श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय १० वा - अन्वयार्थ

दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन -

भगवति अन्तर्हिते - भगवान् अन्तर्धान पावले असता - लोकपितामहः - त्रैलोक्याचा पितामह असा - ब्रह्मा - ब्रह्मदेव - दैहिकीः - शारीरिक - च - आणि - मानसीः - मानसिक - प्रजाः - सृष्टि - कतिधा - किती प्रकारची - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥१॥

च - आणि - भगवान् - हे भगवन् - बहुवित्तम - ज्ञानिश्रेष्ठा - मे - माझ्याकडून - त्वयि - तुला - ये अर्थाः - ज्या गोष्टी - पृष्टाः - विचारल्या गेल्या - तान् - त्या गोष्टी - आनुपूर्व्येण - अनुक्रमाने - वदस्व - सांग - च - आणि - नः - आमच्या - सर्वसंशयान् - संपूर्ण संशयांना - छिन्धि - दूर कर ॥२॥

भार्गव - हे शौनका - अथ - नंतर - तेन क्षत्त्रा - त्या विदुराने - एवम् - याप्रमाणे - संचोदितः - प्रेरणा केलेला - कौषारवः मुनिः - मैत्रेय ऋषि - प्रीतः - संतुष्ट हो‌ऊन - हृदिस्थान - अन्तःकरणात असलेल्या - तान् प्रश्नान् - त्या प्रश्नांचे - प्रत्याह - उत्तर देता झाला ॥३॥

यत् - जसे - अजः भगवान् - जन्मरहित अशा भगवन्ताने - आह - सांगितले होते - तथा - त्याप्रमाणे - विरिञ्‌चः अपि - ब्रह्मदेव देखील - आत्मनि - परमात्म्याच्या ठिकाणी - आत्मानम् - मन - आवेश्य - लावून - दिव्यं वर्षशतम् - देवांची शंभर वर्षे - तपः - तपश्चर्या - चक्रे - करिता झाला ॥४॥

अब्जसंभूतः - कमलापासून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव - यद् अधिष्ठितः - ज्याच्या आश्रयाने होता - तत् पद्मम् - ते कमळ - च - आणि - तत् अम्भः - ते उदक - कालकृतवीर्येण - प्रलयकालाने उत्पन्न केले आहे सामर्थ्य ज्याचे अशा - वायुना - वार्‍याने - कम्पितं विलोक्य - हालविलेले पाहून ॥५॥

एधमानेन हि तपसा - वाढलेल्या तपश्चर्येने - च - आणि - आत्मसंस्थया विद्यया - परमात्मविषयक जे ज्ञान त्याने - विवृद्धविज्ञानबलः - वाढली आहे ज्ञानशक्‍ति ज्याची असा ब्रह्मदेव - अम्भसा सह वायुम् - उदकासहित वायूला - न्यपान् - पिऊन टाकिता झाला ॥६॥

स्वेन - स्वतः - यत् अधिष्ठितं - ज्याचा आश्रय केलेला होता - तत् पुष्करम् - ते कमळ - विद्यापि - आकाशाला व्यापून राहाणारे असे - विलोक्य - पाहून - प्राक् - पूर्वी - लीनान् - लय पावलेल्या - लोकान् - लोकांना - अनेन - या कमळाच्या योगाने - कल्पितास्मि - उत्पन्न करीन - इति सः अचिन्तयत् - असा तो विचार करिता झाला ॥७॥

भगवत्कर्मचोदितः - परमेश्वराने सृष्टिकर्माविषयी प्रेरणा केलेला - पद्मकोशम् - कमलाच्या कळ्यात - आवेश्य - शिरून - द्विसप्तधा - चवदाप्रकारे - वा - किंवा - उरुधा - पुष्कळ प्रकारे - भाव्यम् - करता येण्यासारखे अशा - तत् एकम् - ते एकच असे कमळ - त्रिधा - तीन प्रकाराने - व्यभाङ्क्षीत् - विभागिता झाला ॥८॥

जीवलोकस्य - प्राण्यांना भोग्य अशा लोकांचा - एतावान् - एवढा - संस्थाभेदः - रचनेचा प्रकार - समाहृतः - सांगितला - हि - कारण - असौ - हा - परमेष्ठी - ब्रह्मदेव - अनिमित्तस्य - निष्काम अशा - धर्मस्य - धर्माचा - विपाकः - परिणाम - अस्ति - आहे ॥९॥

प्रभो ब्रह्मन् - हे ब्राह्मणश्रेष्ठा - बहुरूपस्य - ज्याची पुष्कळ स्वरूपे आहेत अशा - अद्भुतकर्मणः - व अद्भुत ज्याच्या लीला आहेत अशा - हरेः - श्रीहरीचे - यत् - जे - कालाख्यम् - कालनावाचे - लक्षणम् - स्वरूप - आत्थ - तू सांगितलेस - तत् - ते - यथा - जसे असेल तसे - वर्णय - सांग ॥१०॥

निर्विशेषः - स्वरूप ज्याला नाही असा - अप्रतिष्ठितः - व आदि आणि अन्त ज्याच्या ठिकाणी नाही असा - गुणव्यतिकराकारः - सत्त्वादि त्रिगुणांचा परिणाम हाच आहे आकार ज्याचा असा - कालस्वरूप - काळरूपी - पुरुषः - ईश्वर - तदुपादानम् - तो काल आहे उपादान कारण ज्याचे असे - आत्मनम् - स्वतःचे स्वरूप असे जग - लीलया - लीलेने - असृजत् - उत्पन्न करिता झाला ॥११॥

ईश्वरेण - परमेश्वराने - विष्णुमायया संस्थितम् - विष्णूच्या मायेने संहार केलेले - ब्रह्मतन्मात्रम् - सूक्ष्म असे ब्रह्मस्वरूप - विश्वम् - जग - अव्यक्‍तमूर्तिना - अस्पष्ट आहे स्वरूप ज्याचे अशा - कालेन - कालाने - वै - खरोखर - परिछिन्नम् - निराळे प्रकाशित केले ॥१२॥

एतत् - हे कालाचे स्वरूप - यथा - जसे - इदानींम् - आता - अस्ति - आहे - तथा - तसे - अग्रे च - पूर्वीही - आसीत् - होते - पश्चात् अपि - पुढेही - ईदृशम् - अशा प्रकारचेच - भविष्यति - असेल - तस्य - त्या कालाच्या निमित्ताने - सर्गः - सृष्टि - नवविधः - नऊ प्रकारची - अस्ति - आहे - तु - परंतु - यः - जी - प्राकृतः - प्रकृतीपासून उत्पन्न झालेली - वैकृतः - आणि विकृतीपासून उत्पन्न झालेली - अस्ति - आहे - सः दशमः - मी दहावी होय ॥१३॥

अस्य - ह्या सृष्टीचा - कालद्रव्यगुणैः - काल, भूते आणि सत्त्वादि गुण यांनी - त्रिविधः - तीन प्रकारचा - प्रतिसंक्रमः - लय - भवति - होतो - महतः सर्गः - महत्तत्त्वाची उत्पत्ति - आद्यः - पहिली सृष्टि होय - सा - ती - आत्मनः - परमेश्वरापासून - गुणवैषमम्यम् - सत्त्वादि गुणांच्या न्यूनाधिक्याने झालेली ॥१४॥

यत्र द्रव्यज्ञानक्रियोदयः - पंचभूते, ज्ञानेंद्रिये आणि कर्मेन्द्रिये यांची जी उत्पत्ति ती - तु - तर - अहमः - अहंकाराची - द्वितीयः - दुसरी सृष्टि होय - द्रव्यशक्‍तिमान् - स्थूल महाभूते उत्पन्न करण्याची ज्यात शक्‍ति आहे अशी - तन्मात्रः - सूक्ष्म भूते ही - तृतीयः भूतसर्गः - तिसरी भूतसृष्टि होय ॥१५॥

ज्ञानक्रियात्मकः - ज्ञानेन्द्रिये आणि कर्मेन्द्रिये जिचे स्वरूप आहे अशी - यः सर्गः - जी सृष्टि - तु - तर - चतुर्थः - चवथी - ऐन्द्रियः - इन्द्रियसृष्टि होय - वैकारिकः - सात्त्विक अहंकारापासून उत्पन्न झालेली - देवसर्गः - देवतांची सृष्टि - पंचमः - पाचवी सृष्टि होय - मनः यन्मयम् - मन जीत अन्तर्भूत होते ॥१६॥

प्रभो - समर्था विदुरा - यः - जी - अबुद्धिकृतः - अज्ञान उत्पन्न करणार्‍या - तमसः - अविद्येची - सर्गः - उत्पत्ति - तु - तर - षष्ठः - सहावी सृष्टि होय - इमे - ह्या - षट् - सहा - प्राकृताः सर्गाः - प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या सृष्टि होत - वैकृतान् अपि - विकृतीपासून उत्पन्न झालेल्या सृष्टींना सुद्धा - मे - माझ्यापासून - शृणु - ऐक ॥१७॥

हरिमेधसः - दुःख हरण करणारी आहे धारणा ज्याची अशा - रजोभाजः - रजोगुणास धारणा करणार्‍या - भगवतः - परमेश्वराची - इयम् - ही - लीला - लीला - अस्ति - आहे - च - आणि - तस्थुषाम् - स्थावरांची - षड्‌विधः - सहा प्रकारची - यः मुख्यसर्गः - जी प्रधान सृष्टि - तु - तर - सप्तमः - सातवी ॥१८॥

वनस्पत्योषधिलताः - वनस्पति, औषधी आणि वेली - त्वक्‌साराः - त्वचा ज्यांची कठीण आहे असे वेळू इत्यादि - वीरुधः - आधाराशिवाय राहणार्‍या वेत इत्यादि वेली - द्रुमाः - वृक्ष - इमे - हे - उत्स्‍रोतसः - ज्यांच्या आहाराची गति ऊर्ध्व आहे असे - तमः प्रायाः - ज्यांची जनशक्‍ति स्पष्ट नाही असे - अन्तःस्पर्शाः - आतच ज्यांना स्पर्शाने ज्ञान होते असे - विशेषिणः - विशेष धर्म ज्यांना आहेत असे - सन्ति - असतात ॥१९॥

तिरश्चाम् - पशु इत्यादि प्राण्यांची - सर्पः - उत्पत्ति - अष्टमः - आठवा सर्ग होय - सह् - तो - अष्टाविंशद्विधः - अठ्ठावीस प्रकारचा - मतः - मानिला आहे - ते - ते - अविदः - उद्या काय होणार याचे धोरण नसलेले - भूरितमसः - पुष्कळ अज्ञान ज्यांना आहे म्हणजे आहार इत्यादि ज्ञानाशिवाय ज्यांना ज्ञान नाही असे - घ्राणज्ञाः - घ्राणेंद्रियाने ओळखणारे - हृदि अवेदिनः - हृदयात न जाणणारे म्हणजे सुखदुःख ज्यांच्या मनात फार वेळ राहत नाही असे - सन्ति - असतात ॥२०॥

सत्तम - हे साधुश्रेष्ठा - गौः - गाय - अजः - बकरा - महिषः - रेडा - कृष्णः - काळा हरिण - सूकरः - डुकर - गवयः - गवा - रुरुः - काळवीट - च - आणि - अविः - मेंढा - च - आणि - उष्ट्रः - उंट - इमे - हे - द्विशफाः - दोन खुरांचे - पशवः - पशु - सन्ति - आहेत ॥२१॥

क्षत्तः - हे विदुरा - तथाः - त्याप्रमाणे - खरः - गाढव - अश्वः - घोडा - अश्वतरः - खेचर - गौरः - एक प्रकारचा हरिण - शरभः - शरभ - च - आणि - वमरी - वनगाय - एते - हे - एकशफाः - एका खुराचे - पशवः सन्ति - पशु आहेत - पञ्चनखान् - पाच आहेत नखे ज्यांना अशा - पशून् - पशूंना - शृणु - ऐक ॥२२॥

श्वा - कुत्रा - सृगालः - कोल्हा - वृकः - लांडगा - व्याघ्रः - वाघ - मार्जारः - मांजर - शशशल्लकौ - ससा व साळ - सिंहः - सिंह - कपिः - वानर - गजः - हत्ती - कूर्मः - कांसव - गोधा - घोरपड - च - आणि - मकरादयः - मगर इत्यादि ॥२३॥

कङ्कगृध्रवटश्येनभासभल्लूकबर्हिणः - कंकपक्षी, गिधाड, वटवाघूळ, ससाणा, भास, अस्वल, मोर - हंससारसचक्राह्‌वकाकोलूकादयः - हंस, सारस, चक्रवाक, कावळा, घुबड इत्यादि - खगाः - पक्षी - सन्ति - आहेत ॥२४॥

क्षत्तः - हे विदुरा - च - आणि - अर्वाक्‌स्त्रोतः - वरून खाली आहे आहारविहाराची गति ज्याची अशी - एकविधः - एकप्रकारची - नृणाम् - मनुष्यांची - सर्गः - सृष्टि - नवमः - नववी होय - ते - ते मनुष्य - रजोधिकाः - रजोगुण आहे अधिक ज्यांमध्ये असे - कर्मपराः - कर्म ज्यांना श्रेष्ठ आहे असे - च - आणि - दुःखे तु - दुःखाच्या ठिकाणी तर - सुखमानिनः - सुख मानणारे - सन्ति - आहेत ॥२५॥

सत्तम - हे साधुश्रेष्ठा विदुरा - एते त्रयः - हे तीने सर्ग - वैकृताः एव - विकृतीपासून झालेलेच आहेत - च - आणि - देवसर्गः - देवसृष्टि - अपि - देखील - वैकृतः - विकृतीपासून उत्पन्न झालेली आहे - तु - परंतु - यः - जी - प्रोक्‍तः - सांगितली - सः - ती - वैकारिकः - सात्त्विक अहंकारापासून झालेली आहे - तु - परंतु - कौमारः - सनत्कुमारांची सृष्टि - उभयात्मकः - प्राकृत आणि वैकृत आहे ॥२६॥

च - आणि - देवसर्गः - देवांचा सृष्टि - अष्टविधः - आठ प्रकारची - अस्ति - आहे - विबुधाः - देव - पितरः - पितर - असुराः - दैत्य - गन्धर्वाप्सरसः - गंधर्व आणि अप्सरा - सिद्धाः - सिद्ध - यक्षरक्षांसिः - यक्ष आणि राक्षस - चारणाः - चारण ॥२७॥

भूतप्रेतपिशाचाः - भूत, प्रेत, पिशाच - विद्याध्राः - विद्याधर - किन्नरादयः - किन्नर इत्यादि - विदुर - हे विदुरा - एते - हे - दश - दहा - विश्वसृक्‌कृताः - ब्रह्मदेवाने केलेल्या - सर्गाः - सृष्टि - ते - तुला - आख्याताः - सांगितल्या ॥२८॥

अतःपरम् - यापुढे - वंशान् - वंशांना - च - आणि - मन्वन्तराणि - मन्वन्तरांना - प्रवक्ष्यामि - सांगतो - हरिः - परमेश्वर - रजःप्लुतः - रजोगुणाने युक्‍त होत्साता - कल्पादिषु - कल्पादिकांमध्ये - एवं स्त्रष्टा - याप्रमाणे सृष्टि उत्पन्न करणारा - अमोघसंकल्पः - निष्फळ नाही संकल्प ज्याचा असा - आत्मा एव - स्वतःच - आत्मना - आपल्या योगाने - आत्मानम् - आत्मस्वरूप अशा जगाला - सृजति - निर्माण करतो ॥२९॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय दहावा समाप्त

GO TOP