|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ
विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रमवर्णन - कुरूणाम् - कौरवांमध्ये - ऋषभः - श्रेष्ठ - अच्युतभावशुद्धः - व श्रीकृष्णाच्या भक्तीने शुद्ध - सौशील्यगुणाभितृप्तः - आणि मैत्रेयाच्या सुशीलत्वादि गुणांनी संतुष्ट झालेला असा - क्षत्ता - विदुर - द्युनद्याः द्वारि - गंगेचे द्वार जे हरिद्वार तेथे - आसीनम् - बसलेल्या - अगाधबोधम् - ज्याचे ज्ञान अगाध आहे अशा - मैत्रेयम् - मैत्रेयाला - उपसृत्य - जवळ जाऊन - पप्रच्छ - प्रश्न करिता झाला. ॥१॥ लोकः - लोक - सुखाय - सुखाकरिता - कर्माणि - क्रिया - करोति - करतात - तु - परन्तु - तैः - त्या कर्मांनी - सुखम् - सुख - न - नाही - वा - किंवा - अन्यदुपारमम् - दुसरे जे दुःख त्याची निवृत्ति - न भवति - होत नाही - प्रत्युत - उलट - ततः - त्यापासून - भूयः - पुनः - दुःखम् एव - दुःखच - विन्देत - प्राप्त करून घेईल - अतः - म्हणून - अत्र - ह्या संसारात - यत् - जे - युक्तम् - करावयास योग्य असेल - तत् - ते - भगवान् - भगवान् - नः - आम्हाला - वदेत् - सांगोत. ॥२॥ नूनम् - खरोखर - दैवात् - प्रारब्धाने - कृष्णात् - कृष्णापासून - विमुखस्य - पाठ फिरविलेल्या - अधर्मशीलस्य - धर्मरहित ज्याचा स्वभाव आहे अशा - सुदुःखितस्य - अत्यन्त पीडित अशा - जनस्य - लोकांचे - अनुग्रहाय - कल्याण करण्याकरिता - जनार्दनस्य - विष्णूच्या - भव्यानि - शुभकारक अशा - भूतानि - विभूति - इह - ह्या भूमीवर - चरन्ति - संचार करितात ॥३॥ साधुवर्य - हे संतशिरोमणे - तत् - म्हणून - नः - आम्हाला - शं वर्त्म - कल्याणकारक मार्ग - आदिश - सांग - येन - ज्या मार्गाने - संराधितः - आराधना केलेला असा - पुंसाम् - पुरुषांच्या - भक्तीपूते - भक्तीने पवित्र झालेल्या - हृदि - अन्तःकरणात - स्थितः भगवान् - असलेला परमेश्वर - पुराणम् - पुरातन - सतत्त्वाधिमम् - आत्मसाक्षात्काराने युक्त अशा - ज्ञानम् - ज्ञानाला - यच्छति - देतो ॥४॥ त्र्यधीशः - त्रिगुणात्मक मायेचा नियन्ता असा - आत्मतन्त्रः - व स्वतन्त्र असा - भगवान् - परमेश्वर - कृतावतारः - ज्याने अवतार घेतला आहे असा होत्साता - यानि - जी - कर्माणि - कर्मे - करोति - करतो - निरीहः - इच्छारहित असा - भूत्वा - होऊन - यथा - ज्या प्रकाराने - इदम् - ह्या सृष्टीला - ससर्ज - उत्पन्न करितो - च - आणि - संस्थाप्य - पालन करून - ञथा - ज्या प्रकारे - जगतः - सृष्टीची - वृत्तिम् - उपजीविका - विधत्ते - करितो ॥५॥ सः - तो परमेश्वर - पुनः - पुनः - स्वे ख - आपल्या हृदयाकाशात - इदम् - ह्या सृष्टीला - निवेश्य - लीन करून - निवृत्तवृत्तिः - ज्याने आपल्या क्रिया समाप्त केल्या आहेत असा - गुहायाम् - आत्ममायेच्या ठिकाणी - यथा - ज्या रीतीने - शेते - शयन करितो - एकः - एक - योगेश्वराधीश्वरः - आणि योग्यांचा श्रेष्ठ अधिपती असा - एतदनुप्रविष्टः - ह्या सृष्टीत प्रवेश केलेला असा - यथा - ज्या प्रकाराने - बहुधा - ब्रह्मदेवादि रूपे धारण करून अनेक प्रकारचा - आसीत् - झाला ॥६॥ अवतारभेदैः - भिन्न भिन्न अवतार घेऊन - क्रीडन् - क्रीडा करीत - द्विजगोसुराणाम् - ब्राह्मण, गाई आणि देव यांच्या - क्षेमाय - कल्याणाकरिता - कर्माणि - कर्मे - विधत्ते - करतो - सुश्लोकमौलेः - पुण्यकीर्तीचा शिरोमणी अशा भगवन्ताची - चरितामृतानि - अमृततुल्य चरित्रे - शृण्वताम् अपि - श्रवण करीत असता देखील - नः - आमचे - मनः - मन - न तृप्यति - संतुष्ट होत नाही. ॥७॥ हि - कारण - अधिलोकनाथः - लोकपालांचा अधिपती - यत्र - ज्याच्या ठिकाणी - सर्वसत्त्वनिकायभेदः - सर्व प्राण्यांच्या समुदायांचा भेद - अधिकृतः - रचलेला - प्रतीतः - दिसतो - तान् - त्या - सहलोकपालान् - लोकांचे रक्षणकर्ते राजे किंवा इन्द्रादिक देव यांसहित - लोकान् - लोकांना - च - आणि - अलोकान् - लोकालोक पर्वताच्या बाहेरील भागांना - यैः - ज्या - तत्त्वभेदैः - तत्त्वांच्या भेदांनी - अचीक्लॄपत् - रचिता झाला ॥८॥ विप्रवर्य - हे ब्राह्मणश्रेष्ठा - विश्वसृट् - जगाला उत्पन्न करणारा - आत्मयोनिः - स्वतःच आहे उत्पत्तिस्थान ज्याचे असा स्वयंभू - नारायणः - परमेश्वर - प्रजानाम् - जीवांच्या - उतच - आणि - आत्मकर्मरूपाभिधानाम् - आपल्या कर्मांच्या रूपांच्या आणि नावांच्या - भिदाम् - भेदांना - व्यधत्त - करता झाला - एतत् च - हेहि - नः - आम्हाला - वर्णय - सांगा ॥९॥ भगवन् - हे मैत्रेया - परावरेषाम् - श्रेष्ठ व कनिष्ठ वर्णाच्या लोकांचे - व्रतानि - धर्म - मे - मी - व्यासमुखात् - व्यासांच्या मुखातून - अभीक्ष्णम् - वारंवार - श्रुतानि - ऐकिले आहेत - किंतु - पण - कृष्णकथामृतौघात्ऋते - कृष्णकथारूपी अमृताच्या प्रवाहाच्या अभावी - क्षुल्लसुखावहानाम् - क्षुल्लक सुख देणार्या - तेषाम् - त्या धर्माच्या - श्रवणेन - श्रवणाने - अतृप्नुम - आम्ही कंटाळून गेलो ॥१०॥ यः - जो भगवान - पुरुषस्य - मनुष्य़ाच्या - कर्णनाडीम् - कर्णरन्ध्रात - यातः - शिरला असता - भवप्रदाम् - संसारात पाडणार्या - गेहरतिम् - गृहविषयक प्रीतीला - छिनत्ति - तोडतो - तस्य - त्या - तीर्थपदः - पवित्र आहेत पदे ज्यांची अशा श्रीकृष्णाच्या - वः सत्रेषु - तुमच्या सभांमध्ये - सूरिभिः - नारदादिक विद्वानांनी - ईड्यमानात् - स्तवन केलेल्या - अभिधानात् - नामाने - कः तृप्नुयात् - कोण तृप्त होईल ॥११॥ ते - तुझा - सखा - मित्र - भगवान् - भगवान् - कृष्णः मुनिः अपि - व्यास मुनि सुद्धा - भगवद्गुणानाम् - भगवंताच्या गुणांना - विवक्षुः - वर्णन करण्याची इच्छा करणारा - भारतम् - महाभारत - आह - रचता झाला - यस्मिन् - ज्या महाभारतात - ग्राम्यसुखानुवादैः - क्षुद्रसुखांच्या वर्णनांनी - नृणां - मनुष्यांची - मतिः - बुद्धि - हरेः - श्रीकृष्णाच्या - कथायां - कथेत - नु - निश्चयाने - गृहीता - लावली आहे. ॥१२॥ विवर्धमाना - वाढणारी - सा - ती कृष्णकथाविषयक बुद्धि - श्रद्दधानस्य पुंसः - श्रद्धाळू पुरुषाच्या ठिकाणी - अन्यत्र - इतर विषय सुखांविषयी - विरक्तिम् - वैराग्य - करोति - उत्पन्न करिते - च - आणि - हरेः - श्रीकृष्णाच्या - पदानुस्मृतिनिर्वृतस्य - चरणकमलाच्या ध्यानाने सुखी झालेल्या पुरुषाच्या - आशु - लवकर - समस्तदुःखात्ययम् - संपूर्ण दुःखाचा नाश - धत्ते - करिते ॥१३॥ अघेन - पापामुळे - हरेः कथायाम् - श्रीकृष्णाच्या कथेविषयी - विमुखान् - पराङ्मुख अशा व - शोच्यशोच्यान् - अत्यंत कीव करण्यास पात्र अशा - तान् अविदः - त्या अज्ञान्यांचे - अनुशोचे - मला वाईट वाटते - वृथावादगतिस्मृतीनाम् - निष्फल आहेत बोलणे, चालणे व मनोव्यापार ज्यांचे अशा - येषाम् - ज्यांचे - आयुः - आयुष्य - अनिमिषः देवः - सतत कार्यतत्पर असा भगवान् काल - क्षिणोति - नष्ट करितो ॥१४॥ आर्तबन्धो कौषारव - हे दुःखितांचे रक्षण करणार्या मैत्रेया ! - तत् - यास्तव - शर्मदातुः - सुख देणार्या - तीर्थकीर्तेः - पवित्र आहे यश ज्यांचे अशा - हरेः - श्रीकृष्णाच्या - कथासु - कथेतील - सारम् - सार अशा - कथाम् एव - कथेलाच - पुष्पेभ्यः - पुष्पांतून - मधु इव - मधाप्रमाणे - उद्धृत्य - काढून - अस्य शिवाय - ह्या जगाच्या कल्याणाकरिता - नः - आम्हाला - कीर्तय - सांग ॥१५॥ विश्वजन्मस्थितिसंयमार्थे - जगाची उत्पत्ति,पालन आणि नाश याकरिता - प्रगृहीतशक्तिः - ज्याने त्रिगुणात्मक शक्तीचा आश्रय केला आहे - कृतावतारः - आणि ज्याने अवतार घेतला आहे असा - सः ईश्वरः - तो परमेश्वर - अतिपूरुषाणि - अमानुष अशी - यानि कर्माणि - जी कृत्ये - चकार - करता झाला - तानि - ती - मह्यम् - मला - कीर्तय - सांग ॥१६॥ पुंसाम् - पुरुषांच्या - निःश्रेयसार्थेन - कल्याणाच्या इच्छेने - क्षत्त्रा - विदुराने - एवम् - या प्रकारे - पृष्टः - विचारलेला - भगवान् - भगवान् - सः मुनिः कौषारविः - तो ऋषि मैत्रेय - तम् - त्या विदुराला - बहु - पुष्कळ - मानयन् - मान देऊन - आह - म्हणाला ॥१७॥ साधो - हे सज्जना विदुरा - लोकान् - लोकांवर - साधु - उत्तम प्रकारे - अनुगृह्नणता - अनुग्रह करणार्या - अधोक्षजात्मनः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी आहे मन ज्याचे अशा - आत्मनः - आपल्या - कीर्तिम् - यशाला - लोके - लोकात - वितन्वता - पसरविणार्या - त्वया - तू - साधु पृष्टम् - चांगला प्रश्न केलास ॥१८॥ क्षत्तः - हे विदुरा - यत् - जो - त्वया - तू - हरिः - दुःखाचा परिहार करणारा - ईश्वरः - परमेश्वर - अनन्यभावेन - अनन्यभक्तीने - गृहीतः - धारण केलास - एतत् - हे - बादरायणवीर्यजे - व्यासापासून उत्पन्न झालेल्या - त्वयि - तुझ्या ठिकाणी - चित्रम् न - आश्चर्यकारक नाही ॥१९॥ प्रजासंयमनः - लोकांचे नियमन करणारा - भगवान् यमः - भगवान यम - माण्डव्यशापात् - मांडव्य ऋषीच्या शापामुळे - सत्यवतीसुतात् - सत्यवतीचा पुत्र जो व्यास त्यापासून - भ्रातुः - भाऊ जो विचित्रवीर्य त्याच्या - भुजिष्यायाम्क्षेत्रे - भोग्य स्त्रीच्या ठिकाणी - जातः - जन्मलास ॥२०॥ च - आणि - भगवान् व्रजन् - भगवान निजधामाला जात असता त्याने - यस्य - ज्या तुला - ज्ञानोपदेशाय - तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता - मा - मला - आदिशत् - आज्ञा केली - सः - तो - भवान् - तू - सानुगस्य भगवतः - सेवकांसहित जो भगवान् त्याला - नित्यम् - निरंतर - संमतः - संमत आहेस ॥२१॥ अथ - आता - ते - तुला - विश्वस्थित्युद्भवान्तार्थाः - जगाचे रक्षण,उत्पत्ति आणि नाश ही आहेत प्रयोजने ज्यांची अशा - योगमायोपबृंहिताः - व योगमायेने विस्तृत केलेल्या अशा - भगवल्लीलाः - भगवंताच्या लीला - अनुपूर्वशः - अनुक्रमाने - वर्णयामि - वर्णन करतो ॥२२॥ आत्मनाम् आत्मा - जीवांचा स्वरूपभूत असा - विभुः - व स्वामी - अनानामत्युपलक्षणः - अनेकपणा जीत नाही अशा बुद्धीने समजून येणारा - भगवान् आत्मा - भगवान् परमात्मा - इदम् - हे विश्व - अग्रे - सृष्टीच्या पूर्वी - आत्मेच्छानुगतौ - आत्म मायेचा लय झाला असता - एकः आस - एकटाच होता ॥२३॥ सः वा एषः द्रष्टा - तो हा पाहणारा - एकराट् - एकटाच प्रकाशणारा असा - तदा - त्यावेळी - दृश्यम् - पाहता येण्यासारख्या वस्तूस - न अपश्यत् - न पाहता झाला - च - आणि - सुप्तशक्तिः - लीन झाल्या आहेत मायादि शक्ती ज्याच्या असा - असुप्तदृक् - व लीन झाली नाही चिच्छक्ति ज्याची असा - आत्मानम् - आपल्याला - असंतम् इव - नसल्याप्रमाणे - मेने - मानता झाला ॥२४॥ महाभाग - हे महाभाग्यवान् विदुरा - सा वा - तीच - एतस्य संद्रष्टः - ह्या साक्षिरूप ईश्वराची - सदसदात्मिका - कार्यकारणात्मक - माया नाम शक्तिः - मायानावाची शक्ती - यया - जिच्या योगाने - इदम् - हे जग - विभुः- परमात्मा - निर्ममे - निर्माण करता झाला ॥२५॥ वीर्यवान् अघोक्षजः तु - चिच्छक्ति ज्याच्यात आहे असा परमेश्वर तर - कालवृत्त्या - कालाच्या शक्तीने - गुणमय्याम् मायायाम् - तीन गुणांचा क्षोभ जीत झाला आहे अशा मायेमध्ये - आत्मभूतेन पुरुषेण - आपल्या अंशाने उत्पन्न झालेल्या पुरुषाकडून - वीर्यम् आधत्त - वीर्य स्थापन करता झाला ॥२६॥ ततः - नंतर - कालचोदितात् अव्यक्तात - कालाने प्रेरणा केलेल्या मायेपासून - महत्तत्त्वम् अभवत् - महत्तत्त्व उत्पन्न झाले - विज्ञानात्मा - विज्ञान आहे स्वरूप ज्याचे असे - तमोनुदः - व अज्ञानाचा नाश करणारे असे - सः - ते महत्तत्त्व - आत्मदेहस्थम् - आपल्या शरीरात - विश्वम् - जगाला - व्यञ्जन् - प्रगट करीत - आस्ते - असते ॥२७॥ अंशगुणकालात्मा - चिदाभासरूप वीर्य, तीन गुण व काल यांनी युक्त असे - सः अपि आत्मा - ते महत्तत्त्व देखील - भगवद्दृष्टिगोचरः - भगवंताचा पाहण्याचा विषय होऊन - अस्य विश्वस्य - ह्या जगाची - सिसृक्षया - उत्पत्ती करण्याच्या इच्छेने - आत्मानम् व्यकरोत् - आपले रुपांतर करते झाले ॥२८॥ विकुर्वाणात् महत्तत्त्वात् - विकार पावलेल्या महत्तत्त्वापासून - कार्यकरणकर्त्रात्मा - कार्य, कारण आणि कर्ता ही ज्याचे स्वरूप आहेत असा - भूतेंद्रियमनोमयः - आणि पंचमहाभूते, दहा इन्द्रिये, मन आणि देवता यांचे मूळ कारण असे - अहंतत्त्वम् - अहंकारनामक तत्त्व - व्यजायत - उत्पन्न झाले ॥२९॥ वैकारिकः तैजसः च तामसः च इति - सात्त्विक, राजस आणि तामस असा - अहं - अहंकार - त्रिधा - तीन प्रकारचा - अभूत् - झाला - विकुर्वाणात् - विकार पावणार्या - अहंतत्त्वात् - सात्त्विक अहंकारापासून - मनः अभूत् - मन उत्पन्न झाले - च् - आणि - वैकारिकाः - सात्त्विक अशा - ये देवाः - ज्या देवता - ते अभूवन् - त्या झाल्या - यतः - ज्या देवतांपासून - अर्थाभिव्यञ्जनम् - शब्दस्पर्शादि विषयांचा अनुभव मिळतो ॥३०॥ ज्ञानकर्ममयानि इन्द्रयाणि - पञ्च ज्ञानेन्द्रिये आणि पञ्च कर्मेन्द्रिये - तैजसानि एव - राजस अहंकारापासून उत्पन्न झालेलीच - सन्ति - होत - च - आणि - तामसाः - तामस अहंकार - भूतसूक्ष्मादिः - सूक्ष्मभूत जो शब्द त्याचे कारण आहे - यतः - ज्या शब्दापासून - आत्मनः - आत्म्याचे - लिङ्गम् - दर्शक चिन्ह असे - खम् - आकाश - भवति - होते ॥३१॥ नभः - आकाश - कालमायांशयोगेन - काल, माया आणि चैतन्यांश यांच्या योगाने - भगवद्विक्षितम् - परमेश्वराच्या दृष्टीस पडले - नभसः अनुसृतम् - आकाशापासून उत्पन्न झालेल्या - स्पर्शम् - स्पर्शाला - विकुर्वत् - विकृत करून - अनिलम् निर्ममे - वायूला उत्पन्न करते झाले ॥३२॥ उरुबलान्वितः - मोठ्या बलाने युक्त असा - नभसा - आकाशाने - सहितः - सहित असा - विकुर्वाणः - विकार पावणारा - वायुः अपि - वायू देखील - रूपतन्मात्रम् - तेजाच सूक्ष्मभूत रूप - च - आणि - लोकस्य लोचनम् - लोकांच्या दृष्टीला प्रकाश देणारे असे - ज्योतिः - तेज - ससर्ज - उत्पन्न करता झाला ॥३३॥ अनिलेन अन्वितम् - वायूने युक्त असे - परवीक्षितम् - व ईश्वराने पाहिलेले - ज्योतिः - तेज - कालमायांशयोगतः - काल, माया व चैतन्यांश यांच्या योगाने - विकुर्वत् - विकार पावत असता - रसमयम् अम्भः - रसस्वरूप अशा उदकाला - आधत्त - उत्पन्न करते झाले ॥३४॥ ज्योतिषा अनुसंसृष्टम् - तेजाने युक्त असे - ब्रह्मवीक्षितम् - ईश्वराने पाहिलेले ते - अम्भः - पाणी - कालमायांशयोगतः - काल, माया व चैतन्यांश यांच्या योगाने - विकुर्वत् - विकार पावून - गन्धगुणाम् महीम् - गन्ध आहे गुण जिचा अशा पृथ्वीला - आघात् - उत्पन्न करते झाले ॥३५॥ भव्य - हे श्रेष्ठ विदुरा - नभाअदिनाम् भूतानाम् - आकाश आदिकरून भूतांमध्ये - यत् यत् - जे जे - अवरावरम् - उत्तरोत्तर - अभूत् - उत्पन्न झाले - तेषाम् - त्यामध्ये - परानुसंसर्गात् - पूर्वी उत्पन्न झालेल्या भूतांचा उत्तरोत्तर संबंध असल्यामुळे - यथासंख्यम् - क्रमाने - गुणान् - गुणांना - विदुः - जाणतात ॥३६॥ कालमायांशलिङ्गिनः - काल, माया आणि चैतन्यांश ज्याचे दर्शक चिन्ह म्हणजे रूपांतर, चांचल्य व चेतना ही ज्यास आहेत अशा - विष्णोः कलाः - विष्णूच्या कलारूप अशा - एते देवाः - ह्या महत्तत्त्वादिकांच्या अभिमानी देवता - नानात्वात् - भिन्न भिन्न असल्यामुळे - स्वक्रियानीशाः - स्वतःच्या सृष्टिरूप कार्याविषयी असमर्थ अशा - प्राञ्जलयः - हात जोडून - विभुम् - परमेश्वराला - प्रोचुः - म्हणाल्या ॥३७॥ देव - हे परमेश्वरा - प्रपन्नतापोपशमातपत्रम् - शरण आलेल्या लोकांच्या तापाला शमविणारे छत्रच अशा - ते - तुझ्या - पदारविन्दम् - पदकमलाला - नमाम - आम्ही नमन करितो. - यन्मूलकेताः - ज्या चरणकमलाचे तल आहे आश्रयस्थान ज्याचे असे - यतयः - योगी लोक - उरुसंसारदुःखम् - मोठ्या संसाररूपी दुःखाला - अञ्जसा - त्वरित - बहिः - बाहेर - उत्क्षिपन्ति - फेकतात ॥३८॥ धातः - हे सृष्टिकर्त्या - भगवन् ईश - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वरा - यत् - ज्या अर्थी - अस्मिन् भवे - ह्या संसारात - तापत्रयेण - दुःखत्रयाने - उपहताः - संतप्त झालेले - जीवाः - प्राणी - सुखं न लभन्ते - सुखाला प्राप्त होत नाहीत - अतः - यास्तव - आत्मन् - हे व्यापक परमेश्वरा - तव - तुझ्या - सविद्याम् - ज्ञानयुक्त अशा - अंघ्रिच्छायाम् - चरणच्छायेचा - आश्रयेम - आम्ही आश्रय करतो. ॥३९॥ यस्य - ज्या - तीर्थेपदः - पवित्र आहे चरणकमल ज्याचे अशा - ते - तुझ्या - अघमर्षोदसरिद्वरायाः पदम् - पापांचा नाश करणारे आहे उदक जिचे अशा नदीश्रेष्ठ भागीरथीचे उत्पत्ति स्थान अशा - यत् पदम् - ज्या चरणकमलाला - ऋषयः - ऋषि - मुखपद्मनीडैः - मुखकमल आहे घरटे ज्याचे अशा - छन्दःसुपर्णैः - वेदरूप पक्ष्यांनी - विविक्ते - एकांत स्थानी - मार्गन्ति - शोधितात - तत् - त्या पादकमलाला - वयम् - आम्ही - प्रपन्नाः - शरण आलेले आहोत ॥४०॥ श्रद्धया - श्रद्धेने - च - आणि - श्रुतवत्या भक्त्या - श्रवणयुक्त अशा भक्तीने - संमृज्यमाने हृदये - शुद्ध केले जाणार्या अन्तःकरणात - यत् - ज्या चरणकमलरूपी स्थानाला - अवधाय - स्थापित करून - वैराग्यबलेन ज्ञानेन - वैराग्य आहे बल ज्याचे अशा ज्ञानाने - धीराः भवन्ति - ज्ञानसंपन्न होतात - तत् - त्या - ते - तुझ्या - अङ्घ्रिसरोजपीठम् - चरणकमलरूपी स्थानाला - व्रजेम - आम्ही शरण आलो आहोत. ॥४१॥ ईश - हे ईश्वरा - विश्वस्य जन्म स्थितिसंयमार्थे - जगाची उत्पत्ति, पालन आणि संहार ही करण्याकरिता - कृतावतारस्य ते - घेतला आहे अवतार ज्याने अशा तुझ्या - पदाम्बुजम् - चरणकमलाला - सर्वे - सर्व - वयम् - आम्ही - शरणं व्रजेम - शरण आलो आहोत - यत् स्मृतम् - जे चरणकमल स्मरण केले असता - स्वपुंसाम् - आपले स्मरण करणार्या पुरुषांना - अभयम् प्रयच्छति - निर्भय असे मोक्षस्थान देते. ॥४२॥ भगवन् - हे भगवन्ता - पुर्याम् - सर्व प्राण्यांच्या शरीरात - वसतः - रहाणार्या - अपि - देखील - ते - तुझे - यत् पदाब्जम् - जे पादकमल - असति - नाशवन्त अशा - सानुबन्धे - परिवारासहित अशा - देहगेहे - देहरूपी घरावर - अहम् मम - मी व माझा - इति - असा - ऊढदुराग्रहाणाम् - धारण केला आहे दुराग्रह ज्यांनी अशा - पुंसाम् - पुरुषांना - सुदूरम् - फार दूर - अस्ति - आहे - तत् - त्या पदकमलाला - भजेम - आम्ही भजतो ॥४३॥ उरुगाय परेश - हे विशालकीर्ते परमेश्वरा - असद्वृत्तिभिः - बर्हिमुख झालेल्या - अक्षिभिः - इंद्रियांनी - ये पराहतान्तर्मनसः - ज्यांचे मन दूर ओढून नेले आहे ते - अथो - त्या कारणास्तव - ये - जे कोणी - ते पदन्यासविलासलक्ष्म्याः - तुझ्या चरणक्षेपरूपी क्रीडेच्या वैभवाचे - आश्रिताः सन्ति - आश्रित आहेत - तान् - त्या - वै नूनं - खरोखरच - न पश्यन्ति - पाहात नाहीत ॥४४॥ देव - हे परमेश्वरा - ये - जे - ते - तुझ्या - कथासुधायाः - कथारूपी अमृताच्या - पानेन - पानाने - प्रवृद्धभक्त्या - वृद्धिंगत झालेल्या भक्तीने - विशदाशयाः - ज्याचे निर्मळ अन्तःकरण झाले आहे असे - भवन्ति - होतात - ते - ते - वैराग्यसारम् - वैराग्याचे सार अशा - बोधम् - ज्ञानाला - प्रतिलभ्य - मिळवून - यथा - ज्याप्रमाणे - अञ्जसा - त्वरेने - अकुण्ठधिष्ण्यम् - वैकुण्ठलोकाला - अन्वीयुः - जातात ॥४५॥ तथा - त्याप्रमाणे - अपरे धीराः - दुसरे ज्ञानी लोक - आत्मसमाधियोगबलेन - आत्म्याच्या ठिकाणी केलेल्या चित्तस्थैर्याच्या सामर्थ्याने - बलिष्ठां प्रकृतिम् - प्रबल अशा मायेला - जित्वा - जिंकून - पुरुषं त्वाम् एव - तू जो आदिपुरुष त्याच्याच ठिकाणी - विशन्ति - प्रवेश करतात - तेषां श्रमः स्यात् - त्यांना परिश्रम होतो - ते सेवया तु - तुझ्या सेवेने तर - न - श्रम होत नाही. ॥४६॥ तत् - त्यास्तव - आद्य - हे आदिपुरुषा - त्वया - तू - लोकसिसृक्षया - जगाच्या उत्पत्तीच्या इच्छेने - त्रिभिः आत्मभिः - सत्त्वादि तीन गुणांनी - अनुसृष्टाः - क्रमाने उत्पन्न केलेले - विभक्ताः - म्हणूनच विभक्त असे - ते सर्वे वयम् - ते सर्व आम्ही देव - तत् स्वविहारतन्त्रम् - त्या आपल्या क्रीडेला साधन अशा ब्रह्माण्डाचे - ते - तुला - प्रतिहर्तवे - समर्पण करण्याकरिता - न शक्नुमः - समर्थ होत नाही. ॥४७॥ अज - हे जन्मरहिता परमेश्वरा - वयम् - आम्ही - काले - योग्य वेळी - बलिम् - भोग - यावत् - संपूर्णपणे - ते - तुला - हराम - अर्पण करू - यथा - ज्याप्रकारे - वयम् - आम्ही - अन्नम् अदाम - अन्न भक्षण करू - च - आणि - यत्र - जेथे - स्थित्वा - राहून - ते इमे लोकाः - ते हे लोक - उभयेषां बलिं हरन्तः - तू आणि आम्ही अशा दोघांना भोग देऊन - अनूहाः- निर्विघ्न होत्साते - अन्नम् अदन्ति - अन्न भक्षण करतील - तां वृत्तिम् उपकल्पय - अशी योजना कर ॥४८॥ त्वम् - तू - सान्वयानाम् सुराणाम् - कार्यासहित अशा आम्हा देवांचा - आद्यः कूटस्थः पुराणः पुरुषः असि - आदिकारण असा निर्विकार पुरातन पुरुष आहेस - देव - हे देवा - त्वम् - तू - अजः - जन्मरहित होत्साता - अजायाम् - अनादि अशा - गुणकर्मयोनौ - सत्त्वादि गुणांना आणि जन्मादि कर्मांना कारणीभूत अशा - शक्त्याम् - मायेत - तु - तर - कविम् - सर्वज्ञ अशा महत्तत्त्वरूपी - रेतः - वीर्य - आदधे - स्थापन केले ॥४९॥ आत्मन् - हे सर्व व्यापका - ततः - यास्तव - सत्प्रमुखाः - सत्त्वगुण ज्यामध्ये प्रधान आहे असे - वयम् - आम्ही - यदर्थे - ज्यांच्याकरिता - बभूविम - उत्पन्न झालो - तत् - ते - ते - तुझे - किम् - कोणते कार्य - करवाम - करू - देव - हे देवा - क्रियार्थे - सृष्टिरूप कार्याकरिता - त्वम् - तू - यदनुग्रहाणाम् नः - ज्या तुझ्यापासून आहे अनुग्रह ज्यांना अशा आम्हाला - स्वचक्षुः - आपले ज्ञान - शक्त्या - क्रियाशक्तीसह - परिदेही - अर्पण कर ॥५०॥ तृतीयः स्कन्धः - अध्याय पाचवा समाप्त |