|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ५ वा - अन्वयार्थ
सृष्टिवर्णन - देवदेव - हे देवांच्या देवा - भूतभावना - हे सृष्टि उत्पन्न करणार्या - पूर्वज - हे पूर्वोत्पन्न ब्रह्मदेवा - ते - तुला - नमः - नमस्कार - अस्तु - असो - यत् - जे - आत्मतत्त्वनिदर्शनम् - आत्मज्ञानाचा बोध करून देणारे - ज्ञानं - ज्ञान - तत् - ते - विजानीहि - सांगा. ॥१॥ प्रभो - हे समर्थ ब्रह्मदेवा ! - इदं - हे विश्व b>यतः - ज्यापासून - सृष्टं - उत्पन्न झाले - यद्रूपं - जशा स्वरूपाने प्रकाशित झाले - यदधिष्ठानं - ज्याच्या आश्रयाने राहते - यत्संस्थं - ज्यांत लीन होते - यत्परं - ज्याच्या सत्तेने चालणारे - च - आणि - यत् - जशा तर्हेचे आहे - तत् - ते - तत्त्वं - तात्त्विक ज्ञान - तत्त्वतः - यथार्थ रीतीने - वद - सांगा. ॥२॥ भूतभव्यभवत्प्रभुः - भूत, भविष्य व वर्तमान ह्या तीनही काळांवर सत्ता गाजविणारे - भवान् - आपण - हि - खरोखर - एतत् - हे - सर्वं - सगळे - वेद - जाणत आहा - विश्वं - जग - तव - तुझ्या - विज्ञानावसितं - विशिष्ट ज्ञानाने जाणले गेलेले आहे. ॥३॥ त्वं - तू - एकः एव - एकटाच - यव्दिज्ञानः - ज्यापासून विशिष्ट ज्ञान मिळविलेला - यदाधारः - ज्याच्या आश्रयांवर अवलंबून राहिलेला - यत्परः - ज्याच्या सत्तेच्या बळावर काम करणारा - यदात्मकः - ज्याच्या आत्मस्वरूपाने युक्त होत्साता - आत्ममायया - प्रकृतीच्या साहाय्याने - भूतैः - महाभूतांकडून - भूतानि - स्थावर-जंगम सृष्टीला - सृजसि - उत्पन्न करतोस. ॥४॥ ऊर्णनाभिः - ज्याच्या बेंबीतून सुतासारखे धागे निघतात असा कोळी नावाचा किडा - इव - त्याप्रमाणे - आत्मशक्तिं - स्वसामर्थ्याला - अवष्टभ्य - आवरून धरून - स्वयं - स्वतः - अक्लमः - श्रमरहित - न पराभावयन् - कोणाकडूनही जिंकिला न जाणारा - तानि - त्या प्राणिमात्रांस - आत्मन् भावयसे - आत्मस्वरूपानेच रक्षितोस. ॥५॥ विभो - हे सर्वव्यापक ब्रह्मदेवा ! - अहं हि - मी तरी - अस्मिन् - ह्या जगात - किञ्चित् - काही देखील - अन्यतः - तुझ्या स्वरूपाहून भिन्न असे - परं - श्रेष्ठ असे - न वेद - जाणत नाही - अपरं - कनिष्ठ असेहि - न - नाही - समं - समान योग्यतेचेहि - न - नाही - नामरूपगुणैः - नावांनी, रूपांनी व गुणांनी - भाव्यं - ओळखिले जाणारे - सत् - चांगले - असत् - वाईट. ॥६॥ सः - ते - भवान् - आपण - सुसमाहितः - एकाग्र अंतःकरणाने - यत् - ज्या - घोरं - भयंकर - तपः - तपश्चर्येला - अचरत् - आचरिले - तेन् - त्यामुळे - त्वं - तू - नः - आम्हाला - खेदयसे - मोहवितोस - परां शङ्कां - तुझ्याहून श्रेष्ठ दुसरा कोणी तरी श्रेष्ठ आहे अशा शंकेला - प्रयच्छसि - उत्पन्न करितोस. ॥७॥ सर्वज्ञ - हे सर्व काही जाणणार्या - सकलेश्वर - सर्वाधिपते ब्रह्मदेवा - एतत् - हे - पृच्छतः - विचारणार्या - मे - मला - तथा एव - तशा तर्हेनेच - विजानीहि - सांगा - अनुशासितः - जसे सांगितले असता - अहं - मी - इदं - हे - सर्वं - सगळे - बुध्ये - जाणीन. ॥८॥ वत्स - हे बाळा नारदा ! - कारुणिकस्य - दयाळू अशा - ते - तुझ्या - इदं - हा - विचिकित्सितं - संशय - सम्यक् - चांगला आहे - सौम्य - हे शांतमूर्ते नारदा ! - यत् - कारण - अहं - मी - परधर्मप्रदर्शने - परमेश्वराचे गुण दाखविण्याच्या कार्याला - चोदितः - प्रवृत्त केलेला आहे. ॥९॥ भो - हे नारदा ! - यथा - ज्याप्रमाणे - मां - मला - प्रब्रवीषि - म्हणतोस - तव - तुझे - तत् च अपि - ते सुद्धा भाषण - अनृतं - खोटे - न - नाही - हि यतः - कारण - मे - माझे - एतावत्त्वं - एवढे सामर्थ्य - मत्तः - माझ्याहून - परं - श्रेष्ठ अशा परमेश्वराला - अविज्ञाय - न जाणल्यामुळे तुला वाटत आहे. ॥१०॥ येन - ज्याने - स्वरोचिषा - स्वतःच्या प्रकाशाने - रोचितं - प्रकाशित केलेल्या - विश्वं - जगाला - यथा - जसा - अर्कः - सूर्य - अग्निः - अग्नि - यथा - जसा - सोमः - चंद्र - यथा - जशी - ऋक्षग्रहतारकाः - नक्षत्रे, ग्रह व चांदण्या - अहं - मी - रोचयामि - प्रकाशित करतो. ॥११॥ दुर्जयया - जिंकण्यासाठी कठीण अशा - यन्मायया - ज्याच्या मायेने - मां - मला - जगद्गुरुं - जगाचा पिता म्हणजे सृष्टिकर्ता असे - ब्रुवन्ति - म्हणतात - तस्मै - त्या - भगवते - षड्गुणैश्वर्य संपन्न अशा - वासुदेवाय - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो - धीमही - आम्ही त्याचे ध्यान करतो. ॥१२॥ यस्य - ज्याच्या - ईक्षापथे - दृष्टीसमोर - स्थातुं - उभे राहण्यास - विलज्जमानया - फारच लाजणार्या - अमुया - ह्या मायेने - विमोहिताः - अत्यंत मोहून गेलेले - दुर्धियः - आमच्यासारखे दुर्बुद्धि - मम अहं - माझे, मी - इति - याप्रमाणे - विकत्थन्ते - बडबडतात. ॥१३॥ ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञ नारदा ! - द्रव्यं - महाभूते - च - आणि - कर्म - कर्म - च - आणि - कालः - काळ - च - आणि - जीवः - जीव - एव - सुद्धा - वासुदेवात् - परमेश्वराहून - परः - श्रेष्ठ - अन्यः - दुसरा - अर्थः - पदार्थ - तत्त्वतः - तात्त्विक दृष्टी पाहता - न अस्ति - नाही. ॥१४॥ वेदा - वेद - नारायणपराः - परमेश्वरविषयकच आहेत - देवाः - देव - नारायणाङ्गजाः - परमेश्वराच्या अवयवापासून झालेले आहेत - लोकाः - त्रैलोक्य किंवा सर्व प्राणिमात्र - नारायणपराः - परमेश्वरालाच श्रेष्ठ मानणारे आहेत - मखाः - यज्ञ - नारायणपराः - परमेश्वरालाच उद्देशून चालू असतात. ॥१५॥ योगः - योग - नारायणपरः - परमेश्वरप्राप्तीकरिताच केला जातो - तपः - तपश्चर्या - नारायणपरं - परमेश्वराविषयी तत्परतेने ध्यान करूनच करावयाची असते - ज्ञानं - ज्ञान - नारायणपरं - परमेश्वरासंबंधीचेच असते - गतिः - मुक्ति - नारायणपरा - परमेश्वराशी एक होऊन जाण्यासंबंधाचीच असते. ॥१६॥ सृष्टः - उत्पन्न केलेला - अहं - मी - अपि - सुद्धा - तस्य - त्या - द्रष्टुः - साक्षीरूपाने राहणार्या - कूटस्थस्य - शरीरांत अविकृत आत्मरूपानेच राहणार्या - अखिलात्मनः - सर्वांचा आत्मा अशा - ईशस्य - परमेश्वराच्या - ईक्षया एव - नेत्रकटाक्षानेच - अभिचोदितः - आज्ञा दिलेला होत्साता - सृज्यं - उत्पन्न करण्यास योग्य अशा सृष्टीला - सृजामि - उत्पन्न करितो. ॥१७॥ निर्गुणस्य - त्रिगुणांहून निराळ्या स्थितीत राहणार्या - विभोः - सर्वव्यापी परमेश्वराच्या - मायया - प्रकृतीच्या योगे - स्थितिसर्गनिरोधेषु - रक्षण, उत्पादन व संहरण ह्या तीन कार्यानिमित्त - सत्त्वं - सत्त्व - रजः - रज - तमः - तम - इति - असे - त्रयः - तीन - गुणाः - गुण - गृहीताः - स्वीकारले. ॥१८॥ द्रव्यज्ञानक्रियाश्रयाः - महाभूते, देवता व इंद्रिये ह्यांच्या उत्पत्तीला कारणीभूत - गुणाः - तीन गुण - नित्यदा - नेहमी - मुक्तं - कशांतही न गुरफटल्या जाणार्या - मायिनं - परंतु मायोपाधीने युक्त अशा - पुरुषं - जीवात्म्याला - कार्यकारणकर्तृत्वे - कार्य, कारण व कर्ता या तीनही बाबतीत - बन्धन्ति - बांधून टाकतात. ॥१९॥ ब्रह्मन् - हे ब्रह्मज्ञ नारदा ! - सः - तो - एषः - हा - एभिः - ह्या - त्रिभिः - तीन - लिङ्गैः - चिन्हानी - स्वलक्षितगतिः - भक्तांनी जाणिली आहे गति ज्याची असा - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न - अधोक्षजः - इंद्रियांना अगोचर असा परमेश्वर - सर्वेषां - सर्वांचा - च - आणि - मम - माझा - ईश्वरः - सत्तारूपाने चालक आहे. ॥२०॥ मायेशः - प्रकृतीला ताब्यात ठेवणारा परमेश्वर - स्वया - स्वतःच्या - मायया - प्रकृतीने - विबुभूषुः - अनेक प्रकारे होण्याची इच्छा करणारा असा होत्साता - यदृच्छया - सहजगत्या - आत्मन् - आत्म्यामध्ये - प्राप्तं - प्राप्त झालेल्या - कालं - काळाला - कर्म - कर्माला - च - आणि - स्वभावं - स्वभावाला - उपाददे - स्वीकारिता झाला. ॥२१॥ पुरुषाधिष्ठितात् - ईश्वराने अंगीकृत केलेल्या - कालात् - काळामुळे - गुणव्यतिकरः - त्रिगुणांचे न्यूनाधिक्याने मिश्रण - स्वभावतः - स्वाभाविक रीतीने - परिणामः - विकास - कर्मणः - प्रकृतीच्या क्रियेपासून - महतः - महतत्त्वाचा - जन्म - जन्म - अभूत - झाला. ॥२२॥ रजःसत्त्वोपबृंहितात् - रजोगुण व तमोगुण यांनी वाढलेल्या - विकुर्वाणात् - विकार पावलेल्या - महतः - महत्तत्त्वापासून - तु - तर - द्रव्यज्ञानक्रियात्मकः - महाभूते, देवता व इंद्रिये यांनी युक्त असा - तमःप्रधानः - तमोगुणाचे प्राधान्य असलेला - अभवत् - उत्पन्न झाला - अहंकारः - अहंकार - इति - या नावाने - प्रोक्तः - सांगितलेला - सः - तो - तु - तर - विकुर्वन् - विकारयुक्त होत्साता - त्रिधा - तीन प्रकारचा - समभूत् - झाला. ॥२३॥ प्रभो - हे समर्था नारदा ! - यद्भिदा - ज्या अहंकाराचे भेद - वैकारिकः - सात्त्विक - च - आणि - तैजसः - राजस - च - आणि - तामसः - तामस - इति - असे - ज्ञानशक्तिः - सात्त्विकाहंकाराची देवतोत्पादक शक्ति - क्रियाशक्तिः - राजसाहंकाराची इंद्रियोत्पादक शक्ति - द्रव्यशक्तिः - तामसाहंकाराची भूतोत्पादक शक्ति - इति - अशा ह्या तीन अहंकाराच्या शक्ति होत. ॥२४॥ भूतादेः - पंचमहाभूतांचे आदिकरण अशा - विकुर्वाणात् - विकाराला पावणार्या - तामसात् - तामसाहंकारापासून - अपि - सुद्धा - नभः - आकाश - अभूत् - झाले - तस्य - त्याचे - मात्रा - सूक्ष्म रूप - च - आणि - गुणः - गुण - शब्दः - शब्द - यत् - जे - द्रष्टटदृश्ययोः - पहाणारा पुरुष व पाहण्याची वस्तु ह्यांचे - लिङ्गं - दयोतक होय. ॥२५॥ अथ - नंतर - विकुर्वाणात् - विकार पावणार्या - नभसः - आकाशापासून - स्पर्शगुणः - स्पर्शगुणयुक्त - अनिलः - वायु - अभूत् - झाला - परान्वयात् - दुसर्याशी म्हणजे पूर्वोक्त आकाशाशी संबंध असल्यामुळे - शब्दवान् - शब्दगुणानेही युक्त - प्राणः - शरीराला धारण करणे - ओजः - इंद्रियांची पुष्टी - सहः - मनाची पुष्टी - च - आणि - बलं - शरीराची शक्ती ही कार्ये करतो. ॥२६॥ कालकर्मस्वभावतः - काल, कर्म व स्वभाव ह्यायोगे - विकुर्वाणात् - विकृत होणार्या - वायोः - वायूपासून - अपि - सुद्धा - वै - खरोखर - रूपवत् - रूपगुणाने युक्त - स्पर्शशब्दवत् - आणि स्पर्श व शब्द ह्या दोन्ही गुणांनी युक्त असे - तेजः - तेज - उदपदयत - उत्पन्न झाले. ॥२७॥ विकुर्वाणात् - विकार पावणार्या - तेजसः - तेजापासून - तु - तर - रसात्मकं - रसगुणाने युक्त - अंभः - उदक - आसीत - झाले - च - आणि - अंभः - ते उदक - परान्वयात् - दुसर्या पूर्वोक्त आकाश, वायु व तेज ह्यांशी संबंध असल्यामुळे - रूपवत् - रूपगुणयुक्त - स्पर्शवत् - स्पर्शगुणाने युक्त - च - आणि - घोषवत् - शब्दगुणयुक्त. ॥२८॥ विकुर्वाणात् - विकार पावणार्या - अंभसः - उदकापासून - तु - तर - गंधवान् - गंध गुणाने युक्त - विशेषः - विशिष्ट पृथ्वीरूप पदार्थ - अभूत् - झाला - परान्वयात् - पूर्वोक्त आकाश, वायू, तेज व उदक ह्यांशी संबंध असल्यामुळे - रसस्पर्शशब्दरूपगुणान्वितः - रस, स्पर्श, शब्द व रूप ह्या चार गुणांनी युक्त आहे. ॥२९॥ वैकारिकात् - सात्त्विक अहंकारापासून - मनः - मन - जज्ञे - उत्पन्न झाले - दिग्वातार्कप्रचेतोऽश्विन्हीन्द्रोपेन्द्रमित्रकाः - दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनीकुमार, अग्नि, इंद्र, विष्णु, मित्र व ब्रह्मदेव ह्या - दश - दहा - देवाः - देवता - वैकारिकाः - सात्त्विकाहंकारोत्पन्न आहेत. ॥३०॥ विकुर्वाणात् तैजसात् तु - राजस अहंकारात विकार होऊन त्यापासून - दश इंद्रियाणि - दहा इंद्रिये - अभवन् - उत्पन्न झाली - ज्ञानशक्तिः - ज्ञानाला आश्रय करून राहणारी शक्ती अशी - बुद्धिः - बुद्धि - क्रियाशक्तिः - कार्याश्रयभूत शक्ती असा - प्राणः - प्राण - तु - तर - तैजसौ - राजसाहंकारोत्पन्न - श्रोत्रत्वग्घ्राणदृग्जिव्हावाग्दोर्मेढ्राङ्घ्रिपायवः - कान, त्वचा, नाक, नेत्र, जीभ, वाणी, हात, शिस्न, पाय, गुद ही दहा इंद्रिये. ॥३१॥ ब्रह्मवित्तम - ब्रह्मज्ञानी पुरुषात श्रेष्ठ अशा हे नारदा - यदा - ज्या वेळी - भूतेन्दियमनोगुणाः - पंचमहाभूते, दहा इंद्रिये, मन व तीन गुण यांनी युक्त - एते - हे - भावाः - पदार्थ - असंगताः - एकमेकात मिश्रित न झालेले असे हे - यदा - जेव्हा - आयतननिर्माणे - शरीर उत्पन्न करण्याविषयी - न शेकुः - समर्थ झाले नाहीत - तदा - तेव्हा - भगवच्छक्तिचोदिताः - ईश्वरशक्तीने प्रेरणा केलेले असे ते - सदसत्त्वं - न्यूनाधिक भागांना - उपादाय - घेऊन - च - आणि - अन्योन्यं - एकमेकांत - संहत्य - मिश्रित होऊन - अदः - हे जग - उभयं - व्यष्टिसमष्टिरूपाचे म्हणजे अवयवरूपाचे आणि समुदायरूपाचे किंवा स्थावरजंगमात्मक असे - हि - खरोखर - ससृजुः - उत्पन्न करते झाले. ॥३२-३३॥ कालकर्मस्वभावस्थः - काल, कर्म, व स्वभाव ह्या ठिकाणी राहणारा - जीवः - परमात्मा - तत् - त्या - उदाकेशयं - पाण्यात पडलेल्या - अजीवं - अचेतन - अंडं - शरीररूपी अंडाला - वर्षपूगसहस्रान्ते - हजारो वर्षे लोटून गेल्यानंतर - अजीवयत् - सचेतन करता झाला. ॥३४॥ सहस्रोर्वङ्घ्रिबाव्हक्षः - हजारो मांडया, पाय, बाहू व नेत्र आहेत ज्याला असा - सहस्राननशीर्षवान् - व हजारो मुखे व मस्तके आहेत ज्याला असा - सः एव - तोच - पुरुषः - पुरुष - अंडं - त्या अंडाला म्हणजे चोवीस तत्त्वांच्या बनलेल्या अंडकोशाला - निर्भिदय - फोडून - तस्मात् - त्यातून - निर्गतः - बाहेर पडला. ॥३५॥ इह - येथे - मनीषिणः - ज्ञानी लोक - यस्य - ज्या पुरुषाच्या - अवयवैः - शरीराच्या हस्तपादादि अवयवांनी - कटयादिभिः - पृष्ठभागाकडील कमरेच्या भागांनी - अधः - खालील - सप्त - सात - जघनादिभिः - कमरेच्या पोटाकडील भागांनी - ऊर्ध्वं - वरील - सप्त - सात - लोकान् - लोकांना - कल्पयन्ति - कल्पितात. ॥३६॥ ब्रह्म - ब्राह्मण - पुरुषस्य - पूर्वोक्त पुरुषाचे - मुखं - तोंड होय - क्षत्रं - क्षत्रिय - एतस्य - ह्या पुरुषाचे - बाहवः - बाहु होत - वैश्यः - वैश्य - भगवतः - पुरुषाच्या - ऊर्वोः - मांडीपासून होत - शूद्रः - शूद्र - पद्भ्यां - पायापासून - अभ्यजायत - झाला. ॥३७॥ भूर्लोकः - पृथ्वीमंडल - पद्भ्यां - पुरुषाच्या दोन पायांनी - कल्पितः - कल्पिले आहे - भुवर्लोकः - अंतरिक्ष - अस्य - ह्या पुरुषाच्या - नाभितः - बेंबीपासून - स्वर्लोकः - स्वर्गलोक - महात्मनः - पुरुषाच्या - हृदा - हृदयाने - महर्लोकः - व महर्लोक - उरसा - वक्षःस्थलाने कल्पिला आहे. ॥३८॥ जनलोकः - जनलोक - ग्रीवायां - कंठाचे ठिकाणी - च - आणि - तपोलोकः - तपोलोक - स्तनव्दयात् - दोन स्तनांपासून किंवा दोन ओठांपासून - सत्यलोकः - सत्यलोक - तु - तर - मूर्धभिः - मस्तकांनी - ब्रह्मलोकः - वैकुंठलोक - सनातनः - नित्य व वरील चौदा लोकांहून निराळा व श्रेष्ठ आहे. ॥३९॥ अतलं - अतल - तत्कटयां - पुरुषाच्या कंबरेचे ठिकाणी - वितलं - वितल - विभोः - सर्वव्यापक पुरुषाच्या - ऊरुभ्यां - दोन मांडयांनी - शुद्धं - पवित्र - सुतलं - सुतल - जानुभ्यां - गुडघ्यांनी - च - आणि - तलातलम् - तलातल - तु - तर - जङ्गभ्यां - पोटर्यांनी - क्लृप्तं - कल्पिले आहे. ॥४०॥ महातलं - महातल - तु - तर - गुल्फाभ्यां - घोटयांनी - रसातलं - रसातल - प्रपदाभ्यां - पायांच्या अग्रांनी - पातालं - पाताल - पादतलतः - तळपायापासून - इति - असा - पुमान् - पुरुष - लोकमयः - चौदा लोकांनी बनला आहे. ॥४१॥ भूर्लोकः - भूलोक - अस्य - पुरुषाच्या - पद्भ्यां - पायांनी - भुवर्लोकः - अंतरिक्ष - नाभितः - बेंबीमुळे - कल्पितः - कल्पिला आहे - स्वर्लोकः - स्वर्ग - मूध्ना - मस्तकाने - कल्पितः - कल्पिला आहे - इति - अशा रीतीने - वा - विकल्पाने म्हणजे निराळ्या रीतीने - लोककल्पना - ह्या लोकांच्या बाबतीत कल्पना आहे. ॥४२॥ स्कंध दुसरा - अध्याय पाचवा समाप्त |