|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध २ रा - अध्याय ४ था - अन्वयार्थ
राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात - औतरेयः - उत्तरापुत्र परीक्षित - इति - याप्रमाणे - आत्मनः - आत्म्याच्या - तत्त्वनिश्चयं - तात्विक निश्चयाला दर्शविणार्या - वैयासकेः - व्यासपुत्र शुकाचार्याच्या - वचः - भाषणाला - उपधार्य - निश्चितपूर्वक आकलन करून - कृष्णे - श्रीकृष्णाच्या ठिकाणी - सतीं - चांगल्या - मतिं - बुद्धीला - व्यधात् - ठेविता झाला. ॥१॥ आत्मजायासुतागारपशुद्रविणबन्धुषु - शरीर, स्त्री, पुत्र, घर, गजादि पशु, द्रव्य व भाऊबंद यांचे ठिकाणी - च - आणि - अविकले - निष्कंटक अशा - राज्ये - राज्याचे ठिकाणी - नित्यं - नेहमी - विरूढां - उत्पन्न होऊन वाढलेल्या - ममतां - ममत्वाला - जहौ - सोडता झाला. ॥२॥ सत्तमाः - साधुश्रेष्ठ शौनकादि ऋषि हो ! - यत् - जे - मां - मला - पृच्छथ - विचारता - इमम् एव - ह्याच - अर्थं - अर्थाबद्दल - कृष्णानुभावश्रवणे - श्रीकृष्णाच्या लीला ऐकण्याविषयी - श्रद्दधानः - श्रद्धायुक्त - च - आणि - महामनाः - थोर अंतःकरणाच्या अशा परीक्षिताने - पप्रच्छ - विचारले. ॥३॥ संस्थां - मृत्यूला - विज्ञाय - जाणून - च - आणि - यत् - जे - त्रैवर्गिक - धर्मार्थकामसंबंधी - कर्म - कर्माला - संन्यस्य - टाकून - भगवति - सर्वगुणसंपन्न अशा - वासुदेवे - श्रीकृष्णाचे ठिकाणी - दृढं - बळकट अशा - आत्मभावं - आत्मैक्याला - गतः - प्राप्त झाला. ॥४॥ अनघ - हे निष्पाप - ब्रह्मन् - ब्रह्मज्ञ शुकाचार्या - सर्वज्ञस्य - सर्व जाणणार्या अशा - तव - तुझे - वचः - भगवत्कथारूपी भाषण - समीचीनं - सर्वोत्कृष्ट होय - हरेः - भगवंताच्या - कथाम् - कथा - मह्य - मला - कथयतः - तू सांगत असता - तमः - अज्ञानांधकार - विशीर्यते - नष्ट होतो. ॥५॥ भूयः एव - पुन्हाही - विवित्सामि - जाण्याची इच्छा करतो - विभुः - व्यापक - भगवान् - परमेश्वर - आत्ममायया - स्वतःच्या प्रकृतीच्या सहाय्याने - यथा - ज्याप्रमाणे - अधीश्वरैः - ब्रह्मदेवादि समर्थांकडून - दुर्विभाव्यं - कल्पना न करण्याजोगा - इदं - ह्या - विश्वं - जगाला - सृजते - उत्पन्न करितो - यथा - ज्याप्रमाणे - गोपायति - रक्षितो - पुनः - फिरून - यथा - ज्याप्रमाणे - संयच्छते - संहार करतो. ॥६॥ पुरुशक्तिः - अपरिमित शक्ती असलेला - परः - श्रेष्ठ - पुमान् - पुरुष, परमेश्वर - यां यां - ज्या ज्या - शक्तिं - शक्तीला - उपाश्रित्य - स्वीकारून - क्रीडन् - खेळ खेळणारा असा - करोति - कार्य करितो - च - आणि - आत्मानं - स्वतःला - क्रीडयन् - खेळविणारा - विकरोति - पुष्कळ प्रकारे स्वतः रूपे घेऊन अनेक कार्ये करितो. ॥७॥ ब्रह्मन् - अहो ब्रह्मज्ञ शुकाचार्य हो ! - च - आणि - नूनं - खरोखर - भगवतः - सर्वगुणसंपन्न अशा - अद्भुतकर्मणः - व ज्यांची पराक्रमाची कृत्ये आश्चर्योत्पादक आहेत अशा - हरेः - श्रीकृष्णाचे - चेष्टितं - क्रीडादि कार्य - कविभिः - विद्वानांकडून - अपि - सुद्धा - दुर्विभाव्यं - अतर्क्य - इव - अशाप्रमाणे - आभाति - भासते. ॥८॥ एकः - एकटा - जन्मभिः - अनेक जन्म घेऊन - भूरिशः - पुष्कळप्रकारे - तु - तर - कर्माणि - कृत्ये - कुर्वन् - करणारा असा होत्साता - यथा - ज्याप्रमाणे - प्रकृतेः - मायेच्या - गुणान् - तीन गुणांना - तु - तर - युगपत् - एकदम - अपि वा - किंवा - क्रमशः - अनुक्रमाने - बिभर्ति - धारण करितो - भगवान् - सर्वगुणसंपन्न - भवान् - आपण - यथा - ज्याअर्थी - शाब्दे - वेदादि शब्दांनी वर्णिल्या जाणार्या - च - त्याचप्रमाणे - परस्मिन् - श्रेष्ठ अनुभविक अशा - ब्रह्मणि - ब्रह्मांत - खलु - खरोखर - निष्णातः - निपुण आहा त्याअर्थी - एतत् - ह्या - मे - माझ्या - विचिकित्सितं - संशयाला - ब्रवीतु - सांगा, म्हणजे संशयांचा निरास करा. ॥९-१०॥ इति - याप्रमाणे - राज्ञा - परीक्षित राजाने - हरेः - श्रीकृष्णाच्या - गुणानुकथने - गुणवर्णनाविषयी - उपामन्त्रितः - प्रार्थना केलेला शुकाचार्य - हृषीकेशं - जितेंन्द्रिय अशा परमेश्वराला - अनुस्मृत्य - स्मरून - प्रतिवक्तुं - बोलण्याला - प्रचक्रमे - सुरूवात करिता झाला. ॥११॥ भूयसे - सर्वोत्कृष्ट माहात्म्याने युक्त अशा - असदुद्भवस्थाननिरोधलीलया - जगाची उत्पत्ति, स्थिती व संहार ह्यांना निमित्तभूत अशा लीलेने - गृहीतशक्तित्रितयाय - तीन शक्ति धारण करणार्या अशा - देहिनां - आणि देहधारी प्राणिमात्रांच्या - अंतर्भवाय - आत राहणार्या अशा - अनुपलक्ष्यवर्त्मने - न जाणता येणारा आहे मार्ग ज्याचा अशा - परस्मै - श्रेष्ठ - पुरुषाय - परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१२॥ सद्वृजिनच्छिदे - साधूंच्या पापांचा नाश करणार्या - असतां - दुष्टांच्या - असंभवाय - उत्पत्तीलाच होऊ न देणार्या - अखिलसत्त्वमूर्तये - जेथे मूर्तिमान संपूर्ण सत्त्वगुण पूर्ण रीतीने वास्तव्य करीत आहे अशा - पुनः - फिरून - पारमहंस्ये - परमहंसानी आचरिलेल्या - आश्रमे - आश्रमात - व्यवस्थितानां - राहिलेल्या - पुंसां - पुरुषांच्या - अनुमृग्यदाशुषे - आत्मज्ञान देणार्या परमेश्वराला - भूयः - पुनः - नमः - नमस्कार असो. ॥१३॥ सात्वतां - भक्तांचा - ऋषभाय - पालक अशा - कुयोगिनां - व अभक्तांपासून - विदूरकाष्ठाय - दूर अंतरावर राहणार्या - मुहुः - वारंवार - नमः नमः - पुनः पुनः नमस्कार - अस्तु - असो - निरस्तसाम्यातिशयेन - सारखेपणा व विशिष्टपणा ज्यातून पार नाहीसा झाला आहे अशा - राधसा - ऐश्वर्याने - स्वधामनि - स्वतःचे राहण्याचे स्थान अशा - ब्रह्मणि - ब्रह्मामध्ये - रंस्यते - रममाण होणार्या परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१४॥ यत्कीर्तनं - ज्यांचे गुणकीर्तन - यत्स्मरणं - ज्याचे स्मरण - यदीक्षणं - ज्याकडे पाहणे - यद्वन्दनं - ज्याला नमन करणे - यच्छ्रवणं - ज्याच्या गुणांचे श्रवण - यदर्हणं - ज्याचे पूजन - लोकस्य - प्राणिमात्रांच्या - कल्मषं - पापाला - सदयः - ताबडतोब - विधुनोति - दूर करते - तस्मै - त्या - सुभद्रश्रवसे - अत्यंत कल्याणप्रद कीर्तीने युक्त अशा श्रीकृष्णाला - नमः नमः - वारंवार नमस्कार असो. ॥१५॥ विचक्षणाः - ज्ञानी पुरुष - यच्चरणोपसादनात् - ज्याच्या चरणकमलाच्या सेवनाने - अन्तरात्मनः - अंतःकरणाच्या - उभयतः - ऐहिक व पारलौकिक - संगं - आसक्तीला - व्युदस्य - टाकून देऊन - गतक्लमाः - श्रमरहित होत्साते - हि - खरोखर - ब्रह्मगतिं - मोक्षमार्गाला - विन्दन्ति - मिळवितात - तस्मै - त्या - सुभद्रश्रवसे - कल्याणप्रद कीर्तीच्या परमेश्वराला - नमः नमः - वारंवार नमस्कार असो. ॥१६॥ तपस्विनः - तपश्चर्या करणारे - दानपराः - दान करणारे - यशस्विनः - कीर्ती मिळविणारे - मनस्विनः - थोर मनाचे पुरुष - मंत्रविदः - वेदमंत्रांना जाणणारे - सुमंगलाः - व सदाचारी पुरुष - यदर्पणं - ज्याच्या अर्पणाला - विना - वगळून - क्षेमं - कल्याणाला - न विन्दन्ति - मिळवीत नाहीत - तस्मै - त्या - सुभद्रश्रवसे - ज्याचे गुणश्रवण कल्याणप्रद आहे अशा परमेश्वराला - नमः नमः - पुनः पुनः नमस्कार असो. ॥१७॥ किरातहूणांध्रपुलिन्दपुल्कसाः - किरात, हूण, तेलंगी, पुलिंद व चांडाळ - आभीरकंकाः - आभीर व कंक - यवनाः - यवन - खसादयः - खस आदि करून लोक - च - आणि - अन्ये - दुसरे - ये - जे - पापाः - पापी पुरुष - यदुपाश्रयाश्रयाः - ज्याच्या आश्रितांचा आशय करणारे असे - शुद्ध्यन्ति - शुद्ध होतात - तस्मै - त्या - प्रभविष्णवे - पराक्रमशाली परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥१८॥ सः - तो - एषः - हा - आत्मवतां - ज्ञान्यांचा - आत्मा - आत्मरूपाने सर्वत्र राहणारा - अधीश्वरः - श्रेष्ठ ऐश्वर्याने शोभणारा किंवा सर्व ईश्वरांमध्ये वर्चस्वाने राहणारा - त्रयीमयः - तीन वेदरूपी b>धर्ममयः - धर्मस्वरूपी - तपोमयः - तपोमूर्ति - गतव्यलीकैः - निष्कपट अशा - अजशङ्करादिभिः - ब्रह्मदेव, शंकर इत्यादिकांनी - वितर्क्यलिङ्गः - आश्चर्याने पाहण्याजोगी आहे मूर्ती ज्याची असा - भगवान् - परमेश्वर b>प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥१९॥ श्रियः - लक्ष्मीचा - पतिः - स्वामी - यज्ञपतिः - यज्ञांचा अधिपति - प्रजापतिः - लोकरक्षक - धियां - बुद्धीचा - पतिः - चालक - लोकपतिः - त्रैलोक्याचा पालक - धरापतिः - पृथ्वीपति - अन्धकवृष्णिसात्वतां - अन्धक, वृष्णि व सात्वत् ह्या वंशातील यादवांचा - पतिः - स्वामी - च - आणि - गतिः - रक्षक - सतां - साधूंचा - पतिः - कैवारी - भगवान् - सर्वगुणसंपन्न श्रीकृष्ण - मे - माझ्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥२०॥ कवयः - ज्ञानी पुरुष - यदङ्घ्र्यनुध्यानसमाधिधौतया - ज्याच्या पादचिंतनरूपी समाधीने शुद्ध झालेल्या b>धिया - बुद्धीने - आत्मनः - आत्म्याच्या - तत्त्वं - तत्त्वाला - हि - खरोखर - अनुपश्यन्ति - पाहतात - च - आणि - एतत् - ह्याला - यथारुचं - आवडीप्रमाणे - वदन्ति - वर्णितात. - सः - तो - भगवान् - सर्वगुणसंपन्न - मुकुन्दः - मुक्तिदाता श्रीकृष्ण - मे - माझ्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥२१॥ पुरा - पूर्वी - अजस्य - ब्रह्मदेवाच्या - हृदि - हृदयांत - सतीं - चांगल्या - स्मृतिं - पूर्वीच्या आठवणीला - वितन्वता - देणार्या - येन - ज्या ईश्वराने - प्रचोदिता - प्रेरणा दिलेली - स्वलक्षणा - आत्मलक्षणाने युक्त अशी - सरस्वती - वाग्देवी - आस्पतः - तोंडातून - किल - खरोखर - प्रादुरभूत् - आपण होऊन प्रगट झाली - सः - तो - ऋषीणां - ऋषींचा - ऋषभः - पुरस्कर्ता - मे - माझ्यावर - प्रसीदतां - प्रसन्न होवो. ॥२२॥ यः - जो - विभुः - सर्वव्यापी - पुरुषः - परमेश्वर - महद्भिः - मोठया - भूतैः - पृथ्वी वगैरे पाच भूतांकडून - इमाः - ह्या - पुरः - शरीरांना - निर्माय - उत्पन्न करवून - यत् - ज्या कारणास्तव - अमूषु - ह्या शरीरात - शेते - शयन करितो - षोडशात्मकः - आणि सोळा कलांनी पूर्ण होत्साता - षोडश - सोळा - गुणान् - गुणांना - भुङ्क्ते - सेवितो - सः - तो - भगवान् - सर्वैश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण - मे - माझ्या - वचांसि - वाणीला - अलंकृषीष्ट - सुशोभित करो. ॥२३॥ तस्मै - त्या - अमिततेजसे - अतितेजस्वी अशा - भगवते - सर्वगुणसंपन्न - व्यासाय - व्यासाला - नमः - नमस्कार असो - सौम्याः - शांतचित्ताचे शुद्ध सात्त्विक भक्त - ज्ञानमयं - ज्ञानरूपी - यन्मुखाम्बुरुहासवम् - ज्याच्या मुखकमलातील रसाला - पपुः - पिते झाले. ॥२४॥ राजन् - हे परीक्षित राजा ! - हरिः - परमेश्वर - आत्मनः - स्वस्वरूपाने उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाला - यत् - जे - साक्षात् - स्वतः प्रत्यक्ष - आह - बोलला - एतत् एव - हेच - वेदगर्भः - ज्याच्या उदरात संपूर्ण वेद साठलेले आहेत अशा - आत्मभूः - ब्रह्मदेव - विपृच्छते - अनेक प्रकारे विचारणार्या - नारदाय - नारदाला - अभ्यधात् - सांगता झाला. ॥२५॥ स्कंध दुसरा - अध्याय चवथा समाप्त |