|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय ८ वा - अन्वयार्थ
भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म - एकदा तु महानद्यां कृताभिषेकनैयमिकावश्यकः ब्रह्माक्षरं अभिगृणानः मूहूर्तत्रयं उदकांतः उपविवेश एकदा तर महानदीत केली आहेत स्नान, व नित्यनैमित्तिक व इतर अवश्य कर्मे ज्याने असा ओम्काराचा जप करणारा तीन मुहूर्तपर्यंत उदकांत बसला. ॥१॥ राजन् तदा तत्र हरिणी पिपासया जलाशयाभ्याशं एका एव उपजगाम हे राजा, तेव्हा त्या ठिकाणी हरिणी पाणी पिण्याच्या इच्छेने पाणवठयावर एकटीच आली. ॥२॥ तया उदके पेपीयमाने तावत् एव अविदूरेण नदतः मृगपतेः लोकभयंकरः उन्नादः उदपतत् तिच्याकडून उदक मनसोक्त प्याले जात असता तितक्यात जवळ शब्द करणार्या सिंहाचा लोकांना भय उत्पन्न करणारा मोठा ध्वनि उठला. ॥३॥ प्रकृतिविक्लवा सा मृगवधूः तं उपश्रुत्य चकितनिरीक्षणा सुतराम् अपि हरिभयाभिनिवेशव्यग्रहृदया पारिप्लवदृष्टिः भयात् अगततृषा एव सहसा उच्चक्राम स्वभावतः भित्री ती हरिणी त्या सिंहगर्जनेला जवळच ऐकून कावरीबावरी झाली आहे दृष्टि जीची अशी अत्यंत सिंहाची धास्ती पडल्यामुळे व्याकुळ झाले आहे मन जीचे अशी चंचल नेत्र झालेली भीतीने तहान भागली नसताच अकस्मात् उडी मारती झाली. ॥४॥ उत्पतत्याः अंतर्वत्न्याः तस्याः उरुभायावगलितः योनिनिर्गतः गर्भः स्रोतसि निपपात उडी मारणार्या गर्भिणी अशा त्या हरिणीचा मोठया भीतीने गर्भस्थानापासून चळलेला योनिद्वारा बाहेर पडलेला गर्भ प्रवाहात पडला. ॥५॥ तत्प्रसवोत्सर्पणभयखेदातुरा स्वगणेन वियुज्यमाना कृष्णसारसती कस्यांचित् दर्यां निपपात च अथ ममार गर्भपात, उडी मारणे व भय ह्या तीन कारणांनी झालेल्या श्रमांनी व्याकुळ अशी आपल्या कळपातून वेगळी पडलेली मृगाची स्त्री कोणा एका गुहेत पडली आणि नंतर मेली. ॥६॥ राजर्षिः भरतः तु स्रोतसा अनूह्यमानं कृपणं एणकूणकं बंधुः अपविद्धम् इव अभिवीक्ष्य अनुकंपया आदाय मृतमातरं इति आश्रमपदं अनयत् राजर्षी भरत तर प्रवाहाने वहात जाणार्या दीन अशा हरिणाच्या बालकाला बंधु जसा बांधवांनी टाकिलेल्याला त्याप्रमाणे पाहून कृपेने ग्रहण करून ह्याची आई मेली आहे असे समजून आश्रमस्थानाला नेता झाला. ॥७॥ ह वा एतस्मिन् एणकुणके उच्चैः कृतनिजाभिमानस्य अहरहः तत्पोषणपालनलालनप्रीणानुध्यानेन सहयमाः आत्मनियमाः च परिचर्यादयः एकैकशः कतिपयेन अहर्गणेन वियुज्यमानाः किल सर्वे एव उदवसन् खरोखरच ह्या हरिणाच्या बालकावर अतिशय आपलेपणाचा अभिमान बाळगणार्या भरताचे प्रत्येक दिवशी त्याचे पोषण, पालन, लालन संतोष यांमध्ये गढून गेल्यामुळे अहिंसादि यमासहवर्तमान आपले नियम आणि परमेश्वराचे आराधन आदि एक एक काही दिवसांनी कमी होत जाणारे खरोखर सर्वच नाहीसे झाले. ॥८॥ अहो बत अयं ईश्वरथचरणपरिभ्रमणरयेण कृपणः हरिणकुणकः स्वगणसुहृद्वंधुभ्यः परिवर्जितः मा च शरणं उपसादितः माम् एव मातापितरौ भ्रातृज्ञातीन् च यौथिकान् उपेयाय अन्यं कंचन न वेद च मयि अतिविस्रब्धः अतः एव शरण्योपेक्षादोषविदुषा अनसूयुना मया मत्परायणस्य पोषणपालनप्रीणनलालनं अनुष्ठेयं अहो खरोखर हा काळचक्राच्या फेर्याच्या वेगामुळे दीन हरिणबालक आपले जातभाई, मित्र व आप्त यांच्यापासून सुटलेला आणि मला शरण आलेला मलाच आईबाप भाऊ व जातगोत आणि कळपातील हरिण जसे समजतो दुसर्या कोणालाहि जाणत नाही आणि माझ्या ठिकाणी अत्यंत विश्वास बाळगणारा म्हणूनच शरण आलेल्यांची उपेक्षा करणे हा दोष आहे असे समजणारा दोषदृष्टि न ठेवणार्या माझ्याकडून मीच केवळ आश्रय ज्याला अशा या हरिणबालकाचे पोषण, पालन, संतोष व लालन केले गेले पाहिजे. ॥९॥ हि नूनं आर्याः उपशमशीलाः कृपणसुहृदः साधवः एवंविधार्थे गुरुतरान् स्वार्थान् अपि उपेक्षंते कारण निश्चयेकरून श्रेष्ठ शांत स्वभावाचे दीनांचे हितकर्ते सत्पुरुष अशा प्रसंगी फार मोठया स्वतःच्या कार्यांनाहि सोडितात. ॥१०॥ इति कृतानुषंगः आसनशयनाटनस्थानाशनादिषु मृगजहुनासह स्नेहानुबद्धहृदयः आसीत् अशाप्रकारे अतिशय प्रीति केलेला बसणे, निजणे, फिरणे, उभे रहाणे व भोजन करणे इत्यादि प्रसंगी हरणाच्या अर्भकाशी स्नेहाने ज्याचे चित्त लागून राहिले आहे असा झाला. ॥११॥ यदा वृकसालावृकादिभ्यः भयं आशंसमानः कुशकुसुमसमित्पलाशफलमूलोदकानि आहरिष्यमाणः समाविशति हरिणकुणकेन सह जेव्हा लांडगे व कोल्हे इत्यादिकांपासून भीती बाळगणारा दर्भ, फुले, समिधा, पाने, फळे, मुळे व पाणी यांना आणण्याची इच्छा करणारा अरण्यात जाई हरिणाच्या बालकाला घेऊन जाई. ॥१२॥ अतिप्रणयभरहृदयः पथिषु च मुग्धभावेन तत्रतत्र विषक्तं कार्पण्यात् स्कंधेन उद्धहति एवं उत्संगे च उरसि आधाय उपलालयन् परमां मुदं अवाप ज्याच्या हृदयात अतिशय प्रेमपूर आहे असा भरत मार्गांमध्ये आणखी पोरस्वभावामुळे जागजागी गुंतून राहिलेल्याला स्नेहपरवश झाल्यामुळे खांद्यावर घेई याप्रमाणे मांडीवर आणि पोटाशी धरून खेळवीत अतिशय हर्षाला प्राप्त होई. ॥१३॥ वाव सः वर्षपतिः क्रियायां निर्वर्त्यमानायां अंतराले अपि उत्थाय उत्थाय यदा एनं अभिचक्षीत तर्हि प्रकृतिस्थेन मनसा वत्स ते सर्वतः स्वस्ति स्तात् इति तस्मै आशिषः आशास्ते शिवाय तो भरतराजा पूजा आदिकरून कर्म चालले असता मध्ये सुद्धा वारंवार उठून ज्या वेळेस ह्या हरिण बालकाला पाही त्यावेळेस शुद्धीवर असलेल्या मनापासून बाळा तुझे सर्वठिकाणी कल्याण असो याप्रमाणे त्याला आशीर्वाद देई. ॥१४॥ अन्यदा भृशं उद्विग्नमनाः कृपणः नष्टद्रविणः इव अतितर्षेण हरिणकुणकविरह विह्वलहृदयसंतापः महत् कश्मलं अभिरंभितः तम् एव अनुशोचन् किल इति ह उवाच कोठे न दिसे त्यावेळेस अत्यंत विह्वल अंतःकरण झालेला कृपण जसा हरपले आहे द्रव्य ज्याचे अशा माणसाप्रमाणे अतिशय उत्कंठेने हरिणबालकाच्या विरहाने व्याकुळ व संतप्तहृदय झालेला मोठया मोहाला प्राप्त झाला त्याविषयीच शोक करीत निश्चयेकरून याप्रमाणे खरोखर म्हणे ॥१५॥ अहो बत वै सः कृपणः मृतहरिणीसुतः एणबालकः अनार्यस्य शठकिरातमतेः अकृतसुकृतस्य मम तत् अविगणयन् आत्मप्रत्ययेन कृतविस्रंभः सुजनः इव आगमिष्यति अपि अहो खरोखर निश्चयेकरून तो दीन मेलेल्या हरिणीचा मुलगा असा हरिणबालक नीच अशा धूर्त पारध्यासारखी बुद्धि असणार्या पुण्य न केलेल्या माझ्यावर ते मनात न आणिता स्वतःच्या अनुभवाने विश्वास केलेला सत्पुरुषाप्रमाणे येईल काय ॥१६॥ अस्मिन् आश्रमोपवने क्षेमेण देवगुप्तं शष्पाणि चरंतं द्रक्ष्यामि अपि ह्या आश्रमाच्या बागेत खुशालपणे देवाने राखलेल्याला कोवळे गवत भक्षण करणार्याला पाहीन काय ? ॥१७॥ च नैकचरः वा एकचरः वृकः सालावृकः वा अन्यतमः न भक्षयति अपि आणि कळपाने फिरणारा अथवा एकटाच फिरणारा लांडगा कोल्हा अथवा दुसरा कोणी क्रूर पशू भक्षण करीत नसेल ना ? ॥१८॥ सकलजगत्क्षेमोदयः भगवान् त्रय्यात्मा ह निम्लोचति अद्य अपि मम मृगवधून्यासः न आगच्छति ज्याचा उदय सगळ्या जगाच्या कल्याणासाठी आहे असा भगवान वेदत्रयीरूपी सूर्य निश्चयेकरून मावळत आहे अजूनसुद्धा माझा हरणाच्या स्त्रीने ठेविलेला ठेवा येत नाही. ॥१९॥ हरिणराजकुमारः विविधरुचिरदर्शनीयनिजमृगदारकविनौदैः स्वानां असंतोषं अपनुदन् अकृतसुकृतं मां आगत्य अपिस्वित् सुखयिष्यति हरिणाचा राजपुत्रासारखा बालक अनेकप्रकारच्या रमणीय व पहाण्याजोग्या स्वाभाविक अशा हरणाच्या बाळक्रीडांनी स्वकीयांच्या दुःखाला दूर करणारा असा पुण्यकर्म घडले नाही अशा मला येऊन सुख देईल काय ? ॥२०॥ क्ष्वेलिकायां मृषासमाधिना आमीलितदृशं मां प्रेमसंरंभेण चकितचकितः आगत्य पृषदपरुषविषाणाग्रेण लुठति खेळामध्ये खोटया समाधीच्या योगाने नेत्र मिटलेल्या अशा मजजवळ प्रणयकोपाने भीत भीत येऊन जलबिंदूप्रमाणे कोमल अशा शिंगाच्या टोकाने ढुशा देतो. ॥२१॥ आसादितहविषि बर्हिषि दूषिते मया उपालब्धः भीतभीतः सपदि उपरतरासः ऋषिकुमारवत् अवहितकरणकलापः आस्ते ज्याच्यावर होमद्रव्ये मांडिली आहेत असे दर्भ कुरतडले असता माझ्याकडून निर्भत्सना केलेला असा भीतभीत तात्काळ सर्व खेळ सोडून देऊन ऋषीच्या बालकाप्रमाणे हातपाय आटोपून निश्चळ झालेला असतो. ॥२२॥ अरे तपस्विन्या अनया किंवा तपः आचरितं यत् इयं अवनिः सविनयकृष्णसारतनयतनुतरसुभगशिवतमाखरखुरपदपंक्तिभिः द्रविणविधुरातुरस्य कृपणस्य मम द्रविणपदवीं च सर्वतः कृतकौतुकं आत्मानं सूचयंती स्वर्गापवर्गकामानां द्विजानां देवयजनं करोति अरे तपस्विनी अशा ह्या पृथ्वीने कोणते बरे तप आचरण केले आहे ज्यामुळे ही पृथिवी नम्रतायुक्त हरिणबालकाच्या अत्यंत लहान, सुंदर व सुखदायक अशा सुकुमार खुर असलेल्या पावलांच्या ओळींनी द्रव्याच्या अभावाने खिन्न झालेल्या दीन अशा माझ्या द्रव्याच्या मार्गाला आणि सर्व ठिकाणी कौतुक केलेल्या स्वतःला सुचविणारी स्वर्ग व मोक्ष यांची इच्छा करणार्या ब्राह्मणांच्या देवाच्या पूजेला योग्य स्थळ मिळवून देते. ॥२३॥ असौ भगवान् उडुपतिः एनं मृतमातरं स्वाश्रमपरिभ्रष्टं मृगबालकं मृगपतिभयात् कृपणजनवत्सलः अनुकंपया परिपाति अपिस्वित् हा भगवान चंद्र ह्या मेली आहे माता ज्याची अशा आपल्या घरापासून चुकलेल्या हरिणबालकाला सिंहाच्या भीतीने दीन लोकांवर दया करणारा दयेने रक्षण करीत आहे काय ? ॥२४॥ च किंवा आत्मजविश्लेषज्वरदवदहनशिखाभिः उपतप्यमानहृदयस्थलनलिनीकं उपसृतमृगीतनयं मां शिशिरशांतानुरागगुणितनिजवदनसलिलामृतमयगभस्तिभिः स्वधयति इति आणि किंवा पुत्राच्या वियोगज्वररूपी वणव्याच्या ज्वाळांनी तप्त झाली आहे हृदयरूपी स्थळकमळिणी ज्याची अशा हरिणीच्या बालकाच्या मागोमाग धावणार्या मला शीतल, शांत व प्रेमामुळे वारंवार खुळखुळलेल्या आपल्या मुखातील उदकरूपी अमृतमय किरणांनी सुख देत आहे काय ? ॥२५॥ एवं अघटमानमनोरथाकुलहृदयः सः योगतापसः मृगदार कालः अहिः आखुबिलं इव आपद्यत याप्रमाणे मनोरथ पूर्ण न झाल्यामुळे व्याकुळ हृदय झालेला तो योगाभ्यास व तपश्चर्या करणारा भरत भयंकर वेग असणारा काळ सर्प उंदराच्य बिळाजवळ जसा तसा येऊन पोचला. ॥२६॥ तदानीं अपि पार्श्ववर्तिनं आत्मजं इव अनुशोचंतं अभिवीक्षमाणः मृगे एव अभिनिवेशितमनाः मृगेण सह इमं लोकं विसृज्य मृतं कलेवरं अनु नमृतजन्मानुस्मृति इतरवत् मृगशरीरं अवाप त्या वेळेसहि बाजूस असणार्या औरस पुत्राप्रमाणे शोक करणार्या मृगाला पहाणारी मृगाच्या ठिकाणीच मन गढून गेलेला असा तो मृगासह ह्या लोकाला सोडून मेलेल्या शरीराबरोबर ज्याचे जन्माचे स्मरण नष्ट झाले नाही असा भरत इतरांप्रमाणे हरिणाच्या शरीराला प्राप्त झाला. ॥२७॥ ह वा तत्र अपि आत्मनः मृगत्वकारणं भगवदाराधनासमीह्यनुभावेन अनुस्मृत्य भृशं अनुतप्यमानः आह खरोखर त्याठिकाणीसुद्धा स्वतःला हरिणपणा प्राप्त होणार्या कारणाला परमेश्वराची आराधना चांगल्या तर्हेने केल्याच्या सामर्थ्याने आठवून अत्यंत पश्चात्ताप पावलेला असा तो म्हणाला ॥२८॥ अहो कष्ट काभासेन स्वारब्धकर्मणा योगारंभणतः च भगवदाराधनलक्षणात् विभ्रंशितः इतरथा साक्षात् निःश्रेयसप्रतिपक्षतया प्राक्परित्यक्तदुस्त्यजहृदयाभिजातस्य तस्य जात्यंतरे एणकुणके आसंगः कथं एवं अंतरायविहतयोगारंभणस्य मृगार्भकपोषणपालनप्रीणनलालनानुषंगेण आत्मानं अविगणयतः राजर्षेः भरतस्य तावत् दुरतिक्रमः करालरभसः अहं आत्मवतां अनुपथात् भ्रष्टः यत् विमुक्तसमस्तसंगस्य विविक्तपुण्यारण्यशरणस्य आत्मवतः मम मनः सर्वेषां आत्मनां आत्मनि भगवति वासुदेवे तदनुश्रवणमननसंकीर्तनाराधनानुस्मरणाभियोगेन अशून्यसकलयामेन कालेन समावेशितं समाहितं तत् अबुधस्य तु पुनः कार्त्स्न्येन आरात् मृगसुतं अनु परिसुस्राव अहो हाय हरिणबालकाच्या रूपाने भासणार्या स्वतःच्या प्रारब्धकर्माने योगमार्गापासून आणि ईश्वराराधनरूपी कर्मापासून भ्रष्ट केला असावा असे नसेल तर प्रत्यक्ष मोक्षाचे शत्रू म्हणून सोडण्यास कठिण अशा औरस पुत्रांचा पूर्वीच त्याग करणार्या त्या भरताचे भिन्न जातीच्या हरिणबालकाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम कसे उत्पन्न झाले असते याप्रमाणे विघ्नाने ज्याचा योगमार्ग भग्न झाला आहे अशा हरिणबालकाचे पोषण, पालन, संतोष व लालन ह्यांच्या योगाने स्वतःची चिंता न करणार्या राजर्षि भरताचा तितक्यात चुकविण्यास कठिण असा हाय मी आत्मज्ञानी लोकांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो जे सर्वसंगपरित्याग केलेल्या एकांताकरिता पवित्र अरण्याचा आश्रय केलेल्या आत्मज्ञानी अशा माझे मन संपूर्ण प्राण्यांचा आत्मा अशा ऐश्वर्यवान परमेश्वराच्या ठिकाणी त्याच्या गुणांचे श्रवण, मनन, संकीर्तन, पूजन व स्मरण यांविषयीच्या निश्चयामुळे ज्याचे सर्व प्रहर भरून गेले आहेत अशा काळाने ठेविले होते निश्चल झाले होते ते मूर्ख अशा माझे तर पुनरपि सर्वस्वी दुरून हरिणबालकाच्या मागोमाग गळून पडले. ॥२९॥ इति एव निगूढनिर्वेदः मातरं मृगीं विसृज्य पुनः कालंजरात् भगवत्क्षेत्रं उपशमशीलमुनिगणदयितं शालग्रामं पुलस्त्यपुलहाश्रमं प्रत्याजगाम याप्रमाणे गुप्त आहे वैराग्य ज्याचे असा तो जी हरिणी तिला सोडून पुनः कालंजर पर्वतापासून परमेश्वराचे क्षेत्र अशा शांत स्वभावाच्या मुनिगणांना आवडणार्या शालनामक वृक्षांचे जेथे वन आहे अशा पुलस्त्यपुलह ऋषीच्या आश्रमाला पुनः येऊन पोचला. ॥३०॥ तस्मिन् अपि कालं प्रतीक्षमाणः च भृशं संगात् उद्विग्नः आत्मसहचरः शुष्कपर्णतृणवीरुधा आवर्तमानः मृगनिमित्तावसानं एव गणयन् तीर्थोदकविलन्नं मृगशरीरं उत्ससर्ज त्या ठिकाणीहि मृत्यूची वाट पहाणारा आणि अतिशय संगतीपासून त्रास पावलेला आत्मा हाच सोबती ज्याचा असा सुकलेली पाने, गवत व वेली यांनी निर्वाह करणारा मृगदेहप्राप्तीच्या कारणाच्या समाप्तीला मात्र मोजीत पवित्र उदकाने भिजलेल्या हरिणाच्या शरीराला टाकिता झाला. ॥३१॥ पंचम स्कन्धः - अध्याय आठवा समाप्त |