श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ८ वा - अन्वयार्थ

ब्रह्मदेवाची उत्पत्ती -

पूरु वंश - पूरु राजाचा वंश - बत - अहो - सत्सेवनीयः - साधूंनी सेवन करण्यास योग्य असा - अस्ति - आहे - यत् - कारण - इह - ह्या पूरुवंशात - भगवत्प्रधानः - भगवन्तालाच मानणारा असा - लोकपालः - दक्षिण दिशेचा पालक यमधर्म त्याचा अवतार - त्वम् - तू - बभूविथ - उत्पन्न झालासा ॥१॥

सः अहम् - तो मी - क्षुल्लसुखाय - क्षुद्र सुखाकरिता - महत् - मोठ्या - दुःखम् - दुःखात - गतानाम् - पडलेल्या - नृणाम् - मनुष्यांच्या - तस्य - दुःखाच्या - विरमाय - नाशाकरिता - भागवतम् - भागवतनामक - पुराणम् - पुराणाला - प्रवर्तये - करतो - यत् - जे भागवत पुराण - साक्षात् भगवान् शेषः - प्रत्यक्ष शेष भगवान् - ऋषिभ्यः - ऋषींना - आह - सांगता झाला ॥२॥

कुमारमुख्याः - सनत्कुमार आहे मुख्य ज्या मध्ये असे - मुनयः - ऋषि - उर्व्याम् - पाताळतळी - आसीनम् - बसलेल्या - अकुण्ठसत्त्वम् - अकुण्ठित आहे ज्ञान ज्यांचे अशा - आद्यं देवम् - आदिदेव अशा - भगवन्तं संकर्षणम् - भगवान् संकर्षणाला - अतः - संकर्षणापेक्षा - परस्य - श्रेष्ठ अशा परमेश्वराचे - तत्त्वम् - यथार्थ स्वरूप - विवित्सवः - जाणण्याच्या इच्छेने - अन्वपृच्छन् - प्रश्न करते झाले ॥३॥

यम् - ज्याला - वासुदेवाभिधम् आमनन्ति - वासुदेव नावाने संबोधितात - तत् स्वम् एव धिष्‌ण्यम् - त्या स्वतःचाच आश्रयभूत अशा वासुदेवाला - बहु मानयन्तम् - फार मान देणार्‍या - प्रत्यग्धृताक्षाम्बुजकोशम् - अन्तर्मुख केलेल्या नेत्ररूपी कमळाच्या कळीला - विबुधोदयाय - सनत्कुमारादि ज्ञान्यांच्या उत्कर्षाकरिता - किञ्चित् उन्मीलयन्तम् - किंचित उघडणार्‍या ॥४॥

वरार्थाः - ज्यांना पतीची इच्छा आहे अशा - अहिराजकन्याः - सर्प राजांच्या कन्या - नानाबलिभिः - अनेक प्रकारच्या उपहारांनी - सप्रेम - प्रेमाने - यत् - ज्याला - अर्चन्ति - पूजितात - चरणोपधानम् - ज्याच्यावर शेष आपले पाय ठेवतो अशा - तत् पद्मम् - त्या कमलाला - स्वर्धुन्युदार्द्रैः - गंगेच्या पाण्याने भिजलेल्या - स्वजटाकलापैः - आपल्या जटाकलापांनी - उपस्पृशन्तु - स्पर्श करणारे ॥५॥

तज्ज्ञाः - शेषाच्या प्रभावाला जाणणारे सनत्कुमारादि ऋषि - अस्य - शेषाच्या - कृतानि - चरित्रांना - अनुरागस्खलत्पदेन - प्रेमामुळे ज्यातील पदे अर्धवट उच्चारली जात आहेत अशा - वचसा - वाक्‍यांनी - मुहुः - वारंवार - गृणन्तः - वर्णन करणारे - ऋषयः - सनत्कुमारादि ऋषि - किरीटसाहस्त्रमणि - सहस्त्र मुकुटांवरील उत्तम मण्यांनी प्रकाशित आहेत - प्रवेकप्रद्योतितोद्दामफणासहस्त्रम् - वर उभारलेल्या हजार फणा ज्याच्या अशा - संकर्षणं अपृच्छन् - शेषाला प्रश्न करिते झाले ॥६॥

भगवत्तमेन तेन - श्रेष्ठ अशा भगवान् शेषाने - एतत् - हे भागवत - निवृत्तिधर्माभिरताय सनत्कुमाराय - मोक्षधर्मात आसक्‍त असलेल्या सनत्कुमाराला - प्रोक्‍तम् - सांगितले - किल - अशी प्रसिद्धी आहे - अङ्ग - हे विदुरा - च - आणि - पृष्टः सः - सांख्यायनाने प्रश्न केलेला तो सनत्कुमार - धृतव्रताय - ज्याने व्रतांचा - सांख्यायनाय - सांख्यायन ऋषीला - (एतत् भागवतं) आह - हे भागवत सांगता झाला ॥७॥

पारमहंस्यमुख्य - परमहंसाच्या धर्मात पूर्ण असा - सः सांख्यायनः - तो सांख्यायन - भगवद्विभूतीः विवक्षमाणः - परमेश्वराच्या लीलांचे वर्णन करण्याच्या इच्छेने - अन्विताय - अनुरूप असे वर्तन करणार्‍या - अस्मद्‌गुरवे पराशराय - आमचे गुरु जे पराशर त्यांना - च - आणि - बृहस्पतेः - बृहस्पतीला - जगाद - सांगता झाला ॥८॥

पुलस्त्येन - पुलस्त्य ऋषीने - उक्‍तः - वर दिलेला - सः - तो - दयालुः - दयाळू - मुनिः - ऋषि पराशर - आद्यम् - पहिले असे - पुराणम् - भागवत पुराण - मह्यम् - मला - प्रोवाच - सांगता झाला - वत्स - हे विदुरा - सः अहम् - तो मी - श्रद्धालवे - श्रद्धाळू अशा - नित्यम् अनुव्रताय - व भागवतधर्माचे नित्य आचरण करणार्‍या - तुभ्यम् - तुला - एतत् - हे भागवत - कथयामि - सांगतो ॥९॥

इदं विश्वम् - हे जग - तदा - त्या वेळी - उदाप्लुतम् - पाण्यात बुडालेले - आसीत् - होते - यत् - ज्या वेळी - स्वात्मरतौ - आत्मस्वरूपाच्या आनंदात - कृतक्षणः - मानिला आहे उत्साह ज्याने असा - निरीहः - निरिच्छ असा - एकः - एकटा - अहीन्द्रतल्पे - सर्पराजरूपी शय्येवर - अधिशयानः - निजणारा - निद्रया - योगनिद्रेने - अमीलितदृक् - मावळली नाही ज्ञानशक्‍ति ज्याची असा भगवान् - न्यमीलयत् - डोळे मिटता झाला ॥१०॥

यथा - ज्याप्रमाणे - अनलः - अग्नि - दारुणि - लाकडात - रुद्धवीर्य - गुप्त आहे शक्ति ज्याची असा - आस्ते - असतो - तथा - त्याप्रमाणे - अन्तःशरीरे - शरीरामध्ये - अर्पितभूतसूक्ष्मः - लीन केली आहेत सूक्ष्मभूते ज्याने असा - कालात्मिकाम् - व काल आहे स्वरूप जीचे अशा - शक्‍तिम् - शक्‍तीला - उदीरयाणः - जागृत करणारा असा - सः - तो परमेश्वर - तस्मिन् - त्या - स्वे - आपल्या - पदे - अधिष्ठानभूत अशा - सलिले - पाण्यात - उवास - रहाता झाला ॥११॥

च - आणि - चतुर्युगानाम् सहस्त्रम् - एक हजार युग चौकड्यापर्यंत - अप्सु - पाण्यात - स्वपन् - झोप घेणारा असा - स्वया - आपल्या - उदीरितया - जागृत असलेल्या - कालख्यया - काल आहे स्वरूप जिचे अशा - स्वशक्त्या - आपल्या शक्तीने - आसादितकर्मतन्त्रः - मिळवित आहे कर्म सामग्री ज्याने असा - सः - तो परमेश्वर - अपीतान् - लय पावलेल्या - लोकान् - लोकांना - स्वदेहे - आपल्या शरीरात - ददृशे - पाहता झाला ॥१२॥

तदा - त्यावेळी - अर्थसूक्ष्माभिनिविष्टदृष्टेः - सूक्ष्म अशा शब्दस्पर्श इत्यादी भूतांकडे लाविली आहे दृष्टि ज्याने अशा - तस्य - त्या परमेश्वराच्या - अन्तर्गतः - आत असलेला - तनीयान् अर्थः - सूक्ष्म भूतांचा समूह - कालानुगतेन - सृष्टिकालाला अनुकूल अशा - रजसा गुणेन - रजोगुणाने - विद्धः - चाळविलेला असता - सूष्यन् - उत्पत्ति करणारा - नाभिदेशात् - नाभिप्रदेशातून - अभिद्यत - उत्पन्न झाला ॥१३॥

कर्मप्रतिबोधनेन - प्राण्यांच्या प्राक्‍तन कर्मांना जागृत करणार्‍या अशा - कालेन - कालाच्या योगाने - आत्मयोनिः - विष्णु आहे उत्पत्तिस्थान ज्यांचे अशा - सः पद्मकोशः - तो कमलाचा कळा - अर्कः इव - सूर्याप्रमाणे - स्वरोचिषा - आपल्या तेजाने - तत् - त्या - विशालम् - अफाट अशा - सलिलम् - पाण्याला - विद्योतयन् - प्रकाशित करीत - सहसा - एकएकी - उदतिष्ठत् - वर आला. ॥१४॥

उ - अहो - सः एव - तोच - विष्णुः - विष्णु - तत् - त्या - सर्वगुणावभासम् - प्राण्यांच्या सर्व भोग्य पदार्थांना प्रकाशित करणार्‍या अशा - लोकपद्मम् - लोकरूपी कमलात - प्रावीविशत् - अन्तर्यामिरूपाने शिरला - तस्मिन् - त्या कमलामध्ये - यं - ज्याला - स्वयम्भुवम् - स्वयंभू - वदन्ति - म्हणतात - सः - तो - स्वयम् - स्वतः - वेदमयः - वेदस्वरूप असा - विधाता - ब्रह्मदेव - अभूत् - उत्पन्न झाला. ॥१५॥

तस्याम् - त्या - अम्भोरुहकर्णिकायाम् - कमलाच्या गाभ्यात - अवस्थितः - बसलेला असा - लोकम् - जनाला - अपश्यमानः - न पाहिल्यामुळे - परिक्रमन् - फिरत फिरत - व्योम्नि - आकाशात - अनुदिशम् - चार दिशांकडे - विवृत्तनेत्रः - फिरवले आहेत डोळे ज्याने असा - सः - ब्रह्मदेव - चत्वारि - चार - मुखानि - मुखे - लेभे - मिळविता झाला. ॥१६॥

तस्मात् - त्या - युगान्नश्वसनावघूर्णजलोर्मिचक्रात - प्रलयकाळाच्या वायूने उसळलेले आहेत पाण्याच्या तरंगांचे समूह ज्यावर अशा - सलिलात् - पाण्यावर - विरूढम् - उद्भवलेल्या - कञ्चम् - कमळावर - उपाश्रितः - बसलेला - आदिदेवः - ब्रह्मदेव - लोकतत्त्वम् - लोकांच्या रचनेला - च - आणि - अद्धा - साक्षात - आत्मानम् - स्वतःला - उ - निश्चयाने - न अविदत् - जाणता झाला नाही. ॥१७॥

यः - जो - असौ - हा - अहम् - मी - अब्जपृष्ठे - कमळाच्या पृष्ठावर - अस्मि - आहे - एषः कः - हा कोण - वा - किंवा - अप्सु - पाण्यात - एतत् - हे - अनन्यत् - एकटेच - अब्जम् - कमळ - कुतः - कोठून - आगतम् - आले - यत्र - ज्यावर - एतत् - हे कमळ - अधिष्ठितम् - आधार घेऊन राहिले - अस्ति - आहे - तत् - ते - इह - येथे - अधस्तात् - खाली - किंचन - काही - हि - खरोखर - अस्ति - आहे - तेन सता - ती सद्वस्तूच - नु - निश्चयाने - भाव्यम् - असली पाहिजे ॥१८॥

सः अजः - तो ब्रह्मदेव - इत्थम् - याप्रमाणे - उद्वीक्ष्य - विचार करून - तदब्जनालनाडीभिः - त्या कमळाच्या देठाच्या छिद्रातून - अन्तर्जलम् - पाण्यात - आविवेश - शिरला - च - आणि - तत् - त्या - खरनालननाभिम् - कठीण आहे देठ ज्याचा अशा त्या कमलाच्या देठाच्या आश्रयाला - विचिन्वन् - शोधीत - अर्वाक् - खाली - गतः - गेलेला असा - तत् - देठाच्या आधाराला - न अविदन्त - न प्राप्त होता झाला ॥१९॥

विदुर - हे विदुरा - अपारे - अगाध अशा - तमसि - अज्ञानमोहात - पतित्वा - पडून - आत्मसर्गम् - आपल्या उत्पत्तीच्या कारणाला - विचिन्वतः - शोधणार्‍या ब्रह्मदेवाचा - सुमहान् - फार मोठा - त्रिणेभिः - वर्तमान, भूत व भविष्य अशा तीन आहेत धावा ज्याला असा काल - अभूत् - झाला - यः - जो काल - अजस्य - ईश्वराचे - हेतिः - शस्त्रस्वरूप असा - देहभाजाम् - व मनुष्यांना - भयम् - भीति - ईरयाणः - उत्पन्न करणारा असा - तेषाम् - मनुष्यांच्या - आयुः - आयुष्याला - परिक्षिणोति - क्षीण करतो ॥२०॥

अप्रतिलब्धक्रामः - पूर्ण झाला नाही मनोरथ ज्याचा असा - ततः - तेथून - निवृत्तः - परत फिरलेला असा - सः देवः - तो ब्रह्मदेव - पुनः - पुनः - स्वधिष्‌ण्यम् - आपल्या स्थानावर - आसाद्य - येऊन - शनैः - हळूहळू - जितश्वासनिवृत्तचित्तः - प्राणांचे नियमन केल्यामुळे स्वस्थ झाले आहे अन्तःकरण ज्याचे असा - आरूढसमाधियोगः - व अभ्यास केला आहे समाधियोगाचा ज्याने असा ॥२१॥

पुरुषायुषा - पुरुषाचे आहे आयुष्य ज्यात अशा - कालेन - काळाने - अभिप्रवृत्तयोगेन - अभ्यासिलेल्या समाधियोगामुळे - विरूढबोधः - उत्पन्न झाले आहे ज्ञान ज्याला असा - सः अजः - तो ब्रह्मदेव - यत् - जे - पूर्वम् - पूर्वी - न अपश्यत - पाहता झाला नव्हता - तत् - ते स्वरूप - स्वयम् - स्वतःच्या - अन्तर्हृदये - अन्तःकरणात - अवभातम् - प्रगट झालेले - अपश्यत - पाहिले ॥२२॥

फणातपत्रायुतमूर्धरत्नद्युभिः - फणारूपी छत्रांनी युक्त अशा मस्तकांच्या वरील रत्नांच्या प्रभांना - हतध्वान्तयुगान्ततोये - घालविला आहे अन्धःकार ज्यावरील अशा प्रलयकाळाच्या उदकात - मृणालगौरायतशेषभोगपर्यङ्के - कमळाच्या गाभ्याप्रमाणे शुभ्र व भव्य अशा शेषरूपी शय्येवर - शयानम् - निजणार्‍या - एकं पुरुषम् - एका पुरुषाला ॥२३॥

संध्याभ्रनीवेः - संध्याकाळचे मेघच आहेत नेसण्याचे वस्त्र ज्याचे अशा - उरुरुक्ममूर्घ्नः - व विपुल आहेत सुवर्णाची शिखरे ज्याला अशा - रत्नौदधारौषधिसौमनस्यवनस्त्रजः - रत्ने, उदकांचे प्रवाह, वनस्पति व पुष्पसमूह यांच्या आहेत वनमाळा ज्यावर अशा - वेणुभुजाङ्घ्रिपाङ्घ्रेः - वेळू हेच ज्याचे बाहू आहेत व वृक्ष हेच ज्याचे पाय आहेत अशा - हरितोपलाद्रेः - पाचूच्या पर्वताच्या - प्रेक्षाम् - शोभेला - क्षिपन्तम् - मागे सारणाराला ॥२४॥

लोकत्रयसंग्रहेण - तीन लोकांचा आहे समावेश ज्यामध्ये अशा - विचित्रदिव्याभरणांशुकानाम् कृताश्रिया - चित्रविचित्र व उंची असे अलंकार आणि वस्त्रे यांना दिली आहे सर्वत्र शोभा ज्याने अशा - आयामतः - लांबीने - च - आणि - विस्तरतः - रुंदीने - स्वमानदेहेन - सुंदर व निरुपम अशा शरीराने - अपाश्रितवेषदेहम् - धारण केले आहेत अलंकार ज्यावर असे आहे शरीर ज्याचे अशा ॥२५॥

स्वकामाय - आपल्या इच्छित फलाकरिता - विवक्तमार्गैः - शुद्ध मार्गानी - अभ्यर्चताम् - पूजा करणार्‍या - पुंसाम् - पुरुषांना - नखेन्दुमयूखभिन्नाङ्गुलिचारुपत्रम् - नखरूपी चंद्राच्या किरणांनी युक्त अशी बोटे हीच आहेत सुंदर पाने ज्याची अशा - कामदुघाङ्घ्रिपद्मम् - इच्छा पूर्ण करणार्‍या अशा चरणकमलाला - कृपया - दयेने - प्रदर्शयन्तम् - दाखविणाराला ॥२६॥

लोकार्तिहरस्मितेन - लोकांच्या पीडेला हरण करणारे आहे मंद हास्य ज्यामध्ये अशा - परिस्फुरत्कुण्डलमण्डितेन - चकचकणार्‍या कुंडलांनी सुशोभित अशा - अधरबिम्बभासा - अधरोष्ठरूपी बिंबफलाच्या कांतीने - शोणायितेन - लाल दिसणार्‍या अशा - सुनसेन - सुंदर आहे नासिका ज्याची अशा - सुभ्रवा - सुंदर आहेत भ्रुकटी ज्यावर अशा - मुखेन - मुखाने - प्रत्यर्हयन्तम् - भक्तांचा सत्कार परत करणार्‍या अशा ॥२७॥

वत्स - हे विदुरा - नितम्‌बे - कमरेला - कदम्बकिञ्जल्कपिशङ्गवाससा - कदंबाच्या फुलातील केशराप्रमाणे पिंगट वर्णाच्या वस्त्राने - च - आणि - मेखलया - कमरपट्ट्याने - च - आणि - श्रीवत्सवक्षस्थलवल्लभेन - श्रीवत्सनामक केसांच्या भोवर्‍याने युक्त असे जे वक्षस्थळ त्याला प्रिय अशा - अनंतधनेन - अगणित आहे किंमत ज्याची अशा - हारेण - हाराने - स्वलङ्कृतम् - सुशोभित अशा ॥२८॥

परार्ध्यकेयुरमणि - बहुमोल बाहुभूषणांनी व उत्तम मण्यांनी - प्रवेकपर्यस्तदोर्दण्डसहस्त्रशाखम् - भरलेले असे बाहू ह्याच आहेत अनंत शाखा ज्याच्या अशा - अव्यक्तमूलम् - अदृष्ट आहेत मुळे ज्यांची म्हणजे ब्रह्म आहे मूळ कारण ज्याचे अशा - अहीन्द्रभोगैः - शेषाच्या फणांनी - अधिवीतवल्शम् - वेष्टिलेल्या आहेत शाखा ज्याच्या अशा - भुवनाङ्घ्रिपेन्द्रम् - जगत्स्वरूपी मोठ्या वृक्षाला ॥२९॥

चराचरौकः - स्थावर आणि जंगम यांचा आश्रय अशा - अहीन्द्रबन्धुम् - शेषाची प्रीतिस्थान अशा - सलिलोपगूढम् - पाण्याने वेष्टिलेला अशा - किरीटसाहस्त्रहिरण्यशृङ्गम् - हजारो किरीट हेच आहेत सुवर्णाची शिखरे ज्याची अशा - आविर्भवत्कौस्तुभरत्नगर्भम् - स्पष्ट दिसत आहे कौस्तुभमणि ज्यात असा आहे अंतर्भाग ज्याचा - भगवन्महीन्‌ध्रम् - भगवत्स्वरूपी पर्वताला ॥३०॥

आम्नायमधुव्रतश्रिया - वेदरूपी भ्रमरांची आहे शोभा जिला अशा - स्वकीर्तिमय्या - आपली कीर्तिस्वरूप अशा - वनमालया - वनमालेच्या योगाने - निवीतम् - व्याप्त अशा - सूर्येन्दुवाय्वग्न्यगमम् - सूर्य, चंद्र व वायु यांना जाणण्यास अशक्य अशा - त्रिधामभिः - तीन लोकांमध्ये आहे तेज ज्यांचे अशा - परिक्रमत्प्राधनिकैः - सभोवार फिरणार्‍या आयुधांमुळे - दुरासदम् - जिंकण्यास अशक्य अशा - हरिम् - ईश्वराला - ब्रह्मा अपश्यत् - ब्रह्मदेव पाहता झाला ॥३१॥

तर्हि एव - त्याच वेळी - लोकविसर्गदृष्टिः - लोकांच्या उत्पत्तीचे आहे ज्ञान ज्याला असा - जगतः - व जगाचा - विधाता - उत्पन्नकर्ता असा - देवः - ब्रह्मदेव - तन्नाभिसरःसरोजम् - परमेश्वराच्या नाभीरूपी सरोवरातील कमळाला - आत्मानम् - स्वतःला - अम्भः - पाण्याला - श्वसनम् - वायूला - च - आणि - वियत् - आकाशाला - ददर्श - पाहाता झाला - अतः - यापेक्षा - परम् - दुसरे - न - न पाहाता झाला ॥३२॥

रजसा - रजोगुणाने - उपरक्तः - युक्त असा - सः - तो ब्रह्मदेव - प्रजाः - प्रजांना - सिसृक्षन् - उत्पन्न करण्याची इच्छा करणारा असा - अव्यक्तवर्त्मनि - अदृश्य आहे मार्ग ज्याचा अशा परमेश्वराच्या ठिकाणी - अभिवेशितात्मा - स्थिर केले आहे अंतःकरण ज्याने असा - विसर्गाभिमुखः - सृष्टि करण्याकडे लागले आहे चित्त ज्याचे असा - इयत् एव - कमल, स्वतः, उदक, वायु व आकाश इतकेच - कर्मबीजम् - सृष्टिकर्माचे मूळ साहित्य - दृष्ट्वा - पाहून - ईड्यम् - स्तुति करण्यास योग्य अशा - तम् - त्या परमेश्वराला - अस्तौत् - स्तविता झाला ॥३३॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय आठवा समाप्त

GO TOP