श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय २१ वा - अन्वयार्थ

सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन -

एतावान् एव भूवलयस्य सन्निवेशः प्रमाणलक्षणतः व्याख्यातः इतकीच भूमंडळाची रचना लांबी, रुंदी व लक्षणे यायोगे सांगितली आहे. ॥१॥

तद्विदः हि एतेन यथा निष्पावादीनां द्विदलयोः (तथा) दिवः मंडलमानं उपदिशन्ति ते अन्तरेण तदुभयसंधितम् अन्तरिक्षं (अस्ति) तज्ञ लोक खरोखर ह्या भूमंडलप्रमाणावरून जसे पावटा वगैरेंच्या दोन पानांचे तसे स्वर्गाच्या वर्तुळाचे प्रमाणे सांगतात त्याच्या मध्ये त्या दोघांच्या सांध्यावर लागून ठेविलेले आकाश आहे. ॥२॥

यन्मध्यगतः भगवान् तपतां पतिः तपनः आतपेन त्रिलोकीं प्रतपति आत्मभासा अवभासयति सः एषः उदगयनदक्षिणायनवैषुवतसंज्ञाभिः मांद्यशैघ्रसमानाभिः गतिभिः आरोहणावरोहणसमानस्थानेषु यथासवनं मकरादिषु राशिषु अभिपद्यमानः दीर्घर्‍हस्वसमानानि विधत्ते ज्या ब्रह्माण्डगोलाच्यामध्ये राहिलेला सर्वगुणसंपन्न तेजांचा स्वामी सूर्य उन्हाने त्रैलोक्याला उष्णता पुरवितो, आपल्या कांतीने प्रकाशित करतो तो हा सूर्य उदगयन, दक्षिणायन व वैषुवत या नावाच्या मंद, शीघ्र व मध्यम अशा गतींनी चढण, उतरण व सपाटी अशा स्थानांवर कालमानाला अनुसरून मकरादिक राशींच्या ठिकाणी चालणारा मोठी, लहान व सारखी करितो. ॥३॥

यदा मेषतुलयोः (सः) वर्तते तदा अहोरात्राणि समानानि भवन्ति यदा वृषभादिषु पञ्चसु राशिषु चरति तदा अहानि एव वर्धन्ते मासिमासि च रात्रिषु एकाएका घटिका ह्‌रसति जेव्हा मेषराशि व तुलाराशि याठिकाणी तो असतो त्यावेळी दिवस व रात्री सारखी होतात जेव्हा वृषभादि पाच राशींमध्ये फिरतो त्यावेळी दिवसच वाढतात आणि प्रत्येक महिन्यातील रात्रीत एकेक घटका कमी होते. ॥४॥

यदा वृश्‍चिकादिषु पंचसु वर्तते तदा अहोरात्राणि विपर्ययाणि भवन्ति जेव्हा वृश्‍चिक आदिकरून पाच राशींमध्ये सूर्य असतो, त्यावेळी दिवस व रात्री उलट प्रकारच्या होतात. ॥५॥

यावत् दक्षिणायनं (अस्ति) तावत् अहानि वर्धन्ते यावत् उदगयनं (अस्ति) तावत् रात्रयः वर्धन्ते जोपर्यंत दक्षिणायन असते तोपर्यंत दिवस वाढतात जोपर्यंत उदगयन असते तोपर्यंत रात्री वाढतात. ॥६॥

एवं मानसोत्तर गिरिपरिवर्तनस्य योजनानां नवकोटयः एकपंचाशत् लक्षाणि तस्मिन् मेरोः पूर्वस्मात् देवधानीं नाम ऐंद्री पुरीं दक्षिणतः संयमनीं नाम याम्यां पश्‍चात् निम्लोचनीं नाम वारुणीं उत्तरतः विभावरीं नाम सौ‌म्यां तासु मेरोः चतुर्दिशं भूतानां प्रवृत्तिनिवृत्तिनिमित्तानि उदयमध्याह्‌नास्तमयनिशीथानि इति समयविशेषेण उपदिशन्ति याप्रमाणे मानसोत्तर पर्वताच्या प्रदक्षिणेची नऊ कोटी एकावन्न लक्ष योजने आहेत, त्या पर्वतावर मेरुपर्वताच्या पूर्वेकडे देवधानी नावाची इंद्राची नगरी, दक्षिणेकडे संयमनी नावाची यमाची नगरी, पश्‍चिमेकडे निम्लोचनी नावाची वरुणाची नगरी, उत्तरेकडे विभावरी नाव असलेली सोमाची नगरी, त्या नगरीमध्ये मेरुपर्वताच्या चारी दिशांकडे प्राण्यांची काम करावयास व ते ठेवावयास लावणारी सूर्योदय, मध्याह्‌नकाळ, सूर्यास्त व मध्यरात्र अशी कालमानाच्या भिन्नपणावरून दर्शवितात. ॥७॥

तत्रत्यानां सदा दिवसमध्यंगतः एव आदित्यः तपति अचलं सव्येन कुर्वन् अपि दक्षिणेन करोति त्या मेरुपर्वतावरील लोकांना नेहमी मध्यान्हाला आल्यासारखाच सूर्य ताप देतो, मेरुपर्वताला डावीकडून प्रदक्षिणा करीत असूनहि उजवीकडून प्रदक्षिणा करतो. ॥८॥

यत्र उदीत तस्य ह समानसूत्रनिपाते निम्लोचति एषः यत्र क्वचन स्यंदेन अभितपति तस्य ह समानसूत्रनिपाते प्रस्वापयति ये तं समनुपश्येरन् ते तत्र गतं न पश्यन्ति ज्याठिकाणी उदयाला येतो, त्याच ठिकाणच्या सारख्या सुताच्या समोरील समांतररेषेत अस्ताला जातो, हा सूर्य ज्याठिकाणी कोठेतरी घाम येण्याइतक्या उन्हाने उष्ण प्रकाश देतो, त्याच्याच सारख्या सुताच्या समोरील समांतर रेषेत असणार्‍यांना गाढ झोपी नेतो, जे त्या सूर्याला स्वतःच्या प्रदेशात पहातात, ते समोरील समांतर रेषेतील मध्यरात्री झोपी गेलेल्यांच्या प्रदेशात गेलेल्याला पहात नाहीत. ॥९॥

यदा ऐंद्रयाः पुर्याः प्रचलते तदा पंचदशघटिकाभिः योजनानां सपादकोटिद्वयं साधिकानि सार्धद्वादशलक्षाणि च याम्यां उपयाति जेव्हा इंद्राच्या नगरीहून तो चालू लागतो, त्या वेळेपासून पंधरा घटिकांनी सव्वादोन कोटी साडेबारा लक्षाहून काही अधिक इतकी योजने चालून यमाच्या नगरीला जाऊन पोहोचतो. ॥१०॥

एवं ततः वारुणीं सौ‌म्यां च पुनः ऐंद्रीं उपयाति तथा अन्ये च सोमादयः ग्रहाः नक्षत्रैः सह ज्योतिश्‍चक्रे समभ्युद्यन्ति वा सह निम्लोचन्ति ह्याप्रमाणे त्या यमनगरीतून वरुण नगरीला, सोमनगरीला आणि फिरून इंद्रनगरीला जातो त्याप्रमाणे दुसरेहि सोम वगैरे ग्रह, नक्षत्रांसह ज्योतिर्मंडलामध्ये उदय पावतात किंवा त्यासह अस्ताला जातात. ॥११॥

एवं सौरः त्रयीमयः असौ रथः मुहूर्तेन अष्टशताधिकानिचतुस्त्रिंशल्लक्षयोजनानि चतुसृषु पुरीषु परिवर्तते याप्रमाणे सूर्याचा वेदत्रयीरूप हा रथ दोन घटकांच्या कालावधीत चौतीस लक्ष आठशेहून काही अधिक इतकी योजने चारीहि नगरीमध्ये फिरतो. ॥१२॥

यस्य एकं चक्रं द्वादशारं षण्नेमि त्रिणाभि संवत्सरात्मकं समामनन्ति तस्य अक्षः मेरोः मूर्धनि कृतः मानसोत्तरे कृतेतरभागः यत्र प्रोतं रविरथचक्रं तैलयंत्रचक्रवत् मानसोत्तरगिरौ भ्रमत् परिभ्रमति ज्याचे एक चाक बारा आरांचे, सहा धावांचे, तीन तुंब्यांचे वर्षरूपी मानितात, त्या रथाचा आंस मेरुपर्वताच्या शिखरावर केला आहे, मानसोत्तर पर्वतावर ज्याचा दुसरा भाग ठेविला आहे असा आहे, जेथे गोवलेले सूर्याच्या रथाचे चाक तेलाच्या घाण्याप्रमाणे मानसोत्तर पर्वतावर फिरत वाटोळे फिरत असते. ॥१३॥

तस्मिन् अक्षे कृतमूलः द्वितीयः अक्षः तुर्यमानेन संमितः ध्रुवे तैलयंत्राक्षवत् कृतोपरिभागः त्या आंसावर बांधिले आहे टोक ज्याचे असा दुसरा आंस चतुर्थांशाप्रमाणे मानलेला असून ध्रुवावर तेलाच्या घाण्याच्या दांडयाप्रमाणे ज्याचा वरील भाग दोरीने घट्ट बांधून टाकिला आहे असा आहे. ॥१४॥

रथनीडः तु षट्‌त्रिंशल्लक्षयोजनायतः यत्तुरीयभागविशालः तावान् रविरथयुगः यत्र छंदोनामानः अरुणयोजिताः सप्त हयाः देवं आदित्यं वहन्ति रथामधील बसावयाची जागा तर छत्तीस लक्ष योजने विस्तृत आहे त्याच्या चतुर्थांश म्हणजे नऊ लक्ष योजने विस्तृत इतके सूर्याच्या रथाचे जोखड आहे ज्या जोखडाला गायत्र्यादि सात छंदांची नावे आहेत ज्यांना असे अरुण नामक सारथ्याने जुंपलेले सात घोडे प्रकाशमान सूर्याला वाहून नेतात. ॥१५॥

सवितुः पुरस्तात् च पश्‍चात् नियुक्तः अरुणः किल सौत्ये कर्मणि आस्ते सूर्याच्या पुढे आणि पश्‍चिमेकडे तोंड करून बसलेला नेमिलेला अरुण खरोखर सारथ्याच्या कामात तत्पर असतो. ॥१६॥

तथा अंगुष्ठपर्वमात्राः षष्टिसहस्राणि वालखिल्याः ऋषयः सूर्यं पुरतः सूक्तवाकाय नियुक्ताः संस्तुवन्ति त्याप्रमाणे अंगठयाच्या पेराएवढाले साठ हजार वालखिल्य नाव असलेले ऋषि सूर्याला संमुख करून स्तोत्ररूपी वाणी उच्चारण्याकरिता योजिलेले असे स्तुति करितात. ॥१७॥

तथा अन्ये च ऋषयः गंधर्वाप्सरसः नागाः ग्रामण्यः यातुधानाः देवाः इति एकैकशः चतुर्दश द्वंद्वशुः सप्त गणाः पृथङ्‌नानानामानः मासिमासि भगवन्तं सूर्यं आत्मानं नानानामानं पृथक् कर्मभिः उपासते त्याप्रमाणे दुसरेहि ऋषि, गंधर्व व अप्सरा, नाग, ग्रामणी, यातुधान, देव असे एकेक मोजले असता चौदा गण जोडीजोडीने मोजिले असता सात गण प्रत्येक निरनिराळी अनेक नावे धारण करणारे असे प्रत्येक महिन्यात सर्वगुणसंपन्न अशा सूर्यस्वरूपी आत्म्याला बारा महिन्यांच्या सूर्याच्या बारा नावांनी निरनिराळ्या कर्मांनी सेवितात. ॥१८॥

भूवलयस्य लक्षोत्तरं सार्धनवकोटियोजनपरिमंडलं सः क्षणेन सगव्युत्युत्तरं द्विसहस्रयोजनानि भुङ्क्ते भूमंडळाचा साडेनऊ कोटीहून कित्येक लक्ष मोठा इतका परिघ आहे तो सूर्य क्षणात दोन हजार योजने व दोन कोस अधिक इतका प्रदेश आक्रमण करितो. ॥१९॥

पंचम स्कन्धः - अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP