श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ९ वा - अन्वयार्थ

ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती -

भगवन् - हे परमेश्वरा - सुचिरात् तपसः - पुष्कळ काळ केलेल्या तपामुळे - अद्य - आज - त्वम् - तू - मे ज्ञातः असि - माझ्याकडून जाणिला गेला आहेस - ननु - खरोखर - भगवतः - परमेश्वराचे - गतिः - स्वरूप - देहभाजां न ज्ञायते - प्राण्यांना समजत नाही - इति - हा - तेषाम् - त्यांचा - अवद्यम् - दोष - अस्ति - आहे - त्वत् अन्यत् - तुझ्याहून इतर काही - न अस्ति - नाही - यत् भाति - जे भासते - तत् अपि - ते देखील - शुद्धम् - खरे - न - नाही - यत् - कारण - मायागुणव्यतिकरात् - मायेच्या सत्त्व आदिगुणांचे मिश्रण होण्यामुळे - त्वम् - तू - उरुः - अनेक प्रकारचा - विभासि - भासतोस ॥१॥

अवबोधरसोदयेन - ज्ञानरसाच्या अविर्भावाने - शश्वत् - निरंतर - निवृत्ततमसः - गेले आहे अज्ञान ज्यापासून अशा - तव - तुझे - सदनुग्रहाय - भक्तांवर अनुग्रह करण्याकरिता - आदौ - सृष्टीच्या आरंभी - अवतारशतैकबीजम् - शंभर अवतारांचे मूल कारण असे - यत् - जे रूप - गृहीतम् - स्वीकारिले - च - आणि - यन्नभिपद्मभवनात् - ज्याच्या नाभिकमळरूप आश्रयापासून - अहम् - मी - आविरासम् - उत्पन्न झालो - तत् - ते - एतत् - हे - रूपम् - रूप - अस्ति - आहे ॥२॥

अतः - या रूपाहून - परम् - दुसरे - यत् - जे - भवतः - तुझे - अविद्धवर्चः - स्पष्ट आहे प्रकाश ज्याचा असे - स्वरूपम् - स्वरूप - स्यात् - असेल - तत् - ते - न पश्यामि - मी पहात नाही - अतः - म्हणून - परम आत्मन् - हे परमेश्वरा - विश्वसृजम् - जगाला उत्पन्न करणार्‍या अशा - अविश्वम् - व सृष्टीहून निराळे अशा - भूतेन्द्रियात्मकम् - भूते आणि इंद्रिये आहेत स्वरूप ज्याचे अशा - ते - तुझ्या - अदः एकम् रूपम् - ह्या एका रूपाला - उपाश्रितः - शरण आलेला - अस्मि - मी आहे ॥३॥

भुवनमङ्गल - हे त्रैलोक्यमंगला - ते - तुझी - उपासकानाम् - उपासना करणार्‍या अशा - नः - आमच्या - मङ्गलाय - कल्याणाकरिता - तत् इदम् - ते हे स्वरूप - ध्याने - ध्यानामध्ये - वै - खरोखर - दर्शितम् - दाखविलेस - यः - जो - त्वम् - तू - असत्प्रसङ्गैः - निरिश्वरवादादि दुष्ट विषयांनी - नरकभाग्भिः - नरकाचे सेवन करणार्‍या पुरुषांनी - अनादृतः - अनादर केलेला असा - असि - आहेस - तस्मै - त्या - भगवते - परमेश्वर अशा - तुभ्यम् - तुला - नमः - नमस्कार - अनुविधेम - करतो ॥४॥

नाथ - हे ईश्वरा - ये - जे - तु - तर - श्रुतिवातनीतम् - वेदरूपी वायूने वाहून नेलेल्या - त्वदीयचरणाम्बुजकोशगन्धम् - तुझ्या चरणरूपी कमलकलिकेचा सुगंध - कर्णविवरैः - कर्णरूपी द्वारांनी - जिघ्रन्ति - हुंगतात - तेषाम् - त्या - स्वपुंसाम् - आपल्या भक्तांच्या - परया - उत्कृष्ट - भक्त्या - भक्तीने - गृहीतचरणः - धरले आहेत पाय ज्याचे असा - त्वम् - तू - तेषाम् - त्यांच्या - हृदयाम्बुजरुहात् - अंतःकरणरूपी कमलापासून - न अषैषि च - दूर होत नाहीस ॥५॥

यावत् - जोपर्यंत - लोकः - लोक - ते - तुझ्या - अभयम् - निर्भय अशा - अङ्घ्रिम् - चरणाला - न प्रवृणीत - स्वीकारीत नाहीत - तावत् - तोपर्यंत - तस्य - त्यांचे - द्रविणगेहसुहृन्निमित्तम् - द्रव्य, घर व मित्र हे आहेत कारण ज्याचे अशी - भयम् - भीति - अस्ति - असते - शोकः - शोक - स्पृहा - इच्छा - परिभवः - अनादर - विपुलः - पुष्कळ - लोभः - लोभ - च - आणि - तावत् - तोपर्यंत - सन्ति - असतात - मम इति - माझे असा - असदवग्रहः - खोटा अभिमान - आर्तिमूलम् - दुःखाचे कारण - भवति - होतो ॥६॥

दीनाः - दुःखित असे - लोभाभिभूतमनसः - व लोभाने ग्रासलेली आहेत अंतःकरणे ज्याची असे - ये - जे - सर्वाशुभोपशमनात् - सर्व दुःखांना दूर करणार्‍या अशा - भवतः - तुझ्या - प्रसंङ्गात् - कथा ऐकणे इत्यादी विषयांपासून - विमुखेन्द्रियाः - पराङ्‌मुख आहेत इन्द्रिये ज्यांची असे - कामसुखलेशलवाय - विषयसुखाच्या अतिशय अल्प अंशाकरिता - शश्वत् - निरंतर - अकुशलानि - दुःखजनक काम्य कर्मे - कुर्वन्ति - करतात - ते - ते - दैवेन - प्रारब्धाने - हतधियः - नष्ट झाली आहे बुद्धि ज्यांची असे - भवन्ति - होतात ॥७॥

उरुक्रम - मोठा आहे पराक्रम ज्याचा अशा - अच्युत - हे परमेश्वरा - क्षुट्‌त्रिधातुभिः - क्षुधा - शीतोष्णवातवर्षैः - व थंडी, ऊन, वारा व पाऊस यांनी - च - आणि - इतरेतरात् - परस्परांपासून - सुदुर्भरेण - अत्यंत दुःसह अशा - कामाग्निना - कामरूपी अग्नीने - च - आणि - रुषा - क्रोधाने - मुहुः - वारंवार - अर्द्यमानाः - पीडिल्या जाणार्‍या अशा - इमाः - ह्या प्रजांना - संपश्यतः - पाहणार्‍या - मे - माझे - मनः - मन - सीदते - दुःखित होते ॥८॥

ईश - हे परमेश्वरा - यावत् - जोपर्यंत - जनः - लोक - भगवतः - परमेश्वराची - इन्द्रियार्थमायाबलम् - इंन्द्रियस्वरूप व विषयस्वरूप जी माया तिचे आहे बल ज्याला अशा - इदम् - ह्या देह व जग इत्यादिकांना - आत्मनः - परमेश्वराहून - पृथक्त्वम् - भिन्नपणाने - पश्येत् - पाहील - तावत् - तोपर्यंत - क्रियार्था - कर्माचे आहे फल ज्यामध्ये असा - दुःखनिवहम् - दुःखसमूहाला - वहती - प्राप्त करून देणारा - व्यर्था अपि - खोटा असा देखील - असा - हा - संसृतिः - संसार - न प्रतिसंक्रमेत - निवृत्त होणार नाही ॥९॥

देव - हे परमेश्वरा - इह - या लोकात - युष्मत्प्रसङ्गविमुखाः - तुझ्या कथा, उपासना इत्यादी विषयांपासून तोंड फिरविलेले असे - ऋषयः अपि - ऋषि देखील - अह्नि - दिवसा - आपृतार्तकरणाः - कर्मे करण्यात गुंतलेली म्हणूनच पीडित आहेत इंन्द्रिये ज्यांची असे - निशि - रात्री - निःशयानाः - झोपी जाणारे असे - नानामनोरथाधिया - अनेक प्रकारचे आहेत मनोरथ जीमध्ये अशा बुद्धीने - क्षणभग्ननिद्राः - क्षणोक्षणी नष्ट झाली आहे निद्रा ज्यांची असे - देवाहतार्थरचनाः - प्रारब्धामुळे चोहोकडून नष्ट झाला आहे द्रव्यसंपादनाचा उद्योग ज्यांचा असे - संसरन्ति - संसारात पडतात ॥१०॥

नाथ - हे ईश्वरा - श्रुतेक्षितपथः - श्रवणाच्या योगाने पाहिला आहे मार्ग ज्याचा असा - त्वम् - तू - पुंसाम् - पुरुषांच्या - भावयोगपरिभावितहृत्सरोजे - भक्‍तीयोगाने शुद्ध झालेल्या हृदयरूपी कमळात - ननु - खरोखर - आस्से - वास करतोस - उरुगाय - हे अनंतकीर्ते - ते - तुझ्या - यत् यत् - ज्या ज्या शरीराला - धिया - मनाने - विभावयन्ति - ध्यातात - तत् तत् - ते ते - वपुः - शरीर - सदनुग्रहाय - भक्‍तांवर अनुग्रह करण्याकरिता - प्रणयसे - प्रगट करतोस ॥११॥

नानाजनेषु - अनेक लोकांमध्ये - अवहितः - अंतर्यामिरूपाने असलेला - सुहृत् - व मित्र असा - अन्तरात्मा - व गुप्तरूपाने संचार करणारा असा - एकः - एक - भवान् - तू - यत् - जसा - असदलभ्यया - दुर्जनांनी प्राप्त करण्यास अशक्‍य अशा - सर्वभूतदयया - सर्व प्राण्यांवरील दयेने - अतिप्रसीदति - अत्यंत प्रसन्न होतोस - तथा - तसा - हृदि - हृदयात - बद्धकामैः - ठेविली आहे इच्छा ज्यांनी अशा - सुरगणैः - देवांच्या समूहांनी - उपचितोपचारैः - पुष्कळ उपहारांनी - आराधितः - आराधना केलेला असा - न प्रसीदति - प्रसन्न होत नाही ॥१२॥

अतः - यास्तव - पुंसाम् - पुरुषांचे - अध्वराद्यैः - यज्ञ इत्यादि - विविधकर्मभिः - नाना प्रकारच्या कर्मांनी - दानेन - दानाने - उग्रतपसा च - आणि तीव्र तपश्चर्येने - च - आणि - व्रतचर्यया - व्रतांच्या आचरणाने - भगवतः - षड्गुणैश्वर्यसंपन्न अशा - तव - तुझा - आराधनम् एव - संतोषच - सत्क्रियार्थः - उत्तम कर्मफल - अस्ति - आहे - यत्र - ज्या तुझ्या ठिकाणी - अर्पितः - अर्पण केलेला - धर्मः - धर्म - कर्हिचित् - कधीही - न हृयते - नष्ट होत नाही ॥१३॥

शश्वत् - निरंतर - स्वरूपमहसा एव - ज्ञानस्वरूपाच्या प्रकाशानेच - निपीतभेदमोहाय - दूर झाला आहे भेदरूपी भ्रम ज्यापासून अशा - बोधधिषणाय - व ज्ञान हीच आहे विद्याशक्‍ति ज्याची अशा - परस्मै - श्रेष्ठ अशा परमेश्वराला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - विश्वोद्‌भवस्थितिलयेषु - सृष्टीची उत्पत्ति, पालन व संहार याविषयी - निमित्तलीलारासाय - कारण अशी जी माया तिच्या लीला हीच आहे क्रीडा ज्याची अशा - ईश्वराय - सर्वांचे नियमन करणार्‍या - ते - तुला - इदम् नमः - हा नमस्कार - चकृम - करतो ॥१४॥

असुविगमे - प्राणोत्क्रमणाच्या वेळी - विवशाः - पराधीन झालेले - ये - जे - यस्य - ज्या तुझी - अवतारगुणकर्मविडम्बनानि - अवतार, गुण व कर्मे यांचे आहे अनुकरण ज्यांमध्ये अशी - नामानि - भक्‍तवत्सल गोवर्धनधारी, दामोदर इत्यादि नावे - गृणन्ति - उच्चारितात - ते - ते पुरुष - नैकजन्मशमलम् - अनेक जन्मातील पाप - सहसा एव - एका वेळीच - हित्वा - टाकून - अपावृतम् - आवरण नसलेल्या अशा - ऋतम् - ब्रह्माला - संयान्ति - प्राप्त होतात - तम् - त्या - अजम् - जन्मरहित अशा ईश्वराला - प्रपद्ये - मी शरण आलो आहे ॥१५॥

आत्ममूलम् - आपणच आहे अधिष्ठान जिचे अशा प्रकृतीला - भित्वा - भेदून - यः - जो त्रिभुवनरूपी वृक्ष - स्थित्युद्‌भवप्रलयहेतवः - पालन्, उत्पति व नाश यांचे कारण असा - च - आणि - विभुः - व्यापक असा - स्वयंम् - स्वतः विष्णू - च - आणि - अहम् - मी - च - आणि - गिरिशः - शंकर - इति - असे - त्रिपात् - तीन आहेत पाय ज्याला असा - एकः - एक - उरुप्ररोहः - व अनेक आहेत फांद्या ज्याला असा - ववृधे - वाढला - तस्मै - त्या - भगवान् - भगवान - त्रिभुवनद्रुमाय - त्रिभुवनरूपी वृक्षाला - नमः - नमस्कार - अस्तु - असो ॥१६॥

यावत् - जोपर्यंत - अयम् - हा - लोकः - लोक - त्वदुदिते - तू सांगितलेल्या - कुशले - कल्याणकारक - स्वे - स्वकीय अशा - भवदर्चने कर्मणि - तुझ्या अर्चनरूपी कर्मात - प्रमत्तः - प्रमाद करणारा - विकर्मनिरतः - विरुद्ध अशा यज्ञादि काम्य कर्मामध्ये तत्पर असा - अस्ति - असतो - तावत् - तोपर्यंत - यः - जो - बलवान् - बलाढ्य असा - इह - या लोकात - अस्य - या जगाची - जीविताशाम् - जगण्याची आशा - सद्यः - तत्काल - छिनत्ति - तोडतो - तस्मै - त्या - अनिमिषाय - नित्य जागृत अशा कालाला - नमः - नमस्कार - अस्तु - असो ॥१७॥

यत् - जे - सर्वलोकनमस्कृतम् - संपूर्ण लोकांनी नमस्कार केलेले असे - द्विपरार्धधिष्‌ण्यम् - दोन परार्ध कालपर्यंत टिकणारे स्थान - अस्ति - आहे - तत् - त्या स्थानावर - अध्यासितः अपि - बसलेला असून सुद्धा - अहम् - मी - यस्मात् - ज्या तुझ्यापासून - विभेमि - भितो - च - आणि - अवरुरुत्समानः - तुझ्या प्राप्तीची इच्छा करणारा असा - बहुसवः - व पुष्कळ केले आहेत यज्ञ ज्याने असा - तपः - तपश्चर्या - तेपे - करता झाला - तस्मै - त्या - अधिमखाय - यज्ञांचा आश्रय अशा - भगवते - व सर्वगुणसंपन्न अशा - तुभ्यम् - तुला - नमः - नमस्कार असो ॥१८॥

निरस्तरतिः अपि - टाकलेले आहे विषयसुख ज्याने असा असूनहि - यः - जो - आत्मकृतसेतुपरीप्सया - आपण केलेल्या धर्ममर्यादेचे पालन करणार्‍या इच्छेने - तिर्यंङ्‌मनुष्यविबुधादिषु - पश्वादि प्राणी, मनुष्य, देव इत्यादि - जीवयोनिषु - जीवयोनामध्ये - आत्मेच्छया - आपल्या इच्छेने - अवरुद्धदेहः - घेतले आहे शरीर ज्याने असा - रेमे - क्रीडा करतो - तस्मै - त्या - पुरुषोत्तमाय - पुरुषश्रेष्ठ अशा - भगवते - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो ॥१९॥

दशार्धवृत्त्या - तम आदि पाच आहेत वृत्ति जिच्या अशी - अविद्यया - अविद्येने - अनुपहतः अपि - व्याप्त नसून सुद्धा - जठरीकृत लोकयात्रः - उदरामध्ये लीन केली आहे लोकरचना ज्याने असा - यः - जो - सुखम् - सुखाचा - विवृण्वन् - विस्तार करणारा असा - भीमोर्मिमालिनि - भयंकर लाटांच्या माला आहेत ज्यामध्ये अशा - अन्तर्जले - पाण्यात - अहिकशिपुस्पर्शानुकूलाम् - शेषरूपी शय्येचा स्पर्श आहे अनुकूल जिला अशी - निद्राम् - योगनिद्रा - उवाह - घेता झाला ॥२०॥

ईडय - स्तुति करण्यास योग्य अशा हे परमेश्वरा - यन्नाभिपद्मभवनात् - ज्यांच्या नाभीरूप कमलाच्या आश्रयापासून - अहम् - मी - आसम् - उत्पन्न झालो - च - आणि - यदनुग्रहेण - ज्याच्या कृपेने - लोकत्रयोपकरणः - तीन लोक उत्पन्न करण्याची साधने प्राप्त झाली ज्याला असा - आसम् - झालो - तस्मै - त्या - उदरस्थभवाय - उदरात आहे सर्व सृष्टि ज्याच्या अशा - योगनिद्रावसानविकसन्नलिनेक्षणाय - व योगनिद्रेच्या शेवटी उघडलेले आहेत कमलनेत्र ज्याने अशा - ते - तुला - नमः - नमस्कार ॥२१॥

सः अयम् - तो हा - समस्तजगताम् - सर्व त्रैलोक्याचा - सुहृत् - मित्र असा - एकः - एक - आत्मा - व सर्वात भरलेला असा - भगवान् - भगवान - यत् - ज्या - सत्त्वेन - ज्ञानाच्या योगाने - च - आणि - भगेन - ऐश्वर्याच्या योगाने - मृडयते - कृपा करतो - तेन एव - त्याच्याच योगाने - असौ प्रणतप्रियः - हा भक्‍तांचा कैवारी - मे - माझ्या - दृशम् - दृष्टीला - अनुस्पृशतात् - युक्‍त करो - यथा - जेणेकरून - अहम् - मी - पूर्ववत् - पूर्वीप्रमाणे - इदम् - हे विश्व - स्त्रक्ष्यामि - उत्पन्न करीन ॥२२॥

आत्मशक्‍त्या - आप

ली शक्‍तिरूप अशा - रमया - लक्ष्मीसहित - गृहीत गुणावतारः - घेतले आहेत सत्त्वादि गुणाच्या योगे अवतार ज्याने असा - प्रपन्नवरदः - शरण आलेल्यांना वर देणारा असा - एषः - हा परमेश्वर - यत् यत् - जे जे कर्म - करिष्यति - करील - तस्मिन् - त्या कर्माच्या ठिकाणी - स्वविक्रमम् - विष्णूचाच आहे प्रभाव ज्यामध्ये असे - इदम् - हे विश्व - सृजतः - उत्पन्न करणार्‍या अशा - मे - माझे - चेतः - अंतःकरण - सः - तो परमेश्वर - युञ्जीत - युक्‍त करो - यथा - जेणेकरून - कर्म - कर्माविषयीची आसक्‍ती - च - आणि - शमलम् - व त्यापासून उत्पन्न झालेले पाप - विजह्याम् - मी टाकून दे‌ईन ॥२३॥

अंभसि - उदकामध्ये - यस्य अनंतशक्‍तेः पुंसः - ज्या अमित पराक्रमी अशा पुरुषाच्या - नाभिहृदात् - नाभिरूप सरोवरातून - इह - येथे - विज्ञानशक्‍तिः अहं - महत्तत्त्वरूप जे चित्त ते आहे शक्‍ती ज्याची असा मी - आसम् - उत्पन्न झालो - अस्य - त्या आदिपुरुषाचे - इदं विचित्रं रुपं - हे विचित्र रूप असे जग - विवृण्वतः मे - विस्तृत करणार्‍या माझ्या - निगमस्य - वेदरूप - गिरां विसर्गः - वाणीचे उच्चारण - मा अरीरिषीष्ट - लुप्त हो‌ऊ नये ॥२४॥

अदभ्रकरूणः - मोठी आहे दया ज्याची असा - भगवान् पुराणः पुरुषः - भगवान आदि पुरुष - विवृद्धप्रेमस्मितेन - वृद्धिंगत झालेल्या प्रेमाने युक्‍त अशा मंदहास्याने - नयनाम्बुरुहं - आपले नेत्रकमल - विजृम्भन् - विकसित करणारा - उत्थाय - उठून - च विश्वविजयाय - आणि विश्वाची उत्पत्ति व्हावी म्हणून - माध्व्या गिरा - गोड शब्दांनी - नः विषादं - आमची चिंता - अपनयतात् - दूर करो ॥२५॥

सः - तो ब्रह्मदेव - तपोविद्यासमाधिभिः - तपश्चर्या, उपासना आणि समाधियोग यांच्या योगाने - स्वसंभवम् - आपली आहे उत्पत्ति ज्यापासून अशा विष्णूला - निशाम्य - पाहून - यावन्मनोवचः - मन व वाणी यांच्या शक्‍तीनुसार - एवम् - याप्रमाणे - स्तुत्वा - स्तुति करून - खिन्नवत् - दमलेल्यासारखा - विरराम - स्वस्थ राहिला ॥२६॥

अथ - नंतर - मधुसूदनः - मधु नामक दैत्याचा नाश करणारा असा विष्णु - आत्मनः - आपल्या - लोकसम्स्तानविज्ञाने - लोकरचनेच्या ज्ञानाविषयी - परिखिद्यतः - खिन्न होणार्‍या - ब्रह्मणः - ब्रह्मदेवाचे - अभिप्रेतम् - अभीष्ट - च - आणि - तेन - त्या - कल्पव्यतिकराम्भसा - कल्पातील क्षोम पावलेल्या पाण्यामुळे - विषण्णचेतसम् - खिन्न झाले आहे मन ज्याचे अशा - तम् - त्या ब्रह्मदेवाला - अन्वीक्ष्य - पाहून - अगाधया - गंभीर अशा - वाचा - वाणीने - कश्मलम् - पापाला - शमयन् इव - दूर करीतच - आह - बोलला ॥२७-२८॥

वेदगर्भ - वेद आहेत

उदरामध्ये ज्याच्या अशा ब्रह्मदेवा - त्वम् - तू - तन्द्रीम् - आळसाप्रत - मा गाः - जाऊ नकोस - सर्गे - सृष्टिविषयी - उद्यमम् - उद्योग - आवह - कर - भवान् - तू - यत् - ज्याप्रीत्यर्थ - माम् - मला - प्रार्थयसे - प्रार्थितोस - तत् - ते - मया - मी - अग्रे - पूर्वी - आपादितम् - प्राप्त् करून ठेविले आहे ॥२९॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा ! - त्वम् - तू - भूयः - पुनः - तपः - तपश्चर्येचे - च - आणि - मदाश्रयाम् - मी आधार जिचा अशा - विद्याम् एव - समाधियोगाचे - आतिष्ठ - आचरण कर - ताभ्याम् - त्या दोहोंच्या योगाने - अन्तर्हृदि - अन्तःकरणात - अपावृतान् - प्रगट झालेल्या - लोकान् - लोकांना - द्रक्ष्यसि - तू पाहशील ॥३०॥

ब्रह्मन् - हे ब्रह्मदेवा - ततः - नंतर - भक्‍तियुक्‍तः - भक्‍तीने युक्‍त असा - समाहितः - व स्थिरचित्त असा - त्वम् - तू - आत्मानि - स्वतःमध्ये - च - आणि - लोके - लोकांत - ततम् - व्यापून असलेल्या अशा - माम् - मला - द्रष्टा - पाहशील - च - आणि - मयि - माझ्या ठिकाणी - लोकान् - लोकांना - च - आणि - आत्मनः - स्वतःला - द्रष्टा - पाहशील ॥३१॥

लोकः - लोक - यदा - जेव्हा - दारुषु - लाकडात - आग्नेम् इव - अग्नि असतो त्याप्रमाणे - सर्वभूतेषु - सर्व प्राण्यांमध्ये - स्थितम् - भरलेला असे - माम् - मला - प्रतिचक्षीत - जाणतील - तर्हि एव - त्या वेळीच - सः - तो लोक - कश्मलम् - मोह - जह्यात् - टाकून दे‌ईल ॥३२॥

यदा - ज्यावेळी - भूतेन्द्रियगुणाशयैः - भूते, इन्द्रिये, सत्त्व आदि गुण व अन्तःकरण यांनी - रहितम् - रहित अशा - आत्मानम् - जीवाला - स्वरूपेण - स्वतःचा स्वरूपभूत अशा - मया - मी जो परमेश्वर त्याशी - उपेतम् - एक झालेला असा - पश्यन् - पाहणारा - भवति - होतो - तदा - तेव्हा - स्वाराज्यम् - मोक्षाला - ऋच्छति - प्राप्त होतो ॥३३॥

नानाकर्मवितानेन - अनेक प्रकारच्या कर्मांच्या विस्तारामुळे - बह्वीः - पुष्कळ - प्रजाः - प्रजा - सिसृक्षतः - उत्पन्न करण्याची इच्छा करणार्‍या अशा - ते - तुझे - आत्मा - मन - अस्मिन् - या सृष्टिकार्याविषयी - न अवसीदति - खिन्न होणारा नाही - यत् - कारण - त्वयि - तुझ्यावर - वर्षीयान् - अत्यन्त मोठा - मदनुग्रहः - माझा अनुग्रह - अस्ति - आहे ॥३४॥

यत् - कारण - प्रजाः - प्रजा - संसृजतः अपि - उत्पन्न करीत असताही - ते - तुझे - मनः - मन - मयि - माझ्या ठिकाणी - निर्बद्धम् - लागलेले - अस्ति - आहे - अतः - म्हणून - पापीयान् - मोह करणारा - रजोगुणः - रजोगुण - आद्यम् ऋषिम् त्वाम् - आदि ऋषि अशा तुला - न बध्नाति - बंधनात पाडणार नाही ॥३५॥

यत् - ज्या अर्थी - त्वम् - तू - माम् - मला - भूतेन्द्रियगुणात्मभिः - भूते, इंन्द्रिये, सत्त्व इत्यादी गुण आणि अहंकार यांनी - अयुक्‍तम् - रहित अशा - मन्यसे - मानतोस - तु - त्याअर्थी - देहिनाम् - प्राण्यांना - दुर्विज्ञेयः अपि - जाणण्यास अशक्‍य असाहि - अहम् - मी - अद्य - आज - भवता - तुझ्याकडून - ज्ञातः - ओळखिला गेलो ॥३६॥

सलिले - पाण्यात - पुष्करस्य - कमलाचे - मूलम् - आधार - नालेन - देठाने - विचिन्वतः - शोध करणार्‍या अशा - तुभ्यम् - तुला - मद्विचिकित्सायाम् - माझ्याविषयी संशय उत्पन्न झाला असता - मे - माझ्याकडून - आत्मा - स्वतःचे रूप - अबहिः - तुझ्या हृदयातच - दर्शितः - दाखविले गेले ॥३७॥

अङ्ग - हे ब्रह्मदेवा - यत् - जी - यत्कथाऽभ्युदयाङ्कितम् - माझ्या कथारूपी उत्कर्षाने युक्‍त अशी - मत्स्तोत्रम् - माझी स्तुति - चकर्थ - तू केली - यत् वा - किंवा जी - ते - तुला - तपसि - तपश्चर्येमध्ये - निष्ठा - आस्था - उत्पन्ना - उत्पन्न झाली - सः एषः - तो हा - मदनुग्रहः - माझा अनुग्रह - अस्ति - आहे ॥३८॥

गुणमयम् - सत्त्वादि गुणांनी भासणार्‍या अशा - अपि - देखील - मा - मला - निर्गुणम् - गुणरहित असे - अनुवर्णयन् - म्हणणारा - त्वम् - तू - लोकानाम् - लोकांच्या - विजयेच्छया - उत्कर्षाच्या इच्छेने - यत् - ज्या अर्थी - अस्तौषीः - माझी स्तुति करता झालास - तत् - त्या अर्थी - अहम् - मी - ते - तुझ्यावर - प्रीतः - संतुष्ट झालो आहे - ते - तुझे - भद्रम् - कल्याण - अस्तु - असो ॥३९॥

यः - जो - पुमान् - पुरुष - एतेन - ह्या - स्तोत्रेण - स्तोत्राने - नित्यम् - नेहमी - माम् - माझी - स्तुत्वा - स्तुति करून - भजेत् - सेवा करील - सर्वकामवरेश्वरः - सर्व इच्छित वर देण्याविषयी समर्थ असा - अहम् - मी - तस्य - त्याला - आशु - लवकर - संप्रसीदेयं - प्रसन्न होईन. ॥४०॥

पूर्तेन - विहिरी, धर्मशाळा व लोकोपयोगी अन्य कृत्यांनी - तपसा - यपश्चर्येने - यज्ञैः - यज्ञांनी - दानैः - दानांनी - च - आणि - योगसमाधिना - योगाभ्यासाने - राद्धम् - सिद्ध होणारे - पुंसाम् - पुरुषांचे - निःश्रेयसम् - उत्तम फळ - मत्प्रीतिः - माझा संतोष - स्यात् - होय - इति - असे - तत्त्वविन्मतम् - तत्त्ववेत्त्यांचे मत - अस्ति - आहे ॥४१॥

धातः - हे ब्रह्मदेवा - यत्कृते - ज्यांच्याकरिता - देहादिः - देह, इन्द्रिये इत्यादिक - प्रियः - प्रिय - अस्ति - आहे - तेषाम् - त्या - आत्मनाम् - जीवांचा - आत्मा - आत्मा - अहम् - मी - प्रेयसाम् अपि - प्रिय वस्तूंपेक्षाही - प्रेष्ठः - प्रिय - अस्म् - आहे - अतः - म्हनून - मयि - माझ्यावर - रतिम् - प्रेम - कुर्यात् - करावे - यत्कृते - ज्याच्यासाठी - देहादिः - देह इत्यादि - प्रियः - प्रिय आहे ॥४२॥

आत्मा - स्वतः तू - इदम् - ह्या विश्वाला - च - आणि - याः - ज्या - मयि - माझ्यामध्ये - अनुशेरते - लय पावल्या आहेत - ताः - त्या - प्रजाः - प्रजांना - आत्मयोनिना - मी आहे कारण ज्याचे अशा - सर्ववेदमयेन - संपूर्ण वेद आहेत उदरात अशा - आत्मना - आपल्या योगाने - यथापूर्वम् - पूर्वीप्रमाणे - सृज - उत्पन्न कर ॥४३॥

कञ्जनाभः - कमलाप्रमाणे आहे नाभि ज्याची असा - प्रधानपुरुषेश्वरः - प्रकृति व पुरुष यांचा नियन्ता असा परमेश्वर - जगत्स्त्रष्ट्रे - जगाला उत्पन्न करणार्‍या अशा - तस्मा - ब्रह्मदेवाला - इदम् - हे जग - एवम् - याप्रमाणे - व्यज्य - स्पष्ट दाखवून - स्वेन रूपेण - आपल्या स्वरूपाने - तिरोदधे - गुप्त झाला ॥४४॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय नववा समाप्त

GO TOP