|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १८ वा - अन्वयार्थ
हिरण्याक्षाबरोबर वराह-भगवानांचे युद्ध - अङ्ग - हे विदुरा एवम् - याप्रमाणे तत् - ते जलेशभाषितम् - वरुणाचे भाषण आकर्ण्य - श्रवण करून महामनाः - मोठे आहे मन ज्याचे असा दुर्मदः - मदोन्मत्त असा सः - तो हिरण्याक्ष तत् - ते वरुणाचे भाषण विगणय्य - तुच्छ समजून नारदात् - नारदापासून हरेः - विष्णूचे गतिम् - वृत्त विदित्वा - जाणून त्वरान्वितः - त्वरेने युक्त असा रसातलम् - रसातळात निर्विविशे - शिरला ॥१॥ तत्र - त्या रसातळात अभिजितम् - चोहोकडून वीरांना जिंकणार्या धराधरम् - पृथ्वीला धारण करणार्या अग्रदंष्ट्रया - दाढेच्या टोकाने प्रोन्नीयमानावनिम् - वर नेली जात आहे पृथ्वी ज्याकडून अशा अरुणाश्रिया - आरक्त आहे कांती ज्याची अशा अक्ष्णा - नेत्राने स्वरुचः - आपल्या कांतीला मुष्णन्तम् - फिक्की पाडणार्या अशा जहास - हसून म्हणाला अहो - कितीहो आश्चर्य आहे वनगोचरः - रानात किंवा पाण्यात संचार करणारा मृगः - पशु किंवा योगी ज्याचा शोध करतात असा ईश्वर ॥२॥ सः - तो हिरण्याक्ष एनम् - ह्या आदिवराहाला आह - म्हणाला अज्ञ - मूर्खा एहि - इकडे ये महीम् - पृथ्वीला मुञ्च - सोड इयम् - ही पृथ्वी विश्वसृजा - ब्रह्मदेवाने रसौकसाम् - रसातळ आहे स्थान ज्यांचे अशा नः - आम्हाला अर्पिता - दिली आहे आसादितसूकराकृते - धारण केले आहे वरहाचे स्वरूप ज्याने अशा सुराधम - अधम देवा मम ईक्षतः - मी पाहत असता अनया - ह्या पृथ्वीने स्वस्ति - कल्याणप्रत न यास्यसि - प्राप्त होणार नाहीस ॥३॥ त्वम् - तू सपत्नैः - शत्रूंकडून नः - आमच्या अभवाय - नाशाकरिता भृतः - पोसलेला अस्ति - आहे किम् - काय यः - जो मायया - मायेने परोक्षजित् - अप्रत्यक्षपणे जिंकणारा असुरान् - दैत्यांचा हन्ति- वध करतो मूढ - मूर्खा योगमायाबलम्- योगमाया आहे बल ज्याला अशा अल्पपौरुषम् - स्वल्प आहे पौरुष ज्यांचे अशा त्वाम् - तुला संस्थाप्य - मारून सुहृच्छुचः - बंधूचा शोक प्रमृजे - मी नाहिसा करितो ॥४॥ अस्मद्भुजच्युतया - आमच्या हातातून सुटलेल्या गदया - गदेने शीर्णशीर्षणि - फुटलेले आहे मस्तक ज्याचे असा त्वयि संस्थिते - तू मृत झाला असता ये - जे तुभ्यम् - तुला बलिम् - पूजा हरन्ति - अर्पण करितात च - आणि ये - जे ऋषयः - ऋषि च - आणि देवाः - देव सन्ति - आहेत ते - ते सर्वे - सर्व अमूलाः - निराधार असे स्वयम् - स्वतः न भविष्यन्ति - नष्ट होतील ॥५॥ अरिदुरुक्तैः - शत्रूंच्या कठोर भाषणरूपी भाल्यांनी तुद्यमानः - पीडा केला जाणारा सः - तो आदिवराह दंष्ट्राग्रगाम् - दाढेच्या टोकावर असलेल्या गाम् - पृथ्वीला भीताम् - भ्यालेली अशी उपलक्ष्य - पाहून तोदम् - व्यथेला मृषन् - सहन करणारा यथा - ज्याप्रमाणे ग्राहाहतः - मगराने पीडिलेला सकरेणुः - हत्तिणीसह इभः - हत्ती तथा - त्याप्रमाणे अम्बुमध्यात् - पाण्यामधून निरगात् - वर निघाला ॥६॥ यथा - ज्याप्रमाणे झषः - मगर व्दिरदम् - हत्तीच्या तथा - त्याप्रमाणे सलिलात् - पाण्यातून निःसरन्तम् - वर निघणार्या तम् - त्या आदिवराहाच्या अनुद्रुतः - मागे लागलेला हिरण्यकेशः - सुवर्णाप्रमाणे आहेत केस ज्यांचे असा करालदंष्ट्रः - भयंकर आहेत दाढा ज्याच्या असा अशनिनिःस्वनः - मेघगर्जनेप्रमाणे आहे शब्द ज्याचा असा सः - तो हिरण्याक्ष अब्रवीत् - बोलला गतह्रियाम् - गेली आहे लज्जा ज्यांची अशा असताम् - दुष्टांना विगर्हितम् - निंदा किम् - काय अस्ति - आहे ॥७॥ सः - तो आदिवराह उदस्तात् - पाण्यावर गोचरे - व्यवहारयोग्य स्थळी गाम् विन्यस्य - पृथ्वीला ठेवून तस्याम् - त्या पृथ्वीच्या ठिकाणी स्वसत्त्वम् - आपल्या आधारशक्तीला अदधात् - स्थापिता झाला अरेः पश्यतः - शत्रु हिरण्याक्ष पहात असता विबुधैः - देवांनी प्रसूनैः - पुष्पांनी आपूर्यमाणः - भरून टाकलेला असा विश्वसृजा - ब्रह्मदेवाने अभिष्टुतः - स्तुति केलेला असा तं बभाषे - त्या हिरण्याक्षाला बोलला ॥८॥ सः - तो आदिवराह परानुषक्तम् - पाठीस लागलेल्या तपनीयोपकल्पम् - सुवर्णाचे आहेत अलंकार ज्याचे अशा महागदम् - मोठी आहे गदा ज्याची अशा काञ्चनचित्रदंशम् - सुवर्णाचे चित्रविचित्र आहे चिलखत ज्याचे अशा दुरुक्तैः - कठोर भाषणांनी मर्माणि - मर्मांना अभीक्ष्णम् - वारंवार प्रतुदन्तम् - टोचणार्या तम् - त्या हिरण्याक्षाला प्रचण्डमन्युः - प्रचण्ड आहे क्रोध ज्याचा असा प्रहसन् - उपहास करीत बभाषे - बोलला ॥९॥ भोः - अरे हिरण्याक्षा ! सत्यम् - खरोखर वयम् - आम्ही वनगोचराः - अरण्यात फिरणारे मृगाः - पशु स्मः - आहो तु अहम् - परंतु मी युष्मव्दिधान् - तुमच्यासारखा ग्रामसिंहान् - कुत्र्यांना मृगेय - शोधतो अभद्र - हे दुर्दैवी दैत्या मृत्युपाशैः - यमाच्या पाशांनी प्रतिमुक्तस्य - बांधलेल्या तुझी विकत्थनम् - वल्गना वीराः - वीर पुरुष न गृह्णन्ति - ग्रहण करीत नाहीत ॥१०॥ एते - हे वयम् - आम्ही रसौकसाम् - रसातळ आहे स्थान ज्यांचे अशा लोकांची न्यासहराः - ठेव हरण करणारे गतह्रियः - गेली आहे लज्जा ज्यांची असे ते - तुझ्या गदया - गदेने द्राविताः - पळवून लाविलेले असे स्मः - आहो अथ अपि - असे असताहि कथञ्चित् - कसेतरी आजौ - युद्धात तिष्ठामहे - उभे रहातो यतः अस्माभिः - कारण आम्हाला स्थेयम् - उभे राहिलेच पाहिजे बलिना - बलवानाशी वैरम् - वैर उत्पाद्य - उत्पन्न करून क्व - कोठे यामः - जावे ॥११॥ त्वम् - तू पद्रथानाम् यूथपाधिपः - पायदळांच्या समुदायातील जे श्रेष्ठ त्यांच्यामध्येहि श्रेष्ठ असा अनूहः - संशयरहित असा किल - खरोखर असि - आहेस नः - आमच्या अस्वस्तये - पराभवाकरिता आशु - लवकर घटस्व - सिद्ध हो च - आणि अस्मान् - आमचा संस्थाप्य - नाश करून स्वकानाम् - आपल्या बान्धवांचे अश्रु - अश्रु प्रमृजः - पुसून टाक सः - जो स्वाम् - आपली प्रतिज्ञाम् - प्रतिज्ञा न अतिपिपर्ति - पूर्ण करीत नाही स - तो असभ्यः - सभेमध्ये अयोग्य अस्ति - आहे ॥१२॥ क्रीड्यमानः - खेळविल्या जाणार्या अहिराट् इव - प्रचण्ड सर्पाप्रमाणे भगवता - भगवान आदिवराहाने अधिक्षिप्तः - तिरस्कृत केलेला च - आणि रुषा - क्रोधाने भृशम् - अत्यन्त प्रलब्धः - उपहास केलेला असा सः - तो हिरण्याक्ष उल्बणम् - दुःसह अशा क्रोधम् - क्रोधाला आजहार - धारण करिता झाला ॥१३॥ अमर्षितः - रागावलेला असा श्वासान् - श्वासांना सृजन् - सोडणारा मत्युप्रचलितन्द्रियः - क्रोधाने खवळली आहेत इंद्रिये ज्याची असा दैत्यः - दैत्य हिरण्याक्ष तरसा - वेगाने आसाद्य - जवळ येऊन गदया - गदेने हरिम् - आदिवराहरूपी श्रीहरीला अभ्यहनत् - प्रहार करिता झाला ॥१४॥ भगवान् - भगवान् तिरश्चीनः - बाजूला वळलेला असा रिपुणा - शत्रूने उरसि - वक्षःस्थलावर विसृष्टम् - सोडलेल्या गदावेगम् - गदेच्या वेगाला योगारुढः - योगी अन्तकम् इव - मृत्यूला जसा तसा अवञ्चयत् - चुकविता झाला ॥१५॥ पुनः - पुनः स्वाम् - आपली गदाम् - गदा आदाय - घेऊन अभीक्ष्णशः - वारंवार भ्रामयन्तम् - फिरविणार्या संरम्भात् - क्रोधाने दष्टदच्छदम् - चावले आहेत ओठ ज्याने अशा तम् - त्या देवावर क्रुद्धाः - रागावलेला हरिः - आदिवराह अभ्यधावत् - धावला ॥१६॥ च - आणि ततः - नंतर प्रभु - भगवान् अरातिम् - शत्रूवर क्षिणस्याम् - उजव्या भ्रुवि - भुवईच्या ठिकाणी गदया - गदेने आजघ्रे - प्रहार करिता झाला तु - परंतु सौम्य - हे विदुरा कोविदः - कुशल असा सः - तो हिरण्याक्ष ताम् - त्या गदेवर गदया - गदेने अहनत - प्रहार करिता झाला ॥१७॥ एवम् - याप्रमाणे हर्यक्षः - श्रेष्ठ हिरण्याक्ष च - आणि हरिः - आदिवराहरूपी विष्णु सुसंरब्धौ - अतिशय रागावलेले असे गुर्वीभ्याम् - प्रचण्ड अशा गदाभ्याम् - दोन गदांनी जिगीषया - जिंकण्याच्या इच्छेने अन्योन्यम् - परस्परांना अभिजघ्रतुः - प्रहार करिते झाले ॥१८॥ शुष्मिणोः - उन्मत्त अशा दोन बैलांचे इलायाम् - गाईविषयी इव - जसे तथा इलायाम् - तसे पृथ्वीविषयी जिगीषया - जिंकण्याच्या इच्छेने स्पृधोः - स्पर्धा करणार्या तिग्मगदाहताङ्गयोः - तीक्ष्ण अशा दोन गदांनी ठेचलेले आहेत अवयव ज्यांचे अशा क्षत्तास्त्रवघ्राणविवृद्धमन्य्वोः - क्षतांपासून न गळणार्या रक्ताच्या वासाने वाढलेला आहे क्रोध ज्याचा अशा विचित्रमार्गान् - अनेक प्रकारचे गदांचे हात चरतोः - करणार्या अशा तयोः - यज्ञवराह व हिरण्याक्ष यांचे मृधः - युद्ध व्यभात् - भासले ॥१९॥ कौरव्य - हे मैत्रेया यज्ञावयवस्य - यज्ञ आहेत अवयव ज्याचे अशा मायागृहीतवाराहतनोः - मायेच्या योगाने धारण केले आहे वराहाचे शरीर ज्याने अशा महात्मनः - परमेश्वराचे च - आणि दैत्यस्य - हिरण्याक्षाचे मह्याम् - पृथ्वीकरिता व्दिषतोः - व्देष करणार्यांचे विमर्दनम् - युद्ध दिदृक्षुः - पहाण्याची इच्छा करणारा असा ऋषिभिः - ऋषींनी वृत्तः - वेष्टिलेला असा स्वराट् - ब्रह्मदेव आगात् - प्राप्त झाला ॥२०॥ सहस्त्रणीः - हजारो ऋषींचा नायक असा भगवान् - भगवान् ब्रह्मदेव आसन्नशौण्डीरम् - प्राप्त केले आहे शौर्य ज्याने अशा अपेतसाध्वसम् - गेले आहे भय ज्याचे अशा कृतप्रतीकारम् - केला आहे प्रतिकार ज्याने अशा अहार्यविक्रमम् - प्रतिकार करण्यास अशक्य आहे पराक्रम ज्याचा अशा दैत्यम् - हिरण्याक्षाला विलक्ष्य - पाहून अदिसूकरम् - आदिवराहरूपी नारायणम् - नारायणाला जगाद - बोलला ॥२१॥ देव - हे देवा ते - तुझ्या अङ्घ्रिमूलम् - पायाजवळ उपेयुषाम् - प्राप्त झालेल्या अशा देवानाम् - देवांचा विप्राणाम् - ब्राह्मणांचा सौरभेणीयाम् - गाईचा च - आणि अनागसाम् - निरपराधी अशा भूतानाम् अपि - प्राण्यांचा देखील आगस्कृत - अपराध करणारा भयकृत् - भय उत्पन्न करणारा दुष्कृत् - व अपकार करणारा असा एषः - हा असुरः - दैत्य अस्मद्राद्धवरः - आमच्याकडून मिळ्विला आहे वर ज्यने असा अप्रतिरथः - ज्याला प्रतिपक्ष नाही असा प्रतिपक्षम् - शत्रूला अन्वेषयन् - शोधीत कण्टकः - कंटकतुल्य असा लोकान् - त्रिभुवनात् अटति - फिरत आहे ॥२२-२३॥ देव - हे देवा मायाविनम् - कपटी दृप्तम् - गर्विष्ठ निरङ्कुशम् - प्रतिबन्धरहित असत्तमम् - व अत्यन्त दुष्ट अशा एनम् - या हिरण्याक्षाला यथा - ज्याप्रमाणे उत्थितम् - संतापलेल्या अशा आशीविषम् - सर्पाचा बालकवत् - बालक खेळ करतो त्याप्रमाणे मा आक्रीड - खेळवू नको ॥२४॥ अच्युत - हे ईश्वरा यावत् - जोपर्यंत दारुणः - भयंकर असा एषः - हा हिरण्याक्ष स्वाम् - आपल्या वेलाम् - वेळेला प्राप्य - प्राप्त होऊन न वर्धेत - वाढणार नाही तावत् - तोपर्यंत स्वाम् - आपल्या देवमायाम् - देवमायेचा आस्थाय - आश्रय करून अधम् - पापी अशा एनम् - ह्या हिरण्याक्षाला जहि - ठार कर ॥२५॥ प्रभो - हे समर्था सर्वात्मन् - सर्वत्र वास करणार्या अशा परमेश्वरा एषा - ही घोरतमा - अतिशय भयंकर अशी लोकच्छम्बट्करी - लोकांचा नाश करणारी संध्या - संध्याकाळची वेळ उपसर्पति - जवळ आली आहे सुराणाम् - देवांचा जयम् - जय आवह - कर ॥२६॥ हि - कारण अधुना - यावेळी एषः - हा अभिजित नाम - अभिजित नावाचा मौहूर्तिकः - दोन घटकांचा योगः - शुभ योग अगात् - आला आहे त्वम् - तू सुहृदाम् - आप्त अशा नः - आमच्या शिवाय - कल्याणाकरिता दुरतरम् - मारण्यास कठीण एनम् - या हिरण्याक्षाचा आशु - लवकर निस्तर - नाश कर ॥२७॥ आनम् - हा हिरण्याक्ष स्वयम् - स्वतः विहितम् - निर्माण केलेल्या अशा मृत्युम् - मृत्युरूप अशा त्वाम् - तुजप्रत दिष्ट्या - दैवाने आसादितः - प्राप्त झाला आहे एनम् - ह्या हिरण्याक्षाला मृधे - युद्धात विक्रम्य - पराक्रम करून हत्वा - मारून लोकान् - लोकांना शर्मणि - कल्पणाच्या ठिकाणी आधेहि - स्थापित कर ॥२८॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय अठरावा समाप्त |