श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय २६ वा - अन्वयार्थ

नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन -

महर्षे एतत् लोकस्य वैचित्र्यं कथं इति हे महामुने, हे त्रैलोक्यामध्ये आश्‍चर्यकारक अनेक भेद कसे असे ॥१॥

श्रद्धया कर्तुः त्रिगुणत्वात् कर्मगतयः पृथग्विधाः सर्वाः एव सर्वस्य तारतम्येन भवन्ति श्रद्धेने कर्म करणार्‍याच्या तीन गुणांनी युक्त असल्यामुळे अनेकप्रकारच्या कर्मांच्या गति सर्वच सर्व प्राणिमात्रांस न्यूनाधिकपणाने फलित होतात. ॥२॥

अथ इदानीं प्रतिषिद्धलक्षणस्य अधर्मस्य कर्तुः तथा एव श्रद्धायाः वैसादृश्यात् कर्मफलं विसदृशं भवति या हि अनाद्यविद्यया कृतकामानां तत्परिणामलक्षणाः सहस्रशः सृतयः प्रवृत्ताः (सन्ति) तासां प्राचुर्येण अनुवर्णयिष्यामः आता सांप्रत ज्याच्या आचरणाविषयी निषेध केला आहे अशा अधर्माच्या कर्त्याला त्याप्रमाणेच श्रद्धेच्याच निरनिराळेपणामुळे कर्माचे फळ निराळे होते जी श्रद्धा खरोखर अनादिकालसिद्ध अशा मायेने प्राप्त झालेल्या उपभोगाच्या त्यांच्या परिणामांवरून समजून येणार्‍या हजारो गति उत्पन्न झालेल्या आहेत, त्याचे विस्ताराने वर्णन करितो. ॥३॥

भगवन् नरकाः नाम देशविशेषाः किं अथवा (ते) त्रिलोक्याः बहिः आहोस्वित् अंतराले इति हे शुकाचार्या, काय नरक नावाचे निरनिराळे देश आहेत किंवा ते त्रैलोक्याच्या बाहेर आहेत, किंवा अंतराळी आहेत असे ॥४॥

त्रिजगत्याः तु अंतराले एव दक्षिणस्यां दिशि भूमेः अधस्तात् च जलात् उपरिष्टात् यस्यां दिशि अग्निष्वात्तादयः पितृगणाः परमेण समाधिना स्वानां गोत्राणां सत्याः एव आशिषः आशासानाः निवसन्ति त्रैलोक्याच्या तर अंतरिक्षातच दक्षिण दिशेकडे पृथ्वीच्या खाली आणि पाण्याच्या वरती ज्या दिशेकडे अग्निष्वात्त वगैरे पितृगण श्रेष्ठ अशा समाधियोगाने स्वकीय कुळातील लोकांना सत्य असेच आशिर्वाद देण्याची इच्छा करणारे राहतात. ॥५॥

यत्र ह वाव अनुल्लंघितभगवच्छासनः सगणः भगवान् पितृराजः वैवस्वतः स्वपुरुषैः स्वविषयं प्रापितेषु संपरेतेषु जंतुषु यथा कर्मावद्यं दोषम् एव दमं धारयति जेथे खरोखर परमेश्वराची आज्ञा न मोडणारा दूतांसह सर्वगुणसंपन्न पितरांचा राजा सूर्यपुत्र यम आपल्या पुरुषांकडून आपल्या देशाला आणिलेल्या मृत झालेल्या प्राण्यांच्या ठिकाणी कर्माच्या निंद्यपणाला अनुरूप दोषालाच उद्देशून शिक्षा देतो. ॥६॥

तत्र ह एके नरकान् एकविंशतिं गणयन्ति राजन् अथ ते तान् नामरूपलक्षणतः अनुक्रमिष्यामः तामिस्रः अंधतामिस्रः रौरव महारौरव कुम्भीपाकः कालसूत्रम् असिपत्रवनं सूकरमूखं अंधकूपः कृमिभोजनः संदंशः तप्तसूर्मिः वज्रकंटकशाल्मली वैतरणी पूयोदः प्राणरोधः विशसनं लालाभक्षः सारमेयादनम् अवीचिः अयःपानं इति किं च क्षारकर्दमः रक्षोगणभोजनः शूलप्रोतः दंदशूकः अवटनिरोधनः पर्यावर्तनः सूचीमुखम् इति अष्टाविंशतिनरकाः विविधयातनाभूमयः (सन्ति) त्यात कित्येक लोक नरक एकवीस आहेत असे वर्णितात, हे राजा, आता तुला त्या नरकांची नावे, स्वरूपे व लक्षणे या क्रमाने सांगतो, तामिस्र, अंधतामिस्र, रौरव, महारौरव, कुम्भीपाक, कालसूत्र, असिपत्रवन, सूकरमुख, अंधकूप, कृमिभोजन, संदंश, तप्तसूर्मिं, वज्रकंटशाल्मली, वैतरणी, पूयोद, प्राणरोध, विशसन, लालाभक्ष, सारमेयादन, अवीचि व अयःपान असे आणखीहि क्षारकर्दम, रक्षोगणभोजन व शूलप्रोत, दंदशूक, अवटनिरोधन, पर्यावर्तन व सूचीमुख याप्रमाणे अठठावीस नरक हे अनेक यातना भोगण्याचे प्रदेश होत. ॥७॥

तत्र यः तु परवित्तापत्यकलत्राणि अपहरति सः हि कालपाशबद्धः अतिभयानकैः यमपुरुषैः तामिस्रे नरके बलात् निपात्यते यत्र तामिस्रप्राये अनशनानुदपानदंडताडनसंतर्जनादिभिः यातनाभिः यात्यमानः जंतुः कश्‍मलम् आसादितः एकदा एव मूर्च्छां उपयाति त्यापैकी जो पुरुष तर दुसर्‍याचे द्रव्य, पुत्र व स्त्री लुबाडतो, तो खरोखर कालाच्या पाशाने बांधलेला अत्यंत भयंकर यमदूतांनी तामिस्र नावाच्या नरकात बलात्काराने टाकिला जातो, ज्या अंधकारमय तामिस्र नरकात उपवास, पाणी पिण्यास न देणे, दंडाने मारणे, भीति घालणे इत्यादि यातनांनी पीडिला जाणारा प्राणी दुःखाला पावलेला एकदमच मूर्च्छेला प्राप्त होतो. ॥८॥

एवम् एव यः तु पुरुषं वञ्चयित्वा दारादीन् उपयुंक्ते (सः) अंधतामिस्रे पतति यत्र निपात्यमानः यातनास्थः शरीरी यथा वृश्‍च्यमानमूलः वनस्पतिः (तथा) वेदनया नष्टमतिः च नष्टदृष्टिः भवति तस्मात् तं अंधतामिस्रम् उपदिशन्ति याप्रमाणेच जो तर पुरुषाला फसवून स्त्री इत्यादिकांना उपभोगितो, तो अंधतामिस्र नरकात पडतो, जेथे पाडिला जाणारा व यातना भोगीत असणारा शरीरधारी ज्याप्रमाणे मूळ तोडलेला मोठा वृक्ष त्याप्रमाणे दुःखाने ज्याची बुद्धि गुंग झाली आहे असा आणि आंधळा होतो, म्हणून त्या नरकाला अंधतामिस्र असे नाव देतात. ॥९॥

वा यः तु इह एतत् अहम् इति मम इदम् इति भूतद्रोहेण केवलं स्वकुटुम्बम् एव अनुदिनं प्रपुष्णाति सः तत् इह विहाय स्वयम् एव तदशुभेन रौरवे पतति अथवा जो पुरुष तर ह्या लोकी हे मी असे माझे हे असे समजून प्राण्यांशी वैर करून केवळ आपल्या कुटुंबालाच दररोज विशेष पोषितो, तो पुरुष ते येथेच सर्व टाकून देऊन स्वतःच त्या अशुभ कर्माने रौरव नरकात पडतो. ॥१०॥

ये तु इह यथा एव अमुना विहिंसिताः जन्तवः परत्र यमयातनाम् उपगतं ते एव रुरवः भूत्वा तथा तम् एव विहिंसन्ति तस्मात् रौरवम् इति आहुः रुरुः इति सर्पात् अतिक्रूरसत्त्वस्य अपदेशः (अस्ति) जे तर येथे अगदी जशारीतीने ह्याने मारिलेले प्राणी परलोकी यमयातनेला प्राप्त झालेल्या पुरुषाला तेच प्राणी रुरुनामक सर्पाच्या स्वरूपांना प्राप्त झालेले असे होऊन तशाच रीतीने त्यालाच पीडा देतात म्हणून रौरव असे म्हणतात रुरु असा सापाहून अत्यंत क्रूर प्राण्याचा वाचक शब्द आहे. ॥११॥

एवम् एव महारौरवः यः केवलं देहंभरः यत्र निपतितं तं पुरुषं क्रव्यादाः नाम रुरवः क्रव्येण घातयन्ति याप्रमाणेच महारौरवनामक नरक होय, जो केवळ स्वतःच्याच देहाचे पोषण करितो अशा ज्या नरकात पडलेल्या त्या पुरुषाला क्रव्यादनामक रुरु प्राणी मांसासाठी मारितात. ॥१२॥

वा यः तु इह उग्रः पशून् वा पक्षिणः प्राणतः उपरन्धयति तं पुरुषादैः अपि विगर्हितं अपकरुणं अमुत्र यमानुचराः कुंभीपाके तप्ततैले उपरन्धयन्ति अथवा जो पुरुष तर येथे क्रूरपणाने पशूंना किंवा पक्ष्यांना जिवंतपणे शिजवितो त्या मनुष्यमांस खाणार्‍या लोकांनीही निंदिलेल्या निर्दय प्राण्याला परलोकी यमदूत कुंभीपाकनामक नरकात तापलेल्या तेलामध्ये शिजवितात. ॥१३॥

इह यः तु पितृविप्रब्रह्मध्रुक् सः अयुतयोजनपरिमंडले ताम्रमये तप्तखले उपरि च अधस्तात् अग्न्यर्काभ्यां अतितप्यमानैः कालसूत्रसंज्ञके नरके अभिनिवेशितः क्षुत्पिपासाभ्यां दह्यमानान्तर्बहिःशरीरः यावन्ति पशुरोमाणि (सन्ति) तावद्वर्षसहस्राणि आस्ते शेते चेष्टते अवतिष्ठति च परिधावति ह्या लोकी जो पुरुष तर पिता, ब्राह्मण, व वेद यांचा द्वेष करितो दहा हजार ज्याचा विस्तार आहे अशा तांब्याच्या अंथरलेल्या तापलेल्या अंगणात वरती आणि खाली अग्नि व सूर्य यांनी अतिशय तापलेल्या कालसूत्र नावाच्या नरकात पाडिलेला भूक व तहान ह्यांनी जळत आहे आतून व बाहेरून शरीर ज्याचे असा पशूंच्या शरीरावर जितके केस आहेत तितकी हजार वर्षेपर्यंत रहातो, शयन करितो, लोळतो, उभा रहातो आणि धावत सुटतो. ॥१४॥

इह यः तु वै निजवेदपथात् अनापदि अपगतः च पाखंडं उपगतः तं असिपत्रवनं प्रवेश्य कशया प्रहरन्ति तत्र ह असौ इतस्ततः धावमानः उभयतो धारैः तालवनासिपत्रैः छिद्यमानसर्वांगः हा हतः अस्मि इति परमया वेदनया मूर्च्छितः पदेपदे निपतति स्वधर्महा पाखण्डानुगतं फलं भुङ्‌क्ते ह्या लोकी जो पुरुष तर खरोखर आपल्या वेदमार्गाहून आपत्काल नसताही दूर झालेला आणि पाखंडमार्गाला प्राप्त झालेला त्या असिपत्रवन नामक नरकात घालून चाबकाने मारतात तेथे खरोखर हा इकडूनतिकडे धावणारा दोन्ही बाजूने धार असणार्‍या तरवारीप्रमाणे तीक्ष्ण धार असणार्‍या ताडवनाच्या पानांनी ज्याचे सर्व अवयव छिन्नभिन्न झाले आहेत असा अरे मेलो रे मेलो असे म्हणून अत्यंत पीडेने मूर्च्छित होऊन पावलोपावली पडतो, स्वधर्माचा नाश करणारा पाखंडमार्गाला अनुरूप असे फळ भोगितो. ॥१५॥

इह यः तु वै राजा वा राजपुरुषः अदण्डये दण्डं वा ब्राह्मणे शरीरदण्डं प्रणयति सः पापीयान् अमुत्र सूकरमुखे नरके निपतति तत्र यथा एव इह इक्षुदण्डः अतिबलैः विनिष्पिष्यमाणावयवः आर्तस्वरेणस्वनयन् यथा एव इह अदृष्टदोषाः (प्राणिनः) उपरुद्धाः क्वचित् मूर्च्छिताः कश्‍मलं उपगतः (भवति) येथे जो पुरुष तर खरोखर राजा किंवा राजाचा आश्रित पुरुष दंड करण्यास अयोग्य अशाला शिक्षा किंवा ब्राह्मणाला फटके मारणे इत्यादि शरीरशिक्षा देतो, तो पापी पुरुष परलोकी सूकरमुख नामक नरकात पडतो. तेथे आपल्या इकडे जसे उसाचे कांडे तसे सामर्थ्यवान यमदूतांनी ज्याचे अवयव पिळून काढले आहेत असा करुणस्वराने ओरडणारा ज्याप्रमाणे ह्याने येथे निरपराधी प्राणी कोंडून ठेविले होते त्याप्रमाणे एकादे वेळी मूर्च्छा पावलेला असा होऊन दुःखाला प्राप्त होतो. ॥१६॥

दह यः तु वै स्वयं पुरुषोपकल्पितवृत्तिः विविक्तपरव्यथः ईश्वरोपकल्पितवृत्तीनां अविविक्तपरव्यथानां भूतानां व्यथां आचरति सः परत्र अंधकूपे तदभिद्रोहेण निपतति तत्र ह असौ पशुमृगपक्षिसरीसृपैः मशकयूकामत्कुणमक्षिकादिभिः ये के अभिद्रुग्धाः तैः जन्तुभिः सर्वतः अभिद्रुह्यमाण विहतनिद्रानिर्वृतिः अलब्धावस्थानः यथा कुशरीरे जीवः (तथा) तमसि परिक्रामति ह्या लोकी जो पुरुष तर खरोखर स्वतः पुरुषाच्या जन्मकर्मानुसार ज्याची उपजीविका ठरवून दिली आहे असा परदुःखाला जाणणारा परमेश्वराने ज्यांच्या उपजीविका सिद्ध करून दिल्या आहेत अशा परपीडेची ज्यांना मुळीच जाणीव नाही अशा प्राण्यांना पीडा करितो, तो परलोकी अंधकूप नामक नरकात त्या प्राण्यांचा छळ केल्याने पडतो, तेथे खरोखर हा प्राणी पशु, हरीण, पक्षी व साप यांसह डास, उवा, ढेकूण, माशा इत्यादिकांनी जे कोणी द्वेष केलेले त्या प्राण्यांकडून सर्वप्रकारे द्वेष केलेला असा ज्याचे झोपेचे सुख नष्ट झाले आहे असा ज्याला स्वस्थपण मिळत नाही असा रोगांनी ग्रासलेल्या शरीरांतील जीव जसा तसा अंधकूपनरकात भटकत फिरतो. ॥१७॥

इह अनिर्मितपञ्चयज्ञः यः तु वै यत् किंचन उपनतं असंविभाज्य अश्‍नाति अप्रत्ताप्रहुतादः वायससंस्तुतः सः परत्र कृमिभोजने नरकाधमे निपतति तत्र शतसहस्रयोजने कृमिकुंडे स्वयं कृमिभूतः कृमिभिः एव भक्ष्यमाणः कृमिभोजनः तत् यावत् अनिर्वेशं आत्मानं यातयते ह्या लोकी पञ्चमहायज्ञ ज्याने केला नाही असा जो तर खरोखर जे काही थोडेसे मिळालेले न विभागता खातो, होम केल्याशिवाय व दुसर्‍याला दिल्याशिवाय खाणारा कावळ्यासारखा मानिलेला तो परलोकी कृमिभोजन नामक नरकात पडतो, तेथे लाखो योजने अशा कृमिकुंडात स्वतः किडयाचे स्वरूप घेतलेला किडयांनीच खाल्ला जाणारा किडयांना भक्षण करणारा ते पातक जितकी वर्षे असेल तितकी वर्षे सुखाशिवाय स्वतःला पीडा करून घेतो. ॥१८॥

राजन् वै यः पुरुषः तु इह अनापदि ब्राह्मणस्य वा अन्यस्य हिरण्यरत्‍नादीनि स्तेयेन वा बलात् अपहरति तम् अमुत्र यमपुरुषाः अयस्मयैः अग्निपिण्डैः संदंशैः त्वचि निष्कुषन्ति हे राजा, खरोखर जो पुरुष तर ह्या लोकी आपत्काल नसताही ब्राह्मणाची किंवा दुसर्‍या कोणाची सुवर्ण, रत्‍ने इत्यादि चौर्य करून किंवा बलात्काराने लुबाडून नेतो त्याला परलोकी यमदूत अग्नीत तापविलेल्या लोखंडाच्या गोळ्यांनी किंवा अग्नितप्त अशा लोखंडी चिमटयांनी कातडी तोडतात. ॥१९॥

वै इह यः तु अगम्यां स्त्रियं वा योषित् अगम्यं पुरुषं अभिगच्छति ??????भिंच्छति तौ अमुत्र कशया ताडयन्तः यमदूताः तिग्मया लोहमय्या सूर्म्या पुरुषं च पुरुषरूपया सूर्म्या स्त्रियं आलिङ्‍गयन्ति खरोखर ह्या पृथ्वीवर जो पुरुष उपभोगण्यास अयोग्य अशा स्त्रीला किंवा जी कोणी स्त्री उपभोगण्यास अयोग्य अशा पुरुषाला उपभोगिते त्या दोघांना परलोकी चाबकाने मारणारे यमदूत तीक्ष्ण लोखंडाच्या मूर्तीशी पुरुषाला आणि पुरुषाकृती अशा मूर्तींशी स्त्रीला आलिंगन द्यावयास लावतात. ॥२०॥

वै इह यः तु सर्वाधिगमः तम् अमुत्र निरये वर्तमानं वज्रकण्टकशाल्मलीम् आरोप्य निष्कर्षन्ति खरोखर येथे जो पुरुष तर पशुपक्ष्यांदि सर्वांशी गमन करतो, त्याला परलोकी नरकात असताना वज्राप्रमाणे तीक्ष्ण धारा असणार्‍या काटयांनी युक्त अशा शेवरीच्या झाडावर चढवून फरफरा ओढितात. ॥२१॥

वै ये तु इह राजन्याः वा राजपुरुषाः पाखण्डाः धर्मसेतून् भिन्दन्ति ते संपरेत्य वैतरण्यां निपतन्ति भिन्नमर्यादाः तस्यां निरयपरिखाभूतायां विण्मूत्रपूयशोणितकेशनखास्थिमेदोमांसवसावाहिन्यां नद्यां यादोगणैः इतस्तः भक्ष्यमाणाः आत्मना च असुभिः न वियुज्यमानाः स्वाघेन उह्यमानाः कर्मपाकं अनुस्मरन्तः उपतप्यन्ते खरोखर जे पुरुष तर येथे राजे किंवा राजाचे अधिकारी पाखंडमार्गाने वागणारे धर्म मार्गांना उच्छेदितात ते मेल्यानंतर वैतरणीमध्ये पडतात, मोडिल्या आहेत धर्ममर्यादा ज्यांनी असे ते त्या नरकाभोवतीचा खंदक झालेल्या विष्टा, मूत्र, पूं, रक्त, केस, नखे, हाडे, चरबी, मांस, वसा ह्यांना वाहून नेणार्‍या वैतरणीमध्ये जलचरांनी इकडेतिकडे खाल्ले जाणारे आणि स्वतः प्राण्यांनी रहित न होणारे आपल्या पापाने वाहून नेले जाणारे कर्माच्या परिणामाला स्मरणारे पश्‍चाताप पावतात. ॥२२॥

वै इह ये तु वृषलीपतयः नष्टशौचाचारनियमाः त्यक्तलज्जाः पशुचर्यां चरन्ति ते च अपि प्रेत्य पूयविण्मूत्रश्‍लेष्ममलापूर्णार्णवे निपतन्ति तदेव अतिबीभत्सितम् अश्‍नन्ति खरोखर येथे जे पुरुष तर शूद्र स्त्रीशी गमन करणारे शुद्धपणाचे आचार व नियम ज्यांनी नाहीसे केले आहेत असे निर्लज्जपणे पशूंप्रमाणे आचरण करितात, ते सुद्धा मेल्यानंतर पूं, विष्ठा, मूत्र, कफ व मळ यांनी भरलेल्या समुद्रात पडतात, त्याच अत्यंत घाणेरडया पदार्थाला खातात. ॥२३॥

वै इह ये तु श्‍वगर्दभपतयः ब्राह्मणादयः मृगयाविहाराः च अतीर्थे मृगान् निघ्नन्ति तान् अपि संपरेतान् लक्ष्यभूतान् यमपुरुषाः इषुभिः विध्यन्ति खरोखर येथे जे तर कुत्री व गाढव यांचे पालन करणारे ब्राह्मण इत्यादि मृगया खेळणारे आणि विहितकर्मावाचून इतर प्रसंगी पशूंना मारितात त्या पाप्यांना सुद्धा मेलेल्यांना नेम धरण्याचे स्थान झालेल्यांना यमदूत बाणांनी वेधितात. ॥२४॥

इह वै ये तु दाम्भिकाः दम्भयज्ञेषु पशून् विशसन्ति तान् अमुष्मिन् लोके वैशसे नरके पतितान् निरयपतयः यातयित्वा विशसन्ति ह्या लोकी खरोखर जे ढोंगी पुरुष तर कपटयज्ञामध्ये पशूंना मारितात, त्यांना परलोकामध्ये वैशस नावाच्या नरकात पडलेल्यांना त्या वैशस नरकाचे अधिपति पीडा देऊन मारितात. ॥२५॥

इह वै यः तु द्विजः काममोहितः सवर्णां भार्यां रेतः पाययति तं पापकृतं अमुत्र रेतःकुल्यायां पातयित्वा रेतः संपाययन्ति येथे खरोखर जो पुरुष तर द्विज असताहि कामाने वेडा बनून स्वजातीच्या पत्‍नीला वीर्य पाजितो, त्या पापी पुरुषाला परलोकी रेतःकुल्या नामक नरकात असणार्‍या वीर्याच्या प्रवाहात पाडून वीर्य पाजितात. ॥२६॥

इह वै ये तु राजानः वा राजभटाः दस्यवः अग्निदाः गरदाः ग्रामान् वा सार्थान् विलुम्पन्ति तान् च अपि परेत्य वज्रदंष्ट्राः यमदूताः सप्तशतानि विंशतिः च श्वानः सरभसं खादन्ति येथे खरोखर जे तर राजे किंवा राजसेवक चोर, आगलावे किंवा विष घालणारे गावांना किंवा व्यापार्‍यांच्या तांडयांना लुबाडतात, त्यांनाहि परलोकी गेल्यावर वज्राप्रमाणे तीक्ष्ण दाढांचे यमदूत सातशे आणि वीस कुत्रे वेगाने खातात. ॥२७॥

इह वै यः तु साक्ष्ये द्रव्यविनिमये वा दाने कथंचित् अनृतं वदति सः वै प्रेत्य निरवकाशे अवीचिमति नरके योजनशतोच्छ्रायात् गिरिमूर्ध्नः अधःशिराः संपात्यते यत्र अश्‍मपृष्ठं स्थलं जलम् इव अवभासते तत् अवीचिमत् उच्यते (सः) तिलशः वीशीर्यमाणशरीरः न म्रियमाणः पुनः आरोपितः निपतति येथे खरोखर जो पुरुष तर साक्ष देण्याच्या वेळी, द्रव्याच्या व्यवहारात किंवा दानकर्मामध्ये कशाहिप्रकारे खोटे बोलतो, तो मेल्यावर खरोखर निराधार व ज्यांत लाटा नाहीत अशा अवीचिमत् नावाच्या नरकात शंभर योजने उंच असलेल्या पर्वताच्या शिखरावरून खाली डोके करून पाडिला जातो, जेथे दगडाची फरसबंदी केलेले स्थळ पाण्याप्रमाणे दिसते त्याला अवीचिमत् म्हणतात, तो तिळाएवढे तुकडे झाले आहेत शरीराचे ज्याच्या असा न मरणारा असा फिरून पर्वतावर ठेविलेला खाली पडतो. ॥२८॥

इह वै यः तु विप्रः वा तत्कलत्रं प्रमादतः सुरां पिबति अपि वा राजन्यः वैश्यः व्रतस्थः सोमपीथः (भवति) तेषां निरयं नीतानां उरसि पदा आक्रम्य वह्‌निना द्रवमाणं कार्ष्णायसं आस्ये निषिञ्चन्ति येथे खरोखर जो तर ब्राह्मण किंवा त्याची स्त्री अज्ञानाने मद्य पिते किंवा क्षत्रिय, वैश्य, व्रतनियमांचा स्वीकार करून सोमरस पिणारा होतो, त्यांना नरकात नेले असता छातीवर पाय ठेवून अग्नीने पातळ होणार्‍या लोखंडाला मुखात ओतितात. ॥२९॥

अथ च वै इह यः तु स्वयं अधमः अपि आत्मसंभावनेन जन्मतपोविद्याचारवर्णाश्रमवतः वरीयसः न बहु मन्येत सः मृतकः एव मृत्वा क्षारकर्दमे निरये अवाक्शिराः निपातितः दुरन्ताः यातनाः हि अश्‍नुते आणखीहि खरोखर ह्या लोकी जो पुरुष तर स्वतः नीच असूनहि स्वतःच्या मोठेपणासाठी जन्माने, तपश्‍चर्येने, विद्येने, आचाराने, जातीने व आश्रमाने युक्त असलेल्या श्रेष्ठ अशांना विशेष मान देत नाही, तो मेल्यासारखा असून सुद्धा मरून क्षारकर्दम नावाच्या नरकात खाली डोके अशा स्थितीत पाडिलेला खरोखर दुर्घर पीडा भोगितो. ॥३०॥

वै इह ये पुरुषाः तु पुरुषमेधेन यजन्ते च याः स्त्रियः नृपशून् खादन्ति तान् यमसदने पशवः इव निहताः ते रक्षोगणाः (भूत्वा) तान् यातयन्तः सौनिकाः इव स्वधितिना अवदाय यथा इह पुरुषादाः तथा हृष्यमाणाः असृक् पिबन्ति नृत्यन्ति च गायन्ति खरोखर येथे जे पुरुष तर ज्यात मनुष्यपशूचे हवन केले जाते अशा यज्ञाने यजन करितात, आणि ज्या स्त्रिया मनुष्यपशूंना खातात, त्यांना यमलोकी पशूप्रमाणे मारलेले असे ती मनुष्ये राक्षसगण होऊन त्या पापी पुरुषांना पीडा देतात, खाटिकांप्रमाणे कुर्‍हाडीने तोडून जसे येथे मनुष्यमांस खाणारे लोक तसे आनंदित होणारे रक्त पितात, नाचतात आणि गातात. ॥३१॥

इह वै ये तु अरण्ये वा ग्रामे अनागसः उपसृतान् वैश्रम्भकैः उपविश्रम्भय्य जिजीविषून् शूलसूत्रादिषु उपप्रोतान् क्रीडनकतयायातयन्ति ते अपिच प्रेत्य यमयातनासु शूलादिषु प्रोतात्मानः च क्षुत्तृङ्‌भ्यां अभिहताः तिग्मतुण्डैः कंकवटादिभिः इतस्ततः आहन्यमानाः आत्मशमलं स्मरन्ति येथे खरोखर जे पुरुष तर रानात किंवा गावात निरपराधी जवळ असलेल्यांना विश्वास बसण्याजोग्या पदार्थांनी विश्वास दाखवून जगण्याची इच्छा करणार्‍यांना सुळावर किंवा फासावर चढविलेल्यांना खेळणे समजून पीडा देतात, ते पापी पुरुषही मेल्यावर यमलोकातील पीडादायक अशा शूळ इत्यादिकावर स्वतः चढविलेले आणि भुकेने व तहानेने व्याकुळ झालेले तीक्ष्ण चोचीच्या कंकवट इत्यादि पक्ष्यांनी इकडेतिकडे पीडिलेले स्वतःच्या पापाला स्मरतात. ॥३२॥

नृप इह वै यथा दंदशूकाः ये तु उल्बणस्वभावाः नराः भूतानि उद्वेजयन्ति ते अपि प्रेत्य दंदशूकाख्ये नरके निपतन्ति यत्र पञ्चमुखाः सप्तमुखाः दंदशूकाः उपसृत्य यथाबिलेशयान् ग्रसन्ति हे परीक्षित राजा, येथे खरोखर सर्पाप्रमाणे क्रूर स्वभावाचे मनुष्य प्राण्यांना छळतात, ते सुद्धा मेल्यावर दंदशूक नामक नरकात पडतात, जेथे पाच मुखे असलेले व सात मुखे असलेले सर्प जवळ जाऊन उंदराप्रमाणे गिळतात. ॥३३॥

वै इह ये तु अन्धावटकुसूलगृहादिषु भूतानि निरुन्धन्ति (तान्) तथा अमूत्र तेषु एव उपवेश्य सगरेण वह्‌निना (च) धूमेन (यमदूताः) निरुन्धन्ति खरोखर येथे जे पुरुष तर अंधार्‍या विहिरीत, खडडयात, कोठारात किंवा गुहा इत्यादि ठिकाणी प्राण्यांना कोंडून ठेवितात, त्यांना त्याप्रमाणे परलोकी तसल्याच प्रदेशात घालून विषयुक्त अग्नीने आणि धुराने यमदूत कोंडतात. ॥३४॥

वै इह यः तु गृहपतिः (अपि) असकृत् उपगतमन्युः अतिथीन् वा अभ्यासगतान् दिधक्षुः इव पापेन चक्षुषा निरीक्षते तस्य पापदृष्टेः अपि अक्षिणी निरये वज्रतुंडा गृध्राः कंककाकवटादयः प्रसह्य उरुबलात् उत्पाटयन्ति खरोखर येथे जो पुरुष तर गृहस्थाश्रमी असूनहि वारंवार क्रोधाविष्ट झालेला असा अतिथींना किंवा पाहुण्यांना लाल डोळे करून जाळतोच की काय असा पापी डोळ्याने पहातो, त्या पापी दृष्टीच्या पुरुषाचेहि दोन्ही डोळे नरकात वज्राप्रमाणे तीक्ष्ण चोची असलेली गिधाडे कंक, कावळे, वट इत्यादि बलात्काराने मोठया शक्तीने उपटून काढितात. ॥३५॥

वै यः तु इह आढ्याभिमतिः अहंकृतिः तिर्यक्प्रेक्षणः सर्वतः अभिविशङ्की अर्थव्ययनाशचिन्तया परिशुष्यमाणहृदयवदनः निर्वृति अनवगतः ग्रहः इव अर्थम् अभिरक्षति सः च अपि प्रेत्य तदुत्पादनोत्कर्षणसंरक्षणशमलग्रहः सूचीमुखे नरके निपतति यत्र ह वित्तग्रहं पापपुरुषं धर्मपुरुषाः वायकाः व सर्वतः अंगेषु सूत्रैः परिवयन्ति खरोखर जो पुरुष तर ह्याठिकाणी श्रीमंतीचा अभिमान बाळगणारा अहंकारी, वक्रदृष्टीने पाहणारा, सर्वाविषयी मनात शंका बाळगणारा, द्रव्याचा खर्च किंवा नाश होईल ह्या काळजीने ज्याचे मुख व अन्तःकरण सुकून जात असते असा वैराग्याला न प्राप्त झालेला, पिशाचाप्रमाणे द्रव्याला राखीत बसतो, तो सुद्धा मेल्यानंतर द्रव्य मिळविण्यासाठी व वाढविण्यासाठी ज्याच्या हातून अनेक पापे घडली आहेत असा, सूचीमुख नामक नरकात पडतो, जेथे खरोखर पिशाचाप्रमाणे द्रव्य रक्षण करणार्‍या पापी पुरुषाला यमधर्माचे सेवक कोष्टयाप्रमाणे सर्व बाजूंनी अवयवांच्या ठिकाणी सुतांनी विणतात. ॥३६॥

अवनिपते एवं यमालये शतशः सहस्रशः एवंविधाः नरकाः सन्ति ये केचित् इह उदिताः च अनुदिताः (ते) सर्वे एव अधर्मर्वातनः (जनाः) तेषु सर्वेषु पर्यायेण विशन्ति तथा एव धर्मानुवर्तिनः इतरत्र (विशन्ति) ते पुनर्भवे उभयशेषाभ्यां निविशन्ति हे परीक्षित राजा, याप्रमाणे यमलोकी शेकडो, हजारो अशाप्रकारचे नरक आहेत, जे कित्येक येथे सांगितलेले आणि न सांगितलेले ते सगळेच अधर्माने वागणारे लोक त्या सर्व नरकात क्रमाक्रमाने शिरतात, त्याचप्रमाणे धार्मिक पुरुष स्वर्गादि इतर लोकात शिरतात, ते लोक पुनः जन्मामध्ये थोडेसे पापपुण्य शिल्लक राहिल्याने शिरतात. ॥३७॥

निवृत्तिलक्षणमार्गः आदौ एव व्याख्यातः एतावन् एव आंडकोशः (अस्ति) पुराणेषु चतुर्दशधा विकल्पितः उपगीयते भगवतः नारायणस्य साक्षात् महापुरुषस्य आत्ममायागुणमयं यत् स्थविष्ठं रूपं अनुवर्णितं तत् यः आदृतः पठति शृणोति श्रवयति सः श्रद्धाभक्ति विशुद्धबुद्धिः भगवतः परमात्मनः उपगेयं अग्राह्यम् अपि वेद निवृत्तिमार्गाचे स्वरूप पूर्वीच सांगितले एवढाच ब्रह्मांडाचा कोशभाग आहे, जो पुराणांमध्ये चौदा प्रकाराने वर्णिलेला असा, विद्वानांकडून गाइला जातो, सर्वैश्वर्यसंपन्न परमेश्वराचे प्रत्यक्ष महापुरुष विष्णूचे स्वतःच्या मायेच्या गुणाने व्यापिलेले जे स्थल असे स्वरूप वर्णिले त्या स्वरूपाला जो आदरपूर्वक पठण करितो, श्रवण करितो व ऐकवितो, तो श्रद्धेने व भक्तीने ज्याची बुद्धि शुद्ध झाली आहे असा सर्वगुणसंपन्न परमेश्वराच्या गाण्याजोग्या व जाणण्यास कठीण अशा रूपालाही जाणतो. ॥३८॥

भगवतः स्थूलं तथा सूक्ष्मं रूपं श्रुत्वा स्थूले निर्जितं आत्मानं धिया शनैः सूक्ष्मं यतिः नयेत् इति परमेश्वराच्या स्थूळ त्याप्रमाणे सूक्ष्म स्वरूपाला ऐकून स्थूल स्वरूपामध्ये जिंकून स्थिर केलेल्या आत्म्याला बुद्धीने हळूहळू सूक्ष्म स्वरूपाकडे योग्याने न्यावे असे ॥३९॥

नृप मया तव भूद्वीपवर्षसरिदद्रिनभःसमुद्रपातालदिङ्‌नरकभागणलोकसंस्था गीता भगवतः ईश्वरस्य अद्‍भुतं स्थूलं वपुः सकलजीवनिकायधाम (अस्ति) हे परीक्षित राजा, मी तुझ्याजवळ पृथ्वी, द्वीपे, खंडे, नद्या, पर्वत, आकाश, समुद्र, पाताळे, दिशा, नरक व नक्षत्रसमूह ह्या सर्व गोष्टींनी युक्त चौदा भुवनांची रचना वर्णन करून सांगितली, सर्वगुणसंपन्न अशा परमेश्वराचे आश्‍चर्यजनक स्थूल शरीर संपूर्ण जीवसमूहाचे आधारस्थान आहे. ॥४०॥

पंचम स्कन्धः - अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP