श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय २२ वा - अन्वयार्थ

भिन्न-भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन -

मेरुं च ध्रुवं प्रदक्षिणेन परिक्रामतः भगवतः आदित्यस्य यत् एतत् राशीनां अभिमुखं प्रचलितं अप्रदक्षिणं च भवता उपवर्णितम् अमुष्य वयं कथं अनुमिमीमहि इति (राजा उवाच) मेरु पर्वताला आणि ध्रुवाला उजवा घालून प्रदक्षिणा करीत फिरणार्‍या भगवान सूर्याचे जे हे राशींच्या समोर चालणे, अप्रदक्षिण दिसते असे आपण सांगितले ह्याचा तात्पर्यार्थ आम्ही कसा समजावा असे परीक्षित राजा म्हणाला. ॥१॥

यथा भ्रमता कुलालचक्रेण सह भ्रमतां तदाश्रयाणां पिपीलिकादीनां गतिः प्रदेशान्तरेषु अपि उपलभ्यमानत्वात् अन्याः एव एवं ध्रुवं च मेरुं प्रदक्षिणेन परिधावता नक्षत्रराशिभिः उपलक्षितेन कालचक्रेण सह परिधावमानानां तदाश्रयाणां सूर्यादीनां ग्रहाणां गतिः नक्षत्रान्तरे च राश्यन्तरे उपलभ्यमानत्वात् अन्याः एव (भाति) ज्याप्रमाणे फिरणार्‍या कुंभाराच्या चाकाबरोबर फिरणार्‍या त्यावर बसलेल्या मुंग्या वगैरेंचा गति दुसर्‍या प्रदेशांमध्येहि आढळून येत असल्यामुळे गतीविरुद्धच दिसते याप्रमाणे ध्रुवाला आणि मेरुपर्वताला उजवा घालून धावणार्‍या नक्षत्र व राशी ह्यांनी दर्शविलेल्या कालचक्रासह धावणार्‍या कालचक्राचा आश्रय केलेल्या सूर्यादिक ग्रहांची गती इतर नक्षत्रांच्या ठिकाणी आणि इतर राशींच्या ठिकाणी आढळून येत असल्यामुळे उलटीच दिसते. ॥२॥

सः एषः भगवान् आदिपुरुषः साक्षात् नारायणः एव कविभिः अपि वेदेन विजिज्ञास्यमानः लोकानां स्वस्तये त्रयीमयं कर्मविशुद्धिनिमित्तं आत्मानं द्वादशधा विभज्य षट्‌सु वसन्तादिषु ऋतुषु यथोपजोषं ऋतुगुणान् विदधाति तो हा भगवान आदिपुरुष प्रत्यक्ष सूर्यनारायणच विद्वानांनीहि वेदाने जाणिला जाणारा लोकांच्या कल्याणाकरिता वेदरूपी कर्माची शुद्धि करणार्‍या अशा स्वतःला बारा मूर्तींनी विभागून सहा वसंतादिक ऋतूंमध्ये कर्मभोगास योग्य असे ऋतूंचे गुण निर्माण करितो. ॥३॥

इह वर्णाश्रमाचारानुपथाः पुरुषाः त्रय्या विद्यया आम्नातैः उच्चावचैः कर्मभिः योगवितानैः च श्रद्धया तं एतं यजन्तः अंजसा श्रेयः समधिगच्छन्ति येथे वर्ण व आश्रम ह्यांच्या आचाराला अनुसरणारे पुरुष तीन वेदरूपी विद्येने शास्त्रांत सांगितलेल्या लहानमोठया कर्मांनी योगसाधनांनी आणि श्रद्धेने त्या ह्या सूर्यनारायणाला पूजणारे तत्काल कल्याण पावतात. ॥४॥

अथ सः एषः लोकानां आत्मा द्यावापृथिव्योः अन्तरेण नभोवलयस्य कालचक्रगतः राशिसंज्ञान् संवत्सरावयवान् द्वादशमासान् भुङ्‌क्ते मासः पक्षद्वयं च पितृणाम् दिवानक्तं वा सौरं सपादर्क्षद्वयं इति उपदिशन्ति यावता (दिवः) षष्ठम् अंशं भुंजीत सः वै संवत्सरावयवः ऋतुः इति उपदिश्यते आता तो हा प्राण्यांचा आत्म्याप्रमाणे असणारा सूर्यनारायण स्वर्ग व पृथिवी यांच्या मधील भागाने आकाशमंडळातील ज्योतिश्‍चक्ररूपी कालचक्रावरून फिरणारा असा राशींची नावे असलेल्या वर्षाचे भाग अशा बारा महिन्यांना उपभोगितो एक महिना म्हणजे शुक्ल व कृष्ण असे दोन पक्ष आणि पितरांचे एक अहोरात्र किंवा सूर्याची सव्वादोन नक्षत्रे इतका काळ होय असे म्हणतात जितक्या वेळाने आकाशमंडळाचा सहावा हिस्सा भोगतो तो खरोखर वर्षाचा भाग ऋतु असे म्हटले जाते. ॥५॥

अथ च यावता अर्धेन नभोवीथ्यां प्रचरति तं कालं अयनं आचक्षते आणखीहि जितक्या काळात वर्षाच्या अर्ध्याने आकाशमार्गात संचार करितो त्या काळाला अयन असे म्हणतात. ॥६॥

अथ च सः ह यावत् नभोमंडलं द्यावापृथिव्योः मंडलाभ्यां सह कार्त्स्न्येन भुंजीत तं कालं संवत्सरं परिवत्सरं इडावत्सरं अनुवत्सरं वत्सरं इति भानोः मान्द्यशैघ्न्यसमगतिभिः आणखीहि तो सूर्य खरोखर जितके आकाशमंडल स्वर्ग व पृथिवी ह्यांच्या मंडळांसह सर्वथा भोगितो त्या काळाला संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, अनुवत्सर, वत्सर असे सूर्याच्या मंद, शीघ्र व मध्यम अशा ह्या गतींना अनुसरून मानितात. ॥७॥

एवं अर्कगभस्तिभ्यः उपरिष्टात् लक्षयोजनतः उपलभ्यमानः अग्रचारी द्रुततरगमनः चंद्रमाः अर्कस्य संवत्सरभुक्तिं पक्षाभ्यां मासभुक्तिं सपादर्क्षाभ्यां पक्षभुक्तिं दिनेन एव भुङ्‌क्ते याप्रमाणे सूर्यकिरणांहून वरती लक्ष योजने दूर आढळणारा पुढे चालणारा शीघ्र गतीचा चंद्र सूर्याच्या वर्षातील भोगाला शुक्ल व कृष्ण ह्या दोन पक्षांनी एक महिन्याच्या भोगाला सव्वादोन नक्षत्रांनी पंधरवडयाच्या भोगाला एकाच दिवसाने उपभोगितो. ॥८॥

अथ च पूर्वपक्षापरपक्षाभ्यां आपूर्यमाणाभिः कलाभिः अमराणां च क्षीयमाणाभिः कलाभिः पितृणां अहोरात्राणि वितन्वानः च सर्वजीवनिवहप्राणः जीवः एकं एकं नक्षत्रं त्रिंशता मुहूर्तैः भुङ्‌क्ते आणखीहि पहिला शुक्लपक्ष व दुसरा कृष्णपक्ष यांनी अनुक्रमे भरून जाणार्‍या अंशांनी देवांच्या आणि क्षय पावणार्‍या अंशांनी पितरांच्या दिवसरात्रीच्या जोडया करणारा आणि सर्व प्राणीसमूहांचा प्राणच असा जीवरूप एकेक नक्षत्र तीस मुहूर्तांनी भोगितो. ॥९॥

यः एषः षोडशकलः पुरुषः भगवान् (चंद्रः) मनोमयः अन्नमयः देवपितृमनुष्यभूतपशुपक्षिसरीसृपवीरुधां प्राणाप्यायनशीलत्वात् सर्वमयः (अस्ति) इति वर्णयन्ति जो हा सोळा अंशांनी युक्त असा पुरुषरूपी भगवान चंद्र मनोरूपी अन्नरूपी देव, पितर, मनुष्य, भूते, पशु, पक्षी, साप व वेली ह्यांच्या प्राणांचे वर्धन करण्याचा स्वभाव असल्यामुळे सर्वव्यापी आहे असे वर्णितात. ॥१०॥

ततः उपरिष्टात् त्रिलक्षयोजनतः कालायने ईश्वरयोजितानि अभिजिता सह अष्टाविंशतिः नक्षत्राणि मेरुं दक्षिणेन एव चरन्ति ह्याहून वरती तीन लक्ष योजने दूर कालचक्रावर परमेश्वराने स्थापिलेली अभिजितनामक नक्षत्रासह अठठावीस नक्षत्रे मेरुपर्वताला प्रदक्षिणा घालूनच फिरतात. ॥११॥

ततः उपरिष्टात् द्विलक्षयोजनतः उशनाः उपलभ्यते अर्कस्य पुरतः पश्‍चात् वा सह एव शैघ्न्यमांद्यसाम्याभिः गतिभिः अर्कवत् चरति लोकानां नित्यदा अनुकूलः एव सः प्रायेण वर्षयन् चारेण वृष्टिविष्टंभग्रहोपशमनः अनुमीयते त्याहून वरती दोन लक्ष योजने दूर शुक्राचार्य दिसतो सूर्याच्या पुढे मागे किंवा बरोबरच शीघ्र, मंद व मध्यम अशा गतींनी सूर्याप्रमाणे चालतो सर्व प्राणिमात्रांना नेहमी अनुकूलच असतो तो बहुधा वृष्टि करणारा गतीने पावसाचा प्रतिबंध करणार्‍या ग्रहांची शांति करणारा असे अनुमान केले जाते. ॥१२॥

उशनसा बुधः व्याख्यातः ततः उपरिष्टात् द्विलक्षयोजनतः उपलभ्यमानः सोमसुतः बुधः प्रायेण शुभकृत् अर्कात् व्यतिरिच्येत तदा सः अतिवाताभ्रप्रायानावृष्टयादिभयं आशंसते शुक्राच्या गतीवरून बुध वर्णिल्यासारखाच आहे त्या शुक्राहून दोन लक्ष योजने वरती आढळणारा चंद्राचा मुलगा बुध बहुतेक चांगले फळ देणारा जेव्हा सूर्यावरून उल्लंघन करून जाईल त्यावेळी तो वादळ, अतिवृष्टि किंवा अनावृष्टि यांचे भय सुचवितो. ॥१३॥

अतः ऊर्ध्वं योजनलक्षद्वितये उपलभ्यमानः अंगारकः अपि यदि वक्रेण न अभिवर्तते त्रिभिः त्रिभिः पक्षैः एकैकशः द्वादश राशीन् अनुभुङ्‌क्ते प्रायेण अघशंसः अशुभग्रहः (अस्ति) ह्या बुधाहून वरती दोन लक्ष योजनांवर आढळणारा मंगळ जर करिता वक्रगतीने चालत नसेल तर तीन तीन पक्षांनी एक एक राशीला क्रमाने बारा राशींना उपभोगितो बहुधा दुःखसूचक पापग्रह आहे. ॥१४॥

ततः उपरिष्टात् द्विलक्षयोजनान्तरगतः भगवान् बृहस्पतिः यदि वक्रः न स्यात् (तर्हि) एकैकस्मिन्‌राशौ परिवत्सरं परिवत्सरं चरति प्रायेण ब्राह्मणकुलस्य अनुकूलः (अस्ति) त्या मंगळाहून वरती दोन लक्ष योजने अन्तरावर फिरणारा भगवान बृहस्पति जर वक्र गेलेला नसेल तर प्रत्येक राशीमध्ये एक एक वर्ष फिरतो बहुधा ब्राह्मण कुळाला अनुकूल असतो. ॥१५॥

तत् उपरिष्टात् योजनलक्षद्वयात् प्रतीयमानः शनैश्‍चरः एकैकस्मिन् राशौ त्रिंशन्मासान् विलंबमानः तावद्‌भिः अनुवत्सरैः सर्वान् एव राशीन् अनुपर्येति हि प्रायेण सर्वेषां अशान्तिकरः अस्ति त्या बृहस्पतीहून वरती दोन लक्ष योजनांवर दिसून येणारा शनिग्रह प्रत्येक राशीमध्ये तीस महिनेपर्यंत थांबणारा तितक्याच वर्षांनी सर्व राशींना प्रदक्षिणा घालतो खरोखर बहुधा सर्व प्राण्यांना अकल्याणकारक आहे. ॥१६॥

ततः उत्तरस्मात् एकादशलक्षयोजनान्तरे ऋषयः उपलभ्यन्ते ये एव लोकानां शं अनुभावयन्तः भगवतः विष्णोः यत् परमं पदं तत् प्रदक्षिणं प्रक्रमन्ति तेथून वरच्या प्रदेशी अकरा लक्ष योजनांच्या अंतरावर सप्त ऋषि आढळतात, जे ऋषिच सर्व प्राणिमात्रांचे कल्याण चिंतिणारे असे भगवान विष्णूचे जे श्रेष्ठ स्थान त्याला प्रदक्षिणा घालून फिरत असतात. ॥१७॥

पंचम स्कन्धः - अध्याय बाविसावा समाप्त

GO TOP