श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय १४ वा - अन्वयार्थ

संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण -

यः एषः जीवलोकः अयं ईश्वरस्य भगवतः विष्णोः वशवर्तिन्या मायया देहात्ममानिनां सत्वादिगुणविशेषविकल्पितकुशलाकुशलसमवहारविनिर्मितविविधदेहावलिभिः वियोगसंयोगाद्यनादिसंसारानुभवस्य द्वारभूतेन षडिन्द्रियवर्गेण दुर्गाध्ववत् असुगमे तस्मिन् अध्वनि यथा अर्थपरः वणिक्सार्थः तथा आपतितः स्वदेहनिष्पादितकर्मानुभवः श्‍मशानवत् अशिवतमायां संसाराटव्यां गतः विफलबहुप्रतियोगेहः अद्य अपि तत्तापोपशमनीं हरिगुरुचरणारविंदमधुकरपदवीं न अवरुंधे यस्यां उ ह एते इंद्रियनामानः षट् ते कर्मणा दस्यवः एव सन्ति जो हा जीवसमुदाय हा ईश्वरस्वरूपी ऐश्वर्यसंपन्न अशा विष्णूच्या कह्यात असणार्‍या मायेने देहाला आत्मा मानणार्‍यांच्या सत्त्वादि गुणांनी वेगवेगळे रचिलेले आणि चांगली, वाईट व मिश्र अशा कर्मांनी निर्मिलेले जे नानाप्रकारचे देह त्यांच्या परंपरांशी वियोग, संयोग इत्यादि हेच आहे स्वरूप ज्याचे अशा अनादि संसाराचा अनुभव घेण्याचे साधन झालेल्या अशा सहा इंद्रियांच्या समूहाने किल्ल्यातील मार्गाप्रमाणे दुर्गम अशा त्या संसारमार्गात जसा द्रव्य मिळविण्यात गुंतलेला व्यापार्‍यांचा तांडा तसा पडलेला स्वतःच्या देहाने आचरलेल्या कर्माचा अनुभव ज्याला आहे असा श्‍मशानाप्रमाणे अत्यंत अमंगल अशा संसाररूपी अरण्यात गेलेला ज्याचे व्यापार पुष्कळ विघ्नांनी निष्फळ होतात असा अजूनहि त्या संसारातील दुःख शमविणार्‍या ईश्वररूप गुरूच्या चरणकमलांवरील भ्रमरांच्या मार्गाला अनुसरत नाही. ज्या अरण्यात खरोखर हे इंद्रिय ह्या नावाचे सहा ते त्यांच्या कर्मावरून चोरच होत. ॥१॥

तत् यथा बहुकृच्छ्राधिगतं यत् किंचित् धर्मौपयिकं पुरुषस्य धनं साक्षात् पुरुषाराधनलक्षणः यः असौ धर्मः तं तु सांपराये उदहारंति अजितात्मनः कुनाथस्य उत् धर्म्यं धनं दर्शनस्पर्शनश्रवणास्वादनावघ्राणसंकल्पव्यवसायगृहग्राम्योपभोगेन यथा अजितात्मनः सार्थस्य तथा विलुंपंति ते जसे फार कष्टाने मिळविलेले जे काही धर्माला उपयोगी असे पुरुषाचे धन प्रत्यक्ष ईश्वराचा संतोष हे आहे लक्षण ज्याचे असा जो हा धर्म त्या धर्माला तर परलोकासाठी म्हणतात मन न जिंकलेल्या क्षुद्र व दुर्व्यसनी श्रीमंतांचे ते धर्माला उपयोगी पडणारे धन रम्य वस्तु पहाणे, स्त्रियांचा समागम, मधुरध्वनीचे श्रवण, सुग्रास भोजन, सुगंधी पदार्थांचा वास घेणे, विषयसंबंधी विचार व निश्‍चय, इत्यादि गृहसंबंधी क्षुद्र उपभोगांच्या नादाने जसे मन न जिंकिलेल्या श्रीमान व्यापार्‍याचे तसे लुटतात. ॥२॥

अथ च यत्र नाम्ना कौटुंबिकाः दारापत्यादयः (सन्ति) कर्मणा वृकसृगालाः एव अनिच्छतः अपि कदर्यस्य कुटुंबिनः मिषितः अपि उरणकवत् संरक्ष्यमाणं (तत् धनं) हरंति तसेच आणि ज्या संसारमार्गात नावाने कुटुंबातील व्यक्ति स्त्री, पुत्र इत्यादि आहेत कर्माने कोल्हे, लांडगेच इच्छा न करणार्‍याहि अतिलोभी असा कुटुंबी पुरुष पहात असता सुद्धा मेंढ्याप्रमाणे अत्यंत जपून ठेवलेले द्रव्य हरण करितात. ॥३॥

हि यथा अनुवत्सरं कृष्यमाणं अपि अदग्धबीजं क्षेत्रं पुनः एव आवपनकाले गुल्मतृणवीरुद्‌भिः गह्वरं इव भवति एवं एव अयं गृहस्थाश्रमः कर्मक्षेत्रं (अस्ति) यस्मिन् हि कर्माणि न उत्सीदंति यत् एषः आवसथः अयं कामकरंडः कारण ज्याप्रमाणे प्रतीवर्षी नांगरले जाणारे सुद्धा ज्यातील बी जळले नाही असे शेत पुनरपि पेरणीच्या वेळी जाळ्या, गवत व वेली यांनी आच्छादल्यासारखे होते याप्रमाणेच हा गृहस्थाश्रम कर्माचे शेत आहे ज्यात निश्‍चयेकरून कर्मे नाश पावत नाहीत ज्याअर्थी हे घर म्हणजे हा कामवासनांचा करंडा होय. ॥४॥

तत्र गतः दंशमशकसमापसदैः मनुजैः शलभशकुंततस्करमूषकादिभिः उपरुद्धमानबहिःप्राणः क्वचित् अस्मिन् अध्वनि परिवर्तमानः अविद्याकामकर्मभिः उपरक्तमनसा अनुपपन्नार्थं गंधर्वनगरं (इव) नरलोकं उपपन्नं इति मिथ्यादृष्टिः अनुपश्यति तेथे प्राप्त झालेला डांस व माशांसारख्या नीच मनुष्यांनी टोळ, पाखरे, चोर व उंदीर इत्यादिकांनी ज्याचे बाह्य प्राण त्रासून गेले आहेत असा कधी ह्या मार्गात भटकणारा अज्ञान, उपभोगेच्छा, व कर्मे यांनी ग्रासून गेलेल्या मनाच्या योगाने असत्य आहे स्वरूप ज्याचे अशा आकाशातील ढगामध्ये भासणार्‍या नगराच्या आकृतीप्रमाणे ह्या मनुष्यलोकाला खरे असे ज्याची दृष्टि खोटी आहे असा नित्य पहातो. ॥५॥

तत्र च पानभोजनव्यवायादिव्यसनलोलुपः क्वचित् आतपोदकनिभान् विषयान् उपधावति त्याठिकाणी आणखी उदकप्राशन, भोजन, मैथुन इत्यादि व्यसनात निमग्न झालेला असा एखादे वेळेस मृगजळासारख्या विषयांच्या मागून धावतो. ॥६॥

क्वचित् च तद्वर्णगुणनिर्मितमतिः अशेषदोषनिषदनं पुरीषविशेषं सुवर्णं अग्निकामकातरः उल्मुकपिशाचम् इव उपादित्सति कधी आणखी त्या अग्नीच्या विष्ठेप्रमाणे रक्तवर्णाच्या रजोगुणाने ज्याला सोने घेण्याची बुद्धि उत्पन्न झाली आहे असा संपूर्ण दोषांचे रहाण्याचे ठिकाण अशा विष्ठाविशेष सोन्याला अग्नीच्या इच्छेने आतुर झालेला कोलतीसारख्या पिशाचाप्रमाणे घेण्यास इच्छितो. ॥७॥

अथ कदाचित् निवासपानीयद्रविणाद्यनेकात्मोपजीवनाभिनिवेशः एतस्यां संसाराटव्यां इतस्ततः परिधावति नंतर केव्हा केव्हा घर, पाणी, द्रव्य इत्यादि अनेक स्वतःच्या उपजीविकासाधनांचा ज्याला अभिमान आहे असा ह्या संसाररूपी अरण्यात इकडे तिकडे धावत सुटतो. ॥८॥

क्वचित् च वात्यौपम्यया प्रमदया आरोहं आरोपितः तत्कालरजसा रजनीभूताः दिग्देवताः इव अतिरजस्वलमतिः असाधुमर्यादः रजस्वलाक्षः इव न विजानाति कधी आणखी जिला वावटळीची उपमा आहे अशा स्त्रीने मांडीवर चढविलेला त्यावेळी उत्पन्न झालेल्या धुळीने रात्रीसारख्या झालेल्या दिशांच्या देवतांप्रमाणे अत्यंत प्रेमरूप धुळीने ज्याची बुद्धि भरली आहे असा ज्याने आपली मर्यादा सोडिली आहे असा धूळ डोळ्यात गेल्याप्रमाणे जाणत नाही. ॥९॥

क्वचित् स्वयं सकृदवगतविषयवैतथ्यः पराभिध्यानेन विभृंशितस्मृतिः तया एव मरीचितोयप्रायान् तान् एव अभिधावति कधी स्वतःला एक वेळ कळून गेला आहे विषयाचा खोटेपणा ज्याला असा दुसर्‍याच्या चिंतनाने ज्याचे स्मरण हरपले आहे असा त्यामुळेच बहुतेक मृगजळासारख्या त्या विषयांच्याच मागून धावतो. ॥१०॥

क्वचित् उलूकझिल्लीस्वनवत् अतिपरुषरभसा प्रत्यक्षं वा परोक्षं आटोपं रिपुराजकुलनिर्भर्त्सितेन अतिव्यथितकर्णमूलहृदयः एखादे वेळी घुबड व रानमाशी यांच्या शब्दाप्रमाणे अत्यंत कठोर व उत्साहपूर्वक त्वेषाने प्रत्यक्ष किंवा आडून धमकीवजा शत्रु किंवा राजाश्रित लोकांच्या निर्भर्त्सनायुक्त शब्दांनी ज्याचे कान व हृदय अत्यंत पीडित झाले आहेत असा ॥११॥

सः यदा दग्धपूर्वसुकृतः (भवति) तदा स्वयं जीवन्म्रियमाणः कारस्करकाकतुंडाद्यपुण्यद्रुमलताविषोदपानवत् उभयार्थशून्यद्रविणान् जीवन्मृतान् उपधावति तो ज्यावेळेस पूर्वपुण्य भोगिले आहे ज्याने असा होतो त्यावेळेस स्वतः जिवंत असून मेल्यासारखा असलेला तो काजरा, काकतुंड इत्यादि अपवित्र वृक्ष व वेली आणि विषकूपाप्रमाणे ज्याचे द्रव्य ऐहिक व पारलौकिक दोन्ही कार्याला लागले नाही अशा जिवंत असून मेल्यासारख्या अशा पुरुषांच्या मागोमाग धावतो. ॥१२॥

एकदा असत्प्रसंगात् निकृतमतिः व्युदकम्नोतःस्खलनवत् उभयतः अपि दुःखदं पाखंडं अभियाति एखादे प्रसंगी दुष्टांच्या संगतीने ज्याची बुद्धि फसली आहे असा उदक नसलेल्या ओढयात अडखळून पडल्याप्रमाणे इहलोक व परलोक यांमध्येहि दुःख देणार्‍या पाखंडमार्गाला जातो. ॥१३॥

यदा तु परबाधया आत्मने अंघः न उपनमति तदा सः खलु पितृपुत्रबर्हिष्मतः वा पितृपुत्रान् भक्षयति जेव्हा तर दुसर्‍याला त्रास दिल्याने स्वतःला अन्न मिळवू शकत नाही तेव्हा तो निश्‍चयेकरून वडील व मुलगे यांची दर्भाची काडी ज्यांचेजवळ असेल त्यांना किंवा बापाला व मुलांना खावयास उठतो. ॥१४॥

क्वचित् दाववत् प्रियार्थविधुरं असुखोदकं गृहं आसाद्य शौकाग्निना दह्यमानः भृशं निर्वेदं उपगच्छति कधी वणव्यासारख्या आवडत्या गोष्टींनी रहित अशा परिणामी दुःख आहे ज्याच्या अशा घराला पावून शोकरूप अग्नीने जळणारा अत्यंत वैराग्याला प्राप्त होतो. ॥१५॥

क्वचित् कालविषमितराजकुलरक्षसा अपहृतप्रियतमधनासुः प्रमृतकः इव विगतजीवलक्षणः आस्ते केव्हा काळाने विषम केलेल्या राजकुलरूपी राक्षसाने हरण केले आहे आवडते धन व प्राण ज्याचे असा मेलेल्या सारखा जीव गेलेल्याप्रमाणे लक्षणे आहेत ज्याची असा होऊन रहातो. ॥१६॥

कदाचित् असत् मनोरथोपगतपितृपितामहादि सत् इति स्वप्‍ननिर्वृतिलक्षणं अनुभवति एखादे वेळेस खोटया मनोराज्यात प्राप्त झालेल्या पितृपितामहादि मंडळींना खरे आहे असे मानून स्वप्‍नसुखाला अनुभवितो. ॥१७॥

क्वचित् गृहाश्रमकर्मचोदनातिभरगिरिं आरुरुक्षमाणः लोकव्यसनकर्शितमनाः कंटकशर्कराक्षेत्रं प्रविशन् इव सीदति कधी गृहस्थाश्रमातील कर्मविधीच्या विस्ताररूपी पर्वतावर चढून जाण्याची इच्छा करणारा ज्याचे मन लोकांच्या पीडेने दुःखित झाले आहे असा काटे व वाळू याने भरलेल्या शेतात शिरल्याप्रमाणे दुःख पावतो. ॥१८॥

च क्वचित् दुःसहेन कायाभ्यंतरवह्‌निना गृहीतसारः स्वकुटुंबाय क्रुध्यति आणखी केव्हा दुःसह अशा शरीरातील अग्नीने सर्व तत्त्व ग्रहण केले आहे ज्याचे असा आपल्या कुटुंबावर संतापतो. ॥१९॥

सः एव पुनः निद्राजगरगृहीतः अंधे तमसि मग्नः शून्यारण्ये इव शेते शवः इव अपविद्धः अन्यत् किंचन न वेद तोच पुनः निद्रारूपी अजगराने पकडलेला असा गाढ अंधकारात बुडून गेलेला भयाण अरण्यात सापडल्याप्रमाणे पडून रहातो प्रेताप्रमाणे अपमानपूर्वक टाकिलेला असा दुसरे काहीएक जाणत नाही. ॥२०॥

कदाचित् दुर्जनदंदशूकैः भग्नमानदंष्ट्रः अलब्धनिद्राक्षणः व्यथित हृदयेन अनुक्षीयमाणविज्ञानः अंधकूपे अंधवत् पतति एखादे वेळी दुर्जनरूपी सर्पांनी गर्वरूपी दाढ मोडिली आहे ज्याची असा ज्याला झोपण्यास अवसर मिळाला नाही असा दुःखित अंतःकरणाने विषयज्ञान कमी होत गेले आहे ज्याचे असा अज्ञानरूप काळोख्या विहिरीत आंधळ्यासारखा पडतो. ॥२१॥

कर्हिस्मचित् काममधुलवान् विचिन्वन् यदा परदारपरद्रव्याणि अवरूंधानः (भवति) राज्ञा वा स्वामिभिः निहतः अपारे नरके पतति केव्हा केव्हा कामसुखरूपी मधाच्या थेंबांना शोधणारा जेव्हा परस्त्री व परद्रव्य यांना गाठण्याची इच्छा करितो राजाने किंवा परस्त्री व परद्रव्य यांच्या मालकांनी बडविलेला पार नसणार्‍या नरकात पडतो. ॥२२॥

अथ च तस्मात् हि कर्म अस्मिन् उभयथा अपि संसारावपनं उदाहरंति आणि म्हणून निश्‍चयाने कर्म हे ह्या इहलोक व परलोक अशा दोन्ही ठिकाणीही संसाराचे उत्पत्तिस्थान आहे असे म्हणतात. ॥२३॥

यदि बंधात् मुक्तः ततः देवदत्तः उपाच्छिनत्ति तस्मात् अपि विष्णुमित्रः (उपाच्छिनत्ति) इति अनवस्थितिः (भवति) जर कदाचित बंधनापासून सुटलाच तर त्यापासून दुसराच कोणी देवदत्त उपटतो त्या देवदत्तापासूनहि तिसराच कोणी विष्णुमित्र लुबाडतो अशी अनर्थपरंपरा होऊन जाते. ॥२४॥

क्वचित् च शीतवाताद्यनेकाधिदैविकभौतिकात्मीयानां दशानां प्रतिनिवारणे अकल्पः दुरंतचिंतया विषण्णः आस्ते कधी आणखी थंडी, वारा, इत्यादि अनेक आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक अशा दुर्दशांच्या निवारणाच्या कामी असमर्थ असा अपरंपार काळजीमुळे खिन्न होऊन बसतो. ॥२५॥

क्वचित् मिथः यत् किंचित् धनं व्यवहरन् वा अन्येभ्यः यत्किंचित् काकिणिकामात्रं (धनं) वा अपहरन् वित्तशाठयात् विद्वेषं एति क्वचित् प्रसंगी परस्परात जे काही थोडेसे द्रव्य देणारा घेणारा अथवा दुसर्‍यापासून थोडे कवडीइतके द्रव्य अथवा चोरणारा द्रव्याच्या फसवणुकीने शत्रुत्वाला प्राप्त होतो. ॥२६॥

तथा अमुष्मिन् अध्वनि इमे सुखदुःखरागद्वेषभयाभिमानप्रमादोन्मादशोकमोहलोभमात्सर्षेर्ष्यावमानक्षुत्पिपासाधिव्याधिजन्मजरामरणादयः उपसर्गाः (भवन्ति) तसेच ह्या संसारमार्गात हे सुख, दुःख, प्रीती, द्वेष, भीती, अभिमान, दांडगेपणा, उन्माद, शोक, मोह, लोभ, मत्सर, चढाओढ, अपमान, भूक, तहान, काळजी, रोग, जन्म व मरण इत्यादि अनेक त्रास आहेत. ॥२७॥

क्व अपि देवमायया स्त्रिया भुजलतोपगूढः प्रस्कन्नविवेकविज्ञानः यद्विहारगृहारंभाकुलहृदयः तदाश्रयावसक्तसुतदुहितृकलत्रभाषितावलोकविचेष्टितापहृतहृदयः अजितात्मा आत्मानं अपारे अंधे तमसि प्रहिणोति केव्हा केव्हा परमेश्वराची मायाच अशा स्त्रीने बाहुरूप वेलीने आलिंगिलेला विवेकज्ञान गळून गेले आहे ज्याचे असा जिला क्रीडेसाठी घर बांधून देण्याच्या खटपटीने व्याकुलहृदय झालेला त्याच्या आश्रयाने राहिलेल्या पुत्र, कन्या व स्त्री यांचे भाषण अवलोकन इत्यादि चेष्टांनी मोहून गेले आहे हृदय ज्याचे असा, ज्याचे मन जिंकिले नाही असा स्वतःला पार नसणार्‍या अंध नावाच्या नरकात पाठवून देतो. ॥२८॥

कदाचित् ईश्वरस्य भगवतः विष्णोः परमाण्वादिद्विपरार्धापवर्गकालोपलक्षणात् रंहसा परिवर्तितेन वयसा आब्रह्मतृणस्तंबादीनां मिषतां भूतानां हरतः अनिमिषतः चक्रात् वित्रस्तहृदयः तं एव ईश्वरं कालचक्रायुधं साक्षात् भगवंतं यज्ञपुरुषं अनादृत्य कंकगृघ्रबकवटप्रायाः आर्यसमयपरिहृताः पाखंडदेवताः सांकेत्येन अभिधत्ते एखादे वेळेस अत्यंत श्रेष्ठ अशा ऐश्वर्यसंपन्न विष्णूच्या परमाणूपासून दोन परार्धापर्यंतचा काल हीच आहे खूण ज्याची अशा वेगाने गरगर फिरविलेल्या आयुष्याने ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत पहाणार्‍या प्राण्यांना हरण करणार्‍या कालरूप चक्रापासून ज्याचे अंतःकरण भ्याले आहे असा त्याच ईश्वर अशा कालचक्ररूपी ज्याचे आयुध आहे अशा प्रत्यक्ष ऐश्वर्यवान अशा यज्ञपुरुषाला झिडकारून कंक, गिधाडे, बगळे, वटवाघुळ यासारख्या आर्यजनांच्या संकेताने त्याज्य मानिलेल्या पाखंड देवतांना संकेताने मान्य असे म्हणतो. ॥२९॥

यदा आत्मवंचितैः तैः पाखंडिभिः उरुवंचितः तेषां ब्रह्मकुलं समावसन् उपनयनादिश्रौतस्मार्तकर्मानुष्ठानेन भगवतः यज्ञपुरुषस्य आराधनं एव शीलं तत् अरोचयन् शूद्रकुलं भजते यस्य निगामाचारे अशुद्धितः यथा वानरजातेः (तथा) मिथुनीभावः कुटुंबभरणं जेव्हा स्वतः फसविलेल्या त्या पाखंडी जनांनी अतिशय फसविलेला त्यांच्या समाजामधून ब्राह्मणकुळात रहाणारा उपनयनादिक श्रुतिस्मृत्युक्त कर्मांच्या आचरणाने ऐश्वर्यसंपन्न अशा यज्ञपुरुषाचे आराधन हेच शील ते ज्याला आवडत नाही असा शूद्रकुळाला भजतो ज्या शूद्र कुळाच्या वेदोक्त आचाराविषयी अपवित्रतेमुळे ज्याप्रमाणे वानराच्या जातीचा असा स्त्रीपुरुषसंबंध कुटुंबपोषण ही असतात. ॥३०॥

तत्र अपि निरवरोधः स्वैरेण विहरन् अतिकृपणबुद्धिः अन्योन्यमुखनिरीक्षणादिना ग्राम्यकर्मणा एव विस्मृतकालावधिः (भवति) तेथेहि प्रतिबंध ज्याला नाही असा स्वच्छंदाने क्रीडा करणारा अत्यंत दीनबुद्धि झालेला परस्परांचे मुख पहाणे इत्यादि नीच कर्मामुळेच मृत्यु जवळ आलेला आहे हे विसरतो. ॥३१॥

क्वचित् द्रुमवत् ऐहिकार्थेषु गृहेषु रंस्यन् यथा वानरः सुतदारवत्सलः व्यवायक्षणः (भवति) कधी वृक्षाप्रमाणे इहलोक हेच प्रयोजन ज्याचे अशा गृहकृत्यामध्ये रममाण होणारा जसा वानर त्याप्रमाणे पुत्र व स्त्री ह्यांबद्दल कळकळ बाळगणारा मैथुनाविषयी उत्सुकता बाळगणारा होतो. ॥३२॥

एवं अध्वनि अवरुंधानः मृत्युगजभयात् गिरिकंदरप्राये तमसि याप्रमाणे संसारमार्गात सुखदुःखे भोगणारा मृत्यूरूपी हत्तीच्या भीतीने पर्वताच्या गुहेसारख्या अज्ञानरूप अडचणीत. ॥३३॥

क्वचित् शीतवाताद्यनेकदैविकभौतिकात्मीयानां दुःखानां प्रतिनिवारणे अकल्पः दुरंतविषयविषण्णः आस्ते केव्हा थंडी, वारा, इत्यादि अनेक आधिदैविक, आधिभौतिक व आध्यात्मिक अशा दुःखांच्या निवारणाच्या कामी असमर्थ असा दुष्परिणामी विषयामुळे खिन्न होतो. ॥३४॥

क्वचित् मिथः वित्तशाठयेन व्यवहरन् यत्किंचित् धनं उपयाति कधी परस्परांशी द्रव्याच्या फसवणुकीने व्यवहार करणारा काही थोडेसे द्रव्य मिळवितो. ॥३५॥

क्वचित् क्षीणधनः शय्यासनाशनाद्युपभोगविहीनः यावत् अप्रतिलब्धमनोरथोपगतादाने अवसितमतिः ततस्ततः जनात् अवमानादीनि अभिलभते एखादे वेळेस द्रव्य संपून गेलेला शय्या, आसन, भोजन इत्यादि उपभोग न मिळालेला जेव्हा न मिळालेल्या पण इच्छेस आलेल्या वस्तूंच्या स्वीकाराविषयी ज्याची बुद्धि समाप्त झाली आहे असा इकडून तिकडून लोकापासून अपमानादिकांना प्राप्त होतो. ॥३६॥

एवं वित्तव्यतिषंगवृद्धवैरानुबंधः अपि पूर्ववासनया मिथः उद्वहति अथ अपवहति याप्रमाणे द्रव्याच्या संबंधामुळे ज्याचा वैरसंबंध वाढत गेला आहे असाहि पूर्वीच्या वासनेमुळे एकमेकांशी विवाहसंबंध करितो आणि जडलेले संबंध तोडितो. ॥३७॥

यत्र एतस्मिन् संसाराध्वनि उ ह वाव यः नानाक्लेशोपसर्गबाधितः आपन्नविपन्नः तं इतरः विसृज्य जातं जातं उपादाय शोचन् मुह्यन् बिभ्यत् विवदन् क्रंदन् संहृष्यन् गायन् नह्यमानः साधुवर्जितः एषः नरलोकसार्थः यतः आरब्धः अद्यापि न एव आवर्तते यं अध्वनः पारं उपदिशंति ज्या ह्या संसारमार्गात निश्‍चयेकरून जो अनेक दुःखे व उपसर्ग ह्यांनी पीडिलेला, संकटात सापडलेला व मेलेला असा, त्याला दुसरा सोडून जो जो जन्मास येईल त्याला घेऊन रडणारा, मोह पावणारा, भिणारा, बरळणारा, ओरडणारा, खिदळणारा, गाणारा, बंधन पावणारा, सज्जनांनी सोडलेला हा व्यापार्‍यांचा मेळा ज्या मूळ स्थानापासून निघाला त्या स्थानाला अजूनहि परत जातच नाही ज्या मूळस्थानाला संसारमार्गाचे पलीकडील स्थान असे म्हणतात. ॥३८॥

यत् इदं योगानुशासनं एतत् वै न अवरुंधते न्यस्तदंडाः उपशमशीलाः उपरतात्मनः मुनयः यत् समवगच्छंति जे हे योगमार्गाचे ज्ञान याला निश्‍चयेकरून प्राप्त होत नाहीत शिक्षा करणे ज्यांनी सोडून दिले आहे असे शांत स्वभावाचे ज्यांची मने विषयापासून परावृत्त झाली आहेत असे ऋषि ज्या योगमार्गाच्या ज्ञानाला चांगले जाणतात. ॥३९॥

यत् अपि वै दिगिभजयिनः यज्विनः ये राजर्षयः किंतु मृधे शयीरन् अस्यां एव मम इयं इति कृतवैरानुबंधाः यां विसृज्य स्वयं उपसंहृताः (आसन्) जरीहि निश्‍चयेकरून दिग्गजांना जिंकणारे, यज्ञ करणारे जे राजे लोक परंतु युद्धात लोळावयाचे या पृथ्वीवर माझी ही याप्रमाणे दुसर्‍याशी वैरसंबंध करणारे ज्या पृथ्वीला सोडून स्वतः मरण पावले. ॥४०॥

कर्मवल्लीं अवलंब्य ततः आपदः नरकात् कथंचित् मुक्तः पुनः अपि एवं संसाराध्वनि वर्तमानः नरलोकसार्थं उपयाति एवं उपरिगतः अपि पुण्यकर्मरूप वेलीला धरून तदनंतर आपत्तिरूप नरकापासून कसा तरी सुटलेला पुनःहि अशा रीतीने संसारमार्गात फिरत रहाणारा मनुष्यसमूहाला येऊन मिळतो त्याचप्रमाणे स्वर्गात गेलेलाहि ॥४१॥

तस्य इदं उपगायंति इह (कः अपि) नृपः आर्षभस्य महात्मनः राजर्षेः अनुवर्त्म (गन्तुम्) मनसा अपि मक्षिका गरुत्मतः इव न अर्हति त्यासंबंधी हे म्हणतात येथे कोणीही राजा ऋषभाचा पुत्र अशा महासमर्थ राजर्षि भरताच्या मार्गाने जाण्याला मनाने सुद्धा माशी गरुडाच्या मार्गाने जशी त्याप्रमाणे समर्थ होत नाही. ॥४२॥

उत्तमश्‍लोकलालसः युवा एव यः दुस्त्यजान् हृदिस्पृशः दारसुतान् सुहृद्राज्यं मलवत् जहौ पुण्य़कीर्ति परमेश्वराच्या सेवेविषयी उत्कंठित तरुण असाच जो सोडण्यास कठीण अशा मनोहर स्त्रीपुत्रांना मित्र व राज्यांना विष्ठेप्रमाणे सोडिता झाला. ॥४३॥

यः नृपः दुस्त्यजान् क्षितिसुतस्वजनार्थदारान् सुरवरैः प्रार्थ्यां सदयावलोकां श्रियं न ऐच्छत् तत् उचितं मधुद्विट्‌सेवानुरक्तमनसां महतां अभवः अपि फल्गुः (अस्ति) जो राजा टाकण्यास अशक्य अशा पृथ्वी, पुत्र, स्वजन, द्रव्य व स्त्री यांना मोठमोठया देवांनी प्रार्थना करण्यास योग्य अशा प्रेमळपणाने पहाणार्‍या अशा लक्ष्मीला इच्छिता झाला नाही ते योग्य होय ज्यांची अंतःकरणे परमेश्वराच्या सेवेत गुंतली आहेत अशा थोर पुरुषांना मोक्ष सुद्धा तुच्छ आहे. ॥४४॥

मृगत्वं हास्यन् अपि यज्ञाय धर्मपतये विधिनैपुणाय सांख्यशिरसे योगाय प्रकृतीश्वराय नारायणाय हरये नमः इति उदारं समुदाजहार मृगदेहाला टाकणारा सुद्धा यज्ञरूपी धर्मरक्षक कर्मकांडात निष्णात ज्ञान हेच ज्याचे फल अशा अष्टांगयोगरूप प्रकृतीचा चालक जलात ज्याचे निवासस्थान आहे अशा परमेश्वराला नमस्कार असो असे मोकळ्या मनाने म्हणता झाला. ॥४५॥

यः भागवतसभाजितावदातगुणकर्मणः राजर्षेः भरतस्य इदं स्वस्त्ययनं आयुष्यं धन्यं यशस्यं च स्वर्गापवर्ग्यं अनुचरितं अनुशृणोति आख्यास्यति वा अभिनंदति आत्मनः एव सर्वां आशिषः आशास्ते परतः कांचन न इति जो भगवद्‌भक्तांनी आदरपूर्वक ज्यांची चरित्रे व गुण वर्णिले आहेत अशा राजर्षि भरताचे हे कल्याणकारक, आयुष्यवर्धक, कृतकृत्य करणारे, कीर्तिप्रद आणि स्वर्ग व मोक्ष मिळवून देणारे आख्यान श्रवण करितो, कथन करितो अथवा वाखाणितो स्वतःपासूनच संपूर्ण मनोरथ मिळवू इच्छितो दुसर्‍यापासून काही एक मिळविण्याची इच्छा करीत नाही असे समजावे. ॥४६॥

पंचम स्कन्धः - अध्याय चवदावा समाप्त

GO TOP