|
श्रीमद् भागवत महापुराण
षष्ठ स्कंध - अध्याय ३ रा - अन्वयार्थ
यम आणि यमदूतांचा संवाद - अयं जनः यस्य वशे वर्तते सः देवः धर्मराजः एवं हताज्ञः सन् स्वभटोपवर्णितं निशम्य मुरारेः नैदेशिकैः विहतान् तान् प्रति किं प्रत्याह हा सर्व प्राणिसमुदाय ज्याच्या ताब्यात आहे तो देव यमधर्म याप्रमाणे आज्ञा मोडलेला असा होत्साता आपल्या दूतांनी सांगितलेले ऐकून परमेश्वराच्या दूतांनी पराभव केलेल्या त्या दूतांना काय उलट सांगता झाला ॥ १ ॥ ऋषे यमस्य देवस्य दण्डभंगः कुतश्चन श्रुतपुर्वः न आसीत् मुने एतं लोकसंशयं त्वदन्यः न हि वृश्चति इति मे विनिश्चितं भाति हे शुकाचार्या यमदेवाच्या आज्ञेचा भंग कुठेहि पूर्वी ऐकिलेला नाही हे ऋषे ह्या लोकांच्या संशयाला तुझ्याशिवाय दुसरा तोडणारच नाही असे मला निश्चयाने वाटते ॥ २ ॥ राजन् भगवत्पुरुषैः प्रतिहतोद्यमाः याम्याः पतिं संयमिनीपतिं यमं विज्ञापयामासुः हे परीक्षित राजा विष्णुदूतांनी ज्यांच्या प्रयत्नाला अडथळा केला आहे असे यमदूत आपला स्वामी संयमिनीनगरीचा अधिपति अशा यमाला प्राथिते झाले ॥ ३ ॥ प्रभो इह त्रैविध्यं कर्म कुर्वतः जीवलोकस्य फलाभिव्यक्तिहेतवः शास्तारः कतिसन्ति महाराज ह्या जगात तीन प्रकारचे कर्म करणार्या प्राणीसमूहाला फले प्राप्त करुन देण्यास कारणीभूत असे नियामक देव किती आहेत ॥ ४ ॥ यदि लोके दंडधारिणः शास्तारः बहवः स्युः तर्हि मृत्युः च अमृतं एव कस्य स्यातां वा कस्य न वा स्याताम् जर लोकामध्ये दंड करणारे शास्ते पुरुष पुष्कळ असतील तर दुःख आणि सुख निश्चयेकरुन कोणाला मिळतील अथवा कोणाला मिळणार नाहीत ॥ ५ ॥ किंतु इह बहूनाम् कर्मिणां इव शास्तृबहुत्वे यथा मंडलवर्तिनां तथा शास्तृत्वं उपचारः हि स्यात् जर ह्या लोकी कर्म करणार्या पुष्कळ प्राण्यांप्रमाणे पुष्कळ शास्ते असल्यास जसा मांडलिक राजांचा तसा शासनाचा अधिकार केवळ नावाचा मात्र होईल ॥ ६ ॥ अतः त्वं नृणां शुभाशुभविवेचनः सेश्वराणां भूतानां एकः अधीश्वरः शास्ता दण्डधरः म्हणून तू मनुष्यांच्या पुण्यपापाचा निर्णय करणारा अधिपतीसह सर्व प्राण्यांचा एकटा राजा शासन करणारा व दण्ड करणारा आहेस ॥ ७ ॥ तस्य ते दंडः विहतः अधुना लोके तत् न वर्तते ते आज्ञा चतुर्भिः अद्भुतैः सिद्धैः विप्रलंभिता त्या तुझे शासन भंग पावले आता लोकात ते चालत नाही तुझी आज्ञा चार अद्भुत सिद्ध पुरुषांनी मोडिली ॥ ८ ॥ ते अस्माभिः तव आदेशात् यातनागृहान् नीयमानं पातकिनं प्रसह्य पाशान् छित्वा व्यमोचयन् ते सिद्ध पुरुष आम्ही दूतांनी तुझ्या आज्ञेवरुन यातनांच्या घरास नेल्या जाणार्या पाप्याला बलात्काराने पाशांना तोडून मुक्त करते झाले ॥ ९ ॥ यदि नः क्षमं मन्यसे तर्हि तान् ते वेदितुं इच्छामि नारायण इति अभिहिते मा भैः इति ( ते ) द्रुतं आययुः जर आम्हाला योग्य आहे असे तुला वाटत असेल त्या सिद्ध पुरुषांना आम्ही तुझ्यापासून जाणण्याची इच्छा करितो हे नारायणा असे म्हणताच भिऊ नको असे म्हणून ते तात्काळ आले ॥ १० ॥ इति आपॄष्टः देवः प्रजासंयमनः सः यमः प्रीतः हरेः पादांबुजं स्मरन् स्वदूतान् प्रत्याह याप्रमाणे प्रश्न केलेला देव प्रजेचे नियमन करणारा तो यम संतुष्ट होत्साता परमेश्वराच्या चरणकमळाला स्मरुन आपल्या दूतांना उत्तर देता झाला ॥ ११ ॥ मदन्यः जगतः च तस्थुषः (अधीश्वरः) परः यत्र विश्वं पटवत् ओतं प्रोतं (अस्ति) यदंशतः अस्य स्थितिजन्मनाशाः (भवन्ति) च नसि ओतवत् लोकः यस्य वशे (वर्तते) माझ्याहून निराळा जंगम आणि स्थावर जगाचा स्वामी दुसरा आहे जेथे हे विश्व वस्त्रातील तंतूप्रमाणे आडवे व उभे भरलेले आहे ज्याच्या ब्रह्मा, विष्णु, महेश या अंशापासून ह्या जगाची स्थिति, उत्पत्ति व संहार ही होतात आणि नाकात वेसण टोचल्याप्रमाणे हा सर्व लोक ज्याच्या स्वाधीन आहे ॥ १२ ॥ यः जनान् नामभिः निजायां वाचि गाः दामभिः तन्त्यां इव बध्नाति नामकर्मनिबन्धबन्धाः ते इमे चकिताः यस्मै बलिं वहंति जो लोकांना नावांनी आपल्या वेदरुप वाणिच्या ठिकाणी बैल दाव्यांनी दावणीत बांधावे त्याप्रमाणे बांधतो नावे व कर्मे यांनी अत्यंत जखडून बांधलेले ते हे जीव भयभीत होत्साते ज्याला पूजा अर्पण करितात ॥ १३ ॥ अहं महेंद्रः निर्ऋतिः प्रचेताः सोमः अग्निः ईशः पवनः अर्कः विरिञ्चः आदित्यविश्वे वसवः अथ साध्याः मरुद्गणाः ससिद्धाः रुद्रगणाः अन्ये च ये विश्वसृजः अमरेशाः अस्पृष्टरजस्तमस्काः सत्त्वप्रधानाः भृग्वादयः यस्य ईहितं न विदुः ततः स्पृष्टमायाः अन्ये किं (विदुः) मी देवेंद्र,निर्ऋति, वरुण, सोम व अग्नि शंकर, वायु, सूर्य, ब्रह्मदेव, द्वादशादित्य व विश्वेदेव वसु आणि साध्य मरुद्गण व सिद्धांसह रुद्रगण दुसरे आणखी जे प्रजापति मोठमोठे देव ज्यांना रजोगुण व तमोगुण स्पर्श करीत नाही असे सत्त्वगुण ज्यात मुख्य आहे असे भृगु आदि ऋषि ज्याच्या मनातील गोष्ट जाणत नाहीत तर मग मायेने स्पर्श केलेले दुसरे कोठून जाणणार ॥ १४-१५ ॥ असुभृतः यं आत्मना अंतर्हृदि (सन्तं) आत्मानं यथा एव आकृतयः ततः परं चक्षुः (न विचक्षते तथा) वै गोभिः मनसा वा असुभिः हृदा गिरा न विचक्षते प्राणी ज्या स्वतःच्या हृदयात असणार्या आत्म्याला जशा खरोखर आकृत्या आपल्याहून भिन्न असलेल्या नेत्राला पाहू शकत नाहीत तसे निश्चयेकरुन इंद्रियांच्या योगे मनाने किंवा प्राण्यांच्या योगाने हृदयाने व वाणीने पाहू शकत नाहीत ॥ १६ ॥ तस्य आत्मतन्त्रस्य अधीशितुः परस्य मायाधिपतेः महात्मन हरेः मनोहराः तद्रृपगुणस्वभावाः दूताः इह प्रायेण वै चरंति त्या स्वतःच्या तंत्राने वागणार्या वरिष्ठ शासनकर्ता श्रेष्ठ मायेचा अधिपति व महासमर्थ अशा परमेश्वराचे मनोहर असे त्याच्या सारखे रुप, गुण व स्वभाव ज्यांचे आहेत असे दूत ह्या जगात बहुधा फिरत असतात ॥ १७ ॥ अथ सुरपृजितानि दुर्दर्शलिंगानि महाद्भुतानि विष्णोः भूतानि तद्भक्तिमतः मर्त्यान् मत्तः च परेभ्यः च सर्वतः रक्षति आणि देवांनी पूजिलेले ज्यांच्या मूर्ति दृष्टीस पडणे अत्यंत दुर्लभ असे परम अद्भुत असे विष्णूचे दूत परमेश्वराची भक्ति करणार्या मनुष्यांना माझ्यापासून आणि दुसर्यापासून आणि सर्वापासून राखितात ॥ १८ ॥ ऋषयः साक्षात् भगवत्प्रणीतं धर्मं तु वै न विदुः देवाः अपि न (विदुः) सिद्धमुख्याः असुराः मनुष्याः न (विदुः) च विद्याधरचारणादयः कुतः (विदुः) ऋषि साक्षात भगवंताने सांगितलेल्या धर्माला तर खरोखर जाणत नाहीत देवसुद्धा जाणत नाहीत मुख्य सिद्ध, असुर व मनुष्य जाणत नाहीत तर मग विद्याधर, चारण इत्यादिक कोठून जाणणार ॥ १९ ॥ भटाः स्वयंभूः नारदः शंभुः कुमारः कपिलः मनुः प्रल्हादः जनकः भीष्मः बलिः वैयासकिः वयं एते द्वादश गुह्यं विशुद्धं दुर्बोधं भागवतं धर्मं विजानीमः यं ज्ञात्वा अमृतं अश्नुते दूत हो ब्रह्मदेव,नारद,शंकर,कार्तिकस्वामी,कपिलमहामुनी व मनु प्रल्हाद,जनक,भीष्म,बलि,शुकाचार्य व आम्ही हे बाराजण गुह्य, अत्यंत शुद्ध, समजण्यास कठीण अशा ईश्वरासंबंधी धर्माला जाणतो ज्याला जाणल्याने मुक्ति उपभोगितो ॥ २०-२१ ॥ भगवति तन्नामग्रहणादिभिः भक्तियोगः अस्मिन् लोके एतावान् एव पुंसा परः धर्मः स्मृतः परमेश्वराच्या ठिकाणी त्याच्या नामग्रहणादि उपायांनी भक्तियोग मिळविणे ह्या लोकांमध्ये एवढाच पुरुषांचा श्रेष्ठ धर्म सांगितला आहे ॥ २२ ॥ पुत्रकः हरेः नामोच्चारणमाहात्म्यं पश्यत येन एव अजामिलः अपि मृत्युपाशात् अमुच्यत बाळांनो परमेश्वराच्या नामोच्चारणाचे माहात्म्य पहा ज्याच्या योगानेच अजामिळसुद्धा मृत्युच्या पाशातून मुक्त झाला ॥ २३ ॥ भगवतः गुणकर्मनाम्नां एतावता पुंसां अघनिर्हरणाय अलं यत् अघवान् अजामिलः अपि म्रियमाणः पुत्रं नारायण इति विक्रुश्य मुक्ति इयाय परमेश्वराच्या गुणांचे व चरित्रांचे आणि नावांचे संकीर्तन हे एवढे पुरुषांच्या पापांचा नाश करण्यास समर्थ आहे कारण पापी अजामिळ सुद्धा मरणोन्मुख झाला असता मुलाला नारायण अशी हाक मारुन मुक्तीला गेला ॥ २४ ॥ बत देव्या मायया अलं विमोहितमतिः मधुपुष्पितायां त्रय्यां जडीकृतमतिः वैतानिके महति कर्मणि वियुज्यमानः अयं महाजनः प्रायेण तत् इदं न वेद शिवाय मायादेवीने पूर्णपणे ज्याची बुद्धि मोहित झाली आहे असा मधुररीतीने फुलविलेल्या वेदवचनाविषयी ज्याची बुद्धी जड होऊन गेली आहे असा यज्ञासंबंधी मोठ्या कर्माच्या ठिकाणी गुंतलेला हा सत्पुरुषसमुदाय बहुधा ते हे जाणीत नाही ॥ २५ ॥ सुधियः एवं विमृश्य अनन्ते भगवति सर्वात्मना खलु भावयोगं विदधते ते मे दंडं न अर्हति अथ अमीषां पातकं यदि स्यात् तत् अपि उरुगायवादः हति बुद्धिमान पुरुष याप्रमाणे विचार करुन अनंतशक्ति परमेश्वराच्या ठिकाणी एकचित्ताने भक्तियोग निश्चयेकरुन आचरितात ते माझ्या शासनाला पात्र होत नाहीत कदाचित ह्यांच्या हातून पातक जर झाले ते सुद्धा परमेश्वराचे नामस्मरण नष्ट करिते ॥ २६ ॥ ये साधवः समदृशः भगवत्प्रपन्नाः ते देवसिद्धपरिगीतपवित्रगाथाः (सन्ति) हरेः गदया अभिगुप्तान् तान् न उपसीदत एषां दंडे वयं न प्रभवाम च वयः न जे साधु सर्व भूतांवर समानदृष्टि ठेवणारे भगवंताला शरण जातात ते देव व सिद्ध यांनी ज्यांची पवित्र कीर्ति गाइली आहे असे होत परमेश्वराच्या गदेने रक्षिलेल्या अशा त्यांना त्रास देऊ नका ह्यांच्या दंडाविषयी आम्ही समर्थ नाही आणि काळ समर्थ होत नाही ॥२७ ॥ अजस्त्र निष्किंचनैः रसज्ञैः परमहंसकुलैः जुष्टात् पादारविंदमकरंदरसात् विमुखान् नरकवर्त्मनि गृहे बद्धतृष्णान् तान् असतः आनयध्वं नित्य सर्वसंगपरित्यागी अशा रस जाणणार्या परमहंससमुदायांनी सेविलेल्या ईश्वराच्या चरणकमलातील मकरंदापासून तोंड फिरविलेल्या नरकाचा मार्ग अशा गृहावर दृढ आशा ठेविलेल्या त्या दुर्जनांना तुम्ही आणा ॥२८ ॥ यत् जिव्हा भगवद्गुणनामधेयं न वक्ति च (यत्) चेतः तच्चरणारविंदं न स्मरति (यत्) शिरः एकदा अपि कृष्णाय न नमति तान् अकृतविष्णुकृत्यान् असतः आनयध्वं ज्याची जीभ परमेश्वराचे गुण व नामे वर्णीत नाही आणि ज्याचे मन परमेश्वराचे चरणकमल स्मरत नाही ज्याचे मस्तक एकदा सुद्धा परमेश्वराला नमत नाही त्या विष्णूची पूजा न करणार्या दुर्जनांना तुम्ही आणा ॥ २९ ॥ नः स्वपुरुषैः यत् असत् कृतं तत् सः भगवान् पुराणः पुरुषः नारायणः क्षम्यतां अहो रचितांजलीनां स्वानां क्षांतिः गरीयसि विदुषां (एव क्षांति) न भूम्ने पुरुषाय नमः आमच्या स्वतःच्या दूतांनी जे वाईट कृत्य केले ते तो ऐश्वर्यसंपन्न पुराणपुरुष नारायण क्षमा करो अहो हात जोडलेल्या स्वतःच्या भक्तांना क्षमा करणे हे समर्थांच्या ठिकाणी केवळ विद्वानांवर क्षमा करणे हे युक्त नाही सर्वव्यापी परमेश्वराला नमस्कार असो ॥ ३० ॥ तस्मात् कौरव्य जगन्मंगलं विष्णोः संकिर्तनं महतां अपि अंहसां ऐकांतिकनिष्कृतं विद्धि त्याकरिता हे परीक्षिता जगाचे कल्याण करणारे परमेश्वराचे संकीर्तन मोठ्यासुद्धा पातकांचे निश्चित प्रायश्चित जाण ॥ ३१ ॥ उद्दामानि हरेः वीर्याणि मुहुः शॄण्वतां गृणतां आत्मा यथा सुजातया भक्त्या शुद्ध्येत् व्रतादिभिः न परमेश्वराच्या सुंदर पराक्रमांना वारंवार ऐकणारांचा कीर्तन करणारांचा आत्मा जसा चांगल्या उत्पन्न झालेल्या भक्तीने शुद्ध होतो व्रतांदिकांच्या योगाने होत नाही ॥ ३२ ॥ कृष्णांग्रिपद्ममधुलिट् पुनः वृजिनावहेषु विसृष्ट मायागुणेषु न रमते अन्यः तु कामहतः आत्मरजः प्रमार्ष्टु कर्म ईहेत यतः एव पुनः रजः स्यात् परमेश्वराच्या चरणकमलासंबंधी मकरंद सेवन करणारा पुनः पापकारक अशा टाकिलेल्या मायेच्या विषयांच्या ठिकाणी रममाण होत नाही दुसरा तर विषयांनी गुंतविलेला आपल्या पापाला धुवून टाकण्यासाठी कर्म करु इच्छितो ज्यामुळे पुनः पाप उत्पन्न होते ॥ ३३ ॥ राजन् ते यमकिंकराः इत्थं स्वभर्तृगदितं भगवन्महित्वं संस्मृत्य विस्मितधियः न एव (जाताः) च ततः प्रभृति अच्युताश्रयजनं प्रतिशंकमानाः द्रष्टुं बिभ्यति स्म हे परीक्षित राजा ते यमाचे दूत याप्रमाणे आपल्या धन्याने सांगितलेले भगवंताचे माहात्म्य स्मरण करुन आश्चर्यचकित झालेच नाहीत आणि तेव्हापासून परमेश्वराचा आश्रय असणार्या जनांना हे आपल्याला शासन करतील की काय अशी भीति बाळगणारे पहावयास भितात ॥ ३४ ॥ मलये आसीनः हरिं अर्चयन् भगवान् कुंभसंभवः इमं गुह्यं इतिहासं कथयामास मलयपर्वतावर बसणारा व परमेश्वराला पूजणारा ऐश्वर्यसंपन्न कुंभापासून ज्याची उत्पत्ति आहे असा अगस्त्य ऋषि ह्या गुप्त इतिहासाला सांगता झाला ॥ ३५ ॥ षष्ठ स्कन्धः - अध्याय तिसरा समाप्त |