|
श्रीमद् भागवत महापुराण
षष्ठ स्कंध - अध्याय ६ वा - अन्वयार्थ
श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप - ततः स्वयंभुवा अनुनीतः प्राचेतसः असिक्न्यां पितृवत्सलाः वृष्टिं दुहितृः संजनयामास नंतर ब्रह्मदेवाने सांत्वन केलेला प्रचेत्यांचा पुत्र दक्ष असिक्नीनामक भार्येच्या ठिकाणी पित्यावर प्रेम करणार्या साठ कन्यांना उत्पन्न करिता झाला ॥ १ ॥ दश धर्माय द्विषट् काय त्रिणव इंदोः द्वे द्वे भूतांगिरः कृशाश्वेभ्यः च अपराः तार्क्ष्याय दत्तवान् दहा धर्माला तेरा कश्यपाला सत्तावीस चंद्राला दोन दोन भूत, अंगिरा आणि कृशाश्व यांना आणि दुसर्या उरलेल्या चार तार्क्ष्य नाव धारण करणार्या कश्यपाला देता झाला ॥ २ ॥ च त्वं सापत्यानां अमूषां नामधेयानि मे शॄणु यासां प्रसूतिप्रसवैः त्रयः लोकाः आपूरिताः आणि तू पुत्रांसह ह्यांची नावे माझ्यापासून श्रवण कर ज्यांच्या मुलगे नातू इत्यादिकांनी तिन्ही लोक भरून गेले ॥ ३ ॥ भानुः लंबाः ककुब् जामिः विश्वा साध्या मरुत्वती वसुः मुहूर्ता संकल्पा धर्मपत्न्यः (आसन्) सुतान् शॄणु भानु, लंबा, ककुब्, जामि, विश्वा, साध्या, मरुत्वती, वसु, मुहुर्ता व संकल्पा ह्या दहा धर्माच्या भार्या होत्या पुत्रांना श्रवण कर ॥ ४ ॥ नृप भानोः देवऋषभः ततः इंद्रसेनः लंबायाः विद्योतः आसीत् ततः च स्तनयित्नवः हे परीक्षित राजा भानूला तर देवऋषभ त्यापासून इंद्रसेन लंबेचा विद्योतनामक पुत्र होता आणि त्या विद्योतापासून स्तनयित्नुनामक पुत्र झाले ॥ ५ ॥ ककुभः संकटः तस्य कीकटः तनयः यतः भुवः दुर्गाणि जामेयः स्वर्गः ततः नंदिः अभवत् ककुबला संकटपुत्र झाला त्याला कीकटनामक पुत्र ज्या कीकटापासून भूमीवरील दुर्गाभिमानी देव झाले जामीचा पुत्र स्वर्ग त्या स्वर्गापासून नंदि नावाचा पुत्र झाला ॥ ६ ॥ विश्वायाः तु विश्वेदेवाः तान् अप्रजान् प्रचक्षते साध्यायाः तु साध्यः गणः तत्सुतः तु अर्थसिद्धिः विश्वेचे तर विश्वेदेव नावाचे पुत्र होते त्यांना संततिविरहित म्हणतात साध्येला तर साध्यनावाचे गण झाले त्या साध्यगणाचा पुत्र तर अर्थसिद्धि होय ॥ ७ ॥ च मरुत्वत्यां मरुत्वान् च जयन्तः इति उभौ बभूवतुः वासुदेवांशः जयंतः यं उपेन्द्रः इति विदुः आणि मरुत्वतीच्या ठिकाणी मरुत्वान् आणि जयंत असे दोघे पुत्र झाले परमेश्वराचा अंश जयंत होय ज्याला उपेंद्र नावाने जाणतात ॥ ८ ॥ च मुहूर्तायाः मौहतिकाः देवगणाः जज्ञिरे ये वै भूतानां स्वस्वकालजं फलं प्रयच्छन्ति आणि मुहूर्तेपासून मुहूर्ताभिमानी देवगण जन्मले जे खरोखर प्राण्यांना आपापल्या काळाला अनुरुप असे फळ देतात ॥ ९ ॥ संकल्पायाः संकल्पः च संकल्पजः कामः स्मृतः वसोः पुत्राः अष्टौ वसवः (आसन्) तेषां नामानि मे शॄणु संकल्पेला संकल्पनामक पुत्र झाला आणि संकल्पापासून झालेला कामनावाचा पुत्र सांगितला आहे वसूचे पुत्र आठ वसु नावाचे झाले त्यांची नावे माझ्यापासून श्रवण कर ॥ १० ॥ द्रोणः प्राणः ध्रुवः अर्कः अग्निः दोषः वसुः विभावसुः द्रोणस्य अभिमतेः पत्न्या हर्षशोकभयादयः द्रोण, प्राण, ध्रुव, अर्क, अग्नि, दोष, वसु व विभावसु द्रोणाच्या अभिमतिनामक पत्नीचे ठिकाणी हर्ष, शोक, भय वगैरे पुत्र झाले ॥ ११ ॥ प्राणस्य ऊर्जस्वती भार्या च सहः आयुः पुरोजवः एते त्रयः पुत्राः ध्रुवस्य भार्या धरणिः विविधाः पुरः असूत प्राणाची ऊर्जस्वतीनामक पत्नी आणि सह, आयु व पुरोजव हे तीन मुलगे ध्रुवाची पत्नी धरणि अनेकप्रकारच्या नगराभिमानी देवांना प्रसवती झाली ॥ १२ ॥ अर्कस्य भार्या वासना पुत्राः तर्षादयः स्मृताः अग्नेः भार्या वसोर्धारा च पुत्राः द्रविणकादयः अर्काची पत्नी वासना तर्षादि मुलगे सांगितले आहे अग्नीची पत्नी वसोर्धारा आणि पुत्र द्रवणिक इत्यादि ॥ १३ ॥ च कृत्तिकापुत्रः स्कंदः ये विशाखादयः ते ततः आसन् दोषस्य शर्वरीपुत्रः शिशुमारः यः हरेः कला आणि कृत्तिकेचा मुलगा स्कंद होय जे विशाख आदिकरुन पुत्र होते ते त्या स्कंदापासून झाले दोषाचा शर्वरीनामक भार्येपासून झालेला पुत्र शिशुमार होय जो भगवंताचा अंश होता ॥ १४ ॥ वसोः आंगिरसीपुत्रः आकृतीपतिः विश्वकर्मा ततः चाक्षुषः मनुः अभूत् मनोः विश्वे साध्याः सुताः वसूच्या आंगिरसीनामक भार्येपासून झालेला पुत्र सृष्टि निर्माण करणारा शिल्पाचार्य विश्वकर्मा त्या विश्वकर्म्यापासून चाक्षुषनामक मनु झाला चाक्षुषमनूचे विश्वेदेव साध्यगण पुत्र होत ॥ १५ ॥ विभावसोः उषा व्युष्टं रोचिषम् आतपम् असृत अथ पञ्चयामः येन भूतानि कर्मसु जाग्रति विभावसूची उषा नामक भार्या व्युष्टाला रोचिषाला आतपाला प्रसविती झाली नंतर त्या आतपापासून पंचयामनामक पुत्र झाला ज्या पञ्चयामाच्या योगाने सर्वप्राणी कर्मांमध्ये तत्पर रहातात ॥ १६ ॥ भूतस्य सरुपा भार्या कोटिशः रुद्रान् असूत रैवतः अजः भवः भीमः वामः उग्रः वृषाकपिः अजैकपाद् अहिर्बुध्न्य बहुरुपः महान् इति रुद्रस्य अन्ये भूतविनायकाः पार्षदाः (सन्ति) तान् घोरा असूत भूताची सरुपानावाची पत्नी कोट्यावधि रुद्रांना प्रसवती झाली रैवत, अज, भव, भीम, वाम, उग्र, वृषाकपि, अजैकपाद, अहिर्बुध्न्य, बहुरुप आणि महान असे या रुद्राचे दुसरे भूत आणि विनायक पार्षदगण आहेत त्यांना घोरानामक स्त्री प्रसवती झाली ॥ १७-१८ ॥ प्रजापतेः अंगिरसः स्वधा पत्नी पितृन् अथ च सती अथर्वांगिरसं वेदं पुत्रत्वे अकरोत् प्रजापति अशा अंगिरा ऋषिची स्वधा नावाची पत्नी पितरांना आणखीहि सतीनामक भार्या अथर्वांगिरसनामक वेदाला पुत्राच्या ठिकाणी करिती झाली ॥ १९ ॥ कृशाश्वः अचिंषि भार्यायां धूम्रकेश धिषणायां वेदशिरः देवलं वयुनं मनुम् अजीजनत् कृशाश्व अचिंनामक भार्येच्या ठिकाणी धूम्रकेशाला धिषणानामक भार्येच्या ठिकाणी वेदशिर, देवल, वयुन व मनु ह्याना उत्पन्न करिता झाला ॥ २० ॥ तार्क्ष्यस्य विनता कद्रूः पतङ्गी यामिनी इति (भार्याः आसन्) पतङ्गी पतगान् अथ यामिनी शलभान् असूत सुपर्णा साक्षात् यज्ञेशवाहनं गरुडं च सूर्यसूतं अनुरुं असूत कद्रूः अनेकशः नागान् असूत तार्क्ष्य नाव धारण करणार्या कश्यपाच्या विनता, कद्रू, पतंगी व यामिनी अशा ह्या चार भार्या होत्या पतंगी पक्ष्यांना त्याचप्रमाणे यामिनी टोळांना प्रसविती झाली विनता प्रत्यक्ष यज्ञाधिपति विष्णूचे वाहन अशा गरुडाला आणि सूर्याचा सारथी अशा अरुणाला प्रसविती झाली कद्रू अनेक प्रकारच्या नागांना प्रसविती झाली ॥ २१-२२ ॥ भारत इन्दोः पत्न्यः तु कृत्तिकादीनि नक्षत्राणि दक्षशापात् यक्ष्मग्रहार्दितः सः तासु अनपत्यः (आसीत्) हे भरतकुलोत्पन्ना परीक्षित राजा चंद्राच्या स्त्रिया तर कृत्तिकादि नक्षत्रे होत दक्षाने शाप दिल्यामुळे क्षयरोगाने पीडिलेला तो चंद्र त्यांच्या ठिकाणी संततिविरहित राहिला ॥ २३ ॥ सोमः पुनः तं प्रसाद्य क्षये दिताः कलाः लेभे अथ लोकांना मातृणां कश्यपपत्नीनां शंकराणि नामानि शॄणु यत्प्रसूतं इदं अदितिः दितिः दनुः काष्ठा आरिष्टा सुरसा च इला चंद्र फिरुन त्या दक्षाला प्रसन्न करुन घेऊन कृष्णपक्षामध्ये क्षीण झालेल्या कलांना मिळविता झाला आता लोकांच्या ज्या माता कश्यपाच्या स्त्रिया त्यांची कल्याणकारक नावे ऐक ज्यांच्यापासून उत्पन्न झालेले हे जग होय अदिति दिति दनु काष्ठा आरिष्टा सुरसा आणि इला ॥ २४-२५ ॥ मुनिः क्रोधवशा ताम्राः सुरभिः सरमा तिमिः तिमेः यादोगणाः (जाताः) सरमासुताः श्वापदाः आसन् मुनि क्रोधवशा ताम्रा सुरभि सरमा तिमि तिमीपासून जलचरगण झाले सरमेचे पुत्र व्याघ्रादि क्रूर प्राणी झाले ॥ २६ ॥ नृप सुरभेः महिषाः गावः च ये अन्ये द्विशफाः ताम्रायाः श्येन गृध्राद्याः मुनेः अप्सरसां गणाः हे राजा सुरभीपासून म्हशी गाई आणि जे दुसरे दोन खुरांचे प्राणी ताम्रेपासून श्येन, गृध्र इत्यादि मुनीपासून अप्सरांचे समुदाय झाले ॥ २७ ॥ राजन् दन्दशूकादयः सर्पाः क्रोधवशात्मजाः इलायः सर्वे भूरहाः च सौरसाः यातुधानाः हे परीक्षित राजा दंदशूक आदिकरुन सर्प क्रोधवशेचे मुलगे होत इलेपासून सर्व वृक्ष आणि सुरसेचे पुत्र राक्षसगण होत ॥ २८ ॥ अरिष्टायाः गंधर्वाः च काष्ठायाः द्विशफेतराः दनोः एकषष्टिः सुताः तेषां प्राधानिकान् शॄणु अरिष्टेपासून गंधर्व आणि काष्ठेपासून दोनखुरी प्राण्यांशिवाय इतर पशु दनूपासून एकसष्ट पुत्र झाले त्यापैकी मुख्य मुख्य श्रवण कर ॥ २९ ॥ द्विमूर्धा शंबरः अरिष्टः हयग्रीवः विभावसुः अयोमुखः शंकुशिराः स्वर्भानुः कपिलः अरुणः द्विमूर्धा शंबर अरिष्ट हयग्रीव विभावसु अयोमुख शंकुशिरा स्वर्भानु कपिल अरुण ॥ ३० ॥ पुलोमा च वृषपर्वा एकचक्रः अनुतापनः धूमकेशः विरुपाक्षः विप्रचित्तिः च दुर्जयः पुलोमा आणि वृषपर्वा एकचक्र अनुतापन धूमकेश विरुपाक्ष विप्रचित्ति आणि दुर्जय ॥ ३१ ॥ नमुचिः किल स्वर्भानोः सुप्रभां कन्यां उवाह नाहुषः बली ययातिः तु वृषपर्वणः शर्मिष्ठां नमुचि खरोखर स्वर्भानूच्या सुप्रभानामक कन्येला वरिता झाला नहुषाचा पुत्र बलाढ्य ययाति राजा तर वृषपर्व्याच्या शर्मिष्ठानामक कन्येला ॥ ३२ ॥ चारुदर्शनाः चतम्रः याः वैश्वानरसुताः ताः उपदानवी हयशिरा पुलोमा तथा च कालका इति रुपवती अशा चार ज्या दनुपुत्र वैश्वानराच्या कन्या त्या उपदानवी हयशिरा पुलोमा त्याचप्रमाणे कालका या अशा होत ॥ ३३ ॥ नृप हिरण्याक्षः उपदानवीं क्रतुः हयशिरां पुलोमां च कालकां वैश्वानरसुते तु ब्रह्मचोदितः भगवान् कः कश्यपः उपयेमे अथ पौलोमाः च कालकेयाः दानवाः युद्धशालिनः हे परीक्षित राजा हिरण्याक्ष उपदानवीला क्रतु हयशिराला पुलोमा आणि कालका ह्या दोन वैश्वानराच्या कन्यांना तर ब्रह्मदेवाने आज्ञा दिलेला षड्गुणैश्वर्यसंपन्न असा प्रजापति कश्यप वरिता झाला ह्या नंतर पुलोमेचे पुत्र आणि कालकेचे पुत्र दानवनावाचे युद्धाने शोभणारे होते ॥ ३४-३५ ॥ राजन् ते पितुः पिता इंद्राप्रियंकरः एकः स्वर्गतः तयोः यज्ञघ्नान् षष्टिसहस्राणि जघान हे परीक्षित राजा तुझा आजोबा इंद्राचे प्रिय करणारा एकटा अर्जुन स्वर्गाला गेला असता त्या पौलोम व कालकेय दानवांपैकी यज्ञांचा नाश करणार्या साठ हजार निवातकवचनामक दानवांना मारिता झाला ॥ ३६ ॥ विप्रचित्तिः सिंहिकायां राहुज्येष्ठं केतुशतं शतं च एकं अजीजनत् विप्रचित्ति सिंहिका नामक पत्नीच्या ठिकाणी राहू आहे वडील ज्यामध्ये असे शंभर केतु आहेत त्यात असे एकशे आणि एक इतके पुत्र उत्पन्न करिता झाला ॥ ३७ ॥ यः ग्रहत्वं उपागतः अथ अतः यः अदितेः वंशः सः अनुपूर्वशः श्रूयतां यत्र नारायणः देवः विभुः स्वांशेन अवतरत् जो राहू ग्रहपणाला प्राप्त झाला आता येथून पुढे जो अदितीचा वंश तो अनुक्रमाने श्रवण केला जावा ज्या ठिकाणी भगवान परमेश्वर सर्वव्यापी असा आपल्या अंशाने अवतार घेता झाला ॥ ३८ ॥ विवस्वान् अर्यमा पूषा त्वष्टा अथ सविता भगः धाता विधाता वरुणः मित्रः शक्रः उरुक्रमः विवस्वान अर्यमा पूषा त्वष्टा तसाच सविता भग धाता विधाता वरुण मित्र शक्र उरुक्रम ॥ ३९ ॥ विवस्वतः संज्ञा श्राद्धदेवं मनुं असूयत वै च महाभागा देवं यमं च यमीं मिथुनं तथा अथ सा एव वडवा भूत्वा भुवि नासत्यौ सुषुवे विवस्वानाची संज्ञानावाची भार्या श्राद्धदेव नामक मनूला प्रसविती झाली त्याचप्रमाणे आणखी मोठी भाग्यवती संज्ञा देदीप्यमान असा यम आणि यमुना जुळ्या अपत्यांना त्याचप्रमाणे नंतर तीच संज्ञा घोडीचे रुप धारण केलेली अशी होऊन पृथ्वीवरच दोन अश्विनीकुमारांना उत्पन्न करिती झाली ॥ ४० ॥ छाया ततः शनैश्चरं च सावणिं मनुं लेभे च या संवरणं पतिं वै वव्रे तपतीं कन्यां सुषुवे छाया नावाची भार्या त्या विवस्वानापासून शनैश्चरनामक पुत्राला आणि सावणिनामक मनूला मिळविती झाली आणि जी संवरणाला पतिरुपाने खरोखर वरिती झाली तपतीनामक कन्येला प्रसविती झाली ॥ ४१ ॥ अर्यम्णः पत्नी मातृका तयोः चर्षणयः सुताः च यत्र ब्रह्मणा वै मानुषी जातिः उपकल्पिता अर्यमाची भार्या मातृका त्या दोघांचे कृताकृतज्ञान संपन्न असे पुत्र होत आणि जेथे कृताकृतज्ञान असल्यामुळे ब्रह्मदेवाने खरोखर मनुष्यजात म्हणून कल्पना केली आहे ॥ ४२ ॥ अनपत्यः पिष्टादः पूषा भग्नदंतः अभवत् पुरा यः असौ विवृतद्विजः दक्षाय कुपितं जहास संतानरहित पीठ खाणारा पूषादेव दात पडलेला असा झाला पूर्वी जो हा पूषा दात बाहेर दाखवून दक्षाकरिता रागावलेल्या शंकराला हसला ॥ ४३ ॥ दैत्यानुजा रचना नाम कन्यका त्वष्टुः भार्या तयोः संनिवेशः च वीर्यवान् विश्वरुपः जज्ञे दैत्यांची कनिष्ठ भगिनी रचना नाव असलेली कन्या त्वष्ट्याची पत्नी होय त्यांच्यापासून संनिवेश आणि पराक्रमी विश्वरुप उत्पन्न झाला ॥ ४४ ॥ सुरगणाः द्विषतां दौहित्रं अपि तं वव्रिरे यत् विमतेन आंगिरसेन गुरुणा परित्यक्ताः देवगण शत्रु जे दैत्य त्यांच्या मुलीचा मुलगा अशाहि त्या विश्वरुपाला गुरुरुपाने वरते झाले जेव्हा आज्ञा केलेल्या अंगिराचा पुत्र अशा बृहस्पति गुरुने सोडून दिले गेले ॥ ४५ ॥ षष्ठ स्कन्धः - अध्याय सहावा समाप्त |