|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय १७ वा - अन्वयार्थ
गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती - तत्र साक्षात् भगवतः यज्ञलिङ्गस्य विष्णोः विक्रमतः वामपादाङ्गुष्ठनखनिर्भिन्नोर्ध्वाण्डकटाहविवरेण अन्तःप्रविष्टा या बाह्यजलधारा तच्चरणपङ्कजावनेजनारुणकिञ्जल्कोपरञ्जिता अखिलजगदघमलापहोपस्पर्शना अमला साक्षात् भगवत्पदी इति अनुपलक्षितवचोऽभिधीयमाना अतिमहता युगसहस्रोपलक्षणेन कालेन दिवः मूर्ध्नि अवततार यत् तत् विष्णुपदं आहुः तेथे प्रत्यक्ष सर्वगुणसंपन्न यज्ञमूर्ति असा विष्णु पाऊल टाकीत असता डाव्या पायाच्या अंगठयाच्या नखाने फुटून गेलेल्या ब्रह्मांडकटाहावरील कवचीच्या छिद्राने आंत शिरलेला जो बाहेरील पाण्याचा प्रवाह त्याच्या पादकमळाच्या धुण्यामुळे तांबुस झालेल्या कमलतंतूंनी तांबुसपणा आणिला आहे जिला अशी, जिचा स्पर्श संपूर्ण जगाच्या पातकाचे क्षालन करण्यास समर्थ आहे अशी, निर्मळ प्रत्यक्ष भगवत्पदी अशा खुणेसाठी योजिलेल्या नावाने संबोधिली अत्यंत मोठया हजार युगाने मोजता येणार्या कालाने स्वर्गाच्या शिखरावर उतरली, ज्या कारणास्तव त्याला विष्णुपद म्हणतात. ॥१॥ यत्र ह वा व वीरव्रतः परमभागवतः उत्कृष्यमाणभगवद्भक्तियोगेन दृढं क्लिद्यमानान्तर्हृदयः औत्तानपादिः औत्कंठयविवशामीलितलोचनयुगलकुङ्मलविगलितामलबाष्पकलया अभिव्यज्यमानरोमपुलककुलकः यां अस्मत्कुलदेवताचरणारविन्दोदकम् इति (कृत्वा) अधुना अपि परमादरेण शिरसा अनुसवनं बिभर्ति ज्या विष्णुपदीच्या ठिकाणी खरोखर ज्याचा संकल्प कधीहि ढळला नाही असा, अत्यंत भगवद्भक्त वाढणार्या भगवद्भक्तियोगाने अत्यंत आर्द्र अंतःकरण झाले आहे ज्याचे असा, उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव उत्कंठेमुळे परवश झालेल्या व मिटलेल्या दोन नेत्ररूप कळ्यांतून गळणार्या निर्मळ अश्रुधारांनी स्पष्ट होत आहेत रोमांचसमूह ज्याचे असा जिला हे आमच्या कुलदेवतेच्या चरणकमलापासून निघालेले उदक असे समजून अजूनहि मोठया आदराने मस्तकाने वेळोवेळी धारण करितो. ॥२॥ ततः तत्प्रभावाभिज्ञाः सप्त ऋषयः ननु एतावती तपसः आत्यन्तिकी सिद्धिः भगवति सर्वात्मनि वासुदेवे अनुपरतभक्तियोगलाभेन एव उपेक्षितान्यार्थात्मगतयः मुमुक्षवः इव आगतां मुक्तिम् इव अद्यापि यां जटाजूटैः सबहुमानं उद्वहन्ति नंतर त्या गंगेच्या प्रभावाला जाणणारे सात ऋषि खरोखर एवढी तपश्चर्येची शेवटची सिद्धि सर्वगुणसंपन्न अशा सर्वत्र आत्मरूपाने रहाणार्या परमेश्वराच्या ठिकाणी निश्चळ भक्तियोगाच्या लाभानेच उपेक्षा केली आहे इतर पुरुषार्थांची व आत्मज्ञानाची ज्यांनी असे मुमुक्षु पुरुष आलेल्या मुक्तीची जशी उपेक्षा करितात त्याप्रमाणे अजूनहि ज्या गंगेला जटासमूहांनी मोठया सन्मानाने धारण करितात. ॥३॥ ततः अनेकसहस्रकोटिविमानानीकसङ्कुलदेवयानेन अवतरंती इंदुमंडलं आवार्य ब्रह्मसदने निपतति तेथून हजारो कोटि विमानांच्या थव्यांनी गजबजून गेलेल्या आकाशमार्गाने खाली उतरणारी चंद्रमंडळाला व्यापून ब्रह्मनगरीत पडते. ॥४॥ तत्र चतुर्धा भिद्यमाना सीता अलकनंदा चक्षुः भद्रा इति चतुर्भिः नामभिः चतुर्दिशं अभिस्पन्दन्ती नदनदीपतिम् एव अभिनिविशति त्या ब्रह्मनगरीस चार भागांनी भिन्न होऊन वाहणारी सीता, अलकनंदा, चक्षु, भद्रा अशा चार नावांनी चार दिशांकडे पाझरणारी नद व नद्या यांचा स्वामी अशा समुद्रालाच जाऊन मिळते. ॥५॥ सीता तु ब्रह्मसदनात् केसराचलादिगिरिशिखरेभ्यः अधोऽधः प्रस्रवन्ती गंधमादनमूर्धसु पतित्वा भद्राश्ववर्षम् अन्तरेण प्राच्यां दिशि क्षारसमुद्रं अभिप्रविशति सीता नदी तर ब्रह्मनगरीतून केसराचल आदिकरून पर्वतांच्या शिखरावरून खालीखाली वहात जाणारी गंधमादन पर्वताच्या शिखरावर पडून भद्राश्व खंडाच्या अनुरोधाने पूर्व दिशेला क्षारसमुद्रामध्ये शिरते. ॥६॥ एवं चक्षुः माल्यवच्छिखरात् केतुमालं अभिनिष्पतन्ती ततः अनुपरतवेगा प्रतीच्यां दिशि सरित्पतिं प्रविशति याप्रमाणे चक्षु नदी माल्यवान नामक पर्वताच्या शिखरातून केतुमाल नामक खंडात पडणारी तेथून अकुण्ठित आहे वेग जीचा अशी पश्चिम दिशेला समुद्रात शिरते. ॥७॥ भद्रा च मेरुशिरसः उत्तरतः निपतिता गिरिशिखरात् गिरिशिखरं अतिहाय शृंगवतः शृंगात् अवस्यन्दमाना उत्तरान् कुरून् अभितः उदीच्यां दिशि जलधिम् अभिप्रविशति भद्रा नदी तर मेरु पर्वताच्या शिखराच्या उत्तर दिशेने पडणारी एका पर्वताच्या शिखरावरून दुसर्या शिखराला मागे टाकून शृंगवान पर्वताच्या शिखरावरून खाली वहाणारी उत्तरकुरुखंडाच्या सभोवार सर्वत्र पसरून उत्तर दिशेला समुद्राला मिळते. ॥८॥ तथैव अलकनंदा ब्रह्मसदनात् दक्षिणेन बहूनि गिरिकूटानि अतिक्रम्य हेमकूटात् हैमकूटानि अतिरभसतररंहसा भारतवर्षं लुठयन्ती दक्षिणस्यां दिशि जलधिं अभिप्रविशति यस्यां स्नानार्थं च आगच्छतः पुंसः पदेपदे अश्वमेधराजसूयादीनां फलं न दुर्लभम् इति (वदन्ति) त्याचप्रमाणे अलकनंदा नामक नदी ब्रह्मनगरीच्या दक्षिण दिशेने पुष्कळ पर्वतशिखरे ओलांडून हेमकूटपर्वताच्या सुवर्णशिखरांना फारच मोठया वेगाने भरतखंडाला भिजवून सोडणारी दक्षिण दिशेकडे समुद्राला मिळते, जीमध्ये स्नानाकरिता येणार्या पुरुषास प्रत्येक पावलागणिक अश्वमेध, राजसूय, इत्यादि यज्ञांचे फळ मिळण्यास कठीण नाही असे म्हणतात. ॥९॥ अन्ये च बहुशः नदाः च मेर्वादिगिरिदुहितरः नद्यः वर्षेवर्षे शतशः सन्ति दुसरेहि पुष्कळ नद आणि मेरु आदिकरून पर्वतांच्या कन्या अशा नद्या प्रत्येक खंडात शेकडो आहेत. ॥१०॥ तत्र अपि भारतं वर्षम् एव कर्मक्षेत्रम् अन्यानि अष्ट वर्षाणि स्वर्गिणां पुण्य़शेषोपभोगस्थानानि भौमानि स्वर्गपदानि व्यपदिशन्ति त्यामध्येहि भरतखंडच कर्मभूमि दुसरी आठ खंडे स्वर्गवासी लोकांची अवशिष्ट पुण्यकर्मांच्या उपभोगाची ठिकाणे पृथ्वीवरील स्वर्गस्थळे ह्या नावांनी ओळखतात. ॥११॥ तत्र तु एषु अयुतपुरुषायुर्वर्षाणां देवकल्पानां नागायुतप्राणानां वज्रसंहननबलवयोमोदप्रमुदितमहासौरतमिथुनव्यवायापवर्गवर्षधृतैकगर्भकलत्राणां पुरुषाणां कालः त्रेतायुगसमः वर्तते तेथे तर ह्या आठ खंडामध्ये दहा हजार वर्षे आयुष्य असणार्या, देवतुल्य अशा, दहा हजार हत्तींच्या इतके बळ असणार्या, वज्रासारखी दृढ शरीरे, बळ, तारुण्य, आणि आनंदी स्वभाव यामुळे आनंदित झालेली, जी अत्यंत क्रीडा करणारी स्त्रीपुरुषांची जोडपी, त्यांच्या संभोगाच्या शेवटी राहिलेल्या आयुष्याच्या वर्षांत एकच गर्भ धारण करणार्या आहेत स्त्रिया ज्यांच्या अशा लोकांचा काळ त्रेतायुगासारखा आहे. ॥१२॥ यत्र ह स्वैः स्वैः गणनायकैः विहितमहार्हणाः देवपतयः सर्वर्तुकुसुमस्तबकफलकिसलयश्रिया आनम्यमानविटपलताविटपिभिः उपशुंभमानरुचिरकाननाश्रमायतनवर्षगिरिद्रोणीषु तथा च विकचविविधनववनरुहामोदमुदितराजहंसजलकुक्कुटकारंडवसारसचक्रवाकादिभिः च मधुकरनिकराकृतिभिः उपकूजितेषु अमलजलाशयेषु जलक्रीडादिभिः विचित्रविनोदैः सुललितसुरसुंदरीणां कामकलिलविलासहासलीलावलोकाकृष्टमनोदृष्टयः स्वैरं विहरन्ति जेथे खरोखर आपापल्या मुख्य मुख्य गणांनी केली आहे मोठी पूजा ज्यांची असे श्रेष्ठ देव सर्व ऋतूंमध्ये असणारी फुले, गुच्छ, फळे व पाने यांच्या शोभेने लवून गेल्या आहेत फांद्या, वेली ज्यांच्या अशा वृक्षांनी शोभणारी अशी जी सुंदर उपवने, आश्रम, मंदिरे व खंडाच्या मर्यादा दर्शविणार्या पर्वतांच्या गुहा ह्यांमध्ये त्याचप्रमाणे फुललेल्या नाना जातींच्या नूतन कमळांच्या गंधाने आनंदित झालेले राजहंस, पाणकोंबडे, कारंडव, सारस व चक्रवाक इत्यादिकांनी आणि भ्रमरसमूहांच्या निरनिराळ्या जातींनी नादयुक्त केलेल्या निर्मळ सरोवरांमध्ये जलक्रीडादिक चित्रविचित्र विनोदांनी सुंदर देवस्त्रियांच्या मदनाने क्षुब्ध केलेले विलास, हास, लीलाकटाक्ष यांनी आकर्षिली आहेत मने व नेत्र ज्यांचे असे स्वच्छंदाने विहार करितात. ॥१३॥ नवसु अपि वर्षेषु भगवान् महापुरुषः नारायणः पुरुषाणां तदनुग्रहाय आत्मतत्त्वव्यूहेन आत्मना अद्यापि सन्निधीयते नऊहि खंडांमध्ये सर्वगुणसंपन्न पुरुषोत्तम नारायण पुरुषांवर तशा प्रकारे अनुग्रह करण्याकरिता आपल्या वासुदेवादि चार मूर्तींच्या समूहाने स्वतः अजूनहि प्रकट रूपाने रहातो. ॥१४॥ इलावृते तु भगवान् भवः एकः एव पुमान् (अस्ति) हि तत्र भवान्याः शापनिमित्तज्ञः अन्यः अपरः न निर्विशति यत् प्रवेक्ष्यतः स्त्रीभावः तत् पश्चात् वक्ष्यामि इलावृत खंडात तर भगवान शंकर एकटाच पुरुष आहे कारण तेथे पार्वतीच्या शापाचे कारण जाणणारा दुसरा कोणी प्रवेश करीत नाही ज्याअर्थी शिरणार्या पुरुषाला स्त्रीपणा ते मागाहून सांगेन. ॥१५॥ भवानीनाथैः स्त्रीगणार्बुदसहस्रैः अवरुध्यमानः भगवतः चतुर्मूर्तेः महापुरुषस्य तुरीयां तामसीं आत्मनः प्रकृतिं संकर्षणसंज्ञा मूर्तिं आत्मसमाधिरूपेण संनिधाप्य एतत् अभिगणन् भवः उपधावति पार्वती आहे धनीण ज्यांची अशा दहा कोटी हजार स्त्रियांच्या समूहांनी सर्वप्रकारे सेविलेला षड्गुणैश्वर्यसंपन्न वासुदेवादि चार मूर्ति धारण करणार्या पुरुषोत्तम नारायणाच्या चवथ्या तमोगुणी अशा स्वतःच्या उत्पत्तीला कारणीभूत संकर्षणनामक मूर्तीला हृदयात चिंतन करण्याच्या रूपाने ठेवून पुढील मंत्राला जपणारा शंकर स्तुति करितो. ॥१६॥ ओम् भगवते सर्वगुणसंख्यानाय अनन्ताय अव्यक्ताय महापुरुषाय नमः नमः इति प्रणवरूपी सर्वगुणसंपन्न ज्यापासून सर्व गुणांना व्यक्तपणा मिळतो अशा अविनाशी निराकार अशा पुरुषोत्तम भगवंताला वारंवार नमस्कार असो अशा ॥१७॥ भजन्य अरणपादपङ्कजं कृत्स्नस्य भगस्य परं परायणं भक्तेषु अलंभावितभूतभावनं भवापहं भवभावं ईश्वरं त्वां भजे भजन करण्यास योग्य अशा हे महापुरुषा, ज्याची चरणकमले लोकांना आश्रयभूत आहेत अशा संपूर्ण ऐश्वर्याचे श्रेष्ठ मुख्य आश्रयस्थान अशा भक्तांच्या ठिकाणी अत्यंत प्रगट केले आहे सिद्ध स्वरूप ज्याने अशा संसार दूर करणार्या संसार उत्पन्न करणार्या परमेश्वर अशा तुला मी भजतो. ॥१८॥ मायागुणचित्तवृत्तिभिः ईशे निरीक्षतः यस्य दृष्टिः अणु अपि यथा अजितमन्युरंहसां नः न अज्यते हि आत्मनः जिगीषुः कः तं न मन्येत मायेच्या गुणांनी व चित्तवृत्तींनी नियमन करण्यासाठी पहाणार्या ज्याची दृष्टि किंचित सुद्धा जशी क्रोधावेश न जिंकिलेल्या आमची दृष्टि लिप्त होते तशी लिप्त होत नाही म्हणून इंद्रियांना जिंकू इच्छिणारा कोणता पुरुष त्या तुला मानणार नाही. ॥१९॥ यः असदृशः मायया क्षीबः मध्वासवताम्रलोचनः इव प्रतिभाति नागवध्वः यत्पादयोः स्पर्शनधर्षितेन्द्रियाः हिरीया अर्हणे न ईशिरे जो दुष्टदृष्टि असणार्यांना मायेने मत्त मद्य व आसव यांनी लाल डोळे झाल्याप्रमाणे भासतो नागपत्न्या ज्याच्या चरणांच्या स्पर्शाने मोहित झाली आहेत इंद्रिये ज्यांची अशा लज्जेमुळे पूजेविषयी समर्थ झाल्या नाहीत. ॥२०॥ ऋषयः यं अस्य स्थितिजन्मसंयमं यं त्रिभिः विहीनं अनन्तं आहुः मूर्धसहस्रधामसु क्वचित् सिद्धार्थम् इव स्थितं भूमंडलं न वेद ऋषि ज्याला ह्या जगाचे रक्षण, उत्पत्ति व संहार ह्यांचे आदिकारण ज्याला तीन गुणांनी रहित अविनाशी म्हणतात हजार मस्तकांच्या ठिकाणी कोठेतरी मोहरीप्रमाणे राहिलेले पृथ्वीमंडळ जाणत नाही. ॥२१॥ यस्य आद्यः गुणविग्रहः महान् विज्ञानधिष्ण्यः भगवान् अजः किल आसीत् यत्संभवः अहं त्रिवृता स्वतेजसा वैकारिकं तामसं ऐन्द्रियं सृजे ज्याचा पहिला गुणस्वरूपी अवतार महतत्त्व सत्त्वगुण आहे आधार ज्याचा असा सर्वगुणसंपन्न ब्रह्मदेव खरोखर झाला, ज्यापासून उत्पन्न होणारा मी तीन गुणांनी युक्त अशा आपल्या तेजाने सात्त्विक देवतासमूह तमोगुणी भूतवर्ग राजस इन्द्रियसमुदाय उत्पन्न करितो. ॥२२॥ एते वयं यस्य महात्मनः वशे सूत्रयंत्रिताः शकुंताः इव स्थितः महानहंवैकृततामसेन्द्रियाः सर्वे यदनुग्रहात् इदं सृजाम हे आम्ही देव ज्या थोर अशा माहात्म्याच्या ताब्यात दोरीने जखडून टाकिलेल्या पक्ष्यांप्रमाणे राहिलेले आहो महत्तत्त्व, अहंकार, देवता, भूते व इंद्रिये ह्यांनी युक्त असे सर्व ज्याच्या कृपेने हे उत्पन्न करितो. ॥२३॥ गुणसर्गमोहितः अयं जनः यन्निर्नितां कर्मपर्वणीं मायां अंजसा निस्तारणयोगं कर्हि अपि न वेद तस्मै विलयोदयात्मने ते नमः गुणांच्या सृष्टीने मोहित झालेला हा लोक ज्याने निर्मिलेल्या कर्माच्या गाठीशी नेणार्या मायेला तत्काळ तरून जाण्याच्या उपायाला कधीहि जाणत नाही त्या संहार व उत्पत्ति ही ज्याची स्वरूपे आहेत अशा तुला नमस्कार असो. ॥२४॥ पंचम स्कन्धः - अध्याय सतरावा समाप्त |