|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय १४ वा - अन्वयार्थ
दितीची गर्भधारणा - धृतव्रतः - स्वीकारिले आहेत नियम ज्याने असा - सः - तो विदुर - कारणसूकरात्मनः - पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता वराहाचे रूप धारण केलेल्या - हरेः - ईश्वराची - कोषारविणा - मैत्रेय ऋषीने - उपवर्णिताम् - सांगितलेल्या - कथाम् - कथेला - निशम्य - श्रवण करून - न अतितृप्तः - फारशी तृप्ती न झालेला असा - उद्यताञ्जलिः - हात जोडून - पुनः - पुनः - पप्रच्छ - प्रश्न करिता झाला ॥१॥ मुनिश्रेष्ठ - हे ऋषिवर्या - तेन एव - त्याच - तु - तर - यज्ञमूर्तिना - यज्ञस्वरूपी - हरिणा - परमेश्वराने - आदिदैत्यः - पहिला दैत्य - हिरण्याक्षः - हिरण्याक्ष - हतः - मारिला - इति - अशी गोष्ट - अनुशुश्रुम - आम्ही ऐकिले आहे ॥२॥ ब्रह्मन् - हे मैत्रेय ऋषे - क्षोणीम् - पृथ्वीला - स्वदंष्ट्राग्रेण - आपल्या दाढेच्या टोकाने - उद्धरतः - वर काढणार्या - तस्य - त्या वराहरूपी श्रीहरीचा - च - आणि - दैत्यराजस्य - दैत्यराज हिरण्याक्षाचा - मृधः - संग्राम - कस्मात् - कोणत्या - हेतोः - कारणामुळे - अभूत् - झाला ॥३॥ वीर - हे वीरा विदुरा - त्वया - तुझ्याकडून - साधु - चांगले - पृष्टम् - विचारिले गेले - यत् - कारण - त्वम् - तू - मर्त्यानाम् - मनुष्यांच्या - मृत्युपाशविशातनीम् - मृत्युरूप बन्धन तोडणारी अशी - हरेः - श्रीहरीची - अवतार कथाम् - अवताराची कथा - पृच्छसि - विचारतोस ॥४॥ मुनिना - नारदाने - गीतया - गायिलेल्या - यया - ज्या कथेने - उत्तानपदः - उत्तानपाद राजाचा - अर्भकः - अल्पवयी - पुत्रः - पुत्र - मृत्योः एव - मृत्यूचाच - मूर्न्धि - मस्तकावर - अङ्घ्रिम् - पाय - कृत्वा - करून - हरेः - विष्णूच्या - पदम् - स्थानावर - आरुरोह - चढला ॥५॥ अथ - नंतर - अत्र अपि - या संग्रामाविषयीहि - पुरा - पूर्वी - देवानाम् अनुपृच्छताम् - देव प्रश्न करीत असता - देवदेवेन ब्रह्मणा - देवांचा मुख्य देव अशा ब्रह्मदेवाने - वर्णितः - वर्णन केलेला - अयम् - हा - इतिहासः - इतिहास - मे - माझ्या - श्रुतः - ऐकण्यात आला आहे ॥६॥ क्षत्तः - हे विदुरा - दाक्षायणी - दक्ष प्रजापतीची कन्या - दितिः - दिति - अर्के - सूर्य - निम्लोचति - अस्ताला जात असता - अग्निजिह्वम् - अग्नि आहे जिह्वा ज्याची अशा - यजुषाम् - यज्ञांचा - पतिम् - रक्षक अशा - पुरुषम् - परमेश्वराला - पयसा - दुधाने - इष्ट्वा - हवन करून - अग्न्यगारे - अग्निशाळेमध्ये - समाहितम् - स्वस्थ मनाने - आसीनम् - बसलेल्या - पतिम् मारीचम् - पति मरीचिपुत्र अशा - कश्यपम् - कश्यप ऋषीला - अपत्यकामा - अपत्याची इच्छा जिला आहे अशी - हृच्छयार्दिता - मदनाने पीडित अशी - संध्यायाम् - संध्याकाळी - चकमे - भोगार्थ इच्छिती झाली ॥७-८॥ विद्वन् - हे ज्ञानी ऋषे - एषः - हा - कामः - मदन - आत्तशरासनः - घेतलेले आहे धनुष्य ज्याने असा - त्वत्कृते - तुझ्याकरिता - दीनाम् - निरपराधी अशा - माम् - मला - मतङ्गजः - हत्ती - रम्भाम् इव - केळीप्रमाणे - विक्रम्य - पराक्रम करून - दुनोति - दुःख देतो ॥९॥ तत् - म्हणून - भवान् - आपण - प्रजावतीनाम् - संतति ज्यास आहे अशा - सपत्नीनाम् - सवतीच्या - समृद्धिभिः - समृद्धिनी - दह्यमानायाम् मयि - दुःखित होणार्या माझ्यावर - अनुग्रहम् - कृपा - आयुङ्क्त्ताम् - करावी - ते - तुझे - भद्रम् - कल्याण - अस्तु - असो ॥१०॥ भर्तरी - पतीच्या ठिकाणी - आप्तोरुमानानाम् - प्राप्त केला आहे मोठा मान ज्यांनी अशा स्त्रियांची - यशः - कीर्ति - लोकान् - जगात - अविशते - पसरते - यासाम् - ज्यांच्या - प्रजया - संततीने - भवद्विधः - तुमच्यासारखा - पतिः - पति - ननु - खरोखर - जायते - उत्पन्न होतो ॥११॥ पुरा - पूर्वी - नः - आमचा - पिता - पिता - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - दुहितृवत्सलः - कन्यांवर प्रीती करणारा - दक्षः - दक्षप्रजापति - वत्साः - मुलींनो - कम् - कोणत्या - वरम् - पतीला - वृणीत - वरता - इति - असे - नः - आम्हाला - पृथक् - वेगवेगळे - अपृच्छत - विचारता झाला ॥१२॥ संतानभावनः - प्रजा उत्पन्न करणारा - सः - तो दक्ष - नः - आम्हा - आत्मजानाम् - कन्यांचा - भावम् - अभिप्राय - विदित्वा - जाणून - तासाम् - त्यांपैकी - याः - ज्या - ते - तुझ्या - शीलम् - स्वभावाला - अनुव्रताः - अनुसरणार्या - आसन् - होत्या - ताः - त्या - त्रयोदश - तेरा - तुभ्यम् - तुला - अददात् - देता झाला ॥१३॥ जञ्जविलोचन - हे कमलनेत्रा - कल्याण - हे सुखदायका - अथ - आता - मे - माझी - कामम् - इच्छापूर्ति - कुरु - करा - हि - कारण - भूमन् - हे संपन्ना - महीयसि - मोठ्याच्या ठिकाणी - आर्तोपसर्पणम् - दुःखितांची याचना - अमोघम् - निष्फल न होणारी असते ॥१४॥ वीर - हे शूरा विदुरा - मारीचः - कश्यप - प्रवृद्धानङ्गकश्मलाम् - वाढलेल्या कामाने पीडित जालेल्या अशा - ताम् - त्या दितीला - वाचा - भाषणाने - अनुनयन् - शान्त करीत - प्रत्याह - म्हणाला ॥१५॥ भीरु - भित्रे - एषः - हा - अहम् - मी - यत् - जे - इच्छसि - तू इच्छितेस - तत् - ते - ते - तुझे - प्रियम् - प्रिय - विधास्यामि - करीन - यतः - जिच्यापासून - त्रैवर्गिकी - धर्म, अर्थ व काम यांची - सिद्धिः - सिद्धि - भवति - होते - तस्याः - त्या स्त्रीची - कामम् - इच्छा - कः - कोण - न कुर्यात् - पुरी करणार नाही ॥१६॥ कलत्रवान् - विवाहित पुरुष - यथा - ज्याप्रमाणे - जलयानैः - नौकांच्या योगाने - अर्णवम् - समुद्राला - तथा - त्याप्रमाणे - स्वाश्रमेण - आपल्या आश्रमाने - सर्वाश्रमान् - सर्व आश्रमांना - उपादाय - घेऊन - व्यसनावर्णवम् - दुःखरूपी समुद्राला - अत्येति - तरून जातो ॥१७॥ मानिनि - हे मानी स्त्रिये - याम् - जिला - श्रेयस्कामस्य - कल्याणेच्छू पुरुषाच्या - आत्मनः - देहाचे - अर्धम् - अर्धा भाग - आहुः - म्हणतात - पुमान् - पुरुष - यस्याम् - जिच्या ठिकाणी - स्वधुरम् - आपल्या कामांचा भार - अध्यस्य - ठेवून - विज्वरः - चिंतारहित असा - चरति - फिरतो ॥१८॥ यथा - ज्याप्रमाणे - दुर्गपतिः - किल्ल्याचा अधिकारी - दस्यून् - शत्रूंना - तथा - त्याप्रमाणे - वयम् - आम्ही - याम् - जिचा - आश्रित्य - आश्रय करून - इतराश्रयैः - इतर आश्रमांनी - दुर्जयान् - जिंकण्यास अशक्य़ अशा - इन्द्रियारातीन् - इन्द्रियरूप शत्रूंना - हेलाभिः - लीलांनी - जयेम - जिंकू शकतो ॥१९॥ गृहेश्वरि - हे गृहस्वामिनी - ये - जे - वयम् - आम्ही - गुणगृध्नवः - गुण ग्रहण करणारे - स्मः - आहोत - ते - ते - च - आणि - अन्ये - दुसरे - ताम् त्वाम् अनुकर्तुम् - त्या तुझे अनुकरण करण्यास - आयुषा अपि वा - सर्व आयुष्याने देखील - न प्रभवः - समर्थ नाही ॥२०॥ अथ अपि - असे असताही - प्रजात्यै - संततीकरिता - एतम् - ह्या - ते - तुझ्या - कामम् - कामाला - अलं करवाणि - मी पूर्ण करीन - यथा - जेणे करून - माम् - माझी - न अतिवोचन्ति - लोक निन्दा करणार नाहीत - तथा - तशी - मुहूर्तम् - दोन घटिका - प्रतिपालय - तू थांब ॥२१॥ एषा - ही - घोराणाम् - राक्षसादि भयंकर प्राण्यांची - वेला - वेळ - घोरदर्शना - भयंकर आहे दर्शन जिचे अशी - घोरतमा - अत्यन्त भयङ्कर - अस्ति - आहे - यस्याम् - जिच्या ठिकाणी - भूतेशानुचराणि - शंकराची अनुयायी अशी - भूतानि - भूते - चरन्ति ह - फिरतात ॥२२॥ साध्वि - हे पतिव्रते - एतरयाम् संध्यायाम् - ह्या संध्याकाळच्या वेळी - भूतभावनः - प्राण्यांचे कल्याण करणारा - भगवान् - भगवान् - भूतराट् - भूतांची राजा शंकर - भूतपर्षद्भिः - भूतगणांनी - परीतः - युक्त असा - वृषेण - नंदीवर बसून - अटति - फिरतो ॥२३॥ श्मशानचक्रानिलधूलिधूम्रविकिर्णविद्योतजटाकलापः - श्मशानातील वावटळीने उठविलेल्या धुळीने धूम्रवर्ण व विसकटलेला असा आहे - देदीप्यमान जटाकलाप ज्याचा असा - देवः - शंकर - ते - तुझा - देवरः - दीर - त्रिभिः - तीन डोळ्यांनी - पश्यति - पहातो ॥२४॥ यस्य - ज्याचा - लोके - जगात - स्वजनः - स्वकीय - वः - किंवा - परः - परकीय - न - नाही - अत्यादृतः न - पूज्य कोणी नाही - उत - किंवा - विगर्ह्यः - निंद्य - कश्चित् - कोणी - न - नाही - बत - खरोखर - वयम् - आम्ही - व्रतैः - व्रतांनी - यच्चरणापविद्धाम् - ज्याच्या पायाने फेकलेल्या अशा - भुक्तभोगाम् - घेतला आहे भोग जिचा अशा - अजाम् - मायारूप वैभवाला - आशास्महे - इच्छितो ॥२५॥ अविद्यापटलम् - मायेच्या आवरणाला - बिभित्सवः - दूर करण्याची इच्छा करणारे - मनीषिणः - ज्ञानी लोक - यस्य - ज्या शंकराच्या - अनवद्याचरितम् - निर्दोष आचरणाला - गृणन्ति - स्तवितात - यत् - कारण - सः - तो - स्वयम् - स्वतः - सताम् - साधूंना - गतिः - मोक्ष देणारा - निरस्तु साम्यातिशयः अपि - दूर केले आहे इतरांचे साम्य किंवा आधिक्य ज्याने असा असूनहि - पिशाचचर्याम् - पिशाचांच्या वृत्तीला - अचरत् - आचरता झाला ॥२६॥ स्वात्मन्रतस्य - स्वस्वरूपी रममाण असलेल्या - तस्य - ज्या शंकराच्या - समीहितम् - अभीष्ट अशा - आचरितम् - आचरणाला - अविद्वांस - अज्ञानी - दुर्भगाः - दुर्दैवी लोक - हसन्ति हि - हसतात - यैः - ज्यांनी - वस्त्रमाल्याभरणानुलेपनैः - वस्त्रे, माला, अलङ्कार व उटी यांनी - श्वभोजनम् - कुत्र्यांचे भक्ष असे हे शरीर - स्वात्मतया - आपला आत्मा आहे असे समजून - उपलालितम् - गौरविले ॥२७॥ ब्रह्मादयः - ब्रह्मदेवप्रभृति देव - यत्कृतसेतुपालाः - ज्याने घालून दिले त्या धर्ममर्यादेचे पालन करणारे आहेत - इदम् - हे - विश्वम् - जग - यत्कारणम् - ज्यापासून उत्पन्न झालेले - अस्ति - आहे - च - आणि - माया - प्रकृति - यस्य - ज्याची - आज्ञाकरी - आज्ञा मान्य करणारी - अस्ति - आहे - तस्य - त्या शंकराची - पिशाचचर्या - पिशाच्याप्रमाणे वृत्ति - अस्ति - आहे - अहो - अहो - विभूम्नः - मोठ्यांचे - चरितम् - चरित्र - विडम्बनम् - अतर्क्य - अस्ति - आहे ॥२८॥ भर्त्रा - पतीने - एवम् - याप्रमाणे - संविदिते - जाणविले असता - मन्मथोन्मथितेन्द्रिया - मदनाने व्याकुळ केलेली आहेत इंद्रिये जिची अशी - सा - ती दिति - वृषली इव - वेश्येप्रमाणे - गतत्रपा - गेली आहे लज्जा जिची अशी - ब्रह्मर्षेः - ब्रह्मर्षि कश्यपाच्या - वासः - वस्त्राला - जग्राह - धरिती झाली ॥२९॥ अथ - नंतर - सः - तो कश्यप ऋषी - भार्यायाः - पत्नीचा - तम् - त्या - विकर्मणि - निषिद्ध कर्मातील - निर्बन्धम् - आग्रहाला - विदित्वा - जाणून - दिष्टाय - दैवाला - नत्वा - नमस्कार करून - अथ - नंतर - तया - तिच्यासह - रहसि - एकांतात - उपविवेश ह - बसलो ॥३०॥ अथ - नंतर - सलिलम् उपस्पृश्य - उदकाला स्पर्श करून - प्राणान् आयम्य - प्राणायाम करून - वाग्यतः - मौन धारण केलेला असा - विरजम् - निर्मळ अशा - ज्योतिः - तेजोरूप सूर्याचे - ध्यायन् - ध्यान करीत - सनातनम् - नित्य अशा - ब्रह्म - परब्रह्मरूप गायत्रीला - जजाप - जपिता झाला ॥३१॥ भारत - हे विदुरा - तेन - त्या - कर्मावद्येन - निंद्य कर्माने - व्रीडिता - लज्जित झालेली - दितिः - दिति - विप्रर्षिम् - ब्रह्मर्षीच्या - उपसंगम्य - जवळ जाऊन - अधोमुखी - खाली आहे मुख जिचे अशी - अभाषत - बोलली ॥३२॥ ब्रह्मन् - हे ऋषे - यस्य - ज्याचा - अंहसम् - अपराध - अकरवम् - केला - सः - तो - भूतानाम् - प्राण्यांमध्ये - ऋषभः - श्रेष्ठ असा - रुद्रः - शंकर - इमम् - ह्या - मे - माझ्या - गर्भम् - गर्भाला - मा वघीत् - नष्ट न करो - हि - कारण - सः - तो - भूतानाम् - प्राण्यांचा - पतिः - रक्षक - अस्ति - आहे ॥३३॥ रुद्राय - भयंकर - उग्राय - उग्र - मीढुषे - सकामकर्माचे फल देणार्या - न्यस्तदण्डाय - टाकला आहे दंड ज्याने असा - मन्यवे - क्रोधरूप अशा - महते देवाय - महादेवाला - नमः - नमस्कार असो ॥३४॥ सः - तो - भामः - भगिनीपति - भगवान् - भगवान - उर्वग्रहः - मोठी आहे कृपा ज्याची असा - सतीपतिः - सतीदेवीचा पती - देवः - महादेव - व्याधस्य अपि - पारध्याला देखील - अनुकम्पानाम् - अनुग्रह करण्यास योग्य अशा - नः - आम्हा - स्त्रीणाम् - स्त्रियांना - प्रसीदताम् - प्रसन्न होवो ॥३५॥ निवृत्तसंध्यानियमः - समाप्त झाले आहे सायंकाळचे विहित कर्मानुष्ठान ज्याचे असा - प्रजापतिः - प्रजापति कश्यप - प्रवेपतीम् - कंप पावणार्या अशा - स्वसर्गस्य - आपल्या संततीच्या - लोक्याम् - उभय लोकांना योग्य अशा - आशिषम् - कल्याणाची - आशासानाम् - इच्छा करणार्या अशा - भार्याम् - पत्नीला - आह - म्हणाला ॥३६॥ अभद्रे - दुर्दैवी - चण्डि - हे कोपिष्टे - ते - तुझे - आत्मनः - अंतःकरणाच्या - अप्रायत्याय् - अशुद्धपणामुळे - मौहूर्तिकात् - दोन घटिकांच्या - दोषात् - दोषामुळे - उत मन्निदेशातिचारेण - आणि माझ्या आज्ञेचा भंग केल्यामुळे - च - आणि - देवानाम् - देवांच्या अनुचरांचा - अवहेलनात् - अपमान केल्यामुळे - तव - तुला - अभद्रौ जाठराधमौ - अकल्याणकारी व अधम असे पुत्र - भविष्यतः - होतील - तौ - ते - सपालान् - रक्षकांसहित - लोकान् - तिन्ही लोकांना - मुहुः - वारंवार - आक्रन्दयिष्यतः - रडावयास लावतील ॥३७-३८॥ दीनानाम् - गरीब - अकृतागसाम् - केला नाही अपराध ज्यांनी असे - प्राणिनाम् - प्राणी - हन्यमानानाम् - मारले जात असता - स्त्रीणाम् - स्त्रिया - निगृह्यमाणानाम् - बलात्काराने धरल्या जात असता - महात्ससु - साधु - कोपितेषु - क्रुद्ध झाले असता - तदा - त्यावेळी - लोकभावनः - जगाचे कल्याण करणारा - विश्वेश्वरः - विश्वाचा स्वामी - असौ - हा - भगवान् - विष्णू - क्रुद्धः - रागावलेला असा - अवतीर्य - अवतार घेऊन - यथा - ज्याप्रमाणे - शतपर्वधृक् - वज्र धारण करणारा इंद्र - अद्रीन् - पर्वतांना - तथा इमौ - त्याप्रमाणे ह्या दोन पुत्रांना - हनिष्यति - मारील ॥३९-४०॥ विभो - महाराज - सुनाभोदारबाहुना - सुदर्शनचक्रामुळे सुंदर आहेत बाहु ज्याचे अशा - भगवता - विष्णूकडून - मह्यम् - माझ्या - पुत्रयोः - दोन पुत्रांचा - वधम् - वध - आशासे - इच्छिते - क्रुद्धात् - रागावलेल्या - ब्राह्मणात् - ब्राह्मणापासून - मा - नव्हे ॥४१॥ नारकाः - नरकातील लोक - च - आणि - असौ - हा - याम् याम् - ज्या ज्या - योनिम - योनीला - गतः - जाईल - तत्रस्थाः - त्या ठिकाणचे लोक - ब्रह्मदण्डदग्ध - ब्राह्मणाच्या दण्डामुळे दग्ध झालेल्या प्राण्यावर - च - आणि - भूतभयदस्य - प्राणिमात्राला दुःख देणार्या प्राण्यावर - न अनुगृह्णन्ति - अनुग्रह करीत नाहीत ॥४२॥ कृतशोकानुपातेन - केलेल्या अपराधाने झालेला शोक व पश्चाताप या दोहींमुळे - सद्यः - तत्काल - प्रत्यवमर्शनात् - युक्त व अयुक्त याचा विचार केला असता - भगवति - विष्णूच्या ठिकाणी - च - आणि - उरुमानात् - मोठा मान ठेविल्यामुळे - भवे - शंकराच्या ठिकाणी - च - आणि - मयि आदरात् - माझ्या ठिकाणी आदर ठेवल्यामुळे - ते - तुझ्या - पुत्रस्य एव - पुत्राच्याच - पुत्रानाम् - पुत्रांमध्ये - तु - तर - एकः - एक - सताम् - साधूंना - मतः - मान्य असा पुत्र - भविता - होईल - शुद्धम् - शुद्ध असे - यद्यशः - ज्याचे यश - भगवद्यशसासमम् - भगवंताच्या कीर्तीच्या बरोबरीने - गास्यन्ति - गातील ॥४३-४४॥ योगैः - प्रयोगांनी - दुर्वर्णम् - हिणकस - हेम इव - सुवर्ण जसे तसे - साधवः - साधु पुरुष - यच्छीलम् - ज्याच्या स्वभावाला - अनिवर्तितुम् - अनुसरण्याकरिता - निर्वैरादिभिः - निर्वैरत्व इत्यादि उपायांनी - आत्मानम् - स्वतःला - भावयिष्यन्ति - शुद्ध करतील ॥४५॥ यदात्मकम् - जे परमेश्वरस्वरूप - इदम् - हे - विश्वम् - जग - यत्प्रसादात् - ज्या परमेश्वराच्या प्रसादामुळे - प्रसीदति - प्रसन्न होते - सः - तो - स्वदृक् - सर्वसाक्षी - भगवान् - परमेश्वर - यस्य - ज्यांच्या - अनन्यया दृशा - एकनिष्ठ बुद्धीने - तोष्यते - संतुष्ट होईल ॥४६॥ सः - तो - महाभागवतः - मोठा भगवद्भक्त - महात्मा - महात्मा - महानुभावः - थोर अन्तःकरणाचा - महताम् - मोठ्यांमध्ये - प्रवृद्धभक्त्या - वृद्धिंगत झालेल्या भक्तीने - अनुभाविताशये - शुद्ध झालेल्या अंतःकरणात - वैकुण्ठम् - विष्णूला - निवेश्य - स्थापून - इमम् - हा संसार - वै - खरोखर - विहास्यति - सोडून देईल ॥४७॥ अलम्पटः - लम्पट नसलेला - शीलधरः - चांगल्या स्वभावाचा - गुणाकरः - गुणांचा सागर - परद्ध्र्या - दुसर्याच्या संपत्तीने - हृष्टः - हर्ष पावलेला - दुःखितेषु - दुःखी लोकांच्या ठिकाणी - व्यथितः - दुःखी झालेला - अभूतशत्रुः - उत्पन्न झाला नाही शत्रु ज्याला असा - सः - तो नातू - उडुराजः - नक्षत्रांचा राजा चन्द्र - नैदाधिकम् - ग्रीष्म ऋतूतील - तापम् एव - तापालाच तसा - जगतः - विश्वाचे - शोकहर्ता - दुःख हरण करणारा - भविष्यति - होईल ॥४८॥ तव - तुझा - पौत्रः - नातू - अन्तः - आत - बहिः - बाहेर - अमलम् - निर्मळ - अब्जनेत्रम् - कमलाप्रमाणे आहेत नेत्र ज्याचे असा - स्वपूरुपेच्चानुगृहीतरूपम् - आपल्या भक्तांच्या इच्छेनुसार घेतली आहेत रूपे ज्याने अशा - श्रीललनाललामम् - लक्ष्मी हीच जी सुंदरी तिने भूषणभूत अशा - स्फुरत्कुण्डलमण्डिताननम् - देदीप्यमान कुण्डलांनी सुशोभित आहे मुख ज्याचे अशा भगवंताला - द्रष्टा - पाहील ॥४९॥ दितिः - दिति - भागवतम् - भगवद्भक्त अशा - पौत्रम् - नातवाला - श्रुत्वा - ऐकून - भृशम् - अत्यन्त - अमोदत - आनन्दित झाली - च - आणि - पुत्रयोः - पुत्रांचा - वधम् - वध - कृष्णात् - कृष्णापासून - विदित्वा - जाणून - महामनाः - मोठे झाले आहे चित्त जिचे अशी - आसीत् - झाली ॥५०॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय चवदावा समाप्त |