|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३० वा - अन्वयार्थ
देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन - काल्यमानः अपि - चाळविलेला असताहि - अयम् - हा - जनः - लोक - तस्य - त्या - बलिनः - बलाढ्य अशा - एतस्य - ह्या कालाच्या - उरुक्रमम् - प्रचण्ड पराक्रमाला - घनावलिः - मेघपंक्ति - वायोः - वायूच्या - विक्रमम् - पराक्रमाला - इव - जसे तसे - नूनम् - निश्चयाने - न वेद - जाणत नाही ॥१॥ पुमान् - पुरुष - यं यम् - ज्या ज्या - अर्थम् - वस्तूला - सुखहेतवे - सुखासाठी - दुःखेन - कष्टाने - उपादत्ते - ग्रहण करितो - तं तम् - ती ती - भगवान् - सर्वसमर्थ काल - धुनोति - नष्ट करितो - यत्कृते - ज्याच्याकरिता - पुमान् - पुरुष - शोचति - शोक करितो ॥२॥ यत् - कारण - दुर्मतिः - दुष्ट आहे बुद्धि ज्याची असा पुरुष - मोहात् - अज्ञानामुळे - सानुबन्धस्य - परिवारयुक्त अशा - अध्रुवस्य - विनाशी अशा - देहस्य - देहाच्या - गृहक्षेत्रवसूनि - घर, शेते आणि द्रव्य - च - इत्यादिकांना - ध्रुवाणि - शाश्वत अशी - मन्यते - मानितो ॥३॥ जन्तुः - प्राणी - एतस्मिन् - ह्या - भवे - संसारात - यां याम् - ज्या ज्या - योनिम् - योनीला - अनुव्रजेत् - प्राप्त होईल - तस्यां तस्याम् - त्या त्या योनीमध्ये - सः - तो प्राणी - निर्वृतिम् - सुखाला - लभते - प्राप्त होतो - वै - खरोखर - न विरज्यते - विरक्त होत नाही ॥४॥ नरकस्थः अपि - नरकात असलेलाहि - पुमान् - पुरुष - नारक्याम् - नरकसेवनाने उत्पन्न झालेले असे - निर्वृतौ सत्याम् - सुख असता - देवमायाविमोहितः - ईश्वराच्या मायेने मोहित झालेला असा - देहम् - शरीराला - त्यक्तुम् - सोडण्यास - वै - खरोखर - न इच्छति - इच्छित नाही ॥५॥ आत्मजायासुतागारपशुद्रविणबन्धुषु - शरीर, स्त्री, पुत्र, घर, पशु, द्रव्य आणि बन्धु यांच्या ठिकाणी - निरूढमूलहृदयः - मनोराज्याने भरलेले आहे अन्तःकरण ज्याचे असा - सः - तो प्राणी - आत्मानम् - आपल्याला - बहुमन्यते - मोठा मानीत असतो ॥६॥ एषाम् - ह्या स्त्रीपुत्रादिकांच्या - उव्दहनाधिना - पोषणाच्या चिन्तेने - संदह्य मानसर्वाङ्गः - जाळले जात आहे सर्वाङ्ग ज्याचे असा - दुराशयः - दुष्ट आहे अन्तःकरण ज्याचे असा - मूढः - मूर्ख असा - सः - तो प्राणी - दुरितानि - पापे - अविरतम् - निरन्तर - करोति - करितो ॥७॥ असतीनाम् - व्यभिचरिणी अशा - स्त्रीणाम् - स्त्रियांनी - रहोरचितया - एकांतात रचलेल्या अशा - मायया - मायेच्या योगाने - च - आणि - कलभाषिणाम् - मधुर भाषण करणार्या अशा - शिशूनाम् - बालकांच्या - आलापैः - भाषणांनी - आक्षिप्तात्मेन्द्रियः - ओढली गेली आहेत अन्तःकरण व इन्द्रिये ज्याची असा - भवति - होतो ॥८॥ अतन्द्रितः - आलस्यरहित असा - गृही - गृहस्थ - कूटधर्मेषु - कपटी आहेत व्यवहार ज्यातील अशा - गृहेषु - घरात - दुःखप्रतीकारम् - दुःखाच्या प्रतीकाराला - कुर्वन् - करणारा असा - सुखवत् - सुखाप्रमाणे - मन्यते - मानितो ॥९॥ गुर्व्या - मोठ्या - हिंसया - हिंसेच्या योगाने - इतस्ततः - इकडून तिकडून - आपादितैः - प्राप्त केलेल्या अशा - अर्थैः - द्रव्यांनी - तान् - त्या स्त्रीपुत्रादिकांना - पुष्णाति - पोशितो - च - आणि - शेषभुक् - शेष वस्तूंचा उपभोग घेणारा असा - येषाम् - ज्यांच्या - पोषेण - पोषणाने - स्वयम् - स्वतः - अधः - अधोगतीत - याति - जातो ॥१०॥ पुनः पुनः - फिरून फिरून - आरब्धायाम् - आरंभ केलेले - वार्तायां लुप्यमानायाम् - उपजीविकेचे साधन लुप्त होऊ लागले असता - लोभाभिभूतः - लोभाने ग्रासलेला असा - निःसत्त्वः - निर्बल असा - परार्थे - दुसर्याच्या द्रव्याविषयी - स्पृहाम् - इच्छा - कुरुते - करितो ॥११॥ मन्दभाग्यः - मंद आहे दैव ज्याचे असा - वृथोद्यमः - निष्फल आहे उद्योग ज्याचा असा - श्रिया - लक्ष्मीने - विहीनः - विरहित असा - कृपणः - दीन - कुटुम्बभरणाकल्पः - कुटुम्बाच्या पोषणाविषयी असमर्थ असा - मूढधीः - मलीन झाली आहे बुद्धि ज्याची असा - ध्यायन् - काही तरी विचार करणारा असा - श्वसिति - उसासे टाकीत असतो ॥१२॥ तत्कलत्रादयः - त्याची स्त्रीपुत्र इत्यादिक - एवम् - याप्रमाणे - स्वभरणाकल्पम् - आपल्या पोषणाविषयी असमर्थ अशा - पुरुषम् - पुरुषाचा - कीनाशाः - कृपण शेतकरी - गोजरम् - वृद्ध बैलाला - इव - जसे तसे - यथा - जसा - पूर्वम् - पूर्वी - तथा - तसा - न आद्रियन्ते - आदर करीत नाही ॥१३॥ तत्र अपि - त्यावेळी सुद्धा - अजातनिर्वेदः - उत्पन्न झाला नाही उव्देग ज्याला असा - जरया - वार्धक्याने - उपात्तवैरुप्यः - प्राप्त झाली आहे रूपहीनता ज्याला असा - मरणाभिमुखः - मरण आहे सन्मुख ज्याच्या अशा - आमयावी - रोगी असा - अप्रदीप्ताग्निः - मंद झाला आहे जठराग्नी ज्याचा असा - अल्पाहारः - अल्प आहे आहार ज्याचा असा - अल्पचेष्टितः - अल्प आहेत क्रिया ज्याच्या असा - स्वयम्भृतैः - स्वतः पोषिलेल्यांकडून - भ्रियमाणः - पोषिला जाणारा - गृहपालः इव - घराचा रक्षक अशा कुत्र्यांप्रमाणे - अवमत्य - तिरस्कार करून - उपन्यस्तम् - ठेविलेल्या पदार्थाला - आहरन् - भक्षण करणारा असा - गृहे - घरात - आस्ते - असतो ॥१४-१५॥ उत्क्रमता - वर येणार्या अशा - वायुना - वायूच्या योगाने - उत्तारः - बाहेर आले आहेत नेत्र ज्याचे असा - कफसंरुद्धनाडिकः - कफाने दाटल्या आहेत शिरा ज्याच्या असा - कासश्वास कृतायासः - कास व श्वास यांनी केली आहे पीडा ज्याला असा - कण्ठे - कण्ठात - घुरघुरायते - घुरघुर शब्द करितो ॥१६॥ शयानः - निजलेला असा - परिशोचद्भिः - शोक करणार्या अशा - स्वबन्धुभिः - आपल्या आप्तांकडून - परिवीतः - वेढिलेला असा - कालपाशवशम् - मृत्यूच्या पाशाच्या अधीनतेला - गतः - प्राप्त झालेला असा - वाच्यमानः - बोलविला जाणारा असाहि - न ब्रूते - बोलत नाही ॥१७॥ एवम् - याप्रमाणे - कुटुम्बभरणे - कुटुंबाच्या पोषणाविषयी - व्यापृतात्मा - गुंतलेले आहे शरीर ज्याचे असा - अजितेन्द्रियः - जिंकलेली नाहीत इन्द्रिये ज्याने असा - उरुवेदनया - मोठ्या वेदनेच्या योगाने - अस्तधीः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्याची असा - स्वाना रुदताम् - आप्त लोक रडू लागले असता - म्रियते - मरतो ॥१८॥ तदा - त्यावेळी - सः - तो - सरभसेक्षणौ - क्रोधयुक्त आहे दृष्टि ज्यांची अशा - भीमौ - भयंकर - प्राप्तौ - प्राप्त झालेल्या - यमदूतौ - यमाच्या दोघा दूतांना - दृष्ट्वा - पाहून - त्रस्तहृदयः - घाबरलेले आहे हृदय ज्याचे असा - शकृत् - मलाला - च - आणि - मूत्रम् - मूत्राला - विमुञ्चति - सोडितो ॥१९॥ यातनादेहे - यातनायुक्त अशा शरीरात - तम् - त्याला - आवृत्य - कोंडून - बलात् - बलात्काराने - गले - गळ्यामध्ये - पाशैः - पाशांनी - बध्वा - बांधून - यथा - ज्याप्रमाणे - राजभटाः - राजाचे दूत - दण्ड्यम् - अपराध्याला - तथा - त्याप्रमाणे - दीर्घम् - लांब अशा - अध्वानम् - रस्त्यावर - नयतः - नेतात ॥२०॥ तयोः - त्या यमदूतांच्या - तर्जनैः - दटावण्यांनी - निर्भिन्नहृदयः - फाटले आहे हृदय ज्याचे असा - जातवेपथुः - उत्पन्न झाला आहे कंप ज्याला असा - पथि - मार्गात - श्वभिः - कुत्र्यांनी - भक्ष्यमाणः - खाल्ला जाणारा - आर्तः - खिन्न झालेला - स्वम् - आपल्या - अघम् - पापाला - अनुस्मरन् - स्मरणारा ॥२१॥ क्षुट्तृट्परीतः - क्षुधा आणि तृषा यांनी व्याप्त झालेला असा - अर्कदवानलानिलैः - सूर्य, वणवा आणि वायु यांनी - तप्तवालुके - तापलेली आहे वाळू ज्यातील अशा - निराश्रमोदके - नाही आश्रम व उदक ज्यामध्ये अशा - पथि - मार्गात - संतप्यमानः - भाजला जाणारा असा - च - आणि - अशक्तःअपि - अशक्त असा असूनसुद्धा - पृष्ठे - पाठीवर - कशया - चाबुकाने - ताडितः - मारलेला असा - कृच्छेन - कष्टाने - चलति - चालतो ॥२२॥ तत्र तत्र - त्या त्या ठिकाणी - पतन् - पडणारा - श्रान्तः - थकलेला - मूर्छितः - घेरी आलेला - पुनः - पुनः - उत्थितः - उठलेला - पापीयसा - अत्यंत कठीण - तमसा - अन्धकारयुक्त - पथा - मार्गाने - यमसादनम् - यमाच्या घरी - नीतः - नेलेला ॥२३॥ अध्वनः - मार्गाच्या - योजनानाम् - योजनांचे - नवतिम् - नव्वद - च - आणि - नव - नऊ - सहस्त्राणि - हजार - त्रिभिः - तीन - मुहूर्तैः - मुहूर्तांनी - वा - किंवा - व्दाभ्याम् - दोन मुहूर्तांनी - नीतः - नेलेला - सः - तो पुरुष - यातनाः - यातनांना - प्राप्नोति - प्राप्त होतो ॥२४॥ उल्मुकादिभिः - जळक्या लाकडांनी - वेष्टियित्वा - वेढून - स्वगात्राणाम् - आपल्या अवयवाचे - आदीपनम् - जाळणे - स्वकृत्तम् - आपल्याकडून तोडलेले असे - वा - किंवा - क्व अपि - कोठे सुद्धा - परतः अपि - दुसर्याकडून सुद्धा - कृत्तम् - तोडलेले असे - आत्ममांसादनम् - आपले मांस खाणे ॥२५॥ च - आणि - यमसादने - यमाच्या नगरीत - श्वगृध्रैः - कुत्रे आणि गिधाड यांकडून - जीवतः - जिवंत प्राण्यांची - अन्त्राभ्युद्धारः - आतडी बाहेर ओढून काढणे - च - आणि - दशद्भिः - चावणार्या अशा - सर्पवृश्चिकदंशाद्यैः - सर्प, विंचू, डास इत्यादि प्राण्यांकडून - आत्मवैशसम् - शरीराला पीडा करणे ॥२६॥ अवयवशः - अवयवांना क्रमाने - कृन्तनम् - तोडणे - च - आणि - गजादिभ्यः - हत्ती इत्यादिकांकडून - भिदापनम् - तुकडे करणे - गिरिशृङ्गेभ्यः - पर्वतांच्या शिखरांवरून - पातनम् - पाडणे - च - आणि - अम्बुगर्तयोः - पाण्यात आणि खाड्यात - रोधनम् - अवरोध करणे ॥२७॥ नरः - पुरुष - नारी वा - किंवा स्त्री - मिथः - परस्परांवरील - सङ्गेन - आसक्तीने - निर्मिताः - उत्पन्न केलेल्या अशा - याः - ज्या - तामिस्त्रान्धतामिस्त्राः - तामिस्त्र व अन्धतामिस्त्र - च - आणि - रौरवाद्याः - रौरव नरक इत्यादिक - यातनाः - यातनांना - भुङ्क्ते - भोगितो ॥२८॥ मातः - हे माते - अत्रएव - येथेच - नरकः - नरक - स्वर्गः - स्वर्ग - अस्ति - आहे - इति - असे - प्रचक्षते - म्हणतात - याः - ज्या - नारक्यः - नरकसंबन्धी - यातनाः - यातना - सन्ति - आहेत - ताः - त्या यातना - इह अपि - ह्या पृथ्वीवर देखील - उपलक्षिताः - नमुन्याकरिता पहावयास मिळतात ॥२९॥ एवम् - याप्रमाणे - कुटुम्बम् - कुटुम्बाचे - बिभ्राणः - पोषण करणारा असा - वा - किंवा - उदरम्भरः एव - पोट भरणाराच - इह - ह्या लोकात - उभयम् - कुटुम्ब आणि उदरभरण या दोन्हींना - विसृज्य - सोडून - प्रेत्य - परलोकी जाऊन - ईदृशम् - अशा प्रकारच्या - तत्फलम् - त्याच्या फलाला - भुङ्क्ते - भोगितो ॥३०॥ यत् - जे - भूतद्रोहेण - प्राण्यांच्या द्रोहाच्या योगाने - भृतम् - पोषिलेले असे - अस्ति - असते - तत् - त्या - इदम् - ह्या - स्वकलेवरम् - आपल्या शरीराला - हित्वा - टाकून - कुशलेतरपाथेयः - पाप हीच आहे वाटखर्ची ज्याची असा - एकः - एकटा - ध्वान्तम् - अन्यतामिस्त्र नरकात - प्रपद्यते - प्राप्त होतो ॥३१॥ पुमान् - पुरुष - दैवेन - प्रारब्धाने - आसादितम् - प्राप्त केलेल्या अशा - तस्य - त्या - कुटुम्बपोषस्य - कुटुम्बपोषणाच्या - शमलम् - पापाला - हृतवित्तः इव - हरण केलेले आहे द्रव्य ज्याचे अशा मनुष्याप्रमाणे - आतुरः - खिन्न होत्साता - निरये - नरकात - भुङ्क्ते - भोगितो ॥३२॥ केवलेन अधर्मेण - केवळ अधर्माच्या योगाने - कुटुम्बभरणोत्सुकः - कुटुम्बाच्या पोषणाविषयी उत्सुक असलेला असा - जीवः - प्राणी - तमसः - नरकाचे - चरमं पदम् - शेवटचे स्थान अशा - अन्धतामिस्त्रम् - अन्धतामिस्त्र नावाच्या नरकाला - याति - जातो ॥३३॥ नरलोकस्य - मनुष्यलोकाच्या - अधस्तात् - खाली - यावत्यः - जितक्या - यातनादयः - नरकयातना, जन्म इत्यादिक - सन्ति - आहेत - ताः - त्यांना - क्रमशः - क्रमाने - समनुक्रम्य - अतिक्रमण करून - शुचिः - शुद्ध असा - पुनः - पुनः - अत्र - ह्या मनुष्यलोकात - आव्रजेत् - तो प्राणी प्राप्त होईल ॥३४॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय तिसावा समाप्त |