श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय १९ वा - अन्वयार्थ

किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन -

किंपुरुषे वर्षे तच्चरणसन्निकर्षाभिरतः परमभागवतः हनूमान किंपुरुषै सह अविरतभक्तिः भगवन्तं आदिपुरुषं लक्ष्मणाग्रजं सीताभिरामं रामं उपास्ते किंपुरुषखंडामध्ये त्या उपास्य देवतेच्या पायांच्या सहवासात रमलेला मोठा भगवद्‌भक्त हनुमान किंपुरुष नामक लोकांसह अखंड भक्ति करणारा असा सर्वगुणसंपन्न सर्वाचे मूळकारण महापुरुष अशा लक्ष्मणाचा ज्येष्ठ बंधु अशा सीतेच्या मनाला रमविणार्‍या रामचंद्राला सेवितो. ॥१॥

आर्ष्टिषेणेन सह गंधर्वैः अनुगीयमानां परमकल्याणीं भर्तृभगवत्कथां समुपशृणोति स्वयं च इदं गायति आर्ष्टिषेणासह गंधर्वांनी नित्य गायिलेल्या अत्यंत कल्याण करणार्‍या, धनी जो भगवान रामचंद्र त्याच्या कथेला ऐकतो आणि स्वतः हे गातो. ॥२॥

ओम् भगवते उत्तमश्‍लोकाय नमः आर्यलक्षणशीलव्रताय नमः उपशिक्षितात्मने उपासितलोकाय नमः साधुवादनिकषणाय नमः ब्रह्मण्यदेवाय नमः महापुरुषाय महाराजाय नमः इति प्रणवरूपी, सर्वगुणसंपन्न, श्रेष्ठ आहे कीर्ति ज्याची अशा श्रीरामचंद्राला नमस्कार असो, चांगली व श्रेष्ठ आहेत लक्षणे, स्वभाव व नियम ज्याचे अशा भगवंताला नमस्कार असो, मनोनिग्रह करणार्‍या लोकसंग्रहाला धरून वागणार्‍या परमेश्वराला नमस्कार असो, साधुपणाची कसोटीच की काय अशा श्रीरामचंद्राला नमस्कार असो, ब्राह्मणांचे कल्याण करणारा देवच अशा ईश्वराला नमस्कार असो, पुरुषोत्तम अशा राजाधिराज श्रीरामचंद्राला नमस्कार असो, असे ॥३॥

हि यत् विशुद्धानुभवमात्रं एकं स्वतेजसा ध्वस्तगुणव्यवस्थं प्रत्यक् प्रशान्तं सुधिया उपलंभनं अनामरूपं निरहं तत् प्रपद्ये कारण जे अत्यंत शुद्ध अनुभवरूप अद्वितीय आपल्या तेजाने नष्ट केली आहे गुणांची व्यवस्था ज्याने अशा दृश्याहून भिन्न अत्यंत शांतस्वरूपी सद्‌बुद्धीने अनुभवला जाणार्‍या नामरूपातील अहंकाररहित अशा त्या श्रीरामचंद्रस्वरूपाला मी शरण आहे. ॥४॥

इह विभोः मर्त्यावतारः तु केवलं रक्षोवधाय एव न मर्त्यशिक्षणं अन्यथा स्वे रमतः आत्मनः ईश्वरस्य सीताकृतानि व्यसनानि (इति) कुतः स्यात् येथे परमेश्वराचा मनुष्ययोनीत घेतलेला अवतार तर केवळ रावणादि राक्षसांना मारण्याकरिताच नव्हे, मनुष्यांना सन्मार्ग दाखविण्याकरिताच होय, तसे नसेल तर स्वतःच्या ठिकाणी रममाण होणार्‍या परमात्मस्वरूपी श्रीरामचंद्राला सीतेमुळे प्राप्त झालेली दुःखे व्हावी हे कसे होईल ॥५॥

सः आत्मवतां आत्मा च सुहृत्तमः भगवान् वासुदेवः त्रिलोक्यां न वै सक्तः स्त्रीकृतं कश्‍मलं न अश्‍नुवीत लक्ष्मणं च अपि विहातुं न अर्हति तो ज्ञानी पुरुषांचा आत्मा आणि अत्युत्तम मित्र असा सर्वगुणसंपन्न सर्वव्यापी श्रीरामचंद्र त्रैलोक्यामध्ये कधीहि आसक्त होत नाही, स्त्रीनिमित्त दुःख भोगीत नाही, लक्ष्मणाला सुद्धा टाकण्यास योग्य नाही. ॥६॥

नूनं महतः जन्म तस्य तोषहेतुः न सौभगं न वाक् न बुद्धिः न आकृतिः न यत् लक्ष्मणाग्रजः तैः विसृष्टान् अपि वनौकसः नः सख्ये बत चकार खरोखर मोठया पुरुषापासून जन्म त्या रामाच्या संतोषाला कारण नाही, सौंदर्य नाही, वाणी नाही, बुद्धि नाही, आकार नाही, कारण लक्ष्मणाचा ज्येष्ठ बंधु रामचंद्र त्या जन्मादि गुणांनी रहित अशा सुद्धा वनात राहणार्‍या आम्हाला मित्रत्वात खरोखर घेता झाला. ॥७॥

सुरः असुरः वा वानरः अथ अपि नरः वा यः (कः अपि स्यात्) सुकृतज्ञं उत्तमं मनुजाकृतिं रामं हरिं सर्वात्मना भजेत यः उत्तरान् कोसलान् अनयत् तं इति (स्तौति) देव, दैत्य किंवा वानर अथवा मनुष्य किंवा जो कोणी असेल, सत्कृत्याला जाणणार्‍या श्रेष्ठ अशा मनुष्ययोनीत जन्म घेतलेल्या रामरूप भगवंताला सर्वप्रकारे भजावे, जो राम उत्तरकोसल देशातील लोकांना नेता झाला त्याची अशी स्तुति करितो. ॥८॥

भारते वर्षे अपि भगवान् नरनारायणाख्यः अव्यक्तगतिः अनुकंपया आत्मवतां अनुग्रहाय आकल्पान्तं उपचितधर्मज्ञानवैराग्यैश्वर्योपशमोपरमात्मोपलम्भनम् तपः चरति भरत खंडामध्येही सर्वगुणसंपन्न नरनारायण नाव असलेला, ज्याचे स्वरूप अस्पष्ट आहे असा ईश्वर कृपेने ज्ञानी पुरुषांवर अनुग्रह करण्याकरिता कल्प संपेपर्यंत धर्म, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, शांति व विषयत्याग हे गुण वाढवून परमात्मप्राप्ति करून देणारे तप आचरितो. ॥९॥

सावर्णेः भगवदनुभावोपवर्णनम् उपदेक्ष्यमाणः भगवान् नारदः वर्णाश्रमवतीभिः भारतीभिः प्रजाभिः तं भगवत्प्रोक्ताभ्यां सांख्ययोगाभ्यां परमभक्तिभावेन उपसरति इदं च अभिगृणाति सावर्णि मनूला भगवंताच्या प्रभावाचे वर्णन सांगणारा, भगवान नारद चार आश्रम व चार वर्ण ह्यांनी युक्त अशा भरतखंडात रहाणार्‍या प्रजांसह त्या नारायणाला भगवंताने सांगितलेल्या सांख्यशास्त्र व योगमार्ग यांनी वाढलेल्या अत्यंत भक्तियोगाने सेवितो आणि हा मंत्र जपतो. ॥१०॥

ओम् भगवते उपरतानात्म्याय अकिञ्चनवित्ताय ऋषिऋषभाय नरनारायणाय नमोनमः परमहंसपरमगुरवे आत्मारामाधिपतये नमोनमः इति प्रणवरूपी, सर्वगुणसंपन्न, ज्याने अहंकार सोडिला आहे अशा, सर्वसंगपरित्याग हेच ज्याचे द्रव्य आहे अशा, ऋषींमध्ये श्रेष्ठ अशा, नरनारायणाला वारंवार नमस्कार असो, परमहंस व श्रेष्ठ गुरु अशा, आत्म्याच्या ठिकाणी रममाण होणार्‍यांचा स्वामी अशा ईश्वराला वारंवार नमस्कार असो अशा. ॥११॥

इदं च गायति यः अस्य सर्गादिषु कर्ता अपि न बध्यते देहगतः अपि दैहिकैः न हन्यते द्रष्टुः यस्य दृक् गुणैः न विदूष्यते तस्मै असक्तविविक्तसाक्षिणे नमः आणि हे गातो जो ह्या जगाच्या उत्पत्त्यादिकांमध्ये करणारा असूनहि बांधला जात नाही, देह धारण करणारा असूनहि देहसंबंधीच्या क्षुधा, तृषा इत्यादि धर्मांनी पीडिला जात नाही, पहाणार्‍या ज्याची दृष्टि गुणांनी विकार पावत नाही, त्या आसक्ति न ठेविता शुद्धबुद्धीने सर्व व्यवहार प्रत्यक्ष पहाणार्‍या नरनारायणाला नमस्कार असो. ॥१२॥

योगेश्वर हिरण्यगर्भः भगवान यत् यत् योगनैपुणं जगाद (तत्) इदं हि उज्झितदुष्कलेवरः (पुरुषः) अंतकाले निर्गुणे त्वयि भक्त्या मनः आदधीत हे योगाधिपते, सुवर्णाचे ब्रह्मांड ज्याच्या उदरात राहिले आहे असा परमेश्वर ज्यामुळे जे योगमार्गातील कौशल्य सांगता झाला ते हेच होय, सोडिले आहे अहंकारमय वाईट शरीर ज्याने अशा पुरुषाने मरण समयी त्रिगुणरहित अशा तुझ्याठिकाणी भक्तीने मन ठेवावे. ॥१३॥

ऐहिकामुष्मिककामलंपटः सुतेषु दारेषु धनेषु चिन्तयन् यथा (शंकते) विद्वान् कुकलेवरात्ययात् शंकेत तस्य (ज्ञाने) यत्‍नः केवलं श्रमः एव ह्या लोकात व परलोकी मिळणार्‍या सुखोपभोगाविषयी आसक्तचित्त झालेला पुत्रांच्याठिकाणी, स्त्रियांच्या ठिकाणी, द्रव्याच्याठिकाणी, आसक्ति ठेवून चिंतन करणारा जसा भितो, ज्ञानी पुरुष वाईट शरीराच्या नाशापासून भय बाळगील त्याचा ज्ञानाविषयींचा प्रयत्‍न केवळ श्रमच होय. ॥१४॥

तत् प्रभो अधोक्षज त्वं नः प्रसीद वयं त्वन्मायया कुकलेवरार्पितां सुदुर्भिदां अहंममतां येन आशु भिंद्याम त्वयि स्वभावं योगं नः विधेहि इति त्या कारणास्तव हे समर्था, हे जितेंद्रिय नरनारायणा, तू आम्हावर प्रसन्न हो, आम्ही तुझ्या मायेने वाईट अशा शरीरामध्ये असणार्‍या नाहीशी करण्यास अत्यंत कठीण अशा मीपणा व माझेपणा ह्यांना ज्या योगसाधनेने लवकर फोडून टाकू, तुझ्याठिकाणी सहजसिद्ध असणार्‍या योगाला आम्हास दाखीव असे. ॥१५॥

अस्मिन् भारते वर्षे अपि सरिच्छैलाः बहवः सन्ति मलयः त्रिकूटः ऋषभः कूटकः कोल्लकः सह्यः देवगिरिः ऋष्यमूकः श्रीशैलः वेङ्‌कटः महेंद्रः वारिधारः विंध्यः शुक्तिमान् ऋक्षगिरिः पारियात्रः द्रोणः चित्रकूटः गोवर्धनः रैवतकः ककुभः नीलः गोकामुखः इंद्रकीलः कामगिरिः इति अन्ये च शतसहस्रशः शैलाः च तेषां नितंबप्रभवाः नदाः च नद्यः असंख्याताः सन्तिः ह्या भरतखंडामध्येही नद्या व पर्वत पुष्कळ आहेत, मलय, त्रिकूट, ऋषभ, कूटक, कोल्लक, सह्य, देवगिरि, ऋष्यमूक, श्रीशैल, वेंकट, महेंद्र, वारिधार, विंध्य, शुक्तिमान, ऋक्षपर्वत, पारियात्र, द्रोण, चित्रकूट, गोवर्धन, रैवतक, ककुभ, नील, गोकामुख, इंद्रकील, कामगिरि याप्रमाणे दुसरेहि शेकडो हजार पर्वत आणि त्या पर्वतांच्या तटांपासून उत्पन्न झालेले नद व नद्या अगणित आहेत. ॥१६॥

च भारत्यः प्रजाः नामभिः एव पुनन्तीनां एतासां अपः आत्मना उपस्पृशन्ति आणि भरतखंडात रहाणारे लोक नावांनीच पवित्र करणार्‍या ह्या नद्यांच्या उदकांना स्वतः आचमनादिक करून सेवितात. ॥१७॥

चंद्रवशा ताम्रपर्णी अवटोदा कृतमाला वैहायसी कावेरी वेणी पयस्विनी शर्करावर्ता तुंगभद्रा कृष्णा वेण्या भीमरथी गोदावरी निर्विंध्या पयोष्णी तापी रेवा सुरसा नर्मदा चर्मण्वती सिंधुः च अंधः शोणः नदौ महानदी वेदस्मृतिः ऋषिकुल्या त्रिसामा कौशिकी मंदाकिनी यमुना सरस्वती दृषद्वती गोमती सरयू रोधस्वती सप्तवती सुषोमा शतद्रुः चंद्रभागा मरुद्वधा वितस्ता असिक्री विश्वा इति महानद्यः सन्ति चंद्रवशा, ताम्रपर्णी, अवटोदा, कृतमाला, वैहायसी, कावेरी, वेणी, पयस्विनी, शर्करावर्ता, तुंगभद्रा, कृष्णा, वेण्या, भीमरथी, गोदावरी, निर्विंध्या, पयोष्णी, तापी, रेवा, सुरसा, नर्मदा, चर्मण्वती, सिंधु, आणि अंध, शोण, हे दोन नद, महानदी, वेदस्मृति, ऋषिकुल्या, त्रिसामा, कौशिकी, मंदाकिनी, यमुना, सरस्वती, दृषद्वती, गोमती, सरयू, रोधस्वती, सप्तवती, सुषोमा, शतद्रु, चंद्रभागा, मरुद्वधा, वितस्ता, असिक्री, विश्वा याप्रमाणे मोठया नद्या आहेत. ॥१८॥

अस्मिन् एव वर्षे लब्धजन्मभिः पुरुषैः शुक्ललोहितकृष्णवर्णेन स्वारब्धेन कर्मणा बह्‌व्यः दिव्यमानुषनारकगतयः आत्मनः आनुपूर्व्येण विधीयन्ते हि सर्वाः एव सर्वेषां यथावर्णविधानं अपवर्गः च अपि भवति ह्याच खंडात ज्यांना जन्म मिळाला आहे अशा पुरुषांनी सात्त्विक शुभ्र अशा, राजस तांबडया वर्णाच्या व तामस कृष्णरंगाच्या अशा स्वतः आरंभिलेल्या कर्माने पुष्कळ स्वर्गीय, मनुष्यलोकातील व नरकामधील अशा गति स्वतःच्या पुण्यपापरूप कर्माच्या अनुक्रमाने मिळतात कारण संपूर्ण गतीसुद्धा सर्वांना वर्णाला अनुसरून कर्माच्या मानाने मोठा सुद्धा मिळतो. ॥१९॥

यः असौ (अपवर्गः) भगवति सर्वभूतात्मनि अनात्म्ये अनिरुक्ते अनिलयने परमात्मनि वासुदेवे अनन्यनिमित्तभक्तियोगलक्षणः नानागतिनिमित्ताविद्याग्रंथिरंधनद्वारेण (भवति) यदा हि महापुरुषप्रसङ्‌गः भवति जो हा मोक्ष सर्वगुणसंपन्न सर्व प्राण्यांचे ठिकाणी आत्मरूपाने रहाणार्‍या रागादिदोषरहित वाणीला अगोचर आधाररहित सर्वव्यापी परमेश्वराच्या ठिकाणी निष्काम भक्तियोगाने मिळणारा अनेक योनीत जन्माला कारणीभूत असा जो अज्ञानग्रंथि त्याला फोडून टाकणार्‍या मार्गाने होतो ज्यावेळी खरोखर महापुरुष अशा विष्णूच्या भक्तांचा समागम घडतो. ॥२०॥

देवाः एतत् हि एव गायन्ति अहो अमीषां शोभनं किं अकारि उतस्वित् एषां हरिः स्वयं प्रसन्नः यैः भारताजिरे मुकुंदसेवौपयिकं जन्म नृषु लब्धं हि नः (अपि) (भारते जन्म लब्धुं) स्पृहा भवति देव ह्याच पुढील श्‍लोकांना गातात, अहो ह्या प्राण्यांकडून शुभकर्म कोणते केले गेले अथवा ज्यामुळे ह्या प्राण्यांच्यावर परमेश्वर स्वतःच प्रसन्न झाला ज्यांनी भरतखंडरूपी अंगणात भगवंताची सेवा करण्यास साधनीभूत असा जन्म मनुष्ययोनीत मिळविला कारण आम्हालाहि या भरतखंडात जन्म घेण्याची इच्छा होते. ॥२१॥

नः दुष्करैः क्रतुभिः वा तपोव्रतैः दानादिभिः फल्गुना द्युजयेन किं यत्र नारायणपादपङ्‌कजस्मृतिः न अतिशयेन्द्रियोत्सवात् प्रमुष्टा (भवति) आम्हाला करण्यास कठीण अशा यज्ञांनी अथवा तपाने व व्रतांनी, दानादिकांनी क्षुद्र स्वर्गादि सुख मिळविल्याने काय करावयाचे आहे, जेथे भगवंताच्या चरणकमलाचे स्मरण नाही, इंद्रियांना अतिशय सुख मिळाल्यामुळे नष्ट होते. ॥२२॥

कल्पायुषां पुनर्भवात् स्थानजयात् क्षणायुषां भारतभूजयः वरं मनस्विनः क्षणेन मर्त्येन कृतं संन्यस्य अभयं हरेः पदं संयान्ति कल्पापर्यंत आहे आयुष्य ज्यास अशा पुरुषांच्या पुनर्जन्म घडवून आणणार्‍या स्थानाला मिळविण्यापेक्षा क्षणभंगुर आयुष्य असणार्‍यांची भरतखंडातील भूमीची प्राप्ति श्रेष्ठ होय, बुद्धिवान पुरुष क्षणभंगुर अशा मनुष्य शरीराने केलेल्या कर्माला सोडून निर्भय अशा भगवंताच्या स्थानाला जातात. ॥२३॥

यत्र वैकुंठकथासुधापगा न तदाश्रयाः भागवताः साधवः न यत्र महोत्सवाः यज्ञेशमखाः न सः सुरेशलोकः अपि न वै सेव्यतां ज्यात विष्णूच्या कथारूपी अमृताची नदी नाही, त्या भगवत्कथांचा आश्रय करून रहाणारे भगवद्‌भक्त असे सत्पुरुष नाहीत, जेथे मोठया समारंभाने होणारे भगवंताला उद्देशून होणारे यज्ञ नाहीत, तो देवलोकहि खरोखर सेविला जाऊ नये. ॥२४॥

च इह जे जन्तवः तु ज्ञानक्रियाद्रव्यकलापसंभृतां नृजातिं प्राप्ताः अपुनर्भवाय न वै यतेरन् ते भूयः वनौकाः इव बन्धनं यान्ति आणि येथे जे प्राणी तर ज्ञान, क्रिया व द्रव्य यांच्या समूहांनी भरलेल्या मनुष्यजन्माला प्राप्त झालेले मोक्षाकरिता खरोखर प्रयत्‍न करणार नाहीत ते पुनः अरण्यात रहाणार्‍या प्राण्यांप्रमाणे संसारबंधनाला प्राप्त होतात. ॥२५॥

एकः पृथक् नामभिः आहूतः स्वयं पूर्णः आशिषां प्रभुः यैः बर्हिषि श्रद्धया भागशः विधिमंत्रवस्तुतः निरुप्तं इष्टं हविः मुदा गृह्‌णाति एकटा असूनहि निरनिराळ्या नावांनी बोलाविलेला स्वतः परिपूर्ण असा उपभोगाचा स्वीकार करण्यास समर्थ ज्यांनी यज्ञात श्रद्धेने विभागांनी विधि, मंत्र व द्रव्ये यांच्यायोगे अर्पिलेल्या इच्छित हविर्भागाला आनंदाने स्वीकारितो. ॥२६॥

अर्थितः नृणां अर्थितं सत्यं दिशति अर्थदः न एव यत् यतः पुनः अर्थिता अनिच्छतां भजतां इच्छापिधानं निजपादपल्लवं स्वयं विधत्ते याचना केलेला ईश्वर मनुष्यांच्या इष्ट वस्तूला खरोखर देतो इष्ट वस्तु देणारा नव्हेच कारण ज्या देणगीमुळे फिरून याचनाप्रसंग प्राप्त होतो, निरिच्छपणा धारण करणार्‍या अशा भक्तांच्या इच्छा झाकून टाकणार्‍या स्वतःच्या चरणरूप पत्राला स्वतः अर्पण करितो. ॥२७॥

यदि अत्र कृतस्य स्विष्टस्य स्वर्गसुखावशेषितम् अजनाभे वर्षे नः स्मृतिमत् जन्म स्यात् यत् हरिः भजतां शं तनोति जर येथे केलेल्या चांगल्या यज्ञादि कर्माचे स्वर्गीय सुखाचा अवशिष्ट पुण्यभागरूप असे ह्या भरतसंज्ञक खंडामध्ये आमचे स्मरणोत्पादक जन्म होय कारण परमेश्वर भक्तांचे कल्याण करितो. ॥२८॥

राजन् एके अश्वान्वेषणे इमां महीं परितः निखनद्‌भिः सगरात्मजैः उपकल्पितान् जंबूद्वीपस्य च अष्टौ उपद्वीपान् ह उपदिशन्ति हे राजा कित्येक लोक घोडा शोधण्याच्या वेळी ह्या पृथ्वीला सभोवार खणणार्‍या सगरपुत्रांनी कल्पिलेली जंबूद्वीपाची आठ लहान लहान बेटे खरोखर सांगतात. ॥२९॥

तत् यथा स्वर्णप्रस्थः चंद्रशुक्लः आवर्तनः रमणकः मंदरहरिणः पाञ्चजन्यः सिंहलः लंका इति ती लहान बेटे अशी स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मंदरहरिण, पांचजन्य, सिंहल, लंका याप्रमाणे ॥३०॥

भारतोत्तम तव एवं जंबूद्वीपवर्षविभागः यथोपदेशम् उपवर्णितः इति उवाच भरतकुलश्रेष्ठा हे परीक्षित राजा, तुला याप्रमाणे जंबूद्वीपातील खंडाचे निरनिराळे भाग जसे मला ठाऊक होते तसे वर्णन करून सांगितले असे शुकाचार्य म्हणाले. ॥३१॥

पंचम स्कन्धः - अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP