|
श्रीमद् भागवत महापुराण
षष्ठ स्कंध - अध्याय १ ला - अन्वयार्थ
अजामिळ-उपाख्यानाचा प्रारंभ - आदौ भगवता निवृत्तिमार्गः यथा कथितः, यत् क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा असंसृतिः पूर्वी ऐश्वर्यसंपन्न अशा आपल्याकडून न्वृत्तिमार्ग पूर्णपणे सांगितला गेला, ज्यामुळे क्रमयोगानें प्राप्त झालेल्या ब्रह्म्यासह मोक्ष प्राप्त होतो; ॥ १ ॥ मुने, एव च त्रैगुण्यविषयः यः असौ अलीनप्रकृतेः पुनःपुनः गुणसर्गः प्रवृत्तिलक्षणः हे मुने, आणखीही त्त्रिगुणापासून उत्पन्न होणारे स्वर्गसुख हाच ज्याचा विषय आहे असा जो हा प्रकृति लीन न झाल्यामुळे वारंवार गुणांचा सर्ग हे ज्याचे लक्षण आहे असा प्रवृत्तिमार्ग सांगितला. ॥ २ ॥ च अधर्मलक्षणाः नाना नरकाः अनुवर्णिताः च यत् आद्यः स्वायंभुवः मन्वन्तरः व्याख्यातः ; आणि ज्यात अधर्म आहे असे पुष्कळ नरक कथन केले गेले आणि ज्यात पहिला स्वायंभुव मनु आहे असे मन्वंतर सांगितले गेले; ॥ ३ ॥ च प्रियव्रतोत्तानपदोः वंशः तच्चरितानि द्वीपवर्षसमुद्राद्रिनद्युद्यानवनसपतीन् धरामंडलसंस्थानं च ज्योतिषां विवराणां यथा विभुः भागलक्षणमानतः असृजत् आणि प्रियव्रत व उत्तानपाद यांचा वंश व त्यांची चरित्रे कथन केली गेली, द्वीप, खंडे, समुद्र नद्या, बागा, वनस्पति, भूमंडलाची रचना आणि आकाशातील गोलांची व पातालांची रचना, जशी परमेश्वर भागांच्या लक्षणांनी व लांबीरुंदीच्या प्रमाणाने करिता झाला. ॥ ४-५ ॥ महाभाग, अधुना नरः इह यथा नानोग्रयातनान् नरकान् न इयात् तत् एव मे व्याख्यातुं अर्हसि अहो महाराज, सांप्रत मनुष्य या लोकी जेणेकरून अनेक भयंकर यातनांनी युक्त अशा नरकाप्रत जाणार नाही तेच ते मला तू आंगण्यास योग्य आहेस. ॥ ६ ॥ इह एव मनउक्तिपाणिभिः कृतस्य अंहसः अपचितिं यथावत् न कुर्यात् चेत् स वै प्रेत्य नरकान् ध्रुवं उपैति, ये तिग्मयातनाः मे भवतः कीर्तिताः ह्या लोकीच मन, वाणी व हात यांनी केलेल्या पापाचे प्रायश्चित्त जसे सांगितले असेल तसे मनुष्य जर करणार नाही तर खरोखर मरणोत्तर त्या नरकांना निस्संषय प्राप्त होतो, जे भयंकर यातनांनी युक्त असे माझ्याकडून तुला सांगितले गेले. ॥ ७ ॥ तस्मात् इह मृत्योः पुरा एवं अविद्यता आत्मना पापनिष्कृतौ यथा रुजां निदानवित् भिषक् चिकित्सेत दोषस्य गुरुलाघवं दृष्ट्वा आशु यतेत त्याकरिता ह्या लोकात मृत्यूच्या पूर्वीच याप्रमाणे क्षीण न देहाने पापाच्या प्रायश्चित्ताविषयी, जसा रोगाचे निदान जाणणारा वैद्य उपाय योजितो, तसेच पापाचा लहान-मोठेपणा पाहून त्वरित प्रयत्न करावा. ॥ ८ ॥ दृष्टश्रुताभ्यां पापं आत्मनः अहितं जानन् अपि विवशः यत् भूयः करोति अथो प्रायश्चित्तां कथं पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टींवरून पाप स्वतःचे अकल्याण आहे असे जाणून सुद्धा मनुष्य पराधीन होत्साता ज्याअर्थी पुनः पुनः ते पाप करतो त्याअर्थी त्याला प्रायश्चित्त कसे काय होणार ? ॥ ९ ॥ क्वचित् अभद्रात् निवर्तते, क्वचित् तत् पुनः चरति, अतः प्रायश्चित्तं कुंजरशौचवत् अपार्थं मन्ये कधी पातकापासून परावृत्तः होतो, कधी तेच पापकृत्य परत आचरतो, म्हणून प्रायश्चित्त हे हत्तीला धुण्यासारखे निरर्थक असे मी मानतो. ॥ १० ॥ अविद्वदधिकारित्वात् कर्मणा कर्मनिर्हारः आत्यंतिकः नहि इष्यते, प्रायश्चित्तं विमर्शनम् अविद्वानांना प्रायश्चित्ताचा अधिकार दिल्यामुळे प्रायश्चित्ताने पापरूप कर्मांचा नाश समूळ होतो असे मानले जात नाही; खरे प्रायश्चित्त म्हटले तर ज्ञान हेच होय. ॥ ११ ॥ राजन्, पथ्यं एव अन्नं अश्नुतः व्याधयः न हि अभिभवन्ति, एवं नियमकृत् शनैः क्षेमाय कल्पते हे राजा, पथ्यकारक असेच अन्न भक्षण करणार्याला रोग खरोखर होत नाहीत, याप्रमाणे नियमांचे आचरण करणारा हळूहळू कल्याणप्रद योग्य होतो. ॥ १२ ॥ धीराः धर्मज्ञाः श्रद्धया अन्विताः तपसा ब्रह्मचर्येण च शमन दमेन त्यागेन सत्यशौचाभ्यां च यमेन च नियमेन देहवाग्बुद्धिजं महत् अपि अघं अनलः वेणुगुल्मं इव क्षिपन्ति धीर व धर्म जाणणारे आस्तिक्यबुद्धीने युक्त पुरुष तपश्चर्येनें व ब्रह्मचर्यानें आणि मनाच्या आकलनाने, इंद्रियनिग्रहाने व दानाने सत्य व शुद्धता यांनी आणि यमाने आणि नियमाने शारीर वाणी व बुद्धि यापासून उत्पन्न होणारे मोठेही पाप अग्नि वेळूच्या बेटाला जसे त्याप्रमाणे दूर करतात. ॥ १३-१४ ॥ केचित् वासुदेवपरायणाः केवलया भक्त्या भास्करः नीहारं इव कार्त्स्येन अघं धुन्वन्ति कोणी ईश्वराचे निस्सीम भक्त केवळ भक्तीने सूर्य धुक्याला जसे, तसे पूर्णपणे पापाला दूर करतात. ॥ १५ ॥ राज हि यथा कृष्णार्पितप्राणः तत्पुरुषनिषेधया पूयेत तथा अघवान् तप आदिभिः न पूयेत हे राजा, यास्तव जसा कृष्णाला प्राण अर्पण करणारा भगवद्भक्तांच्या सेवेने पवित्र होतो, त पापी मनुष्य तपश्चर्यादि उपायांनी पवित्र होत नाही. ॥ १६ ॥ हि लोके अयं पंथाः अकुतोभयः क्षेमः अघ्रीचीनः यत्र सुशीलाः साधवः नारायणपरायणाः खरोखर लोकामध्ये हा भक्तीचा मार्ग निर्भय, उत्तम कल्याणकारक, ज्यात सुस्वभावाचे साधु लोक परमेश्वराचे निस्सीम भक्त असतात; ॥ १७ ॥ राजेंद्र, वीर्याणि प्रायश्चित्तानि नारायणपराङ्मुखं आपगा सुराकुंभं इव न निष्पुनन्ति हे रार्वभौम राजा, आचरण केलेली प्रायश्चित्ते परमेश्वराकडे पाठ फिरविलेल्या मनुष्याला, जशा नद्या मद्याच्या घटाला, त्याप्रमाणे सर्वथा पवित्र करीत नाहीत. ॥ १८ ॥ हि इह तद्गुणरागि मनः कृष्णपदारविन्दयोः सकृत् निवेशितं ते चीर्णनिष्कृताः यमं च पाशभृतः तद् भटान् स्वप्ने अपि न पश्यन्ति कारण, यालोकी परमेश्वराच्या गुणांवर प्रेम करणारे मन परमेश्वराच्या चरणकमलांच्या ठिकाणी एकवार ठेवले असता ते, ज्यांनी सर्व प्रायश्चित्ते केली आहेत असे यमाला आणि पाश धारण करणार्या त्याच्या दूतांना स्वप्नांतसुद्धा पहात नाहींत. ॥ १९ ॥ अत्र च इमं पुरातनं इतिहासं उदाहरन्ति विष्णुयमयोः दूतानां संवादः, तं मे निबोध आणि याविषयी हा प्राचीन इतिहास सांगत असता विष्णु व यम यांच्या दूतांचा संवाद आहे, तो संवाद माझ्याकडून ऐकून घे. ॥ २० ॥ कान्यकुब्जे कश्चित् द्विजः नाम्ना अजामिलः दासीपतिः नष्टसदाचारः दास्याः संसर्गदूषितः आसीत् कान्यकुब्ज देशात अजामिळ नावाचा कोणी ब्राह्मण दासीचा स्वामी झालेला , सदाचरण सोडलेला, दासीच्या समागमाने दूषित झालेला होता. ॥ २१ ॥ बंधक्षकैतवैः चौर्यैः गर्हितां वृत्तिं आस्थितः कुटुंबं बिभ्रत् देहिनः यातयामास लोकांना बांधून त्यांचे द्रव्य हरण करणे, जुगार व फसवेगिरी यांनी, चौर्यकर्मांनी, निंद्य अशा वर्तनाने राहणारा होत्साता, परिवाराला पोसणारा, प्राण्यांना पीडा देत असे. ॥ २२ ॥ राजन्, एवं निवसतः तत्सुतान् लालयानस्य तस्य आयुषः अष्टाशीतति समाः महान् कालः अत्यगात् हे राजा, याप्रमाणे राहणार्या त्या दासीच्या मुलांना खेळविणार्या त्या अजामिळाच्या आयुष्याचा अठ्ठ्याऐंशी वर्षे इतका मोठा काळ निघून गेला. ॥ २३ ॥ प्रवयसं तस्य दश पुत्राः तेषां तु यः अवमः बालः नारायणः नाम्ना च पित्रोः भृशं दयितः अभवत् अत्यंत वृद्ध अशा त्या अजामिळाला दहा मुलगे होते, त्या सर्वांत तर जो कनिष्ठ होता, नारायण नावाने अल्पवयी आणि आईबापांचा अत्यंत लाडका असे. ॥ २४ ॥ तस्मिन् कलभाषिणि अर्भके बद्धहृदयः सः जरठः तल्लीलां निरीक्षमाणः भृशं मुमुदे त्या मधुर भाषण करणार्या बालकाच्या ठिकाणी ज्याचे मन बसले आहे असा तो म्हातारा त्या बालकाचा खेळ पाहणारा अतिशय आनंदित होत असे. ॥ २५ ॥ बालकस्नेहयंत्रितः मूढः भुंजानः प्रपिबन् खादन् भोजयन् पायजन् आगतं अन्तकं न वेद मुलाच्या प्रेमाने बद्ध झालेला तो मूर्ख स्वतः भोग भोगीत पीत खात असता मुलाला जेऊ घालीत , पाजीत, आलेल्या मृत्यूला जाणता झाला नाही. ॥ २६ ॥ एवं वर्तमानः अज्ञः सः मृत्यूकाले उपस्थिते बाले नारायणाह्वये तनये मतिं चकार याप्रमाणे वागणारा तो मूर्ख अजामिळ मृत्यूकाळ प्राप्त झाला असता लहान अशा नारायण नावाच्या मुलाच्या ठिकाणी मन लाविता झाला. ॥ २७ ॥ सः पाशहस्तान् भृशदारुणान् वक्रतुंडान् ऊर्ध्वरोम्णः आत्मानं नेतुं आगतान् त्रीन् पुरुषान् दृष्ट्वा तो अजामिळ हातात पाश असलेल्या, अत्यंत भयंकर अशा, वाकडी तोंडे असलेल्या, ज्यांच्या अंगावरील केस उभारलेले आहेत अशा स्वतःला नेण्याकरिता आलेल्या तीन पुरुषांना पाहून; ॥ २८ ॥ आकुलेन्द्रियः दूरे क्रीडनलासक्तं नारायणाह्वयं पुत्र प्लावितेन स्वरेण उच्चैः आजुहाव व्याकुळ इंद्रिये झालेला, लांब खेळण्यात गुंग असलेल्या नारायण नावाच्या मुलाला उंच अशा स्वराने मोठमोठ्याने हाका मारू लागला ॥ २९ ॥ महराज, म्रियमाणस्य तस्य हरिकीर्तनं ब्रुवतः पार्षदाः भर्तुः नाम निशम्य सहसा अपतन् हे परीक्षित राजा, मरणोन्मुख झालेला तो परमेश्वराची स्तुति गात असता विष्णुदूत आपल्या स्वामीचे नाव श्रवण करून अकस्मात् येऊन पोहोचले, ॥ ३० ॥ विष्णुदूताः दासीपतिं अजामिलं अंतर्हृदयात् विकर्षतः यमप्रेष्यान् ओजसा वारयामासु विष्णूचे दूत दासीचा स्वामी अशा अजामिळाला हृदयाच्या आतूल ओढून काढणार्या यमदूतांना आपल्या प्रभावाने निवारिते झाले, ॥ ३१ ॥ निषेधिताः ते वैवस्वतपुरःसरा तान् ऊचुः, धर्मराजस्य शासनं प्रतिषेद्धारः यूयं के प्रतिबंध केलेले ते यमदूत त्या विष्णुदूतांना म्हणाले, यमाच्या आज्ञेला प्रतिबंध करणारे तुम्ही कोण ? ॥ ३२ ॥ षष्ठ स्कन्धः - अध्याय पहिला समाप्त |