|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३३ वा - अन्वयार्थ
देवहूतीला तत्त्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती - एवम् - याप्रमाणे - कपिलस्य - कपिल मुनीचे - वचः - भाषण - निशम्य - श्रवण करून - विस्त्रस्तमोहपटला - गेले आहे अज्ञानरूपी आवरण जिचे अशी - जनित्री - कपिलाची माता - सा - ती - कर्दमस्य - कर्दमऋषीची - दयिता - प्रियपत्नी - देवहूतिः - देवहूति - तत्त्वविषयाङ्कितसिद्धिभूमिम् - तत्त्वरूपी विषयाने युक्त अशा सांख्यशास्त्राचा प्रवर्तक अशा - तम् - त्या कपिलाला - अभिप्रणम्य - नमस्कार करून - तुष्टाव किल - स्तुती करू लागली. ॥१॥ अथ - नंतर - यज्जठराब्जजातः - ज्याच्या उदरात असलेल्या कमलापासून उत्पन्न झालेला असा - स्वयम् - स्वतः - अजः अपि - ब्रह्मदेव देखील - अन्तःसलिले - पाण्यामध्ये - शयानम् - शयन करणार्या अशा - सत् - व्यक्त अशा - अशेषबीजम् - संपूर्ण विश्वाचे कारण अशा - गुणप्रवाहम् - सत्त्वादि गुणांचा आहे प्रवाह ज्यामध्ये अशा - भूतेन्द्रियार्थात्ममयम् - भूते, इन्द्रिये, शब्दादिक विषय आणि मन एतद्रूप अशा - ते - तुझ्या - वपुः - शरीराचे - दध्यौ - ध्यान करता झाला. ॥२॥ सः - तो - गुणप्रवाहेण - सत्त्वादि गुणांच्या प्रवाहाच्या योगाने - विभक्तवीर्यः - विभक्त केली आहे शक्ति ज्याने असा - अनीहः - निष्क्रिय असा - अवितथाभिसन्धिः - सत्य आहे संकल्प ज्याचा असा - आत्मेश्वरः - जीवाचा नियन्ता - अतर्क्यसहस्त्रशक्तिः - अतर्क्य आहेत अनंत शक्ति ज्याच्या असा - भवान् एव - तूच - विश्वस्य - जगाची - सर्गादि - उत्पत्त्यादि अवस्था - विधत्ते - करितोस. ॥३॥ नाथ - हे कपिल मुने - युगान्ते - प्रलयकाळी - एतत् - हे - विश्वम् - जग - यस्य - ज्याच्या - उदरे - उदरात - आसीत् - होते - यः च - आणि जो - एकः - एकटा - अङ्घ्रिपानः - पायाच्या अंगठ्याला चोखणारा असा - मायाशिशुः - मायेच्या योगाने बालकाचे रूप धारण केलेला - वटपत्रे - वडाच्या पानावर - शेते स्म - निजला होतास - सः त्वम् - तो तू - मे - माझ्याकडून - जठरेण - उदराच्या योगाने - कथं नु भृतः - कसा धारण केला गेलास. ॥४॥ विभो - प्रभो कपिला - त्वम् - तू - पाप्मनाम् - दुष्टांच्या - प्रशमाय - संहारासाठी - च - आणि - निदेशभाजाम् - आज्ञा पालन करणारांच्या - विभूतये - उत्कर्षासाठी - देहतंत्रः - देहाचा स्वीकार केलेला असा - असि - आहेस - यथा - ज्याप्रमाणे - तव - तुझे - सुकरादयः - वराह इत्यादिक - अवताराः - अवतार - तथा - त्याप्रमाणे - अयम् अपि - हा देखील - अवतारः - अवतार - आत्मपथोपलब्धये - ज्ञानमार्ग दाखविण्यासाठी - अस्ति - आहे. ॥५॥ भगवन् - हे कपिल मुने - श्वादः अपि - कुत्र्याचे मांस खाणारा चाण्डाळ देखील - यन्नामधेयश्रवणानुकीर्तनात् - ज्याच्या नामाचे श्रवण व कीर्तन याच्यामुळे - यत्प्रहृणात् - ज्याला नम्र झाल्यामुळे - क्वचित् - एखादे वेळी - यत्स्मरणात् अपि - ज्याच्या स्मरणामुळे देखील - सद्यः - तत्काल - सवनाय - सोमयोगाला - कल्पते - प्राप्त होतो - नु - खरोखर - ते - तुझ्या - दर्शनात् - दर्शनामुळे - कल्पते इति - समर्थ होतो - हे पुनः - पुनः - कुतः - सांगावयाला कशाला पाहिजे. ॥६॥ अहो - अहो - यज्जिह्वाग्रे - ज्याच्या जिव्हाच्या अग्रावर - तुभ्यं नाम - तुझे नाव - वर्तते - असते - अतः - यास्तव - श्वपचः - चाण्डाळ - गरीयान् - अतिशय मोठा - अस्ति - आहे - बत - खरोखर - ये - जे - ते नाम - तुझे नाव - गृणन्ति - घेतात - ते आर्याः - ते श्रेष्ठ पुरुष - तपः तेपुः - तप करिते झाले - जहुवुः - होम करिते झाले - सस्नुः - अवभृत स्नान करिते झाले - च - आणि - ब्रह्म अनूचुः - ब्रह्माचे व्याख्यान करिते झाले. ॥७॥ अहम् - मी - तम् - त्या - परम् - श्रेष्ठ अशा - ब्रह्म - ब्रह्मरूप अशा - पुमांसम् - पुरुषरूप अशा - प्रत्यक्स्नोतसि - विषयापासून अन्तर्मुख केलेल्या अशा अन्तःकरणाच्या ठिकाणी - संविभाव्यम् - चिंतन करण्यास योग्य अशा - स्वतेजसा - आपल्या तेजाच्या योगाने - ध्वस्तगुणप्रवाहम् - नष्ट केला आहे गुणांचा प्रवाह ज्याने अशा - विष्णुम् - विष्णु अशा - वेदगर्भम् - वेद आहेत उदरामध्ये ज्याच्या अशा - कपिलं त्वाम् - कपिल अशा तुला - वन्दे - नमस्कार करते. ॥८॥ एवम् - याप्रमाणे - ईडितः - स्तुति केलेला - भगवान् - भगवान - कपिलाख्यः - कपिल आहे नाव ज्याचे असा - परः - सर्वान्तर्यामी असा - पुमान् - पुरुष - मातृवत्सलः - मातृभक्त असा - विक्लवया - प्रेमाने सद्गदित झालेल्या - वाचा - वाणीने - मातरम् - मातेला - इति - असे - आह - म्हणाला. ॥९॥ मातः - माते - त्वम् - तू - मे - मजकडून - उदितेन - सांगितला गेलेल्या अशा - सुसेव्येन - सुखाने आचरण्याला योग्य अशा - आस्थितेन - अनुष्ठिलेल्या अशा - अनेन - ह्या - मार्गेण - मार्गाने - अचिरात् - लवकर - परां काष्ठाम् - जीवनमुक्तीला - प्राप्स्यसि - प्राप्त होशिल. ॥१०॥ यत् - जे - ब्रह्मवादिभिः - ब्रह्मज्ञानी पुरुषांनी - जुष्टम् - सेविले - तत् - त्या - एतत् - ह्या - मह्यम् - माझ्या - मतम् - मतावर - श्रद्धस्व - विश्वास ठेव - येन - ज्या मताच्या योगाने - अभवम् - जन्मरहित अशा - माम् - मला - यायाः - प्राप्त होशील - अतव्दिदः - त्या माझ्या मताला न जाणणारे असे पुरुष - मृत्युम् - संसारात - ऋच्छन्ति - जातात. ॥११॥ इति - याप्रमाणे - सतीम् - साध्वी अशा - ताम् - त्या देवहूती मातेला - आत्मनः - आत्म्याची - गतिम् - गति - प्रदर्श्य - दाखवून - भगवान् कपिलः - भगवान कपिल - ब्रह्मवादिन्या - ब्रह्मज्ञानी अशा - स्वमात्रा - आपल्या मातेकडून - अनुमतः - अनुमोदन मिळालेला असा - ययौ - गेला. ॥१२॥ च - आणि - सा अपि - ती देवहूति देखील - सरस्वत्याः - सरस्वतीचा - आपीडे - पुष्पमुकुटच अशा - तस्मिन् आश्रमे - त्या आश्रमात - तनयोक्तेन - पुत्राने उपदेशिलेल्या अशा - योगादेशेन - योगशास्त्राच्या विधीने - योगयुक् - योगाभ्यासाने युक्त अशी - समाहिता - स्थिरचित्त अशी - बभूव - झाली. ॥१३॥ अभीक्ष्णावगाहकपिशान् - पुनःपुनः स्नान करण्यानेपिंगट झालेल्या अशा - जटिलान् - जटायुक्त अशा - कुटिलालकान् - कुरळ्या केसांना - च - आणि - आत्मानम् - शरीराला - उग्रतपसा - तीव्र तपश्चर्येच्या योगाने - कृशम् - कृश झालेल्या अशा - चीरिणम् - वस्त्राच्या तुकड्यांनी युक्त अशा - विभ्रती - धारण करणारी - आसीत् - होती. ॥१४॥ वैमानिकैः अपि - विमानातून संचार करणार्या देवांना देखील - प्रार्थ्यम् - इच्छिण्याला योग्य अशा - अनौपम्यम् - अनुपम अशा - कर्दमस्य प्रजापतेः - कर्दम प्रजापतीच्या - तपोयोगविजृम्भितम् - तपश्चर्या व योग यांच्या योगाने वाढलेल्या अशा - स्वगार्हस्थ्यम् - आपल्या गृहस्थधर्मातील सौख्याला. ॥१५॥ पयःफेननिभाः - दुधावरील फेसासारखा - शय्याः - शय्या - रुक्मपरिच्छदाः - सोन्याची टोपणे घातलेले - च - आणि - सुस्पर्शास्तरणानि - मऊ आहेत अस्तरणे ज्यावर अशी - हैमानि - सुवर्णाची - आसनानि - आसने. ॥१६॥ च - आणि - महामा कतेषु - उंची पाचूच्या केलेल्या - स्वच्छस्फटिकाकुड्येषु - स्वच्छ स्फटिकांच्या भिंतीमध्ये - ललनारत्नसंयुक्ताः - सुंदर पुतळ्यांच्या हातात असलेले - रत्नप्रदीपाः - रत्नांचे दिवे - आभान्ति - शोभतात. ॥१७॥ कुसुमितैः - फुललेल्या अशा - बह्वमरद्रुमैः - पुष्कळ कल्पवृक्षांच्या योगाने - रम्यम् - सुंदर असे - कूजव्दिहङ्गमिथुनम् - शब्द करीत आहेत पक्ष्यांचं जोडपी ज्यामध्ये असे - गायन्मत्तमधुव्रतम् - गायन करीत उन्मत भ्रमर ज्यामध्ये असे - गृहोद्यानम् - घरातील उपवन - आसीत - होते. ॥१८॥ विबुधानुचराः - देवांचे सेवक - यत्र - ज्या उपवनात - प्राविष्टम् - प्रवेश केलेल्या अशा - उत्पलगन्धिन्याम् - कलमांचा आहे गन्ध जीमध्ये अशा - वाप्याम् - पुष्करिणीमध्ये - कर्दमेन - कर्दम ऋषीशी - उपलालितम् - क्रीडा करीत असलेल्या अशा - आत्मानम् - स्वतः देवहूतीची - जगुः - स्तुति करीत असत. ॥१९॥ आखण्डलयोषिताम् अपि - इन्द्राच्या स्त्रियांना देखील - इप्सिततमम् - अत्यंत इष्ट अशा - तत् - त्या ऐश्वर्याला - हित्वा - टाकून - पुत्रविश्लेषणातुरा - पुत्राच्या वियोगाने व्याकुळ झालेली अशी - वदनं किञ्चित् चकार - म्लान वदन करिती झाली. ॥२०॥ पत्यौ वनं प्रव्रजिते - पति वनांत गेला असता - अपत्यविरहातुरा - पुत्राच्या विरहाने व्याकुळ झालेली अशी - ज्ञाततत्त्वा अपि - जाणिलेले आहे तत्त्व जिने अशी असूनहि - सा - ती देवहूति - वत्से नष्टे - वासरू नष्ट झाले असता - वत्सला गौः इव - प्रेमळ गाय जशी तशी - अभूत् - झाली. ॥२१॥ वत्स - हे विदुरा - तम् एव - त्याच - देवम् - देवस्वरूप अशा - अपत्यम् - पुत्ररूप अशा - हरिम् - दुःखमुक्त करणार्या - कपिलम् - कपिलाचे - ध्यायती - ध्यान करणारी - तादृशे गृहे - तशा प्रकारच्या घरात - अचिरतः - लवकरच - निस्पृहा - निरिच्छ अशी - बभूव - झाली. ॥२२॥ सुतः - पुत्र - यत् आह - जे म्हणाला - तत् - त्या - ध्यानगोचरम् - ध्यानाचा विषय अशा - प्रसन्नवदनम् - प्रसन्न आहे मुख ज्याचे अशा - भगवद्रूपं - भगवंताच्या मूर्तीची - समस्तव्यस्तचिन्तया - संपूर्ण स्वरूपाच्या व एकएक अवयवाच्या ध्यानाच्या योगाने - ध्यायती - ध्यान करणारी - बभूव - झाली. ॥२३॥ भक्तिप्राहवयोगेन - भक्तिप्रवाहरूप योगाने - बलीयसा - कडकडीत अशा - वैराग्येन - वैराग्याच्या योगाने - युक्तानुष्ठानजातेन - योग्य आचरणाने उत्पन्न झालेल्या अशा - ब्रह्महेतुना - ब्रह्म आहे फल ज्याचे अशा - ज्ञानेन - ज्ञानाच्या योगाने. ॥२४॥ तदा - त्या वेळी - विशुद्धेन - निर्मळ अशा - आत्मना - अन्तःकरणाच्या योगाने - स्वानुभूत्या - आत्मानुभवाच्या योगाने - तिरोभूतमायागुणविशेषणम् - ज्याचा मायेच्या गुणांचा भेद नष्ट झाला आहे अशा - विश्वतोमुखम् - सर्वतोमुख अशा - आत्मानम् - आत्म्याचे - ध्यायती - ध्यान करणारी. ॥२५॥ आत्मसंश्रये - जीवांचा आश्रय अशा - ब्रह्मणि - ब्रह्मरूप अशा - भगवति - परमेश्वराच्या ठिकाणी - अवस्थितमतिः - स्थिर केली आहे बुद्धि जीने अशी - निवृत्तजीवापत्तित्वात् - जीवपण नष्ट झाल्यामुळे - क्षीणक्लेशा - जिचे क्लेश नष्ट झाले आहेत अशी - आप्तनिर्वृतिः - जिला सुख प्राप्त झाले आहे अशी. ॥२६॥ नित्यारूढसमाधित्वात् - नित्य समाधि लागलेली असल्यामुळे - परावृत्तगुणभ्रमा - जिचा गुणनिमित्तक भ्रम नष्ट झाला आहे अशी - सा - ती देवहूती - तदा - त्यावेळी - उत्थितः - उठलेला पुरुष - स्वप्ने - स्वप्नात - दृष्टम् इव - पाहिलेल्या विषयाला जसेजसे - आत्मानम् - आपल्या देहाला - न सस्मार - न स्मरती झाली. ॥२७॥ परतःपोषः अपि - दुसर्याकडून आहे पोषण ज्याचे असा असूनही - आध्यसंभवात् - निरोगी असल्यामुळे - अकृशः - क्षीण न झालेला - तद्देहः - त्या देवहूतीचा देह - मलैः अवच्छन्नः - मळांनी व्याप्त झाले असा - सधूमः - धुराने युक्त अशा - पावकः इव - अग्नीप्रमाणे - बभौ - शोभता झाला. ॥२८॥ वासुदेवप्रविष्टधीः - श्रीहरीच्या ठिकाणी प्रविष्ट झालेली आहे बुद्धि जीची अशी - सा - ती देवहूती - तपोयोगमयम् - तपश्चर्या व योग एतद्रूप अशा - मुक्त केशम् - सुटलेले आहेत केस ज्यातील अशा - गताम्बरम् - गेले आहे वस्त्र ज्याचे अशा - दैवगुप्तम् - दैवाने रक्षण केलेल्या - स्वाङ्गम् - स्वतःच्या शरीराला - न बुबुधे - जाणत नव्हती. ॥२९॥ एवम् - याप्रमाणे - कपिलोक्तेन - कपिलमुनीने उपदेशिलेला अशा - मार्गेण - मार्गाच्या योगाने - सा - ती देवहूती - अचिरतः - लवकरच - परम् - श्रेष्ठ अशा - आत्मानम् - अन्तर्यामीरूप अशा - निर्वाणम् - नित्ययुक्त - ब्रह्म - ब्रह्मरूप - भगवन्तम् - भगवन्ताला - अवापह - प्राप्त झाली. ॥३०॥ वीर - ही वीरा विदुरा - यत्र - ज्या ठिकाणी - सा - ती देवहूती - ससिद्धिम् - सिद्धीला - उपेयुषी - प्राप्त झाली - तत् - ते - नाम्ना - नावाने - सिद्धपदम् - सिद्धपद असे - त्रैलोक्यविश्रुतम् - त्रैलोक्यात प्रसिद्ध असे - पुण्यतमम् - अत्यंत पुण्यकारक असे - क्षेत्रम् - क्षेत्र - आसीत् - झाले - सौम्य - हे गंभीर विदुरा - तस्याः - त्या देवहूतीचे - तत - ते - योगविधूतमार्त्यम् - योगाने लीन झाले आहेत देहसंबंधी मल ज्याचे असे - मर्त्यम् - शरीर - स्त्रोतसाम् - नद्यांमध्ये - प्रवरा - श्रेष्ठ अशी - सिद्धसेविता - सिद्धांनी सेविलेली अशी - सिद्धिदा - सिद्ध देणारी अशी - सरित् - नदी - अभूत - झाले. ॥३१-३२॥ महायोगी - श्रेष्ठ योगी असा - भगवान् कपिलः अपि - भगवान् कपील मुनीदेखील - मातरम् - मातेची - समनुज्ञाप्य - अनुज्ञा घेऊन - पितुः - पित्याच्या - आश्रमात् - आश्रमातून - प्रागुदीचीम् - पूर्व व उत्तर या दोन दिशांच्यामध्ये असलेल्या अशा - दिशम् - ईशान्य दिशेला - ययौ - गेला - सिद्धचारणगन्धर्वैः - सिद्ध, चारण व गंधर्व यांनी - मुनिभिः - ऋषींनी - च - आणि - अप्सरोगणै - अप्सरांच्या समुदायांनी - स्तूयमानः - स्तुति केलेला - समुद्रेण - समुद्राने - दत्तार्हणनिकेतनः - दिली आहेत पूजा व स्थान ज्याला असा. ॥३३-३४॥ सांख्याचार्यैः - सांख्यशास्त्राच्या तत्त्वज्ञान्यांनी - अभिष्टुतः - स्तविलेला असा - सः - तो कपिल महामुनि - त्रयाणां लोकानाम् - तिन्ही लोकांच्या - उपशान्त्यैः - कल्याणासाठी - योगम् - योगाचा - समाख्याय - आश्रय करून - समाहितः - स्थिर झालेला असा - आस्ते - असतो. ॥३५॥ अनघ तात - हे निष्पाप विदुरा - यत् - जे - तव - तुजकडून - अहम् - मी - पृष्टः - विचारिला गेलो - एतत् - हे - निगदितम् - सांगितले - च - आणि - कपिलस्य - कपिल मुनीचा - च - आणि - देवहूत्याः - देवहूतीचा - पावनः - पवित्र असा - संवादः - संवाद - निगदितः - सांगितला. ॥३६॥ सुपर्णकेतौ - गरुड आहे ध्वजाच्या ठिकाणी ज्याच्या अशा - भगवति - श्रीहरीच्या ठिकाणी - कृतधीः - केलेली आहे बुद्धि ज्याने असा - यः - जो पुरुष - इदम् - ह्या - आत्मयोगगुह्यम् - आत्मज्ञानाचे रहस्यरूप अशा - कपिलमुनेः - कपिल मुनीच्या - मतम् - मताला - अनुश्रृणीति - श्रवण करतो - वा - किंवा - यः - जो - अभिधत्ते - कथन करितो - सः - तो - भववत्पदारविन्दम् - भगवन्ताच्या चरणकमलाला - उपलभते - प्राप्त करून घेतो. ॥३७॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय तेहतिसावा समाप्त |