श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २० वा - अन्वयार्थ

ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन -

सौते - हे रोमहर्षणपुत्रा सूता स्वायम्भुवः - ब्रह्मदेवाचा पुत्र मनुः - मनु महीम् - पृथ्वीरूप प्रतिष्ठाम् - स्थानाला अध्यस्य - प्राप्त होऊन अवरजन्मनाम् - अर्वाचीन आहे उत्पत्ति ज्यांची अशा प्राण्यांच्या मार्गाय - उत्पत्तीकरिता कानि - कोणते द्वाराणि - उपाय अन्वतिष्ठत् - करता झाला ॥१॥

क्षत्ता - विदुर महाभागवतः - मोठा भगवद्भक्त कृष्णस्य - श्रीकृष्णाचा ऐकान्तिकः - अत्यन्त सुहृत् - मित्र आसीत् - होता यः - जो सापत्यम् - पुत्रासहित अग्रजम् - ज्येष्ठ बंधु अशा धृतराष्ट्राला कृष्णे - श्रीकृष्णाचे ठिकाणी अघवान् - अपराधी अस्ति - आहे इति - यास्तव तत्याज - त्यागिता झाला ॥२॥

महित्वे - महिम्यात कृष्णव्दैपायनात् - व्यासाहून अनवरः - अन्यून असा तस्य - त्या व्यासाचा देहजः - पुत्र असा सः - तो विदुर सर्वात्मना - सर्वस्वी कृष्णम् - श्रीकृष्णाला श्रितः - अवलंबणारा च - आणि तत्परान् अपि - श्रीकृष्ण आहे श्रेष्ठ ज्यांना अशा भक्तांनाही अनुव्रतः - अनुसरणारा असा आसीत् - होता ॥३॥

तीर्थसेवया - तीर्थाच्या सेवेने विरजाः - गेले आहे पाप ज्याचे असा सः - तो विदुर तत्त्ववित्तमम् - तत्त्वज्ञान्यांमध्ये श्रेष्ठ अशा कुशावर्ते - हरिव्दारात आसीनम् - बसलेल्या अशा मैत्रेयम् - मैत्रेय ऋषीला उपसङ्गम्य - भेटून किम - काय अन्वपृच्छत् - विचारिता झाला ॥४॥

हि - कारण तयोः संवदतोः - मैत्रेय ऋषि व विदुर बोलू लागले असता नूनम् - निश्चयाने अमलाः - पवित्र अशा कथाः - कथा प्रवृत्ताः - सुरू झाल्या स्युः - असाव्या तः - त्या हरेः - श्रीकृष्णाच्या पादाम्बुजाश्रयाः - पादकमलांचा आहे आश्रय ज्यांना अशा गाङ्गाः - गंगेची आपः इव - उदकांप्रमाणे अघघ्रीः - पापांचा नाश करणार्‍या सन्ति - आहेत ॥५॥

कीर्तन्योदारकर्पणः - वर्णनीय व उदार आहेत लीला ज्याच्या अशा हरेः - श्रीकृष्णाच्या लीलामृताम् - कथामृताला पिबन् - पिणारा रसज्ञः - रसज्ञ कः - कोण अनुतृप्येत - तृप्त होईल अतः - म्हणून ताः - त्या कथा नः - आम्हाला कीर्तय - सांग ते - तुझे भद्रम् - कल्याण अस्तु - असो ॥६॥

नैमिषायनैः - नैमिषारण्यात राहणार्‍या ऋषिभिः - ऋषींनी एवम् - याप्रमाणे पृष्टः - प्रश्न केलेला भगवति - श्रीकृष्णाच्या ठिकाणी अर्पिताध्यात्मः - अर्पिले आहे मन ज्याने असा उग्रश्रवाः - सूत तान् - त्या ऋषींना श्रूयताम् - श्रवण करावे इति - असे आह - म्हणाला ॥७॥

भारतः - विदुर स्वमायया - आपल्या मायेच्या योगाने धृतक्रोडतनोः - धारण केले आहे वराहशरीर ज्याने अशा हरेः - श्रीकृष्णाच्या रसातलात् - रसातलातून गोः - पृथ्वीच्या उद्धरणम् - उद्धाररूप लीलाम् - लीलेला च - आणि अवज्ञया - आदराने हतम् - मारलेल्या हिरण्याक्षम् - हिरण्याक्षाला निशम्य - ऐकून संजातहर्षः - उत्पन्न झाला आहे हर्ष ज्याला अशा मुनिम्- मैत्रेय ऋषीला आह - म्हणाला ॥८॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञे ऋषे अव्यक्तमार्गवित् - परमेश्वराच्या सृष्टिपद्धतीला जाणणारा प्रजापतिपतिः - प्रजापतींचा अधिपति प्रजासर्गे - सृष्टीच्या आरंभी प्रजापतीन् - प्रजापतीना सृष्ट्वा - उत्पन्न करून किम् - कोणते कार्य आरभत - आरंभिता झाला तत् - ते मे - मला प्रब्रूहि - सांगा ॥९॥

ये - जे मरीच्यादयः - मरीचीप्रभृति विप्राः - ब्राह्मण यः - जो तु - तर स्वायम्भुवः - स्वायंभुवनामक मनुः - मनु ते - ते ब्रह्मणः - ब्रह्मदेवाच्या आदेशात् - आज्ञेने वै - खरोखर एतत् - हे जग कथम् - कसे अभावयन् - उत्पन्न करते झाले ॥१०॥

सव्दितीयाः - स्त्रियांसहित ते किम् - काय असृजन् - उत्पन्न करते झाले उत - किंवा कर्मसु - सृष्टीकर्मामध्ये स्वतन्‌त्राः - स्त्रियांची अपेक्षा न ठेवणारे असे आहोस्वित् - किंवा सर्वे - सर्व संहताः - एकत्र मिळालेले असे इदम् - ह्या सर्व जगाला समकल्पयन् स्म - निर्माण करते झाले ॥११॥

दुर्वितर्क्येण - तर्क करण्यास अशक्य अशा दैवेन - जीवांच्या अदृष्ट कर्मांच्या योगाने परेण - प्रकृतिनियन्त्या परमेश्वराच्या योगाने च - आणि अनीमिषेण - कालाच्या योगाने भगवतः - निर्विकार परमेश्वरापासून जातक्षोभात् - उत्पन्न झाला आहे क्षोभ ज्यामध्ये अशा गुणत्रयात् - प्रधानापासून महान् - महतत्त्व आसीत् - उत्पन्न झाले ॥१२॥

दैवचोदितात् - अदृष्टाने प्रेरित अशा रजःप्रधानात् - रजोगुण आहे अधिक ज्यामध्ये अशा महतः - महत्तत्त्वापासून जातः - उत्पन्न झालेला त्रिलिङ्गः - त्रिगुणात्मक अहंकार भूतादिः - सूक्ष्म पंचभूतांना कारण असा पञ्चशः - पाच प्रकाराने वियदादीनि - सूक्ष्म भूते, महाभूते, ज्ञानेन्द्रिय व कर्मेन्द्रिये व त्यांच्या त्यांच्या देवता ह्यांना ससर्ज - उत्पन्न करिता झाला ॥१३॥

च - आणि एकैकशः - पृथकपृथक् स्त्रष्टुम् - उत्पन्न करण्याकरिता असमर्थानि - असमर्थ अशी तानि - देवता, भूते व इन्द्रिये दैवयोगेन - अदृष्ट कर्माच्या योगाने संहत्य - एकत्र होऊन भौतिकम् - भूतांचे हैमम् - सुवर्णमय अण्डम् - अण्‌ड्याला अवासृजन् - उत्पन्न करती झाली ॥१४॥

निरात्मकः - चैतन्यरहित असा सः - तो आण्डकोशः - अण्डकोश अब्धिसलिले - समुद्राच्या पाण्यात साग्रं - संपूर्ण वर्षसाहस्त्रम् - हजार वर्षे वै - खरोखर अशयिष्ट - राहिला ईश्वरः - परमेश्वर तम् - त्यामध्ये अन्ववात्सीत् - प्रवेश करिता झाला ॥१५॥

तस्य - त्या ईश्वराच्या नाभेः - नाभीपासून सहस्त्रार्कोरुदीधिति - हजार सूर्याप्रमाणे आहे मोठे तेज ज्यांचे असे सर्वजीवनिकायौकः - सर्व जीवसमुदायांचे स्थान असे पद्मम् - कमळ अभूत् - उत्पन्न झाले यत्र - ज्या कमळामध्ये स्वराट् - ब्रह्मदेव स्वयम् - स्वतः अभूत् - उत्पन्न झाला ॥१६॥

यः - जो सलिलाशये - गर्भोदकात शेते - शयन करतो तेन - त्या भगवता - परमेश्वराने अनुविष्टः - अधिष्ठान केलेला सः - तो ब्रह्मदेव यथापूर्वम् - पूर्व कल्पाप्रमाणे लोकसंस्थाम् - लोकरचनेला स्वया - आपल्या संस्थया - नामरूप इत्यादिकांनी निर्ममे - निर्माण करिता झाला ॥१७॥

ब्रह्मा - ब्रह्मदेव अग्रतः - प्रथम तमिस्त्रम् - तमिस्त्र अन्धतामिस्त्रम् - अन्धतामिस्त्र तमः - तम मोहः - मोह महातमः - महामोह इति - अशी पञ्चपर्वाणम् - पञ्चपर्वा नावाच्या अविद्याम् - अविद्येला छायया - अज्ञानाने ससर्ज - उत्पन्न करिता झाला ॥१८॥

ब्रह्मा - ब्रह्मदेव तमोमयम् - अज्ञानमय अशा तं सर्गम् - त्या सृष्टीला न अभिनन्दन् - पसंत न करणारा असा आत्मनः - आपल्या कायम् - शरीराला विससर्ज - त्यागिता झाला तत् - ते शरीर रात्रिः - रात्रिस्वरूप अभूत् - झाले ततः - त्या रात्रीपासून जातानि - उत्पन्न झालेले यक्षरक्षांसि - यक्ष व राक्षस क्षुत्तृट्‌समुद्भवाम् - क्षुधा व तृषा यांची उत्पत्ति जीमध्ये अशा रात्रिम् - रात्रीला जगृहुः - ग्रहण करिते झाले ॥१९॥

क्षुतृड्भ्याम् - क्षुधा व तृषा यांनी पीडलेले असे ते - ते यक्ष व राक्षस तम् - त्या ब्रह्मदेवाला जग्धुम् - खाण्याकरिता अभिदुद्रुवः - धावून आले क्षुत्तृडर्दिताः - क्षुधा व तृषा यांनी पीडिलेले असे एनम् - ह्या ब्रह्मदेवाचे मा रक्षत - रक्षू नका जक्षध्वम् - खाऊन टाका इति - याप्रमाणे ऊचुः - बोलते झाले ॥२०॥

देवः - ब्रह्मदेव संविग्नः - घाबरलेला असा तान् - त्या यक्षराक्षसांना आह - म्हणाला माम् - मला मा जक्षत - खाऊ नका रक्षत - रक्षण करा अहो - अहो यक्षरक्षांसि - यक्षराक्षसांनो यूयम् - तुम्ही मे - माझे प्रजाः - पुत्र बभूविथ - झाला आहात ॥२१॥

दीव्यन् - प्रकाशणारा सः - तो ब्रह्मदेव प्रभया - कान्तीने याः याः - ज्या ज्या देवताः - देवांना प्रमुखतः - प्राधान्याने असृजत् - उत्पन्न करता झाला ते - ते देव विसृष्टाम् - टाकलेल्या ताम् - त्या अहः - दिवसरूप प्रभाम् - प्रभेला देवयन्तः - खेळविणारे अहार्षुः - स्वीकार करते झाले ॥२२॥

देवः - ब्रह्मदेव जघनतः - कमरेच्या पुढच्या भागापासून अतिलोलुपान् - अत्यन्त विषयलोलुप अशा अदेवान् - दैत्यांना सृजति स्म - उत्पन्न करता झाला ते - ते दैत्य लोलुपतया - विषयलोलुपतेमुळे एनम् - ह्या ब्रह्मदेवाप्रत मैथुनाय - मैथुनाकरिता अभिपेदिरे - प्राप्त झाले ॥२३॥

ततः - नंतर हसन् - हास्य करणारा असा सः - तो भगवान् - ब्रह्मदेव निरपत्रपैः - निर्लज्ज अशा असुरैः - दैत्यांनी अन्वीयमानः - पाठलाग केलेला असा क्रुद्धः - रागावलेला भीतः - भ्यालेला तरसा - वेगाने परापतत् - पळू लागला ॥२४॥

सः - तो ब्रह्मदेव प्रपन्नार्तिहरम् - शरणागतांचे दुःख हरण करणार्‍या अशा पदम् - वर देणार्‍या अशा भक्तानाम् - भक्तांवर अनुग्रहाय - अनुग्रह करण्याकरिता अनुरूपात्मदर्शनम् - योग आहे दर्शन ज्यांचे अशा हरिम् - श्रीकृष्णाला उपव्रज्य - भेटून ॥२५॥

परमात्मन् - हे परमेश्वरा माम् - मला पाहि - राख ते - तुझ्या प्रेषणेन - आज्ञेने प्रजाः - प्रजा असृजम् - उत्पन्न केल्या प्रभो - प्रभो पापाः - पापी अशा ताः - त्या इमाः - ह्या यभितुम् - मैथुन करण्याकरिता माम् - मला उपक्रामन्ति - धरीत आहेत ॥२६॥

क्लिष्टानाम् - दुःखी अशा लोकानाम् - लोकांच्या क्लेशनाशनः - दुःखांचा नाश करणारा असा त्वम् - तू एकः - एक किल - प्रसिद्ध असि - आहेस तव - तुझे अनासन्नपदाम् - प्राप्त केले नाहीत चरण ज्यांनी अशा तेषाम् - लोकांना क्लेशदः - क्लेश देणारा असा एकः - एक त्वम् - तू असि - आहेस ॥२७॥

विविक्ताध्यात्मदर्शनः - निःसंशय आहे दुसर्‍याच्या अन्तकरणाचे ज्ञान ज्याला असा सः - तो श्रीविष्णु अस्य - ह्या ब्रह्मदेवाचे कार्पण्यम् - दैन्याला अवधार्य - जाणून घोराम् - कामाने दूषित झालेल्या आत्मतनुम् - आपल्या शरीराला विमुञ्च - सोडून दे इति - असे उक्तः - सांगितलेला सः ताम् - तो ब्रह्मदेव त्या शरीराला विमुमोच ह - त्यागिता झाला ॥२८॥

धर्म - हे विदुरा क्वणच्चरणाम्भोजां - नूपुरांनी वाजत आहेत चरणकमले जिची अशा मदविह्‌वललोचनाम् - मदाने फिरत आहेत नेत्र जिचे अशा काञ्चीकलापविलसद्‌ - कमरपट्ट्याने शोभणारे जे रेशमी वस्त्र दुकूलच्छत्ररोधसम् - त्याने झाकलेला आहे कटिभाग जिचा अशी अन्योन्यश्लेषया - एकमेकांशी लागलेले असल्यामुळे उत्तुङ्गनिरन्तपयोधराम् - उंच व अवकाशरहित असे आहेत स्तन जिचे अशा सुनासाम् - सुंदर आहे नासिका जिची अशा सुव्दिजाम् - सुंदर आहेत दात जिचे अशा स्निग्धहासलीलावलोकनाम् - जिचे प्रेमळ हास्य व हावभावांनी युक्त दर्शन आहे अशा व्रीडया - लज्जेने आत्मनाम् - शरीराला गूहन्तीम् - झांकणार्‍या अशा नीलालकवरूथिनीम् - काळ्या केसांचा आहे बुचडा जिचा अशा ताम् - त्या संध्येला स्त्रियम् - स्त्री असे उपलभ्य - मानून सर्वे - सर्वे असुराः- दैत्य संमुमुहुः - मोहित झाले ॥२९-३१॥

अहो - कितीहो आश्चर्यजनक रूपम् - रूप अहो - केवढे हो धैर्यम् - धैर्य अहो - कितीहो मोहक अस्याः - ह्या स्त्रीचे नवम् - नूतन वयः - तारुण्य अस्ति - आहे कामयमानाम् - कामना करणार्‍यांच्या मध्ये - मध्ये अकामा इव - जणू काय कामनारहित अशी विसर्पति - फिरत असते ॥३२॥

प्रमदाकृतिम् - स्त्रीसारखी आहे आकृति जिची अशा संध्याम् - संध्येला बहुधा - अनेक प्रकाराने वितर्कयन्तः - तर्क करणारे असे कुमेधसः - पापी आहे बुद्धि ज्यांची असे ते - ते दैत्य ताम् - त्या संध्येला अभिसंभाव्य - मान देऊन विश्रम्भात् - विश्वासाने पर्यपृच्छन् - विचारु लागले ॥३३॥

रम्भोरु - हे सुन्दरी त्वम् - तू का - कोण असि - आहेस वा - अथवा भामिनि - हे सुन्दरी अत्र - ह्या ठिकाणी ते - तुझे कः - कोणते अर्थः - प्रयोजन अस्ति - आहे दुर्भगान् - दुर्दैवी अशा नः - आम्हाला रूपद्रविणपण्येन - स्वरूपरूपी अमोल वस्तूच विकण्यास योग्य असल्यामुळे विबाधेस - पीडा करितेस ॥३४॥

वा - किंवा अबले - हे स्त्रिये त्वम् - तू या - जी काचित् - कोणीहि एधि - अस तव - तुझे संदर्शनम् - दर्शन दिष्ट्या - सुदैवाने जातम् - झाले ईक्षमाणानाम् - पहाणार्‍यांच्या मनः - मनाला कन्दुकक्रीडया - चेंडूच्या क्रीडेने उत्सुनोषि - क्षुब्ध करितेस ॥३५॥

शालिनी - हे सुन्दरी पतत्पतङ्गम् - आपटणार्‍या चेंडूला करतलेन - हाताच्या तलाने मुहुः - वारंवार घ्रन्त्याः - प्रहार करणार्‍या अशा ते - तुझे पादपद्मम् - चरणकमल एकत्र - एके ठिकाणी न जयति - स्थिर होत नाही बृहत्स्तनभारभीतम् - स्थूल अशा स्तनांच्या भाराने दडपलेली अशी मध्यम् - कमर विषीदति - थकून जात आहे अमला - स्वच्छ अशी दृष्टिः - दृष्टि शान्ता इव - शांत झाल्यासारखी अस्ति - आहे च - आणि सुशिखासमूहः - सुंदर केशकलाप अस्ति - आहे ॥३६॥

मूढघियः - विचाररहित झाली आहे बुद्धि ज्यांची असे असुराः - दैत्य प्रमदायतीम् - स्त्रीप्रमाणे आचरण करणार्‍या अशा प्रलोभयन्तीम् - भुलविणार्‍या अशा सायन्तनीम् - संध्याकाळच्या सन्ध्याम् - वेळेला स्त्रियम् - स्त्री असे मत्वा - मानून जगृहुः - स्वीकार करते झाले ॥३७॥

भगवान् - ब्रह्मदेव भावगम्भीरम् - शृंगारिक गूढ अभिप्रायाने प्रहस्य - हास्य करून आत्मना - आपणच आत्मानम् - आपल्याला जिघ्रन्त्या - वास घेणार्‍या कान्त्या - सौंदर्याने गन्धर्वाप्सरसाम् - गन्धर्व व अप्सरा यांच्या गणान् - समूहांना ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥३८॥

सः - तो ब्रह्मदेव कान्तिमतीम् - सौंदर्ययुक्त अशा प्रियाम् - आवडत्या अशा तां तनुम् - त्या शरीररूपी जोत्स्नाम् - चन्द्रिकेला वै - खरोखर विससर्ज - सोडिता झाला विश्वावसुपुरोगमाः - विश्वावसुपुप्रभृति ते एव - ते गंधर्वच प्रीत्या - प्रीतीने ताम् - त्या चंद्रिकेला आददुः - घेते झाले ॥३९॥

च - आणि भगवान् - ब्रह्मदेव आत्मतन्द्रिणा - आपल्या आलस्याने भूतपिशाचान् - भूतांना व पिशाचांना सृष्ट्वा - उत्पन्न करून च - आणि दिग्वाससः - दिशा आहेत वस्त्र ज्यांचे अशा मुक्तकेशान् - मोकळे सोडले आहेत केस ज्यांनी अशा तान् - त्या भूतपिशाचांना वीक्ष्य - पाहून दृशौ - डोळे अमीलयत् - मिटता झाला ॥४०॥

प्रभो - हे विदुरा भूतपिशाचाः - भूते व पिशाचे तव्दिसृष्टाम् - त्या ब्रह्मदेवाने टाकलेल्या अशा जृम्भणाख्याम् - जांभई आहे नाव ज्याचे अशा तां तनुम् - त्या शरीराला जगृहुः - घेते झाले यया - ज्या जांभईने भूतेषु - प्राण्यांमध्ये इन्द्रियविक्लेदः - इन्द्रियांचे शैथिल्य दृश्यते - आढळून येते ताम् - तिला निद्राम् - निद्रा प्रचक्षते - म्हणतात येन - ज्या इन्द्रियशैथिल्यामुळे उच्छिष्टान् - अपवित्र अशा प्राण्यांना धर्षयन्ति - भ्रान्तियुक्त करतात तम् - त्या भृतगणाला उन्मादम् - उन्माद असे प्रचक्षते - म्हणतात ॥४१॥

आत्मानम् - आपल्याला ऊर्जस्वन्तं - बलवान असे मन्यमानः - मानणारा भगवान् - भगवान् प्रभुः - प्रभु अजः - ब्रह्मदेव साध्यान् - साध्यनामक गणान् - गणांना पितृगणान् - पितृगणांना परोक्षेण - अदृश्यरूपाने असृजत् - उत्पन्न करिता झाला ॥४२॥

ते - ते साध्यगण च - आणि पितरः - पितर तम् - त्या आत्मसर्गम् - आपली आहे उत्पत्ति ज्यापासून अशा कायम् - शरीराला प्रतिपेदिरे - मिळविते झाले यत् - ज्या शरीराच्या निमित्ताने कवयः - कर्ममार्गी साध्येभ्यः - साध्यांना च - आणि पितृभ्यः - पितरांना वितन्वते - हव्यकव्य देतात ॥४३॥

सः - तो ब्रह्मदेव सिद्धान् - सिद्धांना च - आणि विद्याधरान् - विद्याधरांना तिरोधानेन - अदृश्य शक्तीने असृजत् - उत्पन्न करिता झाला तेभ्यः एव - त्या सिद्ध व विद्याधरांनाच अन्तर्धानाख्यम् - अन्तर्धान आहे नाव ज्याचे अशा तम् - त्या अद्भुतम् - आश्चर्योत्पादक अशा आत्मानम् - स्वतःच्या शरीराला अदात् - देता झाला ॥४४॥

आत्माभासम् - आपल्या प्रतिबिम्बाला विलोकयन् - अवलोकन करणारा असा आत्मना - स्वतःकडून आत्मानम् - स्वतःला मानयन् - मान देणारा असा सः - तो प्रभुः - ब्रह्मदेव प्रत्यात्म्येन - प्रतिबिंबाच्या योगाने किन्नरान् - किन्नरांना किंपुरुषान् - किंपुरुषांना अजसृत् - उत्पन्न करिता झाला ॥४५॥

ते - ते किन्नर व किंपुरुष तु - तर परमेष्ठिना - ब्रह्मदेवाने त्यक्तम् - टाकिलेले यत् - जे रूपम् - रूप तत् - त्या रूपाला जगृहुः - घेते झाले मिथुनीभूय - एकत्र मिळून उषसि - पहाटेच्या वेळेस कर्मभिः - चरित्रांनी तम् एव - त्या ब्रह्मदेवालाच गायन्तः - गाणारे बभुवूः - झाले ॥४६॥

भोरावता - विस्तारयुक्त अशा देहेन - शरीराने बहुचिंतया - पुष्कळ काळजीमुळे वै - खरोखर शयानः - शयन करणारा असा सर्गे अनुपचिते - सृष्टि वाढलेली नसता क्रोधात् - क्रोधाने तत् - त्या वपुः - शरीराला उत्ससर्ज ह - टाकिता झाला ॥४७॥

अङ्ग - हे विदुरा अमुतः - ह्या शरीरापासून ये - जे केशाः - केस अहीयन्त - गळून पडले ते - ते केस अहयः - सर्पविशेष प्रसर्पतः - हातपाय पसरून चळवळ करणार्‍या त्या शरीरापासून सर्पाः - सर्प च - आणि क्रूराः - क्रोधी असे भोगोरुकन्धराः - फणांमुळे मोठ्या आहेत माना ज्यांच्या असे नागाः - सर्प जज्ञिरे - उत्पन्न झाले ॥४८॥

अन्ते - शेवटी आत्मानम् - आपल्याला कृतत्कृत्यम् इव - कृतकृत्य झाल्याप्रमाणे मन्यमानः - मानणारा सः - तो आत्मभूः - ब्रह्मदेव तदा - त्यावेळी मनसा - अन्तःकरणाने लोकभावनान् - लोकांचे रक्षण करणार्‍या अशा मनून् - मनूंना ससर्ज - उत्पन्न करिता झाला ॥४९॥

आत्मवान् - जितेंद्रिय असा सः - तो ब्रह्मदेव तेभ्यः - त्या मनूंना स्वीयम् - आपले पुरुषं पुरम् - पुरुषरूप शरीराला अत्यसृजत् - सोडिता झाला ये - जे पुरा - पूर्वी सृष्टाः - उत्पन्न केले ते - ते देव, पितर व गन्धर्वादिक तान् - त्या मनूंना दृष्ट्वा - पाहून प्रजापतिम् - ब्रह्मदेवाला प्रशशंसुः - स्तुतिपूर्वक म्हणाले ॥५०॥

अहो - हे जगत्स्‍रष्टः - सृष्टिकर्त्या ब्रह्मदेवा एतत् - हे ते - तुझे कृतम् - कृत्य सकृतम् बत - फार चांगले अस्ति - आहे यस्मिन् - ज्या मनुसृष्टीमध्ये क्रियाः - अग्निहोत्रादिक क्रिया प्रतिष्ठिताः - चाललेल्या सन्ति - आहेत हे - हे ब्रह्मदेवा अतः वयम् अस्मिन् - म्हणून आम्ही ह्या मनुसृष्टीत साकम् - बरोबर अन्नम् - हविर्भागाला अदाम - भक्षण करू ॥५१॥

तपसा - तपश्चर्येने विद्यया - ज्ञानपूर्वक उपासनेने योगेन - आसनादि योगाने च - आणि सुसमाधिना - वैराग्य व ऐश्वर्य इत्यादिकाने युक्तः - युक्त असा हृषीकेश - इन्द्रियांना वश करून घेतलेला असा ऋषिः - ऋषिस्वरूप ब्रह्मदेव अभिमताः - मान्य अशा ऋषीन् - ऋषिरूप प्रजाः - प्रजांना ससर्ज - उत्पन्न करिता झाला ॥५२॥

अजः - ब्रह्मदेव यत् - जे तत् - ते शरीर समाधियोगर्द्धितपोविद्याविरक्तिमत् - समाधि, योग, ऋद्धि, तप, विद्या व वैराग्य यांनी युक्त असे अभूत - होते तस्य - त्या स्वस्य - आपल्या देहस्य - शरीराच्या अंशम् - भागाला तेभ्यः - त्या ऋषींना एकैकशः - प्रत्येकी अदात् - देता झाला ॥५३॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय विसावा समाप्त

GO TOP