श्रीमद् भागवत महापुराण

पंचम स्कंध - अध्याय ३ रा - अन्वयार्थ

नाभिराजाचे चरित्र -

अपत्यकामः नाभिः अप्रजया मेरुदेव्या अवहितात्मा भगवंतं यज्ञपुरुषं अयजत संतानाची इच्छा करणारा नाभिराजा संतानरहित अशा मेरुदेवीसह एकाग्र अंतःकरणाने ऐश्वर्यसंपन्न अशा यज्ञपुरुषाला पूजिता झाला. ॥१॥

श्रद्धया विशुद्धभावेन ह वाव यजतः तस्य प्रवर्ग्येषु प्रचरत्सु द्रव्यदेशकालमंत्रर्त्विग्दक्षिणा‌विधानयोगोपपत्त्या दुरधिगमः अपि सुप्रतीकः निजजनाभिप्रेतार्थविधित्सया गृहीतहृदयः भगवान् भागवतवात्सल्यतया हृदयंगमं मनोनयनानंदनावयवाभिरामं अपराजितं आत्मानं आविश्‍चकार श्रद्धेने विशुद्धभक्तीने खरोखर यजन करणार्‍या त्या नाभिराजाची प्रवर्ग्यादिक कर्मे चालली असता द्रव्य, देश, काल, मंत्र, ऋत्विज्, दक्षिणा, व विधान ह्या सात उपायांनी मिळण्यास अशक्य असताहि सुंदर अवयवांनी युक्त असा आपल्या भक्तांचे इच्छित कार्य करण्याच्या इच्छेने ज्याचे हृदय घेरले आहे असा परमेश्वर भगवद्‍भक्तांविषयीच्या प्रेमामुळे मनोहर ज्याचे शरीर मनाला व नेत्रांना आनंद देणारे आहे अशा पराजय न पावणार्‍या स्वतःला प्रगट करिता झाला. ॥२॥

अथ ह ऋत्विक्सदस्यगृहपतयः तं आविष्कृतभुजयुगलद्वयं कपिशकौशेयांबरधरं उरसि विलसच्छ्रीवत्सललामं दरवरवनरुहवनमालाच्छूर्यमृतमणिगदादिभिः उपलक्षितं स्फुटकिरणप्रवरमुकुटकुंडलकटककटिसू‌‌‌त्रहारकेयूरनूपुराद्यंगभूषणविभू‌षितं हिरण्मयं पुरुषविशेषं अधनाः उत्तमधनम् इव उपलभ्य अर्हणेन सबहुमानं अवनतशीर्षाणः उपतस्थुः नंतर ऋत्विज्, सदस्य आणि गृहपति त्या चार हात प्रगट केले आहेत ज्याने अशा पिंगट वर्णाचे रेशमी वस्त्र धारण केलेल्या वक्षस्थलावर श्रीवत्सकौस्तुभ झळकणार्‍या उत्तम शंख, कमल, वनमाला, चक्र, कौस्तुभमणि व गदा इत्यादिकांनी चिन्हित अशा स्पष्ट किरण असलेले श्रेष्ठ मुकुट, कुंडल, कडी, करगोटा, हार, बाजूबंद व नूपुरे इत्यादि अंगभूषणांनी विभूषित अशा सुवर्णमय पुरुषोत्तमाला दरिद्री उत्तम द्रव्याला जसे त्याप्रमाणे पावून पूजेच्या योगाने मोठया आदराने नम्र मस्तक केलेले असे स्तुति करिते झाले. ॥३॥

अर्हत्तम अनुपथानां अस्माकं अर्हणं मुहुः अर्हसि नमोनमः इति एतावत् सुपदशिक्षितं कः प्रकृतिगुणव्यतिकरमतिः अनीशः पुमान् अर्वाक्तनाभिः नामरूपाकृतिभिः परस्य ईश्वरस्य प्रकृतिपुरुषयोः रूपनिरूपणं अर्हति हे पूज्यश्रेष्ठा तुझ्या मार्गास लागलेल्या आमच्या पूजेचा वारंवार स्वीकारण्यास योग्य आहेस वारंवार नमस्कार करावा असे एवढेच सत्पुरुषांनी शिकविलेले आहे. कोणता प्रकृतीच्या गुणांपासून झालेल्या प्रपंचात ज्याची बुद्धि गढून गेली आहे असा असमर्थ पुरुष अलीकडील नावे, रूपे व आकृति यांनी श्रेष्ठ अशा ईश्वराच्या प्रकृति व पुरुष यांहून स्वरूपाचे निरूपण करण्यास योग्य आहे ॥४॥

सकलजननिकायवृजिननिरसनशिवतमप्रवरगुणगणैकदेशकथनात् ऋते संपूर्ण जनसमूहांच्या पापांचे निरसन करणार्‍या कल्याणकारक श्रेष्ठ गुणसमुदायांच्या एखाद्या अंशाच्या वर्णनाच्या शिवाय ॥५॥

परम परिजनानुरागविरचितशबलसंशब्दसलिलसितकिसलयतुलसिकादूर्वांकुरैः अपि संभृतया सपर्यया किल परितुष्यसि हे श्रेष्ठा भक्तजनांनी केलेल्या प्रेमपूर्वक स्तुतीच्या व जल, शुद्ध पत्रे, तुळशी व दूर्वांकुर यांच्या योगाने सुद्धा केलेल्या पूजेने खरोखर तू संतुष्ट होतोस. ॥६॥

अथ अनया उरुभारभरया इज्यया अपि अनुवसनं अंजसा अव्यतिरेकेण बोभूयमानाशेषपुरुषार्थस्वरूपस्य आत्मनः एव भवतः इह समुचितं अर्थं न उपलभामहे किंतु नाथ आशिषः आशासानानां एतत् अभिसंराधनमात्रं भवितुं अर्हति आता ह्या पुष्कळ साहित्याने युक्त अशा पूजेने सुद्धा प्रतिक्षणी साक्षात् समन्वयाने अतिशयरीतीने होणारे संपूर्ण पुरुषार्थ हेच ज्याचे स्वरूप अशा स्वतःलाच तुला येथे योग्य प्रयोजन आम्ही जाणीत नाही परंतु हे परमेश्वरा भोगांना इच्छिणार्‍या हे केवळ पूजन होण्यास योग्य आहे. ॥७-८॥

तत् यथा परमपरमपुरुष आत्मनः लयं च परं श्रेयः अविदुषां बालिशानां प्रकर्षकरुणया अपवर्गाख्यं स्वमहिमानं उपकल्पयिष्यन् स्वयम् एव नापचितः इतरवत् इह उपलक्षितः ते कसे ते पहा हे श्रेष्ठाहून श्रेष्ठ पुरुषा स्वतःच्या नाशाला आणि श्रेष्ठ अशा कल्याणाला न जाणणार्‍या मूर्खांच्या अतिशय करुणेने मोक्षसंज्ञक अशा आपल्या महिम्याला संपादन करणारा असा स्वतःच पूजा न केलेला असा इतरांसारखा येथे दिसलास. ॥९॥

अथ हि अर्हत्तम यर्हि वरदर्षभः भवान् राजर्षेः बर्हिषि निजपुरुषेक्षणविषयः आसीत् हि अयम् एव वरः आता खरोखर हे पूज्यतमा जो श्रेष्ठ वरदाता असा तू राजर्षीच्या यज्ञात आपल्या जनांच्या दृष्टीचा विषय झालास म्हणून हाच वर योग्य होय. ॥१०॥

अनवरतपरिगुणितगुणगण असंगनिशितज्ञानानलविधूताशेषलमानां भवत्स्वभावानां आत्मारामाणां मुनीनां परममंगलायनगुणगणकथनः असि निरंतरच्या अभ्यासाने गुणसमुदाय वर्णिले जाणार्‍या हे देवा असंगरूपी तीक्ष्ण ज्ञानाग्नीने संपूर्ण पापे नाहीशी झालेल्या अशा तुझ्यासारख्या स्वभाव असणार्‍या आत्मस्वरूपी रममाण झालेल्या मुनींना श्रेष्ठ मंगलांचे स्थान अशा गुणसमुदायांचे वर्णन करणारा तू आहेस. ॥११॥

अथ सकलकश्‍मलनिरसनानि गुणकृतनामधेयानि कथंचित् स्खलनक्षुत्पतनजृंभणदुरवस्थानादिषु ज्वरमरणदशायाम् अपि विवशानां नः स्मरणाय वचनगोचराणि भवंतु याकरिता संपूर्ण मोहांचा नाश करणारी तुझी गुणांवरून पडलेली नावे कोणत्याहि प्रसंगात अडखळणे, क्षुधा, पडणे, जांभई देणे इत्यादि दुःस्थितीत ज्वर व मरणावस्थेतहि पराधीन झालेल्या आमच्या स्मरणाकरिता भाषणाचा विषय होवोत. ॥१२॥

किं च अयं प्रजायां अर्थप्रत्ययः अपत्यकामः भवादृशीं प्रजां आशासानः राजर्षिः आशिषां स्वर्गापवर्गयोः अपि ईश्वरं भवंतं फलीकरणं अधनः धनदं इव उपधावति आणखी असे की, हा संतानाविषयी हाच परमार्थ असा विश्वास असणारा अपत्याची इच्छा करणारा राजर्षि नाभि भोगांचा स्वर्ग आणि मोक्ष यांचाहि स्वामी अशा तुला क्षुद्र फळ मिळण्याकरिता दरिद्री कुबेराला जसा त्याप्रमाणे प्रार्थित आहे. ॥१३॥

इह अनुपासितमहच्चरणः कः वा ते अनवसितपदव्या अपराजितया मायया अपराजितः अनावृतमतिः विषयविषरयानावृतप्रकृतिः या जगात सत्पुरुषाच्या चरणांची सेवा न केलेला कोणता बरे पुरुष तुझ्या निश्‍चित मार्ग न समजलेल्या अशा पराजित न होणार्‍या मायेने पराभव न पावलेला ज्याची बुद्धि गुंग झाली नाही असा विषयरूप विषाच्या वेगाने ज्याचा स्वभाव वेढलेला नाही असा असेल ॥१४॥

यत् उह वाव अदभ्रकर्तः देवदेव इह पुनः समाहूतः असि तत्र अर्थधियां मंदानां अविदुषां नः यत् देवहेलनं तत् सर्वान् तव साम्येन प्रतिवोढुं अर्हसि ज्या कारणास्तव खरोखर पुष्कळ कार्ये करणार्‍या हे देवाधिदेवा याठिकाणी पुन्हा तू बोलविलेला आहेस त्यास्तव अर्थावरच बुद्धि ठेवणार्‍या मंद अज्ञानी अशा आम्ही केलेली जी देव जो तू त्या तुझी हेलना तो सर्वांवर तुझ्या समदृष्टिने सहन करण्यास योग्य आहेस. ॥१५॥

इति निगदेन अभिष्टूयमानः वर्षधराभिवादिताभिवंदितचरणः अनिमिषर्षभः भगवान् सदयं इदं आह अशा भाषणाने स्तविलेला नाभिराजाने वंदिलेल्या ऋत्विजांनी चरणवंदन केलेला असा देवश्रेष्ठ परमेश्वर दयाळुपणे हे बोलला. ॥१६॥

अहो ऋषयः बत अवितथगीर्भिः भवद्‌‌भिः अहं अमुष्य मया सदृशः आत्मजः भूयात् इति असुलभं वरं अभियाचितः यत् कैवल्यात् मम अभिरूपः अहम् एव अस्मि अथ अपि ब्रह्मवादः मृषा भवितुं न अर्हति यत् हि द्विजदेवकुलं मम एव मुखं अहो ऋषि हो खरोखरच ज्यांची भाषणे व्यर्थ होत नाहीत अशा तुम्हाकडून मी ह्याला माझ्यासारखा मुलगा होवो असा कठिण वर मागितला गेला कारण खरे पाहिले तर माझ्या सारखा मीच आहे असे आहे तरी ब्रह्मवाक्य खोटे होण्यास योग्य नाही कारण खरोखर ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य यात श्रेष्ठ अशा ब्राह्मणाचे कुल माझेच मुख होय. ॥१७॥

ततः आत्मतुल्यं अनुपलभमानः अंशकलया आग्नीध्रीये अवतरिष्यामि म्हणून स्वतःसारखा दुसरा मिळत नसल्यामुळे मी अंशरूपाने आग्नीध्रपुत्राच्या पोटी अवतार घेईन. ॥१८॥

भगवान् निशामयंत्याः मेरुदेव्याः पतिं इति अभिधाय अंतर्दधे परमेश्वर श्रवण करणार्‍या मेरुदेवीच्या पतीला याप्रमाणे सांगून अंतर्धान पावला. ॥१९॥

विष्णुदत्त तस्मिन् एव बर्हिषि परमर्षिभिः प्रसादितः भगवान् वातरशनानां श्रमणानां ऊर्ध्वमंथिनां ऋषीणां धर्मान् दर्शयितुकामः नाभेः प्रियचिकीर्षया तदवरोधायने मेरुदेव्यां शुक्लया तनुवा अवततार हे परीक्षित राजा त्याच यज्ञात श्रेष्ठ ऋषींनी प्रसन्न करून घेतलेला परमेश्वर वायु हाच आहे करगोटा ज्याचा अशा तपश्‍चर्येसाठी श्रम करणार्‍या नैष्ठिक ब्रह्मचारी अशा ऋषींच्या धर्मांना दाखविण्याची इच्छा करणारा नाभिराजाचे प्रिय करण्याच्या इच्छेने त्याच्या अंतःपुरांत मेरुदेवीच्या ठिकाणी शुद्धस्वरूप अशा शरीराने अवतार घेता झाला. ॥२०॥

पंचम स्कन्धः - अध्याय तिसरा समाप्त

GO TOP