|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १६ वा - अन्वयार्थ
जय-विजयांचे वैकुंठातून पतन - योगधर्मिणाम् - योग व भागवतधर्म यास जाणणारे असे - तेषाम् मुनिनाम् इति गृणताम् - ते ऋषि याप्रमाणे स्तुति करीत असता - वैकुण्ठनिलयः - वैकुण्ठलोक आहे स्थान ज्याचे असा - विभुः - विष्णु - तत् - त्या भाषणाला - प्रतिनन्द्य - आदरून - इदम् - पुढील वाक्य - जगाद - बोलला ॥१॥ तौ - ते - एतौ - हे - जयः - जय - च - आणि - विजयः - विजय - मम - माझे - पार्षदौ - सेवक - स्तः - आहेत - यत् - जे - माम् - मला - कदर्थीकृत्य - तुच्छ समजून - वः - तुमचा - बहु - पुष्कळ - अतिक्रमम् - अपमान - अक्राताम् - करते झाले ॥२॥ मुनयः - हे ऋषिहो - माम - मला - अनुव्रतैः - अनुसरणार्या अशा - भगवद्भिः - देवस्वरूपी तुम्ही - देवहेलनात् - देवांच्या अवहेलनेमुळे - यः - जो - दण्डः - दण्ड - धृतः - केला - सः एव - तोच - अस्माभिः - आम्ही - अनुमतः - मान्य केला ॥३॥ तत् - यास्तव - वः - तुम्हाला - अद्य - आता - प्रसादयामि - मी संतुष्ट करतो - हि - कारण - ब्रह्म - ब्राह्मण - मे - माझे - परं दैवम् - श्रेष्ठ दैवत होय - यत् - जे - स्वपुंभिः - माझ्या सेवकाकडून - यूयम् - तुम्ही - असत्कृताः - अवमानिले गेला - तत् हि - ते खरोखर - इति - त्यामुळे - आत्मकृतम् - माझेच कृत्य - मन्ये - मी समजतो ॥४॥ लोकः - लोक - भृत्ये कृतागसि - सेवक अपराधी असता - यन्नामानि - ज्या धन्याला नावे - गृह्णाति - ठेवितो - सः - तो - असाधुवादः - अपवाद - आमयः - रोग - त्वचम् इव - त्वचेला जसे तसे - तत्कीर्तिम् - त्या धन्याच्या कीर्तीला - हन्ति - नष्ट करतो ॥५॥ यस्य - ज्या माझ्या - अमृतामलयशःश्रवणावगाहः - अमृतरूप निर्मल कीर्तीचा श्रवणेन्द्रियात झालेला प्रवेश - सद्यः - तत्काल - आश्वापचात् - चाण्डालसुद्धा - जगत् - सर्व लोकाला - पुनाति - पवित्र करतो - सः - तो - विकुण्ठः - विष्णु - भवद्भ्यः - तुमच्यापासून - उपलब्धसुतीर्थकीर्तिः - प्राप्त झाली आहे उत्तम पवित्र कीर्ति ज्याला असा - वः प्रतिकूलवृत्तिम् - तुमच्याविषयी प्रतिकूल आहे स्वभाव ज्याचा असा - स्वबाहुम् अपि - स्वतःच्या बाहूला देखील - छिन्द्याम् - तोडीन ॥६॥ यरयाः - ज्या लक्ष्मीच्या - प्रेक्षालवार्थे - अवलोकनाच्या लेशाकरिता - इतरे - ब्रह्मादिक देव - नियमान् - व्रते किंवा तपश्चर्या - वहन्ति - करितात - सा - ती - श्रीः - लक्ष्मी - यत्सेवया - ज्या ब्राह्मणांच्या सेवेमुळे - चरणपद्मपवित्ररेणुम् - चरणकमलांवर आहे पवित्र धूळ ज्याच्या अशा - क्षताखिलमलम् - दूर केला आहे संपूर्ण लोकांचा मळ ज्याने अशा - प्रतिलब्धशीलम् - व प्राप्त झाला आहे उत्तम स्वभाव ज्याला अशा - विरक्तम् अपि - विरक्त अशाहि - माम् - मला - विजहाति - सोडीत नाही ॥७॥ मयि - माझ्या ठिकाणी - अवहितैः - अर्पण केलेल्या - निजकर्मपाकैः - आपल्या कर्माच्या फलांनी - तुष्टस्य - संतोष पावलेल्या अशा - श्च्योतद्घृतप्लुतम् - वहाणार्या तुपाने भरलेल्या पदार्थाच्या - अनुघासम् - प्रत्येक घासाला - चरतः - रसास्वादपूर्वक भक्षण करणार्या - ब्राह्मणस्य - ब्राह्मणाच्या - मुखतः - मुखातून - अहम् - मी - यत् - जसे - अद्मि - खातो - तथा - तसे - विताने - यज्ञात - यजमानहविः - यजमानाने दिलेला हविर्भाग - हुतभुङ्मुखेन - अग्नीच्या मुखाने - अदन् - खाणारा असा - न अद्मि - खात नाही ॥८॥ अखण्डविकुण्ठ - अपरिमेय व प्रतिबंध नसलेली - योगमायाविभूतिः - योगमाया हीच ज्याचे ऐश्वर्य आहे असे - यदर्हणामभः - ज्या माझ्या पूजेचे उदक - सहचन्द्रललामलोकान् - चंद्र आहे भूषण ज्याचे अशा शंकरासहित सर्व लोकांना - सद्यः - तत्काल - पुनाति - पवित्र करते - सः - तो - अहम् - मी - येषाम् - ज्या ब्राह्मणांची - अमलाङ्घ्रिरजः - निर्मल अशी पायधूळ - किरीटै - मुकुटांनी - बिभर्मि - धारण करितो - तान् - त्या - विप्रान् - ब्राह्मणांना - कः - कोण - न विषहेत - सहन करणार नाही ॥९॥ मे - माझी - तनूः - शरीरेच अशा - व्दिजवरान् - श्रेष्ठ ब्राह्मणांना - मदीयाः - माझ्या - दुहतीः - गाईना - च - आणि - अलब्धशरणानि - प्राप्त झाला नाही रक्षणकर्ता ज्यांना अशा - भूतानि - प्राण्यांना - ये - जे - भेददृष्ट्या - भेददृष्टीने - द्रक्ष्यन्ति - पहातील - तान् - त्यांना - मम - माझा - अधिदण्डनेतुः - दंडाधिकारी जो यम त्याचे - गृधाः - गृधरूपी दूत - अहिमन्यवः - सर्पाप्रमाणे आहे क्रोध ज्यांचा असे - रुषा - क्रोधाने - कुपन्ति - चोचीने तोडितात ॥१०॥ ये - जे - क्षिपतः - कठोर भाषण करणारे अशा - ब्राह्मणान् - ब्राह्मणांना - मयि धिया - माझ्याविषयीच्या बुद्धीने - अर्चयन्तः - पूजन करणारे - तृप्यद्धृदः - आनन्दित आहे अन्तकरण ज्यांचे असे - स्मितसुधोक्षितपद्मवक्त्राः - हास्यरूपी अमृताने भिजलेले आहे मुखकमल ज्यांचे असे - अनुरागकलया - प्रेमाने शोभणार्या - वाण्या - वाणीने - आत्मजवत् - पुत्राप्रमाणे - गृणतः - स्तुति करणारे - अहम् इव - माझ्याप्रमाणे - संबोधयन्ति - गौरवतात - तैः - त्यांच्याकडून - अहम् - मी - उपाहृतः - वश केलेला आहे ॥११॥ तत् - त्यास्तव - स्वभर्तुः - सेवकांचा स्वामी अशा - मे - माझा - अवसायम् - अभिप्राय - अलक्षमाणौ - न जाणणारे - इमौ - हे दघे व्दारपाल - युष्वह्यतिक्रमगतिम् - तुमच्या अपमानामुळे प्राप्त झालेल्या अधोगतीला - सद्यः - तत्काळ - प्रतिपद्य - प्राप्त होऊन - भूयः - पुनः - मम - माझ्या - अन्तिकम् - जवळ - इताम् - प्राप्त होवोत - भृतयोः - सेवकांचा - विवासः - वियोग - अचिरतः - लवकर - कल्पताम् - संपावा - इति यत् - ही जी गोष्ट - तत् - ती - मे - माझ्यावर - अनुग्रहः - अनुग्रह होय ॥१२॥ अथ - तेव्हा - तस्य - श्रीविष्णूच्या - उशतीम् - मनोहर - देवीम् - प्रकाशमान - ऋषिकुल्याम् - व ऋषिमंडळीला अनुकूल अशा - सरस्वतीम् - वाणीचा - आस्वाद्य - आस्वाद घेऊन - मन्युदष्टानाम् - क्रोधाने व्याप्त झालेल्या - अपि - सुद्धा - तेषाम् - त्या सनत्कुमारादि मुनीचे - आत्मा - मन - न अतृप्यत - तृप्त झाले नाही ॥१३॥ व्यादाय - कान देऊन - श्रृण्वन्तः - ऐकणारे असे सनत्कुमारप्रभृति मुनि - सतीम् - श्रेष्ठ अशा - लघ्वीम् - अल्प अक्षरे असलेल्या - गुर्वर्थगह्वराम् - थोर अर्थामुळे समजण्यास कठीण अशा - अगधिगम्भीराम् - खोल आणि भारदस्त अशा - सरस्वतीम् - वाणीचा - विगाह्य - विचार करून - तच्चिकीर्षितम् - ईश्वराचे इष्ट कार्य - न विदुः - समजले नाहीत ॥१४॥ प्रहृष्टाः - आनंदित झालेले असे - ते विप्राः - ते सनत्कुमार ऋषि - योगमायया - योगमायेच्या योगाने - आरब्धपारमेष्ठ्यमहोदयम् - प्रकट केला आहे उत्कृष्ट ऐश्वर्याचा मोठा उत्कर्ष ज्याने अशा - तम् - त्या विष्णूला - क्षुभितत्वचः - रोमाञ्चित झाली आहे त्वचा ज्यांची असे - प्राञ्जलयः - जोडले आहेत हात ज्यांनी असे - प्रोचुः - बोलले ॥१५॥ भगवन् - हे ऐश्वर्यसंपन्ना - देव - देवा - त्वम् - तू - अध्यक्षः - सर्वसाक्षी - सन् - असून - मया एव अपराधः - मीच अपराध - कृत - केला - च - आणि - मे - माझ्यावर - अनुग्रहः - अनुग्रह - कार्यः - करावा - इति यत् प्रभाषसे - असे जे बोलतोस - तत् - त्यामुळे - तव - तुझे - चिकीर्षितम् - इष्ट कार्य - वयम् - आम्ही - न विद्मः - जाणत नाही ॥१६॥ प्रभो - परमेश्वरा - ब्रह्मण्यस्य - ब्राह्मणांचा कैवारी अशा - ते - तुझे - ब्राह्मणः - ब्राह्मण हे - किल - निश्चयाने - परम् - श्रेष्ठ - दैवम् - दैवत - सन्ति - आहेत - तु - परंतु - भगवान् - परमेश्वर - देवदेवानाम् - देवांना पूज्य अशा - विप्राणाम् - ब्राह्मणांचे - आत्मदैवतम् - आत्मदैवत - अस्ति - आहे ॥१७॥ त्वत्तः - तुझ्यापासून - सनातनः - सनातन - धर्मः - धर्म - भवति - उत्पन्न होतो - तव - तुझ्या - तनुभिः - अवतारांनी - रक्ष्यते - रक्षण केला जातो - भवान् - तू - धर्मस्य - धर्माचा - परमः - फलरूप - गुह्यः - रहस्यमय - निर्विकारः - विकाररहित असा - मतः - मान्य आहेस ॥१८॥ हि - कारण - यदनुग्रहात् - ज्या परमेश्वराच्या अनुग्रहामुळे - निवृत्ताः - विरक्त असे - योगिनः - योगी - अञ्जसा - सहज - मृत्युम् - जन्ममरणरूप संसाराला - तरन्ति - तरतात - सः भवान् - तो तू - परैः - इतरांनी - अनुगृह्येत - अनुग्रह केला जातो - इति यत् - असे जे - त्वया उक्तम् - तू म्हटले - तत् - ते - किस्वित् - कसे काय जुळते ॥१९॥ अर्थार्थिभिः - द्रव्याची इच्छा करणार्या - अन्यैः - दुसर्या देवांनी - स्वशिरसा - आपल्या मस्तकाने - धृतपादरेणुः - धारण केली आहे पायांची धूळ जिची अशी - विभूतिः - लक्ष्मी - धन्यार्पितांघ्रि - पुण्यवान् लोकांनी अर्पण केलेली - तुलसीनवदामधाम्नः - जी पायावरील तुलसीची नूतन माला ती ज्याचे स्थान आहे अशा - मधुव्रतपतेः - भ्रमरश्रेष्ठाच्या - लोकम् - स्थानाला - कामयाना इव - जणु काय इच्छिणारी अशी - यम् - ज्या तुझी - अनुवेलम् - वेळोवेळी - वै - निश्चयाने - उपयाति - सेवा करते ॥२०॥ परमभागवतप्रसङ्गः - महाभगवद्भक्तांच्या ठिकाणी निःसीम प्रेम ठेवणारा - यः - जो विष्णु - विविक्तचरितैः - शुद्ध आचरणांनी - अनुवर्तमानाम् - सेवा करणार्या - ताम् - त्या लक्ष्मीला - न आत्याद्रियत् - फारसा मानीत नाही - सः त्वम् - तो तू - असि - आहेस - व्दिजानुपथपुण्यरजः - ब्राह्मणांची प्रत्येक रस्त्यात लागलेली पवित्र धूळ - च - आणि - श्रीवत्सलक्ष्म - श्रीवत्सचिन्ह - त्वाम् - तुला - पुनीतः किम् - पवित्र करते काय - भगभाजनः - ऐश्वर्याचा आश्रय असा - त्वम् - तू - उभे - लक्ष्मीला व श्रीवत्सचिन्हाला - अगाः - प्राप्त झाला आहेस ॥२१॥ त्रियुग - तीन युगात प्रगट होणार्या हे विष्णो - धर्मस्य - धर्मरूप अशा - भगवतः - ऐश्वर्यसंपन्न अशा तुझ्या - त्रिभिः - तीन - स्वैः - आपल्या - पद्भिः - चरणांनी - इदम् - हे - चराचरम् - स्थावरजंगम जग - नः - आम्हाला - वरदया - वर देणार्या - सत्त्वेन तनुवा - सत्वगुणात्मक मूर्तीने - तदभिघाति - धर्माच्या चरणांचा नाश करणार्या अशा - रजः - रजोगुणाला - च - आणि - तमः - तमोगुणाला - निरस्य - दूर करून - व्दिजदेवतार्थम् - ब्राह्मण व देव यांच्याकरिता - नूनम् - निश्चित - भृतम् - पाळिले गेले आहे ॥२२॥ देव - हे देवा - वृषः - धर्मरूप - त्वम् - तू - यदि - जर - आत्मगोपम् - स्वतः रक्षण करण्यास योग्य अशा - व्दिजोत्तमकुलम् - उत्तम ब्राह्मणांच्या कुलाला - ससूनृतेन - गोड वचनासहित - स्वर्हणेन - उत्तम आदराने - न गोप्ता - राखणार नाहीस - तर्हिः - तर - शिवः - कल्याणकारक - तव एव - तुझाच - पन्थाः - वेदमार्ग - नक्ष्यति - नष्ट होईल - हि - कारण - लोकः - लोक - ऋषभस्य - श्रेष्ठ अशा तुझे - तत् - ते तुझे आचरण - प्रमाणम् - प्रमाण - अग्रहीष्यत् - मानील ॥२३॥ जनाय - लोकांचे - क्षेमं - कल्याण - विधित्सोः - करण्याची इच्छा करणार्या अशा - निजशक्तिभिः - स्वतःच्या शक्तीच्या योगाने - उद्धृतारेः - दूर केले आहेत शत्रु ज्याने अशा - सत्त्वनिधेः - सत्त्वगुणाचा सागर अशा - ते - तुला - तत् - तो धर्मनाश - वत - अगदी - अनभीष्टम् इव - इष्ट नाहीच - एतावता - या धर्मरक्षणाच्या प्रयोजनाने - अवनतस्य - नमस्कार करणार्या - त्र्यधिपतेः - त्रैलोक्याचा अधिपति अशा - विश्वभर्तुः - विश्वाचे रक्षण करणार्या अशा - तव - तुझे - तेजः - सामर्थ्य - न क्षतम् - नष्ट झाले नाही - सः - तो नमस्कार - ते - तुझा - विनोदः - विनोद होय ॥२४॥ अधीश - हे अधिपते - भवान् - तू - अनयोः - ह्या दोघां व्दारपालांना - यं दमम् - जो दण्ड - नु वा - किंवा - वृत्तिं वा - अथवा उपजीविका - विधत्ते - करशील - तत् - ते सर्व - निर्व्यलीकम् - निष्कपटपणे - अनुमन्महि - आम्ही मान्य करू - वा - किंवा - ये वयम् - जे आम्ही - अनागसौ - निरपराधी अशा व्दारपालांना - किल्बिषेण - शापरूप पापाने - अयुङ्क्ष्महि - युक्त केले - तेषु - त्या - अस्मासु - आमच्यावर - यः - जो - उचितः - योग्य - सः - तो - दण्डः - दंड - ध्रियताम् - करावा ॥२५॥ विप्राः - हे ब्राह्मण हो - यः - जो - वः - तुमचा - शापः - शाप - मया एव - मीच - निमित्तः - निर्माण केलेला - अस्ति इति - आहे असे - अवैत - जाणा - एतौ - हे दोघे व्दारपाल - सद्यः - तत्काल - सुरेतरगतिम् - दैत्य योनीला - आशु - लवकर - प्रतिपद्य - प्राप्त होऊन - संरभ्यसंभृतसमाध्यनुबद्धयोगौ - क्रोधाने वाढलेल्या एकाग्रतेने ज्यांचा भक्तियोग दृढ झाला आहे असे - भूयः - पुनः - सकाशम् - माझ्याजवळ - आशु - लवकर - उपयास्यतः - प्राप्त होतील ॥२६॥ अथ - नंतर - ते - ते - मुनयः - सनत्कुमारप्रभृति ऋषि - नयनानन्दभाजनम् - नेत्रांच्या आनंदाचे स्थान अशा - विकुपाठम् - विष्णुला - च - आणि - स्वयंप्रभम् - स्वयंप्रकाश अशा - तदधिष्ठानम् - विष्णूचे निवासस्थान अशा - वैकुण्ठम् - वैकुण्ठलोकाला - दृष्टवा - पाहून ॥२७॥ भगवन्तम् - विष्णूला - परिक्रम्य - प्रदक्षिणा करून - प्रणिपत्य - नमस्कार करून - च - आणि - अनुमान्य - अनुमति घेऊन - प्रमुदिताः - आनंदित झालेले - वैष्णवीम् - विष्णूच्या - श्रियम् - ऐश्वर्याला - शंसंतः - स्तविणारे - प्रतिजग्मुः - परत गेले ॥२८॥ भगवान् - श्रीविष्णु - अनुगौ - सेवकांना - आह - म्हणाला - युवाम् - तुम्ही - यातम् - जा - मा मैष्टम् - भिऊ नका - युवयोः - तुमचे - शम् - कल्याण - अस्तु - असो - समर्थः अपि - शाप निरसन करण्याचे सामर्थ्य असूनहि - अहम् - मी - मे - मला - मतम् - मान्य अशा - ब्रह्मतेजः - ब्राह्मणाच्या तेजाला - तु - तर - हन्तुम् - नष्ट करू - न इच्छे - इच्छित नाही ॥२९॥ पुरा - पूर्वी - यदा - ज्यावेळी - मयि उपारते - मी योगनिद्रा घेत असता - विशन्ती - प्रवेश करणारी - लक्ष्मीः - लक्ष्मी - युवाभ्याम् - तुम्हा दोघांना - व्दारि - दरवाजात - अपवारिता - प्रतिबन्ध केली गेली - तदा - त्यावेळी - क्रुद्धया - रागावलेल्या - रमया - लक्ष्मीने - एतत् - हे - पुरा एव - पूर्वीच - निर्दिष्टम् - सांगितले होते ॥३०॥ मयि - माझ्या ठिकाणी - संरम्भयोगेन - विरोधभक्ति करण्याने - ब्रह्महेलनम् - ब्राह्मणाच्या अपमानामुळे मिळालेला शाप - निस्तीर्य - दूर करून - अल्पीयसा - थोडक्याच - कालेन - कालाने - मे - माझ्या - निकाशम् - जवळ - पुनः - फिरून - प्रत्येष्यतम् - परत याल ॥३१॥ भगवान् - विष्णु - व्दास्थौ - व्दारपालांना - इति - याप्रमाणे - आदिश्य - आज्ञा करून - विमानश्रेणिभूषणम् - विमानांच्या पंक्तीनी शोभणार्या - सर्वातिशयया - सर्व सृष्टीतील संपत्तीपेक्षा अतिशय अशा - लक्ष्म्या - संपत्तीने - जुष्टम् - सेविलेले अशा - स्वम् - स्वकीय - धिष्ण्यम् - स्थानात - आविशत् - प्रवेश करता झाला ॥३२॥ गीर्वाणऋषभौ - देवांमध्ये श्रेष्ठ असे - तौ - ते दोघे व्दारपाल - तु - तर - दुस्तरात् - तरून जाण्यास कठीण अशा - ब्रह्मशापात् - ब्राह्मणाच्या शापामुळे - हरिलोकातः - विष्णुलोकातून - हतश्रियौ - नष्ट झाले आहे ऐश्वर्य ज्यांचे असे - विगतस्मयौ - गेला आहे गर्व ज्यांचा असे - भ्रष्टौ - भ्रष्ट - अभूताम् - झाले ॥३३॥ पुत्रकाः - हे पुत्रहो - तदा - त्यावेळी - विकुण्ठधिषणात् - विष्णूच्या स्थानापासून - नियतमानयोः तयोः - ते दोघे पडू लागले असता - विमानाम्यषु - विमानात असलेल्या श्रेष्ठ लोकात - महान् - मोठा - हाहाकारः - हाहाकार - आसीत् - झाला ॥३४॥ तौ एव - तेच - हरेः - विष्णूचे - पार्षदप्रवरौ - मुख्य व्दारपाल - अधुना - ह्या वेळी - दितेः - दितीच्या - जठरनिर्विष्टम् - उदरात असलेल्या - उल्बणम् - उग्र अशा - काश्यपम् - कश्यप ऋषीच्या - तेजः - वीर्याप्रत - प्राप्तो हि - प्राप्त झाले ॥३५॥ तयोः - त्या - यमयोः - जुळ्या - असुरयेः - दैत्यांच्या - तेजसा - तेजाने - अद्य - आज - वः - तुमचे - तेजः - तेज - आक्षिप्तम् - फिके पडले आहे - एतर्हि - आता - तत् - ते - भगवान् हि - विष्णूच स्वतः - विधित्सति - करू इच्छित आहे ॥३६॥ विश्वस्य - सृष्टीचे - स्थितिलयोद्भवहेतुः - रक्षण, नाश व उत्पत्ति यांस कारण - आद्यः - सनातन - यः - जो भगवान् - योगेश्वरैः अपि - मोठमोठ्या योग्यांनीदेखील - दुरत्यययोगमायः - उल्लंघन करण्यास अशक्य आहे योगमाया ज्याची असा - अस्ति - आहे - सः - तो - त्रधीशः - त्रैलोक्याचा अधिपति असा - भगवान् - श्रीहरि - इह - ह्यावेळी - नः - आमचे - क्षेमम् - कल्याण - विधास्यति - करील - तत्र - त्या कार्यात - अस्मदीयविमृशेन - आमच्या विचाराने - कियान् - कितीसा - अर्थः - उपयोग - भवेत् - होईल ॥३७॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय सोळावा समाप्त |