श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १९ वा - अन्वयार्थ

हिरण्याक्षवध -

सः - तो वराह विरिञ्चस्य - ब्रह्मदेवाचे निर्व्यलीकामृतम् - निष्कपट व अमृतासारखे गोड असे तत् - ते वचः - भाषण अवधार्य - ऐकून प्रहस्य - हास्य करून प्रेमगर्भेण - प्रेम आहे आत ज्याच्या अशा अपाङ्गेन - नेत्रकटाक्षाने अग्रहीत् - स्वीकारिता झाला ॥१॥

ततः - नंतर अक्षजः - ब्रह्मदेवाच्या घ्राणेंद्रियापासून उत्पन्न झालेला तो आदिवराह मुखतः - समोर चरन्तम् - संचार करणार्‍या अशा अकुतोभयम् - निर्भय अशा सपत्नम् - शत्रुरूप अशा असुरम् - दैत्याच्या उत्पत्य - उडी मारून हनौ - हनुवटीवर गदया - गदेने जघान - प्रहार करिता झाला ॥२॥

सा - ती गदा तेन - त्या हिरण्याक्षाने गदया - गदेने हृता - ताडिलेली भगवत्करात् - भगवंताच्या हातातून विहता - सुटलेली अशी विघूर्णिता - गरगर फिरत अपतत् - पडली च - आणि रेजे - शोभली तत् - ती गोष्ट अद्‌भुतम् इव - आश्चर्य मानण्यासारखी अभवत् - झाली ॥३॥

तदा - त्या वेळी लब्धतीर्थः अपि - मिळाली आहे संधि ज्याला असा असूनहि सः - तो हिरण्याक्ष निरायुधम् - गेले आहे आयुध ज्याचे अशा तम् - त्या विष्णूला न बबाधे - प्रहार न करिता झाला सः - तो हिरण्याक्ष मृधे - युद्धात धर्मम् - धर्माला मानयन् - मानणारा असा विष्वक्सेनम् - विष्णूला प्रकोपयन् - क्रोध उत्पन्न करणारा बभूव - झाला ॥४॥

विभुः - विष्णु गदायाम् अपविद्धायाम् - गदा धक्क्याने पडली असता हाहाकारे विनिर्गते - हाहाःकार उत्पन्न झाला असता तद्धर्मम् - त्या हिरण्याक्षाच्या सत्यधर्माला मानयाम्रास - प्रशंसिता झाला च - आणि सुनाभम् - सुदर्शन चक्राला अस्मरत् - स्मरता झाला ॥५॥

तत्र - तेथे व्यग्रचक्रम् - उत्कंठित आहे सुदर्शनचक्र ज्याचे अशा स्वपार्षदमुख्येन - आपल्या पार्षदातील प्रमुख अशा दितिपुत्राधमेन - अधम दीतिपुत्राकडून विषज्जमानम् - लगट केल्या गेलेल्या तम् - त्या विष्णूप्रत अताव्ददाम् - विष्णूचा प्रभाव न जाणणार्‍या अशा खेचराणाम् - देवांची ते - तुझे स्वस्ति - कल्याण असो अमुम् - ह्या हिरण्याक्षाचा जहि - वध कर इति - याप्रमाणे चित्राः - आश्चर्यकारक वाचः - वाक्ये आ - सर्वप्रकारे आसन् स्म - उत्पन्न झाली ॥६॥

सः - तो हिरण्याक्ष पद्मपलाशलोचनम् - कमलाप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे अशा आत्तरथाङ्गम् - घेतले आहे चक्र ज्याने अशा तम् - त्या वराहाला निशाम्य - जाणून च - आणि अग्रतः - पुढे व्यवस्थितम् - उभा राहिलेला असा विलोक्य - पाहून अमर्षपरिप्लुतेन्द्रियः - क्रोधाने भरून गेली आहेत इंद्रिये ज्यांची असा श्वसन् - श्वास सोडणारा असा रुपा - क्रोधाने स्वदन्तच्छदम् - आपले ओठ आदशत् - चावू लागला ॥७॥

करालदंष्ट्रः - भयंकर आहेत दाढा ज्याच्या असा चक्षुर्भ्याम् - डोळ्यांनी दहन् इव - जाळतोच की काय असा संचक्षाणः - पाहणारा सः - तो हिरण्याक्ष अभिप्लुत्य - उडी मारून हतः असि - हा पहा मेलास इति - असे उक्त्वा - बोलून स्वगदया - आपल्या गदेने हरिम् - वराहरूप श्रीहरीला अहनत - प्रहार करिता झाला ॥८॥

साधो - हे विदुरा भगवान् - भगवान यज्ञसूकरः - यज्ञवराह शत्रोः मिषतः - शत्रु पाहत असता वातरंहसम् - वायुप्रमाणे आहे वेग जिचा अशा ताम् - त्या गदेला सव्येन पदा - डाव्या पायाने लीलया - लीलेने प्राहरत् - प्रहार करिता झाला ॥९॥

च - आणि आह - म्हणाला आयुधम् - आयुध आधत्स्व - घे च - आणि घटस्व - उद्योग कर यतः - कारण त्वम् - तू जिगीषसि - जिंकण्याची इच्छा करतोस इति उक्तः - असे म्हटलेला सः - तो हिरण्याक्ष तदा - त्या वेळी भूपः - पुनः ताडयन् - प्रहार करणारा असा भृशम् - मोठ्याने व्यनदत् - गर्जना करिता झाला ॥१०॥

सः - तो भगवान् - विष्णू आपततीम् - जवळ येणार्‍या अशा ताम् - त्या गदेला वीक्ष्य - पाहून समस्थितः - व्यवस्थित उभा राहिला प्राप्तम् - व प्राप्त झालेल्या गदेला गरुत्मान् - गरुड पन्नगीम् - नागिणीला इव - जसा तथा - तसा लीलया - लीलेने जग्राह - धारण करिता झाला ॥११॥

महासुरः - मोठा दैत्य स्वपौरुषे प्रतिहते - आपला पराक्रम नष्ट झाला असता हतमानः - नाहीसा झाला आहे गर्व ज्याचा अशा विगतप्रभः - गेली आहे कांती ज्याची अशा हरिणा - विष्णूने दीयमानाम् - दिलेल्या गदाम् - गदेला न ऐच्छत् - न इच्छिता झाला ॥१२॥

सः - तो हिरण्याक्ष ज्वलज्ज्वलनलोलुपम् - पेटलेल्या अग्नीप्रमाणे ग्रासण्यास तयार असलेल्या त्रिशिखम् - तीन आहेत शल्ये ज्याला अशा शूलम् - शूळाला धृतरुपाय - धारण केले आहे वराहरूप ज्याने अशा यज्ञाय - यज्ञपुरुषाकरिता यथा - ज्याप्रमाणे अभिचरन् - जारणमारणादि करणारा पुरुष विप्राय - ब्राह्मणांकरिता तथा - त्याप्रमाणे जग्राह - ग्रहण करिता झाला ॥१३॥

सः - तो विष्णू ओजसा - जोराने दैत्यमाभटार्पितम् - महाशूर दैत्याने फेकलेल्या अशा उदीर्णदीधिति - अतिशय आहे तेज ज्याचे अशा अन्तःखे - आकाशात चकासत् - चकाकणार्‍या अशा तत् - त्या त्रिशूळाला निशातनेमिना - तीक्ष्ण आहे धारा ज्याची अशा चक्रेण - चक्राने यथा - ज्याप्रमाणे हरिः - इंद्र उज्झितम् - टाकिलेल्या तार्क्ष्यपतत्‌त्रम् - गरुडाच्या पिसाला तथा - त्याप्रमाणे चिच्छेद - तोडिता झाला ॥१४॥

अरिणा - शत्रूने बहुधा - अनेकप्रकारे स्वशूले वृक्णे - आपला त्रिशूळ तोडिला असता सः असुरः - तो दैत्य प्रवृद्धरोषः - वाढलेला आहे क्रोध ज्याचा असा नदन् - गर्जना करीत प्रत्येत्य - समोर जाऊन हरेः - विष्णूचे विस्तीर्णम् - विशाल विभूतिमत् - व लक्ष्मीच्या चिन्हाने युक्त असे उरः - जे वक्षःस्थल त्यावर कठोरमुष्टिना - दृढ मुष्टीने प्रहृत्य - प्रहार करून अन्तरधीयत् - गुप्त झाला ॥१५॥

क्षत्तः - हे विदुरा तेन - त्या दैत्याने इत्थम् - याप्रमाणे आहतः - प्रहार केलेला असा भगवान् - भगवान् आदिसूकरः - आदिवराह स्त्रजा - मालेने हतः - ताडिलेल्या व्दिपः इव - हत्तीप्रमाणे मनाक् - किंचित क्व अपि - कोठेही न अकम्पत - हलला नाही ॥१६॥

अथ - नंतर सः - तो हिरण्याक्ष योगमायेश्वरे - योगमायेचा नियन्ता अशा हरौ - विष्णूच्या ठिकाणी उरुधा - अनेक प्रकारे मायाम् - मायेला असृजत् - उत्पन्न करिता झाला याम् - जिला विलोक्य - पाहून प्रजाः - लोक त्रस्ताः - त्रस्त झाले अस्य - व ह्या जगाच्या उपसंयमम् - प्रलयाला मेनिरे - मानू लागले ॥१७॥

चण्डाः - भयंकर असे वायवः - वायू प्रववुः - वाहू लागले च - आणि पांसवम् - धूळीने युक्त अशा तमः - अंधकाराला ऐरयन् - उत्पन्न करिते झाले क्षेपणः - गोफणींनी प्रहिताः - फेकलेले इव - जसे तथा - तसे ग्रावाणः - दगड दिग्‌भ्यः - दिशातून निपेतुः - पडू लागले ॥१८॥

च - आणि द्यौः - आकाश सविद्युत्स्तनयित्नुभिः - विदुल्लता व गर्जना यांनी युक्त अशा पूयेकशासृग्विण्मूत्रास्थीनि - पू, केस, रक्त, विष्ठा, मूत्र व हाडे यांचा असकृत् - वारंवार वर्षद्भिः - वर्षाव करणार्‍या अभ्रोघैः - मेघांच्या समूहांनी नष्टभगणा - दिसत नाहीत नक्षत्रसमुदाय ज्यातील असे बभूव - झाले ॥१९॥

अनघ - हे निष्पाप विदुरा गिरयः - पर्वत नानायुधमुचः - अनेक प्रकारच्या शस्त्रांना सोडणारे असे च - आणि दिग्वाससः - दिशा आहेत वस्त्रे ज्यांची अशा मुक्तमूर्धजः - सोडिलेले आहेत केस ज्यांनी अशा शूलिन्यः - त्रिशूळ असलेल्या यातुधान्यः - राक्षसिणी प्रत्यदृश्यन्त - दिसू लागल्या ॥२०॥

आततायिभिः - वध करण्यास उद्युक्त झालेल्या बहुभिः - अनेक यक्षरक्षोभिः - यक्ष व राक्षस यांनी पत्यश्वरथकुञ्जरैः - पायदळ, घोडेस्वार, हत्ती व रथ यांनी अतिवैशसाः - अत्यंत घातुक अशा हिंस्त्राः - भयंकर वाचः - वाणी उत्सृष्टाः - उच्चारिल्या ॥२१॥

त्रिपात् - तीन आहेत पाय ज्याला असा भगवान् - विष्णू प्रादुष्कृतानाम् - प्रगट केलेल्या अशा आसरीणाम्ः - असुरसंबंधी मायानाम् - मायांना विनाशयत् - नाश करणारे असे दयितम् - प्रिय सुदर्शनास्त्रम् - सुदर्शनास्त्राची प्रायुङ्क्त - योजना करिता झाली ॥२२॥

तद - त्यावेळी भर्तुः - पतीच्या आदेशम् - वचनाचे स्मरन्त्याः - स्मरण करणार्‍या अशा दितेः - दितीच्या हृदि - हृदयात सहसा - एकाएकी वेपथुः - कंप समभवत् - उत्पन्न झाला च - आणि स्तनात् - स्तनांतून असृक् - रक्त प्रसुस्त्रुवे - वाहु लागले ॥२३॥

च - आणि सः - तो हिरण्याक्ष स्वमायासु विनष्टासु - आपल्या माया नष्ट झाल्या असता भूयः - पुनः केशवम् - विष्णूजवळ आव्रज्य - येऊन अमुम् - ह्याला रुषा - क्रोधाने उपगूहमानः - आपल्या बाहूंमध्ये घट्ट आवळणारा असा बहिः - बाहेर अवस्थितम् - असलेल्या विष्णुं - विष्णूला ददृशे - पाहता झाला ॥२४॥

अधोक्षजः - विष्णु वज्रसारैः - वज्रसारख्या कठोर अशा मुष्टिभिः - मुष्टींनी विनिघ्रन्तम् - प्रहार करणार्‍या अशा तम् - त्याला यथा - ज्याप्रमाणे मरुत्पतिः - इंद्र त्वाष्ट्रम् - वृत्रासुराला तथा - त्याप्रमाणे करेण - हाताने कर्णमूले - कानाच्या मुळाशी अहन् - मारता झाला ॥२५॥

हि - खरोखर विश्वजिता - विश्वाला जिंकणार्‍या अशा विष्णूने अवज्ञया - अनादर करून आहतः - प्रहार केलेला सः - तो हिरण्याक्ष यथा - ज्याप्रमाणे नभस्वता - वायूने लुलितः - मोडलेला नगेन्द्रः - प्रचंड वृक्ष तथा - त्याप्रमाणे परिभ्रमद्‌गात्रः - सभोवर फिरत आहे शरीर ज्याचे असा उदस्तलोचनः - व बाहेर निघाले आहेत डोळे ज्याचे असा विशीर्णबाह्‌वङ्घ्रिशिरोरुहः - आणि तुटलेले आहेत हात, पाय व केस ज्याचे असा अपतत् - पडला ॥२६॥

आगताः - आलेले अजादयः - ब्रह्मदेवादिक अकुण्ठवर्चसम् - अकुण्ठित आहे पराक्रम ज्याचा अशा करालदंष्ट्रम् - भयंकर आहेत दाढा ज्याच्या अशा परिदष्टदच्छदम् - चावले आहेत ओठ ज्याने अशा क्षितौ - पृथ्वीवर शयानम् - शयन करणार्‍या अशा तम् - त्या हिरण्याक्षाला वीक्ष्य - पाहून शशंसुः - प्रशंसा करू लागले अहो - कितीहो आश्चर्य इमाम् - ह्या संस्थितिम् - मरणाला कः नु - कोण बरे लभेत - मिळवील ॥२७॥

योगिनः - योगी पुरुष असतः - मिथ्यारूपी लिङ्गात् - लिङ्गशरीरापासून मुमुक्षया - सुटण्याच्या इच्छेने योगसमाधिना - समाधियोगाने रहः - एकांतात यम् - ज्या विष्णूचे ध्यायन्ति - ध्यान करितात तस्य - त्या विष्णूच्या मुखम् - मुखाला प्रपश्यन् - पाहणारा पदा - पायाने हतः - प्रहार केलेला एषः - हा दैत्यापसदः - दुष्ट दैत्य तनुम् - शरीराचा उत्ससर्ज ह - त्याग करिता झाला ॥२८॥

तौ - ते एतो - हे अस्य - विष्णूचे पार्षदौ - व्दारपाल शापात् - शापामुळे असद्‌गतिम् - दुष्ट योनीत यातो - गेलेले असे कतिपंयैः - कित्येक जन्मभिः - जन्मांनी पुनः - पुन्हा स्थानम् - स्थानाला प्रपत्स्येते ह - खरोखर प्राप्त होतील ॥२९॥

इश - हे विष्णो अखिलयज्ञतन्तवे - सर्व यज्ञांचा विस्ताररूप अशा स्थितौ - सृष्टीच्या रक्षणाविषयी गृहीतामलसत्त्वमूर्तये - धारण केले आहे शुद्ध सत्त्वगुणांचे स्वरूप ज्याने अशा ते - तुला नमः नमः - वारंवार नमस्कार अस्तु - असो जगताम् - त्रैलोक्याचा अयम् - हा अरुन्तुदः - मर्मभेदी दिष्ट्या - सुदैवाने हतः - ठार केला अस्ति - आहे वयम् - आम्ही त्वत्पादभक्त्या - तुझ्या चरणाच्या भक्तीने निवृताः - सुखी स्मः - आहो ॥३०॥

सः - तो आदिसूकरः - आदिवराह हरिः - विष्णु असह्यविक्रमम् - असह्य आहे पराक्रम ज्याचा अशा हिरण्याक्षम् - हिरण्याक्षाला एवम् - याप्रमाणे सादयित्वा - मारून पुष्करविष्टरादिभिः - कमल आहे आसन ज्याचे अशा ब्रह्मदेवादि सर्व देवांनी समीडितः - स्तुति केलेला स्वम् - आपल्या अखण्डितोत्सवम् - निरंतर आहे उत्सव ज्यामध्ये अशा लोकम् - लोकाला जगाम - गेला ॥३१॥

सुमित्र - हे विदुरा उदारविक्रमः - मोठा आहे पराक्रम ज्याचा असा हिरण्याक्षः - हिरण्याक्ष महामृधे - घोर संग्रामात क्रीडनकवत् - खेळण्याच्या वस्तूप्रमाणे यथा - जसा निराकृतः - मारला तत् - ते कृतावतारस्य - घेतलेला आहे अवतार ज्याने अशा हरेः - श्रीविष्णूचे चेष्टितम् - चरित्र मया - मी यथानूक्तम् - गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते - तुला अवादि - सांगितले ॥३२॥

व्दिज - हे शौनक ऋषे महाभागवतः - मोठा भगवद्‌भक्त असा क्षत्ता - विदुर इति - याप्रमाणे कौषारवाख्याताम् - मैत्रेय ऋषींनी सांगितलेल्या अशा भगवत्कथाम् - श्रीविष्णूच्या कथेला आश्रुत्य - श्रवण करून परम् - अत्यंत आनन्दम् - आनंदाला लेभे - प्राप्त झाला ॥३३॥

पुण्यश्लोकानाम् - पवित्र आहे कीर्ति ज्यांची अशा उद्दामयशसाम् - मोठे आहे यश ज्यांचे अशा अन्येषाम् - दुसर्‍या सताम् - साधूंच्या कथाम् - कथेला उपश्रुत्य - ऐकून मोदः - आनंद भवति - होतो श्रीवत्साङ्कस्य - श्रीवत्स आहे लांछन ज्याचे अशा विष्णूच्या कथाम् उपश्रुत्य - कथेला ऐकून भवेत् - होईल इति - असे किम् - काय पुनः - पुन्हा वक्तव्यम् - सांगितले पाहिजे ॥३४॥

यः - जो भगवान् झषग्रस्तम् - मगराने पकडलेल्या अशा चरणाम्बुजम् - परमेश्वराच्या चरणकमलाला ध्यायन्तम् - चिंतणार्‍या गजेन्द्र - गजेन्द्राला करेणूनाम् क्रोशन्तीनाम् - हत्तिणी ओरडू लागल्या असता द्रुतम् - त्वरित कृच्छ्रतः - संकटापासून अमोचयत् - सोडविता झाला ॥३५॥

कृतज्ञः - कृतज्ञ असा कः - कोण पुरुष अनन्यशरणैः - ईश्वरावाचून दुसरा रक्षणकर्ता ज्यांना नाही अशा ऋजुभिः - सरल अशा नृभिः - मनुष्यांनी सुखाराध्यम् - सुखाने आराधना करण्यास योग्य अशा असाधुभिः - दुष्टांनी दुराराध्यम् - आराधना करण्यास अशक्य अशा तम् - त्या विष्णूला न सेवेत - सेवणार नाही ॥३६॥

व्दिजाः - ऋषि हो यः - जो कारणसूकरात्मनः - पृथ्वीच्या उद्धाराकरिता वराहरूप धारण केलेल्या श्रीविष्णूच्या विक्रीडितम् - लीलारूप महाद्‌भूतम् - मोठ्या आश्चर्यकारक अशा हिरण्याक्षवधम् - हिरण्याक्षाच्या वधाला श्रृणोति - श्रवण करितो गायति - गायन करतो अनुमोदते - अनुमोदन देतो सः - तो वै - खरोखर ब्रह्मवधात् अपि - ब्रह्महत्येपासून देखील अञ्जसा - सहज विमुच्यते - मुक्त होतो ॥३७॥

अङ्ग - शौनक मुने महापुण्यम् - मोठे आहे स्वर्गादिक पुण्यफल ज्याचे असे अलम् - अतिशय पवित्रम् - पवित्र असे धन्यम् - धन देणारे असे यशस्यम् - कीर्ति मिळवून देणारे असे आयुराशिषाम् - आयुष्य व इष्टवस्तु यांचे च - आणि प्राणेन्द्रियाणाम् - प्राण व इंद्रिये याचे पदम् - आश्रयस्थान असे युधि - युद्धात शौर्यवर्धनम् - शौर्याला वाढविणारे असे एतत् - ह्या चरित्राला शृण्वताम् - ऐकणार्‍यांना अन्ते - शेवटी नारायणः गतिः - नारायणाची प्राप्ती भवति - होते ॥३८॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP