|
श्रीमद् भागवत महापुराण
पंचम स्कंध - अध्याय ७ वा - अन्वयार्थ
भरताचे चरित्र - महाभागवतः भरतः तु भगवता अवनितलपरिपालनाय संचिंतितः तदनुशासनपरः विश्वरूपदुहितरं पञ्चजनीं उपयेमे मोठा भगवद्भक्त असा भरत तर ऋषभदेवाने पृथ्वीतलाचे पालन करण्याकरिता संकल्पानेच अभिषेक केलेला त्या ऋषभदेवाच्या आज्ञेत तत्पर असा पञ्चजनी नावाच्या विश्वरूपाच्या कन्येला वरिता झाला. ॥१॥ उ ह वा तस्यां कार्त्स्न्येन आत्मनः अनुरूपान् पंच आत्मजान् भूतादि भूतसूक्ष्माणि इव जनयामास नंतर तिच्या ठिकाणी सर्वप्रकारे स्वतःला अनुरूप अशा पांच मुलांना भूतांचे आदिकारण अहंकार जसे पाच सूक्ष्मभूतांना तसे उत्पन्न करिता झाला. ॥२॥ सुमतिं राष्ट्रभृतं सुदर्शनं आवरणं धूम्रकेतुं इति यतः आरभ्य एतत् अजनाभं वर्षं भारतं इति व्यपदिशंति सुमति राष्ट्रभृत् सुदर्शन आवरण धूम्रकेतु अशांना ज्या भरतापासून आरंभ करून ह्या अजनाभ नावाच्या देशाला भारत असे म्हणतात. ॥३॥ सः बहुवित् स्वधर्मं अनुवर्तमानः महीपतिः पितृपितामहवत् उरुवत्सलतया स्वे स्वे कर्माणि वर्तमानाः प्रजाः पर्यपालयत् तो महाज्ञानी स्वधर्माला अनुसरणारा भरतराजा बाप व आजोबा यांप्रमाणे अत्यंत दयाळूपणे आपआपल्या कर्मांत रहाणार्या प्रजांना पाळिता झाला. ॥४॥ च यज्ञक्रतुरूपं भगवंतं श्रद्धया आहृताग्निहोत्रदर्शपूर्णमासचातुर्मस्यपशुसोमानां प्रकृतिविकृतिभिः उच्चावचैः क्रतुभिः अनुसवनं चातुर्होत्रविधिना ईजे आणि यज्ञ व क्रतुस्वरूपी परमेश्वराला श्रद्धेने आपल्या अधिकाराने हस्तगत केलेल्या अग्निहोत्र, दर्शपूर्णमास, चातुर्मास्य, पशु, सोम अशा यज्ञांचे मूळस्वरूप व त्यातून निघालेली दुसरी रूपे अशा लहानमोठया यज्ञांनी प्रत्येक सवनकाळी चारी वेदांत सांगितलेल्या विधानाने पूजिता झाला. ॥५॥ विरचितांगक्रियेषु नानायागेषुसंप्रचरत्सु यत् अपूर्वं धर्माख्यं क्रियाफलं तत् परे ब्रह्मणि यज्ञपुरुषे सर्वदेवतालिंगानां मंत्राणां अर्थनियामकतया साक्षात्कर्तरि परदेवतायां भगवति वासुदेवे एव भावयमानः आत्मनैपुण्यमृदितकषायः सः यजमानः अध्वर्युभिः हविषु गृह्यमाणेषु यज्ञभाजः तान् देवान् पुरुषावयवेषु अभ्यध्यायत् अंगभूत क्रियांचे अनुष्ठान ज्यात आहे असे अनेक प्रकारचे यज्ञ उत्तम तर्हेने चालले असता जे अपूर्व नामक धर्मस्वरूपी यज्ञकर्माचे फल ते श्रेष्ठ अशा ब्रह्मस्वरूपी यज्ञपुरुष अशा त्या त्या देवतांचे प्रकाशक अशा मंत्रांचा अर्थाच्या नियंतृत्वामुळे प्रत्यक्ष कर्ताच अशा श्रेष्ठ देवतारूपी भगवान वासुदेवाच्या ठिकाणीच समजणारा आपल्या कौशल्याने रागादि मळ क्षीण केले आहेत ज्याने असा तो यज्ञ करणारा राजा अध्वर्यूंनी हविर्भाग ग्रहण केले असता यज्ञभोक्ते अशा त्या देवांना परमेश्वराच्या अवयवांच्या ठिकाणी चिंतन करिता झाला. ॥६॥ एवं कर्मविशुद्धया विशुद्धसत्त्वस्य अंतर्हृदयाकाशशरीरे ब्रह्मणि महापुरुषरूपोपलक्षणे श्रीवत्सकौस्तुभवनमालारिदरगदादिभिः उपलक्षिते निजपुरुषहृल्लिखितेन पुरुषरूपेण आत्मनि विरोचमाने भगवति वासुदेवे अनुदिनं एधमानरया उच्चैस्तरां भक्तिः अजायत याप्रमाणे कर्माच्या अत्यंत शुद्धतेने निर्मळ चित्त झालेल्या भरताची ज्याचे शरीर हृदयाकाशात स्फुरत होते अशा ब्रह्मरूपी महापुरुषाच्या रूपाच्या आकारासारख्या श्रीवत्स, कौस्तुभ, वनमाला, चक्र, शंख, व गदा इत्यादिकांनी चिन्हित अशा स्वकीय भक्तांच्या हृदयांत चित्रासारख्या राहिलेल्या पुरुषरूपाने अंतःकरणांत शोभणार्या ऐश्वर्यवान वासुदेवाच्या ठिकाणी दिवसेंदिवस जिचा वेग वाढत आहे अशी अत्युत्तम भक्ति उत्पन्न झाली. ॥७॥ एवं वर्षायुतसहस्रपर्यंतावसितकर्मनिर्वाणावसरः अधिभुज्यमानं पितृपैतामहं रिक्थं स्वतनयेभ्यः यथादायं विभज्य स्वयं सकलसंपन्निकेतात् स्वनिकेतात् पुलहाश्रमं प्रवव्राज याप्रमाणे ज्याने कर्म समाप्त करण्याचा काळ दहा हजार सहस्र वर्षे निश्चित केला आहे असा तो भरत भोगलेले वाडवडिलांचे राज्य आपल्या मुलांना वाटणीप्रमाणे वाटून देऊन स्वतः संपूर्ण संपत्तीने भरलेल्या आपल्या घरातून पुलह ऋषीच्या आश्रमाला सर्वसंगत्याग करून गेला. ॥८॥ यत्र ह वाव अद्य अपि भगवान् हरिः वात्सल्येन तत्रत्यानां निजजनानां इच्छारूपेण संनिधाप्यते ज्या आश्रमांत खरोखर अजूनहि भगवान हरि भक्तवत्सलतेने तेथे रहाणार्या स्वकीयजनांना अपेक्षितरूपाने जवळ केला जातो. ॥९॥ यत्र चक्रनदी नाम सरित्प्रवरा आश्रमपदानि उभयतो नाभिभिः दृषच्चक्रैः सर्वतः पवित्रीकरोति ज्याठिकाणी चक्रनदी नावाची श्रेष्ठ नदी आश्रमांच्या स्थानांना दोहो बाजूला टेंगळे असलेल्या पाषाणांच्या चक्रांनी सर्व बाजूने पवित्र करिते. ॥१०॥ वाव किल तस्मिन् पुलहाश्रमोपवने विविधकुसुमकिसलयतुलसिकांबुभिः कंदमूलफलोपहारैः च भगवतः आराधनं समीहमानः विविक्तः उपरतविषयाभिलाषः उपभृतोपशमः सः एकलः परां निर्वृतिं अवाप खरोखरच त्या पुलहाश्रमाच्या उपवनात नानाप्रकारची पुष्पे, पत्रे, तुळशी व उदक यांनी आणि कंद, मुळे, फळे यांच्या नैवेद्यांनी परमेश्वराचे आराधन करणारा शुद्ध विषयेच्छेपासून निवृत्त झालेला पूर्ण शांति धारण केलेला तो एकटा श्रेष्ठ अशा सुखाला प्राप्त झाला. ॥११॥ इत्थं तया अविरतपुरुषपरिचर्यया भगवति प्रवर्धमानानुरागभरद्रुतहृदयशैथिल्यः प्रहर्षयोगेन आत्मनि उद्भिद्यमानरोमपुलककुलक औत्कंठयप्रवृत्तप्रणयबाष्पनिरुद्धावलोकनयनः एवं निजरमणारुणचरणारविंदानुध्यानपरिचितभक्तियोगेन परिप्लुतपर माह्लादगंभीरहृदयह्रदावगाढधिषणाः तां क्रियमाणां भगवत्सपर्यां अपि न सस्मार याप्रमाणे त्या भगवंताच्या सतत पूजेच्या योगाने परमेश्वराच्या ठिकाणी वाढलेल्या प्रेमभराने द्रव पावलेल्या हृदयात शैथिल्य प्राप्त झालेला अत्यानंदामुळे शरीरावर उभे रहात आहेत रोमांचाचे समूह ज्याच्यावर असा उत्कंठेमुळे वाढू लागलेल्या आनंदाश्रूंनी ज्याच्या नेत्रांची अवलोकनशक्ति बंद झाली आहे असा याप्रमाणे स्वतःचा प्रिय जो परमेश्वर त्याच्या आरक्त चरणकमलाच्या ध्यानाने भक्तियोग वृद्धिंगत झाल्यामुळे ज्यात पूर्णपणे परमानंद भरला आहे अशा गंभीर हृदयरूपी डोहांत ज्याची बुद्धि बुजली आहे असा त्या करीत असलेल्या भगवंताच्या पूजेलाहि स्मरता झाला नाही. ॥१२॥ इत्थं धृतभगवद्व्रतः ऐणेयाजिनवाससा च अनुसवनाभिषेकार्द्रकपिशकुटिलजटाकलापेन विरोचमानः सूर्यमंडले उज्जिहाने सूर्यर्चा भगवंतं हिरण्मयं पुरुषं अभ्युपतिष्ठन् एतत् उ ह उवाच याप्रमाणे परमेश्वराचे व्रत धारण करणारा मृगचर्माच्या परिधानाने आणि त्रिकाळ स्नानाने भिजलेल्या पिंगट व कुरळ्या केशांच्या जटाभाराने शोभणारा सूर्यमंडल वर आले असता सूर्याच्या ऋचेने ऐश्वर्यसंपन्न सुवर्णमय पुरुषाला स्तवणारा हे खरोखरच बोलता झाला. ॥१३॥ परोरजः सवितुः देवस्य जातवेदः भर्गः इदं मनसा जजान अदः पुनः आविश्य गृघ्राणं हंसं सुरेतसा चष्टे नृषद्रिंगिरां इमः रजोगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडील सूर्यनारायणाचे कर्मफल देणारे तेज हे मनाने उद्भवले आहे हे पुनः शिरून इच्छिणार्या जीवाला चिच्छक्तीच्या योगाने पहाते मनुष्यांच्या ठिकाणी उपाधिरूपाने रहाणार्या बुद्धीला गति देणार्याला शरण जातो. ॥१४॥ पंचम स्कन्धः - अध्याय सातवा समाप्त |