श्रीमद् भागवत महापुराण

षष्ठ स्कंध - अध्याय ५ वा - अन्वयार्थ

श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप -

विष्णुमायोपबृंहितः सः तस्यां पाञ्‍चजन्यां हर्यश्वसंज्ञान् अयुतं पुत्रान् अजनयत् विष्णूच्या मायेने परिपूर्ण वाढलेला तो सामर्थ्यवान दक्ष त्या पांचजन्य स्‍त्रीच्या उदरी हर्यश्वनामक दहा हजार मुलांना उत्पन्‍न करिता झाला ॥ १ ॥

नृप अपृथग्धर्मशीलाः ते सर्वे दाक्षायणाः प्रजासर्गे पित्रा प्रोक्ताः प्रतीचीं दिशं ययुः हे परीक्षित राजा आचार व स्वभाव सारखा असणारे ते सगळे दक्षाचे मुलगे प्रजा उत्पन्‍न करण्याविषयी बापाने आज्ञा दिलेले असे पश्‍चिम दिशेला जाते झाले ॥ २ ॥

तत्र नारायणसरः सुमहत् मुनिसिद्धनिषेवितम् तीर्थं (आसीत्) यत्र सिंधुसमुद्रयोः संगमः (अस्ति) त्याठिकाणी नारायणसरनावाचे अत्यंत मोठे मुनि व सिद्ध यांनी सेविलेले असे तीर्थ असते झाले जेथे सिन्धु नदी व समुद्र यांचा संगम झाला आहे ॥ ३ ॥

तदुपस्पर्शनात् एव ते विनिर्धूतमलाशयाः उत च पारमहंस्ये धर्मे अपि प्रोत्पन्‍नमतयः (बभूवुः) त्या तीर्थाचा स्पर्श होताच ते हर्यश्व ज्यांच्या अंतःकरणातील सर्व दोष साफ धुवून गेले आहेत असे शिवाय आणखी परमहंससंबधी धर्माच्याठिकाणीहि उत्तम बुद्धि आहे ज्यांची असे झाले ॥ ४ ॥

पित्रादेशेन यंत्रिताः उग्रं तपः एव तेपिरे ह देवर्षिः प्रजाविवृद्धये यत्तान् तान् ददर्श पित्याच्या आज्ञेने बांधलेले दारुण तप करिते झाले एकदा नारद ऋषि प्रजा वाढविण्याच्या कामी गुंतलेल्या त्या दक्षपुत्रांना पहाता झाला ॥ ५ ॥

अथ च उवाच हर्यश्वाः वै भुवः अन्तं अदृष्‍ट्‍वा यूयं प्रजाः कथं भक्ष्यथ पालकाः बत बालिशाः (स्थ) नंतर आणखी बोलला हर्यश्व हो खरोखर पृथ्वीचा शेवट पाहिल्याशिवाय तुम्ही संतति कशा उत्पन्‍न करणार तुम्ही खरोखर पालक असूनही मूर्ख आहा ॥ ६ ॥

तथा एकपुरुषं राष्ट्रं अदृष्टनिर्गमं बिलं च बहुरुपां स्‍त्रियं च अपि पुंश्‍चलीपतिं पुमांसं त्याप्रमाणे ज्यात एकच पुरुष आहे अशा राष्ट्राला बाहेर पडण्याचे द्वार ज्यात दिसत नाही अशा बिळाला आणि पुष्कळ रुपे धारण करणार्‍या स्‍त्रीला आणखीहि जारिणीचा पति अशा पुरुषाला ॥ ७ ॥

उभयतोवाहां नदीं पंचपंचाद्‍भुतं गृहं चित्रकथं क्‍वचित् हंसं क्षौरपव्यं स्वयं भ्रमिं दोहोकडे वहाणार्‍या नदीला पंचवीस वस्तूंच्या एका अद्‍भुत घराला चमत्कारिक गोष्टी सांगणार्‍या कोणाएका हंसाला वस्तरे आणि वज्रे यांनी बनविलेल्या स्वतंत्रपणे फिरणार्‍या चक्राला ॥ ८ ॥

विपश्‍चितः स्वपितुः आदेशं अनुरुपं अविज्ञाय कथं सर्गं करिष्यथ विद्वान अशा आपल्या पित्याच्या आज्ञेला योग्य स्वरुपाने जाणल्याशिवाय कशी सृष्टि उत्पन्‍न कराल ॥ ९ ॥

अथ हर्यश्वाः तु तत् देवर्षेः वाचः कूटं निशम्य औत्पत्ति कमनीषया धिया स्वयं विममृशुः नंतर हर्यश्व तर त्या नारद ऋषीचे भाषणातील कोडे ऐकून जगदुत्पत्ति करण्याची इच्छा जीत आहे अशा बुद्धीने स्वतः विचार करु लागले ॥ १० ॥

भूः जीवसंज्ञक्षेत्रं यत् अनादि निजबंधनं (अस्ति) तस्य निर्वाणं अदृष्‍ट्‍वा असत्कर्मभिः किं भवेत् भूमि हे एक लिंगशरीरनामक क्षेत्र जे अनादि व आत्म्याला बांधणारे आहे त्याच्या नाशाला पाहिल्याशिवाय मोक्षमार्गाला उपयोगी न पडणार्‍या दुष्ट कर्मांनी काय होणार ॥ ११ ॥

ईश्वरः तुर्यः भगवान् स्वाश्रयः परः एकः एव (अस्ति) तं अभवं अदृष्‍ट्‍वा पुंसः असत्कर्मभिः किं भवेत् परमेश्वर चवथा सर्वसाक्षी ऐश्वर्यसंपन्‍न स्वतंत्र श्रेष्ठ एकच आहे त्या नित्यमुक्त प्रभूला पाहिल्याशिवाय पुरुषाचे वाईट कर्मांनी काय होणार ॥ १२ ॥

पुमान् यत् गत्वा यथा बिलस्वर्गं गतः न प्रत्यागच्छति न एव एति प्रत्यग्धाम अविदः इह असत्कर्मभिः किं भवेत् पुरुष जेथे गेला असता ज्याप्रमाणे पाताळात गेलेला येत नाही त्याप्रमाणे पुनः परत येतच नाही तेजोमय ब्रह्माला न जाणणार्‍याला ह्या लोकी वाईट उग्र कर्मे करुन काय लाभ होणार ॥ १३ ॥

आत्मनः नानारूपां बुद्धिः स्वैरिणी इव गुणान्विता तन्‍निष्ठां अगतस्य इह असत्कर्मभिः किं भवेत् स्वतःची नानाप्रकारची रुपे धारण् करणारी बुद्धि जारिणी स्‍त्रीप्रमाणे रजोगुणादिकाने युक्त आहे तिच्या नाशाप्रत न गेलेल्याला येथे दुष्कर कर्मे करुन काय उपयोग होणार ॥ १४ ॥

तत्संगभ्रंशितैश्वर्यं कुभार्यवत् तद्‍गतीः संसरन्तं अबुधस्य असत्कर्मभिः किं भवेत् तिच्या समागमाने ऐश्वर्य भ्रष्ट झालेल्या वाईट स्‍त्रीच्या पतीप्रमाणे त्या अवस्थांना पावणार्‍या जीवाला न जाणणार्‍याचे मिथ्या कर्मांनी काय होणार ॥ १५ ॥

सृष्ट्यप्ययकरीं वेलाकूलान्तवेगितां तां मायां अविज्ञस्य मत्तस्य असत्कर्मभिः किं भवेत् उत्पत्ति व संहार करणार्‍या तीराजवळ खळखळणार्‍या प्रवाहात पडलेल्या प्राण्यास बाहेर पडून न देणार्‍या त्या मायेला न जाणणार्‍या उन्मत्त पुरुषाला मायिक कर्मांनी काय होणार ॥ १६ ॥

पंचविशतितत्त्वानां पुरुषः अद्‍भुतदर्पणं अध्यात्मं अबुधस्य इह असत्कर्मभिः किं भवेत् पंचवीस तत्त्वात्मक पुरुष विलक्षण आधार अशा अंतर्यामी पुरुषाला न जाणणार्‍याच्या ह्या लोकी क्षुद्रकर्मांनी काय होणार ॥ १७ ॥

ऐश्वरं बंधमोक्षानुदर्शनं विविक्तपदं शास्त्रं उत्सृज्य अविज्ञाय असत्कर्मभिः किं भवेत् ईश्वराचे प्रतिपादन करणार्‍या बंध व मोक्ष दाखविणार्‍या वैराग्याचे स्थान अशा शास्त्राला टाकून न जाणून बहिर्मुख कर्मांनी काय होणार ॥ १८ ॥

भ्रमिः तीक्ष्णं सर्वं जगत् निष्कर्षयत् स्वतंत्रं कालचक्रं अबुधस्य इह असत्कर्मभिः किं भवेत् सर्वकाळ फिरणार्‍या तीक्ष्ण सर्व जगाला क्षीण करणार्‍या स्वतंत्र कालचक्राला न जाणणार्‍याला येथे क्षुद्र कर्मांनी काय लाभ होणार ॥ १९ ॥

यः तदनुरुपाय निवर्तकं शास्त्रस्य पितुः आदेशं न वेद गुणविश्रभी कथं उपक्रमेत् जो निवृत्तिमार्गास योग्य अशा अधिकार्‍याला निवृत्त करणार्‍या शास्त्ररुपी पित्याच्या आज्ञेला जाणत नाही तो गुणमय प्रवृत्तिमार्गावर विश्वास ठेवणारा कसा प्रवृत्त होईल ॥ २० ॥

इति व्यवसिताः एकचेतसः हर्यश्वाः तं परिक्रम्य अनिवर्तनं पंथानं प्रययुः याप्रमाणे निश्‍चित झाली आहे बुद्धि ज्यांची असे एक विचाराचे ते हर्यश्व त्या नारदऋषीला प्रदक्षिणा करुन जिकडे गेला असता पुनः परत येत नाही अशा मार्गाला जाते झाले ॥ २१ ॥

मुनिः स्वरब्रह्मणि निर्भातहृषीकेशपदांबुजे अखंडं चित्तं आवेश्य लोकान् अनुचरत् नारद ऋषि नादब्रह्मामध्ये स्पष्ट दिसणार्‍या प्रभूच्या चरणकमली सतत अंतःकरण लावून लोकात फिरत राहिला ॥ २२ ॥

कः शीलशालिनां पुत्राणां नारदात् नाशं निशम्य शोचन् अन्वतप्यत सुप्रजास्त्वं शुचां पदं प्रजापति उत्तम स्वभावाच्या पुत्रांचा नारद ऋषीकडून नाश झालेला ऐकून शोक करणारा असा फारच दुःखी झाला चांगली संतति होणे हे शोकाचे स्थान होय ॥ २३ ॥

सः दक्षः अजेन परिसांत्वितः भूयः पांचजन्यायां शबलाश्चान् सहस्रशः पुत्रान् अजनयत् तो दक्ष ब्रह्मदेवाने सांत्वन केलेला पुनः पांचजनीच्या उदरी शबलाश्च नावाच्या हजारो मुलांना उत्पन्‍न करिता झाला ॥ २४ ॥

ते अपि धृतव्रताः पित्रा प्रजासर्गे समादिष्टाः यत्र स्वपूर्वजाः सिद्धाः (अभवन् तत्र) नारायणसरः जग्मुः ते शबलाश्चहि व्रतधारी बापाने प्रजा निर्माण करण्याविषयी आज्ञापिलेले असे जेथे स्वतःचे पूर्वज सिद्धकोटीला प्राप्त झाले त्या नारायणसरोवरावर गेले ॥ २५ ॥

तदूपस्पर्शनात् एव विनिर्धूत मलाशयाः परमं ब्रह्म जपंतः ते अत्र महत् तपः तेपुः त्या सरोवरातील उदकाच्या स्पर्शानेच अंतःकरणातील सर्व दोष दूर झालेले असे श्रेष्ठ ब्रह्म जपणारे ते शबलाश्च ह्या सरोवराच्या ठिकाणी मोठे तप आचरते झाले ॥ २६ ॥

कतिचित् मासान् अब्भक्षाः कतिचित् वायुभोजनाः इमं मंत्रं अभ्यस्यंतः इडस्पतिं आराधयन् काही महिने केवळ जलपान करणारे काही महिने वायु भक्षण करणारे असे हा मंत्र जपणारे मंत्राधिपती ईश्वराला उपासिते झाले ॥ २७ ॥

ओम् पुरुषाय विशुद्धसत्त्वधिष्ण्याय परमहंसाय महात्मने नारायणाय नमः धीमहि ब्रह्मात्मक पुरुष अशा अत्यंत शुद्ध सत्त्वगुणाचा आधार अशा परमहंस महासमर्थ नारायणाला नमस्कार करितो ॥ २८ ॥

राजेंद्र नारदः मुनिः प्रतिसर्गधियः तान् अपि उपेत्य इति पूर्ववत् वाचः कूटानि ग्राह हे राजाधिराजा नारद ऋषि सृष्टि वाढविण्याची ज्यांची बुद्धि झाली आहे अशा त्या शबलाश्वांच्या जवळ येऊन अशा तर्‍हेची पूर्वीप्रमाणे भाषणांची कोडी सांगता झाला ॥ २९ ॥

भ्रातृवत्सलाः दाक्षायणाः गदतः मम निगमं शॄणुत भ्रातृणां पदवीं अन्विच्छत भावांविषयी अत्यंत प्रेमळ असे दक्षपुत्रहो बोलणार्‍या माझ्या उपदेशाला श्रवण करा बंधूंच्या मार्गाला शोधून काढा ॥ ३० ॥

यः धर्मवित् भ्राता भ्रातृणां प्रायणं अनुतिष्ठति सः पुण्यबंधु पुरुषः मरुद्‌भिः सह मोदते जो धार्मिक भाऊ भावांच्या उत्कृष्ट मार्गाला आचरितो तो पुण्यवान पुरुष देवांसह आनंद पावतो ॥ ३१ ॥

अमोघदर्शनः नारदः एतावत् उक्त्वा प्रययौ मारिष च ते अपि भ्रातृणां मार्गं अन्वगमन् ज्याचे दर्शन निरर्थक होत नाही असा नारद ऋषि याप्रमाणे बोलून जाता झाला हे श्रेष्ठ पुरुषा आणि ते शबलाश्वहि भावांच्याच मार्गाला अनुसरले ॥ ३२ ॥

(ये) परस्य सघ्रीचीनं प्रतीचीनं अनुपथं गताः ते पश्‍चिमाः यामिनीः इव अद्य अपि न निवर्तन्ते जे परमेश्वराच्या उत्तम इंद्रिये अंतर्मुख केल्याने प्राप्त होणार्‍या मार्गाला गेले ते मध्यरात्रीच्या पुढील रात्रीप्रमाणे अजूनहि परत येत नाहीत ॥ ३३ ॥

एतस्मिन् काले बहून उत्पातान् पश्यन् प्रजापतिः पूर्ववत् नारदकृतं पुत्रनाशं उपाशॄणोत् ह्याच वेळी पुष्कळ अपशकुनांना पहाणारा दक्ष पूर्वीप्रमाणे नारदाने केलेल्या पुत्रांच्या नाशाला ऐकता झाला ॥ ३४ ॥

पुत्रशोकविमूर्च्छितः असौ नारदाय चुक्रोध रोषावत् विस्फुरिताधरः देवर्षि उपलभ्य आह देहभान नाहीसे झालेला हा नारदावर रागावला रागाने ज्याचे ओठ थरथर कापत आहेत असा नारदऋषीकडे येऊन म्हणाला ॥ ३५ ॥

अहो असाधो साधुलिंगेन त्वया नः साधूनां असाधु अकारि अर्भकाणां भिक्षोः मार्गः प्रदर्शितः अरे अधमा साधूप्रमाणे सोंग घेणार्‍या अशा तुझ्याकडून आम्हा साधूंचे अहित केले गेले मुलांना संन्याशाचा मार्ग दाखविलास ॥ ३६ ॥

पाप त्रिभिः ऋणैः अमुक्तानां अमीमांसितकर्मणां उभयोः लोकयोः श्रेयसः विघातः (त्वया) कृतः हे पातकी पुरुषा तीन ऋणांतून मुक्त न झालेल्यांचा ज्यांनी कर्माविषयी विचार केला नाही अशांचा दोन्ही लोकांमध्ये कल्याणांचा नाश तुजकडून केला गेला ॥ ३७ ॥

एवं बालानां मतिभित् निरनुक्रोशः हरेः यशोहा निरपत्रपः त्वं पार्षदमध्ये चरसि ह्याप्रमाणे मुलांची बुद्धि फिरविणारा निर्दय परमेश्वराच्या कीर्तीचे हरण करणारा निर्लज्ज असा तू परमेश्वराच्या पार्षदामध्ये रहातोस ॥ ३८ ॥

ननु सौहृदघ्‍नं वै अवैरिणां वैरंकरं त्वाम् ऋते भागवताः नित्यं भूतानुग्रहकातराः खरोखर मैत्री मोडणार्‍या आणि वैर नसणार्‍यांमध्ये वैर उत्पन्‍न करणार्‍या तुला सोडून सर्व भगवद्‍भक्त सदोदित प्राणिमात्रांवर कृपा करण्याविषयी उत्सुक असतात ॥ ३९ ॥

यदि स्‍नेहपाशनिकृंतनं उपशमं मन्यसे मृषा केवलिना त्वया इत्थं पुंसां विरागः न स्यात् जर तू प्रेमपाश तोडिल्याने वैराग्य प्राप्त होईल असे मानशील तर व्यर्थ अशा ह्या केवळ तुझ्या योगाने याप्रकारे मनुष्यांना वैराग्य होणार नाही ॥ ४० ॥

पुमान् न अनुभूय विषयतीक्ष्णतां न जानाति तस्मात् (यथा) स्वयं निर्विद्येत तथा परैः भिन्‍नधीः न (निर्विद्येत) पुरुष अनुभवाशिवाय विषयांच्या दुःखद स्वरुपाला जाणत नाही म्हणून जसा स्वतःच्या अनुभवाने वैरागी होईल तसा दुसर्‍यांनी बुद्धि फिरविलेला विरक्त होणार नाही ॥ ४१ ॥

त्वं कर्मसंधानां नः साधूनां गृहमेधिनां न यत् दुर्मषं विप्रियं कृतवान् असि (तत्) तव (अस्माभिः) मर्षितं तू ज्यांच्या कर्माविषयी मर्यादा आहे अशा आम्हा सज्जनांचे गृहस्थाश्रम्यांचे जे असह्य असे अप्रिय तू केले ते तुझे आम्ही सहन केले ॥ ४२ ॥

तन्तुकृंतन त्वं यत् नः पुनः अभद्रं अचरः तस्मात् मूढ लोकेषु भ्रमतः ते पदं न (भविष्यति) हे वंशच्छेदका तू जे आमचे पुनरपि अकल्याण केले त्यामुळे हे मूर्खा लोकांमध्ये भ्रमण करणार्‍या तुला आधार कोठेहि मिळणार नाही ॥ ४३ ॥

साधुसंमतः नारदः तत् बाढं प्रतिजग्राह हि स्वयं ईश्वरः (अपि) तितीक्षेत एतावान् साधुवादः (अस्ति) सत्पुरुषांना मान्य असा नारद ऋषि ते ठीक आहे म्हणून स्वीकारता झाला कारण स्वतः समर्थ असताहि सहन करितो हाच साधु शब्दाचा अर्थ होय ॥ ४४ ॥

षष्ठ स्कन्धः - अध्याय पाचवा समाप्त

GO TOP