श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १२ वा - अन्वयार्थ

सृष्टीचा विस्तार -

क्षत्तः - हे विदुरा - परमात्मनः - परमेश्वराचे - कालाख्यः - काल शक्‍तिरूप - महिमा - माहात्म्य - एवम् - याप्रमाणे - ते - तुला - वर्णितः - सांगितले - अथ - आता - वेदगर्भः - वेद आहेत उदरामध्ये ज्याच्या असा ब्रह्मदेव - यथा - ज्या रीतीने - अस्त्राक्षीत् - सृष्टि उत्पन्न करता झाला - तत् - ते - मे - माझ्यापासून - निबोध - समजून घे ॥१॥

आदिकृत् - सृष्टीचा उपक्रम करणारा ब्रह्मदेव - अग्रे - प्रथम - महामोहम् - महामोह - च - आणि - मोहम् - मोह - तामिस्त्रम् - तामिस्त्र - च - आणि - अन्घतामिस्त्रम् - अन्धतामिस्त्र - अथ - आणि - तमः - तम - इति - अशा - अज्ञानवृत्तीः - अज्ञानाची स्वरूपे - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥२॥

पापीयसीम् - अतिशय पापी अशा - सृष्टिम् - सृष्टीला - दृष्ट्वा - पाहून - आत्मानम् - स्वतःला - बहु न अमन्यत - चांगले मानिता झाला नाही. - ततः - नंतर - भगवद्धयानपूतेन - परमेश्वराच्या ध्यानाने पवित्र झालेल्या - मनसा - अन्तःकरणाने - अन्याम् सृष्टिम् - दुसर्‍या सृष्टीला - असृजत् - उत्पन्न करता झाला. ॥३॥

अथ - नंतर - आत्मभूः - ब्रह्मदेव - सनकम् - सनक - च - आणि - सनन्दम् - सनन्द - च - आणि - सनातनम् - सनातन - च - आणि - सनत्कुमारम् - सनत्कुमार - इति - अशा - ऊर्ध्वरेतसः - उर्ध्वगति आहे रेताची ज्यांच्या अशा - निष्क्रियान् - धर्म, अर्थ व काम याविषयी निरपेक्ष अशा - मुनीन् - ऋषींना - असृजत् - उत्पन्न करता झाला ॥४॥

स्वभूः - ब्रह्मदेव - तान् - त्या - पुत्रान् - पुत्रांना - बभाषे - म्हणाला - पुत्रकाः - मुलांनो, - प्रजाः - प्रजा - सृजत - उत्पन्न करा - किंतु - परंतु - मोक्षधर्माणः - मोक्षधर्म आचरण करणारे - वासुदेवपरायणाः - वासुदेव हेच सर्वस्व आहे ज्यांचे असे - ते - ते - तत् - ते सृष्टिकर्म - न ऐच्छन् - न इच्छिते झाले. ॥५॥

प्रत्याख्यातानुशासनैः - अङ्गिकारिली नाही आज्ञा ज्यांनी अशा - सुतैः - मुलांनी - एवम् - याप्रमाणे - अवध्यातः - अपमान केलेला - सः - तो ब्रह्मदेव - जातम् - उत्पन्न झालेल्या - दुर्विषहम् - सहन करण्यास कठीण अशा - क्रोधम् - क्रोधाला - नियन्तुम् - आवरून धरण्याकरिता - उपचक्रमे - प्रयत्‍न करता झाला ॥६॥

धिया - बुद्धीने - निगृह्यमाणः अपि - आवरून धरलेलाहि - तन्मन्युः - तो क्रोध - प्रजापतेः - ब्रह्मदेवाच्या - भ्रुवोः - भुवयांच्या - मध्यात् - मध्यापासून - सद्यः - तत्काल - नीललोहितः - काळा व लाल वर्णाचा - कुमारः - बालक असा - अजायत - उत्पन्न झाला ॥७॥

देवानाम् पूर्वजः - देवांच्या पूर्वी उत्पन्न झालेला - सः - तो - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - भवः - शंकर - धातः - हे तात - जगद्‍गुरो - त्रैलोक्यगुरो - मे - माझी - नामानि - नावे - च - आणि - स्थानानि - स्थाने - कुरु - नियोजित कर - इति - असे - रुरौद वै - रडू लागला ॥८॥

इति - हे - तस्य - त्याचा - वचः - शब्द - परिपालयन् - पुरा करणारा - भगवान् - ऐश्वर्यसंपन्न - पाद्मः - ब्रह्मदेव - भद्रया - गोड - वाचा - वाणीने - मा रोदीः - रडू नको - ते - तुझे - तत् - ते कार्य - करोमि - करतो - इति - असे - अभ्यधात् - बोलला ॥९॥

सुरश्रेष्ठ - हे देवश्रेष्ठा - यत् - जे - सोद्वेगः - खिन्न अशा - बालकः इव - मुलाप्रमाणे - अरोदीः - रडलास - ततः - त्यामुळे - प्रजाः - लोक - त्वाम् - तुला - रुद्रः - रुद्र - इति नाम्ना - अशा नावाने - अभिधास्यन्ति - हाक मारतील ॥१०॥

हृत् - हृदय - इन्द्रियाणि - इन्द्रिये - असुः - प्राण - व्योम - आकाश - वायुः - वारा - अग्निः - अग्नि - जलम् - जल - मही - पृथ्वी - सूर्यः - सूर्य - चन्द्रः - चंद्र - च - आणि - तपः - तपश्चर्या - एतानि - ही - स्थानानि - स्थाने - अग्रे एव - पूर्वीच - मे - मी - कृतानि - केली आहेत ॥११॥

मन्युः - मन्यु - मनुः - मनु - महिनसः - महिनस - महान् - महान - शिवः - शिव - ऋतुध्वजः - ऋतुध्वज - उग्ररेताः - उग्ररेता - भवः - भव - कालः - काल - वामदेवः - वामदेव - ध्रृतव्रतः - ध्रृतव्रत - इति तव नामानि सन्ति - ही तुझी नावे आहेत ॥१२॥

रुद्र - हे रुद्रा - धीः - धी - वृत्तिः - वृत्ति - उशना - उशना - उमा - उमा - नियुत्सर्पिः - नियुत्सर्पि - इला - इला - अम्बिका - अम्बिका - च - आणि - इरावतीसुधादीक्षारुद्राण्यः - इरावती, सुधा, दीक्षा आणि रुद्राणी - एताः - ह्या - ते - तुझ्या - स्त्रियः - स्त्रिया - सन्ति - आहेत ॥१३॥

सयोषणः - स्त्रियांसहित - त्वम् - तू - एतानि - ह्या - नामानि - नावांना - च - आणि - एभिः - ह्या स्थानांना, नावांनी व स्त्रियांनी - युक्‍तः - युक्‍त असा - बह्‌वीः - पुष्कळ - प्रजाः - प्रजा - सृज - उत्पन्न कर - यत् - कारण - त्वम् - तू - प्रजानाम् - लोकांचा - पतिः - पालक - असि - आहेस ॥१४॥

गुरुणा - ब्रह्मदेवाने - इति - याप्रमाणे - आदिष्टः - आज्ञा केलेला - सः - तो - भगवान् - भगवान् - नीललोहितः - रुद्र - सत्त्वाकृतिस्वभावेन - बल, आकार व स्वभाव यांना अनुरूप - आत्मसमाः - आपल्यासारख्या - प्रजाः - प्रजा - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥१५॥

रुद्रसृष्टानाम् - रुद्रांनी उत्पन्न केलेल्या - जगत् - जगाच्या - समन्तात् - चोहूंकडे - वसताम् - राहणार्‍या अशा - रुद्राणाम् - रुद्रांचे - संख्यशः - असंख्य - यूथान् - कळप - निशाम्य - पाहून - प्रजापतिः - ब्रह्मदेव - अशङ्कत - शंकित झाला ॥१६॥

सुरोत्तम - हे सुरश्रेष्ठा - उल्बणैः - तीक्ष्ण - चक्षुर्भिः - डोळ्यांनी - मया सह - माझ्यासह वर्तमान - दिशः - दिशांना - दहन्तीभिः - जाळणार्‍या - ईदृशीभिः - अशा प्रकारच्या - सृष्टाभिः - उत्पन्न केलेल्या - प्रजाभिः - प्रजा - अलम् - पुरे झाल्या ॥१७॥

सर्वभूतसुखावहम् - सर्व प्राण्यांना सुख उत्पन्न करणारे असे - तपः - तप - आतिष्ठ - कर - ते - तुझे - भद्रम् - कल्याण - अस्तु - असो - भवान् - तू - तपसा एव - तपश्चर्येने - यथापूर्वम् - पूर्वीप्रमाणे - इदम् - हे - विश्वम् - जग - स्रष्टा - उत्पन्न करशील ॥१८॥

पुमान् - पुरुष - तपसा एव - तपश्चर्येने - परम् - श्रेष्ठ - ज्योतिः - तेजोरूप - सर्वभूतगुहावासम् - सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करणार्‍या अशा - भगवन्तम् - ऐश्वर्यसंपन्न - अधोक्षजम् - परमेश्वराला - अञ्जसा - सहज - विन्दते - प्राप्त करून घेतो ॥१९॥

आत्मभुवा - ब्रह्मदेवाने - एवम् आदिष्टः - याप्रमाणे आज्ञा केलेला रुद्र - गिराम् - वेदवाणीचा - पतिम् - अधिकारी अशा - अमुम् - ब्रह्मदेवाला - परिक्रम्य - प्रदक्षिणा करून - च - आणि - बाढम् इति आमन्त्रय - ठीक आहे अशा शब्दांनी निरोप घेऊन - तपसे - तपश्चर्येकरिता - वनम् - अरण्यात - विवेश - प्रवेश करता झाला ॥२०॥

अथ - नंतर - सर्गम् - सृष्टिस्वरूप - अभिध्यायतः - मनात घोळवीत असणार्‍या त्या - भगवच्छक्‍तियुक्‍तस्य - भगवंताच्या शक्‍तीने युक्‍त अशा ब्रह्मदेवाला - लोकसंतानहेतवः - लोकविस्तार जेणेकरून हो‌ईल असा - दश - दहा - पुत्राः - पुत्र - प्रजज्ञिरे - उत्पन्न झाले ॥२१॥

मरीचिः - मरीचि - अत्र्यङ्गिरसौ - अत्रि व अङ्गिरा - पुलस्त्यः - पुलस्त्य - पुलहः - पुलह - क्रतुः - क्रतु - भृगुः - भृगु - वसिष्ठः - वसिष्ठ - दक्षः - दक्ष - च - आणि - तत्र - त्या पुत्रात - दशमः - दहावा - नारदः - नारद - अस्ति - होय ॥२२॥

स्वयुम्भुवः - ब्रह्मदेवाच्या - उत्सङ्गात् - मांडीतून - नारदः - नारद - अङ्गुष्ठात् - अंगुष्ठापासून - दक्षः - दक्ष - जज्ञे - उत्पन्न झाला - प्राणात् - प्राणापासून - वसिष्ठः - वसिष्ठ - संजातः - उत्पन्न झाला - त्वचि - त्वचेच्या ठिकाणी - भृगुः - भृगु - करात् - हातापासून - क्रतुः - क्रतु - जज्ञे - झाला ॥२३॥

पुलहः - पुलह - नाभितः - नाभीपासून - कर्णयोः - कर्णापासून - पुलस्त्यः ऋषि - पुलस्त्य ऋषि - जज्ञे - झाला - अंगिराः - अंगिरा - मुखतः - मुखातून - अक्ष्णः - डोळ्यातून - अत्रिः - अत्रि - मरीचिः - मरीचि - मनसः - मनापासून - अभवत् - झाला ॥२४॥

यत्र - ज्या धर्माचे ठिकाणी - स्वयम् - स्वतः - नारायणः - नारायण - अस्ति सः - आहे तो - धर्मः - धर्म - दक्षिणतः - उजव्या - स्तनात् - स्तनातून - यस्मात् - ज्यापासून - लोकभयंकरः - लोकांना भीति उत्पन्न करणारा - मृत्युः - मृत्यु - भवति सः - उत्पन्न होतो तो - अधर्मः - अधर्म - पृष्ठतः - पाठीतून - जज्ञे - उत्पन्न झाला ॥२५॥

हृदि - अंतःकरणाच्या ठिकाणी - कामः - काम - भ्रुवः - भ्रुकटीपासून - क्रोधः - क्रोध - अधरदच्छदात् - अधरोष्ठापासून - लोभः - लोभ - आस्यात् - मुखातून - वाक् - वाणी - मेढ्रात् - शिश्नापासून - सिन्धवः - नद्या - च - आणि - पायोः - गुदद्वारापासून - अघाश्रयः - पापांचा आश्रय असा - निऋतिः - निऋति - जज्ञे - उत्पन्न झाला ॥२६॥

छायायाः - छायेपासून - देवहूत्याः - देवहूतीचा - पति - पती - प्रभुः - समर्थ असा - कर्दमः - कर्दम ऋषि - जज्ञे - जन्मला - च - आणि - विश्वकृतः - ब्रह्मदेवाच्या - मनसः - मनापासून - च - आणि - देहतः - देहापासून - इदम् - हे - जगत् - जग - जज्ञे - उत्पन्न झाले ॥२७॥

क्षत्तः - हे विदुरा - सकामः - कामाने युक्‍त असा - स्वयम्भूः - ब्रह्मदेव - तन्वीम् - सुंदर अशा - मनः - अंतःकरणाला - हरन्तीम् - मोह पाडणार्‍या अशा - अकामाम् - कामरहित अशा - वाचम् दुहितरम् - सरस्वतीनामक कन्येला - चकमे - अभिलाषिता झाला - इति - असे - नः श्रुतम् - आमच्या ऐकण्यात आहे ॥२८॥

सुताः - पुत्र असे - मरीचिमुख्याः - मरीचि आहे मुख्य ज्यामध्ये असे - मुनयः - ऋषि - अधर्मे - अधर्मामध्ये - कृतमतिम् - केली आहे बुद्धि ज्याने अशा - तम् - त्या - पितरम् - पिता जो ब्रह्मदेव त्याला - विलोक्य - पाहून - विश्रम्भात् - विश्वासामुळे - प्रत्यबोधयन् - सविनय बोध करते झाले ॥२९॥

यत् त्वम् - जो तू - प्रभुः - समर्थ असा - अङ्गजम् - कामाला - अनिगृह्य - न आवरून - दुहितरं गच्छेः - कन्येशी गमन करण्यास प्रवृत्त झालास - एतत् - हे - पूर्वैः - पूर्वजांनी - न कृतम् - केले नाही - च - आणि - त्वत् अपरे - तुझ्यानंतर - ये - जे - सन्ति ते - आहेत ते - न करिष्यन्ति - करणार नाहीत ॥३०॥

जगदगुरो - हे त्रैलोक्यगुरो - तेजीयासाम् अपि - तेजस्वी लोकांना सुद्धा - एतत् - हे - सुश्‍लोक्यम् - स्तुतीला योग्य असे - न - नाही - हि - कारण - यद्‌वृत्तम् - ज्या तेजस्वी पुरुषांच्या वर्तनाला - अनुतिष्ठन् - अनुसरणारा - लोकः - लोक - क्षेमाय - कल्याणाला - कल्पते - प्राप्त होतो ॥३१॥

यः - जो भगवान - आत्मस्थम् - आपल्या स्वरूपात असलेले - इदम् - हे जग - व्यञ्जयामास - व्यक्‍त करता झाला - तस्मै - त्या - भगवते - परमेश्वराला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - सः - तो भगवान् - धर्मम् - धर्माचे - पातुम् - रक्षण करण्याकरिता - अर्हति - योग्य आहे ॥३२॥

तदा - त्या वेळी - प्रजापतिंपतिः - प्रजापतींचा पिता ब्रह्मदेव - पुरः - आपल्यापुढे - इत्थम् - अशा प्रकारे - गृणतः - बोलणार्‍या - प्रजापतीन् - प्रजापतिरूप अशा - पुत्रान् - पुत्रांना - दृष्ट्वा - पाहून - ब्रीडितः - लज्जित झालेला असा - तन्वम् - शरीराला - तत्याज - त्यागिता झाला ॥३३॥

दिशः - दिशा - घोराम् - निंद्य अशा - ताम् - त्या शरीराला - जगृहुः - स्वीकारत्या झाल्या - यत् - ज्या शरीराला - तमः - तमोगुणरूप - नीहारम् - धुके - विदुः - समजतात - अहम् - मी - यथा - ज्याप्रमाणे - पुरा - पूर्वी - असृजम् तथा - सृष्टि उत्पन्न करता झालो त्याप्रमाणे - समवेतान् - सुव्यस्थित - लोकान् - लोकांना - कथम् - कसे - स्त्रक्ष्यामि - उत्पन्न करीन - इति - असा - कदाचित् - एके वेळी - ध्यायतः - विचार करणार्‍या - स्त्रष्टुः - ब्रह्मदेवाच्या - चतुर्मुखात - चार मुखांतून - वेदाः - वेद - आसन् - उत्पन्न झाले ॥३४॥

उपवेदनयैः सह - उपवेद व न्याय यांसह - चातुर्होत्रम् - होता,अध्वर्यु व उद्‌गाता व ब्रह्मा यांची कर्मे - कर्मतन्त्रम् - यज्ञाचा विस्तार - धर्मस्य - धर्माचे - चत्वारः - चार - पादाः - चरण - तथा एव - तसेच - आश्रमवृत्तयः - आश्रम व त्यांचा वर्तनक्रम - आसन् - उत्पन्न झाले ॥३५॥

तपोधन - तपच ज्याचे धन आहे अशा हे मैत्रैयमुने ! - विश्वसृजाम् - प्रजापतींचा - ईशः - स्वामी - सः - ब्रह्मदेव - वेदादीन् - वेद इत्यादिकांना - मुखतः - मुखापासून - असृजत् - उत्पन्न करता झाला - देवः - ब्रह्मदेव - यत् यत् - जे जे - येन - ज्या मुखाने - असृजत् - उत्पन्न करता झाला - तत् - ते - मे - मला - ब्रूहि - सांगा ॥३६॥

पूर्वादिभिः - पूर्व इत्यादिक - मुखैः - मुखांनी - क्रमात् - क्रमाने - ऋग्यजुःसामाथर्वाख्यान् - ऋक्, यजु, साम व अथर्व अशा आहेत नावे ज्यांची असे - वेदान् - वेद - शस्त्रम् - गायन केल्याशिवाय पठण करावयाचे मन्त्र - इज्याम् - हवन, पूजन इत्यादिक करणे - स्तुतिस्तोमम् - गायनपूर्वक म्हणावयाचे मंत्र - प्रायश्चित्तम् - कर्मात होणार्‍या दोषांची निवृत्ति व्हावी म्हणून करावयाची कृत्ये - व्यधात् - करता झाला ॥३७॥

आत्मनः - आपल्या - पूर्वादिभिः - पूर्व इत्यादिक - मुखैः - मुखांनी - क्रमात् - अनुक्रमाने - आयुर्वेदम् - वैद्यशास्त्र - धनुर्वेदम् - शस्त्रविद्या - गान्धर्वम् - गायनविद्या - च - आणि - स्थापत्यं वेदम् - कलाकौशल्य - असृजत् - उत्पन्न करता झाला ॥३८॥

सर्वदर्शनः - सर्व पदार्थांचे आहे ज्ञान ज्याला असा - ईश्वरः - ब्रह्मदेव - पञ्चमम् - पाचवा - वेदम् - वेद - इतिहासपुराणानि - इतिहास व पुराणे - सर्वेभ्यः एव - सर्वच - वक्‍त्रेभ्यः - मुखातून - ससृजे - उत्पन्न करता झाला ॥३९॥

षोडश्युक्थौ - षोडशी व उक्‍थ ही कर्मे - पूर्ववक्रात् - पूर्वेकडील मुखातून - अथ - आणि - इतरेभ्यः क्रमात् - इतर मुखातून क्रमाने - पुरीष्यग्निष्टुतौ - चयन व अग्निष्टोम - आप्तोर्यामातिरात्रौ - आप्तोर्याम व अतिरात्र - च - आणि - सगोसवम् - गोसवासहित - वाजपेयम् - वाजपेय ॥४०॥

विद्या - शुद्धता - दानम् - दया - तपः - तपश्चर्या - च - आणि - सत्यम् - सत्य - इति - हे - धर्मस्य - धर्माचे - पदानि - चरण - च - आणि - वृत्तिभिःसह - वागण्याच्या नियमांसहित - आश्रमान् - आश्रम - यथासंख्यम् - क्रमाने - असृजत् - उत्पन्न करता झाला ॥४१॥

सावित्रम् - सावित्री - च - आणि - प्राजापत्यम् - प्राजापत्य - च - आणि - ब्राह्मम् - ब्राह्म - अथ - आणि - बृहत् - बृहत् - इति चतुर्धा ब्रह्मचर्यम् - याप्रमाणे चार प्रकारचे ब्रह्मचर्य - वार्तासंचयशालीनशिलोञ्‌छः - वार्ता, संचय, शालीन व शिलोञ्‌छ - इति - अशी - गृहे - घरात - स्थितानां वृत्तयः सन्ति - राहणार्‍यांच्या उपजीविकेची साधने आहेत ॥४२॥

वैखानसाः - वैखानस - वालखिल्यौदुम्बुराः - वालखिल्य व औदुम्बर - फेनपाः - फेनप - इति - असे - वने - अरण्यात - स्थितानां चत्वारः भेदाः सन्ति - असे चार भेद आहेत ॥४३॥

आन्वीक्षिकी - आत्मज्ञान - त्रयी - ऋग्, यजु आणि साम हे तीन वेद - वार्ता - शेतकी आदिकरून निर्वाहाची साधने - च - आणि - तथा एव - त्याप्रमाणेच - दण्डनीतिः - राजनीति - एवम् - याप्रमाणे - व्याहृतयः - भूः, भुवः, स्वः आणि भूर्भुवः स्वः हे मंत्रोच्चार - पूर्वादिभ्यः क्रमात् आसन् - पूर्वादि मुखातून क्रमाने उत्पन्न झाले - च - आणि - अस्य - ह्या ब्रह्मदेवाच्या - दहृतः - हृदयापासून - प्रणवः हि - ओम्‌कार - आसीत् - उत्पन्न झाला ॥४४॥

तस्य - त्या ब्रह्मदेवाच्या - लोमभ्यः - केसांपासून - उष्णिक् - उष्णिक् छन्द - आसीत् - उत्पन्न झाला - विभोः - व्यापक अशा ब्रह्मदेवाच्या - त्वचः - त्वचेपासून - गायत्री - गायत्री छन्द - मांसात् - मासापासून - त्रिष्टुप् - त्रिष्टुप् छन्द - स्नुतः - स्नायूपासून - अनुष्टुप् - अनुष्टुप् छंद - च - आणि - प्रजापतेः - ब्रह्मदेवाच्या - अस्थ्नः - अस्थीपासून - जगती - जगती छन्द - आसन् - झाले ॥४५॥

मज्जायाः - मज्जेपासून - पङ्‌क्‍ति - पङ्‌क्‍ति छंद - उत्पन्ना - उत्पन्न झाला - प्राणतः - प्राणापासून - बृहती - बृहती छंद - अभवत् - उत्पन्न झाला - स्पर्शः - क पासून म पर्यंत जे वर्ण ते - तस्य - त्या ब्रह्मदेवाचा - जीवः - जीव - अभवत् - झाले - स्वरः - अ, इ, उ,ऋ इत्यादी स्वर - देहः - देह - उदाहृतः - म्हटले आहे ॥४६॥

ऊष्माणम् - श, ष, स, ह या ऊष्म वर्णांना - आत्मनः - ब्रह्मदेवाची - इन्द्रियाणि - इन्द्रिये - आहुः - म्हणतात - अन्तस्थाः - य, व, र, ल हे अंतस्थ वर्ण - बलम् - बल - स्युः - होत - प्रजापतेः - ब्रह्मदेवाच्या - विहारेण - क्रीडेपासून - सप्त स्वराः - षड्‌जादि सात स्वर - भवन्ति स्म - उत्पन्न झाले ॥४७॥

शब्दब्रह्मात्मनः - शब्द ब्रह्म आहे शरीर ज्याचे अशा - व्यक्‍ताव्यक्‍तात्मनः - व व्यक्‍त व अव्यक्‍त आहे स्वरूप ज्याचे अशा - तस्य - त्या ब्रह्मदेवाला - परः - परमेश्वर - ब्रह्म - ब्रह्मरूपाने अविकृत असा - विततः - सर्वव्यापी असा - च - आणि - नानाशक्‍त्युपबृंहितः - अनेक शक्‍तींनी युक्‍त असा - अवभाति - दिसतो ॥४८॥

ततः - मग - अपरां - दुसरे - तनूम् - शरीर - उपादाय - धारण करून - सः - तो ब्रह्मदेव - सर्गाय - सृष्टि करण्यासाठी - मनो दधे - मन लाविता झाला - भूरिवीर्याणां ऋषीणाम् - महासामर्थ्यवान् अशा ऋषींची - अविस्तृतम् सर्गम् - अगदी अल्प अशी उत्पत्ति - तत् - तेव्हा - ज्ञात्वा - जाणून - कौरव - हे विदुरा - सः - तो ब्रह्मदेव - हृदये - मनात - भूयःचिंतयामास - पुनः विचार करू लागला ॥४९॥

अहो - अहो - एतत् - हे - अद्‌भुतम् - आश्चर्य - अस्ति - आहे - नित्यदा - निरंतर - मे - मी - व्यापृतस्य अपि - सृष्टिकर्मात लागलो असताहि - प्रजाः - प्रजा - न एधन्ते हि - ज्या अर्थी वाढत नाहीत - नूनम् - खरोखर - अत्र - येथे - दैवम् - प्रारब्ध - विघातकम् - कार्याचा बिघाड करणारे - अस्ति - आहे ॥५०॥

एवम् - याप्रमाणे - तस्य - तो ब्रह्मदेव - युक्‍तकृतः - यथायोग्य काम करीत असता - च - आणि - दैवम् - प्रारब्धाचा - अवेक्षतः - विचार करीत असता - तदा - त्या वेळी - कस्य - ब्रह्मदेवाचे - रूपम् - शरीर - द्वेधा - दुभंगलेले - अभूत् - झाले - यम् - ज्याला - कायम् - काय असे - अभिचक्षते - म्हणतात ॥५१॥

ताभ्याम् - त्या - रूपविभागाभ्याम् - शरीराच्या दोन विभागांनी - मिथुनम् - स्त्री-पुरुषांचा जोडा - समपद्यत - उत्पन्न झाला - तत्र - त्या दोहोमध्ये - यः - जो - पुमान् - पुरुष - सः - तो - तु - तर - स्वायभ्भुवः - ब्रह्मदेवाचा पुत्र - मनुः - मनु - स्वराट् - जगाचा राजा - अभूत - झाला - या - जी - स्त्री - स्त्री - आसीत् - होती - सा - ती - महात्मनः अस्य - महात्म्या मनूची - शतरूपाख्या - शतरूपी नावाची - महिषी - पट्टराणी - अभवत् - झाली ॥५२॥

तदा हि - त्यावेळी खरोखर - मिथुनधर्मेण - मैथुनाने - प्रजाः - प्रजा - एधाम्बभूविरे - वाढू लागल्या - च - आणि - सः अपि - तो मनुसुद्धा - शतरूपायाम् - शतरुपा स्त्रीच्या ठिकाणी - पञ्च - पाच - अपत्यानि - अपत्ये - अजीजनत् - उत्पन्न करता झाला ॥५३॥

सत्तम भारत - हे साधुश्रेष्ठ भरतकुलोत्पन्ना विदुरा - प्रियव्रतोत्तानपादौ - प्रियव्रत व उत्तानपाद - च - आणि - आकूतिः - आकूति - देवहूतिः - देवहूति - च - आणि - प्रसूतिः - प्रसूति - इति - अशा - तिस्त्रः - तीन - कन्याः - कन्या ॥५४॥

सः - तो स्वायंभुव मनु - आकूतिम - आकूति - रुचये - रुचि ऋषीला - तु - त्याचप्रमाणे - कर्दमाय - कर्दम ऋषीला - मध्यमाम् - मधली देवहूति - च - आणि - दक्षाय - दक्षप्रजापतीला - प्रसूतिम् - प्रसूती - प्रादात् - देता झाला - यतः - ज्यांच्यामुळे - जगत् - जग - आपूरितम् - व्यापले गेले ॥५५॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय बारावा समाप्त

GO TOP