यांचा काळ - प्रेतसंस्था मृताहः च - प्रेताचे दहनकर्म आणि सांवत्सरिक श्राद्धदिवस - अभ्युदये कर्मणि च - आणि दुसर्‍या मांगलिक कृत्यात. ॥ २६ ॥

अथ धर्मादिश्रेयआवाहन् देशान् प्रवक्ष्यामि - आता धर्माचरण करावयास शुभ देश सांगतो. - यत्र सत्पात्रं लभ्यते - जेथे सत्पात्र मिळते - सः वै पुण्यतमः देशः अस्ति - तो खरोखर अत्यंत पुण्यकारक देश होय. ॥ २७ ॥

यत्र - ज्यात - एतत् सर्वं चराचरं - हे सर्व स्थावरजंगम विश्व - भगवतः बिंबं (अस्ति) - परमेश्वराची मूर्ति मानण्यात येते - यत्र ह तपोविद्यादयान्वितं - आणि जेथे खरोखरच तपश्चर्या, विद्या, दया ह्यांनी युक्त - ब्राह्मणकुलं (विद्यते) - असा ब्राह्मणांचा समुदाय असतो. ॥ २८ ॥

यत्र यत्र हरेः अर्चा (भवति) - जेथे जेथे परमेश्वराची पूजा होते. - यत्र च - आणि जेथे - पुराणेषु विश्रुताः - पुराणात प्रसिध्द अशा - गंगादयः नद्यः (सन्ति) - गंगादिक नद्या आहेत - सः देशः श्रेयसां पदं (अस्ति) - तो देश पुण्यस्थान होय. ॥ २९ ॥

राजन् - हे राजा - पुष्करादीनि सरांसि - पुष्करादिक सरोवरे - उत अर्हाश्रितानि क्षेत्राणि - किंवा सत्पुरुषांनी सेविलेली क्षेत्रे - कुरुक्षेत्रं गयशिरः - कुरुक्षेत्र, गया - प्रयागः पुलहाश्रमः - प्रयाग, पुलहऋषीचा आश्रम - ॥ ३० ॥

नैमिषं फल्गुनं - नैमिषक्षेत्र, फल्गुतीर्थ - सेतुः प्रभासः - सेतुबंधरामेश्वर, प्रभासक्षेत्र - अथ कुशस्थली - आणि कुशस्थली - वाराणसी मधुपुरी - वाराणसी व मथुरा - पंपा तथा बिंदुसरः - पंपा तसेच बिंदुसरोवर - ॥ ३१ ॥

नारायणाश्रमः नंदा - बदरीनारायणाश्रम, नंदा नदी - सीतारामाश्रमादयः - सीतेचा व रामाचा आश्रम आदिकरून - सर्वे महेंद्रमलयादयाः कुलाचलाः - महेंद्र, मलय इत्यादि सर्व कुलपर्वत - ॥ ३२ ॥

च ये हरेः अर्चाश्रिताः - आणि जे विष्णुच्या पूजेचा आश्रय करितात - एते पुण्यतमाः देशाः (सन्ति) - हे अत्यंत पुण्यकारक देश होत. - श्रेयस्कामः एतान् - कल्याणाची इच्छा करणार्‍या पुरुषाने - अभीक्षणशः निषेवेत - ह्या देशाचे वारंवार सेवन करावे - अत्र हि पुंसां ईहितः धर्मः - कारण येथे पुरुषांनी केलेला धर्म - सहस्राधिफुलोदयः (भवति) - सहस्रपट फळ देणारा होतो. ॥ ३३ ॥

उर्वीश - हे पृथ्वीपते - अत्र तु पात्रवित्तमैः कविभिः - याठिकाणी तर उत्तम सत्पात्री ज्ञानी विद्वानांनी - चराचरं यन्मयं (अस्ति) - स्थावरजंगमात्मक विश्व ज्याचे स्वरुप आहे - सः एकः हरिः एव - असा एक परमेश्वरच - वै पात्रं निरुक्तं - खरोखर सत्पात्र म्हणून सांगितला आहे. ॥ ३४ ॥

राजन् - हे धर्मराजा - यत् तत्र (तव राजसूये) अग्रपूजायां - म्हणूनच त्या तुझ्या राजसूय यज्ञातील अग्रपूजेच्या वेळी - देवर्ष्यर्हत्सु - देव व ऋषि ह्यांतील मोठमोठे योग्य असे - ब्रह्मात्मजादिषु सत्सु वै - सनत्कुमारादिक मुनि आले असताहि - पात्रतया अच्युतः मतः - उत्तम पात्र म्हणून कृष्णच मान्य झाला. ॥ ३५ ॥

महान् आंडकोशांघ्रिपः - मोठा ब्रह्मांडवृक्ष - जीवराशिभिः आकीर्णः (अस्ति) - जीवसमूहांनी भरलेला आहे - तन्मूलत्वात् अचुतेज्या - परमेश्वर ब्रह्मांडाचा आधार असल्यामुळे त्याची पूजा म्हणजे - सर्वजीवात्मतर्पणं (अस्ति) - सर्व जीवात्म्यांचा संतोष होय. ॥ ३६ ॥

अनेन नृतिर्यगृषिदेवताः (सृष्टाः) - ह्या परमेश्वराने मनुष्य, पशुपक्षी, ऋषि व देवता ही उत्पन्न केली - पुराणि सृष्टानि - शरीरे निर्माण केली - हि असौ पुरुषः - म्हणून हा पुरुष - जीवेन रूपेण - जीवरुपाने - पुरेषु शेते - शरीरांच्या ठिकाणी रहातो. ॥ ३७ ॥

राजन् - हे राजा - तेषु एषु (पुरेषु) - परमेश्वर त्या ह्या शरीरात - तारतम्येन वर्तते - न्यूनाधिकपणाने रहातो - हि तस्मात् - याकरिता - यावान् आत्मा- जेवढ्या प्रमाणात आत्मस्वरुप - यथा ईयते - अनुभवास येते - पुरुषः - तो पुरुष - पात्रं अस्ति - सत्पात्र होय. ॥ ३८ ॥

नृप - हे राजा - कविभिः तेषां नृणां - विद्वान् लोकांनी त्या मनुष्यात - मिथः अवज्ञात्मतां दृष्टवा - परस्परांमध्ये तिरस्कार उत्पन्न झालेला पाहून - त्रेतादिषु हरेः अर्चा - त्रेतादियुगांमध्ये हरीची मूर्ति - क्रियायै कृता - उपासनेकरिता निर्माण केली. ॥ ३९ ॥

ततः केचित् - तेव्हापासून कोणी - अर्चायां हरिं संश्रद्धाय - मूर्तीच्या ठिकाणी हरीची भावना ठेवून - सपर्यया उपासते - पूजासामगीने आराधना करितात - उपास्ता अपि - उपासना केलेली हरीची मूर्ती सुद्धा - पुरुषद्विषां अर्थदा न (भवति) - परमेश्वराचा द्वेष करणारांना फलद्रूप होत नाही. ॥ ४० ॥

राजेंद्र - हे राजाधिराजा - पुरुषेषु अपि - पुरुषांमध्येही - तपसा विद्यया तुष्ट्या - तपश्चर्येने, विद्येने व संतोषाने - हरेः तनुं वेदं धत्ते - वेदरुपी हरीचे शरीर धारण करितो - ब्राह्मणं सुपात्रं विदुः - ब्राह्मणाला सुपात्र मानतात. ॥ ४१ ॥

राजन् - हे राजा - पादरजसा त्रिलोकीं पुनंतः ब्राह्मणाः - पायाच्या धुळीने त्रैलोक्याला पवित्र करणारे ब्राह्मण - अस्य जगदात्मनः कृष्णस्य - जगाचा आत्मा अशा या कृष्णाचे - ननु महत् दैवतं (अस्ति) - खरोखर मोठे दैवत होय. ॥ ४२ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय चवदावा समाप्त

GO TOP