श्रीमद् भागवत महापुराण

षष्ठ स्कंध - अध्याय १० वा - अन्वयार्थ

दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून
वज्र-निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण -

विश्वभावनः भगवान् हरिः एवं इंद्रं समादिश्य अनिमेषाणां पश्यतां तत्र एव अग्तर्दधे विश्वपालक सर्वैश्वर्यसंपन्‍न श्रीविष्णु याप्रमाणे इंद्राला सांगून देव पहात असता त्याचठिकाणी गुप्त झाला ॥ १ ॥

भारत महान् आथर्वणः ऋषिः देवैः तथा अभियाचितः मोदमानः प्रहसन् इव इदं उवाच हे भरतकुलोत्पन्‍ना परीक्षित राजा मोठा अथर्वणाचा पुत्र दधीचि ऋषि देवांनी त्याप्रमाणे प्रार्थिला असता आनंदित होऊन हसतच की काय हे म्हणाला ॥ २ ॥

वृंदारकाः यः तु शरीरिणां संस्थायां चेतनापहः दुःसहः अभिद्रोहः यूयं अपि न जानीथ अहो देवहो जे तर प्राण्यांना मृत्युसमयी मूर्च्छादायक व सहन करण्यास अशक्य असे दुःख तुम्ही जाणत नाही काय ॥ ३ ॥

इह जिजीविषूणां जीवानां आत्मा प्रेष्ठः ईप्सितः अस्ति तं भिक्षमाणाय विष्णवे अपि दातुं कः उत्सहेत यालोकी जगण्याची इच्छा करणार्‍या प्राण्यांना जो देह अत्यंत प्रिय व इष्ट आहे त्या देहाला मागणार्‍या विष्णूला सुद्धा देण्यास कोण बरे उत्कंठित होईल ॥ ४ ॥

ब्रह्मन् भूतानुकम्पिनां पुण्यश्लोकेड्यकर्मणां भवद्विधानां महतां पुंसां तत् किं नु दुस्त्यजं हे दधीचि ऋषे प्राण्यांवर दया करणार्‍या पुण्यकीर्ति पुरुषांनी सुद्धा ज्यांच्या सदाचरणाची स्तुति करावी अशा आपणांसारख्या थोर पुरुषांना त्यापैकी कोणते बरे टाकण्यास कठीण आहे ॥ ५ ॥

ननु स्वार्थपरः लोकः परसंकटं न वेद यदि सः वेद तर्हि न याचेत यदि सः ईश्वरः स्यात् तर्हि न इति न आह खरोखर केवळ स्वार्थाविषयी तत्पर असा जन दुसर्‍याच्या दुःखाला जाणत नाही जर तो जाणील तर याचना करणार नाही जर तो समर्थ असेल तर नाही असे म्हणणार नाही ॥ ६ ॥

वः धर्मं श्रोतुकामेन मे यूयं प्रत्युदाहताः एषः अहं वः त्यजन्तं प्रियं आत्मानं संत्यजामि तुम्हांपासून धर्माला श्रवण करु इच्छिणार्‍या माझ्याकडून तुम्ही झिटकारिले गेला हा मी तुमच्याकरिता मला सोडून जाणार्‍या अशा आवडत्या देहाला टाकितो ॥ ७ ॥

नाथाः यः पुमान् अध्रुवेण आत्मना भूतदयया धर्मं न ईहेत यशः न ईहेत सः स्थावरैः अपि शोच्यः अहो नाथहो जो पुरुष क्षणभंगुर अशा देहाने प्राण्यांवर दया करुन धर्माची इच्छा करणार नाही कीर्तीची इच्छा करणार नाही तो पुरुष वृक्षादिकांनी सुद्धा शोक करण्याजोगा आहे ॥ ८ ॥

यः आत्मा भूतशोकहर्षाभ्यां शोचति ह्रष्यति एतावान् पुण्यश्लोकैः उपासितः अव्ययः धर्मः अस्ति जो पुरुष प्राण्यांना शोक किंवा आनंद झाला असता त्यायोगे शोक करितो आनंदित होतो हाच पुण्यश्लोक अशा सत्पुरुषांनी सेविलेला अक्षय असा धर्म होय ॥ ९ ॥

यत् मर्त्यः पारक्यैः क्षणभङ्‍गुरैः अस्वार्थैः स्वज्ञातिविग्रहैः न उपकुर्यात् अहो दैन्यं अहो कष्टम् जर मनुष्य परकी व एका क्षणात नष्ट होणार्‍या ज्याचा स्वतःला काहीएक उपयोग नाही अशा द्रव्य, पुत्रादि बांधव व देह यांनी उपकार करणार नाही किती हो दीनपणा किती हो खेद करण्यासारखी गोष्ट ॥ १० ॥

एवं कृतव्यवसितः आथर्वणः दध्यड् भगवति परे ब्रह्मणि आत्मानं संनयन् तनुं जहौ याप्रमाणे निश्‍चय केलेला अथर्वणाचा पुत्र दधीचि ऋषि सर्वैश्वर्यसंपन्न अशा श्रेष्ठ ब्रह्माच्याठिकाणी आत्म्याला लीन करुन शरीराला टाकिता झाला ॥ ११ ॥

यताक्षासुमनोबुद्धिः तत्वदृक् ध्वस्तबन्धनः परंमं योगं आस्थितः देहं गतं न बुबुधे इंद्रिये, मन व बुद्धि ज्याने नियमित केली आहे असा ज्ञानी ज्याची सर्व बंधने तुटुन गेली आहेत असा श्रेष्ठ योगाचा स्वीकार केलेला शरिर पडलेले जाणता झाला नाही ॥ १२ ॥

अथ इंद्रः विश्वकर्मणा मुनेः शुक्तिभिः निर्मितं वज्रं उद्यम्य भगवत्तेजसान्वितः उत्सिक्तः अभवत् नंतर इंद्र विश्वकर्म्याने दधीचि ऋषीच्या अस्थीनी तयार केलेल्या वज्राला धारण करुन भगवंताच्या तेजाने युक्त झालेला असा अत्यंत बलाढ्य झाला ॥ १३ ॥

सर्वैःदेवगणैः वृतः मुनिगणैः स्तूयमानः त्रैलोक्यं हर्षयन् इव गजेन्द्रोपरि अशोभत संपूर्ण देवगणांनी वेष्टिलेला ऋषिसमूहांनी स्तविला जाणारा त्रैलोक्याला आनंदित करीतच की काय ऐरावतावर शोभता झाला ॥ १४ ॥

राजन् असुरानीकयूथयैः पर्यस्तं वृत्रं क्रुद्धः रुद्रः अन्तकम् इव ओजसा छेतुं अभ्यद्रवत् हे परीक्षित राजा असुरसेनापतींनी वेष्टिलेल्या वृत्रासुराला रागावलेला रुद्र जसा यमाला त्याप्रमाणे वेगाने मारण्याकरिता धावत झाला ॥ १५ ॥

ततः प्रथम युगे त्रैतामुखे नर्मदायां असुरैः सुराणां परमदारुणः रणः अभवत् नंतर पहिल्या महायुगात त्रेतायुगाच्या आरंभी नर्मदानदीच्या काठी दैत्यांसह देवांचे फारच घनघोर युद्ध झाले ॥ १६ ॥

राजन् वृत्रपुरः सराः असुराः मृधे रुद्रैः वसुभिः आदित्यैः अश्विभ्यां पितृवह्‌निभिः मरुद्‍‍भिः ऋभुभिः साध्यैः विश्वेदेवैः तैः युक्तं मरुत्पतिं वज्रधर स्वया श्रिया रोचमानं शक्रं दृष्ट्‍वा न मृष्पन् हे परीक्षित राजा वृत्रप्रमुख दैत्य युद्धात अकरा रुद्रांनी आठ वसूंनी बारा आदित्यांनी दोन अश्विनीकुमारांनी पितर व अग्‍नि यांनी एकोणपन्‍नास मरुत् ऋभुगण साध्यगणांनी विश्वेदेवांनी त्यांनी युक्त अशा देवांचा अधिपति अशा वज्र धारण करणार्‍या आपल्या ऐश्वर्याने शोभणार्‍या इंद्राला पाहून सहन करते झाले नाहीत ॥ १७-१८ ॥

नमुचिः शंबरः अनर्वा द्विमूर्धा ऋषभः अम्बरः हयग्रीवः शङ्कुशिराः विप्रचित्तिः अयोमुखः पुलोमा च वृषपर्वा प्रहेतिः हेतिः उत्कलः दैतेयाः दानवाः यक्षाः च सहस्रशः रक्षांसि सुमालिमालिप्रमुखाः कार्तस्वरपरिच्छदाः असंभ्रान्ताः दुर्मदाः मृत्योः अपि दुरासदं इंद्रसेनग्य्रं सिंहनादेन प्रतिषिध्य अभ्यर्दयन् गदाभिः परिघैः बाणैः प्रासमुद्‍गरतोमरैः शूलैः परश्वधैः खड्‍गैः शतघ्‍नीभिः भुशुंडिभिः च शस्‍त्रैः च अस्‍त्रैः विबुधर्षमान् सर्वतः अवाकिरन् नमुचि, शंबर, अनर्वा, द्विमूर्धा, ऋषभ, अंबर, हयग्रीव, शंकुशिरा, विप्रचित्ति, अयोमुख, पुलोमा आणि वृषपर्वा, प्रहेति, हेति, उत्कल, वगैरे दैत्य, दानव, यक्ष आणि हजारो राक्षस सुमालि व मालि हे दोन दैत्य ज्यात मुख्य आहेत असे सुवर्णाचे अलंकार धारण करणारे निर्भय उन्मत्त असे मृत्युला सुद्धा दुःसह अशा इंद्रसेनेच्या सेनापतीला मोठ्या गर्जनेने निवारण करुन पीडा देऊ लागले गदांनी परिघांनी बाणांनी प्रास, मुद्‍गर व तोमर यांनी शूलांनी परशूंनी खड्‍गानी तोफांनी भुशुडींनी आणि शस्‍त्रांनी व अस्‍त्रांनी श्रेष्ठश्रेष्ठ देवांना सर्वबाजूंनी आच्छादिते झाले ॥ १९-२३ ॥

पुंखानुपुंखपतितैः शरजालैः समन्ततः संछन्‍नाः ते नभोघनैः संछन्‍नानि ज्योतीषि इव न अदृश्यंत एका पिसार्‍याला जोडून दुसरा पिसारा अशा क्रमाने सोडलेल्या बाणसमूहांनी सभोवार आच्छादून गेलेले ते देव आकाशातील मेघांनी आच्छादिलेल्या नक्षत्रांप्रमाणे दिसत नाहीसे झाले ॥ २४ ॥

लघुहस्तैः देवैः सिद्धपथे सहस्रधा छिन्‍नाः शस्‍त्रास्‍त्रवर्षौघाः सुरसैनिकान् हि न आसेदुः शीघ्र वेध करणार्‍या देवांनी अन्तरिक्षामध्ये हजारो प्रकारांनी छेदून टाकिलेले ते शस्‍त्रास्‍त्रांच्या वृष्टींचे समुदाय देवसैन्यावर खरोखर येऊन पोचले नाहीत ॥ २५ ॥

अथ शस्‍त्रास्‍त्रपूगैः अक्षतान् स्वस्तिमतः द्रुमैः दृषद्‌भिः विविधाद्रिशॄङ्‍गैः अविक्षतान् तान् इन्द्रसैनिकान् निशाम्य वृत्रनाथाः तत्रसुः नंतर शस्‍त्रास्‍त्रांच्या समूहांनी ज्यांच्या शरीरावर थोडासुद्धा व्रण पडला नाही अशा सुखाने वावरणार्‍या वृक्षांनी व पाषाणांनी अनेकप्रकारच्या पर्वतशिखरांनी छिन्‍नभिन्‍न न झालेल्या त्या इन्द्राच्या सैनिकांना पाहून वृत्रासुर ज्यांचा स्वामी आहे असे दैत्य भिऊन गेले ॥ २७ ॥

यथा क्षुद्रैः महत्सु प्रयुक्ताः रुशतीः रुक्षवाचः दैत्यैः कृष्णानुकुलेषु देवगणेषु कृताः कृताः सर्वे प्रयासाः विमोघाः अभवन् ज्याप्रमाणे सामान्य क्षुद्रपुरुषांनी मोठ्या सत्पुरुषांना उद्‍देशून बोललेले अकल्याणकारक कठोर शब्द दैत्यांनी कृष्णाचे ज्यांना सहाय्य आहे अशा देवगणांना उद्‍देशून पुनः पुनः केलेले सर्व प्रयत्‍न निष्फळ झाले ॥ २८ ॥

हरौ अभक्ताः हतयुद्धदर्पाः ते स्वप्रयासं वितथं निरीक्ष्य आत्तसाराः आजिमुखे पतिं विसृज्य पलायनाय मनः दधुः भगवंताच्या ठिकाणी भक्ति न करणारे ज्यांचा युद्धाबद्‍दलचा गर्व नाहिसा झाला आहे असे ते दैत्य आपले प्रयत्‍न व्यर्थ झाले असे पाहून ज्यांचे सामर्थ्य हिरावून घेतले आहे असे युद्धाच्या आघाडीवर स्वामी जो वृत्रासुर त्याला सोडून देऊन पळण्यासाठी मनामध्ये ठरविते झाले ॥ २९ ॥

मनस्वी वीरः वृत्रः अनुगान् तान् असुरान् प्रधावतः प्रेक्ष्य च तीव्रेण भयेन भग्‍नं पलायितं सैन्यं प्रेक्ष्य च विहस्य एतत् बभाषे थोरमनाचा पराक्रमी वृत्रासुर पाठोपाठ चालणार्‍या त्या दैत्यांना पळून जाताना पाहून आणि अत्यंत भयाने अस्ताव्यस्त झालेले व पळून गेलेले सैन्य पाहून व हास्य करून हे बोलला ॥ ३० ॥

हे विप्रचित्ते नमुचे पुलोमन् मय अनर्वन् शंबर मे वचनं शॄणुध्वं इति पुरुषप्रवीरः कालोपपन्‍नां मनस्विनां रुचिरां वाचं उवाच हे विप्रचित्ते, हे नमुचे, हे पुलोमन, हे मयासुरा, हे अनर्वन, हे शंबरा माझे भाषण ऐका अशारीतीने पुरुषश्रेष्ठ वृत्रासुर काळाला अनुरुप थोरमनाच्या पुरुषांना आवडणारी वाणि बोलता झाला ॥ ३१ ॥

एषः मृत्युः जातस्य सर्वतः ध्रुवः च इह यस्य प्रतिक्रिया न क्लृप्ता अथ यदि ततः लोकः च यशः हि युक्तं मृत्यूं कः नाम न वृणीत हा मृत्यु उत्पन्‍न झालेल्याला सर्वप्रकाराने निश्‍चित आहे आणि ह्या लोकी ज्या मृत्यूचा प्रतिकार कल्पिला नाही आता जर त्या मृत्यूपासून स्वर्गलोक आणि कीर्ति निश्‍चितपणे योग्य अशा मृत्यूला कोण बरे स्वीकार करणार नाही ॥ ३२ ॥

इह दुरापौ द्वौ मृत्यू संमतौ यत् जितासुः योगरतः ब्रह्मसंधारणया कलेवरं विजह्यात् वा यत् अग्रणीः अनिवृत्तः वीरशये ह्यालोकी दुर्लभ दोनप्रकारचे मृत्यु शास्‍त्रसंमत आहेत जो जितेन्द्रिय योगमार्गात प्रवृत्त झालेला पुरुष ब्रह्मचिंतनाने शरीराला टाकील अथवा जो रणभूमीच्या ठिकाणी पुढारीपणाने वावरणार माघार न घेता रणभूमीवर ॥ ३३ ॥

षष्ठ स्कन्धः - अध्याय दहावा समाप्त

GO TOP