श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय १८ वा - अन्वयार्थ

भिन्न-भिन्न वर्षांचे वर्णन -

तथा च भद्रश्रवा नाम धर्मसुतः तत्कुलपतयः (च) पुरुषाः भद्राश्ववर्षे साक्षात् भगवतः वासुदेवस्य प्रियां धर्ममयीं हयशीर्षाभिधानां तनुं परमेण समाधिना सन्निधाप्य इदं अभिगृणन्तः उपधावन्ति त्याचप्रमाणे भद्रश्रवा नाव असलेला धर्माचा पुत्र व त्याचे मुख्य सेवक पुरुष भद्राश्वखंडामध्ये प्रत्यक्ष सर्वगुणसंपन्न अशा वासुदेवाच्या प्रिय धर्मरूपी हयशीर्ष नाव असलेल्या मूर्तीला मोठया समाधिच्या योगे मनात स्थापून पुढे सांगितल्याप्रमाणे जप करणारे स्तुति करितात. ॥१॥

ओम् भगवते आत्मविशोधनाय धर्माय नमोनमः इति प्रणवस्वरूपी सर्वगुणसंपन्न आत्म्याची शुद्धि करणार्‍या धर्ममूर्ति हयशीर्षाला वारंवार नमस्कार असो याप्रमाणे जप करितात. ॥२॥

अहो भगवद्विचेष्टितं विचित्रं (अस्ति) हि अयं जनः घ्नन्तं मिषन् न पश्यति यर्हि असत् सेवितुं विकर्म ध्यायन् पुत्रं पितरं निर्हृत्य जिजीविषति अहो भगवंताचे चरित्र फार आश्‍चर्य करण्यासारखे आहे कारण हा लोक घात करणारा, पहाणारा पहात नाही जरी तुच्छ विषयसुखाला सेविण्याकरिता वाईट कामाचे ध्यान करणारा मुलाला बापाला जाळून टाकून स्वतः जगण्याची इच्छा करितो. ॥३॥

कवयः विश्वं नश्वरं वदन्ति स्म च अध्यात्मविदः विपश्‍चितः पश्यन्ति तथा अपि अज तव मायया मुह्यन्ति एतत् कृत्यं सुविस्मितं (अस्ति) अतः तं अजं नतः अस्मि विद्वान लोक जगाला क्षणभंगुर म्हणतात आणि अध्यात्मसंपन्न असे विवेकी पुरुष पहातात तरीसुद्धा हे जन्मरहित ईश्वरा, तुझ्या मायेने मोहित होतात हे कृत्य आश्‍चर्यजनक होय म्हणून त्या जन्मरहित तुला नमस्कार करितो. ॥४॥

हि अकर्तुः अपावृतः अपि ते विश्वोद्‌भवस्थाननिरोधकर्म अंगीकृतं युक्तं (अस्ति) कार्यकारणे सर्वात्मनि च वस्तुतः व्यतिरिक्ते त्वयि न चित्रं कारण कर्तृत्वरहित आवरणरहित अशाही तुझ्याकडून जगाचे उत्पत्ति, स्थिति व संहार करणारे कृत्य स्वीकारले गेले योग्यच आहे कार्यस्वरूपी व कारणरूपी अशा सर्वत्र आत्मरूपाने वास्तव्य करणार्‍या आणि वास्तविक भिन्न अशा तुझ्या ठिकाणी आश्‍चर्य नाही. ॥५॥

यः नृतुरंगविग्रहः युगांते तमसा तिरस्कृतान् वेदान् रसातलात् आनीय अभियाचते कवये वै प्रत्याददे तस्मै अवितथेहिताय ते नमः इति जो मनुष्य व घोडा यांचे मिश्र शरीर धारण करणारा हयशीर्ष अवतार युगाच्या शेवटी अंधकाराने अदृश्य केलेल्या वेदांना रसातळातून आणून याचना करणार्‍या ब्रह्मदेवाला खरोखर परत देता झाला त्या ज्याचा संकल्प कधीहि मिथ्या होत नाही अशा तुला नमस्कार असो ह्याप्रमाणे ॥६॥

च हरिवर्षे अपि भगवान् नरहरिरूपेण आस्ते तद्रूपग्रहणनिमित्तं उत्तरत्र अभिधास्ये महापुरुषगुणभाजनः महाभागवतः दैत्यदानवकुलतीर्थीकरणशीलाचरितः प्रह्‌रादः तद्वर्षपुरुषैः सह तत् दयितं रूपं अव्यवधानानन्यभक्तियोगेन उपास्ते इदं च उदाहरति आणखी हरि नामक खंडामध्येही भगवंत नरसिंहस्वरूपाने रहातो ते स्वरूप घेण्याचे कारण पुढील कथाभागात मी सांगेन महापुरुषाच्या गुणांचे पात्रच असा मोठा भगवद्‌भक्त दैत्य व दानव यांच्या कुळाला पवित्रता आणणारा आहे स्वभाव व आचरण ज्याचे असा प्रल्हाद त्या हरिखंडात रहाणार्‍या पुरुषांसह त्या प्रिय स्वरूपाला सतत व निश्‍चल अशा भक्तियोगाने भजतो आणि पुढील मंत्र उच्चारितो. ॥७॥

ओम् भगवते तेजस्तेजसे नरसिंहाय नमोनमः आविः आविर्भव वज्रनख (च) वज्रदंष्ट्र कर्माशयान् रंधय रंधय तमः ग्रस ग्रस ओम् स्वाहा ओम्‌क्ष्‌रौ‌म् आत्मनि अभयं अभयं भूयिष्ठाः प्रणवरूपी सर्वगुणसंपन्न तेजस्व्यांपेक्षा तेजस्वी अशा नरसिंहावतारी परमेश्वराला वारंवार नमस्कार असो. स्पष्टपणे प्रकट हो, वज्राप्रमाणे बळकट नखे असणार्‍या आणि वज्रासारख्या तीक्ष्ण दाढा असणार्‍या हे नरसिंहा, कर्मवासनांना समूळ नष्ट कर, अज्ञानांधकाराला पार गिळून टाक, ओम्‌काररूपी त्रिगुणात्मक नरसिंहाला सर्वस्व अर्पण करितो, क्षरौ‌म् हे ज्या तुझ्या मंत्राचे बीज आहे अशा प्रणवात्मक हे नरहरे, आत्म्याच्या ठिकाणी वारंवार निर्भय देणारा हो. ॥८॥

विश्वस्य स्वस्ति अस्तु खलः प्रसीदतां भूतानि धिया मिथः शिवं ध्यायन्तु च मनः भद्रं भजतात् नः मति अपि अहैतुकी अधोक्षजे आवेश्यतां जगाचे कल्याण असो, दुष्ट प्रसन्न होवो, भूते बुद्धीने एकमेकांत कल्याणाला चिंतोत, आणि मन कल्याणकारक शांततेला सेवन करो, आमची बुद्धि सुद्धा निष्काम अशी जितेंद्रिय अशा तुझ्याठिकाणी प्रविष्ट होवो. ॥९॥

नः अगारदारात्मजवित्तबंधुषु संगः मा (भूत्) यदि स्यात् भगवत्प्रियेषु प्राणवृत्त्या परितुष्टः आत्मवान् यः अदूरात् सिद्ध्यति तथा इन्द्रियप्रियः न आमची घर, स्त्री, पुत्र, द्रव्य व बंधु यांच्याठिकाणी आसक्ति न होवो, जर व्हायचीच असेल तर भगवंताला प्रिय अशा भक्तांच्या ठिकाणी, प्राणांच्या उपजीविकासाधनाने संतुष्ट झालेला जितेंद्रिय ज्ञानी असा जो लवकर सिद्धीला मिळवितो तसा विषयलोलुप पुरुष नाही. ॥१०॥

हि यत्संगलब्धं निजवीर्यवैभवं मुकुंदविक्रमम् श्रुतिभिः संस्पृशतां अंतः गतः अजः मानसं (मलं) हरति तीर्थं तु मुहुः अङ्‌गजं (मलं) हरति अतः तान् सत्पुरुषान् कः वै न सेवेत कारण ज्या साधूंच्या संगतीने मिळालेल्या असामान्य आहे पराक्रमाचा प्रभाव ज्याचा अशा ईश्वराच्या लीलांना कानांनी श्रवण करणार्‍यांच्या अंतरंगात गेलेला जन्मरहित ईश्वर मनातील मळाला हरण करितो पवित्र स्थान तर वारंवार शरीरावरील मळाला हरण करितो यास्तव त्या साधूंना कोण बरे सेवन करणार नाही. ॥११॥

यस्य भगवति अकिंचना भक्तिः अस्ति तत्र सुराः सर्वैः गुणैः समासते हरौ अभक्तस्य बहिः असति मनोरथेन धावतः पुंसः महद्‌गुणाः कुतः (भवन्ति) ज्याची भगवंताच्या ठिकाणी निष्काम भक्ति आहे तेथे देव संपूर्ण गुणांसह रहातात, भगवंताच्या ठिकाणी भक्ति न करणार्‍या क्षणिक सुखाच्या बाह्यप्रदेशात मनोरूपी रथाने धावणार्‍या पुरुषास मोठमोठे गुण कोठून प्राप्त होतील ॥१२॥

हि साक्षात् भगवान् हरिः झषाणाम् ईप्सितं तोयम् इव शरीरिणां आत्मा (अस्ति) महान् तं हित्वा यदि गृहे सज्जते तदा दंपतीनां वयसा महत्त्वं (स्यात्) कारण प्रत्यक्ष सर्वगुणसंपन्न परमेश्वर माशांना प्रिय असलेल्या पाण्याप्रमाणे शरीर धारण करणार्‍या प्राण्यांचा आत्मा होय, मोठा पुरुष त्या परमेश्वराला सोडून जर घरावर आसक्ति ठेवितो तर मग स्त्रीपुरुषांचे वयानेच मोठेपणा ठरेल. ॥१३॥

तस्मात् रजोरागविषादमन्युमानस्पृहाभयदैन्याधिमूलम् संसृतिचक्रवालं गृहं हित्वा अकुतोभयं नृसिंहपादं भजत इति (असुरान् उपदिशति) ह्याकरिता तृष्णा, प्रीति, खेद, क्रोध, अभिमान, काम, भीति, दैन्य ह्यांचे मूळ कारण अशा संसाराचा फेरारूप अशा घराला सोडून देऊन निर्भय अशा नरसिंहावतारी परमेश्वराच्या चरणाला भजा, असा उपदेश प्रल्हाद असुरांना करितो. ॥१४॥

केतुमाले अपि भगवान् लक्ष्म्याः च पुरुषांयुषा अहोरात्रपरिसंख्यानानां प्रजापतेः दुहितृणां

पुत्राणां तद्वर्षपतीनां प्रियचिकीर्षया कामदेवस्वरूपेण महापुरुषमहास्त्रतेजसा उद्वेजितमनसां यासां गर्भाः विध्वस्ता संवत्सरान्ते व्यसवः विनिपतन्ति केतुमाल खंडामध्येहि परमेश्वर लक्ष्मीचे आणि मनुष्याच्या शंभर वर्षांच्या मानाने दिवस व रात्र ह्यांच्या संख्येइतक्या म्हणजे छत्तीस हजार दिवस व छत्तीस हजार रात्री इतक्या संवत्सर नामक प्रजापतीच्या कन्यांचे, पुत्रांचे व त्या खंडाच्या अधिपतींचे प्रिय करण्याच्या इच्छेने कामदेवाचे रूप घेऊन ईश्वराच्या सुदर्शनचक्ररूपी मोठ्या अस्त्राच्या तेजाने भीतियुक्त झालेली आहेत अन्तःकरणे ज्यांची अशा ज्या कन्यांचे गर्भ गळून गेलेले वर्षाच्या शेवटी मृत झालेले पडतात. ॥१५॥

अतीव सुललितगतिविलासविलसितरुचिरहासलेशावलोकलीलया किञ्चिदुत्तंभितसुंदरभ्रूमंडलसुभगवदनारविंदश्रिया रमां रमयन् इंद्रियाणि रमयते अत्यंत सुंदर चालण्याच्या विलासामुळे अधिक शोभणारे जे सुंदर हास्य त्याच्या मंदस्मितयुक्त कटाक्षरूपी लीलेने थोडयाशा वर उचललेल्या सुंदर भुवयांनी शोभिवंत झालेल्या मुखकमळाच्या शोभेने लक्ष्मीला रमविणारा असा इंद्रियांना रमवितो. ॥१६॥

संवत्सरस्य रात्रिषु प्रजापतेः दुहितृभिः च अहस्सु तद्‌भर्तृभिः उपेता रमा देवी तत् भगवतः मायामयं रूपं परमसमाधियोगेन उपास्ते इदं च उदाहरति वर्षाच्या रात्रींमध्ये संवत्सरनामक प्रजापतीच्या कन्यांसह आणि दिवसांच्या ठिकाणी त्या कन्यांच्या पतींसह युक्त अशी लक्ष्मी देवी त्या परमेश्वराच्या मायिक कामदेव नामक रूपाला श्रेष्ठ समाधियोगाने सेविते आणि हा मंत्र म्हणते. ॥१७॥

ओम् ह्‌रां ह्‌रीं ह्‌रूं ओम् भगवते हृषीकेशाय सर्वगुणविशेषैः विलक्षितात्मने आकूतीनां चित्तीनां चेतसां च विशेषाणां अधिपतये षोडशकलाय छंदोमयाय अन्नमयाय अमृतमयाय सर्वमयाय सहसे ओजसे बलाय कांताय कामाय ते उभयत्र नमः भूयात् दोन्हीकडे ओंकार असलेल्या ह्‌रां ह्‌रीं व ह्‌रूं ह्या त्रिगुणात्मक मंत्रबीजांनी युक्त अशा सर्वगुणसंपन्न अशा जितेंद्रिय सर्व विशिष्ट गुणांनी स्पष्ट दृग्गोचर होणारे आहे स्वरूप ज्याचे अशा क्रियाशक्तींचा ज्ञानशक्तींचा अंतःकरणवृत्तींचा आणि सुंदर मोहक वस्तूंचा मुख्य स्वामी अशा पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच विषय व एक मन ह्या सोळा अंशांनी युक्त अशा वेदमूर्ति अन्नस्वरूपी आनंदामृताची प्राप्ति करून देणार्‍या सर्वव्यापी मानसिक शक्ति वाढविणार्‍या इंद्रियशक्ति वृद्धिंगत करणार्‍या शारीरिक बल देणा‍र्‍या सुंदर कामस्वरूपी तुला मनात व बाहेर अशा दोन्ही ठिकाणी नमस्कार असो. ॥१८॥

हि स्त्रियः स्वतः हृषिकेश्वरं त्वा व्रतैः आराध्य लोके अन्यं पतिं आशासते ते वै तासां प्रियं अपत्यं च धनायूंषि न परिपान्ति यतः ते अस्वतंत्राः (सन्ति) कारण स्त्रिया स्वतः जितेंद्रिय अशा तुला व्रतांनी आराधून ह्या लोकी दुसर्‍या पतीला इच्छितात ते पतीहि त्या स्त्रियांच्या प्रिय संततीला आणि द्रव्य व आयुष्याला रक्षू शकत नाहीत ज्याअर्थी ते अन्य पति स्वतंत्र नाहीत. ॥१९॥

स्वयं अकुतोभयः भयातुरं जनं समंततः पाति सः वै पतिः स्यात् सः एकः एव (अस्ति) आत्मलाभात् परं अधि न एव मन्यते इतरथा मिथः भयं (अस्ति) स्वतः निर्भय होऊन भ्यालेल्या लोकाला सर्व बाजूंनी रक्षितो तोच पति होय. तो एकटाच होय आत्मज्ञानाच्या प्राप्तीहून दुसरे अधिक असे मानीतच नाही इतरत्र आपापसात भीति आहे. ॥२०॥

या तस्य ते पादसरोरुहार्हणं निकामयेत् सा अखिलकामलंपटा (भवति) ईप्सितं (आप्तुम्) ईप्सितः (त्वं यदि) अर्चितः ततः एव रासि भगवन् यत् भग्नयाञ्चा प्रतप्यते जी स्त्री त्या तुझ्या चरणकमलांच्या पूजेला इच्छील ती सर्वच कामांची इच्छा करणारी होय, एकच इष्ट वस्तूला मिळविण्यासाठी तू जर इच्छिला गेलास, पूजिला गेलास त्या एका इच्छित मनोरथालाच देतोस, हे परमेश्वरा, ज्यामुळे जिची मागितलेली वस्तु भोगाने नष्ट झाली आहे अशी संताप पावते. ॥२१॥

अजित ऐंद्रियेधियः अजेशसुरासुरादयः मत्प्राप्तये उग्रं तपः तप्यन्ते भगवत्पादपरायणात् ऋते मां न विन्दन्ति यतः अहं त्वत्‌हृदया (अस्मि) हे अजिंक्य परमेश्वरा, इंद्रियांच्या विषयामध्येच आहे बुद्धि ज्यांची असे ब्रह्मदेव, शंकर, देव व दैत्य इत्यादि माझ्या प्राप्तीकरिता घोर तप करितात तुझ्या चरणाच्या एकनिष्ठ सेवेशिवाय मला मिळवीत नाहीत कारण मी तुझ्या ठिकाणी हृदय असणारी अशी आहे. ॥२२॥

अच्युत वंदितं यत् कराम्बुजं सात्वतां शीर्ष्णि अधायि तत् मम अपि निधेहि वरेण्य मां लक्ष्म बिभर्षि ईश्वरस्य मायया ईहितं ऊहितुं कः विभुः (अस्ति) इति (स्तौति) हे परमेश्वरा, वंदन केलेले जे करकमळ भक्तांच्या मस्तकावर ठेविले गेले ते करकमल माझ्याहि ठेव हे श्रेष्ठ ईश्वरा मला चिन्ह रूपाने तू धारण करितोस परमेश्वराच्या मायेने इच्छिलेले तर्काने जाणण्यास कोण समर्थ आहे अशी लक्ष्मी स्तुति करिते. ॥२३॥

च रम्यके भगवतः प्रियतमं मात्स्यं अवताररूपं (अस्ति) तद्वर्षपुरुषस्य मनोः प्राक् प्रदर्शितं (आसीत्) सः इदानिम् अपि महता भक्तियोगेन (तत् रूपं) आराधयति इदं च उदाहरति आणि रम्यकखंडात परमेश्वराचे अत्यंत आवडते मत्स्यसंबंधी अवताररूप आहे त्या खंडातील पुरुष अशा वैवस्वतमनूला पूर्वी दाखविले होते तो मनु सांप्रतही मोठया भक्तियोगाने त्या मत्स्यस्वरूपाची आराधना करितो आणि हे जपतो. ॥२४॥

ओम् भगवते मुख्यतमाय नमः सत्त्वाय प्राणाय ओजसे सहसे बलाय महामत्स्याय नमोनमः इति प्रणवरूप अशा सर्वगुणसंपन्न अत्यंत श्रेष्ठ अशा परमेश्वराला नमस्कार असो, सत्त्वमूर्ति बलिष्ठ इंद्रियशक्तिरूप मानसिक शक्ति व बळ देणार्‍या शारीरिक बल देणार्‍या मोठे मत्स्यस्वरूप धारण करणार्‍या भगवंताला वारंवार नमस्कार असो. ॥२५॥

अखिललोकपालकैः अदृष्टरूपः ऊरुस्वनः त्वं अंतः च बहिः विचरसि यथा नरः दारुमयीं स्त्रियं तथा यः इदं नाम्ना वशे अनयत् सः त्वं ईश्वरः संपूर्ण लोकपालांनी अवलोकन केलेले नाही स्वरूप ज्याचे अशा मोठा नाद करणारा तू आत आणि बाहेर संचार करितोस ज्याप्रमाणे मनुष्य लाकडाच्या बाहुलीला तसा जो हे जग नावाने आपल्या ताब्यात आणिता झाला तो तू परमेश्वर. ॥२६॥

मत्सरज्वराः लोकपालाः यं हित्वा पृथक् च समेत्य द्विपदः चतुष्पदः सरीसृपं स्थाणु यत् अत्र दृश्यते तत् पातुं यतन्तः अपि किल न शेकुः मत्सराने तप्त झालेले लोकपाल ज्या तुला सोडून एकएकटे आणि एकत्र जमून दोन पायांच्या मनुष्यादि प्राण्यांना चार पायांच्या पश्‍वादिकांना जंगमाला स्थावराला जे येथे दिसते त्या सर्वाला रक्षिण्यास प्रयत्‍न करीत असूनही खरोखर समर्थ झाले नाहीत. ॥२७॥

अजः भवान् मया सह ओषधिवीरुधां निधिम् इमां क्षोणीं धृत्वा ऊर्मिमालिनि युगांतार्णवे ओजसा ऊरु क्रमते तस्मै जगत्प्राणगणात्मने ते नमः इति (मनुः स्तौति) जन्मरहित असा तू माझ्या सह औषधी व वेली यांचा साठा अशा ह्या पृथ्वीला धरून लाटांनी शोभणार्‍या प्रलयकालीन समुद्रामध्ये सामर्थ्याने पुष्कळ चालतोस त्या जगातील प्राणसमूहांचा चालक अशा तुला नमस्कार असो, अशा रीतीने मनु स्तुति करतो. ॥२८॥

हिरण्मये अपि कूर्मतनुं बिभ्राणः भगवान् निवसति पितृगणाधिपतिः अर्यमा वर्षपुरुषैः सह तस्य तत्प्रियतमां तनुं उपधावति च इमं मंत्रं अनुजपति हिरण्मयखंडातही कासवाच्या शरीराला धारण करणारा परमेश्वर रहातो पितृसमुहांचा स्वामी अर्यमा त्या खंडात रहाणार्‍या पुरुषांसह त्याच्या त्याला अत्यंत आवडणार्‍या कूर्मरूपी शरीराला स्तवितो आणि ह्या मंत्राला नित्य जपतो. ॥२९॥

ओम् भगवते अकूपाराय नमः सर्वसत्त्वगुणविशेषणाय नोपलक्षितस्थानाय वर्ष्मणे नमः भूम्ने नमः अवस्थानाय नमोनमः ते नमः प्रणवरूपी अशा सर्वगुणसंपन्न कूर्मावतारी ईश्वराला नमस्कार असो, संपूर्ण सत्त्वगुणाने ओळखिल्या जाणार्‍या, ज्याचे ठिकाण कोणालाहि दिसलेले नाही अशा, शरीर धारण करणार्‍या ईश्वराला नमस्कार असो, सर्वव्यापी भगवंताला नमस्कार असो, सर्वांचा आधार अशा कूर्मस्वरूपाला वारंवार नमस्कार असो, तुला नमस्कार असो. ॥३०॥

निजमायया अर्पितं अर्थस्वरूपं बहुरूपरूपितं एतत् यद्रूपं अयथोपलंभनात् यस्य संख्या न अस्ति तस्मै अव्यपदेशरूपिणे ते नमः आपल्या मायेने प्रकाशित केलेले पदार्थस्वरूप अनेक स्वरूपांनी नटलेले हे ज्या तुझे स्वरूप मिथ्यारीतीने अनुभव असल्यामुळे ज्याची गणना नाही त्या ज्याचा प्रपंचरूप आकार वर्णिता न येणारा आहे अशा तुला नमस्कार असो. ॥३१॥

एकः (त्वं) जरायुजं स्वेदजं अण्डजोद्‌भिदं चराचरं देवर्षिपितृभूतं ऐंद्रियं द्यौः खं क्षितिः शैलसरित्समुद्रद्वीपग्रहर्क्षेत्यभिधेयः एकटा तू मनुष्यादि घामापासून होणारे ढेकूण इत्यादि पक्षी व वृक्ष स्थावरजंगम, देव, ऋषि, पितर व भूते, इंद्रियसमूह स्वर्ग, आकाश, पृथ्वी, पर्वत, नद्या, समुद्र, बेटे, ग्रह व नक्षत्रे इत्यादि ज्यांची नावे आहेत असा ॥३२॥

यस्मिन् असंख्येयविशेषनामरूपाकृतौ इयं संख्या कविभिः कल्पिता (अस्ति) यया तत्त्वदृशा अपनीयते तस्मै सांख्यनिदर्शनाय ते नमः इति ज्या असंख्य भेद, नावे, स्वरूपे व आकृत्या ह्यांनी युक्त अशा तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी ही चोवीस तत्त्वांची मर्यादित संख्या कपिलादि विद्वानांनी कल्पिली आहे ज्या तत्त्वज्ञानाने दूर केली जाते त्या सांख्यतत्त्वस्वरूपी तुला नमस्कार असो याप्रमाणे स्तुति करितो. ॥३३॥

च उत्तरेषु कुरुषु भगवान् कृतवराहरूपः यज्ञपुरुषः आस्ते ह एषा भूः देवी कुरुभिः सह तं तु अस्खलितभक्तियोगेन उपधावति च इमां परमां उपनिषदम् आवर्तयति आणि उत्तर दिशेमध्ये असणार्‍या कुरु नामक खंडात सर्वगुणसंपन्न वराहस्वरूप घेतलेला यज्ञरूपी महापुरुष ईश्वर रहातो खरोखर ही पृथ्वी देवी कुरुखंडातील लोकांसह त्या पुरुषाला तर अखंड भक्तियोगाने स्तविते आणि ह्या श्रेष्ठ अशा उपनिषद् मंत्राला वारंवार जपते. ॥३४॥

ओम् भगवते मन्त्रतत्त्वलिङ्‌गाय यज्ञक्रतवे महाध्वरावयवाय महापुरुषाय नमः कर्मशुक्लाय नमः त्रियुगाय ते नमः प्रणवरूपी अशा सर्वगुणसंपन्न मंत्रामधील बीजादि तत्त्वेच आहे मूर्ति ज्याची अशा यज्ञस्वरूपी व क्रतुमूर्ति मोठमोठे यज्ञ हे ज्याचे अवयव आहेत अशा वराहावतारी महापुरुष ईश्वराला नमस्कार असो, पवित्र कर्मामुळे शुद्ध अशा ईश्वराला नमस्कार असो, तीन युगे ज्याचे स्वरूप आहे अशा तुला नमस्कार असो. ॥३५॥

विपश्‍चितः दिदृक्षवः कवयः दारुषु जातवेदसम् इव क्रियार्थैः गुणेषु गूढं यस्य स्वरूपं मनसा मथ्ना मथ्नन्ति ईरितात्मने नमः विद्वान पहाण्याची इच्छा करणारे ज्ञानी पुरुष काष्ठातील अग्नीप्रमाणे यज्ञादि कर्मांनी गुणांमध्ये गुप्त असलेल्या ज्याच्या स्वरूपाला मनोरूपी रवीने घुसळितात प्रगट केले आहे स्वरूप ज्याचे अशा नमस्कार असो. ॥३६॥

द्रव्यक्रियाहेत्वयनेशकर्तृभिः मायागुणैः वस्तुनिरीक्षितात्मने अन्वीक्षया अंगातिशयात्मबुद्धिभिः निरस्तमायाकृतये नमोनमः विषय, इंद्रियव्यापार, देवता, देह, काल व अहंकार ह्यांनी युक्त अशा मायेच्या सत्त्वादि तीन गुणांनी तात्त्विक स्वरूपाने पाहिलेल्या आत्मस्वरूपी अशा विचाराने यमनियमादि योगांच्या आठ अंगांच्या साधनांनी निश्‍चययुक्त झालेल्या बुद्धीनी मायेपासून उद्‌भवणारी आकृति ज्याची दूर झाली आहे अशा परमेश्वराला वारंवार नमस्कार असो. ॥३७॥

ईक्षितुः यस्य ईप्सितं ईप्सितं न यथा अयः ग्राव्णः तदाश्रयं भ्रमते तथा माया गुणैः विश्वस्थितिसंयमोदयं करोति गुणकर्मसाक्षिणे ते नमः मायेकडे दृष्टि फेकणार्‍या ज्या परमेश्वराची इच्छा इच्छा नव्हे ज्याप्रमाणे लोखंड लोहचुंबकामुळे त्याचाच आश्रय करून फिरते तशी प्रकृति सत्त्वादि तीन गुणांनी जगाची उत्पत्ति, पालन व संहार हे करिते गुण व कर्मे ह्यांस साक्षिरूपाने राहिलेल्या तुला नमस्कार असो. ॥३८॥

यः जगदादिसूकरः मां उग्रदंष्ट्रे कृत्वा रसायाः उदन्वतः इभः इव प्रतिवारणं दैत्यं मृधे प्रमथ्य क्रीडन् इव निरगात् तं विभुं प्रणता अस्मि इति (पृथ्वी वराहरूपं स्तोति) जो जगाचे आदिकारण असा यज्ञवराह मला दाढेच्या टोकावर धरून रसातळापासून समुद्रातून हत्तीप्रमाणे दुसरा विरोधी हत्तीच अशा दैत्याला युद्धात मर्दून खेळतच जणू काय बाहेर निघाला त्या व्यापक वराहावतारी परमेश्वराला मी नम्रपणे शरण गेलेली आहे ह्याप्रमाणे पृथ्वी वराहाची स्तुति करिते. ॥३९॥

पंचम स्कन्धः - अध्याय अठरावा समाप्त

GO TOP