श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय ४ था - अन्वयार्थ

नाभिराजाचे चरित्र -

अथ ह प्रकृतयः प्रजाः ब्राह्मणाः देवताः उत्पत्त्या एव अभिव्यज्यमानभगवल्लक्षणं साम्योपशमवैराग्यै‌श्वर्यमहाविभूतिभिः अनुदिनं एधमानानुभावं तं अतितरां अवनितलसमवनाय जगृधुः नंतर निश्‍चयेकरून प्रधानमंडळ प्रजा, ब्राह्मण, देवता उपजताच ज्याच्या ठिकाणी भगवंताची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत अशा समता, शांति, वैराग्य व ऐश्वर्य ह्या महाविभूतींनी दिवसेंदिवस ज्याचा प्रभाव वाढत आहे अशा त्या मुलाला अतिशयेकरून पृथ्वीतलाच्या संरक्षणाकरिता स्वीकारिते झाले. ॥१॥

तस्य ह वा इत्थं वरीयसा बृहच्छ्‌लोकेन वर्ष्मणा च बलेन ओजसा श्रिया यशसा च वीर्यशौर्याभ्यां पिता ऋषभः इति इदं नाम चकार त्याचे खरोखर याप्रकारे अत्यंत श्रेष्ठ मोठी आहे कीर्ति ज्याची अशा शरीराने आणि बलाने, तेजाने, संपत्तीने, कीर्तीने आणि पराक्रम व शूरता यांनी पिता ऋ‌षभ असे हे नाव ठेविता झाला. ॥२॥

हि तस्य स्पर्धमानः भगवान् इंद्रः व‌र्षे न ववर्ष तत् अवधार्य भगवान् योगेश्वरः ऋ‌षभदेवः प्रहस्य आत्मयोगमायया अजनाभं नाम स्ववर्षं अभ्यवर्षत् खरोखर त्याचा हेवा करणारा भगवान इंद्र त्या भागांत वृष्टि करता झाला नाही ते जाणून भगवान योगाचा स्वामी ऋषभदेव हसून आपल्या योगमायेने अजनाभ नावाच्या आपल्या भागांवर पर्जन्य पाडिता झाला. ॥३॥

नाभिः तु यथाभिलषितं सुप्रजस्त्वं अवरुध्य अतिप्रमोदभरविह्वलः गद्‌गदाक्षरया गिरा स्वैरं गृहीतनरलोकसधर्मं भगवंतं पुराणपुरुषं मायाविलसितमतिः वत्स तात इति सानुरागं उपलालयन् परां निर्वृति उपगतः नाभिराजा तर इच्छेनुरूप चांगल्या संततीला प्राप्त होऊन मोठया हर्षभराने युक्त असा सद्‍गदित शब्द ज्यात आहेत अशा वाणीने स्वेच्छेने स्वीकारले आहेत मनुष्यलोकीचे गुण ज्याने असा ऐश्वर्यवान पुराणपुरुषाला मायेने ज्याची बुद्धि चमकू लागली आहे असा हे वत्सा अरे बाळा असे प्रेमाने लालन करीत अत्यंत सुखाला प्राप्त झाला. ॥४॥

जनपदः नाभिः राजा आपौरप्रकृ‌ति विदितानुरागं आत्मजं समयसेतुरक्षायां अभिषिच्य ब्राह्मणेषु उपनिधाय मेरुदेव्या सह विशालायां प्रसन्ननिपुणेन तपसा समाधियोगेन नरनारायणाख्यं भगवंतं वासुदेवं उपासीनः कालेन तन्महिमानं अवाप नागरिक जनांच्या मताने वागणारा नाभि राजा नागरिकांपासून प्रधानमंडळापर्यंत कळून आले आहे प्रेम ज्यावरील अशा मुलाला धर्ममर्यादेचे रक्षण करण्याच्या कामावर अभिषेक करून ब्राह्मणांच्या मांडीवर ठेवून मेरुदेवीसह बदरिकाश्रमात दुसर्‍याला त्रास न होणार्‍या व तीव्र अशा तपश्‍चर्येने समाधियोगाने नरनारायण नावाच्या ऐश्वर्यवान अशा परमेश्वराला पूजणारा काही काळाने त्याच्या महिम्याला प्राप्त झाला. ॥५॥

पांडवेय यस्य ह श्‍लौकौ उदाहरंति राजर्षेः नाभेः तत् कर्म कः पुमान् नु अन्वाचरेत् यस्य शुद्धेन कर्मणा हरिः अपत्यतां अगात् हे परीक्षित राजा ज्याच्या संबंधाचे दोन श्‍लोक म्हणत असतात राजर्षि अशा नाभिराजाचे ते प्रसिद्ध कर्म कोणता पुरुष निश्‍चयेकरून आचरण करील ज्याच्या शुद्ध अशा कर्माने परमेश्वर पुत्रत्वाला प्राप्त झाला. ॥६॥

नाभेः अन्यः ब्रह्मण्यः कुतः यस्य बर्हिषि मंगलपूजिताः विप्राः ओजसा यज्ञेशं दर्शयामासुः नाभीहून दुसरा ब्राह्मणांचे हित करणारा कोठे मिळणार ज्याच्या यज्ञामध्ये मंगल उपचारांनी पूजिलेले ब्राह्मण आपल्या तेजाने यज्ञपुरुषाला दाखविते झाले. ॥७॥

अथ ह स्ववर्षं कर्मक्षेत्रं अनुमन्यमानः प्रदर्शितगुरुकुलवासः लब्धवरैः गुरुभिः अनुज्ञातः गृहमेधिनां धर्मान् अनुशिक्षमाणः भगवान् ऋषभदेवः समाम्नायाम्नातं उभयलक्षणं कर्म अभियुंजन् इंद्रदत्तायां जयंत्यां आत्मसमानानां आत्मजानां शतं जनयामास नंतर आपल्या देशाला कर्मभूमि मानणारा दाखवून दिला आहे गुरुकुळी वास ज्याने असा वर प्राप्त झालेल्या गुरूंनी अनुमोदन दिलेला गृहस्थाश्रम्यांच्या धर्मांना शिकविणारा भगवान ऋषभदेव शास्त्राने घालून दिलेल्या श्रुतिस्मृति प्रणीत कर्माला करणारा इंद्राने दिलेल्या जयंती नामक स्त्रीच्या ठिकाणी आपल्यासारख्या शंभर मुलांना उत्पन्न करिता झाला. ॥८॥

येषां खलु महायोगी ज्येष्ठः श्रेष्ठगुणः भरतः आसीत् येन इदं वर्षं भारतं इति व्यपदिशंति ज्यामध्ये निश्‍चयेकरून महान योगी सर्वात वडील श्रेष्ठ गुणांचा भरत नावाचा मुलगा होता ज्यामुळे ह्या वर्षाला भारत असे म्हणतात. ॥९॥

तम् अनु कुशावर्तः इलावर्तः ब्रह्मावर्तः मलयः केतुः भद्रसेनः इंद्रस्पृक् विदर्भः कीकटः इति नव पुत्राः नवति प्रधानाः (आसन्) त्याच्यानंतर कुशावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतु, भद्रसेन, इंद्रस्पृक्, विदर्भ, कीकट असे नऊ पुत्र नव्वदाहून श्रेष्ठ होते. ॥१०॥

कविः हरिः अंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः आविर्होत्रः द्रुमिलः चमसः अथ करभाजनः कवि, हरि, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस त्याचप्रमाणे करभाजन ॥११॥

इति नव भागवतधर्मप्रधानाः महाभागवताः तेषां भगवन्महिमोपबृंहितं वासुदेवनारदसंवादं उपशमायनं सुचरितं उपरिष्टात् वर्णयिष्यामः असे नऊ भागवतधर्माला मुख्य मानणारे मोठे भगवद्‌भक्त होते. त्यांचे भगवंताच्या महिम्याने भरलेले वासुदेव आणि नारद यांच्या संवादात्मक शांतीचे निधान असे चांगले चरित्र पुढे आम्ही वर्णन करू. ॥१२॥

यवीयांसः जायंतेयाः एकाशीतिः पितुः आदेशकराः महाशालीनाः महाश्रोत्रियाः यज्ञशीलाः कर्मविशुद्धाः ब्राह्मणाः बभूवुः त्यांचे कनिष्ठ बंधु जयंतीपासून उत्पन्न झालेले एक्क्याऐंशी पित्याचे आज्ञाधारक अत्यंत विनयशील मोठे वैदिक वारंवार यज्ञ करणारे कर्माने अत्यंत शुद्ध झालेले ब्राह्मण झाले. ॥१३॥

भगवान् स्वयं आत्मतंत्रः नित्यनिवृत्तानर्थपरंपरः केवलानंदानुभवः ईश्वरः एव विपरीतवत् कर्माणि आरभमाणः अतद्विदां कालेन् अनुगतं धर्मं उपशिक्षयन् समः उपशांतः मैत्रः कारुणिकः ऋषभसंज्ञः गृहेषु लोकं धर्मार्थयशःप्रजानंदामृतावरोधेन नियमयत् ऐश्वर्यसंपन्न स्वतः स्वतंत्र ज्याच्यापासून अनर्थपरंपरा नित्य दूर झालेल्या आहेत असा केवळ आनंदाचा अनुभव घेणारा ईश्वरच अज्ञान्याप्रमाणे कर्मांना करणारा ते समजत नाही ज्यांना अशा लोकांना कालपरंपरेने प्राप्त झालेल्या धर्माला शिकविणारा सम, शांत, मित्रत्वाने चालणारा, दयाळू ऋषभदेव गृहस्थाश्रमातील लोकाला धर्म, अर्थ, कीर्ति, प्रजा, भोग व मोक्ष यांच्या संग्रहाने नियम घालून देता झाला. ॥१४॥

यत् यत् शीर्षण्याचरितं तत् तत् लोकः अनुवर्तते जे जे श्रेष्ठांनी आचरण केलेले ते ते लोक अनुष्ठित करितो. ॥१५॥

यद्यपि सकलधर्मं गुह्यं ब्राह्मं स्वविदितं तथापि ब्राह्मणैः दर्शितमार्गैः सामादिभिः उपायैः जनतां अनुशशास जरी संपूर्ण आहेत धर्म ज्यात असे गुप्त वेदसंबंधी स्वतःस माहीत होते तरी सुद्धा ब्राह्मणांनी दाखविलेल्या मार्गांनी सामादिक उपायांनी जनसमूहाला वागविता झाला. ॥१६॥

द्रव्यदेशकालवयःश्रद्धत्विंग्विविधोद्‌देशोपचितैः सर्वैः क्रतुभिः अपि यथोपदेशं शतकृत्वः इयाज द्रव्य, देश, काल, वय, आस्तिक्यबुद्धि, ऋत्विज अशा नानाप्रकारच्या सामग्रीने परिपूर्ण अशा संपूर्ण यज्ञांनी सुद्धा ब्राह्मणांच्या उपदेशाप्रमाणे शंभरवेळा यजन करिता झाला. ॥१७॥

भगवता ऋषभेण परिरक्ष्यमाणे एतस्मिन् वर्षे कश्‍चन पुरुषः आत्मनः अन्यस्मात् कर्हिचित् कथंचन किमपि अविद्यमानम् इव भर्तरि अनुवसनं विजृंभितस्नेहातिशयम् अंतरेण न वाञ्छति न अपेक्षते ऐश्वर्यवान अशा ऋषभदेवाने रक्षण केलेल्या ह्या देशात कोणीहि पुरुष स्वतःला दुसर्‍यापासून केव्हाहि कसल्याहि कोणत्याहि न मिळण्यासारख्या वस्तूला स्वामी ऋषभदेवावर प्रतिक्षणी अतिशय प्रेम वाढत जावे याशिवाय इच्छित नसे अपेक्षित नसे. ॥१८॥

सः कदाचित् अटमानः ब्रह्मावर्तगतः भगवान् ऋषभः ब्रह्मर्षिप्रवरसभायां निशामयन्तीनां प्रजानां अवहितात्मनाः प्रश्रयप्रणयभरसुयंत्रितान् अपि आत्मजान् उपशिक्षयन् इति ह उवाच तो एकदा फिरत फिरत ब्रह्मावर्तात गेलेला ऐश्वर्यवान ऋषभदेव मोठमोठया ब्रह्मर्षींच्या सभेत पहात असलेल्या प्रजेच्यामध्ये ज्यांची अंतःकरणे स्वाधीन आहेत अशा ज्यांचे वर्तन प्रेम व नम्रतेने सुव्यवस्थित आहे अशाहि मुलांना शिक्षण देणारा असा याप्रमाणेच म्हणाला. ॥१९॥

पंचम स्कन्धः - अध्याय चवथा समाप्त

GO TOP