श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १७ वा - अन्वयार्थ

हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय -

सर्वे - सर्व - दिवौकसः - देव - आत्मभुवा - ब्रह्मदेवाने - गीतम् - गायिलेले - कारणम् - कारण - निशम्य - श्रवण करून - शंकया - शंकेने - ततः - तेथून - त्रिदिवाय - स्वर्गाला - न्यवर्तन्त - परत गेले ॥१॥

भर्तुः - पतीच्या - आदेशात् - आज्ञेवरून - अपत्यपरिशंकिनी - पुत्रांपासून देवांना होणार्‍या पीडेची शंका बाळगिणारी - साध्वी - पतिव्रता - दितिः - दिति - तु - तर - वर्षशते पूर्णे - शंभर वर्षे पूर्ण झाली असता - यमौ - जुळ्या - पुत्रौ - पुत्रांना - प्रसुषुवे - प्रसवती झाली ॥२॥

तत्र - त्यावेळी - जायमानयोः - ते पुत्र उत्पन्न होत असता - दिवि - स्वर्गात - भुवि - पृथ्वीवर - च - आणि - अन्तरिक्षे - आकाशात - लोकस्य - लोकांना - उरुभयावहाः - मोठे भय उत्पन्न करणारे - बहवः - पुष्कळ - उत्पाताः - उत्पात - निपेतुः - उद्‌भवले ॥३॥

सहाचलाः - पर्वतासहित - भुवः - पृथ्वीवरील प्रदेश - चेलुः - हालू लागले - सर्वाः - सर्व - दिशः - दिशा - प्रजज्वलुः - पेटू लागल्या - सोल्काः - तुटणार्‍या तारांसहित - अशनयः - विजा - पेतुः - पडल्या - च - आणि - आर्तिहेतवः - अरिष्टसूचक - केतवः - धुमकेतु - उदीयुः - उगवले ॥४॥

सुदुःस्पर्शः - अंगास झोंबणारा - फूत्कारान्ः - फूत्कार - ईरयन् - सोडणारा - वात्यनीकः - वावटळी आहेत सैन्ये ज्याची असा - रजोध्वजः - धूळ आहे निशाणे ज्याची असा - नगपतीन् - प्रचंड वृक्षांना - उन्मूलयन् - उपटणारा - वायुः - वारा - ववौ - वाहू लागला ॥५॥

उद्धसत्तदिडम्भोदघटया - मोठ्याने हसणार्‍याच अशा वीजांनी युक्त अशा मेघांच्या समूहाने - नष्टभागणे - दिसत नाहीसा झाला आहे नक्षत्रसमूह ज्यातील अशा - व्योम्नि - आकाशात - प्रविष्टतमसा - प्रवेश केलेल्या अंधकाराने - पदम् - पाऊलभर जागा - न व्यादृश्यते स्म - दिसत नव्हती ॥६॥

वार्घि - समुद्र - विमनाः इव - दुखणेकर्‍यासारखा - उदूर्मिः - उंच उंच उसळत आहेत लाटा ज्याच्या असा - क्षुभितोदरः - खवळलेले आहेत उदारातील मगरादिक प्राणी ज्याच्या असा - चुक्रोश - गर्जना करू लागला - च - आणि - सोदपानाः - तलाव, विहिरी इत्यादिकांसहित - सरितः - नद्या - शुष्कपंकजाः - शुष्क झाली आहेत कमळे ज्यातील अशा - चुक्षुभुः - गढूळ झाल्या ॥७॥

सराह्‌वोः - राहूसहित - शशिसूर्ययोः - चंद्रसूर्यांना - परिधयः - खळी - मुहुः - वारंवार - अभूवन् - उत्पन्न होऊ लागली - निर्घाताः - निरभ्र आकाशात गर्जना - अभूवन् - होऊ लागल्या - च - आणि - विवरेभ्यः - पर्वतांच्या गुहांतून - रथनिह्रादाः - रथांचे खडखडाट - प्रजज्ञिरे - उत्पन्न होऊ लागले ॥८॥

अन्तर्ग्रामेषु - गावात - मुखतः - तोंडातून - उल्बणम् - भयंकर - अग्निम् - अग्नीला - वमन्त्यः - ओकणार्‍या - शिवाः - भालू - सृगालोलूकटंकारैः - कोल्हे व घुबडे यांच्या शब्दांसहित - अशिवम् - अरिष्टसूचक - प्रणेदुः - ओरडू लागल्या ॥९॥

ग्रामसिंहाः - कुत्रे - शिरोधराम् उन्नमय्यः - माना उंच करून - ततस्ततः - जिकडेतिकडे - संगीतवत् - गायन केल्यासारखे - रोदनवत् - रडल्यासारखे - विबिधाः - अनेक प्रकारच्या - वाचः - वाणींना - व्यमुञ्चन् - सोडू लागले ॥१०॥

क्षत्तः - हे विदुरा - मत्ताः - उन्मत्त असे - खराः - गर्दभ - खार्काररभसा - आपल्या जातीप्रमाणे शब्द करण्याची आहे त्वरा ज्यांना असे - कर्कशैः - कठोर अशा - खुरैः - खुरांनी - धरातलम् - पृथ्वीतलाला - घ्रन्तः - आघात करणारे असे - वरूथशः - कळपांनी - पर्यधावन् - धावू लागले ॥११॥

रासभत्रस्ताः - गर्दभांनी त्रस्त झालेले - रुदन्तः - रडणारे असे - खगाः - पक्षी - नीडात् - घरट्यातून - उदपतन् - बाहेर पडू लागले - घोषे - गौळवाड्यात - च - आणि - अरण्ये - अरण्यात - पशवः - पशु - शक्रन्मूत्रम् - विष्ठा व मूत्र - अकुर्वत् - करू लागले ॥१२॥

गावः - गाई - अत्रसन् - घाबरून गेल्या - असृग्दोहाः - रक्ताची धार देणार्‍या अशा - बभूवुः - झाल्या - च - आणि - तोयदाः - मेघ - पूयवर्षिणः - पुवाचा वर्षाव करणारे असे - बभूवुः - झाले - देवलिङ्गानि - देवांच्या मूर्ती - व्यरुदन् - रडू लागल्या - द्रुमाः - वृक्ष - अनिलम् विना - वारा नसताहि - पेतुः - उपटून पडले ॥१३॥

दीपिताः - विशेष उत्तेजित झालेले - अन्ये - दुसरे पापग्रह - पुण्यतमान् - अत्यंत मङ्गलकारक अशा - ग्रहान् - ग्रहांना - च - आणि - भगणान् अपि - नक्षत्र समूहांनाही - अतिचेरुः - उल्लंघू लागले - च - आणि - वक्रगत्या - उलट गतीने - परस्परम् - एकमेकांशी - युयुधुः - युद्ध करू लागले ॥१४॥

ब्रह्मपुत्रान् ऋते - सनत्कुमाराशिवाय - अततत्त्वविदः - उत्पातांचे कारण न जाणणारे - प्रजाः - लोक - च - आणि - अन्यान् - दुसर्‍या - महोत्पातान् - मोठमोठ्या उत्पातांना - दृष्ट्वा - पाहून - भीताः - भ्यालेले असे - विश्वसंप्लवम् - विश्वाच्या प्रलयाला - मेनिरे - मानते झाले ॥१५॥

व्यजमानात्मपौरुषैः - व्यक्त होत आहे पूर्वसिद्ध पराक्रम ज्यांचा असे - तौ - ते - आदिदैत्यौ - आदिदैत्य - अश्मसारेण - दगडासारख्या बळकट - कायेन - शरीराने - अद्रिपति इव - प्रचंड पर्वतासारखे - ववृधाते - वाढते झाले ॥१६॥

हेमकिरीटकोटिभिः - सुवर्णमय किरीटांच्या अग्रांनी - दिविस्पृशौ - आकाशाला स्पर्श करणारे असे - निरुद्धकाष्ठौ - व्यापिलेल्या आहेत दिशा ज्यांनी असे - स्फुरदंगदाभुजौ - तेजस्वी बाहुभूषणे आहेत बाहूंमध्ये ज्यांच्या असे - पदेपदे - पावलोपावली - गाम् - पृथ्वीला - कम्पयन्तौ - कापविणारे - सुकाञ्‌च्या - सुंदर आहे कमरपट्टा जिचे ठिकाणी अशा - कट्या - कमरेने - अर्कम् - सूर्याला - अतीत्य - झाकला जाणे - तस्थतुः - उभे राहिले ॥१७॥

प्रजापतिः - कश्यप ऋषि - तयोः - त्या दोन पुत्रांना - नाम - नाव - अकार्षीत् - ठेविता झाला - यमयोः - जुळ्या त्या दोन पुत्रांपैकी - यः - जो - स्वदेहात् - आपल्या देहापासून - प्राक् - प्रथम - अजायत - उत्पन्न झाला - तम् - त्याला - हिरण्यकशिपुम् - हिरण्यकशिपु या नावाने - च - आणि - सा - ती दीति - यम् - ज्याला - अग्रतः - प्रथम - असूत् - प्रसवली - तम् - त्याला - हिरण्याक्षम् - हिरण्याक्ष या नावाने - प्रजाः - लोक - विदुः - ओळखू लागेल ॥१८॥

हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - ब्रह्मवरेण - ब्रह्मदेवाच्या वराने - अकुतोमृत्युः - ज्याला कोठूनहि मृत्यु नाही असा - उद्धतः - व उन्मत्त झालेला असा - सपालान् - रक्षण करणार्‍या राजासहित - त्रीन् - तीन - लोकान् - लोकांना - दोर्भ्याम् - बाहूंनी - वशे - स्वाधीन - चक्रे - करिता झाला ॥१९॥

तस्य - त्या हिरण्यकशिपूचा - प्रियः - आवडता - अनुजः - धाकटा बंधू - अन्वहम् - प्रतिदिवशी - प्रीतिकृत् - प्रीति करणारा - हिरण्याक्षः - हिरण्याक्ष - युयुत्सुः - युद्धाची इच्छा करणारा - गदापाणिः - गदा आहे हातात ज्याच्या असा - रणम् - युद्धाचा - मृगयन् - शोध करणारा - दिवम् - स्वर्गाला - यातः - गेला ॥२०॥

दुःसहजवम् - दुःसह आहे वेग ज्याचा अशा - रणत्काञ्चननूपुरम् - खुळखुळ वाजत आहे सुवर्णांचे नूपुर ज्याचे अशा - वैजयन्त्यास्त्रजा - वैजयन्ती माळेने - जुष्टम् - युक्त अशा - अंसन्यस्तमहागदम् - खांद्यावर ठेविली आहे मोठी गदा ज्याने अशा - मनोवीर्यवरोत्सिक्तम् - शौर्याने, बलाने व ब्रह्मदेवाच्या वराने गर्विष्ठ झालेल्या अशा - असृण्यम् - प्रतिबंध नसलेल्या अशा - अकुतोभयम् - कोठूनहि नाही भय ज्याला अशा - तम् - त्या हिरण्याक्षाला - वीक्ष्य - पाहून - देवाः - देव - भीताः - भय पावलेले असे - तार्क्ष्यत्रस्ताः - गरुडापासून त्रास पावलेल्या - अहयः इव - सर्पाप्रमाणे - निलिल्यिरे - लपून बसले ॥२१-२२॥

सः - तो - दैत्यराट् - दैत्यराज - सेन्द्रान् देवगणान् - इंद्रासहित देवगणांना - स्वेन महसा - आपल्या पराक्रमामुळे - तिरोहितान् - लपून बसलेले असे - दृष्ट्वा - पाहून - क्षीबान् - मत्त झालेले असे - अपश्यन् - न पाहणारा - भृशम् - मोठ्याने - व्यनदत् - गरजला ॥२३॥

ततः - नंतर - महासत्त्वः - मोठे आहे बल ज्याचे असा - निवृत्तः - परतलेला असा - क्रीडिप्यन् - क्रीडा करण्याची इच्छा करणारा - सः - तो हिरण्याक्ष - मत्तः व्दिपः इव - मदोन्मत्त हत्तीप्रमाणे - भीमनिःस्वनम् - भयंकर आहे गर्जना ज्याची अशा - गम्भीरम् - अपार - वार्धिम् - समुद्रात - विजगाहे - बुडी मारिता झाला ॥२४॥

तस्मिन् प्रविष्टे - तो समुद्रात शिरला असता - वरुणस्य - वरुणाचे - सैनिकाः - सैनिक - यादोगणाः - जलचरांचे समुदाय - सन्नधियः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्यांची असे - ससाध्वसाः - भीतीने युक्त असे - अहन्यमानाः अपिः - मारले नसतानाहि - तस्य - त्या हिरण्याक्षाच्या - वर्चसा - तेजाने - प्रधर्षिता - घाबरलेले असे - दूरतरम् - फार लांब - प्रदुद्रुवुः - पळाले ॥२५॥

तात - हे विदुरा - महाबलः सः - मोठे आहे बल ज्याचे असा तो हिरण्याक्ष - वर्षपूगान् - अनेक वर्षे - उदधौ - समुद्रात - चरन् - संचार करणारा असा - श्वसनेरितान् - वार्‍याने उसळलेल्या - महोर्मीन् - मोठ्या लाटांना - मौर्व्या गदया - पोलादी गदेने - मुहुः - वारंवार - अभिजघ्रे - ताडन करिता झाला - च - आणि - प्रचेतसः विभावरीम् पुरीम् - वरुणाच्या विभावरीनामक राजधानीस - आसेदिवान् - प्राप्त झाला ॥२६॥

तत्र - त्या राजधानीत - असुरलोकपालकम् - दैत्यांचा लोक जो पाताल त्याचा राजा अशा - यादोगणानाम् - जलचरांच्या समूहात - ऋषभम् - श्रेष्ठ अशा - प्रचेतसम् - वरुणाला - उप्‌लभ्य - प्राप्त होऊन - प्रलब्धुम् - उपहास करण्याकरिता - नीचवत् - नीचाप्रमाणे - प्रणिपत्य - नमस्कार करून - स्मयन् - हसत - जगाद - बोलला - अधिराज - हे राजाधिराज - मे - मला - संयुगम् - युद्ध - देहि - दे ॥२७॥

प्रभो - अहो महाराज - त्वम् - तू - लोकपालः - लोकांचे रक्षण करणारा - अधिपतिः - राजा - दुर्मदवीरमानिनाम् - मदोन्मत्त व पराक्रमी असे स्वतःला मानणार्‍यांच्या - वीर्यापहः - पराक्रमाला नाहीसा करणारा - बृहच्छ्रवाः - महाकीर्तिवान् - असि - आहेस - यत् - कारण - भवान् - तू - पुरा - पूर्वी - लोके - जगातील - अखिलदैत्यदानवान् - संपूर्ण दैत्य व दानव यांना - विजित्य - जिंकून - राजसूयेन अयजत् - राजसूय यज्ञ केलास ॥२८॥

उत्सिक्तमदेन - वाढला आहे गर्व ज्याचा अशा - विव्दिषा - शत्रूने - एवम् - याप्रमाणे - दृढम् - अत्यंत - प्रलब्धः - उपहास केलेला - सः - तो - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - अपां पतिः - उदकाचा राजा वरुण - समुत्थम् - उत्पन्न झालेल्या - रोषम् - क्रोधाला - स्वया धिया - आपल्या बुद्धीने - शमयन् - शांत करीत - व्यवोचत् - म्हणाला - अङ्ग - अहो - वयम् - आम्ही - उपशमम् - शांतीला - गताः - प्राप्त झालेले आहोत ॥२९॥

असुरर्षभ - हे असुरश्रेष्ठा - रणमार्गकोविदम् - युद्धकलेत कुशल अशा - त्वाम् - तुला - संयुगे - युद्धात - यः - जो - आराधयिष्यति - संतुष्ट करील - एतादृशम् - अशा प्रकारचा - पुरातनात् पुरुषात् - पुराणपुरुषावाचून - अन्यम् - दुसर्‍याला - न पश्यामि - मी पाहत नाही - तम् - त्या पुराणपुरुषाजवळ - इहि - जा - भवादृशाः - आपल्यासारखे - मनस्विनः - गुणी लोक - यम् - ज्याला - स्तुवते - स्तवितात ॥३०॥

यः - जो पुराणपुरुष - त्वव्दिधानाम् - तुझ्यासारख्या - असताम् - दुष्टांचा - प्रशान्तये - निग्रह करण्याकरिता - सदनुग्रहेच्छया - साधूंवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने - रूपाणि - अवतार - धत्ते - धारण करितो - तं वीरम् - त्या वीर पुराणपुरुषाच्या - आरात् - जवळ - अभिपद्य - प्राप्त होऊन - विस्मयः - गर्वरहित असा - श्वभिः - कुत्र्यांनी - वृतः - वेष्टिलेला - वीरशय्ये - वीरशय्येवर म्हणजे रणांगणावर - शयिष्यसे - झोप घेशील ॥३१॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय सतरावा समाप्त

GO TOP