श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय ६ वा - अन्वयार्थ

ऋषभदेवांचा देहत्याग -

भगवः योगसमीरितज्ञानावभर्जितकर्मबीजानां आत्मारामाणां यदृच्छया उपगतानि ऐश्वर्याणि पुनः नूनं क्लेशदानि भवितुं न अर्हंति ज्ञानसंपन्न मुने, योगाने प्रदीप्त झालेल्या ज्ञानाग्नीने ज्यांची कर्मबीजे भाजून गेली आहेत अशा आत्मस्वरूपी रममाण झालेल्या पुरुषांची सहजगत्या प्राप्त झालेली ऐश्वर्ये पुनरपि निश्‍चयेकरून क्लेशदायक होण्यास योग्य होत नाहीत. ॥१॥

सत्यं उक्तं किंतु इह वै एके अनवस्थानस्य मनसः विश्रंभं अद्धा शटकिरातः इव न संगच्छंते खरे बोलले गेले परंतु येथे खरोखर काही लोक अस्थिर अशा मनाच्या विश्वासाला पूर्णपणे धूर्त पारध्याप्रमाणे प्राप्त होत नाहीत. ॥२॥

तथा च उक्तं अनवस्थिते मनसि कर्हिचित् सख्यं न कुर्यात् हि यद्विश्रंभात् चिरात् चीर्णं ऐश्वरं तपः चस्कंद त्यासंबंधाने म्हटले आहे अस्थिर अशा मनाच्या ठिकाणी कधीहि मित्रत्व करू नये कारण ज्याच्यावर विश्वास केल्यामुळे पुष्कळ दिवसपर्यंत आचरण केलेले शंकराचे तप फुकट गेले. ॥३॥

कृतमैत्रस्य योगिनः कामस्य तम् अनु ये अरयः पत्युः पुंश्‍चली जाया इव नित्यं छिद्रं ददाति मित्रत्व केलेल्या योग्याचे मन कामवासनेला त्याच्या मागून जे इतर क्रोध आदिकरून जे शत्रु त्यांना पतीचा विश्वास असणार्‍या कुलटा स्त्रीप्रमाणे निरंतर अवसर देते. ॥४॥

कामः मन्युः मदः लोभः शोकमोहभयादयः च कर्मबंधः यन्मूलः तत् कः बुधः नु स्वीकुर्यात् काम, क्रोध, मद, लोभ, शोक, मोह व भय इत्यादि आणि कर्माचे बंधन ज्यामुळे होते ते कोणता ज्ञानी मनुष्य निश्‍चयेकरून स्वीकारील ॥५॥

अथ एवं अखिललोकपालललामः अपि जडवत् विलक्षणैः अवधूतवेषभाषाचरितैः अविलक्षितभगवत्प्रभावः योगिनां सांपरायविधिं उपशिक्षयन् स्वकलेवरं जिहासुः आत्मनि आत्मानं असंव्यवहितं अनर्थांतरभावेन अन्वीक्षमाणः उपरतानुवृत्तिः उपरराम नंतर याप्रमाणे संपूर्ण लोकपालांचे भूषण असा सुद्धा वेडयाप्रमाणे विलक्षण अशा अवधूतासारखा वेष, भाषण व आचरण यांनी ज्याचे ईश्वरी सामर्थ्य ध्यानात येत नसे असा, योग्यांना देहत्यागाच्या विधीला शिकविणारा, आपल्या देहाला टाकण्याची इच्छा करणारा, आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याला व्यवधानरहित अशा भेदभावावाचून पहाणारा, विषयांचा संबंध ज्याचा सुटला आहे असा ऋषभदेव विराम पावता झाला. ॥६॥

ह वा एवं मुक्तलिंगस्य तस्य भगवतः ऋषभस्य योगमायावासनया अभिमानाभासेन इमां जगतीं संक्रममाणः कोंकवेंककुटकान् दक्षिणकर्नाटकान् देशान् यदृच्छया उपगतः कुटकाचलोपवने आस्यकृताश्‍मकवलः उन्मादः इव मुक्तमूर्धजः असंवीतः एव विचचार असो, याप्रमाणे लिंगदेह ज्याने सोडिला आहे अशा त्या ऐश्वर्यसंपन्न अशा ऋषभदेवाचा देह योगमायेच्या वासनेने अभिमानाच्या आभासाने ह्या पृथ्वीवर फिरत फिरत कोंक, वेंक, व कुटक अशा दक्षिण कर्नाटक देशांना सहजरीत्या प्राप्त झालेला कुटकपर्वताच्या उपवनात मुखात दगडाचा घास धारण केलेला उन्मत्ताप्रमाणे केस मोकळे सोडलेला नग्नच फिरता झाला. ॥७॥

अथ समीरवेगविधूतवेणुविकर्षणजातोग्रदावानलः तद्वनं आलेलिहानः तेन सह ददाह नंतर वायूच्या वेगाने कंपित झालेल्या वेळूच्या घर्षणाने उत्पन्न झालेला भयंकर वणवा त्या अरण्याला ग्रासणारा असा त्या ऋषभदेवासह जाळिता झाला. ॥८॥

मंद अर्हन्नामा कोंकवेंककुटकानां राजा यस्य किल अनुचरितं उपाकर्ण्य उपशिक्ष्य कलौ अधर्मेउत्कृष्यमाणे भवितव्येन विमोहितः अकुतोभयं स्वधर्मपथं अपहाय निजमनीषया असमंजसं कुपथपाषंडं संप्रवर्तयिष्यते मंदबुद्धि अर्हत् या नावाचा कोंक, वेंक व कुटक या देशांचा राजा ज्याचे निश्‍चयेकरून चरित्र ऐकून स्वतः शिकून कलियुगात अधर्म भरभराटीस आला असता भवितव्यतेमुळे मोहित झालेला असा ज्याला कोठेहि भय नाही अशा स्वधर्माच्या मार्गाला सोडून आपल्या बुद्धीने अयोग्य अशा भलत्याच पाखंड मार्गाला प्रवृत्त करील. ॥९॥

ह वाव येन कलौ मनुजापसदाः देवमायामोहिताः स्वविधिनियोगशौचचरित्रविहीनाः निजनिजेच्छया देवहेलनानि अस्नानानाचमनाशौचकेशोल्लुंचनादीनि अपव्रतानि गृह्‌‌णानाः अधर्मबहुलेन कलिना उपहतधियः ब्रह्मब्राह्मणयज्ञपुरुषलोकविदूषकाः प्रायेण भविष्यंति नंतर ज्याच्या योगाने कलियुगात नीच मनुष्य देवमायेने मोहित झालेले, आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेल्या पवित्र आचरणाने हीन, आपापल्या इच्छेप्रमाणे देवाचा अपमान करणार्‍या, स्नान न करणे, आचमन न घेणे, अमंगळपणा, केस कातरणे इत्यादि भलभलत्या नियमांना ग्रहण करणारे, ज्यात पुष्कळ अधर्म आहे अशा कलीने बुद्धि भ्रष्ट झालेले असे वेद, ब्राह्मण, यज्ञपुरुष व पवित्र जन यांना दूषण देणारे बहुधा होतील. ॥१०॥

हि ते च अंधपरंपरया अर्वाक्तनया निजलोकयात्रया आश्‍वस्ताः स्वयमेव अंधे तमसि प्रपतिष्यंति म्हणून ते आणखी अंधपरंपरेच्या योगाने अलीकडील स्वतःच्या प्रवृत्तीने विश्वास पावलेले स्वतःच अंध नावाच्या नरकात पडतील. ॥११॥

अयं अवतारः रजसा उपप्लुतकैवल्योपशिक्षणार्थः तस्य अनुगुणान् श्‍लोकान् गायंति हा अवतार रजोगुणाने व्याप्त झालेल्यांना मोक्षमार्गाचे शिक्षण देण्याकरिता आहे त्याच्या गुणाला अनुरूप अशा श्‍लोकांना गातात. ॥१२॥

अहो सप्तसमुद्रवत्याः भुवः द्वीपेषु वर्षेषु एतत् अधिपुण्यं यत्रत्यजनाः मुरारेः भद्राणि अवतारवन्ति कर्माणि गायंति अहो सप्तसमुद्रांकित भूमीवरील द्वीपामधील देशामध्ये हा देश अधिक पुण्यकारक होय जेथे रहाणारे लोक परमेश्वराची कल्याणकारक ज्यात अवतारकृत्ये सांगितली आहेत अशी कर्मे गातात. ॥१३॥

अहो नु प्रैयव्रतः वंशः यशसा अवदातः यत् यत्र पुराणः पुमान् कृतावतारः सः आद्यः पुरुषः अकर्महेतुं धर्मं चचार अहो निश्‍चयेकरून प्रियव्रताचा वंश कीर्तीने पवित्र आहे कारण ज्या वंशात पुराणपुरुष परमात्मा अवतार धारण केलेला आहे तो आदिभूत पुरुष कर्मनिरासरूपी मोक्षाला कारणभूत अशा धर्माला आचरण करिता झाला. ॥१४॥

अपरः कः योगी नु अभवस्य अस्य काष्ठां मनोरथेन अपि अनुगच्छेत् यः येन असत्तया उदस्ताः कृतप्रयत्‍नाः योगमायाः स्पृहयति दुसरा कोणता योगी निश्‍चयेकरून जन्मरहित अशा ह्या ऋषभदेवाच्या दिशेला मनाच्या इच्छेनेहि जाईल जो ज्या ऋषभदेवाने खर्‍या नसल्यामुळे टाकून दिलेल्या ज्याबद्दल प्रयत्‍न केला आहे अशा योगमायांना इच्छील. ॥१५॥

इति ह स्म सकलवेदलोकदेवब्राह्मणगवां परमगुरोः भगवतः ऋषभाख्यस्य पुंसां समस्तदुश्‍चरिताभिहरणं विशुद्धाचरितं ईरितं इदं परममहामंगलायनं उपचितया अनुश्रद्धया अवहितः अनुशृणोति वा आश्रावयति अनयोः अपि तस्मिन् भगवति वासुदेवे एकान्ततः भक्तिः समनुवर्तते अशा प्रकारचेच संपूर्ण वेद, शास्त्र, देव, ब्राह्मण व गाई यांचा श्रेष्ठ गुरु अशा ऐश्वर्यसंपन्न ऋषभदेवाचे पुरुषांच्या संपूर्ण पापांचा नाश करणारे पवित्र आचरण कथन केले हे श्रेष्ठ महामंगलाचे निधान वाढलेल्या श्रद्धेने एकाग्र अंतःकरणपूर्वक ऐकतो अथवा ऐकवितो त्या दोघांचीहि त्या ऐश्वर्यसंपन्न अशा वासुदेवाच्या ठिकाणी निश्‍चित भक्ति जडते. ॥१६॥

हि यस्याम् एव विविधवृजिनसंसारपरितापोपतप्यमानं आत्मानं अनुसवनं अविरतं स्नापयंतः भगवदीयत्वेन एव परिसमाप्तसर्वार्थाः कवयः तया एव परया निर्वृत्त्या स्वयं आसादितं आत्यंतिकं परमपुरुषार्थं अपवर्गम् अपि नो आद्रियन्ते यास्तव ज्या भक्तीच्या ठिकाणीच अनेक प्रकारच्या पापांमुळे संसारतापाने तप्त झालेल्या आत्म्याला क्षणोक्षणी सतत स्नान घालणारे भगवंताचे स्वकीय झाल्यानेच चारी पुरुषार्थ ज्यास लाधले आहेत असे ज्ञानी लोक त्याच श्रेष्ठ अशा सुखाने आपोआप प्राप्त झालेल्या परमावधीच्या श्रेष्ठ पुरुषार्थ अशा मोक्षालाहि स्वीकारीत नाहीत. ॥१७॥

अंग राजन् भगवान् मुकुंदः भवतां च यदूनां पतिः गुरुः दैवं प्रियः कुलपतिः क्व च वः अलं किंकरः एवम् अस्तु भजतां मुक्तिः ददाति कर्हिचित् स्म भक्तियोगं न ददाति हे परीक्षित राजा, ऐश्वर्यवान परमेश्वर तुमचा आणि यादवांचा स्वामी गुरु दैवत प्रिय कुलपति आणि कित्येक प्रसंगी तुमचा सर्व तर्‍हेने सेवक हे असो; परंतु सेवा करणारांना मुक्ति देतो कधीहि भक्तियोग देत नाही. ॥१८॥

नित्यानुभूतनिजलाभनिवृत्ततृष्णः यः करुणया अतद्रचनया श्रेयसि चिरसुप्तबुद्धेः लोकस्य अभयं आत्मलोकं आख्यात् तस्मै भगवते ऋषभाय नमः नित्य अनुभविलेल्या आत्मलाभामुळे भोगेच्छा सुटलेला जो कृपेने मिथ्याभूत देहादिकांविषयींच्या मनोरथपरंपरांनी कल्याणाविषयी ज्यांच्या बुद्धि चिरकाल निद्रिस्त झाल्या आहेत अशा लोकांना निर्भय अशा आत्मनिरूपणाला सांगता झाला त्या ऐश्वर्यसंपन्न ऋषभदेवाला नमस्कार असो. ॥१९॥

पंचम स्कन्धः - अध्याय सहावा समाप्त

GO TOP