श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २५ वा - अन्वयार्थ

देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा -

तत्त्वसंख्याता - प्रकृत्यादि तत्त्वांची गणना करणारा- साक्षात् - प्रत्यक्ष- भगवान् - श्रीहरिस्वरूप- कपिलः - कपिल- स्वयम् - स्वतः - अजः अपि - जन्मरहित असूनसुद्धा- नृणाम् - मनुष्यांना- आत्मप्रज्ञप्तये - आत्मज्ञान सांगण्याकरिता- आत्ममायया - आपल्या योगमायेने- जातः - जन्मास आला आहे ॥१॥

पुंसाम् - पुरुषांमध्ये - वर्ष्मणः - वृद्ध अशा - सर्वयोगिनाम् - सर्व योग्यांमध्ये - वरिम्णः - श्रेष्ठ अशा - अस्य - कपिलाच्या - विश्रुतौ - कीर्तीविषयी - श्रुतदेवस्य - श्रवण केला आहे देव ज्याने अशा - मे - माझी - असवः - इन्द्रिये - हि - खरोखर - भूरि - अतिशय - न तृप्यन्ति - तृप्त होत नाहीत ॥२॥

स्वच्छन्दात्मा - भक्तांच्या इच्छेनुसार आहे देहधारणा ज्याची असा - भगवान् - श्रीहरि - आत्ममायया - आपल्या योगमायेने - यत् यत् - जे जे - विधत्ते - करतो - कीर्तन्यानि - वर्णनीय अशा - तानि - त्या चरित्रांना - श्रद्दधानस्य - श्रद्धायुक्त अशा - मे - मला - अनुकीर्तय - सांग ॥३॥

एवम् - याप्रमाणे - आन्वीक्षिक्याम् - आत्मज्ञानाविषयी - प्रचोदितः - प्रेरणा केलेला असा - व्दैपायनसुखः - व्यासाचा मित्र - भगवान् - भगवान - मैत्रयः - मैत्रय ऋषि - तु - तर - प्रीतः - संतुष्ट झालेला - विदुरम् - विदुराला - तथा - त्याच्या प्रश्नाप्रमाणे - इदम् - असे - प्राह - म्हणाला ॥४॥

पितरी - पिता - अरण्यं प्रस्थिते - अरण्यात गेला असता - भगवान् - भगवान - कपिलः - कपिल - मातुः - मातेचे - प्रियचिकीर्षया - प्रिय करण्याच्या इच्छेने - तस्मिन् - त्या - बिन्दुसरोवरे किल - बिन्दु सरोवरावरच - अवात्सीत् - राहिला ॥५॥

धातुः - ब्रह्मदेवाचे - वचः - भाषणाला - संस्मरन्ती - स्मरणारी अशी - देवहूती - देवहूती - अकर्माणम् - कर्म नाही ज्याला असा - तत्त्वमार्गाप्रदर्शनम् - ज्ञानमार्गाच्या सिद्धान्ताला दाखविणार्‍या अशा - आसीनम् - बसलेल्या अशा - तम् - त्या - स्वसुतम् - आपल्या पुत्राला - आह - म्हणाली ॥६॥

भूमन् - हे सर्वव्यापका - प्रभो - प्रभो कपिला - अहम् - मी - असदिन्द्रियतर्षणात् - तुच्छ अशा इंद्रियाच्या उपभोगतृष्णेमुळे - नितराम् - अत्यन्त - निर्विण्णा - खिन्न झालेली अशी - येन संभाव्यमानेन - ज्या तृष्णेच्या पूर्ण करण्याने - अन्धम् - गाढ - तमः - अन्धकारात - प्रपन्ना - सापडलेली - अस्मि - आहे ॥७॥

दुष्पारस्य - दुष्ट आहे शेवट ज्याचा अशा - त्वम् - तू - सत् - उत्तम - चक्षुः - दृष्टि - जन्मनाम् - जन्मांच्या - अन्ते - शेवटी - अद्य - आज - मे - मजकडून - त्वदनुग्रहात् - तुझ्या अनुग्रहामुळे - लब्धम् - मिळविलेली - अस्ति - आहे ॥८॥

पुंसाम् - पुरुषांमध्ये - आद्यः - पहिला - भगवान् - भगवान - ईश्वरः - श्रीहरि - उदितः - उदयाला आलेल्या - सूर्यः इव - सूर्याप्रमाणे - तमसा - अज्ञानाने - अंधस्य - अंध अशा - लोकस्य - लोकांची - चक्षुः - दृष्टि - वै - खरोखर - किल - निश्चयाने - स - तो - भवान् - आपण - अस्ति - आहा ॥९॥

अथ - आता - देव - हे देवा ! - मे - माझ्या - संमोहम् - अज्ञानाला - अपाक्रष्टुम् - दूर करण्याकरिता - त्वम् - तू - अर्हसि - योग्य आहेस - त्वया - तुजकडून - एतस्मिन् - ह्या देहाच्या ठिकाणी - यः - जो - अहंमम - मी व माझे - इति - असा - अवग्रहः - आग्रह - योजितः - निर्मिलेला - अस्ति - आहे ॥१०॥

अहम् - मी - प्रकृतेः - मायेला - च - आणि - पुरुषस्य - ईश्वराला - जिज्ञासया - जाणण्याच्या इच्छेने - तम् - त्या - त्वा - तुला - शरणम् - शरण - आगता - आलेली - अस्मि - आहे - अहम् - मी - शरण्यम् - रक्षण करणार्‍या अशा - स्वभृत्यसंसारतरोः - आपल्या भक्तांच्या संसाररूपी वृक्षाला - कुठारम् - कुर्‍हाडीप्रमाणे असणार्‍या अशा - सद्धर्मविदाम् - खर्‍या धर्माला जाणणार्‍यांमध्ये - वरिष्ठम् - श्रेष्ठ अशा - त्वाम् - तुला - नमामि - नमस्कार करित्ये ॥११॥

इति - याप्रमाणे - स्वमातुः - आपल्या मातेचे - निरवद्यम् - निर्दोष अशा - ईप्सितम् - मनोरथाला - निशम्य - ऐकून - पुंसाम् - पुरुषांना - अपवर्गवर्धनम् - मोक्षाविषयी प्रेम उत्पन्न करणार्‍या अशा - तम् - त्या मनोरथाचे - धिया - बुद्धीने - अभिनंद्य - अभिनंदन करून - आत्मवताम् - ज्ञानी अशा - सताम् - साधूंचा - गतिः - रक्षक असा - सः - तो कपिल - ईषत्स्मितशोभिताननः - मंद हास्याने शोभायमान झाले आहे मुख ज्याचे असा - बभाषे - म्हणाला ॥१२॥

आध्यात्मिकः - परमात्म्याची प्राप्ती करून देणारा - योगः - भक्तियोग - पुंसाम् - पुरुषांच्या - निःश्रेयसाय - कल्याणाकरिता - मे - मला - मतः - अभिमत - अस्ति - आहे - यत्र - ज्या भक्तियोगामध्ये - दुःखस्य च सुखस्य च - दुःखाची आणि सुखाची - अत्यन्तोपरतिः - सर्वथैव शांति - भवति - होते ॥१३॥

अनघे - हे निष्पाप - तम् - त्या - इमम् - ह्या योगाला - ते - तुला - प्रवक्ष्यामि - सांगतो - श्रोतुकामानाम् - श्रवणाची आहे इच्छा ज्यांना अशा - ऋषीणाम् - ऋषींना - सर्वांगनैपुणम् - सर्व अङ्गांनी परिपूर्ण अशा - यम् - ज्या - योगम् - योगाला - पुरा - पूर्वी - अवोचम् - मी बोललो ॥१४॥

चेतः - अंतःकरण - अस्य - ह्या - आत्मनः - जीवात्म्याच्या - बन्धाय - बंधासाठी - च - आणि - मुक्तये - मोक्षासाठी - खलु - निश्चयाने - मतम् - मानलेले - अस्ति - आहे - गुणेषु - विषयांमध्ये - सक्तम् - आसक्त असलेले असे - बन्धाय - बंधासाठी - वा - किंवा - पुंसि - श्रीहरीच्या ठिकाणी - रतम् - आसक्त असलेले असे - मुक्तये - मोक्षासाठी - भवति - होते ॥१५॥

यदा - ज्या वेळी - अहंममाभिमानोत्थैः - मी व माझे अशा अभिमानाने उत्पन्न झालेल्या - कामलोभादिभिः - काम, लोभ इत्यादिक - मलैः - विकारांनी - वीतम् - रहित असे - मनः - अंतःकरण - शुद्धम् - शुद्ध असे - अदुःखम् - दुःखरहित असे - असुखम् - सुखरहित असे - भवति - होते ॥१६॥

तदा - त्या वेळी - पुरुषः - पुरुष - ज्ञानवैराग्ययुक्तेन - ज्ञान व वैराग्य यांनी युक्त अशा - च - आणि - भक्तियुक्तेन - भक्तीने युक्त अशा - आत्मना - अंतःकरणाने - आत्मानम् - आत्म्याला - प्रकृतेः - मायेच्या - परम् - पलीकडे असणार्‍या - केवलम् - स्वगतभेदाने रहित - स्वयंज्योतिः - स्वयंप्रकाश - अणिमानम् - अत्यंत सूक्ष्म - अखण्डितम् - परिमाणरहित - उदासीनम् - क्रियारहित - च - आणि - हतौजसम् - क्षीण झाले आहे बल जिचे अशा - प्रकृतिम् - मायेला - परिपश्यति - पाहतो ॥१७-१८॥

योगिनाम् - योगी पुरुषांना - ब्रह्मसिद्धये - ब्रह्मप्राप्तीकरिता - अखिलात्मनि - सर्वांतर्यामी अशा - भगवति - षड्‌गुणैश्वर्यसंपन्न अशा श्रीहरीच्या ठिकाणी - युज्यमानया - योजिल्या जाणार्‍या - भक्त्या - भक्तीशी - सुदृशः - तुल्य - शिवः - कल्याणकारक - पन्थाः - मार्ग - न अस्ति - नाही ॥१९॥

कवयः - विव्दान लोक - प्रसङ्गम् - विषयासक्तीला - आत्मनः - आत्म्याचे - अजरम् - बळकट अशा - पाशम् - बंधनस्वरूप अशा - विदुः - समजतात - सः एव - तीच असक्ती - साधुषु - सत्पुरुषांच्या ठिकाणी - कृतः - केलेली अशी - अपावृतम् - उघडिलेले - मोक्षव्दारम् - मोक्षाचे व्दार - अस्ति - आहे ॥२०॥

तितिक्षवः - सहनशील - कारुणिकाः - दयाळू असे - सर्वदेहिनाम् - सर्व प्राण्यांचे - सुहृदः - मित्र - अजातशत्रवः - उत्पन्न झालेला नाही शत्रु ज्यांना असे - शांताः - गंभीर - साधवः - साधु - साधुभूषणाः - सुशील हेच आहे भूषण ज्यांचे असे - भवन्ति - असतात ॥२१॥

ये - जे - मयि - माझ्या ठिकाणी - अनन्येन - एकनिष्ठ - भावेन - प्रेमाने - दृढाम् - दृढ अशा - भक्तिम् - भक्तीला - कुर्वन्ति - करितात - मत्कृते - माझ्याकरिता - त्यक्तकर्माणः - टाकिलेले आहे कर्म ज्यांनी असे - त्यक्तस्वजनबान्धवाः - सोडिलेले आहेत आप्तलोक व बांधव ज्यांनी असे ॥२२॥

मदाश्रयाः - मी आहे आश्रय ज्यांना अशा - मृष्टाः - शुद्ध अशा - कथाः - कथांना - शृण्वन्ति - श्रवण करितात - च - आणि - कथयन्ति - सांगतात - मद्गचेतसः - माझ्या ठिकाणी गेलेले आहे अंतःकरण ज्यांचे अशा - एतान् - ह्या भक्तांना - विविधाः - नानाप्रकारचे - तापाः - ताप - न तपन्ति - ताप देत नाहीत ॥२३॥

साध्वि - हे पतिव्रते - ते एते - ते हे - सर्वसङ्गविवर्जिताः - सर्वसङ्गपरित्याग केलेले असे - साधवः - साधु - सन्ति - होत - अथ - म्हणून - तेषु - त्या साधूच्या ठिकाणी - सङ्गः - सङ्गति - ते - तुजकडून - प्रार्थ्यः - प्रार्थना करण्यास योग्य आहे - हि - कारण - ते - ते साधु - सङ्गदोषहरा - विषयांच्या आसक्तीच्या दोषांना दूर करणारे - सन्ति - आहेत ॥२४॥

सताम् - साधूंच्या - प्रसङ्गात् - संगतीमुळे - मम - माझ्या - वीर्यसंविदः - पराक्रमांचे आहे ज्ञान ज्यांमध्ये अशा - हृत्कर्णरसायनाः - हृदय व कर्ण यांना सुख देणार्‍या अशा - कथाः - कथा - भवन्ति - होतात - तज्जोषणात् - त्यांच्या सेवनामुळे - अपवर्गवर्त्मनि - मोक्षाच्या मार्गाविषयी - आशु - लवकर - श्रद्धा - श्रद्धा - रतिः - प्रेम - भक्तिः - भक्ति - अनुक्रमिष्यति - अनुक्रमाने उत्पन्न होतात ॥२५॥

मद्रचनानुचिन्तया - माझ्या लीलांच्या चिंतनाने - संजातया - उत्पन्न झालेल्या - भक्त्या - भक्तीने - दृष्टश्रुतात् - पाहिलेल्या व ऐकिलेल्या - ऐन्द्रियात् - इन्द्रियसुखापासून - जातविरागः - उत्पन्न झाले आहे वैराग्य ज्याला असा - पुमान् - पुरुष - यत्तः - उद्योग करणारा असा - योगयुक्तः - योगाभ्यासयुक्त असा - ऋजुभिः - सरळ अशा - योगमार्गैः - योगमार्गांनी - चित्तस्य - अन्तःकरणाच्या एकाग्रतेविषयी - यतिष्यते - यत्न करील - अयम् - हा पुरुष - प्रकृतेः - प्रकृतीच्या - गुणानाम् - गुणांचे - असेवया - सेवन न केल्यामुळे - वैराग्यविजृम्भितेन - वैराग्याने वाढलेल्या अशा - ज्ञानेन - ज्ञानाने - योगेन - योगाभ्यासाने - च - आणि - मयि - माझ्या ठिकाणी - अर्पितया - ठेविलेल्या - भक्त्या - भक्तीने - प्रत्यगात्मानम् - सर्वांच्या अन्तर्यामी राहणार्‍या अशा - माम् - मला - इह - ह्या देहामध्येच - अवरुन्धे - प्राप्त होतो ॥२६-२७॥

काचित् - कोणती - भक्तिः - भक्ती - त्वयि - तुझ्या ठिकाणी - उचिता - योग्य अशी - कीदृशी - कोणत्या प्रकारची - अस्ति - आहे - यया - जिच्या योगाने - अहम् - मी - निर्वाणम् - मोक्षरूप अशा - ते - तुझ्या - पदम् - पदाला - अञ्जसा - लवकर - अन्वाश्नवै - प्राप्त होईन ॥२८॥

हे निर्वाणात्मन् - हे मोक्षस्वरूपा - त्वया - तुजकडून - यः - जो - भगवद्‌बाणः - श्रीहरीच्या ठिकाणी बाणरूप असा - योगः - योग - उदितः - सांगितला गेला - यतः - ज्या योगापासून - तत्त्वावबोधनम्- तत्त्वज्ञान - भवति - होते - सः - तो - कीदृशः - कशाप्रकारच्या - अस्ति - आहे - च - आणि - तस्य - त्याची - कति - किती - अङ्गानि - अङ्गे - सन्ति - आहेत ॥२९॥

हरे - हे कपिल महामुने - मन्दधीः - मन्द आहे बुद्धि जिची अशी - योषा - स्त्री - अहम् - मी - तत् - त्या - एतत् - ह्याला - यथा - ज्याप्रमाणे - सुखम् - सुखाने - बुध्येयम् - जाणीन - तथा - त्याप्रमाणे - मे - मला - विजानीहि - सांग ॥३०॥

कपिलः - कपिल मुनि - यत्र - जिच्या ठिकाणी - तन्वा - देहाने - अभिजातः - उत्पन्न झाला - तस्याः - त्या - मातुः - मातेच्या - इत्थम् - याप्रमाणे - अर्थम् - अभिप्रायाला - विदित्वा - जाणून - जातस्नेहः - उत्पन्न झाला आहे स्नेह ज्याला असा - तत्त्वाम्नायम् - ज्यात अनुक्रमाने तत्त्वे सांगितली आहेत अशा - यत् - ज्याला - सांख्यम् - सांख्यशास्त्र - वदन्ति - म्हणतात - तत् - त्याला - च - आणि - भक्तिवितानयोगम् - भक्तिविस्ताररूप योगाला - वै - खरोखर - प्रोवाच - सांगता झाला ॥३१॥

गुणलिङ्गानाम् - ज्यांनी विषय जाणिले जातात अशा - आनुश्रविककर्मणाम् - वेदात सांगितलेली आहेत कर्तव्यकर्मे ज्यांची अशा - एकमनसः - एकरूप आहे मन ज्याचे अशा पुरुषांच्या - देवानाम् - इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवतांची - सत्त्वे एव - सत्त्वमूर्ति अशा श्रीहरीच्याच ठिकाणी - स्वाभाविकी - यत्नावाचून सिद्ध झालेली अशी - अनिमित्ता - निष्काम अशी - या - जी - वृत्तिः - वृत्ती - सा - ती - भागवती - श्रीहरीसंबंधी - भक्तिः - भक्ती - अस्ति - होय - इयम् - ही - सिद्धेः - सिद्धीपेक्षा - गरीयसी - अतिशय श्रेष्ठ अशी - अस्ति - आहे - या - जी - यथा - ज्याप्रमाणे - अनलः - जठराग्नि - विगीर्णम् - गिळलेल्या अन्नाला - तथा - त्याप्रमाणे - कोशम् - लिङ्गशरीराला - आशु - लवकर - जयति - जीर्ण करिते ॥३२-३३॥

मत्पादसेवाभिरताः - माझ्या चरणसेवेमध्ये निमग्न झालेले असे - मदीहाः - माझ्यासाठीच आहे क्रिया ज्यांची असे - केचित् - कित्येक - मे - माझ्या - एकात्मताम् - सायुज्य मुक्तीला - न स्पृहयन्ति - इच्छित नाहीत - ये - जे - भागवताः - भगवद्‌भक्त - प्रसज्य - आसक्ती करून - मम - माझ्या - पौरुषाणि - लीला - अन्योन्यतः - परस्परांशी - सभाजयन्ते - वर्णन करितात ॥३४॥

अम्ब - माते - ते - ते - सन्तः - साधु - रुचिराणि - सुंदर अशा - प्रसन्नवक्त्रारुणलोचनानि - प्रसन्न मुख व किंचित् लाल आहेत नेत्र ज्यांमध्ये अशा - वरप्रदानि - वर देणार्‍या अशा - मे - माझ्या - दिव्यानि रुपाणि - अलौकिक रूपांना - पश्यन्ति - पाहतात - साकम् - त्यांच्याबरोबर - स्पृहणीयाम् - प्रेमळ अशा - वाचम् - वाणीला - वदन्ति - बोलतात ॥३५॥

दर्शनीयावयवैः - दर्शन करण्यास योग्य आहेत अवयव ज्यांचे अशा - उदारविलासहासेक्षितवामसूक्तैः - उत्कृष्ट आहेत लीला, हास्य, अवलोकन व मधुर भाषण ज्यामध्ये अशा - तैः - त्या स्वरूपांनी - हृतात्मनः - हरण केले आहे चित्त ज्यांचे अशा - हृतप्राणान् - हरण केलेली आहेत इंद्रिये ज्याची अशा - अनिच्छतः अपि - इच्छा न करणारे असूनही - तान् - त्यांना - मे - माझी - भक्तिः - भक्ती - अण्वीम् - सूक्ष्म अशा - गतिम् - मोक्षाला - प्रयुङ्क्ते - प्राप्त करिते ॥३६॥

अथो - अज्ञाननिवृत्तीनंतर - मायाविनः - मायावी अशा - मे - माझ्या - ताम् - त्या - विभूतिम् - ऐश्वर्याला - अनुप्रवृत्तम् - भक्तीच्या मागोमाग आपोआप प्राप्त झालेल्या अशा - अष्टाङ्गम् ऐश्वर्यम् - अणिमादिक अष्टसिद्धींना - वा - किंवा - भागवतीम् - परमेश्वराची - भद्राम् - कल्याणकारक अशा - श्रियम् - ऐश्वर्याला - अस्पृहयन्ति - इच्छित नाहीत - परस्य - श्रेष्ठ अशा - मे - माझ्या - लोके - लोकांत - तु - तर - ते - ते भक्त - ताम् - त्या ऐश्वर्याला - अश्नुवते - प्राप्त होतात ॥३७॥

शान्तरूपे - हे शान्तस्वरूपाच्या माते - मत्पराः - मीच आहे श्रेष्ठ ज्यांना असे भक्त - कर्हिचित् - केव्हाही - न नङ्क्ष्यन्ति - नाश पावत नाहीत - मे - माझे - अनिमिषः - सतत चालू असणारे - हेतिः - कालरूपी हत्यार - तान् - त्यांना - नो लेढि - ग्राशीत नाही - येषाम् - ज्यांचा - अहम् - मी - प्रियः - प्रिय - आत्मा - आत्मा - सुतः - पुत्र - सखा - मित्र - गुरुः - गुरु - सुहृदः - आप्त - च - आणि - इष्टम् दैवम् - उपास्य देवता - भवति - होती ॥३८॥

ये - जे - इमम् - ह्या - लोकम् - लोकाला - तथा एव - त्याचप्रमाणे - अमुम् - परलोकाला - उभयायिनम् - दोन्ही लोकांत फिरणार्‍या अशा - आत्मानम् - लिङ्गदेहयुक्त जीवाला - आत्मानम् अनु - देहाबरोबर - इह - ह्या जगांत - ये - जे - रायः - ऐश्वर्य - पशवः - पशु - च - आणि - गृहा - घरे - सन्ति - आहेत - तान् - त्यांना - च - आणि - अन्यान् सर्वान् - इतर सर्व पदार्थांना - विसृज्य - सोडून - अनन्यया भक्त्या - एकनिष्ठ भक्तीने - विश्वतोमुखम् - सर्वतोमुख अशा - माम् - मला - एवम् - याप्रमाणे - भजन्ति - सेवितात - तान् - त्यांना - मृत्योः - संसारापासून - अतिपारये - मी सोडवितो ॥३९-४०॥

भगवतः - ऐश्वर्यसंपन्न अशा - प्रधानपुरुषेश्वरात् - प्रकृति व पुरुष यांचा नियन्ता अशा - भूतानाम् - प्राण्यांच्या - आत्मनः - अन्तरी वास करणार्‍या अशा - मत् - माझ्या - अन्यत्र - वाचून - तीव्रम् - कठीण - भयम् - दुःख - न निवर्तते - निवृत्त होत नाही ॥४१॥

अयम् - हा - वातः - वायु - मद्‌भयात् - माझ्या भीतीमुळे - वाति - वहातो - मद्‌भयात् - माझ्या भीतीमुळे - सूर्यः - सूर्य - तपति - प्रकाश देतो - इन्द्रः - इन्द्र - वर्षति - वृष्टि करितो - अग्निः - अग्नि - दहति - जाळितो - च - आणि - मद्‌भयात् - माझ्या भीतीमुळे - मृत्युः - मृत्यू - चरति - संचार करितो ॥४२॥

योगिनः - योगी पुरुष - क्षेमाय - कल्याणासाठी - ज्ञानवैराग्ययुक्तेन - ज्ञान व वैराग्य यांनी युक्त अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - अकुतोभयम् - कोठूनहि भय नाही अशा - मे - माझ्या - पादमूलम् - चरणाच्या आश्रयाला - प्रविशन्ति - रहातात ॥४३॥

अस्मिन् लोके - ह्या लोकामध्ये - मयि - माझ्या ठिकाणी - तीव्रेन - तीव्र अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - अर्पितम् - ठेविलेले असे - मनः - अन्तःकरण - स्थिरम् - स्थिर - भवति - होते - एतावान् एव - एवढाच - पुंसाम् - पुरुषांचा - निःश्रेयसोदयः - कल्याणाचा उत्कर्ष - अस्ति - आहे ॥४४॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय पंचविसावा समाप्त

GO TOP