श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २१ वा - अन्वयार्थ

कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान -

भगवन् - हे मैत्रेया च - आणि स्वायम्भुवस्य मनोः - स्वायंभुव मनूचा परमसंमतः - अत्यन्त मान्य वंशः - वंश कथ्थताम् - सांगावा यत्र - ज्या वंशामध्ये मैथुनेन - मैथुनाने प्रजाः - प्रजा एधिरे - वाढू लागल्या ॥१॥

स्वायम्भुवस्य - स्वायंभुव मनूचे सुतौ - पुत्र प्रियव्रतोत्तानपादौ - प्रियव्रत व उत्तानपाद सप्तव्दीपवतीम् - सात व्दीपांनी युक्त अशा महीम् - पृथ्वीला यथाधर्मम् - धर्मानुसार वै - खरोखर जुगुपतुः - रक्षिते झाले ॥२॥

अनघ - हे निष्पाप ब्रह्मन् - मैत्रेया देवहूती - देवहूती इति - या नावाने विश्रुता - प्रसिद्ध तस्य - त्या मनूची दुहिता - कन्या कर्दमस्य - कर्दम प्रजापतेः - प्रजापतीची पत्नी - स्त्री वै - खरोखर त्वया - तू उक्ता - सांगितली ॥३॥

महायोगी - मोठा योगी सः - तो कर्दम ऋषि योगलक्षणैः - योगाच्या लक्षणांनी युक्तायाम् - युक्त अशा तस्याम् - त्या देवहूतीच्या ठिकाणी वीर्यम् - वीर्याला कतिधा - किती प्रकाराने वै - खरोखर ससर्ज - उत्पन्न करिता झाला तत् - ते शुश्रूषवे - श्रवणेच्छु अशा मे - मला वद - सांगा ॥४॥

ब्रह्मन् - हे मैत्रेया च - आणि ब्रह्मणः - ब्रह्मदेवाचा सुतः - पुत्र यः - जो भगवान् - भगवान् रुचिः - रुचिनामक ऋषि वा - अथवा दक्षः - दक्षप्रजापति मानवीम् - मनु कन्या जी आकूति व प्रसूतिनामक भार्याम् - स्त्रीला लब्ध्वा - मिळवून भूतानि - प्राण्यांना यथा - जसे ससर्ज - उत्पन्न करिता झाला ॥५॥

भगवान् - भगवान कर्दमः - कर्दम ऋषि प्रजाः - प्रजांना सृज - उत्पन्न कर इति - याप्रमाणे ब्रह्मणा - ब्रह्मदेवाने उदितः - सांगितलेला असा सरस्वत्याम् - सरस्वती नदीवर सहस्त्राणां दश समाः - दहा हजार वर्षे तपः - तपश्चर्येला तेपे - करिता झाला ॥६॥

ततः - नंतर कर्दमः - कर्दम ऋषि समाधियुक्तेन - एकाग्रचित्ताने युक्त अशा क्रियायोगेन - पूजा प्रकाराने प्रपन्नवरदाशुषम् - शरणागतांना वर देणार्‍या अशा हरिम् - श्रीविष्णूला भक्त्या - भक्तीने संप्रपेदे - शरण गेला ॥७॥

क्षत्तः - हे विदुरा तावत् - त्यावेळी कृते युगे - कृतायुगामध्ये पुष्कराक्षः - कमलाप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे असा भगवान् - विष्णु शाब्दम् - वेदांनी जाणण्यास योग्य अशा ब्रह्म - ब्रह्ममय वपुः - शरीराला दधत् - धारण करणार्‍या अशा तम् - त्या कर्दम ऋषीला आत्मानम् - स्वस्वरूप दर्शयामास - दाखविता झाला ॥८॥

सः - तो कर्दम ऋषि विरजम् - निर्मळ अशा अर्काभम् - सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा सितपद्मोत्पलस्त्रजम् - शुभ्र कमळे व कमोद यांच्या माळेने युक्त अशा स्निग्धनीलालकव्रात - तुळतुळीत व काळ्या केसांचा समूह आहे वक्त्राब्जम् - ज्याच्या मुखकमलावर विरजोम्बरम् - स्वच्छ आहे वस्त्र ज्याचे अशा किरीटिनम् - किरीटयुक्त अशा कुण्डलिनम् - कुण्डलांनी युक्त अशा शंखचक्रगदाधरम् - शंख, चक्र व गदा धारण करणार्‍या अशा श्वेतोत्पलक्रीडनकम् - श्वेतकमळ आहे खेळणे ज्याचे अशा मनःस्पर्शस्मितेक्षणम् - मनाला आनंद उत्पन्न करणारे आहे हास्य व दर्शन ज्याचे अशा वक्षःश्रियम् - वक्षस्थळावर आहे लक्ष्मी ज्याच्या अशा कौस्तुभकन्धरम् - कौस्तुभमणि आहे कण्ठामध्ये ज्याच्या अशा गरुत्मतः - गरुडाच्या अंसदेशे - खांद्यावर विन्यस्तचरणाम्भोजम् - ठेविलेली आहेत चरणकमळे ज्याने अशा खे - आकाशात अवस्थितम् - राहिलेल्या तम् - त्या विष्णूला दृष्ट्वा - पाहून ॥९-११॥

लब्धमनोरथः - पूर्ण झाला आहे मनोरथ ज्याचा असा जातहर्षः - झाला आहे आनंद ज्याला असा तो ऋषि मुर्धा - मस्तकाने क्षितौ - पृथ्वीवर अपतत् - पडला च - आणि प्रीतिस्वभावात्मा - प्रीतीच आहे स्वतःसिद्ध धर्म ज्याचा असा तो ऋषि तु - तर कृताञ्जलिः - केला आहे नमस्कार ज्याने असा गीर्भिः - वाणींनी अभ्यगृणात् - स्तुति करिता झाला ॥१२॥

ईड्य - स्तुति करण्यास योग्य अशा हे परमेश्वरा अद्य - आज अखिलसत्वराशेः - संपूर्ण सत्वगुणांचा निधि अशा तव - तुझ्या दर्शनात् - दर्शनामुळे नः - आमच्या अक्ष्णोः - नेत्रांचे सांसिध्यम् साफल्य जुष्टम् बत - खरोखर प्राप्त झाले आहे योगिनः - योगी सद्भिः - उत्तमोत्तम अशा जन्मभिः - जन्मांनी रूढयोगाः - वाढविला आहे योग ज्यांनी असे यद्दर्शनम् - ज्या तुझ्या दर्शनाची आशासते - इच्छा करितात ॥१३॥

ये - जे विषय निरये अपि - नरकात देखील स्युः - आहेत तेषाम् - त्या कामलवाय - विषयांच्या लेशाकरिता ये - जे लोक भवसिन्धुपोतम् - संसारसमुद्रात नौकारूप अशा त्वत्पादारविन्दम् - तुझ्या चरणकमलाला उपासते - सेवितात ते - ते लोक ते - तुझ्या मायया - मायेने हतबुद्धयः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्यांची असे सन्ति - असतात ईश - परमेश्वरा तेषाम् - त्याच्या कामान् - कामांना रासि - तू देतोस ॥१४॥

तथा - त्याप्रमाणे दुराशयः - दुष्ट आहे इच्छा ज्याची असा समानशीलाम् - तुल्य आहे स्वभाव जिचा अशा गृहमेधधेनुम् - गृहस्थाश्रमात धर्मादि अर्थांना साधून देणार्‍या अशा स्त्रीला परिवोढुकामः - वरण्याकरिता आहे इच्छा ज्याची असा सः - तो च - तर अहम् - मी अशेषमूलम् - संपूर्ण वस्तूचे मूल कारण अशा कामदुघाङ्घ्रिपस्य - सर्व इच्छा पुरविणार्‍या कल्पवृक्षाप्रमाणे असणार्‍या तव - तुझ्या मूलम् - पादमूळाला उपेयिवान् - प्राप्त झालो आहे ॥१५॥

अधीश - हे लोकाधिपते अयम् - हा कामहतः - कामाने पीडिलेला लोकः - लोक प्रजापतेः - प्रजापालक अशा ते - तुझ्या वचसा - वाणीरूप तन्त्या - दावणीने नु - निश्चयाने बद्धः - बांधलेला अस्ति - आहे शुक्ल - हे शुद्धमूर्ते अहम् - मी च - तर लोकानुगतः - लोकांचे अनुकरण करणारा असा अनिमिषाय - कालरूप अशा तुभ्यम् - तुला बलिम् - पूजा किल - निश्चयाने वहामि च - अर्पण करतोच ॥१६॥

भक्ताः - भक्त लोकान् - लोकांना च - आणि लोकानुगतान् - लोकांना अनुसरणार्‍या अशा पशून् - पशूंना हित्वा - टाकून ते - तुझ्या चरणातपत्रम् - चरणरूपी छत्राला आश्रिताः - अवलंबणारे परस्परम् - एकमेकांशी त्वद्‌गुणवादसीधुपीयूष - तुझ्या गुणकथारूपी मद्यामृताने निर्यापितदेहधर्माः - नष्ट झाले आहेत देहधर्म ज्यांचे असे भवन्ति - होतात ॥१७॥

अतः - म्हणून ते - तुझे अजराक्षभ्रमि - ब्रह्मरूपी कण्यावरून फिरणारे असे त्रयोदशारम् - अधिक महिन्यासुद्धा तेरा महिनेरूप आहेत आरा ज्यामध्ये असे त्रिशतम् षष्टिपर्व - तीनशे साठ दिवसरूप आहेत पेरे ज्याला असे षण्नेमि - सहा ऋतू आहेत धावा ज्याला असे अनन्तच्छदि - अनंत आहेत क्षण, लव, निमेष इत्यादि पत्राकार धारा ज्याला असे त्रिणाभि - तीन चातुर्मास्य आहेत नाभि ज्याला अशा करालस्त्रोतः - तीव्र आहे वेग ज्याचा असे जगत् - त्रैलोक्याला आच्छिद्य - आकर्षण करून धावत् - धावणारे यत् - जे कालचक्र अस्ति - आहे तत् - ते एषाम् - ह्या भक्तांचे आयुः - आयुष्य न छिनत्ति - नष्ट करीत नाही ॥१८॥

भगवन् - हे परमेश्वरा स्वयम् - स्वतः एकः - एक सन् - असलेला जगतः - जगाची सिसृक्षया - उत्पत्ति करण्याच्या इच्छेने व्दितीयया - दुसर्‍या आत्मन् - आपल्या ठिकाणी अधियोगमायया - स्वीकार केलेल्या योगमायेच्या योगाने स्वीकृताः - स्वीकारलेल्या यथा - ज्याप्रमाणे ऊर्णनाभिः - कोळी स्वशक्तिभिः - आपल्या सत्वादिक शक्तींनी अदः - ह्या जगाला सृजसि - उत्पन्न करतोस पासि - रक्षितोस पुनः - पुनः ग्रसिष्यसे - प्रलय करशील ॥१९॥

अधीश - हे परमेश्वरा मायया - मायेच्या योगाने नः - आम्हाला यत् - ज्या भूतसूक्ष्मम् - सूक्ष्म भूतरूप पदम् - विषयसुखाला तनुषे - वाढवतोस एतत् - हे तव - तुझे ईप्सितम् - इच्छित बत - खरोखर न - नाही अपि - तरीसुद्धा नः - आमच्या अनुग्रहाय - अनुग्रहाकरिता तत् - ते विषयसुख अस्तु - असो यर्हि - ज्या अर्थी मायया - मायेच्या योगाने परिच्छिन्नः इव - जणू काय मर्यादित असा लसत्तुलस्या - शोभत आहे तुलसी ज्याच्या ठिकाणी अशा तनुवा - शरीराने विलक्षितः - दृष्टिगोचर झाला आहेस ॥२०॥

स्वमायया - आपल्या मायेच्या योगाने आवर्तितलोकतन्त्रम् - उत्पन्न केली आहेत जगतांची साधने ज्याने अशा अनुभूत्या - ज्ञानाने उपरतक्रियार्थम् - संपविलेला आहे कर्मफलाचा भोग ज्याचे ठिकाणी अशा नमनीयपादसरोजम् - वंद्य आहेत पदकमले ज्याची अशा अल्पीयसी - अत्यंत अल्प आराधने - भजन केले असता कामवर्षम् - मनोरथांचा वर्षाव करणार्‍या अशा तम् - त्या त्वाम् - तुला अभिक्ष्णम् - वारंवार नमामि - नमस्कार करतो ॥२१॥

इति - याप्रमाणे अव्यलीकम् - निष्कपटपणे प्रणुतः - स्तुती केलेला सुपर्णपक्षोपरिरोचमानः - गरुडाच्या पंखामुळे अधिक शोभणारा असा अब्जनाभः - कमल आहे नाभीच्या ठिकाणी ज्याच्या असा भगवान प्रेमस्मित - प्रेम व हास्य या दोन्हींच्या योगाने उद्वीक्षणविभ्रमद्‌भ्रूः - चंचल आहे भ्रुकुटि ज्याची असा तम् - त्या कर्दम ऋषीला अमृतेन - अमृततुल्य वचसा - भाषणाने आबभाषे - बोलता झाला ॥२२॥

त्वया - तुझ्याकडून यदर्थम् - ज्याकरिता आत्मनियमैः - अंतःकरणाच्या नियमांनी अहम् एव - मीच अर्चितः - पूजिलो तत् - ते तव - तुझे चैत्यम् - हृद्‌गत विदित्वा - जाणून मे - मजकडून पुरैव - पूर्वीच समयोजि - उत्तमप्रकारे योजिले गेले ॥२३॥

प्रजाध्यक्ष - हे लोकाधिपते मयि - माझ्या ठिकाणी संगृभितात्मनाम् - एकाग्र केले आहे चित्त ज्यांनी अशा लोकांचे मदर्हणम् - माझे पूजन जातु - केव्हाही मृषा - व्यर्थ वै - खरोखर न स्यात् - होणार नाही भवव्दिधेषु - तुझ्या सारख्यांच्या ठिकाणी अतितराम् एव - सर्वथाच मृषा न स्यात् - निष्फळ होणार नाही ॥२४॥

प्रजापतिसुतः - ब्रह्मदेवाचा पुत्र सम्राट् - सार्वभौम राजा मनुः - मनु अस्ति - आहे यः - जो मनु विख्यातमङ्गलः - प्रसिद्ध आहे सदाचारादि गुण ज्याचे असा ब्रह्मावर्तम् - ब्रह्मवर्ताला अधिवसन् - राहणारा असा सप्तार्णवाम् - सात समुद्रांनी युक्त असा महीम् - पृथ्वीला शास्ति - रक्षितो ॥२५॥

विप्र - हे कर्दम ऋषे धर्मकोविदः - धर्मशास्त्रात प्रवीण असा सः - तो राजर्षिः - राजर्षि मनु च - तर त्वाम् - तुला दिदृक्षुः - पाहण्याची इच्छा करणारा महिष्या - पट्टराणी शतरूपया - शतरूपेसह परश्वः - परवांच्या दिवशी इह - येथे आयास्यति - येईल ॥२६॥

प्रभो - कर्दम ऋषे पतिम् - पतीला मृगयन्तीम् - शोधणार्‍या अशा वयःशीलगुणान्विताम् - वय, स्वभाव व गुण यांनी युक्त अशा असितापाङ्गीम् - काळेभोर आहेत नेत्र जीचे अशा आत्मजाम् - कन्येला अनुरूपाय - अनुरूप अशा ते - तुला दास्यति - देईल ॥२७॥

यत्र - ज्या स्त्रीचे ठिकाणी ते - तुझे हृदयम् - चित्त समाहितम् - जडलेले भविष्यति - असेल ब्रह्मन् - कर्दम ऋषे सा - ती नृपवधूः - राजकन्या आशु - लवकर त्वाम् - तुला इमान् - ह्या परिवत्सरान् - अनेक वर्षांच्या कालावधीपर्यंत कामम् - यथेच्छ भजिष्यति - सेवील ॥२८॥

या - जी स्त्री आत्मभृतम् - आपल्या ठिकाणी धारण केलेल्या अशा ते - तुझ्या वीर्यम् - वीर्याला नवधा - नऊ प्रकाराने प्रसविष्यति - प्रसवेल ऋषयः - ऋषि त्वदीये - त्वत्संबंधी वीर्ये - वीर्योत्पन्न संततीच्या ठिकाणी अञ्जसा - अनायासे आत्मनः - पुत्रांना आधास्यन्ति - स्थापना करतील ॥२९॥

च - आणि त्वम् - तू मे - माझ्या निदेशम् - आज्ञेला सम्यक् - उत्तम प्रकारे अनुष्ठाय - पाळून मयि - माझ्या ठिकाणी तीर्थीकृताशेषः - अर्पण केली आहेत संपूर्ण कर्मफले ज्याने असा उशत्तमः - अत्यंत निर्मळ असा माम् - मला प्रपत्स्यसे - प्राप्त होशील ॥३०॥

जीवेषु - प्राण्यांच्या ठिकाणी दयाम् - दयेला कृत्वा - करून च - आणि आत्मवान् - जितेन्द्रिय असा अभयम् - अभयाला दत्वा - देऊन आत्मानम् - स्वतःला च - आणि जगत् - जगाला सह - एकरूप मयि - माझ्या ठिकाणी च - आणि माम् - मलाहि आत्मनि - स्वतःचे ठिकाणी द्रक्ष्यसि - पाहशील ॥३१॥

महामुने - हे मुनिश्रेष्ठा अहम् - मी स्वांशकलया - आपल्या अंशरूपाने त्वव्दीर्येण सह - तुझ्या वीर्यासह तव - तुझ्या देवहूत्याम् - देवहूतीनामक क्षेत्रे - क्षेत्रभूत अशा स्त्रीचे ठिकाणी अवतीर्य - अवतार घेऊन तत्त्वसंहिताम् - सांख्यनामक शास्त्राला प्रणेष्ये - निर्माण करीन ॥३२॥

प्रत्यगक्षजः - अन्तर्मुख इंद्रियांमध्ये प्रगट होणारा असा भगवान् - विष्णु तम् - त्या कर्दम ऋषीला एवम् - याप्रमाणे अनुभाष्य - बोलून सरस्वत्या - सरस्वती नदीने परिश्रितात् - वेष्टिलेल्या अशा बिंदुसरसः - बिंदुसरोवरापासून जगाम - गेला ॥३३॥

अशेष - अनेक साधनांनी सिद्ध झालेल्या सिद्धेश्वराभिष्टुत सिद्धमार्गः - योगी लोकांनी स्तविलेला आहे वैकुण्ठमार्ग ज्याचा असा भगवान् - विष्णु पत्ररथेन्द्रपक्षैः - गरुडाच्या पंखांनी उच्चारितम् - उच्चारिलेल्या अशा उदीर्णसाम - गायिलेल्या आहेत सामवेदाच्या ऋचा ज्यामध्ये अशा स्तोमम् - स्तवनाला आकर्णयन् - श्रवण करणारा असा तस्य निरीक्षतः - तो कर्दम ऋषि पाहात असता ययौ - गेला ॥३४॥

अथ - नंतर शुक्ले संप्रस्थिते - शुक्लवर्ण विष्णु गेला असता भगवान् - भगवान् कर्दमः ऋषिः - कर्दम ऋषी तं कालम् प्रतिपालयन् - त्या कालाची वाट पाहणारा असा बिन्दुसरसि - बिन्दुसरोवराच्या ठिकाणी आस्ते स्म - स्वस्थ बसला ॥३५॥

मनुः - मनु शातकौम्भपरिच्छदम् - सुवर्णाची आहेत भूषणे ज्याला अशा स्यन्दनम् - रथावर आस्थाय - बसून स्वाम् - आपल्या दुहितरम् - कन्येला आरोप्य - बसवून सभार्यः - भार्येसहित महीम् - पृथ्वीवर पर्यटन् - फिरत फिरत ॥३६॥

सुधन्वन् - उत्तम आहे धनुष्य ज्याचे अशा हे विदुरा भगवान् - विष्णु यत् - ज्या दिवसाला समादिशत् - सांगता झाला तस्मिन् अहनि - त्या दिवशी शान्तव्रतस्य - शांत आहे आचरण ज्याचे अशा कर्दम ऋषीच्या तत् - त्या आश्रमपदम् - आश्रमस्थानाला उपायात् - प्राप्त झाला ॥३७॥

यस्मिन् - ज्या सरोवरामध्ये प्रपन्ने - शरणागताचे ठिकाणी अर्पितया - अर्पण केलेल्या कृपया - दयेने भृशम् - अत्यन्त संपरीतस्य - व्याप्त झालेल्या भगवतः - श्रीविष्णूच्या नेत्रात् - नेत्रापासून अश्रुबिन्दवः - अश्रुबिंदु न्यपतन् - गळले ॥३८॥

तत् - ते वै - खरोखर बिन्दुसरः नाम - बिन्दुसर नावाचे सरोवर पुण्यम् - पवित्र असे सरस्वत्या - सरस्वती नदीने परिप्लुतम् - वेष्टिलेले असे शिवामृतजलम् - आरोग्यदायक व अमृतासारखे गोड आहे जल ज्यामध्ये असे महर्षिगणसेवितम् - व मोठमोठ्या ऋषिसमुदायाने सेविलेले असे अस्ति - आहे ॥३९॥

कूजत्पुण्यमृगव्दिजैः - शब्द करीत आहेत मृग व पक्षी ज्यांचे ठिकाणी अशा पुण्यद्रुमलता जालैः - पवित्र वृक्ष व लता यांच्या समूहांनी वनश्रिया - वनशोभेने अन्वितम् - युक्त असे सर्वर्तुफलपुष्पाढ्यम् - सर्व ऋतूंतील फळे व पुष्पे यांनी युक्त असे ॥४०॥

मत्ताव्देजगणैः - उन्मत्त अशा पक्षिगणांनी घुष्टम् - शब्दित असे मत्तभ्रमरविभ्रमम् - उन्मत्त अशा भ्रमरांचा आहे विनोद ज्यामध्ये असे मत्तबर्हिन टाटोपम् - उन्मत्त मयूररूपी नटांची आहे, नृत्याविषयी त्वरा ज्यामध्ये असे आह्‌वयन्मत्तकोकिलम् - बोलवित आहेत उन्मत्त कोकिला ज्यामध्ये असे ॥४१॥

कदम्बचंपकाशोककरञ्जबकुलासनैः - कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुल व असाणा यांनी कुन्दमन्दारकुटजैः - कुंद, मंदार व कुडा यांनी च - आणि चूतपोतैः - आंब्याच्या रोपांनी अलङ्कृतम् - अलङ्कृत केलेले असे ॥४२॥

कारण्डवैः - पाणकावळ्यांनी प्लवैः - पाण्यावर तरणार्‍या क्रौंचबकादिक पक्ष्यांनी हंसैः - हंसांनी कुररैः - टिटव्यांनी जलकुक्कुटैः - पाणकोंबड्यांनी सारसैः - सारसपक्ष्यांनी चक्रवाकैः - चक्रवाकपक्ष्यांनी च - आणि चकोरैः - चकोरपक्ष्यांनी वल्गु - मधुर कूजितम् - शब्द केलेले ॥४३॥

तथा एव - त्याचप्रमाणे हरिणैः - हरिणांनी क्रोडैः - डुकरांनी श्वाविद्गवथकुञ्जरैः - साळी, गवे व हत्ती यांनी गोपुच्छैः - गोपुच्छनामक वानरांनी हरिभिः - वानरांनी मर्कैः - माकडांनी नकुलैः - मुंगुसांनी च - आणि नाभिभिः - कस्तुरिमृगांनी वृतम् - वेष्टिलेल्या अशाच ॥४४॥

आदिराजः - पहिला राजा स्वायंभुव मनु तत् - त्या तीर्थवरम् - श्रेष्ठ तीर्थात प्रविश्य - प्रवेश करून तस्मिन् - त्या आश्रमात हुतहुताशनम् - अग्नीमध्ये हवन केले आहे ज्याने अशा आसीनम् - बसलेल्या मुनिम् - ऋषीला ददर्श - पाहता झाला ॥४५॥

चिरम् - पुष्कळ कालपर्यंत तपसि - तपश्चर्येमध्ये उग्र युजा - घोर आहे योग ज्याचा अशा वपुषा - शरीराने विद्योतमानम् - प्रकाशणार्‍या अशा भगवतः - विष्णूच्या स्निग्धापाङ्गविलोकनात् - प्रेमयुक्त कटाक्षाने केलेल्या अवलोकनामुळे च - आणि तव्द्याहृतामृतकला - विष्णूचे भाषण हाच कोणी चंद्र त्याच्या कलेतील पीयूषश्रवणेन - अमृताच्या श्रवणाने न अतिक्षामम् - फार कृश नसलेल्या अशा ॥४६॥

प्रांशुम् - उंच अशा पद्मपलाशाक्षम् - कमलपत्राप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे अशा जटिलम् - जटायुक्त अशा चीरवाससम् - वल्कले आहेत वस्त्र ज्याचे अशा मुनिं - ऋषीला ददर्श - पाहता झाला उपसंसृत्य - जवळ जाऊन यथा - ज्याप्रमाणे असंस्कृतम् - संस्कार न केलेले अर्हणम् - अमूल्य रत्न दृश्यते - दिसते तथा - त्याप्रमाणे मलिनम् - मलीन अशा मुनिं - ऋषीला ददर्श - पाहता झाला ॥४७॥

अथ - नंतर सः - तो कर्दम ऋषि उटजम् - पर्णकुटिकेच्या उपायातम् - समीप आलेल्या अशा पुरः - अग्रभागी प्रणतम् - नमस्कार केलेल्या नृदेवम् - राजाला प्रतिनन्‌द्य - गौरवून अनुरुपया - योग्य अशा सपर्यया - पूजेने प्रत्यगृह्णात् - सत्कार करिता झाला ॥४८॥

भगवदादेशम् - विष्णूच्या आज्ञेला स्मरन् - स्मरणारा मुनिः - कर्दम ऋषि गृहीतार्हणम् ताहेणम्ः - स्वीकारली आहे पूजा ज्याने अशा संयतम् - जितेन्द्रिय अशा आसीनम् - बसलेल्या तम् - त्या राजाला प्रीणयन् - संतुष्ट करीत श्लक्ष्णया - मधुर अशा गिरा - वाणीने इति - याप्रमाणे आह - बोलला ॥४९॥

देव - हे राजा यः - जो त्वम् - तू हरेः - विष्णूची पालनी - रक्षण करणारी अशी शक्तिः - शक्ति असि - आहेस तस्य - त्या ते - तुझे चङ्क्रमणम् - संचार नूनम् - खरोखर सताम् - साधूंच्या संरक्षणाय - संरक्षणाकरिता च - आणि असताम् - दुष्टांच्या वधाय - नाशाकरिता अस्ति - आहे ॥५०॥

यः - जो स्थाने - त्या त्या कार्याच्या वेळी अर्केन्व्दग्नीन्द्रवायूनाम् - सूर्य , चंद्र, अग्नि इन्द्र व वायु यांची च - आणि यमधर्मप्रचेतसाम् - यमधर्म व वरुण यांची रूपाणि - स्वरूपांना आधत्से - धारण करतोस तस्मै - त्या शुक्लाय - शुक्लवर्ण विष्णूरूप ते - तुला नमः - नमस्कार अस्तु - असो ॥५१॥

विस्फूर्जच्चण्डकोदण्डः - टणत्कार करणारे व प्रचण्ड आहे धनुष्य ज्याचे असा रथेन - रथाने अघान् - शत्रूंना त्रासयन् - त्रास उत्पन्न करणारा स्वसैन्यचरणक्षुण्णाम् - आपल्या सैन्याच्या पायांनी तुडविलेल्या भुवः - पृथ्वीच्या मण्डलम् - मंडलाला वेपयन् - कापविणारा वृहतीम् - मोठ्या सेनाम् - सेनेला विकर्षन् - खेचून नेणारा त्वम् - तू मणिगणार्पितम् - रत्नांचे समूह आहेत स्थापिलेले ज्यावर अशा जैत्रम् - विजयी रथम् - रथावर आस्थाय - बसून अंशुमान् इव - सूर्याप्रमाणे यदा - ज्यावेळी न पर्यटसि - फिरणार नाहीस ॥५२-५३॥

तदा एव - त्याच वेळी राजन् - हे राजा वर्णाश्रमनिबन्धनाः - वर्ण व आश्रम यांच्या आहेत व्यवस्था ज्यामध्ये अशा भगवद्रचिताः - श्रीविष्णूंनी निर्माण केलेल्या सर्वे - सर्व सेतवः - धर्ममर्यादा दस्युभिः - शत्रूंनी भिद्येरन् - नष्ट होतील बत - खरोखर ॥५४॥

त्वयि शयाने - तू स्वस्थ निजला असता व्यङ्कुशैः - निरंकुश अशा लोलुपैः - विषयलंपट नृभिः - मनुष्यांकडून अधर्मः - अधर्म समेधेत - वाढेल च - आणि अयं लोकः - हे जग दस्युग्रस्तः - शत्रूंना ग्रासलेले असे विनंक्ष्यति - नष्ट होईल ॥५५॥

वीर - हे शूरा अथ अपि - असे असताहि यदर्थम् - ज्याच्याकरिता त्वम् - तू इह - येथे आगतः - आलास तत् - ते वयम् - आम्ही निर्व्यलीकेन हृदा - निष्कपट अंतःकरणाने प्रतिपद्यामहे - स्वीकारू ॥५६॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय एकविसावा समाप्त

GO TOP