![]() |
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३२ वा - अन्वयार्थ
धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणार्यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन - अथ - परंतु - यः - जो - गृहे एव - घरातच - आवसन् - रहाणारा - गृहमेधीयान् धर्मान् - गृहस्थाच्या धर्मांना - आचरन् - आचरणारा - स्वान् धर्मान् - आपल्या धर्मांना - कामम् अर्थं च दोग्धि - दोहून त्यांपासून भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करून घेतो - सः - तो - तान् - त्या धर्मांना - भूयः - पुनः - पिपर्ति - भरतो ॥१॥ सः च अपि - आणि तो - काममूढः - भोग्य वस्तूंनी टाकिलेला - भगवद्धर्मा - भागवतधर्मापासून - पराङ्मुखः - परावृत्त झालेला - श्रद्धया अन्वितः - श्रद्धेने युक्त असा - देवान् पितृन् च - देवांना आणि पितरांना - क्रतुभि - यज्ञांच्या योगाने - यजते - पूजितो ॥२॥ तच्छ्रद्धया - त्या श्रद्धेमुळे - आक्रान्तमतिः - व्याप्त झालेली आहे बुद्धि ज्याची असा - पितृदेवव्रतः - पितर आणि देव यांचीच व्रते आचरणारा - सोमपाः - सोमपान करणारा - पुमान् - पुरुष - चांद्रमसं लोकं गत्वा - चंद्राच्या लोकास जाऊन - पुनः एष्यति - पुनः मृत्युलोकावर येईल ॥३॥ यदा च - आणि तेव्हा - अनंतासनः हरिः - शेष आहे आसन ज्याचे असा भगवान विष्णु - अहीन्द्रशय्यायाम् - शेषशय्येवर - शेते - शयन करतो - तदा - तेव्हा - गृहमेधिनाम् - गृहस्थाश्रमी पुरुषांचे - ते एते लोकाः - ते हे चंद्रादि लोक - लयं यांति - लय पावतात ॥४॥ ये धीराः - जे धैर्यशाली पुरुष - निःसंगाः - वैराग्यशाली - न्यस्तकर्माणः - टाकिली आहेत कर्मे ज्यांनी असे - प्रशांताः - अत्यंत शांत असे - शुद्धचेतसाः - शुद्ध आहे अंतःकरण ज्याचे असे - निवृत्तिधर्मनिरताः - निवृत्तिधर्मात अत्यंत रमलेले - निर्ममाः - टाकिले आहे विषयावरील माझेपण ज्यांनी असे - निरहंकृताः - अहंकाररहित - कामार्थहेतवे - भोग्य वस्तु आणि संपत्ती यांच्या इच्छेने - स्वधर्मान् न दुह्यन्ति - आपल्या धर्माचे दोहन करीत नाहीत - ते - ते - स्वधर्माख्येन सत्त्वेन - आपला धर्म हेच बल त्याच्या योगाने - परिशुद्धेन चेतसा - अत्यंत शुद्ध झालेल्या चित्तामुळे - सूर्यव्दारेण - सूर्यरूप व्दाराने - विश्वतोमुखम् - सर्वत्र मुखे आहेत ज्याला अशा - परावरेशम् - स्थावर आणि जंगम अशा सर्व सृष्टीचा नियंता अशा - अस्य प्रकृतिम् - या जगाचे साहित्यरूप कारण अशा - उत्पत्त्यन्तभावनम् - उत्पत्ति व लय करणार्या अशा - पुरुषं - पुरुषाप्रत - यांति - जातात ॥५-६-७॥ तु - अपि - व्दिपरार्धावसाने - दोन परार्धांच्या शेवटी - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाचा - यः प्रलयः - जो प्रलय - भवति - होतो - तावत् - तोपर्यंत - ते - ते - परचिंतकाः - परमेश्वराचे ध्यान करणारे - परस्य लोकं - ब्रह्मदेवाच्या लोकात - अध्यासते - रहातात ॥८॥ यर्हि - जेव्हा - क्ष्मांऽभोऽनलानिलवियन् - पृथ्वी, उदक, अग्नि, वायु, आकाश, - मनइंद्रियार्थभूतादिभिः - मन, इंद्रिये, शब्दादि विषय, अहंकार इत्यादिकांनी - परिवृतं - युक्त अशा - ब्रह्मांडं - ब्रह्मांडाला - प्रतिसंजिहीर्षुः - आवरून घेण्याची इच्छा करणारा - गुणत्रयात्मा - त्रिगुणात्मक असा - परः स्वयंभूः - श्रेष्ठ ब्रह्मदेव - पराख्यं कालं अनुभूय - परार्धनामक कालाचा अनुभव घेऊन - अव्याकृतं विशति - अव्यक्त अशा ईश्वरस्वरूपात प्रविष्ट होतो ॥९॥ एवं - याप्रमाणे - परेत्य - दूरवर जाऊन - भगवंतम् अनुप्रविष्टाः - भगवंताचे ध्यान करीत असलेले - जितमरुन्मनसः - प्राण आणि मन यांवर विजय संपादन केलेले - विरागाः - विषयावरील आसक्तीचा त्याग केलेले - ये योगिनः - जे योगी आहेत ते - तेन एव साकम् - त्या ब्रह्मदेवासह - अगताभिमानाः - पूर्वी गेलेला नाही अहंकार ज्यांचा असे - अमृतं ब्रह्म - अमृत व ब्रह्मस्वरूपी अशा - प्रधानम् पुराणं पुरुषं - श्रेष्ठ पुराणपुरुषाला - उपयांति - जाऊन पोचतात ॥१०॥ अथ - यास्तव - सर्वभूतानां - सर्व प्राण्यांच्या - हृत्पद्मेषु - हृदयरूपी कमलात - कृतालयम् - केले आहे घर ज्याने अशा - श्रुतानुभावं - ऐकिला आहे पराक्रम ज्याचा अशा - तं - त्या आदिपुरुषाला - भामिनि - हे तेजस्वी माते - भावेन शरणं व्रज - भक्तीने शरण जा ॥११॥ यः - जो - स्थिरचराणां - स्थावरजंगम सृष्टीच्या - आद्यः - प्रारंभी असलेला - वेदगर्भः - वेद आहेत गर्भात ज्याच्या असा ब्रह्मदेव - ऋषिभिः योगेश्वरैः - ऋषि व मोठे मोठे योगी असे - योगप्रवर्तकैः कुमोराद्यैः सिद्धैः सह - जे सनत्कुमारादि योगप्रवर्तक सिद्ध पुरुष त्यासह ॥१२॥ कर्तृत्वात् - सृष्टीच्या कर्तेपणामुळे - भेददृष्ट्या - भेदबुद्धीच्या योगाने - अभिमानेन - अहंकारामुळे - निःसंगेन कर्मणा अपि - निष्काम कर्माचे आचरण केलेले असूनही - सगुणं ब्रह्म - सगुण ब्रह्मरूपी अशा - पुरुषर्षभम् पुरुषम् - पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा पुरुषाला ॥१३॥ संसृत्य - प्राप्त होऊन - पुनः - फिरून - ईश्वरमूर्तिना कालेन - ईश्वरस्वरूपी काळामुळे - गुणव्यतिकरे जाते - तीन गुणांचे परस्पर मिश्रण झाले असता - यथापूर्वं प्रजायते - पूर्वी प्रमाणे जन्मास येतो ॥१४॥ ते च अपि - आणि ते सुद्धा - धर्मविनिनिर्मितम् पारमेष्ठ्यं ऐश्वर्यं - स्वधर्माच्या आचरणाने प्राप्त झालेल्या ब्रह्मलोकातील ऐश्वर्याला - निषेव्य - भोगून - गुणव्यतिकरे सति - गुणांचे मिश्रण होऊ लागले असता - पुनः आयांति - फिरून जन्मास येतात ॥१५॥ ये तु इह - पण जे या जगात - कर्मसु आसक्तमनसः - कर्मावर आसक्त आहे मन ज्याचे असे - श्रद्धया अन्विताः - श्रद्धेने युक्त असे - अप्रतिषिद्धानि - ज्यांचा शास्त्राने निषेध केलेला नाही अशी काम्य - अपि च नित्यानि कर्माणि - तशीच आणखी नित्य कर्मे - कृत्स्त्रशः - सर्वतोपरी - कुर्वन्ति - करितात ॥१६॥ रजसा कुठण्मनसः - रजोगुणाने व्याकुळ झाले आहे चित्त ज्याचे असे - कामात्मानः - भोगावर आसक्ती ठेवणारे - अजितेंद्रियाः - इंद्रियांचा निग्रह न केलेले - अनुदिनम् - प्रतिदिवशी - गृहेषु अभिरताशयाः - घराच्या ठिकाणी अनुरक्त आहे मन ज्यांचे असे - पितृन् यजंति - पितरांची उपासना करतात ॥१७॥ ते त्रैवर्गिकाः पुरुषाः - ते धर्म, अर्थ आणि काम यांनाच मानणारे पुरुष - हरिमेधसः - संसार नष्ट करणारी आहे बुद्धि ज्यांची अशा - कथनीयोरुविक्रमस्य - वर्णन करण्यासारखा आहे मोठा पराक्रम ज्याचा अशा - मधुव्दिषः - भगवान् मधुसूदनाच्या - कथायाम् विमुखाः - कथांपासून पराङ्मुख - भवंति - होतात ॥१८॥ च - आणि - नूनं - खरोखर - ते - ते - दैवेन विहताः - दैवाने नष्ट केलेले - ये - जे - अच्युतकथासुधां हित्त्वा - भगवंताच्या कथारूपी अमृताचा त्याग करून - विङ्भुजः पुरीषम् इव - विष्ठा भक्षिणार्या डुकरांप्रमाणे - असदाथाः शृण्वन्ति - अकल्याण करणार्या गोष्टी ऐकतात ॥१९॥ अर्यम्णः दक्षिणेन पथा - सूर्याच्या दक्षिणेकडील मार्गाने - ते पितृलोकं व्रजन्ति - ते पितृलोकाला जातात - च - आणि - ततः - तेथून - श्मशानांतक्रियाकृतः - और्ध्वदेहिक संस्कारापर्यंत सर्व कर्मे करणारे - प्रजाम् अनु - आपल्या पुत्रादिकांच्या वंशात - प्रजायंते - जन्म घेतात ॥२०॥ ततः - मग - क्षीणसुकृताःते - संपले आहे पुण्य ज्याचे असे ते - सति - हे साध्वी - विवशाः - निःसहाय असे - देवैः विभ्रंशितोदयः - देवांनी नष्ट केले आहे ऐश्वर्य ज्याचे असे - सद्यः - तत्काळ - पुनः इमं लोकं पतंति - फिरून या मृत्युलोकात येऊन पडतात ॥२१॥ तस्मात् - या कारणास्तव - त्वं - तू - सर्वभावेन - एकनिष्ठ प्रेमाने - तहुणाश्रयया भक्त्या - त्या भगवंताच्या गुणांचा आश्रय करणार्या भक्तीने - भजनीयपदांबुजम् - भजन करण्याला योग्य असे आहे चरणकमल ज्याचे अशा - परमेष्ठिनं - परम श्रेष्ठ भगवंताला - भजस्व - भज ॥२२॥ भगवति वासुदेवे - भगवान वासुदेवाच्या ठिकाणी - प्रयोजितः भक्तियोगः - योजिलेला भक्तियोग - वैराग्यं - विरक्तपणा - ब्रह्मदर्शनं यत् ज्ञानं - ब्रह्माचा साक्षात्कार करून देणारे असे जे ज्ञान ते - आशु - त्वरित - जनयति - उत्पन्न करितो ॥२३॥ यदा - जेव्हा - अस्य चित्तम् - या भक्ताचे चित्त - अर्थेषु समेषु - विषय सर्व सारखेच असता - इंद्रियवृत्तिभिः - इंद्रियांच्या आवडीनुसार - इदं प्रियं उत (इदं) अप्रियम् इति - हे प्रिय आणि हे अप्रिय असे - वैषम्यम् - विषमभाव - न विगृह्णति - धारण करीत नाही ॥२४॥ तदा एव - तेव्हाच - सः - तो - आत्मना - शुद्ध केलेल्या अंतःकरणाच्या योगाने - निःसंगं - गुणरहित अशा - समदर्शनम् - सर्वत्र एकाच दृष्टीने पहाणार्या अशा - हेयोपादेयरहितम् - हे त्याज्य आणि हे घेण्यासारखे असा भेदभाव ज्यात नाही अशा - आत्मानम् - आत्मस्वरूपाला - आरूढं पदं - निश्चित असे परब्रह्म स्वरूपी स्थान असे - ईश्वते - पाहू लागतो ॥२५॥ ज्ञानमात्रं - केवळ ज्ञानस्वरूपी - परं - परब्रह्म - दृश्यादिभिः - दृश्य, द्रष्टा, दर्शन या - भावैः - भावनांमुळे - ब्रह्म - ब्रह्मा - परमात्मा - परमात्मा - ईश्वरः - ईश्वर - पुमान् - पुरुष - भगवान् - षड्गुणैश्वर्यसंपन्न - इति - अशा रीतीने - ईयते - वर्णिले जाते ॥२६॥ इह हि - खरोखर या जगात - योगिनः - योग्याला - समग्रेण योगेन - सर्व प्रकारचा योगांनी - एतावान् एव - एवढेच - अभिमतः अर्थः - मान्य असे फळ - युज्यते - प्राप्त होते - यत् - जो - कृत्स्त्रशः तु - अगदी सर्वस्वी - असंगः - विषयासक्तीचा त्याग ॥२७॥ पराचीनैः इंद्रियैः - बहिर्मुख अशा इंद्रियांच्या योगाने - एकं ज्ञानं निर्गुणम् ब्रह्म - एकत्र ज्ञानस्वरूप आणि निर्गुण असे ब्रह्म - शब्दादिधर्मेण अर्थरूपेण - शब्दादी विषय आहेत धर्म ज्यांचे अशा आकाशादि वस्तुरूपाने - भ्रांत्या - भ्रमामुळे - अवभाति - भासमान होते ॥२८॥ यथा - ज्याप्रमाणे - अहंरुपः महान् - अहंकाररूपी महत्तत्त्व - त्रिवृत् - त्रिगुणात्मक - पंचविधः - पाच प्रकारे - एकादशविधः - अकरा प्रकारचे - भाति - भासते - स्वराट् - स्वयंप्रकाश जीव - यतः - ज्यामुळे - तस्य वपुः - त्या जीवाचे शरीर - अंडं - ब्रह्मांड - च - आणि - जगत् - जग - भाति - भासतात - तथा ज्ञानं - त्याप्रमाणे ज्ञान - शब्दादिरूपेण भाति - शब्दादिकांच्या रूपाने भासमान होते ॥२९॥ वै - खरोखर - एतत् - हे ज्ञानरूप ब्रह्म - नित्यशः श्रद्धया भक्त्या - भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा व भक्ति - योगाभ्यासेन - आणि योगाभ्यास यांच्या नित्य आचरणाने - समाहितात्मा - एकाग्र झाले आहे अंतःकरण ज्याचे अशा - निःसंगः - विरक्त पुरुष - विरक्त्या परिपश्यति - वैराग्याच्या योगानी पाहतो ॥३०॥ गुर्वि - हे माते - इति एतत् - असे हे - तत् - ते - ब्रह्मदर्शनम् - ब्रह्मसाक्षात्कार करून देणारे - ज्ञानम् - ज्ञान - कथितम् - सांगितले - येन - ज्याच्या योगाने - प्रकृतेः पुरुषस्य च - प्रकृति आणि पुरुष यांचे - तत्त्वम् - वास्तविक स्वरूप - अनुबुध्यते - जाणता येते ॥३१॥ नैर्गुण्यः - निर्गुण ब्रह्मविषयक - ज्ञानयोगः - ज्ञानयोग - च - आणि - मन्निष्ठाः - माझ्याविषयी निष्ठा ज्यात आहे असा - भक्तिलक्षणः (योगः) - भक्तियोग - व्दयोः अपि - या दोघांचाही - भगवच्छब्दलक्षणः - भगवंताची प्राप्ति या स्वरूपाचा - एकः एव अर्थः - एकच उद्देश आहे ॥३२॥ यथा - ज्याप्रमाणे - पृथग्व्दारैः इंद्रियैः - ज्यांची व्दारे निरनिराळी आहेत अशा इंद्रियांमुळे - बहुगुणाश्रयः - अनेक गुणांचा आश्रय असलेला - एकः अर्थः - एकच पदार्थ - नाना ईयते - विविध रूपांनी प्रतीतीस येतो - तव्दत् - त्याप्रमाणे - भगवान् - परमेश्वर - एकः सन् अपि - एक असूनही - (विविधैः) शास्त्रवर्त्मभिः - निरनिराळ्या शास्त्रमार्गांच्या योगाने - पृथक् प्रतीयते - निरनिराळा भासतो ॥३३॥ क्रियया - लौकिक कर्मांनी - क्रतुभिः - यज्ञादि वेदोक्त कर्मांनी - दानैः - दानांनी - तपस्वाध्यायमर्शनैः - तपश्चर्या आणि वेदाभ्यास यांच्या विचाराने - आत्मेन्द्रियजयेन अपि - मन आणि इंद्रिये यांचे नियंत्रण करूनही - कर्मणां च संन्यासेन - आणि कर्मांचा त्याग करून - विविधाङ्गेन योगेन - यमनियमादि निरनिराळी अंगे असलेल्या योगाने - च एव हि भक्तियोगेन - तसेच भक्तियोगाने - यः प्रवृत्तिनिवृत्तिमान् - जो प्रवृत्ति आणि निवृत्ति या उभयस्वरूपांचा आहे त्या - उभयचिन्हेन धर्मेण - उभयलक्षणी धर्माने - आत्मतत्त्वावबोधेन - आत्मतत्त्वाच्या ज्ञानाने - दृढेन वैराग्येण च - आणि तीव्र वैराग्याने - एभिः - या साधनांनी - भगवान् - परमेश्वर - सगुणः निर्गुणः - सगुण असो की निर्गुण असो - स्वदृक् ईयते - सारखाच प्रत्ययास येतो ॥३४-३६॥ भक्तियोगस्य - भक्तीयोगाचे - चतुर्विधं स्वरूपं - चार प्रकारचे स्वरूप - च - आणि - यः - जो - जन्तुषु अंतः - प्राण्यांमध्ये - धावति - धावत असतो - (तस्य) अव्यक्तगतेः कालस्य - समजून न येणारी आहे गति ज्याची अशा काळाचे - स्वरूपम् - स्वरूप - ते - तुला - प्रावोचं - स्पष्ट सांगितले ॥३७॥ अविद्याकर्मनिर्मिताः - अविद्येच्या कर्मांनी उत्पन्न केलेले - जीवस्य बह्णिः संसृतीः - जीवाचे अनेक मार्ग - ते प्रावोचम् - तुला मी सांगितले - अंग - हे माते - यासु प्रविशन् - ज्या मार्गात प्रविष्ट होणारा - आत्मा - जीव - आत्मनः गतीः न वेद - स्वतःचे वास्तविक स्वरूप जाणत नाही ॥३८॥ एतत् - ही विद्या - कर्हिचित् - केव्हाही - खलाय न उपदिशेत् - दुष्टाला उपदेशू नये - न अविनीताय - उर्मट माणसासही सांगू नये - न स्तब्धाय - मौन धरणालाहि सांगू नये - न भिन्नाय - दुराचरणी माणसाला सांगू नये - न एव च धर्मध्वजाय - आणि धर्माचे केवळ चिन्ह धारण करणार्या दांभिकालाही सांगू नये ॥३९॥ न लोलुपाय उपदिशेत् - लोभी माणसाला सांगू नये - न गृहारूढचेतसे - ज्याचे मन घर इत्यादि विषयांवर आसक्त झालेले आहे अशालाहि सांगू नये - न च मे अभक्ताय - तशीच माझा भक्त नसलेल्या सांगू नये - जातु - कधीही - मद्भक्तव्दिषाम् अपि - माझ्या भक्तांचा व्देष करणार्यांना सुद्धा सांगू नये ॥४०॥ श्रद्दधानाय - श्रद्धाळू - विनीताय - नम्र - अनसूयवे - निर्भत्सरी - भूतेषुकृतमैत्राय - सर्व प्राणिमात्राशी स्नेह करणार्या - च - आणि - शुश्रूषाभिरताय - गुरु इत्यादिकांची सेवा करण्यात आनंद मानणार्या - बहिर्जातविरागाय - अंतर्बाह्य झाले आहे वैराग्य ज्याला अशा - शांतचित्ताय - शांत आहे मन ज्याचे अशा - निर्मत्सराय - कोणाचा हेवा न करणार्या - शुचये - शुद्ध अशा - भक्ताय - भक्ताला - दीयताम् - द्यावा - यस्य - ज्याला - अहं - मी - प्रेयसां प्रियः - अत्यंत प्रिय वस्तूतहि प्रिय आहे ॥४१-४२॥ अम्ब - हे माते - यः पुरुषः - जो पुरुष - इदम् - हे तत्त्वज्ञान - सकृत् - एकदा तरी - श्रद्धया शृणुयात् - श्रद्धेने ऐकेल - वा - अथवा - यः - जो - मच्चित्तः - माझ्या ठिकाणी आहे मन ज्याचे असा - अभिधत्ते - दुसर्याला सांगेल - सः च - तो - हि - खरोखर - मे पदवीं एति - माझ्या स्थानाला जातो ॥४३॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय बत्तिसावा समाप्त |