|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय १५ वा - अन्वयार्थ
भरताच्या वंशाचे वर्णन - भरतस्य सुमतिः नाम आत्मजः अभिहितः उ ह वाव कलौ केचित् अनार्याः पाखंडिनः ऋषभपदवीं अनुवर्तमानं यं अवेदसमाम्नातां देवतां पापीयस्या स्वमनीषया कल्पयिष्यंति भरताचा सुमति नावाचा मुलगा होता असे सांगितले आहे खरोखर कलियुगात कोणी क्षुद्र असे पाखंडी लोक ऋषभासारख्या जीवन्मुक्त मार्गाला अनुसरणार्या ज्या सुमतीला वेदात कोठेच न सांगितलेली देवता असे अत्यंत पापयुक्त अशा स्वतःच्या बुद्धीने मानितील. ॥१॥ तस्मात् वृद्धसेनायां देवताजित् नाम पुत्रः अभवत् त्या सुमतीपासून वृद्धसेनेच्या ठिकाणी देवताजित् नावाचा मुलगा होता झाला. ॥२॥ अथ आसुर्यां तत्तनयः देवद्युम्नः (अभवत्) ततः धेनुमत्यां परमेष्ठी सुतः (अभवत्) तस्य सुवर्चलायां प्रतीहः उपजातः नंतर आसुरी स्त्रीच्या ठिकाणी त्या देवताजिताला मुलगा देवद्युम्न झाला. त्या देवद्युम्नापासून धेनुमतीच्या ठिकाणी परमेष्ठी नावाचा मुलगा झाला. त्या परमेष्ठीला सुवर्चलेच्या ठिकाणी प्रतीह नावाचा मुलगा झाला. ॥३॥ यः आत्मविद्यां आख्याय स्वयं संशुद्धः महापुरुषं अनुसस्मार जो आत्मज्ञानाला कथन करून स्वतः पवित्र झालेला ईश्वराला अनुभविता झाला. ॥४॥ प्रतीहात् सुवर्चलायां प्रतिहर्त्रादयः त्रयः इज्याकोविदाः सूनवः आसन् प्रतिहर्तुं स्तुत्यां अजभूमानौ अजनिषातां प्रतीहापासून सुवर्चलेच्या ठिकाणी ज्यात पहिला आहे असे तीन यज्ञविद्येत निष्णात मुलगे झाले, प्रतिहर्त्यापासून स्तुतीच्या ठिकाणी अज व भूमा असे दोन मुलगे झाले. ॥५॥ भूम्नः ऋषिकुल्यायां उद्गीथः ततः देवकुल्यायां प्रस्तावः प्रस्तावात् नियुत्सायां विभुः हृदयजः आसीत् विभोः रत्यां पृथुषेणः (अभवत्) तस्मात् आकूत्यां नक्तः जज्ञे च नक्तात् द्रुतिपुत्रः राजर्षिप्रवरः उदारश्रवः गयः अजायत आत्मवत्त्वादिलक्षणेन जगद्रिरक्षिषया गृहीतसत्त्वस्य साक्षात् भगवतः विष्णोः कला महापुरुषतां प्राप्तः भूमाला ऋषिकुल्येच्या पोटी उद्गीथ त्यापासून देवकुल्येच्या उदरी प्रस्ताव प्रस्तावापासून नियुत्सेच्या ठिकाणी विभु नावाचा पुत्र झाला, विभूपासून रतीच्या ठिकाणी पृथुषेण झाला, त्या पृथुषेणापासून आकूतीच्या ठिकाणी नक्त झाला, आणि नक्तापासून द्रुति नामक स्त्रीच्या ठिकाणी राजर्षीत श्रेष्ठ असा अत्युत्तम कीर्ती असणारा गय झाला, आत्मज्ञानादि गुण असल्याने जगाचे रक्षण करण्याच्या इच्छेने सत्त्वगुण स्वीकारणार्या प्रत्यक्ष ऐश्वर्यवान अशा परमेश्वराची कला असा महापुरुष ह्या पदवीला प्राप्त झाला. ॥६॥ प्रजापालनपोषणप्रीणनोपलालनानुशासनलक्षणेन च इज्यादिना च भगवति परावरे महापुरुषे ब्रह्मणि सर्वात्मना अर्पितपरमार्थलक्षणेन स्वधर्मेण ब्रह्मविच्चरणानुसेवया च आपादितभगवद्भक्तियोगेन अभीक्ष्णशः परिभावितातिशुद्धमतिः सः वै उपरतानात्म्ये आत्मनि स्वयं उपलभ्यमानब्रह्मात्मानुभवः अपि निरभिमानः एव अवनिं अजूगुपत् प्रजांचे पालन, पोषण, संतोष, लालन, सदुपदेश हे आहे लक्षण ज्याचे अशा आणि यज्ञ प्रमुख आहे ज्यात अशा आणि ऐश्वर्यसंपन्न अशा स्थावरजंगमरूप महापुरुष अशा परब्रह्माच्या ठिकाणी एकनिष्ठेने अर्पण केल्यामुळे परमार्थरूप झालेल्या स्वधर्माने ब्रह्मज्ञानी पुरुषांच्या चरणसेवेने आणि प्राप्त झालेल्या भक्तियोगाने वारंवार ज्याची बुद्धि अतिशुद्ध व सुसंस्कृत झाली आहे असा तो गयराजा निश्चयेकरून देहाविषयी अभिमान नाहीसा झाला आहे ज्याचा अशा चित्तात स्वतः प्राप्त झाला आहे ब्रह्मानुभव ज्याला असा झाला असता सुद्धा अभिमानरहित असाच पृथ्वीला पाळिता झाला. ॥७॥ पांडवेय पुराविदः तस्य मां गाथां उपगायंति हे परीक्षित राजा, प्राचीन इतिहास जाणणारे लोक त्या गयराजाची ही गाथा गातात. ॥८॥ यज्वा अभिमानी बहुवित् धर्मगोप्ता समागतश्रीः सतां सदसः पतिः सत्सेवकः कः अन्यः नृपः भगवत्कलाम् ऋते गयं कर्मभिः प्रतियाति यज्ञ करणारा, प्रतिष्ठावान, बहुश्रुत, धर्माचे रक्षण करणारा, संपत्तिमान सज्जनांच्या सभेचा मुख्य, सत्पुरुषांची सेवा करणारा, असा दुसरा कोणता राजा परमेश्वराच्या अंशाशिवाय गयराजाची सत्कर्मांनी बरोबरी करील. ॥९॥ सतीः सत्याशिषः दक्षकन्याः परया मुदा यं सरिद्भिः अभ्यषिंचन् निराशिषः यस्य गुणवत्सस्नुतोधाः धरा प्रजानां आशिषः दुदुहे पतिव्रता ज्यांचे आशीर्वाद खरे होतात अशा दक्षाच्या मुली मोठया आनंदाने ज्या गयराजाला नद्यांच्या जलांनी अभिषेक करित्या झाल्या, निरिच्छ अशा ज्या गयाला गुण हाच वत्स दृष्टीस पडल्यामुळे पान्हा फुटलेली अशी पृथ्वी प्रजांचे मनोरथ पुरविती झाली. ॥१०॥ च छंदांसि अकामस्य यस्य कामान् दुदूहुः अथो युधि प्रत्यंचिता नृपाः बलिं आजर्हुः धर्मेण विप्राः परेत्य यत् आशिषां षष्ठं अंशं आणि वेद निरिच्छ अशा ज्या गयाचे मनोरथ पुरविते झाले, शिवाय युद्धात बाणांनी सत्कारिलेले राजे करभार देते झाले, धर्माने ब्राह्मण परलोकी ज्या गयाला धर्मफलाचा सहावा अंश ॥११॥ यस्य उरुसोमपीथे अध्वरे मघोनि माद्यति अध्वरात्मा भगवान् श्रद्धाविशुद्धाचलभक्तियोगसमर्पितेज्याफलं आजहार ज्या गयाच्या सोमपान पुष्कळ आहे ज्यात अशा यज्ञात इंद्र मदांध झाला असता यज्ञस्वरूपी परमेश्वर श्रद्धेने अत्यंत शुद्ध आणि अचल अशा भक्तियोगाने अर्पण केलेल्या यज्ञाच्या फलाला स्वीकारता झाला. ॥१२॥ यत्प्रीणनात् आविरिंच्यात् देवतिर्यङ्मनुष्यवीरुत्तृणं सद्यः प्रीयेत सः स्वयं प्रीतः विश्वजीवः यस्य बर्हिषि ह प्रीतिं अगात् ज्याच्या संतोषामुळे ब्रह्मदेवापासून ते देव, पशु, मनुष्य, वेली, गवत यांपर्यंत तत्काळ संतोष पावावे तो स्वतः संतुष्ट झालेला जगांचा जीव ज्याच्या यज्ञात खरोखर संतोषाला प्राप्त झाला. ॥१३॥ गयात् सुमत्यां चित्ररथः सुगतिः अवरोधनः इति त्रयः पुत्राः बभूवुः चित्ररथात् ऊर्णायां सम्राट् अजनिष्ट गयापासून सुमतीच्या पोटी चित्ररथ, सुगति, अवरोधन असे तीन मुलगे झाले, चित्ररथापासून ऊर्णेच्या ठिकाणी सम्राट् नावाचा मुलगा झाला. ॥१४॥ ततः उत्कलायां मरीचिः (अभवत्) मरीचेः बिंदुमत्यां बिंदुमान् उदपद्यत तस्मात् सरघायां मधुनामा (पुत्रः) अभवत् मधोः सुमनसि वीरव्रतः (अभवत्) ततः भोजायां मंथुप्रमंथूः जज्ञाते मंथोः सत्यायां भौवनः तत्तः दूषणायां त्वष्टा अजनिष्ट त्वष्टुः विरोचनायां विरजः (अभवत्) विरजस्य विषूच्यां शतजित्प्रवरं पुत्रशतं च (एका) कन्या किल जातं त्या सम्राटापासून उत्कलेच्या पोटी मरीचि झाला, मरीचीपासून बिंदुमतीच्या ठिकाणी बिंदुमान उत्पन्न झाला, त्या बिंदुमानापासून सरघेच्या ठिकाणी मधु नावाचा पुत्र झाला, मधूपासून सुमनेच्या पोटी वीरव्रत झाला, त्या वीरव्रतापासून भोजेच्या उदरी मंथु व प्रमंथु असे दोन मुलगे झाले, मंथूपासून सत्येच्या ठिकाणी भौवन, त्या भौवनापासून दूषणेच्या पोटी त्वष्टा उत्पन्न झाला, त्वष्टयापासून विरोचनेच्या उदरी विरज झाला, विरजाला विषूचीच्या ठिकाणी शतजित् श्रेष्ठ आहे ज्यात असे शंभर मुलगे आणि एक मुलगी निश्चयेकरून झाली. ॥१५॥ तत्र अयं श्लोकः चरमोद्भवः विरजः इमं प्रैयव्रतं वंशं कीर्त्या यथा विष्णुः सुरगणं (तथा) अति अलं अकरोत् त्याच्याविषयी हा श्लोक शेवटी झालेला विरज ह्या प्रियव्रताला वंशाला कीर्तीने जसा विष्णु देवगणाला त्याप्रमाणे अत्यंत शोभा देता झाला. ॥१६॥ पंचम स्कन्धः - अध्याय पंधरावा समाप्त |