श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय २३ वा - अन्वयार्थ

शिशुमारचक्राचे वर्णन -

अथ तस्मात् परतः त्रयोदशलक्षयोजनान्तरतः यत् (अस्ति) तत् विष्णोः परमं पदं अभिवदन्ति यत्र ह महाभागवतः औत्तानपादिः ध्रुवः अग्निना इंद्रेण प्रजापतिना कश्यपेन च धर्मेण समकालयुग्भिः सबहुमानं दक्षिणतः क्रियमाणः इदानीम् अपि कल्पजीविनां आजीव्यः उपास्ते तस्य अनुभावः इह उपवर्णितः नंतर तेथून पलीकडे तेरा लक्ष योजने अंतरावर जे आहे त्याला विष्णूचे श्रेष्ठ पद म्हणतात, जेथे खरोखर मोठा भगवद्‌भक्त उत्तानपादराजाचा मुलगा ध्रुव अग्नि, इंद्र, प्रजापति, कश्यप आणि धर्म ह्या ध्रुवाच्या काळी जोडिलेल्या नक्षत्रांनी मोठया आदरपूर्वक प्रदक्षिणा घातला गेला, अजूनहि प्रलयकाळापर्यंत जगणार्‍या प्राण्यांचे उपजीविकासाधन असा रहातो, त्या ध्रुवाचा पराक्रम या ग्रंथात वर्णिला आहे. ॥१॥

सः हि ईश्वरेण अव्यक्तरंहसा अनिमिषेण भगवता कालेन भ्राम्यमाणानां सर्वेषां ग्रहनक्षत्रादीनां ज्योतिर्गणानां अवष्टंभः स्थाणुः इव विहितः शश्वत् अवभासते तो ध्रुव खरोखर परमेश्वरस्वरूपी ज्याचा वेग स्पष्ट दिसत नाही अशा नेहमी चालणार्‍या भगवान काळाकडून फिरविल्या जाणार्‍या संपूर्ण ग्रह, नक्षत्रे इत्यादिक ज्योतिश्‍चक्रांचा आधारस्तंभ अशा खांबाप्रमाणे योजना केलेला असा नेहमी प्रकाशतो. ॥२॥

तथा मेढीस्तंभे संयोजितः आक्रमणपशवः त्रिभिः त्रिभिः सवनैः यथास्थानं मंडलानि चरन्ति एवं एतस्मिन् कालचक्रे अन्तर्बहिर्योगेन आयोजिताः ग्रहादयः भगणाः ध्रुवम् एव अवलंब्य वायुना उदीर्यमाणाः आकल्पान्तं परिचंक्रमन्ति यथा वायुवशाः मेघाः च श्येनादयः नभसि परिवर्तन्ते एवं प्रकृतिपुरुषसंयोगानुगृहीताः कर्मनिर्मितगतयः कर्मसारथयः ज्योतिर्गणाः भुवि न पतन्ति त्याप्रमाणे मेढीप्रमाणे रोवलेल्या खांबावर जोडिलेले धान्याची मळणी काढण्याकरिता सभोवार फिरणारे पशु तीन तीन वेळांनी आपापले स्थान न सोडता सभोवार फिरतात ह्याप्रमाणे, ह्या कालचक्रावर अंतर्बाह्यसाधनांनी जोडिलेले ग्रहादिक नक्षत्रसमूह ध्रुवालाच अवलंबून वायूने प्रेरिलेले प्रलयकाळापर्यंत फिरतात, ज्याप्रमाणे वायूच्या आधीन झालेले मेघ आणि ससाणे वगैरे आकाशात हिंडतात याप्रमाणे प्रकृति व पुरुष यांच्या संयोगाची कृपा ज्यांच्यावर झाली आहे असे, कर्माने ज्यांच्या गति निर्मिल्या आहेत असे, कर्म हेच ज्यांचा सारथि आहे असे ज्योतिःसमूह पृथ्वीवर पडत नाहीत. ॥३॥

केचन एतत् ज्योतिरनीकं भगवतः वासुदेवस्य योगधारणायां शिशुमारसंस्थानेन अनुवर्णयन्ति कित्येक लोक हे ज्योतिश्‍चक्र भगवान परमेश्वराच्या योगधारणेत शिशुमारचक्राच्या रचनेप्रमाणे वर्णितात. ॥४॥

यस्य अवाक्शिरसः कुंडलीभूतदेहस्य पुच्छाग्रे ध्रुवः उपकल्पितः तस्य लांगूले प्रजापतिः अग्निः इंद्रः धर्मः इति सन्ति पुच्छमूले धाता च विधाता कटयां सप्तर्षयः (सन्ति) तस्य दक्षिणावर्तकुंडलीभूतशरीरस्य यानि उदगयनानि नक्षत्राणि (तस्य) दक्षिणपार्श्वे उपकल्पयन्ति दक्षिणायनानि तु सव्ये (उपकल्पयन्ति) तथा कुंडलाभोगसंनिवेशस्य शिशुमारस्य उभयोः अपि पार्श्वयोः समसंख्याः अवयवाः भवन्ति तथा इह अपि पृष्ठे तु अजवीथी च उदरतः आकाशगंगा अस्ति ज्याच्या खाली डोके असलेल्या कुंडलाकार देहाच्या शेपटीच्या टोकावर ध्रुव कल्पिला आहे, त्याच्या शेपटीवर प्रजापति, अग्नि, इंद्र, धर्म असे आहेत, शेपटीच्या मुळाशी धाता आणि विधाता कंबरेवर सप्तर्षि आहेत, त्या प्रदक्षिणाकार अशा कुंडलासारख्या शरीरावर जी उत्तरायणातील नक्षत्रे त्याच्या उजव्या बाजूवर आहेत असे म्हणतात, दक्षिणायनातील नक्षत्रे तर डाव्या बाजूला मानितात, ज्याप्रमाणे कुंडलाकार शरीराच्या शिशुमाराच्या दोन्हीहि बाजूंवर सारख्या प्रमाणाचे अवयव असतात, तसे येथेहि समजावे, त्या शिशुमाराच्या पाठीवर तर अजवीथी आणि उदरस्थानी आकाशगंगा आहे. ॥५॥

दक्षिणवामयोः श्रोण्योः पुनर्वसुसुपुष्यौ च दक्षिणवामयोः पश्‍चिमयोः पादयोः आर्दाऽऽश्‍लेषे दक्षिणवामयोः नासिकयोः अभिजितदुत्तराषाढे दक्षिणवामयोः लोचनयोः यथासंख्यं श्रवणपूर्वाषाढे दक्षिणवामयोः कर्णयोः धनिष्ठा च मूलः मघादीनि अष्ट नक्षत्राणि दक्षिणायनानि वामपार्श्ववंक्रिषु युंजीत तथैव उदगयनानि मृगशीर्षादीनि दक्षिणपार्श्ववंक्रिषु प्रातिलोम्येन प्रयुंजीत दक्षिणवामयोः स्कंधयोः शतभिषाज्येष्ठे न्यसेत् डाव्या व उजव्या कंबरेवर पुनर्वसु व पुष्य आणि पाठीमागल्या डाव्या व उजव्या पायांवर आर्द्रा व आश्‍लेषा, डाव्या व उजव्या नाकपुडयांवर अभिजित व उत्तराषाढा, उजव्या व डाव्या नेत्रांच्या ठिकाणी अनुक्रमाने श्रवण व पूर्वाषाढा, उजव्या व डाव्या कानांवर धनिष्ठा आणि मूळ मघा वगैरे आठ नक्षत्रे जी दक्षिणायनातील होत ती, डाव्या बाजूच्या फासळ्यांवर योजावीत, त्याचप्रमाणे उत्तरायणात असणारी मृगशीर्ष वगैरे उजव्या बाजूच्या फासळ्यांवर उलटरीतीने योजावीत, उजव्या व डाव्या खांद्यावर शततारका व ज्येष्ठा ही नक्षत्रे ठेवावीत. ॥६॥

उत्तराहनौ अगस्तिः अधराहनौ यमः च मुखेषु अंगारकः उपस्थे शनैश्‍चरः ककुदि बृहस्पतिः वक्षसि आदित्यः हृदये नारायणः मनसि चंद्रः नाभ्यां उशना स्तनयोः अश्विनौ प्राणापानयोः बुधः गले राहुः सर्वांगेषु केतवः रोमसु सर्वे तारागणाः वरच्या हनुवटीवर अगस्ति, खालच्या हनुवटीवर यम आणि तोंडावर मंगळ, उपस्थावर शनि, वशिंडावर बृहस्पति, वक्षस्थलावर सूर्य, हृदयावर नारायण, मनाच्या ठिकाणी चंद्र, नाभीवर शुक्र, स्तनांवर अश्विनीकुमार, प्राण व अपान ह्याठिकाणी बुध, कंठावर राहु, सर्वावयवांवर केतु, केसांवर संपूर्ण नक्षत्रसमूह ॥७॥

उह एव भगवतः विष्णोः एतत् सर्वदेवतामयं रूपं अहःअहः संध्यायां प्रयतः वाग्यतः निरीक्षमाणः उपतिष्ठेत ज्योतिर्लोकाय कालायनाय अनिमिषां पतये महापुरुषाय नमः इति अभिधीमहि आणखीहि भगवान विष्णूचे हे सर्वदेवतात्मक स्वरूप प्रतिदिवशी संध्याकाळी शुद्ध होऊन मौनव्रत धरून अवलोकन करीत उपासना करावी, कालचक्ररूपी ज्योतिर्लोकाला कालस्वरूपी देवांचा अधिपति अशा महापुरुष ईश्वराला नमस्कार असो, असे म्हणून आम्ही त्याचे ध्यान करितो. ॥८॥

त्रिकालं मंत्रकृतां पापापहं आधिदैविकं ग्रहर्क्षतारामयं त्रिकालं नमस्यतः वा स्मरतः तत्कालजं पापं आशु नश्येत तीनहि काळी मंत्रांचा जप करणार्‍यांच्या पापांचा नाश करणार्‍या देवतामय अशा ग्रह, नक्षत्रे व तारका यांनी भरून गेलेल्या ज्योतिश्‍चक्राला सकाळी, दुपारी व सायंकाळी अशावेळी नमस्कार करणार्‍याचे किंवा स्मरणार्‍याचे त्याकाळी झालेले पाप लवकर नष्ट होईल. ॥९॥

पंचम स्कन्धः - अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP