श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय ११ वा - अन्वयार्थ

राजा रहूगणाला भरताचा उपदेश -

अकोविदः (त्वं) कोविदवादवादान् वदसि अथो अतिविदां वरिष्ठः न (भवसि) हि सूरयः एनं व्यवहारं तत्त्वावमर्शेन सह न आमनंति विद्वान नसलेला तू पंडितांच्या वादासारख्या भाषणाला बोलतोस म्हणून अत्यंत विद्वानांमध्ये श्रेष्ठ होणार नाहीस कारण विद्वान लोक ह्या व्यवहाराला तत्त्वविचाराच्या योग्यतेचा मानीत नाहीत. ॥१॥

हि राजन् तथा एव उरुगार्हमेधवितानविद्योरुविजृंभितेषु वेदवादेषु शुद्धः साधुः तत्त्ववादः नु प्रायेण न चकास्ति यास्तव हे राजा, तसाच गृहस्थाश्रमातील अनेक यज्ञांचा विस्तार वर्णन करणार्‍या विद्यांमध्ये भरपूर दिसून येणार्‍या वैदिक वचनांमध्ये शुद्ध चांगला तत्त्वयुक्त विचार खरोखर बहुधा आढळत नाही. ॥२॥

यस्य स्वयं गृहमेधिसौख्यं स्वप्ने निरुक्त्या हेयानुमितं न स्यात् तस्य साक्षात् वरीयसीः वाचः अपि तत्त्वग्रहणाय समासन् ज्याला स्वतःला गृहस्थाश्रमातील सुख स्वप्नातील उदाहरणाने टाकण्यास योग्य मानिलेले होत नाही त्याला प्रत्यक्ष अत्युत्तम वचनेहि ज्ञान करून देण्यास समर्थ होत नाहीत. ॥३॥

पुरुषस्य मनः यावत् रजसा वा तमसा वा सत्त्वेन अनुरुद्धं (अस्ति) निरंकुशं (तत्) चेतोभिः च आकूतिभिः कुशलं वा इतरं आतनोति पुरुषाचे मन जोपर्यंत रजोगुणाने अथवा तमोगुणाने किंवा सत्त्वगुणाने व्याप्त असते स्वतंत्र असे ते मन ज्ञानेंद्रियांच्या योगे आणि कर्मेंद्रियांच्या योगे धर्माला अथवा अधर्माला विस्तारिते ॥४॥

च सः वासनात्मा विषयोपरक्तः गुणप्रवाहः विकृतः षोडशात्मा पृथङ्‌नामभिः रूपभेदं बिभ्रत् पुरैः अंतर्बहिष्ट्‌वं तनोति आणि तो वासनायुक्त आत्मा विषयांनी व्याप्त झालेला गुणाच्या योगाने चकित झालेला कामादिरूपाने परिणत झालेला पंचप्राण, पंचभूते व पंचेंद्रिये यांसह सोळावा असा आत्मा वेगवेगळ्या नावांनी निरनिराळ्या रूपांना धारण करणारा शरीराच्या योगाने उत्कृष्टपणा व अधमपणा यांना विस्तारितो. ॥५॥

संसृतिचक्रकूटः मायारचितांतरात्मा स्वदेहिनं आलिंग्य दुःखं सुखं च व्यतिरिक्तं तीव्रं कालोपपन्नं फलं आव्यनक्ति संसारचक्रात छळणारा मायेने रचिलेला जीवरूप अंतरात्मा स्वतःच्या देहात रहाणार्‍याला चिकटून दुःखाला सुखाला आणि दुःख व सुख याहून वेगळ्या दुर्निवार अशा कालाने प्राप्त झालेल्या फळाला उत्पन्न करितो. ॥६॥

तावान् स्थूलसूक्ष्मः आविः अयं व्यवहारः सदा क्षेत्रज्ञसाक्ष्यः भवति तस्मात् अदः मनः परावरस्य गुणागुणत्वस्य लिंगं वदंति तोपर्यंत स्थूल आणि सूक्ष्म रूपाने भासणारा हा व्यवहार नित्य क्षेत्रज्ञाला दिसण्याजोगा असतो त्याकरिता ह्या मनाला कनिष्ठ व श्रेष्ठ अशा गुणाभिमान व गुणराहित्य यांचे कारण म्हणतात. ॥७॥

अथो गुणानुरक्तं मनः जंतोः व्यसनाय नैर्गुण्य क्षेमाय स्यात् यथा प्रदीपः घृतवर्तिम् अश्‍नन् सधूमाः शिखाः भजति अन्यदा हि स्वं पदं (भजति) तथा गुणकर्मानुबद्धं मनः वृत्तीः श्रयते अन्यत्र तत्त्वं (श्रयते) म्हणून विषयांच्या ठिकाणी आसक्त झालेले मन प्राण्याच्या दुःखाकरिता विषयपराङ्‌मुख झालेले कल्याणाकरिता होय ज्याप्रमाणे दिवा तुपाने भिजलेल्या वातीला भक्षण करीत धूमयुक्त अशा ज्वालांना धारण करितो नाहीतर तूप संपले असता आपल्या स्वरूपाला पोचतो त्याप्रमाणे गुण व कर्म यांनी बद्ध झालेले मन वृत्तींचा आश्रय करते एरवी म्हणजे संबंध सुटला असता आपल्या मूळ तत्त्वाला मिळते. ॥८॥

हि पंच आकूतयः (पंच) धियः अभिमानः इति मनसः एकादश वृत्तयः आसन् वीर मात्राणि कर्माणि च पुरं इति (ह) एकादश तासां भूमीः वदंति यास्तव पाच कर्मेंद्रिये, पांच ज्ञानेंद्रिये, अभिमान अशा मनाच्या अकरा वृत्ति आहेत. हे राजा, पाच सूक्ष्मभूते, पाच कर्मे आणि शरीर असे खरोखर अकरा त्या वृत्तीचे आधारभूत विषय म्हणतात. ॥९॥

गंधाकृतिः स्पर्शरसश्रवांसि विसर्गरत्यर्त्यभिजल्पशिल्पाः (विषयासन्ति) एके मम इति एकादशं शय्यां अहं द्वादशं (वृत्त्यन्तरं) गंध व रूप, स्पर्श, रस व शब्द मळत्याग, संभोग, गमन, भाषण व कौशल्य हे देहाचे विषय होत. कोणी कोणी माझे असे मानणे याला अकरावा विषय शरीराला अहंकाराला बारावी निराळी वृत्ति ॥१०॥

मनसः द्रव्यस्वभावाशयकर्मकालैः अमी एकादश विकाराः (भवन्ति) सहस्रशः शतशः च कोटिशः (विकाराः) क्षेत्रज्ञतः स्युः स्वतः न (स्युः) मिथः न (स्युः) मनाचे द्रव्य, स्वभाव, संस्कार, कर्म व काल यांच्या योगाने हे अकरा भेद होतात. हजारो, शेकडो आणि कोटयावधि भेद परमेश्वरापासून होतात. स्वतः मनाच्या सामर्थ्यामुळे होत नाहीत. परस्परांच्या संबंधामुळे होत नाहीत. ॥११॥

हि शुद्धः क्षेत्रज्ञः मायारचितस्य अविशुद्धकर्तुः जीवस्य मनसः एताः नित्याः क्व अपि आविर्हिताः च तिरोहिताः विचष्टे यास्तव शुद्ध जीव मायेने निर्मिलेल्या अशुद्ध कर्म करणार्‍या जीवोपाधिरूप मनाच्या ह्या वृत्ति सतत चालत आलेल्या कधी प्रकट आणि गुप्त अशा पहात असतो. ॥१२॥

क्षेत्रज्ञः आत्मा पुराणः पुरुषः साक्षात् स्वयंज्योतिः अजः परेशः नारायणः भगवान् वासुदेवः स्वमायया आत्मनि अवधीयमानः (अस्ति) जीव आत्मस्वरूप प्राचीन पुरुष प्रत्यक्ष स्वयंप्रकाश जन्ममरणरहित ब्रह्मदेवादि श्रेष्ठांचा स्वामी जीवसमूहांचा आश्रय ऐश्वर्यसंपन्न सर्व भूतांचा आश्रय आपल्या मायेने आत्म्याच्या ठिकाणी स्थापिला जाणारा होय. ॥१३॥

यथा अनिलः आत्मस्वरूपेण निविष्टः स्थावरजंगमानां ईशेत् एवं परः भगवान् वासुदेवः क्षेत्रज्ञः आत्मा इदं अनुप्रविष्टः ज्याप्रमाणे वायु प्राणरूपाने प्रविष्ट होऊन चराचर प्राण्यांचे नियंत्रण करितो ह्याप्रमाणे श्रेष्ठ ऐश्वर्ययुक्त परमेश्वरस्वरूप शरीराचा स्वामी आत्मा ह्या शरीरात प्रविष्ट झालेला आहे. ॥१४॥

नरेंद्र तनुभृत् यावत् एतां मायां वयुनोदयेन विधूय विमुक्तसंगः जितषट्‌सपत्‍नः आत्मतत्त्वं न वेद तावत् इह भ्रमति हे राजा, शरीरधारी जीव जोपर्यंत ह्या मायेला ज्ञानाच्या उदयेकरून टाकून केला आहे सर्वसंग परित्याग ज्याने असा जिंकिले आहेत सहा शत्रु ज्याने असा आत्मस्वरूप जाणत नाही तोपर्यंत ह्या भवचक्रात भ्रमण करितो. ॥१५॥

यावत् आत्मलिंगं एतत् मनः जनस्य संसारतापावपनं (अस्ति इति) न (वेद) यत् शोकमोहामयरागलोभवैरानुबंधं ममतां विधत्ते जोपर्यंत आत्म्याचा उपाधि असलेले हे मन जनाचे संसारताप भोगण्याचे क्षेत्र होय असे जाणत नाही, कारण शोक, मोह, राग, प्रीति, लोभ व वैर यांच्या संबंधाला ममतेला उत्पन्न करिते. ॥१६॥

तत् अप्रमत्तः गुरोः हरेः चरणोपासनास्त्रः अदभ्रवीर्यं उपेक्षया अध्येधितं स्वयं व्यलीकं आत्ममोषं एनं भ्रातृव्यं जहि यास्तव सावध राहून श्रेष्ठ अशा परमेश्वराची चरणसेवा हेच अस्त्र ज्याचे असा विपुल सामर्थ्य आहे ज्याचे अशा उपेक्षेमुळे पुष्कळ वाढलेल्या स्वतः मिथ्या असलेल्या आत्म्याला चोरणार्‍या ह्या शत्रूला मार. ॥१७॥

पंचम स्कन्धः - अध्याय अकरावा समाप्त

GO TOP