|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय १० वा - अन्वयार्थ
जडभरत व राजा रहूगणाची भेट - अथ सिंधुसौवीरपतेः रहूगणस्य इक्षुमत्याः तटे व्रजतः शिबिकावाहपुरुषान्वेषणसमये तत्कुलपतिना दैवेन सः द्विजवरः उपसादितः उपलब्धः एषः पीवा युवा संहननांगः गोखरवत् धुरं वोढुं अलं इति पूर्वविष्टितगृहीतैः सह गृहीतः प्रसभं अतदर्हः सः महानुभावः शिबिकां उवाह नंतर सिंधुसौवीर देशाचा स्वामी अशा रहूगणराजाच्या इक्षुमती नदीच्या तीरावरून जाणार्या पालखी उचलणार्या भोयांच्या शोधाच्या वेळी त्या भोयांच्या नायकाने दैवाने तो ब्राह्मणश्रेष्ठ गाठिला मिळालेला हा पुष्ट तरुण बळकट शरीराचा बैल व गर्दभ याप्रामाणे पालखीचा दांडा वहाण्यास समर्थ आहे असे म्हणून पूर्वीच्या पकडलेल्या वेठयांच्या जोडीला धरिलेला बलात्काराने त्या कामाला अयोग्य असा तो महाप्रभावशाली भरत पालखीला वहाता झाला. ॥१॥ हि यदा इषुमात्रावलोकनानुगतेः द्विजवरस्य पुरुषगतिः न समाहिता तदा रहूगणः स्वशिबिकां विषमगतां उपधार्य अधिवहतः पुरुषान् आह हे वोढारः साधु अतिक्रमत यानं विषमं किम् इति उह्यते इति खरोखर जेव्हा लांबीची जागा कीडामुंगीरहित आहे असे पाहून पाऊल टाकणार्या ब्राह्मणश्रेष्ठ भरताला इतर भोयांची चाल जमेना तेव्हा रहूगणराजा आपल्या पालखीला हिसके बसत आहेत असे जाणून पालखी वहाणार्या पुरुषांना म्हणाला, अहो भोयांनो, नीट चाला पालखी हिसके मारीत काय म्हणून चालविली जात आहे असे ॥२॥ अथ ते सोपालंभं ईश्वरवचः उपाकर्ण्य उपायतुरीयात् शंकितमनसः तं विनापयांबभूवुः तेव्हा भोई निंदायुक्त असे राजाचे भाषण श्रवण करून चौथा उपाय जो दंड त्याची अंतःकरणात भीती बाळगणारे त्या राजाला विनंती करिते झाले. ॥३॥ नरदेव वयं न प्रमत्ताः भवन्नियमानुपथाः साध्वेव वहामः अयं अधुना एव नियुक्तः अपि द्रुतं न व्रजति उह अनेन सह वोढुं वयं न पारयामः इति हे राजा, आम्ही चुकणारे नव्हे आपल्या नियमानुसार नीटपणेच पालखी वहात आहो हा आताच लावलेला असूनहि भराभर चालत नाही खरोखर ह्याच्याबरोबर वहाण्याला आम्ही समर्थ नाही असे ॥४॥ नूनं सांसर्गिकः दोषः एव एकस्य अपि सर्वेषां सांसर्गिकाणां भवितुं अर्हति इति निश्चित्य कृपणवचः निशम्य रहूगणः राजा निसर्गेण बलात् ईषदुत्थितमन्युः कृतः रजसा आवृतमतिः जातवेदसं इव अविस्पष्टब्रह्मतेजसं आह खरोखर संसर्गजन्य दोषच एकाचाहि सगळ्या संसर्ग ठेवणार्यांचा होण्यास योग्य असतो असे पक्के समजून इतर भोयांचे दीन भाषण ऐकून रहूगण राजा स्वभावतः बलात्काराने थोडा क्रोध उत्पन्न झाला आहे ज्याला असा केलेला रजोगुणाने ज्याची बुद्धि वेष्टिली आहे असा होत्साता अग्नीप्रमाणे ज्याचे ब्रह्मतेज अस्पष्ट आहे अशा ब्राह्मणाला म्हणाला ॥५॥ अहो कष्टं भ्रातः व्यक्तं उरु परिश्रांतः भवान् एकः एव दूरं अध्वानं सुचिरं यानं ऊहिवान् अतिपीवा न संहननांगः न च जरसा उपद्रुतः सखे एते अपरे संघट्टिनः नो एव इति बहु विप्रलब्धः अपि ब्रह्मभूतः अवस्तुनि संस्थानविशेषे अविद्यया विहितद्रव्यगुणकर्माशयस्वचरमकलेवरे अहंममेत्यनध्यारोपितमिथ्याप्रत्ययः तूष्णीं शिबिकां पूर्ववत् उवाह अहो हाय हाय, अरे दादा, उघडरीतीने फार थकला आहेस तू एकटाच, लांबीची वाटभर फार वेळपर्यंत पालखी वहाता झालास, अत्यंत पुष्ट नाहीस, बळकट शरीराचा नाहीस आणि जरेने व्यापिलेला आहेस मित्रा हे दुसरे सोबती असे नाहीतच, याप्रमाणे पुष्कळ टोचून बोललेला असताहि ब्रह्मरूप बनलेला मिथ्याभूत अशा विशिष्ट रचनेच्या अशा अज्ञानाने रचिली आहेत महाभूते, इंद्रिये, पुण्यपाप व चित्त ज्यात अशा आपल्या शेवटच्या शरीरावर मी व माझे असा मिथ्याभिमान न ठेवणारा भरत मुकाटयाने पालखीला पहिल्याप्रमाणे वाहू लागला. ॥६॥ पुनः स्वशिबिकायां विषमगतायां प्रकुपितः रहूगणः उवाच अरे इदं किं च त्वं जीवन्मृतः मां कदर्थीकृत्य भर्तृशासनं अतिचरसि प्रमत्तस्य ते दंडपाणिः जनतायाः इव यथा स्वां प्रकृति भजिष्यसे चिकित्सां करोमि इति तेव्हा पुनः आपली पालखी हिसके बसत चालली असता अतिशय संतापलेला रहूगण राजा म्हणाला, अरे, हे काय आणि तू जिवंत असून मेल्यासारखा मला तुच्छ समजून स्वामीच्या आज्ञेला उल्लंघित आहेस उन्मत्त अशा तुला हातात दंड धारण करणारा अधिकारी जनसमूहाला जसा त्याप्रमाणे जेणेकरून आपल्या सरळ स्वभावाला तू धरिशील उपाय मी करतो असे ॥७॥ भगवान् ब्रह्मभूतः सर्वभूतसुहृदात्मा विगतस्मयः सः ब्राह्मणः एवं बहु अबद्धं अपि भाषमाणं नरदेवाभिमानं रजसा तमसा अनुविद्धेन मदेन तिरस्कृताशेषभगवत्प्रियनिकेतं पंडितमानिनं योगश्वरचर्यायां नातिव्युत्पन्नमतिं स्मयमानः इव इदं आह भगवत्स्वरूपी ब्रह्मरूपी ऐक्य पावलेला सर्व प्राण्यांचा मित्र व आत्मा असा गर्व नसलेला तो ब्राह्मण याप्रमाणे पुष्कळ अमर्यादितहि बोलणार्या मी राजा असा अभिमान बाळगणार्या रजोगुणामुळे तमोगुणामुळे वृद्धिंगत पावलेल्या गर्वाने परमेश्वराचे सर्वस्वी प्रिय स्थान असा जो भरत त्याचा तिरस्कार करणार्या आपल्याला पंडित मानणार्या महापुरुषांच्या आचरणाविषयी फारसा अभ्यास केला नाही बुद्धीने ज्याच्या अशा थोडे हसतच हे म्हणाला ॥८॥ वीर त्वया उदितं व्यक्तं अविप्रलब्धं यदि भर्तुः मे सः भारः स्यात् यदि गंतुः मे अधिगम्यं अध्वा स्यात् पीवा इति प्रवादः राशौ विदां न हे वीरा तू बोललेले स्पष्टपणे निंदायुक्त नव्हे जर वाहून नेणार्या मला ते ओझे वाटेल जर गमन करणार्या मला पोचावयाचे स्थान मार्ग असेल लठठ असे म्हणणे पंचमहाभूतात्मक देहांविषयी विद्वानांविषयी नाही. ॥९॥ स्थौल्यं कार्श्यं व्याधयः च आधयः क्षुत् तृट् भयं कलिः इच्छा जरा निद्रा रतिः मन्युः अहंमदः च शुचः देहेन जातस्य हि संति मे न स्थूलपणा, कृशपणा, शारीरिक रोग, आणि मानसिक रोग, क्षुधा, तहान, भय, कलह, इच्छा, वृद्धपणा, झोप, रति, क्रोध, अहंकार आणि शोक देहाबरोबर उत्पन्न होणार्याला खरोखर असतात मला नाहीत. ॥१०॥ राजन् यत् जीवन्मृतत्वं आद्यंतवत् नियमेन विकृतस्य इष्टं ईडय यत्र स्वस्वाम्यभावः ध्रुवः तर्हि असौ विधिकृत्ययोगः उच्यते हे राजा, कारण जन्ममरणपणा आदी व अंत याप्रमाणे नियमाने विकार असणार्याला दिसून येतो. हे स्तुतिपात्र राजा, जेथे सेव्यसेवकभाव निश्चित ठरेल तेथेच हा आज्ञा व कर्तव्य यांची जोडी योग्य होईल. ॥११॥ यत् विशेषबुद्धेः व्यवहारतः अन्यत् विवरं न पश्यामि तत्र ईश्वरः कः च ईशितव्यं किं तथा अपि राजन् ते किं करवाम ज्याअर्थी भेदबुद्धीला व्यवहारावाचून दुसरा अवकाश मी पहात नाही त्याअर्थी सत्ता चालविणारा कोण आणि ज्यावर सत्ता चालवायची ते काय तसे असताहि हे राजा, तुझे काय करावे ते सांग. ॥१२॥ वीर उन्मत्तमत्तजडवत् स्वसंस्थां गतस्य मे भवता चिकित्सितेन च शिक्षितेन कियान् अर्थ (स्यात्) स्तब्धप्रमत्तस्य पिष्टपेषः हे पराक्रमी राजा, पिशाचग्रस्त, दांडग्या व मूर्ख मनुष्याप्रमाणे ब्रह्मरूपास पोचलेल्या मला तू केलेल्या योग्य उपचाराने आणि शिक्षेने कोणता उपयोग होणार ताठेखोर व दांडग्या मनुष्याला पीठ दळण्याप्रमाणे निरर्थक होय. ॥१३॥ उपरतानात्म्यनिमित्तः उपशमशीलः मुनिवरः एतावत् अनुवादपरिभाषया प्रत्युदीर्य उपभोगेन कर्मारब्धं व्यपनयन् राजयानम् अपि तथा उवाह देहाला आत्मा मानण्याला निमित्तभूत जी अविद्या ती ज्यांची नष्ट झाली आहे असा शांत स्वभावाचा मुनिश्रेष्ठ याप्रमाणे राजाच्या प्रत्येक भाषणाचा अनुवाद करणार्या शब्दांनी उत्तर देऊन उपभोगाने प्रारब्धकर्माला दूर करीत पालखीलाहि तशीच पूर्वीप्रमाणे वहाता झाला. ॥१४॥ पांडवेय सः अपि च सम्यक्श्रद्धया तत्त्वजिज्ञासायां अधिकृताधिकारः सिंधुसौवीरपतिः हृदयग्रन्थिमोचनं बहुयोगग्रंथसंमतं तत् द्विजवचः आश्रुत्य विगतनृपदेवस्मयः त्वरया अवरुह्य शिरसा पादमूलं उपसृतः क्षमापयन् उवाच हे परीक्षिता, तोसुद्धा आणि उत्तमप्रकारच्या श्रद्धेमुळे तत्त्व जाणण्याविषयी अधिकार प्राप्त झालेला सिंधुसौवीरदेशाचा राजा हृदयाचा अहंकारग्रंथि सोडविणारे अनेक योगग्रंथांस संमत असे ते ब्राह्मणाचे भाषण श्रवण करून मी राजा आहे असा गर्व नाहीसा झाला आहे ज्याचा असा त्वरेने उतरून मस्तकाने चरणाला जवळ जाऊन क्षमा मागणारा बोलला. ॥१५॥ त्वं कः निगूढः चरसि द्विजानां सूत्रं बिभर्षिं कतमः अवधूतः कस्य असि कुत्रत्यः इह अपि कस्मात् नः क्षेमाय चेत् असि उत शुक्लः न तू कोण गुप्तरूपाने फिरत आहेस ? ब्राह्मणांच्या यज्ञोपवीताला धारण करीत आहेस ? कोणता अवधूत आहेस ? कोणाचा आहेस ? कोठे रहाणारा ? येथे आणखी कशाकरिता आलास ? आमच्या कल्याणाकरिता जर असशील तर मग कपिलमुनि तू नाहीस ना ? ॥१६॥ अहं सुरराजवज्रात् न विशंके त्र्यक्षशूलात् न यमस्य दंडात् न अग्न्यर्कसोमानिलवित्तपास्त्रात् न ब्रह्मकुलावमानात् भृशं शंके मी इंद्राच्या वज्रापासून भीत नाही, शंकराच्या शूळापासून नाही, यमाच्या दंडापासून नाही, अग्नि, सूर्य, चंद्र, वायु व कुबेर यांच्या अस्त्रांपासून नाही, ब्राह्मणाच्या कुळाच्या अपमानापासून अत्यंत भितो. ॥१७॥ तत् साधो ब्रूहि असंगः जडवत् निगूढविज्ञानवीर्यः अपारः विचरसि योगग्रंथितानि ते वचांसि नः मनसा अपि भेत्तुं न क्षमंते म्हणून अहो महाराज, सांगा संगरहित, अज्ञानासारखा, शास्त्रज्ञानरूपी प्रभाव गुप्त आहे ज्याचा असा, ज्याचा महिमा अपार आहे असा फिरत आहेस योगशास्त्राने पूर्ण भरलेली तुझी भाषणे आमच्या मनानेसुद्धा उकलण्यास समर्थ नाहीत. ॥१८॥ च अहं वै योगेश्वरं आत्मतत्त्वविदां मुनीनां परमं गुरुं ज्ञानकलावतीर्णं साक्षात् हरिं इह अरणं तत् किं प्रष्टुं प्रवृत्तः आणि मी खरोखर योगमार्ग प्रवर्तक अशा आत्मतत्त्व जाणणार्या ऋषीमध्ये श्रेष्ठ गुरु व ज्ञानाच्या अंशाने अवतार घेतलेल्या प्रत्यक्ष विष्णुरूप कपिलमुनीला येथे आश्रयस्थान ते कोणते आहे असे विचारण्यास प्रवृत्त झालो आहे. ॥१९॥ सः भवान् वै लोकनिरीक्षणार्थं अव्यक्तलिंगः विचरति अपिस्वित् अंधबुद्धिः गृहानुबंधः योगेश्वराणां गति कथं विचक्षीत तो तू खरोखर लोकस्थिति पहाण्याकरिता स्वतःचे स्वरूप गुप्त ठेवणारा असा फिरत आहेस काय अंधबुद्धीचा घरामध्ये आसक्त झालेला पुरुष योगेश्वराच्या गतीला कसा जाणणार ? ॥२०॥ भर्तुः च गंतुः भवतः कर्मतः श्रमः दृष्टः आत्मनः अनुमन्ये यथा असता उदानयनाद्यभावात् व्यवहारमार्गः समूलः इष्टः भार वहाणार्या आणि चालणार्या तुला कर्मापासून श्रम दिसत आहे आपल्यावरून मी असे मानितो जसे खोटया घागरीने उदक आणणे इत्यादिकाचा अभाव असल्यामुळे प्रपंचमार्ग प्रमाणासह सत्य आहे. ॥२१॥ स्थाल्यग्नितापात् पयसः अभितापः तत्तापतः तंडुलगर्भरंधिः देहेंद्रियस्वाशयसंनिकर्षात् अनुरोधात् पुरुषस्य तत्संसृतिः चुलीवर भांडयाला अग्नीचा ताप लागल्यामुळे आंतील पाण्याला उष्णता येते, त्या पाण्याच्या तापाने तांदुळांचा अंतर्भाग शिजण्याची क्रिया घडते देह, इंद्रिये, प्राण व मन यांच्या संबंधामुळे क्रमाने पुरुषाला तत्संबंधी गति प्राप्त होते. ॥२२॥ नृपतिः प्रजानां शास्ता अभिगोप्ता यः अच्युतस्य किंकर पिष्टं वै न पिनष्टि यत् स्वधर्मं आराधनं ईहमानः अघौघं विजहाति राजा प्रजांना शिक्षण देणारा रक्षण करणारा आहे जो परमेश्वराचा दास आहे पिठाला खरोखर पुनः दळत नाही तर मग आपला धर्म अनुष्ठानाला इच्छिणारा पापसमुदायाला टाकून देतो. ॥२३॥ तत् आर्तबंधो भवान् यथा सदवध्यानं अंहः तरे नरदेवाभिमानमदेन तुच्छीकृतसत्तमस्य मे मैत्रीदृशं कृषीष्ट त्याकरिता हे दुःखितांच्या हितकर्त्या आपण ज्या रीतीने सत्पुरुषांच्या अपमानरूपी पापापासून मुक्त होईन मी राजा आहे अशा अभिमानाने गर्विष्ठ झाल्याने सत्पुरुषांना तुच्छ मानलेल्या माझ्यावर स्नेहदृष्टि करा. ॥२४॥ अपि विश्वसुहृत्सखस्य साम्येन वीताभिमतेः तव न विक्रिया अपि मादृक् शूलपाणिः हि स्वकृतात् महद्विमानात् अदूरात् नंक्ष्यति कदाचित जगाचा हितकर्ता व मित्र अशा सर्वांवर समदृष्टि असल्यामुळे अभिमान नाहीसा झालेल्या तुला विषाद वाटला नसेल तथापि माझ्यासारखा शंकरसुद्धा स्वतः केलेल्या सत्पुरुषांच्या अपमानामुळे तत्काल नष्ट होईल. ॥२५॥ पंचम स्कन्धः - अध्याय दहावा समाप्त |