![]() |
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ११ वा - अन्वयार्थ
मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन - सद्विशेषाणाम् - व्यक्त पदार्थांच्या अंशांचा - चरमः - शेवटचा भाग - अनेकः - एकमेकापासून पृथक असलेला - असंयुक्तः - समुदायरूपाला प्राप्त न झालेला - सदा - नेहमी - अस्ति - असतो - सः - तो - परमाणुः - परमाणु - विज्ञेयः - समजावा - संयुतेभ्यः - एकत्र झालेल्या अशा - यतः - ज्यांच्यामुळे - नृणाम् - मनुष्यांना - ऐक्यभ्रमः - एकत्रीकरणामुळे मूर्तरूपास आल्याचा भास - भवति - होतो ॥१॥ स्वरूपावस्थितस्य - मूळ रूपातच असलेल्या - सतः पदार्थस्य एव - कार्यस्वरूप पदार्थाचेच - यत् - जे - कैवल्यम् - केवलरूप - सः - तो - अविशेषः - विशिष्ट धर्म ज्यात नाही असा - निरन्तरः - भेदरहित असा - परममहान् - फार मोठा - विज्ञेयः - समजावा ॥२॥ सत्तम - हे साधुश्रेष्ठ विदुरा - भगवान् - परमेश्वराची शक्तिरूप असा - विभुः - उत्पत्ति इत्यादिकांमध्ये दक्ष असा - अव्यक्तः - व अस्पष्ट असा - व्यक्तभुक् - व्यक्त सृष्टीला व्यापून राहणारा असा - कालः अपि - कालसुद्धा - एवम् - परमाणूप्रमाणे - संस्थानभुक्त्या - परमाणु, मध्यम आणि परम महान् अशा सर्व अवस्थांना व्यापून असल्यामुळे - सौक्ष्म्ये - सूक्ष्म स्वरूपाविषयी - च - आणि - स्थौल्ये - स्थूल स्वरूपाविषयी - अनुमतिः - तर्क केलेला आहे ॥३॥ यः - जो - परमाणुताम् - परमाणुस्वरुपाला - भुङ्क्ते - उपभोगितो - सः वै कालः - तो काल खरोखर - परमाणुः - परमानु - तु - परंतु - यः - जो - ततः - परमाणुस्वरूपाहून - अविशेषभुक् - सामान्य कार्यमात्राचा उपभोग घेणारा - आस्ते - असतो - सः कालः - तो काल - परमः - फार - महान् - मोठा होय ॥४॥ द्वौ - दोन - परमाणू - परमाणु - अणुः - अणु - स्यात् - होय - त्रयः - तीन अणु - त्रसरेणुः - त्रसरेणु - स्मृतः - म्हणतात - यः - जो त्रसरेणु - जालार्करश्म्यवगतः - खिडकीतील सूर्याच्या किरणात दिसणारा असा - खम् एव - आकाशातच - अनुपतन् - उडत - अगात् - जातो ॥५॥ यः - जो - त्रसरेणुत्रिक्रम् - तीन त्रसरेणूंना - भुङ्क्ते - व्यापितो - सः कालः - तो काल - त्रुटिः - त्रुटि - स्मृतः - म्हणतात - तु - परंतु - शतभागः - शंभर आहेत त्रुटिरूप अवयव ज्याचे असा - वेधः - वेध - स्यात् - होय - तु - परंतु - तैः त्रिभिः - त्या तीन वेधांनी - लवः - लव - स्मृतः - म्हणतात ॥६॥ त्रिलवः - तीन आहेत लवा ज्यामध्ये असा - निमेषः - निमेष - ज्ञेयः - समजावा - ते त्रयः - ते तीन निमेष म्हणजे - क्षणः - क्षण - आम्नातः - म्हणतात - पञ्च - पाच - क्षणान् - क्षणांना - काष्ठां - काष्ठा - विदुः - समजतात - दश - दहा - च - आणि - पञ्च - पाच - ताः - काष्ठा म्हणजे - लघु - लघु - भवति - होतो ॥७॥ दश - दहा - च - आणि - पञ्च - पाच - लघूनि - लघू म्हणजे - नाडिका - घटिका - आम्नाता वै - खरोखर म्हणतात - ते द्वे - त्या दोन घटिका म्हणजे - मुहूर्तः - मुहूर्त - भवति - होतो - षट् - सहा - वा - किंवा - सप्त - सात घटिका - नृणाम् - मनुष्यांच्या - प्रहरः - प्रहर - भवति - होतो - सः एव - तोच - यामः - याम होय ॥८॥ द्वादशार्धपलोन्मानम् - सहा पले वजनाचे पात्र - चतुर्भिः - चार - स्वर्णमाषैः - मासे सुवर्णाने - चतिरङ्गुलैः - तयार केलेल्या चार अंगुले लांब अशा तारेने - कृतच्छिद्रम् - केले आहे छिद्र ज्यामध्ये असे - यावत्प्रस्थजलप्लुतम् - प्रस्थवजन पाण्याने बुडणारे असे - भवति - असते - तत् नाडिका उच्यते - त्याला घटिका म्हणतात ॥९॥ मानद - हे मान देणार्या विदुरा - चत्वारः - चार - च - आणि - चत्वारः - चार - यामाः - प्रहर - मर्त्यानाम् - मनुष्यांचे - उभे - दोन - अहनी - रात्र आणि दिवस - स्तः - होतात - पञ्चदश - पंधरा - अहानि - दिवसांचा - पक्षः - पक्ष - भवति - होतो - सः - तो - शुक्लः - शुक्ल - च - आणि - कृष्णः - कृष्ण ॥१०॥ तयो - त्या दोन पक्षांचा - समुच्चयः - समूह म्हणजे - मासः - महिना - तत् - तो महिना - पितृणाम् - पितरांचे - अहर्निशम् - अहोरात्र - भवति - होते - तौ द्वौ - दोन महिने म्हणजे - ऋतुः - ऋतु - भवति - होतो - षट् - सहा महिने म्हणजे - अयनम् - अयन - भवति - होते - तत् - ते - दक्षिणम् - दक्षिण - च - आणि - उत्तरम् - उत्तर - च - आणि - अयने - दक्षिणायन व उत्तरायण यांना - दिवि - स्वर्गातील - अहनी - दिवस रात्र - प्राहुः - म्हणतात - द्वादश - बारा महिने म्हणजे - वत्सरः - संवत्सर - स्मृतः - म्हणतात - संवत्सरशतम् - शंभर वर्षे - नृणाम् - मनुष्यांचे - परम् - अधिकांत अधिक - आयुः - आयुष्य - निरूपितम् - सांगितले आहे ॥११-१२॥ ग्रहर्क्षताराचक्रस्थः - ग्रह, नक्षत्रे व तारका यांच्या चक्रावर राहणारा असा - अनिमिषः - नित्य जागृत असणारा - विभुः - सर्वसाक्षी भगवान् - परमाण्वादिना - परमाणु आहे अल्पतम मान ज्याचे - संवत्सरावसानेन - व संवत्सर आहे महत्तम मान ज्याचे अशा कालचक्राने - जगत् - पृथ्वीला - पर्येति - प्रदक्षिणा करतो ॥१३॥ विदुर - हे विदुरा - सः एव - तोच - संवत्सरः - संवत्सर - परिवत्सरः - परिवत्सर - इडावत्सरः - इडावत्सर - अनुवत्सरः - अनुवत्सर - च - आणि - वत्सरः - वत्सर - एवम् - याप्रमाणे - प्रभाष्यते - म्हटला जातो ॥१४॥ यः - जो - भूतभेदः - पंचमहाभूतांपैकी एक असा सूर्य - कालाख्यया - काल आहे नाव जिचे अशा - स्वशक्त्या - आपल्या शक्तीने - सृज्यशक्तिम् - उत्पन्न करावयाच्या वस्तूंतील शक्तीला - उरुधा - अनेकप्रकारे - उच्छ्वसयन् - उत्तेजित करणारा - क्रतुभिः - व यज्ञांनी - गुणमयम् - सत्त्वादि गुणांनी युक्त अशा कर्मफलाला - वितन्वन् - विस्तारित - पुंसाम् - पुरुषांचा - अभ्रमाय - मोह निवृत्त करण्याकरिता - दिवि - आकाशात - धावति - धावतो - तस्मै - त्या - वत्सरपंचकाय - पंचसंवत्सरमय स्वरूपाला - बलिम् - पूजा - हरत - अर्पण करा ॥१५॥ पितृदेवमनुष्याणाम् - पितर, देव व मनुष्य यांचे - इदम् - हे शंभर वर्षांचे - परम् - मोठे - आयुः - आयुष्य - स्मृतम् - म्हटले आहे - ये - जे - विदः - ज्ञानी - कल्पात् - कल्पापासून - बहिः - बाहेर - स्युः - आहेत - तेषाम् - त्या - परेषाम - श्रेष्ठांचे - गतिम् - आयुष्याचे प्रमाण - आचक्ष्व - सांग ॥१६॥ भगवान् - आपण - भगवतः कालस्य - सर्वश्रेष्ठ कालाची - गतिम् - गति - नूनम् - खरोखर - वेद - जाणता - धीराः - ज्ञानी पुरुष - योगराद्धेन - योगाभ्यासाने प्राप्त झालेल्या - चक्षुषा - ज्ञानाने - विश्वम् - जगाला - विचक्षते - पहातात ॥१७॥ कृतम् - कृत - त्रेता - त्रेता - द्वापरम् - द्वापर - च - आणि - कलिः - कलि - इति - याप्रमाणे - चतुर्युगम् - चार युगांचा समुदाय - सावधानम् - संध्या व अंश यांसहित - दिव्यैः - देवाच्या - द्वादशभिः - बारा - सहस्त्रैः - हजार - वर्षैः - वर्षांनी - भवति - होते - इति - असे - निरूपितम् - सांगितले आहे ॥१८॥ कृतादिषु - कृत, त्रेता इत्यादि युगांमध्ये - यथाक्रमम् - क्रमाने - चत्वारि - चार - त्रीणि - तीन - द्वे - दोन - च - आणि - एकम् - एक - सहस्त्राणि - हजार - च - आणि - द्विगुणानि - दुप्पट - शतानि - शेकडे - संख्यातानि - गणिली आहेत ॥१९॥ तज्ज्ञाः - कालाचे प्रमाण जाणणारे लोक - शतसंख्ययोः - शेकडे आहेत संख्या ज्यांची अशा - संध्याशयोः - युगाच्या प्रारंभीचा काल व समाप्तीचा काल यांच्या - अन्तरेण - मध्ये - यः कालः - जो काल - आस्ते - असतो - तम् एव - त्याच कालाला - युगम् - युग - आहुः - म्हणतात - यत्र - ज्यामध्ये - धर्मः - धर्म - विधीयते - सांगितला आहे ॥२०॥ कृतं - कृतयुगामध्ये - चतुष्पाद् - तप आदि चार आहेत चरण ज्याला असा - धर्मः - धर्म - मनुजान् - मनुष्यांमध्ये - समनुवर्तते - असतो - अन्येषु - इतर युगात - पादेन - एका चरणाने - वर्धता - वाढणार्या - अधर्मेण - अधर्माने - सः - तोच चतुष्पाद् धर्म - व्येति - नष्ट होतो ॥२१॥ तात - हे विदुरा - त्रिलोक्याः - त्रैलोक्याच्या - बहिः - बाहेरील - आब्रह्मणः - महर्लोकापासून ब्रह्मलोकासुद्धा सर्वांचा - युगसाहस्त्रम् - हजार युगे - दिनम् - दिवस - भवति - होतो - च - आणि - तावती एव - तेवढीच - निशा - रात्र - भवती - होते - यत् - ज्या रात्रीत - विश्वसृक् - ब्रह्मदेव - निमीलति - शयन करतो - निशावसाने - रात्र संपल्यावर - आरब्धः - आरंभ केलेली - लोककल्पः - सृष्टिरचना - यावत् - जोपर्यंत - भगवतः - ब्रह्मदेवाचा - दिनम् - दिवस - अस्ति तावत् - असतो तोपर्यंत - चतुर्दश - चवदा - मनून् - मनूचा - भुञ्जन् - उपभोग घेणारी अशी - अनुवर्तते - चालू असते ॥२२-२३॥ मनुः - मनु - स्वम् स्वम् - आपाआपल्या - कालम् - कालाचा - साधिकाम् - किंचित अधिक अशी - एकसप्ततिम् - एकाहत्तर युगे - भुङ्क्ते हि - उपभोग घेतो - मन्वन्तरेषु - मन्वन्तरात - मनवः - मनु - ऋषयः - ऋषि - सुराः - देव - च - आणि - सुरेशाः - इंद्र - च - आणि - तान् अनु - इंद्राचे अनुयायी - ये - जे गंधर्व इत्यादि - ते - ते - युगपत् - एकाच काळी - भवन्ति - होतात - च - आणि - तद्वंश्याः - मनुवंशातील राजे - क्रमेण - क्रमाने - एव - च - भवन्ति - होतात ॥२४॥ एषः - हा - दैनंदिन - प्रत्येक दिवशी उत्पन्न होणारा असा - ब्राह्मः - ब्रह्मदेवाचा - त्रैलोक्यवर्तनः - त्रैलोक्याला उत्पन्न करणारा - सर्गः - सर्ग - अस्ति - आहे - यत्र - ज्या सर्गात - कर्मभिः - कर्मानी - तीर्यङ्नृपितृदेवानाम् - पशु, पक्षी, मनुष्य, पितर व् देव यांची - संभव - उत्पत्ति - भवति - होते ॥२५॥ मन्वन्तरेषु - मन्वन्तरात - सत्त्वम् - सत्त्वगुणाला - विभ्रत् - धारण करणारा असा - स्वमूर्तिभिः - आपले अवतारस्वरूप अशा - मन्वादिभिः - मनु इत्यादिकांकडून - उदितपौरुषः - प्रगट केला आहे पराक्रम ज्याने असा - भगवान् - परमेश्वर - इदम् - ह्या - विश्वम् - जगाचे - अवति - रक्षण करतो ॥२६॥ दिनात्यये - ब्रह्मदेवाचा दिवस संपल्यावर - तमोमात्राम् - तमोगुणाचा अंश - उपादाय - घेऊन - प्रतिसंरुद्धविक्रमः - बंद केला आहे पराक्रम ज्याने असा - कालेन - कालाकडून - अनुगताशेषः - प्रविष्ट केले आहे सर्व जग ज्याने असा - तूष्णीम् - स्वस्थ - आस्ते - असतो ॥२७॥ निशायाम् अनुवृत्तायाम् - रात्र सुरू झाली असता - निर्मुक्तशशिभास्करम् - चंद्र व सूर्य लुप्त झाले आहे अशा स्थितीत - भूरादयः - भूः इत्यादिक - त्रयः - तीन - लोकाः - लोक - तम् एव - त्या परमेश्वरातच - अन्वपिधीवन्ते - गुप्त होतात ॥२८॥ शक्त्या - शक्तिरूप अशा - संकर्षणाग्निना - शेषाच्या मुखातील अग्नीच्या योगाने - त्रिलोक्याम् दह्यमानायाम् - त्रैलोक्य जळू लागले असता - ऊष्मणा - उष्णतेने - अर्दिताः - पीडित झालेले - भृग्वादयः - भृगु इत्यादिक ऋषि - महर्लोकात् - महर्लोकापासून - जनम् - जनलोकाला - यान्ति - जातात ॥२९॥ तावत् - तोपर्यंत - उत्कटाटोपचण्डवातेरितोर्मयः - उत्कट आहे क्षोभ ज्यांचा अशा प्रचंड वायूनी उसळत आहेत लाटा ज्यांच्या असे - कल्पन्तैधितसिन्धवः - प्रलयकाली वाढलेले समुद्र - सद्यः - तत्काल - त्रिभुवनम् - त्रैलोक्याला - प्लावयन्ति - बुडवितात ॥३०॥ तस्मिन् - त्या - सलिले अन्तः - पाण्यामध्ये - अनन्तासनः - शेष आहे आसन ज्याचे असा - हरिः - दुःख हरण करणारा भगवान् - योगनिद्रानिमीलाक्षः - योगनिद्रेच्या योगाने मिटलेले आहेत डोळे ज्याने असा - जनालयैः स्तूयमानः - व जनलोक आहे स्थान ज्याचे अशा मुनींनी स्तविला जाणारा असा - आस्ते - असतो ॥३१॥ कालगत्या - कालगतीने - उपलक्षितैः - युक्त अशा - एवंविधैः - अशा प्रकारच्या - अहोरात्रैः - दिवसरात्रींनी - अस्य अपि - ह्या ब्रह्मदेवाचे सुद्धा - परम् - अधिक असे - वयःशतम् - शंभर वर्षे आहे काल ज्याचा असे - आयुः - आयुष्य - अपक्षितम् इव - संपल्यासारखे - भवति - होते ॥३२॥ तस्य - ब्रह्मदेवाच्या - आयुषः - आयुष्याचे - यत् - जे - अर्धम् - अर्ध - तत् - ते - परार्धम् - परार्ध - अभिधीयते - म्हटले आहे - पूर्वः - पूर्व - परार्धः - परार्ध - अपक्रान्तः - संपले - अपरः - दुसरे परार्ध - अद्य - हल्ली - प्रवर्तते - चालू आहे ॥३३॥ पूर्वस्य - पूर्व - परार्धस्य - परार्धाच्या - आदौ - प्रारंभी - ब्राह्मः नाम - ब्राह्म नावाचा - महान् कल्पः - मोठा कल्प - अभूत् - झाला - यत्र - ज्या ब्राह्म कल्पात - ब्रह्मा - ब्रह्मदेव - अभवद् - उत्पन्न झाला - यम् - ज्याला - शब्दब्रह्म इति - शब्दब्रह्म असे - विदुः - समजतात ॥३४॥ तस्य एव - त्या परार्धाच्याच - अन्ते - शेवटी - कल्पः - एक कल्प - अभूत् - झाला - यम् - ज्याला - पाद्मम् - पाद्म कल्प - अभिचक्षते - म्हणतात - यत् - ज्या कल्पात - हरेः - विष्णूच्या - नाभिसरसः - नाभिसरोवरापासून - लोकसरोरुहम् - त्रैलोक्यरूपी कमळ - आसीत् - उत्पन्न झाले ॥३५॥ भारत - हे विदुरा - द्वितीयस्य अपि - दुसर्या परार्धाचाहि - अयम् - हा - तु - तर - कल्पः - कल्प - वाराहः इति - वाराह नावाने - विख्यातः - प्रख्यात असा - कथितः - सांगितला आहे - यत्र - ज्या वाराहकल्पात - हरिः - विष्णु - सूकरः - वराह - आसीत् - झाला ॥३६॥ अयम् - हा - द्विपरार्धाख्यः - द्विपरार्ध आहे नाव ज्याचे असा - कालः - काल - अव्याकृतस्य - कार्याच्या उपाधीने शून्य अशा - अनादेः अनन्तस्य - व ज्याला आदि नाही व अन्तही नाही अशा - जगदात्मनः - जगाचे कारण अशा परमेश्वराचा - निमेषः - डोळ्याची पापणी मिटून उघडण्यास लागणारा काळ - उपचर्यते - म्हटला जातो ॥३७॥ धाममानिनाम् एव - देह, घर इत्यादिकांवर आसक्ति ठेवणार्या प्राण्यांचेच - ईश्वरः - समर्थ असा - अयम् - हा - कालः - काल - भूम्नः - परिपूर्ण अशा परमेश्वराला - ईशितुम् - नियमित करावयास - न प्रभुः - समर्थ होत नाही ॥३८॥ विकारेः - सोळा विकारांनी - युक्तैः - युक्त अशा आठ प्रकृति त्यांनी - सहितः - सहित असा - बहिः - बाहेर - विशेषादिभिः - पृथिवी इत्यादि भूतांनी झाकलेला असा - पञ्चाशत्कोटिविस्तृतः - पन्नास कोटि योजनांनी विस्तृत असा - अयम् - हा - आण्डकोशः - ब्रह्मांडकोश - अस्ति - आहे ॥३९॥ दशकोत्तराधिकैः - उत्तरोत्तर दसपटीने वाढणार्या पृथिवी आदिकरून आवरणांनी - आवृतः सः - झाकलेला असा तो ब्रह्मांडकोश - यत्र - ज्या परमेश्वरामध्ये - प्रविष्टः - लीन झाला असता - परमाणुवत् - परमाणूप्रमाणे - लक्ष्यते हि - खरोखर दिसतो - च - आणि - अन्ये - दुसर्या - कोटिशः - कोट्यवधि - अण्डराशयः - ब्रह्मांडाच्या राशी - अन्तर्गताः - आत असलेल्या - लक्ष्यन्ते - दिसतात ॥४०॥ तत् - त्याला - साक्षात् - प्रत्यक्ष - महात्मनः पुरुषस्य विष्णोः - श्रेष्ठ पुरुषरूप विष्णूचे - परम् - श्रेष्ठ - धाम - स्वरूप असे - सर्वकारणकारणम् - व सर्व कारणांचे कारण - अक्षरम् - अविनाशि - ब्रह्म - ब्रह्म - आहुः - म्हणतात ॥४१॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय अकरावा समाप्त |