श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १३ वा - अन्वयार्थ

यतिधर्माचे निरूपण आणि अवधूत-प्रल्हाद-संवाद -

कल्पः तु - सामर्थ्यवान पुरुषाने तर - एवं परिव्रज्य - याप्रमाणे संन्यास घेऊन - देहमात्रावशेषितः - देहमात्र अवशिष्ट राहिला आहे ज्याचा असा - निरपेक्षः - व निरिच्छ होत्साता - ग्रामैकरात्रविधिना - प्रत्येक गावांत एक रात्र राहणे - महीं चरेत् - या नियमाने पृथ्वीवर संचार करावा. ॥ १ ॥

असौ यदि वासः बिभृयात् (तर्हि) - तो वस्त्र धारण करील तर - परं कौपीनाच्छादनं (स्यात्) - केवळ लंगोटीचे आच्छादन धारण करावे - दंडलिंगादेः अन्यत् - दंड, संन्यास इत्यादिकांशिवाय - त्यक्तं किंचित् - त्याग केलेले काहीसुद्धा - अनापदि न (बिभृयात्) - आपत्तिकाळाशिवाय धारण करू नये. ॥ २ ॥

आत्मारामः - आत्मरूपी रममाण झालेल्या - अनपाश्रयः सर्वभूतसुहृत् - अनासक्त व सर्व प्राण्यांशी मित्रत्वाने वागणार्‍या - शांतः नारायणपरायणः - शांत व परमेश्वराकडे सदा लक्ष ठेवणार्‍या - भिक्षुः एकः एव चरेत् - भिक्षूने एकटयानेच फिरावे. ॥ ३ ॥

सदसतः परे - कार्य व कारण यांहून वेगळ्या अशा - अव्यये आत्मनि - नाशरहित आत्म्याच्या ठिकाणी - अदःविश्वं - हे विश्व - च परं ब्रह्म आत्मानं - आणि परब्रह्मरूपी आत्म्याला - सर्वत्र सदसन्मये पश्येत् - कार्यकारणरूप सर्व विश्वात पाहावे. ॥ ४ ॥

आत्मदृक् - आत्मस्वरूपीदृष्टी ठेवणारा - सुप्तप्रबोधयोः सन्धौ - निद्रा व जागृती यांच्या संधीवर - आत्मनः गतिं - आत्म्याची गती - बन्धं च मोक्षं च - आणि बंध व मोक्ष यांना - मायामात्रं न वस्तुतः - केवळ मायारूपाने वास्तविकपणे नव्हे असे - पश्यन् - पाहणारा. ॥ ५ ॥

अस्य अध्रुवं जीवितं - ह्याच्या अनिश्चित जीविताला - ध्रुवं मृत्यूम् - निश्चयात्मक मृत्यूला - न अभिनंदेत् - चांगले मानु नये - भूतानां प्रभवाप्यय - प्राण्यांची उत्पत्ति व संहार करणार्‍या - परं कालं प्रतीक्षेत - श्रेष्ठ काळाची वाट पाहावी. ॥ ६ ॥

असच्छास्रेषु न सज्जेत - खोटया शास्त्रांच्या ठिकाणी आसक्त होऊ नये - जीविकां न उपजीवेत - धंद्यावर उपजीविका करू नये - वादवादान् तर्कान् त्यजेत् - वितंडवादी तर्क सोडून द्यावे - कं च पक्षं न समाश्रयेत् - आणि कोणत्याही पक्षाचा अवलंब करू नये. ॥ ७ ॥

शिष्यान् न अनुबन्धीत - शिष्य जमवू नयेत - बहून् ग्रंथान् - पुष्कळ ग्रंथांचा - न एव अभ्यसेत् - अभ्यास करू नये - व्याख्यां न उपयुंजीत - व्याख्यानांवर निर्वाह करू नये - क्वचित् आरंभान् - कधीही मठादिक - न आरभेत् - स्थापू नयेत. ॥ ८ ॥

महात्मनः शांतस्य - उदार अंतःकरणाच्या व शांत अशा - समचित्तस्य यतेः आश्रमः - सर्वत्र समदृष्टि ठेवणार्‍या संन्याशाचा आश्रम - प्रायः धर्महेतुः न - बहुतकरून व्यावहारिक धर्मासाठी नाही - बिभृयात् उत वा त्यजेत् - धारण करावी किंवा सोडून द्यावी. ॥ ९ ॥

अव्यक्तलिंगः - ज्याचे बाह्य चिन्ह स्पष्ट नाही - व्यक्तार्थः - पण आत्मानुसंधान मात्र ज्याचे स्पष्ट आहे अशा - सः मनीषी कविः - त्या बुद्धिमान ज्ञानी पुरुषाने - उन्मत्त बालवत् - उन्मत्तासारखे किंवा अर्भकासारखे - (वा) मूकवत् - अथवा मुक्यासारखे - नृणां दृष्टया - मनुष्याच्या दृष्टीने - आत्मानं दर्शयेत् - स्वतःला भासवावे. ॥ १० ॥

अत्र अपि - ह्याविषयी सुद्धा - प्रह्लादस्य अजगरस्य मुनेः च - प्रल्हाद आणि अजगर नावाचा ऋषी - संवादं - संवादरूप - इमं पुरातनं इतिहासं - हा प्राचीन इतिहास - उदाहरंति - सांगत असतात. ॥ ११ ॥

कतिपयैः अमात्यैः वृतः - कित्येक प्रधानांना बरोबर घेऊन - भगवत्प्रियः प्रह्लादः - परमेश्वराचा आवडता प्रल्हाद - लोकतत्त्वाविवित्सया - लोकातील तत्त्व जाणण्याच्या इच्छेने - लोकान् विचरन् - लोकांमध्ये फिरणारा - सह्यसानुनि कावेर्यां धरोपस्थे - सह्याद्रीच्या शिखरी कावेरी नदीजवळील भूमीवर - शयानं - निजलेल्या - रजस्वर्लैः तनूदेशैः - मळलेल्या अवयवांनी - निगूढामलतेजं - ज्याचे निर्मल तेज आच्छादून गेले आहे - तं - अशा त्या अजगर मुनीला - ददर्श - पाहता झाला. ॥ १२-१३ ॥

जनाः यं वै - लोक ज्याला खरोखर - कर्मणा आकृतिभिः वाचा - कृतीने, आकाराने व भाषणाने - वर्णाश्रमादिभिःलिंगैः च - आणि वर्ण व आश्रम इत्यादिक चिन्हांनी - सः असौ इति न वा इति - तोच हा की नव्हे असे - न विदंति - जाणत नाहीत. ॥ १४ ॥

विवित्सुः महाभागवतः असुरः - ज्ञानाची इच्छा करणारा मोठा भगवद्भक्त प्रल्हाद - तं नत्वा - त्याला नमस्कार करून - विधिवत् अभ्यर्च्य - यथाशास्त्र पूजा करून - पादयोः शिरसा स्पृशन् - चरणांवर मस्तक ठेवून - इदं अप्राक्षीत् - असा प्रश्न करिता झाला. ॥ १५ ॥

यथा सोद्यमः भोगवान् - उद्योगी व भोगी पुरुषाप्रमाणे - पीवानं कायं बिभर्षि - पुष्ट शरीर धारण करीत आहेस - इह उद्यमवतां वित्तं - ह्या लोकी उद्योग करणार्‍याला द्रव्य - वित्तवतां भोगः - द्रव्यवानाला भोग - भोगिनां अयं देहः (च) - व भोगी मनुष्याचा हा देह - खलु पीवा भवति - निश्चयेकरून पुष्ट होतो - अन्यथा न (भवती) - इतररीतीने होत नाही. ॥ १६ ॥

ब्रह्मन् - हे मुने - निरुद्यमस्य शया नस्य ते - उद्योगरहित व निजून राहणार्‍या तुला - यतः एव भोगः न ततः - ज्याअर्थी भोग नाही त्याअर्थी - विप्र - हे द्विजा - नु ह अभोगिनः तव - निश्चयेकरून भोगवान नसणार्‍या तुझा - अयं देहः - हा देह - यतः पीवा (अस्ति) - ज्या कारणास्तव पुष्ट आहे - तत् नः - ते कारण आम्हास - क्षमं चेत् (तर्हि) वद - सांगण्यासारखे जर असेल तर सांग. ॥ १७ ॥

(त्वं) कविः कल्पः - तू विद्वान दक्ष - निपुणदृक् चित्रप्रियकथः - चतुर, चमत्कार वाटण्यासारख्या कथा सांगणारा - समः - निःपक्षपाती - वा लोकस्य कर्म कुर्वतः - आणि लोक द्रव्योपार्जनादि कर्म करीत असता - तत् वीक्षिता अपि - ते पाहणाराही - शेषे - निजून राहिला आहेस. ॥ १८ ॥

भत्रदैत्यपतिना इत्थं परिपृष्टः - प्रल्हादाने याप्रमाणे विचारलेला - स्मयमानः सः महामुनिः - हास्य करणारा तो महामुनि - तद्वागमृतयंत्रितः - प्रल्हादाच्या भाषणामृताने ज्याचे चित्त वळले आहे - तं अभ्याय - असा होऊन प्रल्हादाला म्हणाला. ॥ १९ ॥

असुरश्रेष्ठ - हे दैत्यराजा - आर्यसंमतः भवान् - सज्जनांना मान्य असा तू - अध्यात्मचक्षुषा - ज्ञानदृष्टीने - ईहोपरमयोः नृणां पदानि - प्रवृत्ति व निवृत्ति या मार्गात मनुष्यांना मिळणारी फळे - इदं ननु वेद - हे खरोखर जाणत असशीलच. ॥ २० ॥

यस्य (तव) अज्ञानं - ज्या तुझे अज्ञान - भगवान् नारायणः देवः - ऐश्वर्यवान जलशायी परमेश्वर - केवलया भक्त्या - शुद्ध भक्तीमुळे - सदा हृद्‌गत - सदोदित अंतःकरणात राहणारा असा - ध्वांतं अर्कवत् - अंधकाराला सूर्य नष्ट करितो त्याप्रमाणे - धुनोति - दूर करितो. ॥ २१ ॥

अथ अपि राजन् - तरीसुद्धा हे राजा - तव प्रश्नान् - तुझ्या प्रश्नांची उत्तरे - यथाश्रुतं ब्रूमहे - आमच्या ज्ञानाला अनुसरून सांगतो - हि भवान् - कारण तू - आत्मनः शुद्धिं इच्छतां - चित्तशुद्धि इच्छिणार्‍या - संभावनीयः (अस्ति) - सत्पुरुषांना मान्य आहेस. ॥ २२ ॥

योग्यैः कामैः अपूरया - योग्य उपभोग अर्पण केले तरी तृप्ति न होणार्‍या अशा - भववाहिन्या तृष्णया - संसार चालविण्याच्या तृष्णेने - कर्माणि कार्यमाणः अहं - कर्मे करावयास लाविला जाणारा मी - नानायोनिषु योजितः (अस्मि) - अनेक योनीत जन्म घेण्यास लाविलेला आहे. ॥ २३ ॥

कर्मभिः भ्रमन् (अहं) - कर्मानुसार भ्रमण करणारा मी - स्वर्गापवर्गयोः तिरश्चां - स्वर्ग, मोक्ष, पशुयोनि यांचे - पुनः अस्य च द्वारं - तसेच या मनुष्य जन्माचे द्वार अशा - इमं लोकं - ह्या लोकाला - यदृच्छया प्रापितः (अस्मि) - दैवगतीने प्राप्त झालो. ॥ २४ ॥

अत्र अपि - येथेही - सुखाय अन्यापनुत्तये च - सुखाकरिता आणि दुःख दूर होण्याकरिता - कर्माणि कुर्वतां दंपतीनां - कर्मे करणार्‍या स्त्री-पुरुषांचे - विपर्ययं दृष्ट्‌वा - विपरीत फल पाहून - निवृत्तः (अस्मि) - मी निवृत्त झालो आहे. ॥ २५ ॥

सुखं अस्य आत्मनः रूपं (अस्ति) - सुख हे आपल्या जीवाचे स्वरूप होय - सर्वेहोपरतिः (तस्य) तनुः (अस्ति) - सर्व कामांचा विराम हा त्याचे शरीर होय - मनःसंस्पर्शजान् भोगान् दृष्ट्‌वा - मनाच्या संबंधामुळे उत्पन्न होणारे भोग पाहून - (तान्) संविशन् स्वप्स्यामि - ते भोग भोगीत मी झोप घेतो. ॥ २६ ॥

पुनान् - पुरुष - इति एतत् - अशा ह्या - आत्मनः संतं स्वार्थं विस्मृत्य - स्वतःजवळ असणार्‍या स्वार्थाला विसरून - असति द्वैते - मिथ्या अशा द्वैतामध्ये - विचित्रां घोरां संसृतिं आप्नोति - विलक्षण व भयंकर अशा संसाराला प्राप्त होतो. ॥ २७ ॥

यथा अज्ञः - जसा अज्ञानी मनुष्य - तदुद्भवैः छंन्नं - पाण्यापासून झालेल्या शेवाळाने आच्छादिलेले - जलं हित्वा - उदक सोडून - जलकाम्यया - पाणी मिळण्याच्या इच्छेने - मृगतृष्णां उपधावेत् (तथा) - मृगजळाकडे धाव घेतो त्याप्रमाणे - स्वतः अन्यत्र - स्वस्वरूपाहून दुसर्‍या ठिकाणी - अर्थदृक् (धावति) - पुरूषार्थ आहे असे पाहणारा धावतो. ॥ २८ ॥

देवतंत्रैः हादिभिः - दैवाच्या आधीन असणार्‍या देहादिकांनी - आत्मनः सुखं - आत्म्याला सुख - दुःखात्ययं च - आणि दुःखाचा नाश होण्याची - ईहतः अनीशस्य (नरस्य) - इच्छा करणार्‍या असमर्थ मनुष्याच्या - कृताः कृताः क्रियाः - पुनः पुनः केलेल्या क्रिया - मोघाः (भवन्ति) - निष्फळ होतात. ॥ २९ ॥

आध्यात्मिकादिभिः दुःखैः - आध्यात्मिक आधिभौतिक इत्यादि दुःखांनी - कर्हिचित् अविमुक्तस्त मर्त्यस्य - केव्हाही न सोडलेल्या मनुष्याला - कृच्छ्रोपनतैः अर्थैः कामैः - मोठया संकटांनी संपादिलेले द्रव्य व उपभोग यांशी - किं क्रियेत - काय करता येईल. ॥ ३० ॥

अजितात्मनां लुब्धानां - इंद्रिये न जिंकलेले व लोभी अशा - भयात् अलब्धनिद्राणां - भीतीने झोप न घेणार्‍या - सर्वतः अभिविशंकिनां धनिनां - सर्व ठिकाणी मनात भीति बाळगणार्‍या श्रीमंताचे - क्लेशं पश्यामि - दुःख मी पाहत आहे. ॥ ३१ ॥

राजतः चोरतः शत्रोः स्वजनात् - राजापासून, चोरापासून, शत्रूपासून व स्वजनापासून - पशुपक्षितः अर्थिभ्यः - पशु, पक्षी व याचक यांपासून - कालतः स्वस्मात् - काळापासून आणि स्वतःपासून - नित्यं प्राणार्थवद्भयं (अस्ति) - सदा प्राण आणि द्रव्य ही धारण करणार्‍यांप्रमाणे भय असते. ॥ ३२ ॥

बुधः - ज्ञानी पुरुषाने - नृणां शोकमोहभयक्रोध - मनुष्याचे शोक, मोह, भय, क्रोध, - रागक्लैब्यश्रमादयः - राग, दौर्बल्य व श्रम इत्यादि - यन्मूलाः स्युः - ज्यामुळे होतात - प्राणार्थयोः स्पृहां जह्यात् - ती प्राण व द्रव्य यांची इच्छा सोडून द्यावी. ॥ ३३ ॥

अस्मिन् लोके - ह्या लोकांत - मधुकारमहासर्पौ नः गुरूत्तमौ - मधमाशी व अजगर हे दोन आमचे श्रेष्ठ गुरु होत - यच्छिक्षया - ज्यांच्या उपदेशाने - वैराग्यं परितोषं च वयं प्राप्ताः - वैराग्य आणि संतोष हे आम्ही मिळविले. ॥ ३४ ॥

मधुव्रतात् - मधमाशीपासून - सर्वकामेभ्यः विरागः मे शिक्षितः - सर्व उपभोगांपासून विरक्तपणा मी शिकलो - पतिं हत्वा - धन्याला मारून - मधुवत् कृच्छ्राप्तं - मधाप्रमाणे संकटाने मिळविलेले द्रव्य - वित्तं अन्यः अपि हरेत् - दुसरा कोणीतरी हरण करितो. ॥ ३५ ॥

अनीहः अहं - निरिच्छ असा मी - यदृच्छोपनतात् - सहजरीत्या मिळालेल्यावर - परितुष्टात्मा (अस्मि) - संतुष्ट आहे मन ज्याचे असा असतो - नो चत् - नाही तर - सत्त्ववन् - धैर्य धारण करणारा - महाहिः इव - अजगराप्रमाणे - बह्‌वहानि शये - पुष्कळ दिवस निजतो. ॥ ३६ ॥

क्वचित् अल्पं - कधी थोडे - क्वचित् भूरि - कधी पुष्कळ - स्वादु वा अस्वादु - गोड किंवा कडु् - क्वचित् भूरिगुणोपेतं - कधी पुष्कळ गुणांनी युक्त - उत क्वचित् गुणहीनं - किंवा कधी ज्यात काहीच गुण नाही असे - अन्नं भुंजे - अन्न खातो. ॥ ३७ ॥

क्व अपि - एखाद्या प्रसंगी - श्रद्धया उपाहृतं - श्रद्धेने आणिलेले - कदाचित् मानवर्जितम् - कधी अपमानाने दिलेले - भुञ्जे - मी खातो - अथ कस्मिंश्चित् (काले) - आणखी एखाद्या वेळी - यदृच्छया दिवानक्तं - सहजरीतीने दिवसा किंवा रात्री - भुक्त्वा (आस्से) - खाऊन पडलेला असतो. ॥ ३८ ॥

दिष्टभुक् अहं - प्रारब्ध कर्म भोगणारा मी - तुष्टधीः - संतुष्ट आहे अंतःकरण ज्याचे असा होऊन - क्षौ‌मं दुकूलं अजिनं चीरं वल्कलं - पीतांबर, कद, चर्म, व वल्कल - अन्यत् अपि वा संप्राप्तं एव वसे - किंवा दुसरेही मिळालेले नेसतो. ॥ ३९ ॥

क्वचित् धरोपस्थे तृणपर्णाश्मभस्मसु - कधी पृथ्वीतलावर गवत, पातेरा, दगड किंवा राख ह्यांवर - क्वचित् परेच्छया - कधी दुसर्‍याच्या इच्छेने - प्रासादापर्यंके कशिपौ वा शये - राजवाडयात पलंगावर अथवा गादीवर निजतो. ॥ ४० ॥

विभो - बा समर्था - क्वचित् स्नातः अनुलिप्तांगः - कधी स्नान केलेला व अंगाला उटी लाविलेला - सुवासाः स्रग्वी अलंकृतः - चांगले वस्त्र नेसलेला आणि माळा व अलंकार धारण केलेला - रथेभाश्र्वैः चरे - रथ, हत्ती किंवा घोडयावरून फिरतो - क्व अपि ग्रहवत् दिग्वासाः (चरामि) - कधी कधी पिशाच्चासारखा नग्न भटकतो. ॥ ४१ ॥

स्वभावविषमं जनं - स्वभावाने निरनिराळ्या असलेल्या लोकांना - अहं न निंदे न च स्तौ‌मि - मी निंदित नाही अथवा स्तवीत नाही - एतेषां - ह्यांना - श्रेयः उत महात्मानि ऐकात्म्ये आशासे - कल्याणाच्या ठायी व परमात्म्याशी ऐक्य करितो. ॥ ४२ ॥

विकल्पं चित्तौ जुहुयात् - विकल्प भेदग्रहण करणार्‍या चित्तामध्ये हवन करावा - तां अर्थविभ्रमे - त्या चित्ताला ज्यांत व्यवहाराचे खेळ आहेत - मनसि जुहुयात् - अशा मनात लीन करावे - मनः वैकारिके हुत्वा - मनाला अहंकारात लीन करून - (तत्) अनु तं मायायां जुहोति - त्यानंतर अहंकाराला मायेत लीन करितो. ॥ ४३ ॥

सत्यदृक् मुनिः - सत्यस्वरूप पाहणार्‍या मुनीने - तां मायां आत्मानुभूतौ जुहुयात् - त्या मायेला आत्मानुभावांत लीन करावे - ततः निरीहः (भूत्वा) - नंतर निरीच्छ होऊन - स्वानुभूत्या आत्मानि - स्वानुभावाने आत्म्याच्या ठिकाणी - स्थितः विरमेत् - स्थिर होऊन त्याने विराम पावावे. ॥ ४४ ॥

इत्थं - याप्रमाणे - लोकशास्त्राभ्यां व्यपेतं - लोकाचाराहून वेगळे असे - सुगुप्तं अपि स्वात्मवृत्तं - गुप्त असलेलेही आपले चरित्र - ते मया वर्णितं - तुला मी सांगितले - भवान् हि भगवत्परः (असि) - कारण तू भगवद्भक्त आहेस. ॥ ४५ ॥

ततः - नंतर - असुरेश्वरः - प्रल्हाद - मुनेः पारमहंस्यं धर्मं श्रुत्वा - मुनीपासून परमहंसाचा धर्म श्रवण करून - प्रातः - संतुष्ट झालेला - तं पूजयित्वा - त्याचा बहुमान करून - आमंत्र्य - निरोप घेऊन - गृहं वै प्रययौ - घरी गेला. ॥ ४६ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय तेरावा समाप्त

GO TOP