|
श्रीमद् भागवत महापुराण
षष्ठ स्कंध - अध्याय ९ वा - अन्वयार्थ
विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषीकडे जाणे - भारत तस्य विश्वरुपस्य सोमपीथं सुरापीथं अन्नादं (इति) त्रीणि शिरांसि आसन् इति सुश्रुम हे भरतकुलोत्पन्ना परीक्षित राजा त्या विश्वरुपाला सोमपीथ सुरापीथ अन्नाद अशी तीन मस्तके होती असे आम्ही ऐकिले आहे ॥ १ ॥ नृप देवाः यस्य पितरः देवेभ्यः सः बर्हिषि प्रत्यक्षं उच्चकैः भागं सप्रश्रयं वै अवदत् हे परीक्षित राजा देव ज्याचे पितर देवांना तो विश्वरुप यज्ञामध्ये प्रत्यक्ष उच्च स्वराने हाक मारुन हविर्भागाला नम्रतापूर्वक खरोखर अर्पण करीत असे ॥ २॥ सः एव असुरान् प्रति हि परोक्षं भागं ददौ मातृस्नेहवशानुगः यजमानः भागं अवहत् तोच विश्वरुप दैत्यांना उद्देशून खरोखर गुप्त रीतीने हविर्भागाला देता झाला मातेविषयीच्या प्रेमाच्या आधीन होऊन यज्ञ करणारा विश्वरुप हविर्भाला पोचवीत असे ॥ ३ ॥ सुरेश्वरः तस्य धर्मालीकं तत् देवहेलनं आलक्ष्य भीतः तरसा रुषा तच्छीर्षाणि अच्छिनत् इंद्र त्या विश्वरुपाच्या धर्मसंबंधी कपटाला त्या देवांविषयीच्या अपराधाला पाहून भ्यालेला वेगाने रागाने त्या विश्वरुपाची मस्तके तोडिता झाला ॥ ४ ॥ तस्य यत् तु सोमपीथं शिरः तत् कपिञ्जलः आसीत् सुरापीथं कलविंकः (आसीत्) यत् अन्नादं सः तित्तिरिः त्याचे जे तर सोमपीथनामक मस्तक ते कवडा पक्षी झाले सुरापीथनामक मस्तक चिमणी झाले जे अन्नाद नावाचे मस्तक लावा पक्षी होय ॥ ५ ॥ यत् अपि (इंद्रः) ईश्वरः (आसीत्) अञ्जलिना ब्रह्महत्या जग्राह सः हरिः भूतानां विशुद्धये संवत्सरान्ते तदघं भूम्यम्बुद्रुमयोषिद्भ्यः चतुर्धा व्यभजत् जरीहि इंद्र समर्थ होता तथापि ओंजळीने ब्रह्महत्येला स्वीकारता झाला तो इंद्र प्राण्यांच्या शुद्धीकरिता वर्षाच्या शेवटी ते ब्रह्महत्येचे पातक पृथ्वी, उदक, वृक्ष व स्त्रिया यांना चार प्रकाराने विभागता झाला ॥ ६ ॥ भूमिः खातपूरवरेण तुरीयं वै जग्राह भूमौ ईरणं ब्रह्महत्यायाः रुपं प्रदृश्यते पृथ्वी खणलेला खळगा आपोआप भरावा अशा वराने ब्रह्महत्येच्या चतुर्थांश भागाला खरोखर घेती झाली पृथ्वीच्या ठिकाणी खारी माती ब्रह्महत्येचे रुप दिसते ॥ ७ ॥ द्रुमाः छेदविरोहेण वरेण तुर्यं जगृहुः ब्रह्महत्या तेषां निर्यासरुपेण प्रदृश्यते वृक्ष तोडिले असता पुनः अंकुर फुटावे अशा वराने ब्रह्महत्येच्या चवथ्या भागाला घेते झाले ब्रह्महत्या त्या वृक्षांमध्ये डिंकाच्या रुपाने दिसते ॥ ८ ॥ स्त्रियः शश्वत्कामवरेण तुरीयम् अंहः जगृहुः अंहः तासु मासिमासि रजोरुपेण प्रदृश्यते स्त्रिया सदोदित संभोगाच्या वराने ब्रह्महत्येच्या पातकाचा चतुर्थांश घेत्या झाल्या ब्रह्महत्यारुपी पातक त्या स्त्रियांच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याला रजोदर्शनाच्या रुपाने दिसते ॥ ९ ॥ आपः द्रव्यभूयोवरेण तुरीयं मलं जगृहुः तासु बुद्बुदफेनाभ्यां (तत्) दृष्टं क्षिपन् तत् हरति उदक मिश्रणाने द्रव्यवृद्धि व्हावी असा वर मिळवून ब्रह्महत्यारुपी पातकाच्या चवथ्या विभागाला स्वीकारते झाले त्या उदकामध्ये बुडबुडे व फेस ह्या स्वरुपाने दिसून येते बुडबुडे व फेस ह्यांना पाण्यातून बाहेर काढून टाकणारा ते पातक नाहीसे करितो ॥ १० ॥ ततः हतपुत्रः त्वष्टा इंद्राय शत्रवे इन्द्रशत्रो विवर्धस्व मा चिरं विद्विषं जहि जुहाव नंतर ज्याचा पुत्र मृत झाला आहे असा त्वष्टा इंद्राला उद्देशून शत्रु उत्पन्न करिण्याकरिता हे इन्द्रशत्रो वृद्धिगत हो विलंब करु नको शत्रुला मार अग्नीत हवन करिता झाला ॥ ११ ॥ अथ घोरदर्शनः यथा लोकानां युगान्त समये कृतान्तः इव अन्वाहार्यपचनात् उत्थितः नंतर भयंकर स्वरुप धारण करणारा एक असुर जसा लोकांच्या प्रलयकाळी यमच जणू काय असा दक्षिणाग्नीपासून उत्पन्न झाला ॥ १२ ॥ दिनेदिने विष्वक् इषुमात्रं विवर्धमानं तं प्रतिदिवशी आपल्या सभोवती बाण टाकण्याच्या इतक्या प्रमाणाने वाढणार्या त्या असुराला ॥ १३ ॥ दग्धशैलप्रतीकाशं सन्ध्याभ्रानीकवर्चसम् तप्तताम्रशिखाश्मश्रुं मध्याहनार्कोग्रलोचनम् देदीप्यमाने त्रिशिखे शूले रोदसी आरोप्य नृत्यन्तं उन्नदन्तं च पदा महीं चालयन्तं जळलेल्या पर्वताप्रमाणे कृष्णवर्ण असा ज्याची कांती संध्याकाळच्या मेघसमूहाप्रमाणे आहे असा ज्याची शेंडी व दाढीमिशा तापलेल्या तांब्याप्रमाणे लाल आहे असा दोन प्रहरच्या प्रखर सूर्याप्रमाणे उग्र डोळे असलेला तेजस्वी तीन टोके असलेला सूळावर पृथ्वी व आकाश ह्यांना आरोपित करुन नाचणारा मोठ्याने गर्जना करणारा आणि पायाने पृथ्वीला कापविणारा ॥ १४-१५ ॥ दरीगंभीरवक्त्रेण नभस्तलम् पिबता च जिह्वया ऋक्षाणि लिहता भुवनत्रयं ग्रसता महता रौद्रदंष्ट्रेण मुहुर्मुहुः जृम्भमाणं वीक्ष्य सर्वे लोकाः वित्रस्ताः दश दिशः दुद्रुवुः गुहेप्रमाणे विस्तीर्ण अशा मुखाने आकाशाला पिणारा आणि जिभेने नक्षत्रांना चाटणारा त्रिभुवनाला गिळणारा मोठ्या क्रूर दाढांनी युक्त अशा मुखाने वारंवार जांभया देणारा असे पाहून संपूर्ण लोक त्रासून गेले दहा दिशांना पळत सुटले ॥ १६-१७ ॥ येन त्वाष्टमूर्तिना तमसा इमे लोकाः आवॄताः वै सः पापः परमदारुणः वृत्रः इति प्रोक्तः ज्या त्वष्ट्याचा पुत्र अशी मूर्ति धारण करणार्या तमोगुणी असुराने हे लोक व्यापून टाकिले म्हणून तो असुर पापी अत्यंत भयंकर असा वृत्र या नावाने प्रसिद्ध झाला ॥ १८ ॥ सगणाः विबुधर्षभाः स्वैः स्वैः दिव्यास्त्रशस्त्रौघैः तं अभिद्रुत्य निजघ्नुः सः तानि कृत्स्नशः अग्रसत् गणांसह मोठमोठे देव आपापल्या तेजस्वी शस्त्रास्त्रांच्या समुदायांनी त्या वृत्रासुराच्या अंगावर धावत जाऊन प्रहार करते झाले तो वृत्रासुर त्या शस्त्रास्त्रांना संपूर्णरीतीने गिळून टाकिता झाला ॥ १९ ॥ ततः विषण्णाः ग्रस्ततेजसः ते सर्वे विस्मिताः समाहिताः प्रत्यञ्चं आदिपुरुषं उपतस्थुः नंतर खिन्न झालेले निस्तेज झालेले ते सर्व देव आश्चर्यचकित होऊन सावधानचित्ताने शरीरात अंतर्यामि स्वरुपाने रहाणार्या पुराणपुरुष ईश्वराला स्तविते झाले ॥ २० ॥ ये वयं वाय्वम्बराग्न्य प्क्षितयः त्रिलोकाः ब्रह्मादयः उद्विजन्तः यस्मै बलिं हराम असौ अंतकः यस्मात् बिभेति ततः नः अरणं जे आम्ही वायू, आकाश, अग्नि, उदक व पृथ्वी ही भूते तीन लोक ब्रह्मदेवादिक देव भिऊन ज्याला पूजा अर्पण करितो हा काळ ज्याला भितो त्या परमेश्वराकडून आमचे रक्षण ॥ २१ ॥ अविस्मितं स्वेन एव लाभेन परिपूर्णकामं समं प्रशान्तम् तं विना अपरं उपसर्पति बालिशः श्वलाङ्गुलेन सिंधुं अतितितर्ति हि आश्चर्यरहित अशा स्वतःच्याच प्राप्तीने पूर्ण मनोरथ झालेल्या समबुद्धीने वागणार्या शान्त अशा त्या परमेश्वराला सोडून देऊन दुसर्या देवाजवळ जातो मूर्ख कुत्र्याच्या शेपटीने समुद्राला तरुन जाण्याचा प्रयत्न करितो असे समजावे ॥ २२॥ मनुः यथा यस्य उरुशॄङ्गे जगतीं स्वनावं आबद्ध्य दुर्गं ततार सः एव वारिचरः अपि श्रितान् नः दुरन्तात् त्वाष्ट्रभयात् नूनं त्राता वैवस्वत मनु ज्याप्रमाणे ज्या मत्स्यावतारी भगवंताच्या मोठ्या शिंगाला पृथ्वीरुपी आपल्या नौकेला बांधून संकटातून मुक्त झाला तोच मत्स्यावतारी भगवान् सुद्धा आश्रय करुन राहिलेल्या आम्हाला दुस्तर अशा वृत्रासुराच्या भीतीपासून खरोखर रक्षील ॥ २३ ॥ पुरा एकः उदीर्णवातोर्मिरवैः कराले संयमांभसि अरविंदात् पतितः स्वयंभूः अपि येन तस्मात् भयात् ततार सः नः पारः अस्तु पूर्वी एकटा जोराच्या वार्याने उत्पन्न झालेल्या लाटांच्या शब्दांमुळे भयंकर अशा प्रलयकालीन उदकामध्ये नाभिकमळापासून पडलेला ब्रह्मदेवसुद्धा ज्या परमेश्वरामुळे त्या भयापसून तरला तो परमेश्वर आमचे रक्षण करणारा असो ॥ २४ ॥ यः एकः ईशः निजमायया नः ससर्ज येन विश्वं अनुसृजाम पृथगीशमानिनः वयं पुरः समीहतः यस्य लिङ्ग्म् अपि न पश्याम जो एकटा ईश्वर आपल्या मायेने आम्हाला उत्पन्न करिता झाला ज्या योगाने सृष्टीला आम्ही मागाहून उत्पन्न करु शकतो स्वतंत्र ईश्वर आहोत असा अभिमान बाळगणारे आम्ही पूर्वी अन्तर्यीमरुपाने प्रेरणा करणार्या ज्याच्या रुपाला सुद्धा पाहू शकत नाही ॥ २५ ॥ च नित्यः एव यः युगेयुगे स्वमायया तनुभिः देवर्षितिर्यङ्नृषु कृतावतारः सपत्नैः भृशं अर्द्यमानात् नः आत्मसात्कृत्वा पाति आणि तीन्हीहि काळात सारखेपणाने वागणारा जो ईश्वर प्रत्येक युगामध्ये आपल्या मायेने मूर्तींनी देव, ऋषि, पशु व मनुष्य ह्या योनीत अवतार घेऊन शत्रूंनी अत्यंत पीडिलेल्या आम्हाला आपले असे समजून रक्षितो ॥ २६ ॥ सर्वे वयं आत्मदैवतं परं प्रधानं पुरुषं विश्वं अन्यं शरण्यं तम् एव देवं शरणं व्रजाम सः महात्मा स्वानां नः शं धास्यति सर्व आम्ही आत्मस्वरुपी दैवतच अशा श्रेष्ठ मुख्य पुरुष जगद्रूपी अद्वितीय शरण जाण्यास योग्य अशा त्याच परमेश्वराला शरण जात आहोत तो थोर अंतःकरणाचा परमेश्वर स्वकीय अशा आमचे कल्याण करील ॥ २७ ॥ महाराज शंखचक्रगदाधरः इति उपतिष्ठतां तेषां सुराणां प्रतीच्यां दिशि आविः अभूत् हे परीक्षित राजा शंख, चक्र व गदा धारण करणारा परमेश्वर या प्रमाणे स्तुति करणार्या त्या देवांच्या पश्चिम दिशेला प्रगट झाला ॥ २८ ॥ राजन् श्रीवत्सकौस्तुभौ विना आत्मतुल्यैः षोडशभिः र्फ्युपासितम् उन्निद्रशरदम्बुरुहेक्षणम् तं अवनौ दृष्ट्वाः ईक्षणाह्लादविक्लवाः सर्वे दंडवत्पतिताः शनैः उत्थाय तुष्टवुः हे परीक्षित राजा श्रीवत्सलांछन व कौस्तुभमणि शिवाय करुन आपल्या स्वतःसारख्या सोळा पार्षदगणांनी सभोवार वेष्टिलेल्या फुललेल्या शरदऋतूतील कमळाप्रमाणे डोळे असलेल्या त्या परमेश्वराला पृथ्वीवर पाहून त्याच्या दर्शनपासून झालेल्या आनंदाने विवश झालेले सर्व देव साष्टांग नमस्कार घालते झाले हळू हळू उठून स्तुती करु लागले ॥ २९-३० ॥ यज्ञवीर्याय ते नमः उत वयसे ते नमः हि अस्तचक्राय ते नमः तथा सुपुरुहूतये ते नमः यज्ञ हेच ज्याचे सामर्थ्य आहे अशा तुला नमस्कार असो त्याचप्रमाणे कालस्वरुपी अशा तुला नमस्कार असो तसेच शत्रूंच्या अंगावर सुदर्शनचक्र फेकणार्या तुला नमस्कार असो त्याचप्रमाणे चांगली चांगली ज्याला पुष्कळ नावे आहेत अशा तुला नमस्कार असो ॥ ३१ ॥ यत् धातः तिसृणां गतीनां ईशितुः ते परमं पदं विसर्गस्य अर्वाचीनः वेदितुं न अर्हति कारण हे सृष्टिकर्त्या तीन सत्त्वादिमार्गाना आपल्या ताब्यात ठेवणार्या तुझ्या श्रेष्ठ स्थानाला अलीकडच्या सृष्टीतील प्राणी जाणण्यास समर्थ होत नाही ॥ ३२ ॥ ओम् भगवान् नारायण वासुदेव आदिपुरुष महापुरुष महानुभाव परममंगल परमकल्याण परमकारुणिक केवल जगदाधार लोकैकनाथ सर्वेश्वर लक्ष्मीनाथ परमहंस ते नमः अस्तु भवान् परिव्राजकैः परमेण आत्मयोगसमाधिना परिभावितपरिस्फुटपारमहंस्यधर्मेण उद्धाटिततमः कपाटद्वारे चित्ते अपावृते आत्मलोके स्वयं उपलब्धपिजयुखानुभवः अस्ति हे प्रणवरुपा हे सर्वैश्वर्यसंपन्ना हे जलशायी परमेश्वरा सर्वव्यापी हे विष्णो सृष्टि उत्पन्न होण्यापूर्वी अस्तित्वात असणार्या हे वासुदेवा हे पुरुषश्रेष्ठा हे उत्कृष्ट पराक्रम करणार्या देवा अत्यंत मंगलरुपा हे अत्यंत कल्याण करणार्या ईश्वरा हे परमदयाळो हे अद्वितीय पुरुषा त्रैलोक्याला आधारभूत असणार्या हे भगवंता हे त्रैलोक्यैकपते सर्वांचा स्वामी अशा हे जगन्नाथा हे लक्ष्मीपते श्रेष्ठ हंसस्वरुप धरणार्या हे देवाधिदेवा तुला नमस्कार असो तू संन्याशांनी श्रेष्ठ अशा अष्टांगयोगाने चित्ताची एकाग्रता करून अभ्यासिलेल्या भगवद्भजनरुप परमहंसधर्माने ज्यातील अज्ञानरुपी कवाडाची दारे उघडली आहेत अशा चित्तामध्ये प्रगट झालेल्या अन्तर्यामिस्वरुपाच्या ठिकाणी स्वतःच आत्मनंदसुखाचा अनुभव मिळविलेला असा आहेस ॥ ३३ ॥ तव अयं विहारयोगः दुरवबोधः इव यत् अशरणः अशरीरः अनवेक्षितास्मत्समवायः अगुणः अविक्रियमाणेन आत्मना एव इदं सगुणं सृजसि पासि हरसि तुझा हा क्रीडेचा प्रकार जणु काय जाणण्यास फार कठीण असा आहे कारण कोणालाहि शरण न जाणारा शरीररहित आमच्या सहाय्याची अपेक्षा न करणारा निर्गुण विकाररहित आत्मस्वरुपानेच ह्या त्रिगुणात्मक जगाला उत्पन्न करतोस रक्षितोस संहार करितोस ॥ ३४ ॥ अथ भवान् देवदत्तवत् इह गुणविसर्गपतितः तत्र पारत्न्त्र्येण स्वकृतकुशलाकुशलं फलं उपाददाति किं आहोस्वित् आत्मारामः उपशमशीलः समंजसदर्शनः उदास्ते इति ह वाव न विदामः किंवा तू देवदत्त नावाच्या पुरुषाप्रमाणे ह्या जगात गुणकार्यरुपी देहामध्ये पडलेला असा त्या ठिकाणी परतंत्रपणाने आपण केलेल्या पुण्यपापरुपी फळाला उपभोगितोस काय अथवा आत्म्याच्या ठिकाणी आराम पावणारा शांति हाच ज्याचा स्वभाव आहे असा उदार दर्शन असणारा होऊन उदासीनपणाने असतोस असे खरोखर आम्ही जाणत नाही ॥ ३५ ॥ भगवति अपरिमितगुणगुणे अनवगाह्यमाहात्म्ये अर्वाचीनविकल्पवितर्कविचारप्रमाणा-भासकुतर्कशास्त्रकलिलान्तःकरणाश्रयदुरव-ग्रहवादिनां विवादानवसरे उपरतसमस्तमायामये केवले ईश्वरे उभयं विरोधः नहि एव स्वरुपद्वयाभावात् आत्ममायां अन्तर्धाय कः नु अर्थः दुर्घटः इव भवति सर्वैश्वरसंपन्न ज्याच्या गुणसमुदायांचा अंत लागत नाही अशा अवर्णनीय माहात्म्य असणार्या वस्तुस्वरुपाला स्पर्शहि न करणारे अलीकडील वितर्क, विचार व कुतर्क ह्यांनी युक्त अशा शास्त्रांनी व्याकुळ झालेल्या अंतःकरणाच्या आश्रयाने दुराग्रहपूर्वक वाद करणार्या पुरुषांच्या वादविवादाला अगोचर अशा जेथे संपूर्ण मायिक संसार शांत झाला आहे अशा अद्वितीय परमेश्वराच्या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या विरोध नाहीच नाही दोन्ही स्वरुपांचा तेथे अभाव असल्यामुळे स्वतःच्या मायेला मध्ये स्थापून कोणता बरे कर्तृत्वादि पदार्थ घडवून आणण्यास कठीण अशासारखा होतो ॥ ३६ ॥ यथा रञ्जुखंडः सर्पादिधियां मतं अनुसरति तथा समविषममतीनां मतं अनुसरसि ज्याप्रमाणे दोरीचा तुकडा भ्रमाने सर्प मानणार्यांच्या मताला अनुसरतो त्याप्रमाणे समविषमबुद्धीच्या लोकांच्या मताला तू अनुसरतोस ॥ ३७ ॥ सः एव हि पुनः सर्ववस्तुनि वस्तुस्वरुपः सर्वेश्वरः सकलजगत्कारणकारणभूतः सर्वप्रत्यगात्मत्वात् सर्वगुणाभासोपलक्षितः एकः एव पर्यवशेषितः तोच तू ईश्वर खरोखर पुनः प्रत्येक वस्तूमध्ये वस्तुरुपाने रहाणारा सर्वांचा प्रेरक संपूर्ण जगाला उत्पन्न करण्यास कारणीभूत जी तत्त्वे त्यांच्याहि उत्पत्तीला कारण असा प्राण्यांच्या अंतर्यामी रहात असल्यामुळे सर्व गुणांच्या प्रकाशांनी अनुमानिला जाणारा एकटाच सत्यरुपाने अवशिष्ठ राहिलेला आहेस ॥ ३८ ॥ अथ ह वाव मधुमथन तव सकृत् अवलीढया महिमामृतरससमुद्रविप्रुषा स्वमनसि निष्यन्दमानानवरतसुखेन विस्मारितदृष्टश्रुत विषयसुखलेशाभासाः एकान्तिनः सर्वभूतप्रियसुह्रदि सर्वात्मनि भगवति नितरां निरन्तरं निर्वृतमनसः स्वार्थकुशलाः हि आत्मप्रियसुह्रदः परमभागवताः एते साधवः उह वा त्वच्चरणाम्बुजानुसेवां पुनः कथं विसृजन्ति यत्र अयं संसारपर्यावर्तः न (अस्ति) म्हणूनच हे मधुसूदना तुझ्या एकदा चाटिलेल्या माहात्म्यरुपी अमृतरसाच्या समुद्रातील एका बिंदूने आपल्या अंतःकरणात एकसारख्या पाझरणार्या सुखाने पाहिलेल्या व ऐकिलेल्या विषयसंबंधी अल्प सुखाच्या आभासाची ज्यांना विस्मृती झाली आहे असे एकनिष्ठपणे भक्ति करणारे सर्व प्राणिमात्रांचा अत्यंत आवडता मित्रच अशा सर्वत्र आत्मरुपाने रहाणार्या भगवान् ईश्वराचे ठिकाणी अत्यंत एकसारखे ज्याचे अंतःकरण तृप्त झाले आहे असे स्वतःचा अर्थ साधण्याविषयी निपुण असे त्याचप्रमाणे आत्म्याला आवडत्या मित्राप्रमाणे मानणारे अत्यंत भगवद्भक्ति करणारे हे सत्पुरुष खरोखर तुझ्या पादकमळांच्या सेवेला पुनः कसे सोडितील ज्याठिकाणी फिरुन होणारा हा संसाराचा फेरा असत नाही ॥ ३९ ॥ त्रिभवनात्मभवन त्रिविक्रम त्रिनयन त्रिलोकमनोहरानुभाव दितिजदनुजादयः अपि तव एव विभूतयः च अयं तेषां अनुपक्रमसमयः इति (मत्वा) यथा दंडधर स्वात्ममायया सुरनरमृगमिश्रित जलचराकृतिभिः यथापराधं दंडं दधर्थ एवं भगवन् उत यदि मन्यसे एनम् अपि त्वाष्ट्रं जहि त्रैलोक्याचा आत्मा व उत्पत्तिस्थान अशा हे परमेश्वरा त्रैलोक्यात पराक्रम गाजविणार्या हे भगवंता तीन डोळे असणार्या हे विष्णो त्रैलोक्यामध्ये मनोहर आहे लीला ज्याची अशा हे नारायणा दैत्य व दानव हे सुद्धा तुझेच अंश आणि हा त्या दैत्यदानवांचा उत्कर्षकाळ नाही असे मानून ज्याप्रमाणे हे दंड धारण करणार्या देवाधिदेवा आपल्या मायेने देव, मनुष्य, पशु व मिश्र जाती आणि मत्स्यादि पाण्यात रहाणारे प्राणी ह्यांच्या आकृति धारण करुन अपराधानुरुप दंडाला धारण करितोस ह्या प्रमाणे सर्वैश्वर्यसंपन्न हे परमेश्वरा जर तू इच्छित असशील तर ह्याहि त्वष्ट्याच्या पुत्राला मार ॥ ४० ॥ तत ततामह अनघ तव नतानां तव चरणनलिनयुगलध्यानानुबद्धह्रदयनिगडानां स्वलिङ्गविवरणेन आत्मसात्कृतानां तावकानां अस्माकं अनुकम्पानुरञ्जितविशदरुचिरशिशिर-स्मितावलोकेन च विगलितमधुरमुखरसामृतकलया अन्तस्तापं शमयितुं अर्हसि हे पित्या हे पितामहा हे निष्पाप परमेश्वरा तुला नम्र झालेल्या तुझ्या दोन पादकमळांच्या चिंतनाने बधली आहे ह्रदयामध्ये शॄंखला ज्यांच्या अशा स्वतःची मूर्ति प्रगट करुन ज्यांना तू आपलेसे केले आहेस अशा तुझे असे म्हणविणार्या आमच्या कृपेमुळे प्रेमपूर्वक निर्मळ, मनोहर आणि शीतळ अशा हास्यसहित अवलोकनाने आणि बाहेर निघालेल्या प्रियवाणीरुप अमृताच्या कलेने अन्तःकरणातील तापाला शांत करण्यास योग्य आहेस ॥ ४१ ॥ अथ ह भगवन् अस्माभिः विस्फुलिङ्गादिभिः हिरण्यरेतसः इव अखिलजगदुत्पत्तिस्थितिलयनिमित्ताय-मानदिव्यमायाविनोदस्य सकलजीवनिकायानां अन्तर्ह्रदयेषु च बहिः अपि ब्रह्मप्रत्यगात्मस्वरुपेण देशकालदेहावस्थानविशेषं तदुपादानोपलम्भकतया अनुभवतः सर्वप्रत्ययसाक्षिणः आकाशशरीरस्य साक्षात् परब्रह्मणः परमात्मनः तव इह कियान् वा अर्थविशेषः विज्ञापनीयः स्यात् आता खरोखर हे परमेश्वरा आम्ही ठिणग्या इत्यादिकांनी अग्नीला उजेड दाखविण्याप्रमाणे संपूर्ण जगाची उत्पत्ति, स्थिति व प्रलय ह्याला कारणीभूत अशा दिव्य मायेने क्रीडा चालविणार्या संपूर्ण जीवसमूहांच्या ह्रदयाच्या आत आणि बाहेरसुद्धा ब्रह्मस्वरुपाने व अन्तर्यामिस्वरुपाने ज्यायोगे देश, काल, देह व अवस्था ह्यांचे उल्लंघन न होईल असे समजून त्यांच्या उपादानकारणत्वेकरुन व प्रकाशत्वेकरुन अनुभव घेणार्या सर्वांच्या बुद्ध्यादिकांचा साक्षी अशा तसेच आकाशाप्रमाणे अलिप्त असणारे शरीर धारण करणार्या प्रत्यक्ष परब्रह्मस्वरुपी परमात्मा अशा तुला येथे कोणता बरे विशिष्ट कार्यरुपी अर्थ सांगण्यासारखा आहे ॥ ४२ ॥ अत एव वयं यत्कामेन उपसादिताः तत् भगवतः परमगुरोः तव विविधवृजिनसंसारपरिश्रमोपशमनीं चरणशतफ्लाशच्छायां उपसृतानां अस्माकं कार्यं स्वयं उपकल्पय म्हणूनच आम्ही ज्या इच्छेने प्राप्त झालो आहो ते सर्वैश्वर्यसंपन्न श्रेष्ठ गुरु अशा तुझ्या अनेकप्रकारच्या दुःखांनी प्राप्त होणार्या संसारसंबंधी श्रमाला शांत करणार्या पादकमळांच्या छायेला प्राप्त झालेल्या आमचे कार्य स्वतः संपादन कर ॥ ४३ ॥ अथो ईश कृष्ण भुवनत्रयं ग्रसन्तं त्वाष्ट्रं जहि येन नः तेजांसि च अस्त्रायुधानि ग्रस्तानि आता हे ईश्वरा हे श्रीकृष्णा त्रैलोक्याला गिळून टाकणार्या त्वष्ट्याचा पुत्र जो वृत्रासुर त्याला मार ज्या वृत्रासुराने आमची तेजे आणि अस्त्रे व आयुधे गिळिली ॥ ४४ ॥ हंसाय दह्रनिलयाय निरीक्षकाय कृष्णाय सृष्टयशसे निरुपक्रमाय सत्संग्रहाय भवपाथनिजाश्रमाप्तौ अन्ते परीष्टगतये हरये ते नमः परमहंसरस्वरुपी ह्रदयाकाशात रहाणार्या सूक्ष्मरीतीने सर्वत्र अवलोकन करणार्या सर्वांच्या ह्रदयाचे आकर्षण करणार्या सुंदर पवित्र कीर्ति असणार्या अनादि अशा साधुलोकच ज्याचे ग्रहण करितात अशा संसारमार्गातील वाटसरुला स्वतःचे स्थान प्राप्त झाले असता किंवा शेवटी जो त्यांना योग्य गति देतो अशा हरि या नावाने प्रसिद्ध असलेल्या तुला नमस्कार असो ॥ ४५ ॥ राजन् अथ त्रिदशैः सादरं एवं ईडितः हरिः स्वं उपस्थानं आकर्ण्य अभिनन्दितः तान् प्राह हे परीक्षित राजा नंतर देवांनी आदरपूर्वक याप्रमाणे स्तविलेला श्रीविष्णु आपल्या स्तुतीला ऐकून संतुष्ट झालेला त्या देवांना म्हणाला ॥ ४६ ॥ सुरश्रेष्ठाः अहं वः मदुपस्थानविद्यया प्रीतः यया पुंसां आत्मैश्वर्यस्मृतिः च मयि भक्तिः एव भवति हे देवश्रेष्ठहो मी तुम्ही केलेल्या माझ्या स्तोत्ररुपी विद्येने प्रसन्न झालो आहे ज्या विद्येने पुरुषांना माझ्या आत्म्याच्या ऐश्वर्याचे स्मरण आणि माझ्या ठिकाणी भक्ति सुद्धा होते ॥ ४७ ॥ विबुधर्षभाः मयि प्रीते दुरापं किं तथा अपि तत्त्ववित् मयि एकान्तमतिः मतः अन्यत् न वांछति हे देवश्रेष्ठहो मी प्रसन्न झालो असता दुर्लभ काय आहे तरीसुद्धा ज्ञानी पुरुष माझ्या ठिकाणी एकनिष्ठ बुद्धि ठेवणारा असा माझ्यापासून दुसरे इच्छित नाही ॥ ४८ ॥ गुणवस्तुदृक् कृपणः आत्मनः श्रेयः न वेद यदि तान् इच्छतः तस्य कः (अपि विषयान् एव यच्छेत्) सः अपि तथाविधः (स्यात्) त्रिगुणात्मक विषयांच्या ठिकाणी तत्त्वबुद्धि धारण करणारा अज्ञानी पुरुष आपले कल्याण जाणत नाही जर त्या विषयांना इच्छिणार्या त्या पुरुषास कोणीहि विषयच देईल तर तो देणारा पुरुष सुद्धा तसा विषयीच असला पाहिजे ॥ ४९ ॥ स्वयं निःश्रेयसं विद्वान् अज्ञाय कर्म न वक्ति हि भिषक्तमः अपध्यं वाञ्छतः रोगेणः (तत्) न राति स्वतः मोक्षसुख ज्ञानी पुरुष अज्ञानी पुरुषाला प्रवृत्तिविषयक कर्म सांगत नाही कारण श्रेष्ठ वैद्य अपथ्य इच्छिणार्या रोग्याला तो अपथ्य पदार्थ देत नाही ॥ ५० ॥ मघवन् वः भद्रं ऋषिसत्तमं दध्यञ्चं यात मा चिरं विद्याव्रततपः सारं गात्रं याचत हे इंद्रा तुमचे कल्याण असो ऋषिश्रेष्ठ दधीचीजवळ जा विलंब करु नका विद्या, व्रत व तप ह्यांनी दृढ बनलेले शरीर मागा ॥ ५१ ॥ सः वा दध्यड् अश्वशिरोनाम निष्कलं ब्रह्म अधिगतः यत् वा अश्विभ्यां दत्तं तयोः अमरतां व्यधात् कारण तो दधीची ऋषि अश्वशिरस नावाच्या शुद्ध ब्रह्मविद्येला जाणणारा आहे आणि जे अश्विनीकुमारांना दिलेले असे त्या अश्विनीकुमारांना अमरपणा देते झाले ॥ ५२ ॥ आथर्वणः दध्यड् मदात्मकं अभेद्यं वर्म त्वष्ट्रे (दत्तवान्) च त्वष्टा यत् विश्वरुपाय प्रादात् यत् त्वं ततः अधाः अथर्वणकुलोत्पन्न दधीची ऋषि मत्स्वरुपी विदारण करता न येणारे नारायणकवच त्वष्ट्याला देता झाला आणि त्वष्टा जे विश्वरुपाला देता झाला जे तू त्या विश्वरुपापासून धारण केलेस ॥ ५३ ॥ धर्मज्ञः अश्विभ्यां युष्मभ्यं याचितः अंगानि दास्यति ततः तैः विश्वकर्मनिर्मितः आयुधश्रेष्ठः (वज्रः) भविष्यति धर्म जाणणारा दधीची ऋषि अश्विनीकुमारांनी तुमच्याकरिता प्रार्थिला असता अस्थींना देईल नंतर त्या अस्थींनी विश्वकर्म्याने निर्मिलेले उत्कृष्ट असे वज्र नावाचे आयुध होईल ॥ ५४ ॥ मत्तेजउपबृहितः येन वृत्रशिरः हर्ता तस्मिन् विनिहते यूयं भूयः तेजोऽस्त्रायुधसंपदः प्राप्स्यथ वः भद्रं च मत्परान् न हिंसन्ति माझ्या तेजाने वाढलेला ज्या वज्राने वृत्रासुराच्या मस्तकाला हरण करशील तो वृत्रासुर वध पावला असता तुम्ही पुनः तेज, अस्त्रे, आयुधे आणि संपत्ति ह्यांना मिळवाल तुमचे कल्याण असो आणि माझी एकनिष्ठपणे भक्ति करणार्यांना कोणीहि मारु शकत नाही ॥ ५५ ॥ षष्ठ स्कन्धः - अध्याय नववा समाप्त |