श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय ९ वा - अन्वयार्थ

भरताचा ब्राह्मणकुळात जन्म -

अथ कस्यचित् अंगिरः प्रवरस्य शमदमतपःस्वाध्यायाध्ययनत्यागसंतोषतितिक्षाप्रश्रयविद्यानसूयात्मज्ञानानंदयुक्तस्य द्विजवरस्य आत्मसदृशश्रुतशीलाचाररूपौदायगुणाः नव अंगजाः सोदर्याः बभूवुः च यवीयस्यां भार्यायां मिथुनं नंतर कोण्या एका अंगिरागोत्रात श्रेष्ठ अशा शम, दम, तपश्‍चर्या, वेदाध्ययन, सत्पात्री दान, संतोष, सहनशीलता, विनय, कर्मविद्या, निर्मत्सरपणा, आत्मज्ञानासंबंधी आनंद या गुणांनी युक्त अशा ब्राह्मणश्रेष्ठाला विद्वत्ता, शील, आचार, रूप व उदारता हे गुण आपल्यासारखेच आहेत ज्याचे असे नऊ स्वतःपासून झालेले सहोदर मुलगे झाले आणि धाकटया स्त्रीच्या ठिकाणी पुत्र व कन्या झाली. ॥१॥

तत्र तु यः पुमान् तं परमभागवतं राजर्षिप्रवरं उत्सृष्टमृगशरीरं भरतं चरमशरीरेण विप्रत्वं गतं आहुः त्या पुत्र व कन्येमधील तर जो पुरुष त्याला श्रेष्ठ भगवद्‍भक्त असा राजर्षिमध्ये श्रेष्ठ मृगशरीर सोडलेला भरत शेवटल्या जन्मातील शरीराने ब्राह्मणपणाला प्राप्त झालेला म्हणतात. ॥२॥

तत्र अपि च स्वजनसंगात् भृशं उद्विजमानः भगवतः कर्मबंधविध्वंसनश्रवणस्मरणगुणविवरणचरणारविंदयुगलं मनसा विदधत् आत्मनः प्रतिघातं आशंकमानः भगवदनुग्रहेण अनुस्मृतस्वपूर्वजन्मावलिः आत्मानं उन्मत्तजडांधबधिरस्वरूपेण लोकस्य दर्शयामास त्या ठिकाणीहि आणखी स्वकीयजनांच्या संगतीपासून अतिशय भय पावणारा परमेश्वराच्या ज्याचे श्रवण, स्मरण व गुणवर्णन केल्याने कर्मबंध नष्ट होतो अशा दोन चरणकमलांना मनाने धारण करणारा स्वतःच्या नाशाविषयी भीति बाळगणारा परमेश्वराच्या कृपेने पूर्व जन्मपरंपरेला स्मरणारा स्वतःला उन्मत्त, जड, आंधळा व बहिरा अशा रूपाने लोकाला दाखवीत असे. ॥३॥

ह वा च पुनः पुत्रस्नेहानुबद्धमनाः विप्रः तस्य आत्मजस्य अपि आसमार्वतनात् संस्कारान् यथोपदेशं विदधान उपनीतस्य अनभिप्रेतान् अपि शौचाचमनादीन् कर्मनियमान् समशिक्षयत् हि पुत्रेण पितुः अनुशिष्टेन भाव्यं इति खरोखर आणि पुनः पुत्राच्या स्नेहाने ज्याचे मन बद्ध झाले आहे असा ब्राह्मण त्या मुलाच्याहि विद्यासमाप्तीपर्यंत संस्कारांना यथाशास्त्र करणारा उपनयन झालेल्या मुलाला आवडत नसलेलेहि शरीरशुद्धि, आचमन इत्यादि कर्माचे नियम शिकविता झाला कारण पुत्राने बापापासून सुशिक्षित असे व्हावे ता हेतूने ॥४॥

च सः अपि तत् उ ह पितृसन्निधौ एव असध्रीचीनं इव करोति स्म छंदांसि अध्यापयिष्यन् व्याहृतिभिः सह सप्रणवशिरस्त्रिपदीं सावित्रीं ग्रैष्मवासंतिकान् मासान् अधीयानं अपि असमवेतरूपं ग्राहयामास आणि तोहि ते बापाने शिकविलेले बापाजवळ असतानाच वेडेवाकडे दिसावे असे करिता झाला वेद पढविण्याची इच्छा करणारा सप्तव्याहृतींसह प्रणव व शिर ह्यांसह वर्तमान त्रिपाद अशा गायत्री मंत्राला ग्रीष्म व वसंत असे दोन ऋतु चार महिने शिकत असणार्‍या भरताला सुद्धा चुकतमाकत कसेबसे उच्चारविता झाला. ॥५॥

एवं आत्मनि स्वतनुजे अनुरागावेशितचित्तः समनुशिष्टेन भाव्यं इति असदाग्रहः अनभियुक्तानि शौचाध्ययनव्रतनियमगुर्वनलशुश्रूषणाद्यौपकुर्वाणककर्माणि अपि पुत्रं अनुशास्य स्वयं तावत् अनधिगतमनोरथः स्वयं गृहे एव प्रमत्तः अप्रमत्तेन कालेन उपसंहृतः याप्रमाणे आत्मस्वरूप अशा स्वतःच्या देहापासून झालेल्या भरताच्या ठिकाणी प्रेमामुळे तेथे चित्त लागून राहिलेला असा मुलाने सुशिक्षित व्हावे असा भलताच आग्रह धरणारा नको असलेली पवित्रता, वेदाध्ययन, व्रते, नियम, गुरूची व अग्नीची सेवा करण्याची रीति इत्यादि उपकुर्वाण ब्रह्मचार्‍यांचीहि कर्मे मुलाला शिकवून स्वतः तेवढयाने मनोरथ पूर्ण न झालेला स्वतः गृहकृत्यांतच प्रमादाने वागणारा असावध असलेल्या काळाने उचलून नेला. ॥६॥

अथ यवीयसी द्विजसती स्वगर्भजातं मिथुनं सपत्‍न्याः उपन्यस्य स्वयं अनुसंस्थया पतिलोकं अगात् नंतर धाकटी ब्राह्मणाची पतिव्रता स्त्री स्वतःच्या गर्भापासून उत्पन्न झालेल्या पुत्र व कन्येला सवतीच्या स्वाधीन करून स्वतः पतीबरोबर सहगमन करण्याच्या योगाने पतीच्या लोकाला गेली. ॥७॥

पितरि उपरते अतत्प्रभावविदः त्रय्यां विद्यायां एव परविद्यायां न पर्यवसितमतयः भ्रातरः एनं जडमतिः इति भ्रातुः अनुशासननिर्बंधात् न्यवृत्संत पिता मरण पावला असता त्याचे सामर्थ्य न जाणणारे तीन वेदरूप अशा विद्येतच आत्मविद्येत नाही ज्यांची बुद्धि गुंतून राहिली आहे असे भाऊ ह्या भरताला जडबुद्धिचा आहे असे समजून भावाच्या शिक्षणाच्या कर्तव्यापासून परावृत्त झाले. ॥८॥

सः च द्विपदपशुभिः प्राकृतैः यदा उन्मत्त जड बधिर इति अभिभाष्यमाणः तदनुरूपाणि प्रभाषते च सः कर्माणि कार्यमाणः परेच्छया करोति विष्टितः वेतनतः वा याञ्चया वा यदृच्छया उपासादितं अल्पं बहु मिष्टं वा कदन्नं अभ्यवहरति परं इंद्रियप्रीतिनिमित्तं न नित्यनिवृत्तनिमित्तस्वसिद्धविशुद्धानुभवानंदस्वात्मलाभाधिगमः द्वंद्वनिमित्तयोः सुखदुःखयोः असंभावितदेहाभिमानः तो भरत आणि दोन पायांचे पशुच अशा मूर्ख लोकांनी ज्यावेळेस हे दांडग्या हे मूर्खा हे बहिर्‍या असे संबोधिला जाई तेव्हा त्यांना योग्य असे उत्तर देई आणि तो कर्मे ज्याच्याकडून करविली जातात असा दुसर्‍याच्या इच्छेने करीत असे वेठीने, मजूरीने अथवा मागण्याने किंवा यत्‍नावाचून मिळालेले थोडे बहुत गोड अथवा गलिच्छ अन्न खात असे परंतु इंद्रियांच्या संतोषाकरिता नव्हे सदोदित ज्याच्यापासून कारण दूर असते अशा स्वतःसिद्ध, केवळ अनुभवरूपी आनंदमय आत्मज्ञानाची प्राप्ती झालेला मानापमानादि द्वंद्वाला कारणीभूत अशा सुख व दुःख यांच्या ठिकाणी देहविषयक अभिमान ठेविला नाही ज्याने असा असे. ॥९॥

शीतोष्णवातवर्षेषु वृषः इव अनावृतांगः पीनः संहननांगः स्थंडिलसंवेशनानुन्मर्दनामज्जनरजसा महामणिः इव अनभिव्यक्तब्रह्मवर्चसः कुपटावृतकटिः उरुमषिणा उपवीतेन संज्ञया द्विजातिः इति ब्रह्मबंधुः इति अतज्ज्ञजनावमतः विचचार थंडी, ऊन्ह, वारा, पाऊस यांमध्ये बैलाप्रमाणे उघड अंगाने लठठ मजबूत शरीर असणारा भूमीवर लोळणे, अंग न चोळणे, स्नान न करणे इत्यादि कारणांनी साठलेल्या मळाने मोठया रत्‍नाप्रमाणे ज्याचे ब्रह्मचर्य स्पष्ट दिसत नाही असा मळकट वस्त्राने कंबर बांधलेला पुष्कळ मळलेल्या यज्ञोपवीतामुळे नावाला मात्र ब्राह्मणाच्या जन्मास आलेला असे आडनावाचा ब्राह्मण असे खरे स्वरूप न जाणणार्‍या लोकांनी अपमानिलेला असा फिरत असे. ॥१०॥

यदा तु परतः कर्मवेतनतः आहारं ईहमानः स्वभ्रातृभिः अपि केदारर्मणि निरूपितः तत् अपि करोति किंतु समविषमन्यूनं अधिकं इति न वेद कणपिण्याकफलीकरणकुल्माषस्थालीपुरीषादीनि अपि अमृतवत् अभ्यवहरति जेव्हा तर दुसर्‍यापासून कामाच्या मजूरीने अन्न इच्छिणारा स्वतःच्या भावांनीहि शेतकामात लाविलेला असे तेसुद्धा करीत असे परंतु उंच, सखल, अधिक, उणे असे जाणत नसे कण्या, पेंड, कोंडा, किडके उडीद, भाताच्या खरपुडया इत्यादि सुद्धा अमृताप्रमाणे खात असे. ॥११॥

अथ कदाचित् कश्‍चित् वृषलपतिः अपत्यकामः भद्रकाल्ये पुरुषपशुं आलभत नंतर एके दिवशी कोणी एक शूद्रांचा राजा संततीची इच्छा करणारा भद्रकाळी देवीला पुरुषरूपी पशु बळी देत होता. ॥१२॥

ह तस्य दैवमुक्तस्य पशोः पदवीं निशीथसमये तमसा आवृतायां निशि परिधावंतः अनधिगतपशवः तदनुचराः आकस्मिकेन विधिना वीरासनेन मृगवराहादिभ्यः केदारान् संरक्षमाणं अंगिरःप्रवरसुतं अपश्यन् इतक्यात खरोखर त्या सुदैवाने सुटून गेलेल्या पुरुषरूप पशूच्या मार्गाला मध्यरात्रीच्या वेळी अंधकाराने व्याप्त झालेल्या रात्री पाठलाग करीत धावणारे पशु न मिळालेले त्याचे सेवक अकस्मात रीतीने वीरासनाने हरिण, डुकरे, इत्यादिकांपासून शेतांना चांगल्या रीतीने राखणार्‍या अंगिरा गोत्रातील श्रेष्ठ मुलगा जो भरत त्याला पहाते झाले. ॥१३॥

अथ ते एनं अनवद्यलक्षणं अवमृश्य भर्तृकर्मनिष्पत्तिं मन्यमानाः मुदा विकसितवदनाः रशनया बद्धवा चंडिकागृहं उपनिन्युः नंतर ते सेवक ह्या निर्दोष लक्षण असणार्‍या भरताला बघून स्वामीच्या कार्याची सिद्धि मानणारे हर्षाने मुख प्रफुल्लित झालेले दोरीने बांधून चंडिकेच्या मंदिरात नेते झाले. ॥१४॥

अथ पणयः तं स्वविधिना अभिषिच्य अहतेन वाससा आच्छाद्य भूषणालेपस्रक्‌तिलकादिभिः उपस्कृतं भुक्तवंतं पुरुषपशुं धूपदीपमाल्यलाजकिसलयांकुरफलोपहारोपेतया वैशससंस्थया च महता गीतस्तुतिमृदंगपणवघोषेण भद्रकाल्याः पुरतः उपवेशयामासुः नंतर चोर त्याला स्वतःच्या विधानाने स्नान घालून कोर्‍या वस्त्राने आच्छादित करून अलंकार, उटी, माळा, टिळे, इत्यादिकांनी सुशोभित केलेल्या जेवलेल्या पुरुषपशूला धूप, दीप, फुले, लाह्या, पत्री, अंकुर, फळे, नैवेद्य ह्या साहित्याने युक्त अशा हिंसेच्या विधीने आणि मोठया गीते, स्तोत्रे, मृदंग व टिमक्या यांच्या घोषाने भद्रकाळीच्या पुढे उभा करिते झाले. ॥१५॥

अथ वृषलराजपणिः पुरुषपशोः असृगासवेन भद्रकालीं देवीं यक्ष्यमाणः तदभिमंत्रितम् अतिकरालनिशितं असिं उपाददे नंतर शूद्रांचा राजा चोर पुरुषपशूच्या रक्तरूपी मद्याने भद्रकाळी देवीला पूजणारा देवीमंत्राने अभिमंत्रित केलेल्या अत्यंत भयंकर व तीक्ष्ण अशा तरवारीला घेता झाला. ॥१६॥

सा एव भद्रकाली देवी इति रजस्तमःप्रकृतीनां धनमदरज‌उत्सिक्तमनसां भगवत्कलावीरकुलं कदर्थीकृत्य उत्पथेन स्वैरं विहरतां हिंसाविहाराणां तेषां वृषलानां यत् साक्षात् ब्रह्मभूतस्य निर्वैरस्य सर्वभूतसुहृदः ब्रह्मर्षिसुतस्य सूनायां अपि अननुमतं आलंभनं अतिदारुणं कर्म तत् उपलभ्य अतिदुविषहेण ब्रह्मतेजसा दंदह्यमानेन वपुषा सहसा उच्चचाट तीच भद्रकाळी देवी याप्रमाणे रजोगुणी व तमोगुणी स्वभावाच्या द्रव्यसंबंधी मदरूपी रजोगुणाने ज्याचे मन उच्छृंखल झाले आहे अशा परमेश्वराच्या अंशरूपी ब्राह्मणाच्या कुलाला तुच्छ मानून कुमार्गाने यथेच्छ संचार करणार्‍या हिंसा हा एक खेळच आहे असे मानणार्‍या त्या शूद्रांचे जे प्रत्यक्ष ब्रह्मरूप बनलेल्या वैर सोडून सर्वांशी मैत्रीने रहाणार्‍या ब्रह्मर्षीच्या मुलाचे हिंसाविधायक शास्त्राला सुद्धा संमत नसलेले वधरूपी अत्यंत भयंकर कृत्य त्या कृत्याला पाहून अत्यंत असह्य अशा ब्रह्मतेजाच्या योगे अतिशय संतप्त झालेल्या शरीराने अकस्मात् मूर्तिरूप सोडून बाहेर आली. ॥१७॥

भृशं अमर्षरोषावेशरभसविलसितभ्रुकुटिविटपकुटिलदंष्ट्रारुणेक्षणाटोपतिभयानकवदना इदं हंतुकामा इव अतिसंरंभेण महाट्टहासम् विमुंचती ततः उत्पत्य तेन एव असिना विवृक्णशीर्ष्णाम् पापीयसाम् दुष्टानां गलात् स्रवंतं अत्युष्णं असृगासवं गणेन सह निपीय अतिपानमदविह्वला स्वपार्षदैः सह उच्चैस्तरां जगौ च ननर्त च शिरःकंदुकलीलया विजहार अत्यंत अपराध सहन न होणे, व शरीरदाह ह्या दोहोंच्या आवेशाच्या वेगाने चढून गेलेला भ्रुकुटिविस्तार, वक्र दाढा, लाल डोळे, व त्यामुळे अत्यंत भयंकर वदन झाले आहे जीचे अशी ह्या जगाला मारू इच्छिणारी जणू काय मोठया आवेशाने मोठया अट्टाहासाला सोडणारी देवी तेथून उडी मारून त्याच तलवारीने मस्तके तोडून टाकिलेल्या अत्यंत पापी अशा दुष्टांच्या कंठापासून गळणार्‍या अत्यंत उष्ण अशा रक्तरूपी मद्यास गणांसह प्राशन करून अत्यंत रक्तपानाने उन्मत्त व धुंद झालेली आपल्या गणांसह अत्यंत उंच स्वराने गाती झाली आणि नाचती झाली आणि मस्तकरूपी चेंडूच्या खेळाने क्रीडा करू लागली. ॥१८॥

एवमेव महदभिचारातिक्रमः खलु कार्त्स्न्येन आत्मने फलति असाच मोठयावर केलेला जारणमारणरूप अपराध निश्‍चयाने सर्वस्वी आपल्याला फळास येतो. ॥१९॥

विष्णुदत्त विमुक्तदेहाद्यात्मभावसुदृढहृदयग्रंथीनां सर्वसत्त्वसुहृदात्मनां निर्वैराणां अप्रमत्तेन साक्षात् भगवता अनिमिषारिवरायुधेन तैः तैः भावैः परिरक्ष्यमाणानां अकुतश्‍चिद्‌भयं तत्पादमूलं उपसृतानां भागवतपरमहंसानां स्वशिरच्छेदने आपतिते अपि असंभ्रमः (इति) यत् एतत् वै महत् अद्‌भुतं न हे परीक्षिता, देहादिकांवरील आत्मभावरूपी बळकट हृदयग्रंथि ज्यांची सुटली आहे अशा सर्व प्राण्यांवर मित्रभाव ठेवणार्‍या निर्वैर अशा दक्षतेने प्रत्यक्ष परमेश्वराने कालचक्ररूपी श्रेष्ठ आयुधाने त्या त्या साधनांनी रक्षण केल्या जाणार्‍या कशापासूनहि भय नाही ज्याला अशा परमेश्वराच्या चरणतलांचा आश्रय केलेल्या भगवद्‌भक्त अशा विरक्तांना स्वतःचा शिरच्छेद होण्याचा प्रसंग आला असतासुद्धा भीति न वाटणे असे जे आहे हे खरोखर मोठे आश्‍चर्य नव्हे. ॥२०॥

पंचम स्कन्धः - अध्याय नववा समाप्त

GO TOP