|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय २४ वा - अन्वयार्थ
राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन - सवितुः अधस्तात् योजनायुते स्वर्भानुः नक्षत्रवत् चरति इति एके वदन्ति यः असौ स्वयं असुरापसदः सैंहिकेयः भगवदनुकम्पया अमरत्वं च ग्रहत्वं अतदर्हः हि अलभत तात तस्य जन्म च कर्माणि उपरिष्टात् वक्षामः सूर्याच्या खाली दहाहजार योजनांच्या अंतरावर राहु नक्षत्राप्रमाणे फिरतो असे कित्येक लोक म्हणतात, हा असा नीच दैत्य सिंहिकेचा मुलगा परमेश्वरकृपेने अमरपणाला आणि ग्रहपणाला, अमर होण्यास नालायक असूनहि मिळविता झाला, बा परीक्षित राजा, त्या राहूचा जन्म व कर्म पुढे सांगणार आहो. ॥१॥ यत् अदः प्रतपतः तरणेः मंडलं तत् विस्तरतः योजनायुतं (अस्ति) सोमस्य (मण्डलं) द्वादशसहस्र (अस्ति) राहोः (मण्डलं) त्रयोदशसहस्रं (अस्ति) आचक्षते यः पर्वणि तद्वयवधानकृत् वैरानुबन्धः सूर्याचंद्रमसौ अभिधावति जे हे प्रकाश देणारे सूर्यमंडळ, त्याचा विस्तार दहा हजार योजने आहे, चंद्रमंडळ बारा हजार योजने आहे, राहूचे मंडळ तेरा हजार योजने आहे म्हणतात, जो राहु पौर्णिमा व अमावास्या ह्या पर्वांच्या दिवशी त्यांना प्रतिबंध करणारा, वैर मनात बाळगून सूर्य व चंद्र यांकडे धावून जातो. ॥२॥ भगवता तत् निशम्य उभयत्र अपि रक्षणाय प्रयुक्तं सुदर्शनं नाम तत्तेजसा दुर्विषहं मुहुः परिवर्तमानं भागवतं दयितं अस्त्रं अभि मुहूर्तं अवस्थितः उद्विजमानः चकितहृदयः आरात् एव निवर्तते लोकाः तत् उपरागं इति वदन्ति परमेश्वराने ते ऐकून दोन्ही ठिकाणी रक्षणाकरिता योजिलेले सुदर्शननामक त्याच्या तेजाने असह्य वारंवार सभोवार फिरणारे भगवंताचे प्रिय अस्त्राच्या समोर काही वेळ उभा राहिलेला घाबरून गेलेला मनात चकित होऊन दुरूनच परत फिरतो, लोक त्या ह्या गोष्टीला ग्रहण असे बोलतात. ॥३॥ ततः तावन्मात्रः एव अधस्तात् सिद्धचारणविद्याधराणां सदनानि त्या राहूपासून तितक्याच प्रमाणावर म्हणजे दहा हजार योजने अंतरावर खाली सिद्ध, चारण व विद्याधर यांची घरे ॥४॥ ततः अधस्तात् यक्षरक्षःपिशाचप्रेतभूतगणानां विहाराजिरं अन्तरिक्षं यावत् वायुः प्रवाति यावत् मेघाः उपलभ्यन्ते त्याहून खाली यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत, भूते यांच्या समूहांचा क्रीडांगण असा आकाशप्रदेश आहे, जितक्या भागात वायु वहातो, जितक्या प्रदेशात मेघ आढळतात. ॥५॥ ततः अधस्तात् शतयोजनान्तरे इयं पृथिवी (अस्ति) यावत् हंसभासश्येनसुपर्णादयः पतत्त्रिप्रवराः उत्पतन्ति इति त्याहून खाली शंभर योजने अंतरावर ही पृथ्वी आहे, जितक्या उंचीपर्यंत हंस, भास, ससाणे, गरुड इत्यादि श्रेष्ठ पक्षी उडतात असे म्हणतात. ॥६॥ भूमेः यथासंनिवेशावस्थानम् उपवर्णितं अवनेः अपि अधस्तात् सप्त भूविवराः एकैकशः योजनायुतान्तरेण आयामविस्तारेण उपक्लृप्ताः अतलम् वितलं सुतलं तलातलं महातलं रसातलं पातालं इति पृथ्वीची ज्याप्रमाणे रचना व व्यवस्था केलेली ते सर्व पूर्वी सांगितले आहेच, पृथ्वीच्याहि खालच्या प्रदेशात सात पृथ्वीची विवरे म्हणजे मोठमोठी छिद्रे आहेत, त्यापैकी प्रत्येक क्रमाने दहा दहा हजार योजने इतक्या अंतराच्या लांबीरुंदीच्या विस्ताराने कल्पिली आहेत, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल, पाताल अशी ही सात पृथ्वीच्या खाली विवरे आहेत. ॥७॥ हि एतेषु बिलस्वर्गेषु नित्यप्रमुदितानुरक्तकलत्रापत्यबन्धुसुहृदनुचराः गृहपतयः ईश्वरात् अपि अप्रतिहतकामाः मायाविनोदाः दैत्यदानवकाद्रवेयाः स्वर्गात् अपि अधिककामभोगैश्वर्यानन्दविभूतिभिः सुसमृद्धभवनोद्यानाक्रीडविहारेषु निवसन्ति खरोखर ह्या स्वर्गाप्रमाणे असणार्या सात बिळांमध्ये म्हणजे छिद्रांमध्ये नेहमी आनंदित व प्रेम करणारी मुले, स्त्रिया, बंधु, मित्र व सेवक आहेत ज्यांचे असे गृहस्वामी परमेश्वराकडूनहि ज्यांच्या इच्छांना अडथळा होत नाही असे कपटविद्येत पारंगत असे दैत्य, दानव व सर्प स्वर्गापेक्षाहि अधिक कामभोग, ऐश्वर्यानंद आणि संपत्ति यांनी पूर्ण भरलेली जी मंदिरे, उपवने, विहारस्थळे त्याठिकाणी रहातात. ॥८॥ महाराज येषु मायाविना मयेन विनिर्मिताः नानामणिप्रवरप्रवेकविरचितविचित्रभवन प्राकारगोपुरसभाचैत्यचत्वरायतनादिभिः नागासुरमिथुनपारावतशुकसारिकाकीर्णकृत्रिमभूमिभिः विवरेश्वरगृहोत्तमैः समलंकृताः पुरः चकासति हे परीक्षित राजा, ज्या विवरांमध्ये कपटी अशा मयासुराने निर्मिलेली नानाप्रकारच्या अत्युत्तम श्रेष्ठ मण्यांनी बांधिलेली जी विचित्र मंदिरे, कोट, वेशी, सभा, अंगणे, देवालये इत्यादिकांनी नाग व असुर यांची जोडपी व तसेच पारवे, पोपट, साळुंक्या यांनी गजबजून गेलेल्या रत्नजडित उपवनभूमींच्या योगे विवरांच्या अधिपतींच्या उत्तम उत्तम गृहांनी अत्यंत सुशोभित झालेली नगरे शोभतात. ॥९॥ च अतितरां मनइंद्रियानन्दिभिः लताङ्गलिङ्गितानां कुसुमफलस्तबकसुभगकिसलयावनतरुचिरविटपविटपिना च अमलजलपूर्णानां समिथुनविविधविहंगमजलाशयानां श्रीभिः झषकुलोल्लंघनक्षुभितनीरनीरजकुमुदकुवलयकल्हारनीलोत्पललोहितशतपत्रादिवनेषु कृतनिकेतनानां पक्षिणां एकविहाराकुलमधुरविविधस्वनादिभिः इन्द्रियोत्सवैः अमरलोकश्रियं अतिशयितानि उद्यानानि आणि अत्यंत मनाला व इंद्रियांना आनंद देणार्या वेलींनी आपल्या अवयवांनी ज्यांना आलिंगन दिले आहे अशा फुले, फळे, गुच्छ व सुंदर कोमलपल्लव यांनी ज्यांच्या सुंदर फांद्या लवल्या आहेत अशा वृक्षांना आणि स्वच्छ पाण्याने भरलेल्या जोडप्यांनी वागणार्या अनेक पक्ष्यांनी गजबजलेल्या सरोवरांच्या शोभेने मत्स्यादि जलचरांच्या समुदायांनी उल्लंघिल्यामुळे क्षुब्ध झालेल्या पाण्यात असलेली कमळे, कुमुदे, कुवलये, कल्हार, नीलोत्पले, तांबडी शंभर पानांची कमळे ह्यांच्या समुदायामध्ये घर करून रहाणार्या पक्ष्यांच्या सतत क्रीडेमुळे एकसारखे चाललेले जे अनेकप्रकारचे मधुर शब्द इत्यादिकांच्या योगे प्राप्त होणार्या इंद्रियांच्या आनंदांनी देवलोकांच्या शोभेला मागे टाकणारी उपवने ॥१०॥ ह वाव यत्र अहोरात्रादिभिः कालविभागैः भयं न उपलक्ष्यते खरोखर जेथे दिवस व रात्र इत्यादि कालाच्या विभागामुळे भय दिसून येत नाही. ॥११॥ हि यत्र महाहिप्रवरशिरोमणयः सर्वं तमः प्रबाधन्ते खरोखर जेथे मोठमोठया श्रेष्ठ सर्पांच्या मस्तकांवरील मणि संपूर्ण अंधकाराला दूर करितात. ॥१२॥ वा एतेषु वसतां दिव्यौषधिरसान्नपानस्नानादिभिः आधयः व्याधयः च वलीपलितजरादयः च दैहवैवर्ण्यदौर्गन्ध्यस्वेदक्लमग्लानिः इति वयोवस्थाः न भवन्ति किंवा ह्या सात विवरांमध्ये रहाणार्या प्राण्यांस दिव्य औषधींचे रस, अन्न, पान व स्नान इत्यादिकांनी चिंता, रोग आणि वळ्या, म्हातारपणाने केस पांढरे होणे, वृद्धावस्था इत्यादि आणि देह निस्तेज होणे, दुर्गंधि, घाम, श्रम व ग्लानि अशा वयाच्या अवस्था होत नाहीत. ॥१३॥ तेषां कल्याणानां चक्रापदेशात् भगवत्तेजसः विना कुतश्चन मृत्युः न हि प्रभवति त्या पुण्यकारी प्राण्यांचा सुदर्शन चक्र या नावाने प्रसिद्ध असणार्या भगवंताच्या तेजाहून अन्यरीतीने कोठूनहि मृत्यु होतच नाही. ॥१४॥ यस्मिन् प्रविष्टे प्रायः असुरवधूनां पुंसवनानि भयात् एव स्रवन्ति च पतन्ति जे सुदर्शन चक्र प्रविष्ट झाले असता बहुतकरून असुरस्त्रियांचे गर्भ भीतीनेच स्रवतात आणि पडतात. ॥१५॥ अथ अतले मयपुत्रः बलः असुरः निवसति ह वा येन इह षण्णवतिः मायाः सृष्टाः मायाविनः काश्चन अद्य अपि धारयन्ति यस्य जृम्भमाणस्य मुखतः स्वैरिण्यः कामिन्यः पुंश्चल्यः इति त्रयः स्त्रीगणाः उदपद्यन्त याः वै बिलायनं प्रविष्टं पुरुषं हाटकाख्येन रसेन साधयित्वा स्वविलासावलोकनानुरागस्मितसंलापोपगूहनादिभिः स्वैरं किल रमयन्ति यस्मिन् उपयुक्ते आत्मानं अयुतगजबलं अभिमन्यमानः पुरुषः अहं ईश्वरः (अस्मि) अहं सिद्धः इति मदांध इव कत्थन्ते प्रथमतः अतल नामक विवरामध्ये मयासुराचा मुलगा बल नामक असुर रहातो, खरोखर ज्या बलासुराने येथे शाण्णव माया उत्पन्न केल्या, कपटी पुरुष कित्येक मायांना अजूनहि धारण करितात, ज्या जांभई देणार्या बलासुराच्या मुखातून स्वच्छंदचारिणी, व्यभिचार करणार्या, जारकर्म करणार्या अशा तीन प्रकारच्या स्त्रियांचे समूह उत्पन्न झाले, ज्या स्त्रिया खरोखर विवरस्थळास प्राप्त झालेल्या पुरुषाला हाटक नावाने प्रसिद्ध असलेल्या रसाने सामर्थ्य देऊन आपले विलासयुक्त अवलोकन, प्रेमयुक्त हास्य, भाषणे, आलिंगन इत्यादिकांनी स्वच्छंदाने खरोखर रमवितात, जो सुवर्णाचा हाटक नावाचा रस सेविला असता स्वतःला दहा हजार मदोन्मत्त हत्तींचे सामर्थ्य आपल्याला आहे असे मानणारा पुरुष मी ईश्वर आहे, मी सिद्ध आहे, असे मदाने मत्त होऊन अंध झालेल्या मनुष्याप्रमाणे बडबडतात. ॥१६॥ ततः अधस्तात् वितले हरः भगवान् हाटकेश्वरः स्वपार्षदभूतगणावृतः भवः प्रजापतिसर्गोपबृंहणाय भवान्या सह मिथुनीभूतः आस्ते यतः प्रवृत्ताः भवयोः वीर्येण हाटकी नाम सरित्प्रवरा यत्र चित्रभानुः मातरिश्वना समिध्यमानः ओजसा पिबति तन्निष्ठ्य़ूतं हाटकाख्यं सुवर्णं असुरेंद्रावरोधेषु पुरुषाः पुरुषीभिः सह भूषणेन धारयन्ति तेथून खाली वितलनामक विवरामध्ये शंकर सर्वगुणसंपन्न हाटकेश्वर नावाने प्रसिद्ध असलेला आपल्या पार्षदसंज्ञक भूतगणांनी वेष्टित सर्व जगाचा चालक असा ब्रह्मदेवाच्या सृष्टीला वाढविण्याकरिता पार्वतीसह संभोग करीत रहातो, जेथून निघालेली शंकरपार्वतीच्या वीर्याने हाटकी नावाची श्रेष्ठ नदी आहे, जेथे अग्नि वायूने प्रज्वलित केलेला सामर्थ्याने पितो, त्याने थुंकलेले हाटकनामक सुवर्ण मोठमोठ्या दैत्यांच्या अंतःपुरात पुरुष स्त्रियांसह अलंकाररूपाने धारण करितात. ॥१७॥ ततः अधस्तात् सुतले उदारश्रवाः पुण्यश्लोकः विरोचनात्मजः बलिः महेन्द्रस्य प्रियं चिकीर्षमाणेन भगवता अदितेः लब्धकायः भूत्वा बटुवामनरूपेण परिक्षिप्तलोकत्रयः भगवदनुकम्पया एव तत्र पुनः प्रवेशितः इंद्रादिषु अविद्यमानया समृद्धया श्रिया अभिजुष्टः स्वधर्मेणं आराधनीयं तम् एव भगवन्तं आराधयन् अपगतसाध्वसः अधुना अपि आस्ते तेथून खाली सुतल नामक विवरामध्ये मोठा कीर्तिमान व पुण्यवान विरोचनाचा पुत्र बलिराजा इंद्राचे प्रिय करण्याची इच्छा करणार्या परमेश्वराने अदितीपासून जन्म मिळविलेला होऊन वामन नावाने बटुरूप धारण करून त्रैलोक्य पादाक्रांत केले आहे ज्याने असा परमेश्वराच्या कृपेनेच त्या सुतलात फिरून घालवून दिला, इंद्रादि देवांच्या ठिकाणी नसणार्या सर्व ऐश्वर्याने पूर्ण अशा लक्ष्मीने सेविलेला स्वधर्माने पूजण्यास योग्य अशा त्याच वामनरूपी ईश्वराला पूजणारा असा निर्भय झालेला अजूनहि रहातो. ॥१८॥ यत् बिलनिलयैश्वर्यं एतत् यत् तत् भगवति अशेषजीवनिकायानां जीवभूतात्मभूते परमात्मानि तीर्थतमे पात्रे वासुदेवे उपपन्ने परया श्रद्धया परमादरसमाहितमनसा संप्रतिपादितस्य साक्षात् अपवर्गद्वारस्य भूमिदानस्य साक्षात्कारः नो एव जे सुतल नामक विवरस्थानाचे ऐश्वर्य हे जे ते सर्वैश्वरसंपन्न संपूर्ण जीवसमूहांच्या जीवरूपी आत्म्यांच्या ठिकाणी व्यापकरूपाने रहाणारा परमात्मस्वरूपी अत्यंत पवित्र असा योग्य असा परमेश्वर प्राप्त झाला असता मोठ्या श्रद्धेने मोठ्या आदराने एकाग्र केलेल्या अंतःकरणाने दिलेल्या प्रत्यक्ष मोक्षाचे द्वार अशा पृथ्वीदानाचे प्रत्यक्ष फळ नव्हेच. ॥१९॥ ह वाव क्षुतपतनप्रस्खलनादिषु विवशः पुरुषः यस्य नाम सकृत् अभिगृणन् कर्मबंधनं अंजसा विधुनोति ह एव मुमुक्षवः यस्य प्रतिबाधनं अन्यथा उपलभ्यन्ते खरोखरच उचकी, पडणे, अडखळणे, इत्यादि कर्मांमध्ये पराधीन पुरुष ज्याचे नाव एकवार उच्चारणारा कर्मजन्यबंधनाला तत्काळ तोडितो खरोखर मोक्षाची इच्छा करणारे पुरुष ज्या कर्मबंधनाच्या दूर करण्याच्या उपायाला अन्य मार्गाने मिळवू पहातात. ॥२०॥ तत् भक्तानां सर्वेषां आत्मवतां आत्मदे आत्मनि आत्मतया एव (समर्पितस्य भूमिदानस्य न तत्फलम्) तो उपाय भक्तांना संपूर्ण आत्मज्ञानसंपन्न ज्ञानी पुरुषांना आत्मप्राप्ति करून देणार्या आत्मरूपी परमेश्वराच्या ठिकाणी आपलेपणानेच दिलेल्या भूमिदानाचे ते फल नव्हे. ॥२१॥ भगवान् अमुष्य नूनं न वै अनुजग्राह उत यत् पुनः आत्मानुस्मृतिमोषणं मायामयभोगैश्वर्यम् एव अतनुत इति (युज्यते) परमेश्वर ह्या बलिराजावर खरे पाहिले असता अनुग्रह करिता झालाच नाही, उलटपक्षी जे फिरून आत्मज्ञानाचा विसर पाडणारे कपटमय भोगांचे ऐश्वर्यच देता झाला असे म्हणणे जुळते. ॥२२॥ अनधिगतान्योपायेन भगवता याञ्चाछलेन अपहृतस्वशरीरावशेषितलोकत्रयः च वरुणपाशैः संप्रतिमुक्तः गिरिदर्यां अपविद्धः यत् तत् इति ह उवाच ज्याला दुसरा उपाय सापडला नाही अशा परमेश्वराने याचना करण्याच्या निमित्ताने स्वतःचे शरीर वगळून सर्व त्रैलोक्य ज्यापासून हिरावून घेतले आहे आणि वरुणाच्या पाशांनी घटट आवळून धरलेला पर्वताच्या गुहेत टाकिलेला जे ते याप्रमाणे खरोखर बोलला. ॥२३॥ यः असौ इंद्रः यस्य मंत्राय वृतः एकांततः बृहस्पतिः सचिवः अयं भगवान् नूनं अर्थेषु न निष्णातः बत तं अतिहाय स्वयं उपेंद्रेण आत्मानं आत्मनः आशिषः अयाचत तद्दास्यं नो एव (अयाचत) अतिगंभीरवयसः कालस्य मन्वन्तरपरिवृतं इदं लोकत्रयं कियत् जो हा इंद्र ज्याला मसलत देण्याकरिता नेमिलेला सर्वप्रकारे बृहस्पति प्रधान होय हा सर्वैश्वरसंपन्न इंद्र खरोखर पुरुषार्थ मिळविण्याविषयी कुशल नव्हे कारण भगवत्प्राप्तिरूपी पुरुषार्थाला टाकून देऊन स्वतः विष्णूकडून स्वतःला स्वतःचे सुखोपभोग मागून घेता झाला त्या विष्णूच्या सेवेला नाहीच मागता झाला अनंत वर्षे आयुष्य आहे ज्याचे अशा काळाच्या दृष्टीने एका मन्वन्तराने विपर्यास पावणारे हे त्रैलोक्य किती योग्यतेचे आहे ॥२४॥ अस्मत्पितामहः स्वपितरि उपरते यस्य अनुदास्यम् एव किल वव्रे उत भगवता दीयमानं अकुतोभयं स्वपित्र्यं यत् पदं तु भगवतः परं इति मत्वा न खलु अयाचत आमचा आजा प्रल्हाद आपला पिता हिरण्यकश्यपु मृत झाला असता ज्या परमेश्वराचे सेवकत्वच खरोखर मागता झाला, आणि परमेश्वराकडून दिल्या जाणार्या निर्भय अशा आपल्या वडिलोपार्जित अशा ज्या राज्यपदाला तर परमेश्वराहून वेगळे असे समजून खरोखर न मागता झाला. ॥२५॥ अमृजितकषायः परिहीणभगवदनुग्रहः आत्मद्विधः कः वा महानुभावस्य तस्य अनुपथं उपजिगमिषति इति ज्याचे पाप नष्ट झाले नाही असा ज्यावर भगवंताचा अनुग्रह झाला नाही असा आमच्यासारखा कोणता बरे पुरुष मोठे आहे सामर्थ्य ज्याचे अशा त्या परमेश्वराच्या मार्गाच्या धोरणाने जाण्याची इच्छा करील अशा रीतीने बलिराजाच्या मनात नेहमी विचार येत असतात. ॥२६॥ तस्य अनुचरितं उपरिष्टात् विस्तरिष्यते निजजनानुकम्पितहृदयः भगवान् अखिलजगद्गुरुः नारायणः स्वयं गदापाणिः यस्य द्वारि अवतिष्ठते येन दिग्विजये अंगुष्ठेन पदा दशकन्धरः योजनायुतायुतं उच्चाटितः त्या बलिराजाचे आख्यान पुढे विस्ताराने वर्णिले जाईल, आपल्या भक्तांवर कृपा करण्याचा ज्याचा मानस आहे असा, सर्वगुणसंपन्न संपूर्ण जगाचा गुरु असा विष्णु, स्वतः हातात गदा घेऊन ज्या बलीच्या दरवाज्यावर उभा रहातो, ज्या विष्णूने दिशा जिंकायला निघाला असता अंगठयाचाच उपयोग ज्यात केला आहे अशा पायाने रावण कोटयावधि योजने दूर भिरकावून दिला. ॥२७॥ ततः अधस्तात् तलातले त्रिलोकीशं चिकीर्षुणा पुरारिणा भगवतां निर्दग्धस्वपुरत्रयः तत्प्रसादात् लब्धपदः मायाविनां आचार्यः त्रिपुराधिपतिः मयः नाम दानवेंद्रः महादेवेन परिरक्षितः विगतसुदर्शनभयः महीयते त्या सुतलाहून खाली तलातलनामक विवरामध्ये त्रैलोक्याचे कल्याण करण्याच्या इच्छेने त्रिपुरासुराला मारणार्या शंकराने ज्याची स्वतःची तीनही पुरे जाळून टाकिली आहेत असा त्या शंकराच्या कृपेने मिळाले आहे पद ज्याला असा कपटी पुरुषांचा गुरु त्रिपुरांचा स्वामी मय नावाचा दानवांचा राजा शंकराने रक्षिला असल्यामुळे ज्याचे सुदर्शनचक्रासंबंधीचे भय नष्ट झाले आहे असा उत्कर्षाला प्राप्त होत आहे. ॥२८॥ ततः अधस्तात् महातले काद्रवेयाणां नैकशिरसां सर्पाणां क्रोधवशः नाम गणः (अस्ति) महाभोगवन्तः कुहकतक्षककालियसुषेणादिप्रधानाः पुरुषवाहात् पतत्त्रिराजाधिपतेः अनवरतम् उद्विजमानाः स्वकलत्रापत्यसुहृत्कुटुंबप्रसंगेन क्वचित् प्रमत्ताः विहरन्ति त्या तलातल विवराहून खाली महातल नामक विवरामध्ये कद्रुपुत्र अशा पुष्कळ फणा असणार्या सर्पांचा क्रोधवश नावाचा गण आहे मोठमोठी शरीरे धारण करणारे मुख्य मुख्य असे कुहक, तक्षक, कालिय, सुषेण आदिकरून सर्प श्रीविष्णूचे वाहन असा पक्ष्यांचा राजा जो गरुड त्यापासून अत्यंत भ्यालेले असे आपली जी बायकामुले, मित्र व कुटुंब यांच्या सन्निध राहून फार थोडा वेळ बेसावधपणे क्रीडा करितात. ॥२९॥ ततः अधस्तात् रसातले पणयः निवातकवचाः कालेयाः हिरण्यपुरवासिनः इति नाम विबुधप्रत्यनीकाः उत्पत्त्या महोजसः महासाहसिनः दैतेयाः च दानवाः भगवतः हरेः एव तेजसा प्रतिहतबलावलेपाः बिलेशयाः इव वसन्ति ये वै सरमया इंद्रदूत्या उच्चारिताभिः मंत्रवर्णाभिः वाग्भिः इंद्रात् बिभ्यति त्या महातल नामक विवराहून खाली रसातल नामक विवरामध्ये पणि निवातकवच कालेय हिरण्यपुरवासी अशी नावे असणारे देवांचे शत्रु असे जन्मापासूनच मोठे बलाढय असे धाडसाची कामे करणारे दितिपुत्र दैत्य आणि दनुपुत्र दानव सर्वगुणसंपन्न अशा श्रीविष्णूच्याच सुदर्शनचक्र नामक तेजाने सामर्थ्याविषयीचा अभिमान ज्यांचा पार नष्ट झाला आहे असे सामान्य बिळातच रहाणार्या सर्पाप्रमाणे रहातात जे खरोखर सरमा नामक इंद्राच्या दूतीने उच्चारिलेल्या गुप्त अर्थाच्या अक्षरांनी युक्त असलेल्या शब्दांमुळे इंद्रापासून भितात. ॥३०॥ ततः अधस्तात् पाताले वासुकिप्रमुखाः शंखकुलिकमहाशंखश्वेतधनंजयधृतराष्ट्रशंखचूडकंबलाश्वतरदेवदत्तादयः महामर्षाः महाभोगिनः निवसन्ति उ ह वै येषां पंचसप्तदशशतसहस्रशीर्षाणां फणासु विरचिताः रोचिष्णवः महामणयः स्वरोचिषा पातालविवरतिमिरनिकरं विधमन्ति त्या रसातलाहून खाली पाताल नामक विवरामध्ये वासुकि आहे मुख्य ज्यामध्ये असे नागलोकाचे अधिपति शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड, कंबल, अश्वतर, देवदत्त इत्यादि मोठे रागीट मोठमोठी शरीरे धारण करणारे असे रहातात आणखीहि खरोखर ज्या पांच, सात, दहा, शंभर, व हजार फणा असणार्या नागांच्या फणांवर ठेविलेले तेजःपुंज मोठमोठे मणि आपल्या कांतीने पातालविवरातील अंधःकार समूहाला नष्ट करून टाकितात. ॥३१॥ पंचम स्कन्धः - अध्याय चोविसावा समाप्त |